Maharashtra Institute of Educational Planning and Administration - MIEPA

Maharashtra Institute of Educational Planning and Administration - MIEPA

Educational Leadership and Guidance

07/09/2022

राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) हे NIEPA येथे स्थापन करण्यात आले आहे शाळेचा कायापालट घडवून आणण्यासाठी, शाळा प्रमुखांना ज्ञान, कौशल्ये आणि वृत्ती यांमध्ये सक्षम करण्यासाठी या केंद्राची स्थापना झाली आहे. राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) हे कार्यक्रमासाठी रूपरेषा आणि शालेय नेतृत्व विकास केंद्रित असा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी कार्यरत आहे. शासन पत्र दि. 5, जानेवारी 2017 नुसार या संस्थेस राज्याची -School Leadership Academy म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज
https://www.facebook.com/Maharashtra-Institute-of-Educational-Planning-and-Administration-MIEPA-100133188184315

राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) हे NIEPA, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार दरवर्षी प्रमाणे या वर्षी सन २०२१-२२ मध्ये मिपा –SLA मार्फत खालील नेतृत्व विषयक साहित्य विकसित करण्यात आले असून निपा, नवी दिल्ली यांच्या http://ncsl.niepa.ac.in/ या राष्ट्रीय पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे.
• शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत केसलेट बुक (२५ केसलेट)– शालेय मुख्याध्यापकांसाठी संदर्भ साहित्य
http://ncsl.niepa.ac.in/case-study-2022-23.php
• PSLM या ऑनलाईन कोर्सचे संदर्भ साहित्य म्हणून शालेय समस्या सोडविण्यासाठी नेतृत्वाच्या कामगिरीचे सार्वत्रिकीकरणा अंतर्गत एकूण १३ मोड्यूलचे विकसन
http://ncsl.niepa.ac.in/sla-module-2022-23-mh.php
• शालेय / शैक्षणिक नेतृत्व संदर्भात संशोधन अहवाल
http://ncsl.niepa.ac.in/research-study-mh.php
SLA अंतर्गत विविध पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शाळांची व्हिडीओ डॉक्युमेंटरी NCSL,निपा, नवी दिल्ली यांच्या http://ncsl.niepa.ac.in/state-videos.php राष्ट्रीय पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहेत.
• १.के.व्ही.के.घाटकोपर सार्वजनिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय घाटकोपर – संगणकीय शिक्षण
https://youtu.be/CoDAmtMo89E
• २.कराड नगर परिषद शाळा क्रमांक ३,जिल्हा सातारा – वैशिष्ठ्यपूर्ण बाल शिक्षण
https://youtu.be/-_-XP9s_Fbc
• ३.आनंद निकेतन,सेवाग्राम,नई तालीम,वर्धा – जीवनाभिमुख व्यावसायिक शिक्षण
https://youtu.be/SRdXP6h2JTk

Maharashtra Institute of Educational Planning and Administration - MIEPA Educational Leadership and Guidance

14/01/2021

आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) औरंगाबाद संस्थेच्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्ती निमित्त "निपुण" स्मरणिका ई-प्रकाशन सोहळा, शिक्षणमंत्री मा. ना. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे शुभहस्ते *दि. 22 डिसेंबर 2020 रोजी संपन्न झाला.
उद्घाटनपर मार्गदर्शनात मा. ना. प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, निपुण स्मरणकेतील सर्वच भाग वाचनीय असून यातून संस्था सर्वांपर्यंत पोहचणार आहे. तसेच रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त मिपा संस्थेच्या संचालक व मिपा टिमचे अभिनंदन केले.
👉 मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज
https://www.facebook.com/Maharashtra-Institute-of-Educational-Planning-and-Administration-MIEPA-100133188184315/
📌 संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर ‘निपुण’ ई-स्मरणिका सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://www.miepa.ac.in

(डॉ. नेहा बेलसरे)
संचालक
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन
व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद

Photos from Maharashtra Institute of Educational Planning and Administration - MIEPA's post 23/12/2020

