Bapu Chandanshive

Bapu Chandanshive

You may also like

Bageshwar Dham Sarkar
Bageshwar Dham Sarkar

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bapu Chandanshive, News & Media Website, Ahmednagar, Maharashtra.

26/12/2023

ख्यातनाम साहित्यिक मा. प्रा. डॉ. राजन गवस यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना....

26/03/2023

प्रसिद्धी पत्रक : २६ मार्च २०२३

समविचारी पक्षांच्यावतीने सोमवारी नगर शहरात लोकशाही बचाव सत्याग्रहाचे आयोजन
---------------------------------------------------------
प्रतिनिधी : देशातील यंत्रणांचा दुरुपयोग करून काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. याविरुद्ध देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. २७) नगर शहरामध्ये सकाळी ११.३० वाजता माळीवाडा स्टॅन्ड जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समविचारी पक्ष, संघटना, समूह, गट, चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने लोकशाही बचाव सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याच्या नियोजनाची बैठक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी काँग्रेस पक्षाचे किरण काळे, संजय झिंजे, प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, प्रवीण गीते, गणेश चव्हाण, शैला लांडे, पुनम वंनंम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. सुभाष लांडे, कॉ. बन्सी सातपुते, कॉ. भैरवनाथ वाकळे, कॉ. मेहबूब सय्यद, आम आदमी पक्षाचे भरत सकाळ, रवी सातपुते, दिलीप घुले, राजेंद्र कर्डिले, ॲड. विद्या जाधव, सैनिक पक्षाचे ॲड. शिवाजी डमाळे, बामसेफचे शिवाजीराव भोसले, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज शेख, चर्मकार समितीचे शिवाजीराव साळवे तसेच बाळासाहेब देशमुख, विजयराव शिंदे, राजू देठे, विशाल केदारी, विजय सौदे आदींसह समविचारी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अनेकांनी यावेळी आपले परखड मनोगत व्यक्त केले. देशात अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे. सामान्य माणूस दैनंदिन प्रश्नांनी त्रस्त आहे. मात्र भाजप, आरएसएसला देशामध्ये हुकुमशाही आणायची आहे. त्यांना संविधान मान्य नाही. देशाच्या जनतेचा या भूमिकेला तीव्र विरोध असल्याचे मत यावेळी वक्त्यांनी मांडले. तसेच लोकशाही वाचविण्यासाठी नगरमध्ये समविचारी पक्ष, संघटना मोठ्या प्रमाणावर या निमित्ताने एकत्र आल्याचे पहिल्यांदाच पहायला मिळाले.

लोकशाही बचाव सत्याग्रहामध्ये भाजप, आरएसएस विरोधी विचाराच्या सर्व समविचारी पक्ष, संघटना, समूह, गट, चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सत्याग्रहाच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

फोटो ओळी : सोमवारी नगर शहरामध्ये भाजप - आरएसएस विरोधी समविचारी पक्षांच्या वतीने लोकशाही बचाव सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजनाची बैठक जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात रविवारी पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------------------

आपले नम्र,
भाजप - आरएसएस विरोधी सर्व समविचारी पक्ष, संघटना, समूह, गट, चळवळीतील कार्यकर्ते

05/12/2020
24/09/2020

शेती अदानीच्या दावणीला बंधू, अन शिक्षण अंबानीच्या ओंजळीतून घेऊ, चौकीदाराचा दरोडा डोळे मिटून पाहू!

25/05/2020

तू जे शहर उभे करण्यासाठी रक्त सांडलेस....

तू जे शहर उभे करण्यासाठी रक्त सांडलेस
तिथं तुला आज कोणीही थांब का म्हणत नाही?

तू झोपलास रस्त्यावर, जेवलास रांगेत उभा राहून ताटकळत
तुला या शहरात कोणीच निवारा का देत नाही...?

तू कामगार आहेस, जन्मापासून मृत्यूपर्यंत...
सहा वर्षांचा असताना आला होतास दोन हजार किलोमीटर दूर
या शहरात भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी...
दोन रात्री रेल्वेत संडासच्या जवळ बसला होतास मुटकुळे करुन,
लोकांनी तुडवताना दिल्या होत्या 'भिकारडी' म्हणून शिव्या,
तूझा बाप नुसताच हसला होता तुझ्याकडे बघून...
तू शरमला होतास बापाची सहनशक्ती पाहुन...
बापाला सवय होती या जागेची कायमचीच
टी.सी. विचारायचा तिकीट, दम द्यायचा...
बाप 'नही साब, आगली स्टेशनपर निकालेंगे' म्हणत गयावया करताना तू पहिलं होतं अनेकदा...
इथं येऊन फुटपाथवर झोपलास, थंडी- वाऱ्यात कुडकुडलास, वर्षभर एकच ड्रेस घालून दिलखुलास नटलास
उपाशीही झोपलास कित्येकदा या शहरात...

