Ravi B. Mankar

Ravi B. Mankar

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ravi B. Mankar, Writer, Nagpur.

16/11/2024

अनेक वर्ष काँग्रसने सत्ता केली. त्यानंतर भाजप आल, मात्र काय बदल झाला? तरी तुम्ही काँग्रेस आणि भाजपाला मतदान करता. साचलेल पाणी गढूळ होतं, त्यामुळे ते पाणी आपण पित नाही. कारण त्यात अळ्या असतात. असाच सत्ताधारी पक्ष अळ्या पेक्षा, अळ्या झालेला आहे.

प्रकाश आंबेडकर
प्रमुख, वंचित बहुजन आघाडी

16/11/2024

पंतप्रधानांनी यावेळी माझ्यावर टीका केली नाही. टिप्पणी केली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत, त्यांनी माझ्यावर टीकेची झोड उठवली, त्यावेळी आमच्या जागा वाढल्या. त्यामुळे मी मोदींना राज्यात, प्रचाराचं निमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्रात यावं आणि माझ्यावर टिप्पणी करावी. त्यामुळे आमच्या जागा तरी वाढतील.

शरद पवार
अध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट

16/11/2024

आम्ही अटलबिहारी वाजपेयींसोबत त्यांच्या सरकारमध्ये होतो. आता यापुढे कधीही इकडे तिकडे जाणार नाही. पंतप्रधान मोदी संपूर्ण देशासाठी, काम करत आहेत आणि त्यांनी बिहारसाठीही खूप काही केलं आहे. मधल्या काळात चूक झाली, आमच्या काही लोकांमुळे हे घडलं. पण, आम्ही आता ठरवलंय की, यापुढे कुठेही जाणार नाही.

नितीश कुमार
मुख्यमंत्री, बिहार

13/11/2024

उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेकजण मंत्री होते. मात्र शिंदेंनी काही लोकं घेतले आणि गुहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? पक्ष फोडल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र, फोडायला अक्कल लागत नाही.

शरद पवार
अध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट

13/11/2024

निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या बॅगा तपासणं हे चुकीच मानत नाही. पण कॉमन सेन्स आहे, जे पैशांच वाटप, आदान, प्रदान होतं ते उद्धव ठाकरें सारखे नेते आपल्या बॅगेतून नेणार का? लोकसभ निवडणुकीत एकनाथ शिंदे कशाप्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टरमधून नेत होते हे आम्ही दाखवलं.

संजय राऊत
खासदार, शिवसेना ठाकरे गट

13/11/2024

तुम्ही ठरवलं पाहिजे की, तुमचं आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य, तुम्ही दरोडेखोरांच्या हातामध्ये देणार, की निष्ठावंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये देणार? महाराष्ट्र काय म्हणून ओळखला जायला पाहिजे, अदाणीचा लाचार महाराष्ट्र म्हणून ओखळला जायला पाहिजे? हे तुम्ही ठरवायचं आहे. हा महाराष्ट्र मोदी आणि दिल्लीत बसून हाकता येणार नाही.

उद्धव ठाकरे
प्रमुख, शिवसेना ठाकरे गट

12/11/2024

आता उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना वाटतं ते मुख्यमंत्री व्हावे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटतं की, नाना पटोले, बाळासाहेब थोरात किंवा इतर कोणी काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्री व्हावं. राष्ट्रवादी साहेबाची आहे तिथे साहेबांनी अप्रत्यक्षपणे सूतोवाच केलं की जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे. असं प्रत्येक जण आपआपल्या परीने आपआपल्या पक्षाचा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मी ठरवलंय की यावेळेस त्या भानगडीत पडायचं नाही.

अजित पवार
प्रमुख , राष्ट्रवादी अजित पवार गट

12/11/2024

सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले.त्यामुळे महाविकास आघाडीची झोप उडाली होती. तसेच लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये, यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली. महाविकास आघाडी ज्या गाडीवर चालताय, त्याला ना चाक आहेत ना ब्रेक आहेत.

नरेन्द्र मोदी
प्रधान मंत्री, भारत

12/11/2024

कोणत्याच निवडणुकीची लढाई सोपी नसते. निवडणूक अशीच असते, शेवटपर्यंत लढायचे असते, गोळी कुठून येईल सांगता येत नाही.कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, वातावरण चांगले आहे. मी केलेले काम बोलते लोक म्हणतात आम्ही भाजपला मदत करत नाही तुम्हाला मतदान करतोय.

अशोक चव्हाण
खासदार, राज्यसभा

10/11/2024

भारत हा रशियाचा एक नैसर्गिक मित्र आहे. आमची मैत्री वास्‍तवावर आधारित आहे. आमच्‍यातील सहकार्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. आमच्या राष्ट्रांमधील गुणवत्तेच्या आणि विश्वासाच्या जोरावर अद्वितीय संबंध निर्माण झाले आहेत. द्विपक्षीय संबंध विकसित करण्यावर आमचा भर आहे.भारत जागतिक महासत्तांच्या यादीत समाविष्ट होण्यास पात्र आहे. भारत हा जगातील सर्व अर्थव्यवस्थांमध्ये, सर्वात वेगवान वाढ होणारी अर्थव्‍यवस्‍था आहेच, त्‍याबरोबर प्राचीन संस्कृतीच्‍या पाया हे पुढील वाढीसाठी खूपच आश्‍वासक आहे.

