Renuka Mata Mandir Trust Nagpur
स्वयंभू व त्रिगुणात्मक स्वरूपी रेणुका मातेचे मंदिर.
आज आश्विन शुक्ल *नवमी *
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
*सोमवार* दिनांक *२३ ऑक्टोबर २०२३*
*शारदीय नवरात्रौत्सवाचा नववा दिवस*
*“जगतजननी नागपूर निवासिनी श्री रेणुका देवीचे नवरात्रौत्सव नवमी दर्शन."*
दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय.
ध्यान मंत्र : महागौरी
श्वेते वृषे समारुढा श्वेताम्बरधरा शुचिः |
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा ||
● दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे.
● या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।' तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत. महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.
● आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-
जन्म कोटि लगि रगर हमारी।
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।
● या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे.
● आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.
आज आश्विन शुक्ल *अष्टमी*
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
*रविवार* दिनांक *२२ ऑक्टोबर २०२३*
*“जगतजननी नागपूर निवासिनी श्री रेणुका देवीचे सुप्रभात दर्शन."*
आज आश्विन शुक्ल *सप्तमी*
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
*शनिवार* दिनांक *२१ ऑक्टोबर २०२३*
*“जगतजननी नागपूर निवासिनी श्री रेणुका देवीचे सुप्रभात दर्शन."*
आज आश्विन शुक्ल *षष्ठी*
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
*शुक्रवार* दिनांक *२० ऑक्टोबर २०२३*
*“जगतजननी नागपूर निवासिनी श्री रेणुका देवीचे सुप्रभात दर्शन."*
🙏🌺|| श्री रेणुका माता प्रसन्न ||🌺🙏
आज अश्विन शुक्ल पंचमी. अश्विन नवरात्री पंचम दिन. आज ललिता पंचमी आहे.. शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५. गुरुवार , दिनांक १९ ऑक्टोबर २०२३.
श्री रेणुका मातेच्या संध्याकाळी आरतीचे थेट प्रक्षेपण. सर्व भक्तगणांनी आरतीत सहभागी व्हावे.
पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो ।
अर्ध्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम तें आले सदभावे क्रीडता हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो
उदो बोला उदो।
आज आश्विन शुक्ल *पंचमी*
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
*गुरुवार* दिनांक *१९ ऑक्टोबर २०२३*
*“जगतजननी नागपूर निवासिनी श्री रेणुका देवीचे सुप्रभात दर्शन."*
आज अश्विन शुक्ल चतुर्थी बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023, मातेची संध्या आरती
#कुंकुमार्चन म्हणजे काय व ते कसे करतात ??!!
=========
◆ कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?
इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीमधील चरणां पासून प्रारंभ करून तिच्या डोक्या पर्यंत वहावे अथवा इच्छित देवी देवतांचा नामजप करत कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय.
◆ देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?
देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणां पासून प्रारंभ करून तिच्या डोक्या पर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय.
◆ त्या संबधी कोणती काळजी घ्यावी ?
कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तु (सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट ) पात्रात घेऊन सुचिर्भुत करुन घ्यावे. त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवल अंगठा तर्जनी व मधील बोट यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणा पासून मस्तका पर्यंत वाहावे अथवा कुंकवाने स्नान घालावे.
◆ कुंकुमार्चनाचे शास्त्र
कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्ती तील शक्ती तत्त्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते कुंकुमार्चन करण्या साठी विषेश दिवसाची जसे पोर्णिमा अमावस्या गुरु पुष्यामृत योग लक्ष्मी पुजन मंगळवार शुक्रवार निवड करावी मूळ कार्यरत शक्ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशा तून झाली अाहे. शक्ती तत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्या गंध लहरींच्या सुवासा कडे ब्रह्मांडातील शक्ती तत्त्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्ती तील सगुण तत्त्वाला जागृत करण्या साठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्त्वाला प्रसन्न करणार्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्ती तत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.
◆ फलश्रुती :- अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पण केलेले साठलेले कुंकु एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्य सिध्दी साठी याची सहायता होते.
परमेश्वरावर असलेली श्रद्धा व गुरूंवर असलेली अपार भक्ती यामुळे माणूस आयुष्यात असाध्यही साध्य करू शकतो..!
आज आश्विन शुक्ल *चतुर्थी*
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
*बुधवार* दिनांक *१८ ऑक्टोबर २०२३*
*“जगतजननी नागपूर निवासिनी श्री रेणुका देवीचे सुप्रभात दर्शन."*
आज अश्विन तृतीया मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023, मातेची संध्या आरती
आज आश्विन शुक्ल *तृतीया*
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
*मंगळवार* दिनांक *१७ ऑक्टोबर २०२३*
*“जगतजननी नागपूर निवासिनी श्री रेणुका देवीचे सुप्रभात दर्शन."*
आजची देवीची पूजा
दुसरी माळ
द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ।।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
आज आश्विन शुक्ल *द्वितीया*
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
*सोमवार* दिनांक *१६ ऑक्टोबर २०२३*
*“जगतजननी नागपूर निवासिनी श्री रेणुका देवीचे सुप्रभात आरती दर्शन."*
देवीची साडेतीन शक्तीपीठे
|| श्रीमहालक्ष्मी अंबाबाई || (कोल्हापूर)
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठापैकी श्री महालक्ष्मी कोल्हापूर हे पूर्ण व अत्यंत प्राचीन शक्तीपीठ आहे. कोल्हापूरला दक्षिणकाशी असे म्हटले जाते. अनेक लहान गांवाहून कोल्हापूरला एस.टी.बसेस जातात.