तूझ्या आयुष्यात गडद काळा रंग व्यापून असताना
तू घेतलास वयाच्या बाराव्या वर्षीच हातात ब्रश
तुला रंगवायचे होतं हे शहर...
रस्त्याच्या कडेच्या डिव्हायडर पासून ते टिळक- सावरकर पुलापर्यंत सर्वकाही तू रंगवलंस ...
पण आता तू गावाकडं जाताना हे शहर तुला का थांबवत नाही?
तू हे शहर रंगविण्यासाठी जीवाचा झूला केलास
तिथं तुला आज कोणीही थांब का म्हणत नाही...?

तू वडिलांबरोबर रंगकाम करतो म्हणून रडत होतास,
आणि बाप तू अजून लहान आहेस म्हणून समजूत काढत होता... त्याची भीती वेगळीच होती,
तुला न्यायचं नव्हतं चाळीसाव्या मजल्यावर आणि डोळे गरगरणाऱ्या त्या लोंबकळणाऱ्या मचाणावर...
तूझे वय अजून तोल सावरण्या इतकं झाले नव्हतं म्हणून तो जपत होता तुला,
पण तू पेटला होतास इरेला...
गावाकडं गवताच्या गळक्या छपरावर चढून तू नाचला होतास आभाळाला वाकुल्या दाखवत...
पण आज शहरात इमारतीच्या शेजारी पत्र्याच्या खोलीतून पाहता येत नव्हते तुला महाकाय, सुंदर इमारतीनी सजलेले शहर,
म्हणून तू चढलास अनेक इमारतींच्या हजारो पायऱ्या...
आणि रंगवलंस दारं- खिडक्या, मखमली शयनगृहे, सुवासिक टॉयलेटस आणि टोलेजंग मनोरे...
मग त्याचं इमारतीत राहणारे आणि तूझ्याकडे गँलरीतून डोकावणारे हे लोक...
आज कोणीही तुला थांब का म्हणत नाही...?

तू पहिल्या दिवशी ब्रश हातात घेतल्यावर
स्वतःच रंगाला होता मोरासारखा,
तोंडावर पाडून घेतले होतेस चकाकणाऱ्या इमारतीचे रंग
तूझे घर मात्र शेणाच्या मातीच्या रंगांत लोळून मातकट झालेले...
वर्षानुवर्ष रंग हरवलेल्या कुडाच्या भिंती, आणि गवताने झाकलेले दारिद्र्य...
ते तूझे वर्षानुवर्षं कुपोषित असलेले घर सोडून तू आला या शहरात भूक भागविण्यासाठी...
तू आता निघालास घरी तेव्हा ही पंचावन्न मजली,
तूच उभारलेली इमारत तूझ्याकडे तुच्छतेनं का बघतीय...?
तू बांधलेले हे संगमरवरी देवालय तुला का आसरा देत नाही...?
मेट्रोच्या खांबांच्या सिमेंटमध्ये तू तूझे सळसळणारे रक्त कालवले,
त्या शहरातील आज कोणीही तुला थांब का म्हणत नाही...?

तू आला या शहरात आणि काम शोधलंस...
सात वर्षांपासूनच तू धुवू लागला होता हॉटेलातील बशा- प्लेट्स तेव्हा इथली श्रीमंती तूझ्याकडे बघुन ढेकर देत तुझी हेटाळणी करीत होती,
तेव्हा तू फक्त हसत राहिलास केविलवाणा चेहरा करून...
कोणी ओरडलाच शिवी देत, तरीही तू संयम ढळू दिला नाही कधीच या शहरात...
तू पेटवून दिल्या त्यांनी तोंडात धरलेल्या सिगारेटी आणि भरून दिले मद्याचे ग्लास,
तूझे चिमुकले हात पुसत राहिले टेबलवर पडलेले भांडवली- सामंती मुजोरपणाचे खरकटे डाग...
हेच ते शहर तुला गुलाम बनवत होतं
हेच शहर तूझे बालपण हिरावून घेत होतं
तूझ्या भुकेच्या बदल्यात तुला या शहराने काय दिलं?
तू कप धुतले, भांडी धुतली, खरकटे पुसून घेतले, चहा दिला, मद्य दिले... तूझे बालपण या शहरातील लोकांच्या सेवेसाठी तू कुर्बान केलंस...
तरीही या शहरातील आज कोणीही तुला थांब का म्हणत नाही...?

तू तूझ्या तरुणपणात चढलास इथल्या महाकाय कचऱ्याच्या ढिगावर आणि साफ करीत राहिलास वीर्य पुसून टाकलेले नेपकिन्स, भांडवली- जातीय व्यवस्थेच्या पत्रावळी, गगनचुंबी इमारतींमधून बाहेर पडणारा ओला- सुका तिरस्कार आणि टाकाऊपणा...
तू साफ केल्या बाटल्या, कंडोम, सँनीटरी पेड, मलमूत्राने तुंबलेल्या श्रीमंत गटारी...
तू धुतल्या गटारीतील पाण्यानेच ह्रदयावर झालेल्या जखमा
तू रात्रंदिन झीजलास सिटीला स्मार्ट बनविण्यासाठी...
तरीही...
त्या शहरातील आज कोणीही तुला थांब का म्हणत नाही...?