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास सेंटर (NCSL) मार्फत तयार केलेल्या व महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) , औरंगाबाद द्वारे मराठी भाषांतरित आणि संदर्भिकृत केलेल्या शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची (PSLM) औपचारिक सुरुवात दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी झालेली होती. हा कार्यक्रम देशभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुखांसाठी हा कार्यक्रम मोफत खुला आहे. तसेच भविष्यात शाळाप्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ शिक्षक या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात. त्यानुसार राज्यभरातून सदर कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींचे मनस्वी अभिनंदन.
नुकताच राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था(निपा) ,नवी दिल्ली यांचेकडून जिल्हानिहाय झालेल्या नोंदणीचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. त्यानुसार राज्यभरातून ७८६९ नोंदणी झालेली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर नागपूर जिल्ह्याची सर्वाधिक नोंदणी झालेली आहे तर त्याखालोखाल जळगाव, सातारा, मुंबई उपनगर, पुणे अशी आघाडीवर असलेली जिल्हे आहेत. तर इतर जिल्ह्यांची नोंदणी अल्पप्रमाणात आहे. शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन यासोबतच शालेय सुधारणा आणि परिवर्तन होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुख व ज्येष्ठ शिक्षक यांना या कार्यक्रमाचा लाभ व्हावा म्हणून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), प्राचार्य जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था तसेच सर्व संबंधितांनी आपआपल्या स्तरावरून नोंदणीसाठी आवाहन व प्रोत्साहित करावे.
👉🏻 मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज
https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315
तसेच
YouTube चॅनेल
लिंक:-https://youtu.be/g4MbLsJD5MA
नुसार आपणास बघता येईल
👉🏻 PSLM कोर्स माहिती साठी YouTube link
https://youtu.be/a6M_hLoielk
👉🏻 शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (Program on School Leadership and Management - PSLM) ऑनलाइन स्वरूपातील व राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी दिल्ली अधिकृत प्रमाणपत्र देणारा कोर्स मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत राष्ट्रीय वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. त्यासाठी पुढील दिलेल्या वेबपोर्टल वर नोंदणी करून स्वतःचे लॉगीन व पासवर्ड मुख्याध्यापकांनी तयार करावे आणि आणि कोर्स विहित मुदतीत सर्वच मुख्याध्यापकांनी पूर्ण करावा.
Program for School Leadership and Management – PSLM नोंदणीसाठी करण्यासाठी वेबपोर्टल लिंक
http://pslm.niepa.ac.in/
फेसबुक पेज व YouTube channel ला आपण Like व Subscribe केल्यामुळे आगामी व उपलब्ध मार्गदर्शन संदर्भात नोटिफिकेशन मिळून अधिकाधिक संख्येने अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय तज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ होईल.
👉🏻 रजिस्ट्रेशन, लॉगिन निर्मिती व कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्य व मदतीसाठी कार्यालयीन वेळेत खालील तज्ञ व्यक्तींची दिलेल्या भ्रमणध्वनी नुसार मदत घेता येईल.
श्री. धनंजय क्षिरसागर :- 98 6044 3300
श्री. ओमप्रकाश शेळके :- 98 2229 063
विशाल सोळंकी (भा.प्र.से.),
मा. शिक्षण आयुक्त,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पुणे
तसेच
डॉ. नेहा बेलसरे
संचालक
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन
व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद

20/12/2020

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद
Maharashtra Institute of Educational Planning and Administration (MIEPA), Aurangabad
मिपा (MIEPA) औरंगाबाद द्वारे रौप्य वर्षपूर्ती महोत्सव सोहळा
दिनांक 22 डिसेंबर 2020
वेळ सकाळी 11:00 वाजता
सर्व सन्माननीय अधिकारी ,कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक , मिपा या राज्यस्तरीय संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त विकसित
रौप्य महोत्सव स्मरणिका निपुण प्रकाशन मा.ना.वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री कॅबिनेट महाराष्ट्र राज्य. यांचे हस्ते होणार आहे. तसेच अधिकारी ऑनलाईन नेतृत्व संवर्धन व शैक्षणिक विकास , प्रशिक्षण कार्यक्रम { Leadership Enhancement & Academic Development } ची सुरुवात मा.ना. बच्चुभाऊ (ओमप्रकाश) कडू शालेय शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते होत आहे.
सदर प्रसंगी
💐मार्गदर्शक व प्रेरणा💐
मा.श्रीमती वंदना कृष्णा,(भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन.
💐अध्यक्ष 💐
मा.श्री. विशाल सोळंकी (भा.प्र.से.) आयुक्त शिक्षण तसेच महासंचालक मिपा.
💐प्रमुख उपस्थिती💐
मा. श्री.राहुल द्विवेदी(भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, मुंबई तथा संचालक- SCERT.
आणि
मा. श्री हरिश कृष्णन
(MD) पब्लिक अफेअर्स अंड
स्टॅटजीक मॅट्रिक एंगेजमेंट सिस्को सिस्टम इंडिया व सार्क.
उपरोक्त मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
📌📌📌📌📌📌
मिपा संस्थेच्या अधिकृत page ला like करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315
तसेच उदघाटन सोहळ्यास ऑनलाईन जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
YouTube Link:-
https://youtu.be/D_kaPjq0WqA
टीप: 3 डिसेंबर - 15 डिसेंबर या दरम्यान ज्या अधिकाऱ्यांनी लीड-LEAD कार्यक्रमासाठी नोंदणी केलेली आहे त्यापैकी Programme Monitoring and Evaluation आपण सुरू करीत आहोत.
डॉ.नेहा बेलसरे
संचालक.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद.

