Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.

स्व. गणपतराव गाताडे दिव्यांग विद्याल? Our residential school has been started since 2002 and 50 students are taking education in this school.

It has permitted by government, but it does not get any kind of grant from government as well as any trust.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 21/03/2024

World Down Syndrome Day

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 08/09/2023
Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 15/08/2023

Independence Day celebrations at Divyang School.

03/07/2023
Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 21/03/2023

कागल ता.21- डाऊन सिंड्रोम मुलांमध्ये संवेदना निर्माण करण्याची मानसिकता ठेवून काम केल्यास ही मुले सक्षमपणे सामाजिक प्रवाहात आपले अस्तित्व निर्माण करू शकतात असे प्रतिपादन मानसशास्त्रज्ञ श्री अतिश निपाणीकर यांनी केले.
कागल जिल्हा कोल्हापूर येथील स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद बौद्धिक अक्षम विद्यालयात 21 मार्च जागतिक डाऊन सिंड्रोम दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात श्री निपाणीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व नॅशनल ट्रस्टच्या कोल्हापूर लोकल समितीचे सदस्य श्री अतुल जोशी होते. प्रमुख उपस्थिती विश्वस्त अमेय जोशी होते.
यावेळी हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. अमेय जोशी यांनी केले.
निरामय या जागतिक डाऊन सिंड्रोम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पिवळे व निळे ड्रेस घालून फुगे उडविले व आनंदोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री अनिल पाटील यांनी तर आभार महेश पवार यांनी मानले.यावेळी सो. आयेशा नदाफ सो. अनुराधा घाटगे श्री. नितीन कांबळे अक्षय निकम राजू राणे यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 16/03/2023

कागल ता. १६ /०३/२०२३
कागल येथील स्व. गणपतराव गाताडे दिव्यांग निवासी व अनिवासी विद्यालय कागल या शाळेत सुदर्शन इंडस्ट्रियल चे मालक मा. सिदार्थ बन्सल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
श्रीयुत योगेश मटुरे यांनी या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांना बन्सल यांच्या हस्ते स्पोर्ट्स किट व स्नेहभोजन दिले. बन्सल यांनी दिव्यांग मुलांच्या पंगतीस स्वतः भोजन वाढले. या वेळी बोलताना श्री सिद्धार्थ बन्सल म्हणाले दिव्यांग मुलांना संस्थेने सुसज्य इमारती सह शैक्षणिक व भौतिक सुविधा दर्जेदार निर्माण केल्या आहेत यातून त्यांची सेवाभावी वृत्ती लक्षात येते या विद्यालयास भविष्यात सर्वोपरी मदत करू असे अभिवाचन त्यांनी दिले.
यावेळी अर्जुन नाईक, योगेश मटुरे, इमरान मुजावर यांच्या सह स्टॅंड सर्कल चे सहकारी होते.
प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त श्री. अमेय अतुल जोशी यांनी मांडले तर आभार प्रविण मोरबाळे यांनी मांडले.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 19/01/2023

जिज्ञासा विद्यालय कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या दिव्यांग विद्यालयांच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय कागल ने सहभाग घेऊन विशेष प्राविण्य मिळवले सदर स्पर्धेमध्ये धुळसिद्ध शेळके, अष्टांग जाधव, प्रज्वल चव्हाण, शैलेश नाईक, निखिल गुरव, प्रथमेश वाडकर हे विद्यार्थी सहभागी झालेले होते फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल व बोची आधी खेळांचा समावेश होता बोची -प्रथम क्रमांक
हॉलीबॉल -द्वितीय क्रमांक
फुटबॉल -चौथा क्रमांक

यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन....

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 10/01/2023

१० जानेवारी २०२३, स्व. गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालयाचा २१ वा वर्धापनदिन साजरा.
Celebrating 21st Anniversary of Lt. Ganapatrao Gatade Intellectually disabled school.
Thank you all the teachers, parents, dear students, and non-teaching staffs as always for your valuable support and making this program a grand success..

Divyang Student’s Dance Performance on World Disability Day 2022 03/12/2022

03 डिसेंबर 2022 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभाग , जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केशवराव नाट्यगृह येथे आयोजित दिव्यांग मुला-मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य सादरीकरण करताना आमच्या स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालय, कागल चे विद्यार्थी व शिक्षक.

Divyang Student’s Dance Performance on World Disability Day 2022 03 डिसेंबर 2022 जागतिक दिव्यांग दिनानिमित्तसमाज कल्याण विभाग , जिल्हा परिषद, कोल्हापूर आयोजित दिव्यांग मुला-मुलींचा ...

