Shivkanya aani Mavle

मराठी लोकांचे एकत्रीकरण आणि येथील लोकांनी एकत्र राहणे हा उद्देश.

28/01/2024

चला परत एकदा सिद्धार्थ च चित्रपट पाहू या
तारीख : ४ फेब्रुवारी
वेळ : दुपारी ४ वाजता
ठिकाण : आपले नेहमीचे स्टार गलेरिया, डेरा, दुबई, गोल्ड सुख मेट्रो स्टेशन जवळ
संपर्क : ९७१५२७४४३३८९
971 52 052 744 3389

15/12/2023

Types of share market

1. Equity market
a. NSE
b. BSE
2. Commodity Market
a. Agri (MCX)
b. Non Agri (NCDEX)
3. Currency Market
a. Currency Pairs (NSE)

23/08/2023

Proud moment for
Sucessful landing on the Moon. 👏👏💐💐

सॉफ्ट लँडिंग यशस्वी..🔥🔥🔥

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत जगातला पहिला देश ठरला.💪वंदे मातरम्.🇮🇳

Photos from Shivkanya aani Mavle 's post 14/08/2023

भारतीय स्वतंत्र दीन झेंडा वंदन ल इथे जाऊ शकता

13/08/2023

दुबई मध्ये स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी consulat मध्ये जाऊ शकता, फक्त पासपोर्ट किंवा एमिरेट्स आयडी घेऊन जाणे.

जय हिंद
जय महाराष्ट्र
जय भवानी जय शिवाजी

02/08/2023

मी दामले,पुण्यात सदाशिव पेठेत , नागनाथ पार जवळ,राहतो, माझी बायको, पुण्यातील senior सिटिझन साठी accompany and assistance देते (ज्यांना घराबाहेर जाऊन काही कामे (जसे बँक, पोस्ट, dental, eye, medical test किंवा short duration family function attend )करायची आहेत पण सोबत यायला कोणी नाही अशा ज्येष्ठांसाठी हे काम करते, आणि मी, फक्त पुण्यात ज्येष्ठ नागरिक, आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला यांच्यासाठी रात्री ९ ते सकाळी ९ अशी टॅक्सी सेवा देतो. (पुणे airport व पुणे रेल्वे station साठी) आमच्या या सेवेचे नाव *प्रवासनीस* असे आहे.

19/07/2023
18/07/2023

*🌹अधिक मास व श्रावण मास 🌹*

प्रश्न एकच *ह्यावेळी श्रावण महिना २ महिने आहे का? सोमवाराचे ८ सोमवार उपवास करायचे का?* आम्ही दरवर्षी नवनाथ पारायण वाचतो मग ते कधी वाचन करायचं? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.

ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच ते म्हणजे *श्रावण महिना दरवर्षी प्रमाणे एकच महिना आहे*.

कॅलेंडरवर *अधिक श्रावण, निज श्रावण असं लिहलेलं असल्यामुळे श्रावण महिन्याबाबत संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे*. त्यातच, Social media व वर्तमानपत्र ह्यावरही वेगवेगळी माहिती देणारे मतप्रदर्शन बघायला मिळत आहे.

सविस्तर सांगायचं झाल्यांस *सौरवर्ष व चांद्रवर्ष यांच्यांत दरवर्षी साडेएकरा दिवसांचा फरक पडतो*.कालगणनेच्या सोयीसाठी, ह्यांत मेळ घालण्यासाठी दर ३२ महिन्यां नंतर एक अधिक महिना घेतला जातो. व हे अंतर पुर्ववत केले जाते. अधिक महिन्यांत रविची संक्रांत होत नाही.ह्या महिन्यांस पुढील महिन्याचे नाव असते. जसे, ह्यावर्षी आषाढ महिन्यानंतर व श्रावण महिन्यापुर्वी अधिक महिना येत असल्यांने अधिक श्रावण असे म्हटले आहे. साधारणतः फाल्गुन ते अश्विन हे महिनेच अधिक महिने येतात. अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास, मल मास, धोंड्याचा महिना अशी नावंही प्रचलित आहेत.

वर्तमानपत्र व Social media वरील चर्चेचा विषय बघता उत्तर भारतांत पौरोहित्य करणार्‍या मंडळींनी,ज्योतिषींनी ८ सोमवार करा, दोन महिने श्रावण महिना आहे, असे मत प्रदर्शित केलं आहे. त्यांच्या व आपल्याकडील *कालगणनेत ही फरक* आहे. *त्या भागांत पौर्णिमा ते पौर्णिमा महिना असतो. आपल्याकडे अमावस्या ते अमावस्या महिना असतो*.

