Vrushali Athale

* Personal Counseling * Psychological Counseling * Psychotherapy * Marriage Counseling * Aptitude Te

09/07/2023

**झन्नाट बाईपण**
बाईपण भारी देवा पाहिला. आधी मित्रांच्या बायकांबरोबर पाहिला आणि नंतर पुन्हा ए आई आणि अहो आईंबरोबर पाहिला. मैत्रिणी न म्हणता मुद्दाम मित्रांच्या बायका असं म्हणतेय. सांगायचा मुद्दा असा की वेगवेगळ्या नात्यातल्या बायका एकत्र येऊन हा चित्रपट नक्की बघू शकतात हेच ह्या चित्रपटाचं यश आहे. मित्राची बायको असो किंवा आपल्या नवऱ्याची मैत्रीण असो, आपली आई असो की आपली सासू असो...ती बाई च..ती हे बाई पणाचे सगळे रंग अनुभवत जगते. आणि म्हणून तिला हा चित्रपट आवडतोय असं जाणवलं. चित्रपट पहाताना माझ्या मनात आलेले विचार असच ह्या लेखा कडे बघा. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, अभिनय छान च. अर्थातच चित्रपटाची समीक्षा करणं असा उद्देश नाहीये. अगदी सामान्य स्त्री म्हणून आणि एक मानसोपचार तज्ञ म्हणून मनात काय काय आलं ते लिहावं असं वाटलं. एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की साधारण तिशी उलटलेली प्रत्येक स्त्री काही ना काही relate करू शकत होती . अगदी कुठल्या ना कुठल्या व्यक्तिरेखे बद्दल किंवा कुठल्या ना कुठल्या प्रसंगा बद्दल प्रत्येक स्त्री ला जवळीक जाणवत होती. अर्थात अगदी तरुण मुली मात्र फार relate करु शकतील असं नाही वाटलं. कारण बाईपण फार झपाट्याने बदलत गेलं आहे. ते बदलताना प्रत्येक स्त्री चे आपले आपले वेगळे अनुभव असतातच. पण स्त्रीमुक्ती सारख्या विषयाचं गांभीर्य दाखवण्यावर चित्रपटाचा focus नसून बाईपण नेमकं कसं आहे ते दाखावण्यावर आहे हे मला फार आवडलं .छान वाटलं. सहा बहिणींचं आयुष्य दाखवत अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील घटना प्रसंग खाचखळगे आणि गमतीजमती सगळंच छान दाखवलं आहे. अगदी सख्ख्या बहिणींमधली धुसफूस, हेवेदावे, मत्सर आणि माया प्रेम ह्या बाईपणाचं यथार्थ दर्शन घडवतात. जन्माला येताच मूल दगावत हे दुःख आयुष्यभर उराशी बाळगून जगणारी माई/जया, त्या दुःखानी जेवढी विझत जाते तेवढीच बरोबरीच्या बहिणीला त्याच वेळी मुलगी होते आणि त्या आनंदात त्या बहिणीला आपल्या दुःखाची जाणीव सुद्धा नाहीये ह्या वेदनेने ती जास्त दुखावते. तिचं मूल गेल्यामुळे तिचीच नजर लागते असा गैरसमज करून घेणारी शशी....आणि तरीही भाची वरच्या माये पोटी तिला सपोर्ट करणारी, तिची काळजी घेणारी माई.. आपली मुलगी आणि तिच्या सासूच्या छान घडत असलेल्या नात्यातला गोडवा किंवा जवळीक ह्याचं कौतुक वाटायच्या ऐवजी आसुया वाटणारी आणि मुलगी माझ्याच पासून दुरावते की काय ह्या भीती ने अस्वस्थ होणारी शशी.. सासऱ्यानी कलागुणांना जोपासण्याची कधीही परवानगी न देता सुद्धा स्वतःच्या सुनेला सपोर्ट करणारी आणि तरीही सासऱ्यांचा योग्य तो मान ठेवणारी साधना.. सुनेच्या हातचं यापुढे जेवणार नाही असं म्हणणारे अण्णा जेव्हा रात्री भुकेने अस्वस्थ होऊन फ्रिज मध्ये खायला काही आहे का शोधतात तेव्हा सगळं ताट व्यवस्थित वाढून "अण्णा तुम्ही काही जेवला नाहीत आणि मी काही पाहिलं नाही" असं म्हणून राग विसरून प्रेमाने अण्णांना जेवायला वाढणारी आणि त्यात ही त्यांचा त्या घरातला मान सांभाळणारी साधना ( काही मुली ह्याला फालतू इगो असं ही म्हणतीलच ..ते ही चूक नाही). ह्या प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये स्त्री चं स्त्रीत्व दिसतं. स्वतःचा नवरा जेव्हा दुसऱ्या तरुण स्त्री च्या प्रेमात पडतो तेव्हा कोलमडलेली पल्लवी जेव्हा स्वत्वाची जाणिव होते तेव्हा मात्र नवऱ्याकडे प्रेमाची भिक न मागता divorce paper वर सही करून त्याला मोकळं करण्याचा निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घेते. स्वतःच्या हळवेपणा ला दुबळ होऊ न देता कणखर बनवते. "माझ्या घरात सगळ्यात कमी किंमत मला आहे कारण मी पैसे कमवत नाही" असं म्हणणारी केतकी च पल्लवी ला तिच्या क्षमतेची, आत्मनिर्भर असण्याची जाणीव करून देते.. नवरा कर्जबाजारी झाल्या नंतर दोन मुलं नोकरी सांभाळून नवऱ्याच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी चारू अचानक आपला menopause आला हे समजतं तेव्हा अक्षरशः कोलमडून जाते. तिच्या ढसाढसा रडण्यात आजपर्यंत दुहेरी भूमिका निभावताना वाढत गेलेला सगळा ताण बाहेर पडतो. menopause आला तरीही फक्त स्वतःसाठी स्वताहाला हवं तसं कधी जगलोच नाही ही त्रासदायक जाणीव त्यात दिसते. असे अनेक प्रसंग बाई चं बाईपण उलगडून दाखवतात. चित्रपटातील सगळ्याच स्त्री कलाकार उत्तम अभिनयाने हे प्रसंग बोलके करतात. एकमेकांमध्ये वर्षानुवर्ष चालणारं शीतयुद्ध असो की सतत मनातल्या मनात चालू असलेली तुलना असो हा बाईपणाचाच एक भाग आहे. पण म्हणून बाई ही अशीच असते का... तर नाही हो.. बाई ही अतिशय हळवी, संवेदनशील, मायाळू, दयाळू, प्रेमळ, सोशिक, चिवट, लवचिक, कणखर, मनस्वी, अतिशय हुशार चलाख ...अरे बाप रे...किती विशेषणं वापरू.. अशी ही असते. हे "बाईपण" असतंच भारी! केतकी च्याच भाषेत सांगायचं तर एकंदर बाईपण झन्नाट!
तळ टीप : ( आपण किंवा आपलं कुटुंब किती सुधारित आहोत, किती पुरोगामी आहोत वगैरे असले विचार न करता निव्वळ बाई चं बाईपण किती अनाकलनीय आहे अशा दृष्टीने चित्रपट बघा. नक्की आवडेल.)
© *वृषाली आठले*
( Counseling Psychologist & Psychotherapist)
डोंबिवली.

