District Information Office, Nagpur
Official Facebook Account of District Information Office, NAGPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra
*निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्या*
- उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार
भारत निवडणूक आयोग
▪ छत्रपती संभाजीनगर येथे विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न
▪️विभागीय आयुक्तांसह तिन्ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग
नागपूर, दि.06: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे अशा स्पष्ट सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले.
नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व विधानसभा निवडणूक पूर्वतयारी बाबत छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार, उपसचिव सुमनकुमार, संजयकुमार, अभिलाष कुमार, अनिलकुमार, अविनाशकुमार तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, नागपूर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल, नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.
▪️प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता जपा
प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांना सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रतिनिधींना वेळोवेळी माहिती दिली पाहिजे. प्रत्येक माहितीचे योग्य ते दस्तऐवजीकरण केले पाहिजे. निवडणूक प्रक्रियेबाबत कोणाच्या काही शंका असतील तर त्याचे वेळीच शंकानिरसन करुन पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे हिर्देशकुमार यांनी सांगितले.
मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा
मतदार याद्यांबाबतही योग्य ती काळजी घेऊन त्या याद्या अधिक बिनचूक असाव्यात. प्रत्येक मतदारापर्यंत मतदान चिठ्ठ्या वेळत पोहोचतील याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मतदार याद्यांविषयी असलेल्या तक्रारींबाबत तात्काळ दखल घेवून मतदान केंद्रांबाबतही सर्व यंत्रणांनी खबरदारी घेतली पाहिजे. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था, तात्पुरत्या मतदान केंद्रांची मान्यता घेणे, मतदान केंद्राचे ठिकाण बदलले असल्यास त्याबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविणे, त्याची प्रसिद्धी करणे, विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणे जसे. पर्यावरणपूरक, महिलांनी, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले इ, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, सावली इ. सुविधांची निर्मिती, तसेच वेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणे, मतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे आदीबाबत त्यांनी सुचना केल्या. या सर्व सुविधांची पूर्तता झाल्याबाबत व आवश्यकतांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांनी स्वतः पाहणी करुन खातरजमा करावी,असे निर्देशही त्यांनी दिले.
यंदा मतदान हे नोव्हेंबर महिन्यात असून आता सुर्यास्त लवकर होईल, अशा वेळी सायंकाळी मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाशासाठी दिवे असणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रात मोबाईल जाता कामा नये याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. टपाली मतदान व गृह मतदान प्रक्रियेबाबतही यंत्रणांनी पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित राबविण्यासाठी दक्षता घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
मतदान कर्मचाऱ्यांसाठी सुविधा द्या
निवडणूक कामकाजासाठी लागणारे पुरेस मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जेवण, पिण्याचे पाणी, कामकाजाची सुविधा, मतदान केंद्रांवर गेल्यावर मुक्काम, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता, भोजन, पाणी याबाबतची व्यवस्था पुरविण्यात यावी. महिला कर्मचाऱ्यांना विशेष सुरक्षा व सोयी सुविधा द्याव्या. निवडणूक कामकाजात कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवणाऱ्या आजारांसाठी तात्काळ वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन असावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्या. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याची योग्य काळजी घेतली जाईल, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
▪️सी व्हिजील वरील तक्रारींचे तात्काळ निराकरण करा
प्रत्येक जिल्ह्यात व विधानसभा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी सर्व संलग्न जिल्ह्यांच्या पोलीस यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवावा. मद्य, अंमलीपदार्थ, मौल्यवान वस्तू, रोकड यांच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवून कारवाई करावी. याबाबत सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करावी. या तक्रारींचे तात्काळ निराकरण झाले पाहिजे, याबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
▪️फेक न्यूजला तात्काळ पायबंद
निवडणूक काळात माध्यमांमध्ये येणाऱ्या बनावट बातम्या, फेक न्यूज अर्थात खोट्या माहितीचे प्रसारण तात्काळ रोखावे. खोटी माहिती असल्यास तिचे प्रसारण रोखून सत्य माहितीचे तात्काळ प्रसारण करावे. निवडणूक विभागाशी संबंधित बातम्या असतील तर तात्काळ योग्य माहिती पुरवावी व वस्तूस्थिती जनतेसमोर मांडावी, जेणेकरुन निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होणार नाही व त्याबाबत गैरसमज निर्माण होणार नाही, असे भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार यांनी सांगितले.