*१७ जुलै २०२३ ला मध्यरात्री अमावस्या संपुन १८ जुलै २०२३ पासुन अधिक महिना* सुरु होत आहे.तर *१६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ०३ वाजुन ०७ मिनिटांनी अधिक महिना संपेल*, व नेहमीप्रमाणे, दरवर्षी प्रमाणे श्रावण महिना सुरु होणार आहे. अधिक श्रावण व निज श्रावण ह्यामुळे संभ्रम झाला असला तरी त्या महिन्यांची विभागणी वरील प्रमाणे आहे.*थोडक्यात,१८ जुलै ते १६ ऑगस्ट २०२३ अधिक मास व १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ हा श्रावण मास आहे* त्यामुळे, जावायाला, ब्राम्हणाला, गाईला वाण देणे, अधिक माहात्म्य वाचणे, आईची पुजा करुन आईची ओटी भरणे, देवालयांतील देवांना, गंगेला वाण देणे हे सर्व १८ जुलै ते १५ ऑगस्ट ह्या दरम्यांन करायचं आहे. तसेच, श्रावणांतील व्रत-वैकल्य, सोमवार व इतर उपवास, पारायण वाचन हे सगळं १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ ह्या दरम्यांन करायचे आहे. इतर कोणत्याही माहितीनुसार नव्हे तर वरील प्रमाणे श्रावण महिन्याची व्रत-वैकल्य, उपवास करायचे आहेत.
अधिक महिन्यांत दशमी, एकादशी, द्वादशी, पौर्णिमा ह्या विशेष तिथींना दान देण्याचं अधिक महत्त्व आहे.त्याच प्रमाणे पंचपर्व म्हणजेच वैधृती योग, व्यतिपात योग,अमावस्या, पौर्णिमा, द्वादशी तिथी हि पंचपर्व,त्यांची दानंही महत्त्वाची आहेत. अधिक मासांत गंगास्नानाचंही तितकंच महत्त्व आहे. अनेकजण अधिक मासांत संपुर्ण महिनाभर गंगास्नान करतात. दान देतांना अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक,बर्फी तसेच सप्तधान्याची दानं दिली जातात. अनारसे, बत्तासे ह्यासारख्या वस्तु ३३ नग ह्या प्रमाणांत देतात.दान शक्यतो तांब्याच्या पात्रांत द्यावे. तांब्याचे ताम्हण घेऊन त्यावर पळसाच्या पानाची पत्रावळ ठेवावी.त्या पत्रावळीवर थोडेसे गहु ठेवुन त्यावर दान द्यायची वस्तु ठेवावी. हळद-कुंकु वाहुन वस्तुवर तुळशी पत्र ठेवावं.त्यावर रुमाल,उपरणं झाकुन त्यावर दिपदान ठेवुन तुपाची वात लावावी. दान देणार्‍या व्यक्तीचं पुजन करुन यथाशक्ती प्रमाणे दान वस्तुवर दक्षिणा ठेवुन ते दान संबंधित व्यक्तिला द्यावे. वस्त्रदानही देता येते. अर्थातच,काय द्यावे? किती प्रमाणांत द्यावे? हा प्रत्येकाच्या इच्छाशक्तीचा व आर्थिकतेचा प्रश्न आहे. त्यामध्ये कोणतेही बंधन नाही. सक्ती नाही.
*आईने केलेल्या कन्यादाना बद्दलची कृतज्ञता म्हणुन अधिक मासांत मुली आपल्या आईची साडी, खण-नाराळाने ओटी भरतात*.
अधिक मासांत विष्णु स्वरुप देवतांचं विशेषतः कृष्णाचं महत्त्व जास्त असल्यांने कृष्णाला महिनाभर तुळस वाहणे, दररोज थोडासा लोण्याचा नैवैद्य दाखवुन तो एका लहान बाळ-गोपाळाला देणे असे अनेक उपक्रम करता येतात.
*श्रावण महिन्यांतील सोमवार २१ ऑगस्ट, २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ११ सप्टेंबर ह्याचं दिवशी श्रावण सोमवार उपवास करायचे आहेत

अधिक मास व श्रावण मास* ह्यांची माहीती
Forwarded......

16/07/2023

टिपिकल हिंदू वेषात,डोक्यात गजरा माळलेल्या,कपाळावर कुंकू लावलेल्या या ज्या बायका दिसतायत, त्या कोण्या खेडेगावातल्या , गावंढळ बायका नसून त्या आहेत ISRO च्या उच्च शिक्षित शास्त्रज्ञ..
काल त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालेलं आहे अन त्याचाच जल्लोष अन एकमेकांचं अभिनंदन करतायत...
तुमचं शिक्षण किती यावर तुमची किंमत ठरत् नाही तर तुम्ही तुमची संस्कृती,परंपरा किती जपता यावर ठरते...!!
संपूर्ण देशाला यांचा गौरव आहे...!

03/07/2023

गुरु आहे सावली, गुरु आहे आधार गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार, गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात
गुरु पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
🙏🏻🌹🙏🏻
श्री गुरूदेव दत्त 💐🙏💐
💐🙏💐दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐🙏💐

04/06/2023

जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन. भावविभोर श्रद्धांजली 🙏🙏💐💐💐

03/06/2023

Pune SSC Result: "सगळे कष्ट फळाला आले"; १०० टक्के मिळवणाऱ्या स्वरालीची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरात १०० टक्के मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १५१ इतकी असून त्यामध्ये पुण्यातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. टिळक रोड येथील डीईएस इंग्लिश मिडियम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. त्या शाळेतील स्वराली राजपूरकर या विद्यार्थीनिला १०० टक्के मिळाले आहे. याबद्दले तिने प्रतिक्रिया दिली आहे.