PSLM and LEAD Registration New Link 03/12/2020

MIEPA औरंगाबाद या संस्थेच्या वतीने दि. ३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत मुख्याध्यापकांसाठी शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (program for school leadership and management -PSLM ) कार्यक्रम मराठी माध्यमातून NIEPA नवी दिल्लीच्या राष्ट्रीय पोर्टल वर सुरु करण्यात येत आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांनी उद्घाटन कार्यक्रमासाठी यापूर्वी दिलेल्या youtube link वर तांत्रिक अडचणीमुळे जॉईन होता येणार नाही. तरी नवीन YouTube खाली देत आहोत.

तसेच त्याच वेळेत MIEPA औरंगाबाद व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी ऑनलाईन कोर्सेस सुरु करण्यात येत आहेत. LEAD - Leadership Enhancement and Academic Development हा कोर्स विस्तार अधिकारी ते राज्यस्तर अधिकारी यांच्यासाठी असून याची नोंदणी देखील सदर कार्यक्रमापासून सुरु करण्यात येणार आहे. तरी, सर्व अधिकाऱ्यांनी https://youtu.be/a6M_hLoielk या लिंक वर ३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत उपस्थित राहावे.

- डॉ. नेहा बेलसरे
संचालक,
MIEPA औरंगाबाद

PSLM and LEAD Registration New Link Announcement about 2 Courses a. School Leadership and Management Course for all HMs b. Leadership Enhancement and Academic Development for all officers

02/12/2020

MIEPA औरंगाबाद या संस्थेच्या वतीने दि. ३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत मुख्याध्यापकांसाठी शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (program for school leadership and management -PSLM ) कार्यक्रम मराठी माध्यमातून NIEPA नवी दिल्लीच्या राष्ट्रीय पोर्टल वर सुरु करण्यात येत आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांनी उद्घाटन कार्यक्रमासाठी खालील youtube link वर जॉईन व्हावे

तसेच त्याच वेळेत MIEPA औरंगाबाद व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी ऑनलाईन कोर्सेस सुरु करण्यात येत आहेत. LEAD - Leadership Enhancement and Academic Development हा कोर्स विस्तार अधिकारी ते राज्यस्तर अधिकारी यांच्यासाठी असून याची नोंदणी देखील सदर कार्यक्रमापासून सुरु करण्यात येणार आहे. तरी, सर्व अधिकाऱ्यांनी https://youtu.be/g4MbLsJD5MA या लिंक वर ३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत उपस्थित राहावे.

- डॉ. नेहा बेलसरे
संचालक,
MIEPA औरंगाबाद

31/10/2020

SLDP राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम मधील गट सादरीकरण कृती मध्ये सहभागी प्रशिक्षणार्थी.

31/10/2020

शालेय नेतृत्व विकास प्रशिक्षणातील मुख्याध्यापक व अधिकारी यांच्याशी संवाद साधतांना MIEPA,औरंगाबाद संस्थेच्या आदरणीय संचालक डॉ. नेहा बेलसरे मॅडम.

31/10/2020

लोणावळा येथे SLDP प्रशिक्षण दरम्यान मार्गदर्शन करतांना , डॉ. चारू मलिक, Senior Training Consultant NCSL-NIEPA.

Photos from Maharashtra Institute of Educational Planning and Administration - MIEPA's post 31/10/2020

Resources Created by MIEPA to support quality education in Maharashtra.