व्लादिमीर पुतिन
राष्ट्राध्यक्ष, रशिया

10/11/2024

मी उद्धव ठाकरेंना विचारतो की राहुल गांधी, सावरकर यांच्या बद्दल चांगलं बोलू शकतील का? बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल काँग्रेसचा कुणी नेता चांगले शब्द बोलेल का? उद्धव ठाकरे यांनी कुठं बसावं, हा त्यांचा प्रश्न आहे. पण, ते कुठं बसले आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं.

अमित शहा
केंद्रीय गृह मंत्री

10/11/2024

गावा खेड्यातील लोकांना, गरिबांना, तरुणांना मोठ्या प्रमाणात मूर्ख बनवण्याचा आणि त्यांना जातीच्या नावावर भडकवणे आणि त्या मार्गाने आपली राजकिय पोळी शेकून घेण्याचा काही राजकिय पक्षांचा स्वार्थी हेतू असतो.

एका समाजात पिढ्यानपिढ्या मिळून मिसळून राहत असलेल्या आपल्याच लोकांत जातीच्या नावाने फुट पाडणे आणि त्यांच्या मतांच विभाजन करने आणि त्या प्रकारे आपल्या पक्षाचा मतपेढी मध्ये वाढ करणे.

या एवजी जेवढ्या लोकांना हे ह्यांच्या मोठ मोठ्या सभांमध्ये उचलून आणतात त्यांच्या कडे साध बघूनसुद्धा कल्पना येईल की यांना, यांनी फक्त मेंढरासारख ठेवले; बाकी विकासाच्या नावावर यांच्याकडे काहीही ठोस उपाययोजना नाहीत आणि नव्हत्या नाहीतर देशाला स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्ष लोटली मात्र आमच्या देशातील लोक लोकांच्या जीवनात असे खास काही बदल झालेल नाहीत.

बेरोजगारी प्रचंड, दारिद्र्य प्रचंड, राज्यात तिथले सरकार स्त्रियांसाठी, युवकांसाठी, योजना राबवत असतात,मात्र त्यांचे प्रश्न काही कायमचे सुटत नाहीत आणि ही सत्य परस्थिति आहे.

किती स्त्रियांचे प्रश्न एखादी लाडकी बहीण योजना आणून किंवा युवकांसाठी लाडका भाऊ योजना आणून त्यांनी प्रश्न कायमचे सोडविले? सुटले का प्रश्न स्त्रियांचे आणि युवकांचे?

मग या प्रश्नांवर यांच्याकडे तात्पुरते उपाय आहेत मात्र यांच्याकडे समाजातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी ठोस असे उत्तर नाहीत ना उपाय? कारण हे निवडणुकीत उभे सुद्धा लोकांना करतात, जातीच्या आधारावर, थोबाड बघुन, परिवार, राजघराणे बघून,

मग त्या राजघराण्यातून बैलं किंवा गाढवं का ना समोर येत असो, मग या बैलांना आणि गाढवांना सामाजिक परिस्थिति बद्दल जाणीव नसते, ते फक्त आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी लोकांचा वापर करतात त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात

त्यात अनेक चोरांना, भ्रष्ट लोकांना, सुद्धा त्या मध्ये स्थान मिळते आणि त्याचे परिणाम संपूर्ण समजाला भोगावे लागते, तुम्हाला संपूर्ण एक कार्यकाळ उलटून गेला तरी तुमच्या क्षेत्रातील लोकांचे प्रश्ण सुटलेले नसतात ही परिस्थिती असते.

तर मग अश्या चोरांना, बैलांना पाठींबा देऊन फायदा काय? आणि मते देऊन फायदा काय?

09/11/2024
07/11/2024

संविधानाची पुस्तिका हातात घेऊन निवडणूकीच्या काळात काही चोरांचा अवलादी

सातत्याने दलितांना, गरिबांना, शेतकर्‍यांना, युवकांना आणि समाजातील सर्वच स्तरातील लोकांना सातत्याने मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असतात.

आणि यांच्या भूलथापांना प्रचंड प्रमाणात गावा खेड्यातील आमचा, गरीब, शेतकरी आणि दलित आणि या काळातील समाजातील सगळाच वर्ग बळी पडतो ही अतिशय दुःखाची बाब आहे.

यांना संविधानाच्या पुस्तिका हातात घेऊन आपल्या पक्षाच्या मतपेढी मध्ये वाढ करायची असते बाकी काही नाही;

त्यांना प्रश्ण विचारण्याची वेळ आली आहे की बाबा याच्या एवजी तुम्ही दुसरे काही काम केले आहेत काय?

दलितांचे, गरिबांचे युवकांचे आणि शेतकर्‍यांचे किती प्रश्ण या चोरांनी सोडविले?

यांनी जर का तुम्हा लोकांचे प्रश्न सोडविले तर तुमच्या गावा खेड्यातील किंवा देशातील लोकांचे किती प्रश्ण सुटले आहेत?

फक्त संविधानाची पुस्तिका हातात घेऊन गरिबांना, गावा खेड्यातील, लोकांना, दलितांना, आदिवासी समाजातील लोकांना आणि समस्त समाजातील आज अडचणीत जगत असलेल्या लोकांना

यांना फक्त मूर्ख बनवण्याचा आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा यांचा फक्त आणि फक्त स्वार्थी प्रयत्न आहे. हे तुम्हाला निवडणुका झाल्या नंतर तुमच्या गावातील गल्ल्यांमध्ये भटकताना दिसणार नाही

तर कुठेतरी विदेशात अय्याशी करतांना दिसतील आणि तुमचे प्रश्ण तसेच राहतील, ते सोडविले जाणार नाही.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website