03/06/2023

वटपौर्णिमा विषयी पौराणिक कथा
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात

25/05/2023

तुम्ही यूएई मध्ये जॉब बघत असाल, तर पहिल्यांदा तुमच्या पदवीधर असलेलं प्रमाणपत्र attestation करून घ्या.
घाई घाई मध्ये केले तर जास्त पैसे जातील, भारतातून केले तर कमी जातील आणि यूएई मध्ये केले तर जरा जास्तच वाटेल तुम्हाला.

म्हणून नीट ठरवून कामाला लागा.

23/05/2023

उद्योजक मार्गदर्शन.

22/05/2023

Archery World Cup स्पर्धा सध्या शांघाय येथे सुरु आहे. या स्पर्धेत मराठमोळा तिरंदाज प्रथमेश जावकरने जगातील नंबर १ चा तिरंदाज माईक श्लोसरचा पराभव करत सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे.

अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा!

14/05/2023

सहारा मॉल, अल नहादा , शारजा

14/05/2023

छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर 'समयनय' हा ग्रंथ संभाजी राजेंनी लिहून घेतला. 'धर्म कल्पलता' हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो.

Photos from Shivkanya aani Mavle 's post 11/05/2023

*अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!*

यावल गाव, जिल्हा जळगाव मधील *नेमिका निखिल जोशी* यांनी Being Muakaan Events तर्फे आयोजित सौ यूएई या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाने निवडून आल्या आहेत.

या स्पर्धेत पाच फेरी होत्या, त्यातून यांची निवड झाली आहे.

तसेच त्यांनी सौ प्रसिद्ध हा किताब पण जिंकला आहे.

त्यांच्या या यशाला शिवकन्या आणि मावळे तर्फे सलाम.

04/05/2023

Tommorrow 5 th of May.. Sudha Murthy in conversation session at the Intellectual Hall, Expo centre, Sharjah.. The entry is free.. Please feel to invite and forward this to your friends and family

01/05/2023

महाराष्ट्र दिनाची कहाणी

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली...!!!
"वीर बलिदानी हुतात्म्यांस शतशत वंदन"...!!!
।।जय जय जय महाराष्ट्र माझा।।

25/04/2023

नमस्कार मराठी परिवार,
सध्या बाजारात आंबे आले आहेत.
आपल्याकडे कोणी आंबे विकणार आहेत का?
त्यांनी किंमत आणि कुठल्या प्रकारचे अंबे आहेत ते सविस्तर कळवावे.
आणि कृपया आपल्या परवर साठी चांगेल किंमत द्यावी

23/04/2023

तुम्ही दुबई मध्ये जिथे राहत आहेत तिथे जवळच कुठल्या हॉटेल मध्ये अतिशय चविष्ट वडापाव मिळतो.

15/04/2023

दुबई मधील मराठी डॉक्टर
डॉक्टर सौ. सीमा परब
aani Mavle

12/04/2023

तुला शिकविल चांगलाच धडा - फुलराणी

Want your organization to be the top-listed Government Service in Al Ajman?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

मी दामले,पुण्यात सदाशिव पेठेत , नागनाथ पार जवळ,राहतो, माझी बायको, पुण्यातील senior सिटिझन साठी accompany and assistance ...
Pune SSC Result: "सगळे कष्ट फळाला आले"; १०० टक्के मिळवणाऱ्या स्वरालीची पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उ...
सहारा मॉल, अल नहादा , शारजा
तुला शिकविल चांगलाच धडा - फुलराणी
तुला शिकविल चांगलाच धडा - फुलराणी

Category

Website

Address

Al Ajman
0000

Other Social Services in Al Ajman (show all)
Habitat For Tomorrow Habitat For Tomorrow
Street 10
Al Ajman

"Habitat for Tomorrow" is an initiative started by Habitat Schools, to develop social commitment in students, parents and public. It is an umbrella term with many services falls u...

Mohammed Abdul Rahim PTI Mohammed Abdul Rahim PTI
Al Ajman

Ambassador of peace, Ambassador of Islam, Eyeing Prime Ministership Of Pakistan and a future leader.

Hayaaliltawfir Hayaaliltawfir
Al Rashidiya 2/Ajman
Al Ajman

A cat has nine lives �

Ajman KMCC Kasaragod District Ajman KMCC Kasaragod District
Ajman
Al Ajman

the official page of Ajman KMCC Kasaragod District Committee.

Ajman pergola house Ajman pergola house
Ajman
Al Ajman, 1000

my company is Ajman, I do all types of car garage, parking, and wall and half, small and big sheds,

Jabal Al Sheikh Marble Jabal Al Sheikh Marble
Ajman/Al Jurf 1
Al Ajman