09/07/2023

**झन्नाट बाईपण**

#बाईपणभारीदेवा

Photos from Vrushali Athale's post 26/06/2023

*देखणं घर*
प्रत्येक घर काहीतरी बोलतं. एखाद्या घरी गेलं की जाणवतं की ते घर अस्वस्थ आहे, एखादं घर नाराज, एखादं घर उदास ..तर एखादं घर अगदी शांत, आनंदी, सुंदर, तृप्त वाटतं. अनेक वर्ष मी अनेक घरं पहिली.अगदी उंबरठ्यातून आत जातानाच ते घर मला कळतं, त्या घराची एनर्जी कळते. अगदी नुकतंच मी एक घर पाहिलं, त्या घरी मी राहिले. आमचे मोहन हर्षे काका आणि राधा काकू चं भोपाळ चं घर. अतिशय सुंदर! इतकं देखणं घर आहे की शब्दात मांडणं थोडं कठीण आहे. कारण सगळ्याच जाणिवा शब्दात नाही मांडता येत. तरीही त्या घरी राहिल्यावर वाटलं लिहायला पाहिजे. त्या घराविषयी जे जे वाटलं ते लिहायला पाहिजे. ते घर घडवणाऱ्या, त्याची निर्मिती करणाऱ्या दोघांना अगदी मनापासून दाद द्यावीशी वाटली. कारण काहीही सुंदर निर्माण करणाऱ्याचे हात सुंदर असतात, मन सुंदर असतं. ही त्या सुंदर मनाला दिलेली दाद आहे!
दारात चाफा सोनचाफा प्राजक्त मधुमालती अशा कितीतरी सुगंधी फुलांचा गंध श्वासात भरून च अतिथी आत येईल असं ह्या फुलझाडांचं अस्तित्व. योग्य जागी छोटंसं तुळशवृंदावन आणि तिथे रोज तेवणारा दिवा मनाला दिलासा देऊन गेला. अजूनही हा पवित्र रीवाज कुणीतरी रोज सांभाळतं हे किती सकारात्मक आहे. घरात गेल्यावर प्रकर्षाने जाणवते ती घराची रचना. घरातली प्रत्येक छोटी मोठी वस्तू प्रत्येक जागा कलात्मक रीतीने खूप विचारपूर्वक मांडली आहे. लहान सहान गोष्टींचा विचार आणि सोयी सुविधा तर आहेतच पण त्याहून खास म्हणजे सगळं देखणं आहे. अगदी सोफा सेट खुर्च्या बैठक सगळंच देखणं. घरातल्या दोघांचीही सहज ओळख करून देणारी रंगसंगती. खिडक्या इतक्या प्रशस्त की बाहेरचा उजेड हवा सहज घरात शिरकाव करतात. भिंती कमी आणि मोकळ्या मोठ्या खिडक्या त्या घर मालकाच्या मोकळ्या स्वच्छ मनाची ओळख करून देतात. घराचा मालक म्हणणं सुद्धा चूक च. हा असा माणूस त्या घराचा सखा असतो. 3 स्टार 5 स्टार हॉटेल्स मध्ये हे सगळं असतंच, पण हे सगळं स्वतहाच्या घरात जपणारा विरळाच. पुन्हा पाहुणचार करण्यात कुठेही औपचारिकता नाही, कसलाही बडेजाव नाही, मी पणा नाही. उलट जाणवली ती फक्त माणसं जोडण्याची इच्छा. ..घरातून वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्या खालची जागा सुद्धा indoor plants नी सुशोभित केलेली. वरती terrace garden मध्ये जाई जुई मोगरा यांच्या बरोबरीने चिकू पेरू डाळिंब अशीही झाडं होती. त्या फळाफुलांसाठी येणाऱ्या पक्षांचं ही त्या घरी स्वागत होतं. " गोकर्ण इतका जिद्दी आहे की सदफुलीला वाढू देत नव्हता..म्हणून दोघांना थोडं लांब च ठेवलं" हे सांगताना त्यात फक्त झाडा पाना फुलां विषयी च ज्ञान डोकावत नव्हतं तर त्या सदाफुली विषयी ची संवेदना डोकावली..क्षणात माझ्या मनात आलं की सदाफुली विषयी इतका विचार करणारा हा माणूस माणसाच्या मनाचा किती विचार करत असेल! त्या अंगणातल्या आणि गच्ची मधल्या सगळ्या झाडांची लागवड, त्यांची उगानिगा राखणं, त्यांचा सांभाळ करणं हे मात्र राधा काकू च काम. ह्या घराचं नाव ' निर्मला ' . त्यांच्या आई च नाव. त्यात ही वेगळेपण असं की आई ची सही जशी होती तशी च त्या अक्षरांची रचना करून ते नाव घरावर विराजमान झालं आहे. जणू त्या घरावर च आई ने सही केली आहे. त्या माऊलीचं अक्षर सुद्धा ज्यांनी इतकं छान जपलं ती दोघं किती सुंदर मनाची आहेत ह्याची सहज कल्पना आली. सांभाळ करावा तर असा, जपावं तर असं! अशा छान संवेदनशील मोकळ्या मनाच्या ह्या दोघांचं मोकळं घर माझ्या मनात घर करून राहिलं..म्हणून हा लेखन प्रपंच!
©वृषाली आठले

