Mayor Sau Rakhi Kancharlawar

Mayor Sau Rakhi Kancharlawar

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mayor Sau Rakhi Kancharlawar, Politician, Municipal Corporation, Chandrapur.

07/08/2023
Photos from Mayor Sau Rakhi Kancharlawar's post 29/04/2022

महापौर पदाच्या निरोप समारंभप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन निरोप देताना शिपाई वर्ग.

29/04/2022

महापौर पदाच्या निरोप समारंभप्रसंगी राजशिष्टाचारानुसार अभिवादन करताना शिपाई.

29/04/2022

महापौर पदाच्या निरोप समारंभप्रसंगी भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, ज्येष्ठ नेते ब्रिजभूषण पाझारे,नगरसेवक सुभाष कासनगोटुवार, डॉ. दीपक भट्टाचार्य आणि अन्य.

29/04/2022

महापौरपदाचा कार्यकाळ आज संपत असल्यानिमित्त नागरिकांशी संवाद

20/04/2022
20/04/2022

महानगरपालिकेत चंद्रपूरच्या गोंडककालिन महाराणी हिराई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात आज 20 एप्रिल रोजी चांदानगरीच्या गोंडकालीन महाराणी हिराई यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला.

महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते महाराणी हिराई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण समिती उपसभापती शितल कुडमेथे, माजी सभापती चंद्रकला सोयाम, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका माया उईके, नगर सेविका शितल आत्राम यांची उपस्थिती होती.

Photos from Mayor Sau Rakhi Kancharlawar's post 14/04/2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महानगर यांच्यावतीने गांधी चौक येथे शीतपेय वाटप करण्यात आले. यावेळी लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची देखील उपस्थिती होती.

Photos from Mayor Sau Rakhi Kancharlawar's post 14/04/2022

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

14/04/2022
11/04/2022
10/04/2022
06/04/2022

भाजपचा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

06/04/2022
01/04/2022
Photos from Mayor Sau Rakhi Kancharlawar's post 28/03/2022

खंडित पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाचे युद्धस्तरावर प्रयत्न

महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली पाहणी

मंगळवारी 50 टक्के क्षमतेने, तर बुधवारी 100% पाणी पुरवठा होणार

चंद्रपूर | महा औष्णिक विद्युत केंद्राच्या पाईपलाईन कामामुळे लिकेज झाल्याने खंडित झालेला पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत सुरू होईल. मंगळवारी 50 टक्के क्षमतेने, तर बुधवारी 100% पाणी पुरवठा होईल, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, आज सोमवारी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी पाहणी केली.

इरई धरणावरुन येणारी पाईपलाईन सिटीपिएसच्या पाईपलाईन कामामुळे लिकेज झालेली आहे. इरई धरण चेकपोस्टजवळच्या नाल्यांमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. इरई धरणावरुन होणारा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी भेट दिली. यावेळी उपायुक्त अशोक गराटे, उपअभियंता विजय बोरीकर यांची उपस्थिती होती.

आज रात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल. मंगळवारी सकाळपर्यंत शहरातील नागरिकांना 50 टक्के क्षमतेने, तर बुधवारी 100 टक्के क्षमतेने पाणीपुरवठा होईल, यासाठी महानगरपालिकेतर्फे कसोशीने प्रयत्न केले जात आहे.

28/03/2022

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते मौलाना अबुल कलाम आझाद बागेचा नूतनीकरण व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

28/03/2022

मौलाना अबुल कलाम आझाद बागेच्या लोकार्पण कार्यक्रमावर महापौर राखी कंचर्लावार यांची प्रतिक्रिया

https://youtu.be/tLC2j9VL99w

Photos from Mayor Sau Rakhi Kancharlawar's post 27/03/2022

मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे थाटात उद्घाटन

मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे थाटात उद्घाटन

उदघाटन सोहळ्यानंतर पहिल्याच दिवशी रविवारी आझाद बगीचात नागरिकांची मोठी गर्दी

चंद्रपूर शहराचे हृदयस्थान असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे रूप पालटले असून, भव्यदिव्य, मनमोहक आणि आकर्षक असा बगीचा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक २६ मार्च २०२२ रोजी रात्री मोठ्या थाटात पार पडला.