03/12/2022

03 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हेलन केलर यांचे फोटो पूजन करण्यात आले.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 18/10/2022

राष्ट्रीय न्यास (National Trust) दिल्ली व कागल तालुका कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित, स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धीक अक्षम विद्यालय कागल.
ता. कागल, जि. कोल्हापूर. यांच्या संयुक्त विद्यमाने
जिल्हास्तरीय निरामय योजना मार्गदर्शन शिबीर
श्री. अतुल रामचंद्र जोशी (लोकल लेवल कमिटी सभासद नॅशनल ट्रस्ट कोल्हापूर.) याच्या वतीने आयोजित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त मा. अमेय अतुल जोशी , मा. अनिल पाटील सर (मुख्याध्यापक) , मा. अतिश निपाणिकर सर (मानसोपचार तज्ञ) व दिव्यांग पालक उपस्थित होते.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 18/10/2022

जिल्हा परिषद कोल्हापूर येथील स्टॅाल.
या दिवालीसाठी स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालय, कागल या शाळेतील विद्यार्थ्यांनी हे सर्व दिवे स्वतः बनविले आहेत. हे सर्व दिवे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आजच खरेदी करुन
या विशेष विद्यार्थ्यांना सक्षम बनण्यास मदत करु.

Based in Kagal Dist- Kolhapur, Lt. Ganpatrao Gatade Intellecually Disabled School is a centre that trains intellectually-challenged individuals.
This Diwali we are preparing Diya's for sell. You can Pre Order Now.
Contact +91 99606 57474 Or DM us.
Thank You.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 24/09/2022

दिवाली
बौद्धिक अक्षम विद्यार्थांनी बनविलेले दिवे विक्रीसाठी उपलब्ध
स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालय, कागल.

या दिवालीसाठी स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालय, कागल या शाळेतील विद्यार्थ्यांनी हे सर्व दिवे स्वतः बनविले आहेत. हे सर्व दिवे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आजच खरेदी करुन या विशेष विद्यार्थ्यांना सक्षम बनण्यास मदत करु.
Based in Kagal, Lt. Ganpatrao Gatade Intellecually Disabled School is a centre that trains intellectually-challenged individuals. This Diwali we are preparing Diya's for sell. You can Pre Order Now. Contact +91 99606 57474 Or DM us. Thank You.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 15/08/2022

कागल ता. १५. स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी शिस्त, शिक्षण आणि संस्काराने विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी सेवाभावीपणे कार्य करावे असे आवाहन दूधगंगा विद्यालयाचे संस्थापक पत्रकार अतुल जोशी यांनी केले.

येथील दूधगंगा विद्यालयाच्या प्रांगणात आज ७५ व्या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहन समारंभात

अध्यक्ष स्थानावरुन अतुल जोशी बोलत होते. प्रमुख पाहुणे कोल्हापूरचे प्रसिध्द धनवंतरी डॉ. सचिन कुलकर्णी, विजय मंत्री, दिनकरराव प्रभावळकर होते. यावेळी दूधगंगा विद्यालयाचे ध्वजारोहन डॉ. सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौध्दिक अक्षम विद्यालयाचे ध्वजारोहन रोहीत गाताडे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीकांत भोळे यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. जोशी म्हणाले, "ज्या गावात शाळा त्या गावातून राष्ट्रप्रेमी पिढी तयार होते हे खरे आहे. परंतू शिक्षणाबरोबर शिस्त संस्कार ही विद्यार्थ्यांची गरज बनली आहे. स्वातंत्र्याने आम्हाला काय दिले ? असा प्रश्न पडावा असे जातीभेदाचे विषमतेचे राजकारण चालू आहे. हे मानवी स्वातंत्र्याला घातक आहे. यावेळी दिनकरराव प्रभावळकर यांचे भाषण झाले.

यावेळी प्रमुख उपस्थित अमेय जोशी, आनंदराव पाटील, दिनकर पाटील, प्रकाश कदम, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील, शिवाजीराव दावणे, रामचंद्र शेळके, कृष्णात दळवी, अजय गावडे, होते.

स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केले. सुत्रसंचलन पुरंदर कांबळे यांनी

केले. तर आभार सौ. संगिता पाटील यांनी मानले.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 13/08/2022

दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ध्वजारोहण समारंभ संस्थेचे विद्यमान संचालक मा. श्री. अमेय अतुल जोशी यांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी धरणग्रस्त वसाहतीमधील मा. श्री. आनंदराव पाटील, दिनकरराव यादव तसेच दूधगंगा विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल या शाळेचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, श्री रामलिंग बाल विद्या मंदिर धरणग्रस्त वसाहत कागल या बालवाडी चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय कागल या शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 12/08/2022

*व्यसनमुक्तीची शपथ* घेताना स्वर्गीय गणपतराव गाताडे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 28/07/2022

आज दीप अमावस्या शाळेमध्ये दिवे लावून दीप अमावस्या साजरी केली.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 25/07/2022

Rakhi's Made by Our Intellecually Disabled Students.