28/06/2022

*कोपरा*
© वृषाली निमकर आठले
दिनांक : २६- ६ - २०२२
रविवार ची निवांत संध्याकाळ आणि हातात आलं आणि चहाची पात घातलेला वाफाळलेला चहा घेऊन पाय पसरून सोफ्यावर बसले होते. बाहेर नुकताच सुरू झालेला पाऊस मन हळू हळू शांत करत होता. हल्ली पावसाळा आला की मित्रांबरोबर पिकनिक ला जाण्यापेक्षा असं घरात शांत बसून राहावं असं वाटतं. पण ह्याचं कारण मात्र वाढणारं वय नसून अंतर्मुख होणं आहे. हे असं अंतर्मुख होणं फार सुंदर असतं.
एका जागी शांत बसून घराचा एक एक कोपरा न्याहाळायला मला खूप आवडतो. आपण इतके कष्ट करून घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ आणि सुंदर ठेवतो तर अशा निवांत वेळी त्या कोपर्यांकडे ही पहावं की . घराचा दर्शनी भाग जसा नेटका ठेवावा तसाच प्रत्येक कोपरा ही छान ठेवावा आपण. गरम चहाचा एक एक घोट घेताना मन तरल व्हायला लागलं. असं मुद्दाम वेळ काढून शांत बसल्यावर विचार पण उगीच गर्दी करत नाहीत. हळूच डोकावतात ते मनात. वाटलं ह्या घराच्या कोपऱ्यात आणि मनाच्या कोपऱ्यात खूप साम्य आहे. माणसं घराच्याही कोपऱ्यात अडगळ ठेवतात आणि मनाच्याही कोपऱ्यात फार अडगळ साठऊन ठेवतात. सगळं नको असलेलं साचलेलं असं वर्षानुवर्ष साठाऊन ठेवतात. राग, रुसवे फुगवे, नाराजगी, गैरसमज, दुःख.. सगळी जळमटं च की ही. म्हणून मन आणि घर मोकळं रहात नाही. मन क्षणभर अस्वस्थ झालं..जाऊदे ना..उल्लेख तरी कशाला करायचा ह्याचा.. नकोच. नजर पुन्हा एक आवडणारा कोपरा शोधत स्थिर झाली आणि मग मन ही स्थिर! "आपलाच संवाद आपणाशी" असं झालं माझं. क्षणात उत्तर मिळालं. मला घराचा प्रत्येक कोपरा सजवायला का आवडतो ह्याचं उत्तर.. कोपरा घराचा असो की मनाचा, तो मोकळा करून सजवायला आवडतो मला. आवराआवरी करताना घरचे कधीतरी म्हणतात " आता बास की...कोण बघतय त्या कोपऱ्यात?" ...कुणी कशाला पाहायला हवं? माझी मीच तर पाहत असते घराचे आणि मनाचे सुंदर कोपरे!