तू रंगवलेस मार्क्स, लेनिन आणि फुले, शाहू, आंबेडकरांचे निश्चल पुतळे...
तू जाता- येता करीत राहिलास वंदन...
लाल आणि निळे झेंडे बघून दिल्यास जिवाच्या आकांताने घोषणा...
या शहराने तुला रेशनकार्ड देण्याअगोदर मतदान कार्ड दिलं,
शिक्के आणि नावासमोरची बटण दाबण्यासाठी पैसे दिले,
दारू पाजली, हातात झेंडे दिले, पण रहायला घर दिले नाही...
जग, देश लॉकडाऊन होतास, तूही मग लॉकडाऊन झालास
कारण या शहराने फक्त तुला भुकेच्या बदल्यात वापरून घेतले बघ... तू निघालास गावाकडे उपाशी पोटाने, अशावेळी
या शहरातील आज कोणीही तुला थांब का म्हणत नाही...?

तू भांडवलदारांच्या गिरणीत राबलास, कारखान्यात खपलास,
त्यांच्या कोट्यवधी नफ्यामध्ये तू तूझे जगणं ओतून टाकलेस,
तूझा हात गेला, पाय गेला तरीही तू या शहरातील श्रीमंतीत भर टाकण्यासाठी कष्टत राहिलास...
तू या शहराला तूझे चकाकणारे डोळे दिले, कोवळे बालपण, सळसळते तरुणपण आणि खंगलेले म्हातारपणही दिले...
अशा अवस्थेत तू निघालास माघारी गावी... तरीही,
या शहरातील आज कोणीही तुला थांब का म्हणत नाही...?

तू शेकडो किलोमीटर चालतो आहेस,
पाय थकलेत, तूझ्या बायकोच्या कडेवर बाळ आहे, डोक्यावर संसारची आयुष्याची मिळकत आहे, मागे सात वर्षांची ऐश्वर्या चालते आहे...
तू वाटेत पाहिलंय, पोटूशी चालताना आणि रस्त्याच्या बाजूला बाळंत होताना बाईला...
तू पाहिलंय थकलेल्या आईला पाटकूळी घेऊन शेकडो किलोमीटर चालणारा आत्मनिर्भर मुलगा
आणि भुकेमुळे रस्त्याच्या कडेला तडफडणारी माणसं,
नदीत उडी टाकून मरणारे उपाशी देह...
तू पोहोचणार आहेस, जगालास तर तूझ्या त्याच गावात
जिथं तुला जातीनं ओळखतात,
शहराने धूसर केलेली जात पून्हा तोंड वर काढेल...
जी हुजूर, म्हणत सामंतवादी मग्रुरांच्या वाड्यावर तुला पून्हा गुलामी सुरू करावी लागेल...
तू 'आत्मनिर्भर' होऊ नये यासाठी हजारो वर्ष कार्यरत असलेली मनुवादी व्यवस्था कार्यरत होईल...
बायकोला बंगल्यावर सोडून यावं लागेल कधीकधी पहिल्यासारखंच...
कुजलेल्या घराचे छत गुलामीच्या, शोषणाच्या आठवणी तुला पून्हा सांगेल...
शोषण दोन्हीकडे आहे बघ...
गावाकडे जातीचे- धर्माचे, शहरात श्रमाचे- भांडवली नफ्याचे
तू जेव्हा गाव सोडलं, तेव्हाही कोणी तुला अडवलं नाही आणि आता शहर सोडतानाही तुला कोणी थांब म्हटलं नाही...
देश तुला आता म्हणतोय आत्मनिर्भर बन...
मी तुला सांगतो मित्रा- शिक, संघटित हो आणि संघर्ष कर... अन्यथा तुला ही व्यवस्था कायम वापरत आली आहे, वापरत आहे, वापरत राहिल...
कारण तू ज्या गावाची बापजाद्यापासून सेवा केली आणि ज्या शहराला सजविण्यासाठी जिवाचं रान केलंस तिथंही तुला आज कोणीही थांब म्हणत नाही...
इथं आज तुला कोणीही थांब म्हणत नाही...

प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, पंढरपूर
8999984433

21/04/2020

कोरोनाला जर असाच जबरी शाप दिला, तर तो होरपळून खाक होईल का?... सहजच विचारलं...!

Want your business to be the top-listed Media Company in Maharashtra?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address

Ahmednagar
Maharashtra
414001
Other News & Media Websites in Maharashtra (show all)
Latest News Analysis Latest News Analysis
Maharashtra

This is a Blogger Website, In this Site India and World Latest News with Analysis, In this News Blog All kind of Information are available.

newspart.com newspart.com
Vibhuti A2/502, Saibaba Vihar Complex, Anand Nagar, Ghodbundar Road, Thane
Maharashtra, 400607

Trending News

News18 Pune News18 Pune
Pune
Maharashtra

Your district. Your News. On https://lokmat.news18.com. News18 Pune.

Knowledd Knowledd
Mumbai
Maharashtra

It's Love that we share 🌺