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 21/07/2022

जिल्हा परिषद, कोल्हापूर
स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२
जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 13/07/2022

स्व. गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालया मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या विशेष मुलांची सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी वर्षभर काळजी घेत असतात. या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !

Photos from Swargiya Ganapatrao Gatade Divyang Vidyalay, Kagal.'s post 21/06/2022

*21 जून जागतिक योग दिनानिमित्त स्वर्गीय गणपतराव गाताडे बौद्धिक अक्षम विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. योग शिक्षक श्री तानाजी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूरक व्यायाम, तालबद्ध हालचाली, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायम व प्रार्थना घेण्यात आली. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.*

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

या वर्षीची दिवाळी बनवुया अधिक सर्वसमावेशक आणि साजरी करु बौद्धिक अक्षम मुलांनी बनवलेली उत्पादने खरेदी करुन. आमची शाळा आणि...
दिंव्यांगकल्याण अभियानात सहभागी मुलांना संस्थेचे विश्वस्त.,,.....  Mc Donald ची सफर घडवली.....           कागल जि. कोल्हा...
शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अमेरीका स्थित शास...
स्वर्गीय गणपतराव गाताडे दिव्यांग विद्यालय कागल शालेय परिपाठ
मोफत प्रवेश जुन २०२२ साठी स्व. गणपतराव गाताडे दिव्यांग (मतिमंद) विद्यालय, कागल, कोल्हापुर.येथे मोफत प्रवेश सुरु, ६ ते १४...

Category

Website

Address

Kalammawadi Project Affected Colony, Kagal, Kolhapur(Maharashtra)
Kolhapur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Other Schools in Kolhapur (show all)
Genius Public School & Junior College, Bhuyewadi Genius Public School & Junior College, Bhuyewadi
Near Warana Bazar, Main Road, Bhuyewadi
Kolhapur, 416229

Genius Public School and Junior College, Bhuyewadi Is established to provide the best education for the students who are living in a rural area in the medium of English...

Disha Academy Disha Academy
Sake Road, Bachani
Kolhapur, 416221

Nature's Lap Pre School Nature's Lap Pre School
Near Government Engineering College, Behind Institute Of Engineers, Station Road# 2
Kolhapur, 431005

ज्ञान प्रबोधिनी,बाचणी ज्ञान प्रबोधिनी,बाचणी
Kolhapur

न हीं ज्ञानात परम चक्षु:

Suraj Motor Training School Suraj Motor Training School
Arban Bank Jarag Nagar
Kolhapur, 416007

Motor Training School

Nagojirao Patankar High School Nagojirao Patankar High School
Shivaji Peth A Ward, C Ward
Kolhapur, 416012

ना.पा. हाय स्कूल Official Page B.N.Patankar Trust

Future Kid's Pre-School Future Kid's Pre-School
Plot No. 26 , Nursingh Colony , Near Gangai Lawn, Phulewadi Ring Road
Kolhapur, 416010

"Where little minds bloom, and big dreams take root." 🌱✨

Ostrich International School, Shingnapur Ostrich International School, Shingnapur
A/6, Shakambhari Colony, Near Anandkash Lawn, Shingnapur
Kolhapur, 416010

Where Learning Becomes Fun With The Help Of Technology Based Teaching Methods.

Tiny Hearts Preschool Tiny Hearts Preschool
Behind HDFC Bank, Opp Pandurang Nagari , Near Honda Service Centre, Deokar Panand
Kolhapur, 416012

Innovative Public School Borawade Innovative Public School Borawade
Mudhal Titta Radhangri Road Borawade. Tal-Kagal, Dist/Kolhapur
Kolhapur, 416208

Job Recruitment

Shree Shamrao Patil Group of Institutions Talsande Shree Shamrao Patil Group of Institutions Talsande
𝐓𝐚𝐥𝐬𝐚𝐧𝐝𝐞, 𝐖𝐚𝐫𝐧𝐚-𝐕𝐚𝐭𝐡𝐚𝐫 𝐑𝐨𝐚𝐝, 𝐓𝐚𝐥. 𝐇𝐚𝐭𝐤𝐚𝐧𝐚𝐧𝐠𝐚𝐥𝐞
Kolhapur, 𝟒𝟏𝟔𝟏𝟏𝟐

The official page of Shree Shamrao Patil Group of Institutions Talsande.

Barbie World pre primary and primary school Barbie World pre primary and primary school
1761 E Ward, Rajarampuri 4th Lane
Kolhapur

A self financed government recognised English medium Pre primary and primary school since 22 years.