© वृषाली निमकर आठले
( मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक.)

Photos from Vrushali Athale's post 28/06/2022

29/03/2021
#कविता_मनातली | असा मी...तसा मी...कसा मी...कळेना | विंदा. करंदीकर |वृषाली_आठले | सय_हितगुज_आठवणींचे 30/05/2020

#कविता_मनातली | असा मी...तसा मी...कसा मी...कळेना | विंदा. करंदीकर |वृषाली_आठले | सय_हितगुज_आठवणींचे #कवितामनातली_वृषाली_आठले ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आणि एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व वृषाली आठले सादर करता.....

31/03/2020

अशांत शांतता
© सौ. वृषाली निमकर-आठले.
दिनांक: ३१/३/२०२०
रविवार ची शांत सकाळ, लॉकडाऊन मुळे क्लिनिक बंद आहे तर रविवार हा दिवस निवांत असतो याची जाणीव झाली. एरवी अनेक वर्ष मी रविवारी क्लिनिक मध्ये व्यस्त असते. पण आता क्लिनिक ला जाण्याची धावपळ नाही म्हणून सवयीप्रमाणे स्वयंपाक, अंघोळ, पूजा, योगाभ्यास करून मोकळी झाले आणि विचार केला आज खूप वेळ मी ध्यानाला बसू शकते. ध्यानावस्थेत बसणं म्हणजे ध्यान-धारणेला बसणं, हि गेल्या दहा वर्षात स्वत:ला लावून घेतलेली सवय आहे. नियमितपणा नसल्यामुळे सवय म्हणण्यापेक्षा धडपड असं म्हणूया. साधारण अर्धातास बसून उठले तर नवरा फोन घेऊन घाईत आला. आमच्या एका मित्राचे १२ मिस्ड कॉल्स येऊन गेले होते. फोन केला तेव्हा त्याचा कमालीचा घाबरलेला आवाज, " वृषाली ताबडतोब तुझी मदत हवी आहे. माझी एन्क्झायटी (Anxiety) वाढली आहे. मला पॅनिक अटॅक येऊन गेला. मी तुझ्या क्लीनिक ला आत्ता येऊ शकत नाही. हे सगळं सिरीयस झालं तर काय करू?". बोलताना त्याला चक्क धाप लागली होती, इतकं घाईत आणि भरकटल्यासारखा तो बोलत होता. त्याच्याशी फोन वर च बोलून त्याला शांत करावं लागलं. त्याला समुपदेशनाची खरंच गरज होती.

अनेक लोकं कुठल्या ना कुठल्या अस्वस्थतेच्या आजाराने ग्रस्त आहेत (Anxiety Disorder). आता लॉकडाऊन मुळे त्यांची अस्वस्थता अजून च वाढली आहे. लॉकडाऊन मुळे मिळालेल्या शांततेचं काय करावं हे काही लोकांना कळेनासं झालं आहे. हल्ली सतत गुगल वर शोधत राहून लोकं स्वत:च ठरवतात कि आपल्याला डिप्रेशन (Depression) आलंय, आपल्याला क्लॉस्ट्रोफोबिआ (Claustrophobia) झाला आहे; आणि मग त्यांची भीती अजून वाढते. मुळात हे समजून घेण्याची गरज आहे कि, ‘You can get all information on Google, but you need an expert’s advice to know what is happening with you and how to handle it’.

लॉकडाऊनमुळे सुरुवातीला चार दिवस सगळ्यांना सुट्टी मिळाल्याचा आनंद झाला खरा, पण त्यानंतर हळू हळू कोणी कंटाळायला लागलं, कोणाची चिडचिड वाढली, कोणाची एन्क्झायटी वाढली, कोणाची भीती वाढली. वरकरणी जरी असं वाटलं कि ह्याला लॉकडाऊन कारणीभूत आहे, तरी ते सत्य नाही. ह्या समस्या लोकांना आधी होत्याच, परंतु लॉकडाऊनमुळे लोकांना त्याची जाणीव व्हायला लागली. रोजचं धावपळीचं आयुष्य म्हणजे अनेकदा आपल्याच अनेक प्रश्नांपासून आपणच केलेला पलायनवाद ठरू शकतो. असं अनेकांना वाटतं कि माणूस जितका व्यस्त तेवढं बरं असतं, मग असले आजार होतच नाहीत. पण वास्तविक हे आजार मुळातच असतात ते त्यांना जाणवत नाहीत. आणि अचानक मिळालेल्या मोकळ्या वेळेमुळे त्याचं गांभीर्य जाणवायला लागतं.