|| श्री तुळजाभवानी || (तुळजापूर)
श्री क्षेत्र तुळजापूर महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्हयातील बालाघाटाच्या डोंगर पठारावर श्री क्षेत्र तुळजापूर हे तालुक्याचे गांव आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवीचे अनादी कालापासून वास्तव्य आहे. मोठा उत्सव असतो.
|| माहूरगड निवासिनी श्री रेणुका देवी ||
महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयारील किनवट तालुक्यात माहूर हे गांव आहे. गावांच्या शेजारीच गडावर श्री रेणुका देवीचे स्थान आहे. गावांतून नियमित बसेस आहेत.
|| श्री सप्तशृंग निवासिनी || (श्री क्षेत्र सप्तशृंग)
देवीच्या साडेतीन पीठापैकी सप्तश्रृंग हे अर्धपीठ आहे. हे प्रमुख शक्तीपीठ आहे. नाशिक जिल्हयात चांदवड डोंगराच्या रांगेत सप्तश्रृंगी पर्वत आहे. या पर्वताला सात शिखरे आहेत म्हणून याला सप्तश्रृंगी गड म्हणतात.
यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यभ्दवेत् ||
तत्सर्व क्षम्यतां देवि प्रसदि परमेश्र्वरि ||१||
श्रीमहाकालीमहालक्ष्मीमहासरस्वत्यः प्रसन्ना वरदा भवंतु ||
|| श्रीरस्तु || शुभं भवतु || इष्टकामनासिध्दिरस्तु ||१६||
नमो देवै महादेव्यै शिवायै सततं नमः |
नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणतास्मताम् |
सर्व मङगल माङगल्ये शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोश्स्तुते ||
|| श्री जगदंबा प्रसन्न ||
|| मंगलाचरण ||
स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपंकजसमरणम् ||
वासरमणिरिव तमसां राशीन् नाशयति विघ्नानाम् ||१||
या कुन्देन्दु तुषार हार धवला या शुभ्र वस्न्नांवृता ||
या वीणावरण्डमण्डितकरा या श्र्वेतापद्यासना||
या ब्रम्हा च्युतशंकरप्रभुतिर्भिदैवेः सदा वन्दिता ||
सा मां पातु सरस्वती भगवती शिःशेषजाडयापहा ||२||
मूकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरिम् ||
यत्कृपा तहमं वन्दे परमानन्दमाधवम् ||३||
नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् ||
देवीं सरस्वती व्यासं ततो मयमुदीरयेत् ||४||
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ||
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगदगुरूम् ||५||
गुरूर्ब्रम्हाउ गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्र्वरः ||
गुरूदेव साक्षात् पर ब्रह्मा तस्मै श्री गुरूवे नमः ||६||
नमः परमकल्याणम् || नमः परम मंगलम् ||
वासुदेवाय शान्ताय || यदुनां पतये नमः ||
गीतेत श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे अवताराचे आश्व
आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ।
प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो ।
मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो ।
ब्रह्माविष्णु रुद्रआईचें पूजन करिती हो ।। १
।।उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु .।।
#नवरात्री व #घटस्थापनेच्या तुम्हाला सर्वांना व तुमच्या कुटुंबियांना भक्तीमय शुभेच्छा ...
आज भाद्रपद शुक्ल *द्वादशी*
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
*मंगळवार* दिनांक *२६ सप्टेंबर २०२३*
*“जगतजननी नागपूर निवासिनी श्री रेणुका देवीचे सुप्रभात दर्शन."*
आज श्रावण मासा निमित्य मातेला फुलांची आणि फळांची शेज करण्यात आली.. 🙏🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the place of worship
Telephone
Website
Address
Nagpur
440032
Opening Hours
Monday | 6:30am - 8:30pm |
Tuesday | 6:30am - 8:30pm |
Wednesday | 6:29am - 8:30pm |
Thursday | 6:30am - 8:30pm |
Friday | 6:30am - 8:30pm |
Saturday | 6:30am - 8:30pm |
Sunday | 6:30am - 8:30pm |
Shri Sant Das Narayan Maharaj Sevashram Satguru Nagar Pardi
Nagpur
Hello Everyone Welcome to our Page of Shri Sant Das Narayan Maharaj Sevashram, satguru nagar pardi, Nagpur
Sector 27 Plot 130 Poonarvasan Khapri
Nagpur, 441108
Lord Jagannath is an abstract representation of Krishna or Vishnu. Incarnation of Vishnu.
Manish Nagar Napur
Nagpur, 440015
Adirudra Foundation is a foundation to be set up in the vicinity of Pohna Rudreshwar Mahadev Temple in Wardha district where a 151 feet high idol of Lord Shiva will be erected. A m...
Nagpur, 444034
All Swami Devotees, Welcome to "Shree Swami Samarth Akkalkot" on this Page.
Kharbi Road, Nandanvan
Nagpur, 440009
Bageshwar Dham: Devoted to Lord Hanuman 🙏🐵🕉️ | Embrace faith, find strength, and seek blessings.
Lava, Wadi
Nagpur, 440023
बाबा खाटु श्याम को भगवान श्री कृष्ण के कलयुगी अवतार के रूप में जाना जाता है।