Live interaction on - Leadership efforts for Improving Student Learning in the backdrop of Mountain 21/02/2020

https://www.youtube.com/watch?v=2gmL3drsqv8

Live interaction on - Leadership efforts for Improving Student Learning in the backdrop of Mountain Experts: Dr. Charu Malik, Mr. Subhash Joshi and Mr. Uttam Rana NCSL invites two school heads of government primary school from district Tehri Garhwal and Pit...

30/01/2020

*"कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय..."* 🌹🌹*

31/12/2019

नववर्षाच्या पूर्वसंध्ये पासून महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये शालेय नेतृत्व विकास ही संकल्पना रुजवण्यासाठी, राष्ट्रीय नेतृत्व विकास संस्था, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त प्रयत्नाने मिपा- महाराष्ट्र ही संस्था राज्य शालेय नेतृत्व विकास संस्था म्हणून कार्य करणार असून त्याअंतर्गत शिक्षक व मुख्याध्यापक यांना शैक्षणिक नेतृत्व विकासाची विविध संधी प्रमुख्याने ज्यामध्ये ऑनलाइन कोर्सेस आणि प्रशिक्षण याबाबत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सदर बाबीचा प्रचार व प्रसार होऊन विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत व्हावी व एकूणच शैक्षणिक वातावरण हे समृद्ध व सुदृढ व्हावे तसेच त्याची परिणीती ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये दिसावी आणि विविध स्तरावर घेतल्या जाणाऱ्या सर्व्हेमधून ती प्रतिबिंबित होईल यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न संस्थेमार्फत करण्यात करण्यात येणार असून संस्था राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य नेतृत्व अकादमी म्हणून कार्य करणार आहे .
शिक्षण क्षेत्रातील सर्वांनी या ऑनलाईन पेजला लाईक करून सहकार्य करावे तसेच फेसबूक वर सुद्धा आपली रिक्वेस्ट पाठवावी आणि YouTube चॅनेल सुध्दा Subscribe करावे ज्यामुळे सर्व शिक्षण क्षेत्र सहज जोडले जाऊन प्रभावी संप्रेक्षण करण्यास मदत होईल.
एकूणच शालेय नेतृत्व विकास आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक प्रगतीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
💐💐येणारे नववर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धीचे जावो आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक विकासाचे ध्येय प्राप्त होवो हीच सदिच्छा 💐💐👍👍

डॉ. नेहा बेलसरे
संचालक
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Aurangabad
431001
Other Education in Aurangabad (show all)
Islamic deen knowledge Islamic deen knowledge
Aurangabad

hamare islamic deen knowledge ko follow jarur kare

Squaricle Training Solutions Squaricle Training Solutions
Osmanpura
Aurangabad, 431005

Employability Skills and Soft Skills Training institute

English Treasure for Competitive Learner English Treasure for Competitive Learner
Aurangabad

This is an educational page to help the learnars those who are facing problems in English language a

Asli Engineer Asli Engineer
Aurangabad, 431001

�Knowledge,Knowledge Hoti Hai� �doesn't matter which field you have� � if you want to increase your technical knowledge� �then follow this page� https://instagram.com/asliengineer...

zaheer__khan_official.04 zaheer__khan_official.04
Aurangabad

hi friend s

BPSC Team BPSC Team
Ward No. 04
Aurangabad, 824101

Education is your future.�

Logishoft training institute Logishoft training institute
Aurangabad

Logishoft training institute and placement also provide

Nitya niranjan Nitya niranjan
Aurangabad, 824102

ঔৣ☬᪥( wēľčōmē💝To💞my🥀pŕöfîĺè}:᪥☬ঔৣ ༺۝ঔৣ(बघेलवंशी पुत्र}ঔৣ۝༻ #pľêāśê🙏10k💞🥀😴__f_o_l_l_o_w_😘.#vod

MPSC 2020 MPSC 2020
Aurangabad

स्पर्धा परीक्षा विध्यार्थ्यांना सर्?

mr._vishsal_v_p mr._vishsal_v_p
Aurangabad, 431136

Trade_Swings with Gujju Trade_Swings with Gujju
Aurangabad

#swingtrading #education #learnstockhere

Tips Study Tips Study
Belly Road Patna
Aurangabad, 824143

हमारे Page Tips study पर क्लास 5th से 12th तक की सभी subject की तैयारी NCERT Book से कराई जाती है!