Anxiety Disorder किंवा Generalized Anxiety Disorder (GAD) हा जरी खूप गंभीर आजार नसला तरी, योग्य उपचार करून त्यातून बाहेर पडलं नाही तर माणसाचं आयुष्य अकारण पोखरलं जातं. अकारण म्हणण्याचं कारण असं कि, अकारण, आणि अवाजवी भीती आणि चिंता हीच त्याची प्रमुख लक्षणं आहेत. आपल्यापैकी प्रत्येकालाच कसली न कसली चिंता, काळजी, विवंचना, भीती असतेच. पण हि चिंता किंवा भीती जेव्हा सहन करण्यापलीकडे जाते आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते तेव्हा विशिष्ट शारीरिक आणि मानसिक लक्षणं दिसतात. काही लोकांना घरात बसून राहावं लागत आहे म्हणून Claustrophobia जाणवतो आहे. म्हणजेच बंद जागांची भीती. घराबाहेर जाता येणार नाही म्हणून त्यांची Anxiety वाढते. घरात बसलं तर जीवाची घुसमट होते, अगतिक वाटायला लागतं, अस्वस्थता वाटायला लागते. असा भयगंड (Phobia) हा अनेकदा निरर्थक असतो, अवाजवी असतो हे ज्याचं त्याला कळतही असतं पण तरीही काहीतरी भयानक घडेल हि भीती त्याच्या मनानी घेतलेली असते.

अनेक लोकांना लिफ्ट ने जाणे, विमान प्रवास, ट्रेन मध्ये आत गर्दीत गेलं कि घुसमट होणे अशा स्वरूपाचा भयगंड असतो. तसेच मॉल्स चे बेसमेंट, बोगदा अशा जागांचा फोबिया असतो. Mysophobia/Germophobia - जंतूंची, जंतू संसर्गाची अवाजवी भीती, Agoraphobia - अनोळखी माणसं किंवा ठिकाणाची भीती, Aviophobia - विमानप्रवासाची भीती, Haemophobia - रक्ताची भीती, Thanatophobia - मृत्यू या संकल्पनेची भीती, Social Phobia, असे भयगंडाचे अनेक प्रकार आहेत.

एकदा का भीती वाढली कि ज्या गोष्टीची, किंवा प्रसंगाची भीती वाटते, काही तरी वाईट घडेल असे वाटते, त्यापासून लांब पळणे, किंवा स्वत:ला लांब ठेवण्याचा क्षणात प्रयत्न करणे, किंवा नुसतं त्या गोष्टीला सामोरं जाण्याच्या कल्पनेनेच खूप घाबरणे अशी लोकांची अवस्था होते.

Anxiety, Phobia आणि Panic Disorder मध्ये विशिष्ट प्रकारची शारीरिक (Physiological) आणि मानसिक/भावनिक (Psychological/Emotional) लक्षणं दिसतात. घाम फुटणं, हातापायाला कंप जाणवणं, छातीत धडधड वाढणं, चक्कर येणं, डोकं दुखणं, घशाला कोरड पडणं, छातीत दुखणं, अशी शारीरिक लक्षणं दिसतात. तसेच एखाद्या जागेतून पळून जावंसं वाटणं, मृत्यूची भीती वाटणं, रडू येणं, अचानक घरात येरझाऱ्या घालाव्याश्या वाटणं, अशी मानसिक लक्षणं दिसतात. बहुतांशी हि भीती काल्पनिक असते, तर काहीवेळा आपण आयुष्यात अनुभवलेल्या एखाद्या वाईट घटनेशी (जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, जवळून पाहिलेला/अनुभवलेला अपघात) याचा संबंध असतो.लॉकडाऊनमुळे Claustrophobia किंवा Mysophobia/Germophobia या प्रकारची भीती/भयगंड असलेल्या लोकांना त्रास जाणवतो आहे.

Anxiety, Phobia आणि Panic Disorder यावर औषोधोपचार आणि सायकोथेरपीज अशा दोन्ही पद्धतीने उपचार करता येतात. काहीवेळा Anxiety/Phobia एवढंच आजाराचं स्वरूप असतं तर काहीवेळा अशी Anxiety/Phobia हा इतर मनोविकारांबरोबर आढळून येतो (Comorbidity). तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचे उपचार घेणं आवश्यक आहे. सायकोथेरपीज मध्ये सिस्टिमॅटिक डिसेंसटायजेशन थेरपी (systematic desensitization therapy), Cognitive Behavioural Therapy (CBT), अश्या स्वरूपाचे उपचार करता येतात.

परंतु ज्यावेळी आपण तज्ञांकडे जाऊ शकत नाही त्यावेळी आपल्या मनावरचं नियंत्रण अन्य कुठल्या मार्गाने मिळवता येईल हा विचार करणं गरजेचं असतं. मनावरचं नियंत्रण म्हणजेच आपल्या विचार आणि भावनांवरील नियंत्रण. म्हंटलं तर हि फार अवघड गोष्टं आणि म्हंटलं तर फार सोपी गोष्टं आहे. आपल्या पारंपरिक योगशास्त्राचा, योगाभ्यासाचा, प्राणायामाचा आणि ध्यान-धारणेचा खूप जवळचा संबंध स्थिर मनाशी आहे. माणसाचं मन स्थिर तेव्हाच असू शकतं जेव्हा ज्या परिस्थितीत माणूस आहे, तिथे तो शारीरिक, आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे असतो. त्यावेळी त्याच्या मनात कधी एकदा ह्यातून आपली सुटका होणार आहे, कधी एकदा हे संपणार आहे, कधी एकदा काहीतरी सुरु होणार आहे… अशा प्रकारच्या अपेक्षा, मागण्या किंवा विचार आले कि माणूस जिथे जसा आहे तसा आनंदाने न जगता, जे नाहीये त्याचा मागोवा घ्यायला लागतो. आणि जे आत्ता घडत नाहीये किंवा जे आपल्याला मिळत नाहीये त्याचा हट्ट मन करायला लागतं आणि अश्या परिस्थितीत आपलं मन सदैव अशांत, अस्वस्थ आणि असमाधानी राहतं. भीतीचं हि असंच आहे.