उदघाटन लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. खासदार बाळू धानोरकर यांची उपस्थिती प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेता देवानंद वाढई, भाजपचे महानगराध्यक्ष, डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या चित्राचे अनावरण केले. त्यानंतर रिमोट दाबून एलईडीचे द्वार उघडून बगीचा त प्रवेश करण्यात आला. बागेत योगनृत्य, स्केटिंग, महाराष्ट्र संगीत, आदिवासी नृत्य, महात्मा ज्योतिबा फुले यांचे एकपात्री प्रयोग आणि विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमात बगीचा त दररोज नियमित येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंच, योग परिवार, बगीचा मित्र परिवार आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा सोहळा बघण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आझाद बगीच्याचे शनिवारी रात्री उद्घाटन झाल्यानंतर रविवार, दिनांक 27 मार्च रोजी दिवसभर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बगिच्यात नेताजी पार्क, स्केटिंग आणि योगा, बॅडमिंटन कोर्ट, चिल्ड्रेन पार्क, ज्योतिबा फुले पार्क, पाथवे, शहीद स्मारक पार्क, फ्लावर गार्डन, गार्डनिंग आणि लॅंडस्कॅपिंग, भव्य मंदिर, आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई, भव्य पार्किंग आणि फूड कोर्ट देखील साकारण्यात आले आहे. रविवारी सकाळी पहाटे पाच वाजेपासून अनेक नागरिकांनी देण्यास सुरुवात केली. सकाळी महिला चा झुम्बा डान्स, तरुण मुले स्केटिंग आणि व्यायाम करणाऱ्या नागरिकांनी याचा आनंद घेतला. हा बगीच्या सुरू झाल्याने #चंद्रपूर शहरातील महिला तरुण आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Photos from Mayor Sau Rakhi Kancharlawar's post 27/03/2022

उदघाटन सोहळ्यानंतर पहिल्याच दिवशी रविवारी आझाद बगीचात नागरिकांची मोठी गर्दी

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या आझाद बगीच्याचे शनिवारी रात्री उद्घाटन झाल्यानंतर रविवार, दिनांक 27 मार्च रोजी दिवसभर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

बगिच्यात नेताजी पार्क, स्केटिंग आणि योगा, बॅडमिंटन कोर्ट, चिल्ड्रेन पार्क, ज्योतिबा फुले पार्क, पाथवे, शहीद स्मारक पार्क, फ्लावर गार्डन, गार्डनिंग आणि लॅंडस्कॅपिंग, भव्य मंदिर, आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई, भव्य पार्किंग आणि फूड कोर्ट देखील साकारण्यात आले आहे.

रविवारी सकाळी पहाटे पाच वाजेपासून अनेक नागरिकांनी देण्यास सुरुवात केली. सकाळी महिला चा झुम्बा डान्स, तरुण मुले स्केटिंग आणि व्यायाम करणाऱ्या नागरिकांनी याचा आनंद घेतला.

तब्बल सहा वर्षांनी हा बगीच्या सुरू झाल्याने चंद्रपूर शहरातील महिला तरुण आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

25/03/2022
17/03/2022
Want your public figure to be the top-listed Public Figure in Chandrapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा
आझाद बागेचा नूतनीकरण व लोकार्पण सोहळा
मी येणार म्हणणारे आले अन गोंधळ घालून गेले...
हुतात्मा स्मारक अभ्यासिकेचे उद्घाटन
शिवरायांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण चंद्रपूर वासियांना खूप खूप शुभेच्छा
भानापेठ येथील कबड्डी स्पर्धेचे काही क्षण.
अंचलेश्वर गेट ते बागला चौक पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन
माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयाचे गेटसमोरील जागेचे सौंदर्यीकरण
नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
रेड टँकर अभिनव योजनेचा शुभारंभ

Category

Website

Address

Municipal Corporation
Chandrapur
442402