भीती मध्ये प्रत्यक्षात न घडलेल्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. अनेकदा वाईट शंका मनात येतात. संभाव्य धोके, वाईट शक्यता यांनी मन त्रस्त होतं. म्हणजेच भीतीपासून सुटका हवी असेल तर वाईटच काहीतरी घडेल हा कल्पनाविलास थांबायला हवा. तो तेव्हाच थांबेल जेव्हा आपण ज्या परिस्थितीत आहोत त्याचा आनंद घ्यायला शिकू. तसंच आपल्याला दुसऱ्या टोकाला जाऊन विचार करता यायला हवा कि जे काही वाईट व्हायचं ते होऊ दे, ती वेळ येईल तेव्हा मी समोर जाईनच. असा जर विचार आपण केला, तर आपण आपसूकच तो पर्यंत वर्तमानात त्याची काळजी करण्यापासून मुक्त किंवा परावृत्त होऊ शकतो. पुढे जे होईल त्याची वाईट कल्पना करण्यापेक्षा आत्ता आपण जसे जेथे आहोत तेथे पूर्ण असण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करणं ह्याचा सराव आपण करायला हवा.

सकारात्मक विचार करा असं म्हणून प्रश्न सुटत नाहीत. आधी नकारात्मक विचारांपासून पळ न काढता त्यांना सामोरे जाणे, वास्तववादी विचार करून त्याची शक्यता-अशक्यता पडताळून पाहणे, आणि कल्पना आणि वास्तव यातील फरक समजून घेणे असा प्रयत्न आपण जाणीवपूर्वक करायला हवा. मनोसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन शास्त्रोक्त उपचार म्हणजेच समुपदेशन आणि सायकोथेरपी तसेच गरज असल्यास औषोधोपचार आवश्यक आहेतच. परंतु त्याच बरोबर स्व-मदतीची जोड जर मिळाली तर या अशांततेवर मात करून आपले आयुष्य आपल्याला शांतपणे आणि आनंदाने जगता येईल.
© सौ. वृषाली निमकर-आठले.
(समुपदेशक व मानसोपचारतज्ञ)
Mail ID: [email protected]
(हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता लेखकाच्या नावासकट शेअर करावा ही विनंती).

06/02/2020

कणखर वारसा
© सौ. वृषाली निमकर-आठले.
दिनांक: ६/२/२०२०.
“चला.. संपलं गं माझं माहेरपण. उद्यापासून स्वयंपाकघराचा ताबा घ्यायचा”; असं आई म्हणाली आणि क्षणभर डोळ्यांत पाणी आलं. एका वाक्यात तिने मी केलेल्या कष्टांची, लगबगीची पोचपावती किती छान पद्धतीने दिली. गम्मत वाटली! मी आईचं माहेरपण छान केलं असं तिला वाटलं, आणि तिने ते व्यक्त करून माझ्याच ओंजळीत भरभरून समाधान टाकलं.
ह्यावेळी आई-बाबा चांगले महिना-दिड महिना रहायला आले आणि खूप काळानी दोघांचा छान सहवास मला मिळाला. आताशा आई-बाबांचं, आई-काकांचं (सासू-सासरे) काहीही करतांना मला कमालीचं समाधान मिळतं. ह्या चारही मोठ्या माणसांचा सहवास मिळाला कि बरं वाटतं. देवाच्या कृपेने आणि त्यांच्याच माझ्यावर झालेल्या संस्कारांमुळे हा सहवास हवाहवासा वाटतो. आपल्या मुलांना मोठं करता करता आपले आई-वडील कधी वयस्क झाले हे कळलंच नाही. कदाचित ते कळत होतं पण मन मानायलाच तयार होत नव्हतं कि आता त्यांचं म्हातारपण आलंय. स्वत:ची पन्नाशी आली तरीही आपल्या आई-वडिलांनी मात्रं छान त्यांच्या तरुणपणासारखंच सणसणीत राहावं हि इच्छा असणं याहून आपल्या मनाचा वेडेपणा तो काय! वडिलांच्या चाळीसाव्या वाढदिवसाला शुभेच्छा देतांना ते म्हणाले होते, “आता वाढदिवस कसला, आता आमचे काढदिवस”; तेव्हा केवढं वाईट वाटलं होतं. आता स्वत:ची पन्नाशी आल्यावर त्यांना म्हंटल, “पहा, आता तर तुमच्याबरोबर तुमच्या लेकीचे हि काढदिवस सुरु झाले”. अनुभवांची शिदोरी मोठी मोठी व्हायला लागली आणि आता ह्या चांगल्या-वाईट अनुभवांची देवाण-घेवाण आपल्या आई-बाबांबरोबर आणि आई-काकांबरोबर करावीशी वाटायला लागली. चौघांचीही व्यक्तिमत्त्व अगदीच भिन्न पण तरीही वेगवेगळ्या अर्थानी मी त्यांच्याशी अधिकाधीच जोडले गेले. विचारांती लक्षात आलं कि, एक मानसोपचारतज्ञ म्हणून नाही, तर हे सगळं माझ्या मूळ स्वभावातच आहे; जन्मजात आहे. जसं आई बरोबरचं नातं सहज सुंदर आहे, तसंच सासूबाईंबरोबरचंही माझं नातं कधी सहज आणि सुंदर होत गेलं, हे माझं मलाच कळलं नाही. जशी वडिलांविषयी उपजतच माया आहे, तशीच ती सासऱ्यांविषयी पण कधी वाटू लागली कळलंही नाही.
हि नाती परिपक्व होण्यात त्या चौघांचाही वाटा मोठा आहे. आपापल्या आयुष्यात त्यांनी केलेले अतोनात कष्ट आणि तडजोडी माझ्या डोळ्यासमोरून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ह्या वयांत मी त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं होतं मला. वार्धक्याची चाहूल नेमकी कधी, कुठल्या वयांत लागेल, हे सांगणं महाकठीण. अलीकडच्या काळात त्यांच्या शरीरावर आणि वर्तनात दिसणाऱ्या वार्धक्याच्या खाणाखुणा पाहिल्या कि मन अस्वस्थ होतं; आणि मग ह्या वयातही टिकून असलेली त्यांची उमेदच मनाला उभारी देते. हि त्यांची उमेद, सकारात्मक दृष्टीकोन, आणि महत्वाचं म्हणजे अजूनही घरातल्या तरुणांसाठीच काहीनाकाही करण्याची धडपड आणि इच्छा पाहिली कि हा आदर आणखी वाढतो.
तसा परिपक्वतेचा संबंध खरंच वयाशीही नाही, आणि शिक्षणाशीही नाही हे नक्की. पण वार्धाक्यानी येणाऱ्या अनुभवांचा संबंध मात्रं परिपक्वतेशी आहेच, असं मला वाटतं.
मला नेहमी कौतुक वाटतं ते, ह्या ज्येष्ठांच्या अनुभवसंपन्न आयुष्याचं. अनेक तडजोडी केल्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची लवचिकता, नकारात्मक परिस्थितीचा सामना करतांना त्यांच्यात असलेला कणखरपणा, एखाद्या निर्णयावर ठाम राहून त्या निर्णयांच्या परिणामांना समोरं जाण्याचं धारिष्ट्य, या सगळ्याचंच मला कौतुक वाटतं. त्याचबरोबर, सकारात्मक परिस्थितीतही आपलं अंथरूण पाहून पाय पसरावे हेच धोरण. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या कि जाणवतं कि, त्यांचं शरीर थकलं, सगळी गात्रं हळूहळू थकली म्हणून क्वचित कधीतरी ते परावलंबी होत असतीलही, पण मानसिक आरोग्य मात्रं त्याचं आजही कणखर आहे.
मला नेहमीच असं वाटतं, ‘आपण आपल्याच पालकांचं किती करतो, आपल्याला किती करावं लागतं...’ वगैरे गोष्टींचा उगीच बाऊ करण्यापेक्षा, आपण ते करायलाच हवं; ते फार मोठं पुण्य आहे, हा विचार आपण करायला हवा. आणि त्यांची सेवा करता करता त्यांच्याकडून ह्या कणखर मानसिक आरोग्याचा वारसा आपण घ्यायला हवा.
© सौ. वृषाली निमकर-आठले.
(समुपदेशक व मानसोपचारतज्ञ)
Mail ID: [email protected]
(हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता लेखकाच्या नावासकट शेअर करावा ही विनंती).

12/12/2019

कंगोरे अस्तित्वाचे
© सौ. वृषाली निमकर–आठले.
(समुपदेशक व मानसोपचारतज्ञ)
दिनांक: १२/१२/२०१९
She is a Paradox
She is Faithful and yet detached
She is Committed and yet relaxed
She loves everyone and yet no one
She is sociable but also a loner
She is gentle and yet tough
She is passionate but can also be platonic
In short, she is predictable in her Unpredictability
काही दिवसांपूर्वी Instagram वर माझ्या हे वाचनात आलं, आणि मनात आलं की हे तर माझंच चपखल वर्णन आहे. मी नक्की कशी आहे... किंवा मी हि अशी कशी आहे.. असे अनेकदा मनात येणारे विचार क्षणभर थांबले आणि वाटलं हो, हे जे काही मी वाचलं, मी नेमकी तशीच आहे. ह्या माझ्याच स्वभावाच्या अनेक छटा आहेत. एखाद्याला विरक्त जगताना पाहिलं कि त्याला भरभरून जगायचं कसं हे शिकवण्यासाठी धडपडणारी मी खरी, कि जीवनाविषयी खूप आसक्ती असतानाच आणि सगळी सुखं पायाशी हात जोडून उभी असतानाही त्याने उन्मत्त न होता क्वचितच सहज विरक्त होणारी मी खरी?
लहानपणापसून बोलकी, नंतर गप्पीष्ट, उत्तम वक्तृत्व असणारी आणि माणसांनी मन मोकळं बोलायलाच हवं असा दुराग्रह असणारी मी खरी.. कि अचानक अंतर्मुख होणारी, बाह्य संवादापेक्षा स्वत:च स्वत:शीच संवाद साधत स्वत:च्याच मनात खोलवर डोकावणारी मी खरी?
मनाला आकारणच सतावणारे असे अनेक प्रश्न पडतात. पण लोकांना जसा ह्या प्रश्नांचा त्रास होतो तसा मला मात्र त्याचा त्रास होत नाही. उलट मला उलटसुलट विचारांचा मागोवा घेत त्यांना पकडण्यात, निरखण्यात आणि मग नेमकेपणानी त्यांना समजून घेण्यात कमालीचा आनंद मिळतो. असं वाटतं, हे विचार माझ्या जगण्याला एक सुंदर दिशा देतात. आपण आपल्या जिवाभावाच्या माणसावर जसं उदंड प्रेम करतो ना, तसंच उदंड प्रेम मी ह्या विचारांवर करते. मला त्यांचं माझ्या मनात येणं आवडतं. शेवटी प्रेम म्हणजे काय तर स्वत:ला काहीकाळ विसरून समोरच्याचं अस्तित्व खूप हवंसं वाटणं. त्या सहअस्तित्वाची पराकोटीची ओढ वाटणं. असंच काहीसं ह्या विचारांचं आणि माझं नातं आहे. आपण माणसांवर जसं प्रेम करतो तसंच माझ्या विचारांवर मी भरभरून प्रेम करते. माझ्या मनांत भरून राहणारं त्या विचारांचं अस्तित्व मला फार भावतं; आणि त्या विचारांत माझं मन रमून जातं.
कित्त्येकदा ते विचार अगदी परस्पर भूमिका घेऊन आलेले असतात. आपल्या विचारांच्या विरुद्ध विचार असलेली व्यक्ती समोर आली कि लोकं हिरीरीने वाद घालतात, भांडतात; आणि स्वत:चेच विचार कसे योग्य आहेत हे सिद्ध करण्यासाठी जीव टाकतात. स्वत:च्याच मनामध्ये विचारांचा गोंधळ झाला, आणि जर उलटसुलट विचार मनात घोळायला लागले तर मात्रं माणसं घाबरून जातात. वास्तविक समोरच्याचा विचार आपल्याला पटत नसेल तर तो विचार आपण नाकारू शकतो, पण आपण तसं न करता जी व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळा विचार करते त्या व्यक्तीलाच नाकारतो. आणि म्हणूनच स्वत:च्याच मनामध्ये जेव्हा विरोधी विचार थैमान घालतात तेव्हा लोकं घाबरून जातात, गोंधळून जातात कारण इथे नाकारणार कोणाला? वास्तविक आपण विरुद्ध विचार करणाऱ्या माणसाला समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा, आणि आपल्याच मनातल्या परस्पर विरुद्ध विचारांचा मागोवा घेऊन त्यातला अयोग्य, अवाजवी आणि अवास्तव अशा विचारला आपण नाकारायला हवं. हे जर साध्य झालं तर स्वत:च जगणं आपण वैचारिकदृष्ट्या खूप समृद्ध करू शकतो.
© सौ. वृषाली निमकर–आठले.
(समुपदेशक व मानसोपचारतज्ञ)
Website: www.vrushaliathale.com
Mail ID: [email protected]
(हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता लेखकाच्या नावासकट शेअर करावा ही विनंती).

Want your practice to be the top-listed Clinic in Dombivli east?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

F/17, Shree Parshwa Industrial Premises, V P Road. Opp Plasma Blood Bank
Dombivli East
421201

Opening Hours

Tuesday 5pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
Thursday 5pm - 9pm
Friday 10am - 1pm
Saturday 5pm - 9pm
Sunday 10am - 1pm

Other Dombivli East clinics (show all)
SAI AASHA Medical STORE SAI AASHA Medical STORE
Shop No 3, Ashapura Park, Near Mahaveer Hospital, P & T Colony
Dombivli East

ALL TYPES OF FAMILY PHYSICIAN & SKIN SPECIALIST MEDICINE AVAILABLE HERE

Fertility Decoded : Akruti IVF Fertility Decoded : Akruti IVF
Akruti Ivf Centre LLP , Gharda Circle , Above Mc Donalds
Dombivli East, 421203

AN EDUCATIONAL INITIATIVE BY AKRUTI IVF TO DECODE JARGONS IN INFERTILITY

Shree Lakshmi Health Clinic Shree Lakshmi Health Clinic
Shop No 5, Samarth Suja Apartment, Rathod Complex, Azdegaon
Dombivli East

General Clinic, Homeopathic Consultation

Dermage skin and Laser clinic Dermage skin and Laser clinic
Deo Madan Soc. Near Corporation Bank Atm Kalyan Road Gopal Nagar Lane No . 1
Dombivli East, 421201