▪️मतदार जनजागृतीवर भर द्या
मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी आयोगामार्फत लवकरच ‘स्विप’ उपक्रम मोठ्याप्रमाणावर राबविले जाणार आहेत. ते सर्व उपक्रम आपल्या विधानसभा क्षेत्रात राबवावे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करावेत.
▪️मतदानाच्या अचूक आकडेवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी
मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी विधानसभा मतदार संघस्तरावर, जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर नेमण्यात येणार आहे. मतदान टक्केवारीची आकडेवारी बुथनिहाय पडताळणी करुन मतदान टक्केवारी अचूक देण्यात येईल यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचेही निवडणूक उपायुक्त यांनी सांगितले.
▪️मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. चोकलिंगम म्हणाले की, राजकीय पक्ष उमेदवारांना वेळोवेळी अद्यावत निर्णय व माहिती देऊन अवगत करावे.मतमोजणी साठी मतमोजणी केंद्राच्या पुनर्रचनेचा आराखडा नव्याने मंजूर करावयाचा असल्यास त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. टपाली मतमोजणीबाबतच्या व्यवस्थेसह आराखडा मंजूर करावा. निवडणूक कामकाजाविषयी सर्व अहवाल वेळेत व अचूक पाठविणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही दिरंगाई व हयगय खपवून घेतली जाणार नाही. सर्व आकडेवारी अचूक पाठवावी. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आपल्या अंतर्गतअसलेल्या सर्व विधानसभा क्षेत्रातील कामकाजावर लक्ष ठेवावे. पैशांचा वापर. माध्यमांमध्ये येणारी माहिती, आणि असामाजिक तत्वांचा वावर याबाबत सजग राहून वेळीच कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.
▪️वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
बैठकीस लातूरचे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे,नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे,चंद्रपूर जिल्हाधिकारी . विनय गौडा जी सी, गोंदिया जिल्हाधिकारी प्राजित नायर, भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी.एस, वर्धा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, गडचिरोली, जिल्हाधिकारी संजय दैने, हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबांसे, लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, नागपुरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल तसेच बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव,गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे,चंद्रपूर पोलीस अधीक्षक रिना जानबंधू,लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल, परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, हिंगोली पोलीस अधीक्षक एस. डी. कोकाटे, भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन तसेच दुरदृष्य पद्धतीने सर्व जिल्ह्यातील अधिकारी व या निवडणूकीसाठी नेमलेले निवडणूक आयोगाचे निरीक्षक सहभागी झाले होते.
०००००
Maharashtra DGIPR Election Commission of IndiaNagpur Municipal Corporation
#विधानसभानिवडणूक२०२४
भारत निवडणूक आयोग यांनी खर्चविषयक सूचना सारसंग्रह २०२४ मध्ये निर्देश दिल्यानुसार उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणे आवश्यक आहे. उमेदवारांने निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातून उमेदवाराने आपला निवडणूक खर्च धनादेश, धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात कोणतेही गुन्हे दाखल असल्याची, नसल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाची बाब म्हणून गणली जाईल.
*जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती*
▪️निवडणुकीसंदर्भात तक्रारी असल्यास साधा संपर्क
नागपूर, दि. 04 - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असून जिल्हयातील 12 विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हयाकरीता विधानसभा मतदार संघनिहाय भारतीय प्रशासकीय व महसूल सेवेत कार्यरत असलेल्या निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
काटोल आणि सावनेर विधानसभा मतदारसंघासाठी नवीन कुमार सिंग (8421691220) असून त्यांचे संपर्क अधिकारी पंकज आंभोरकर (9923463223) आहेत. त्यांचा कॉटेज क्र. 4 आहे. हिंगणा आणि उमरेड (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी पवन कुमार सिन्हा (8668754564)असून संपर्क अधिकारी शेखर पाटील (888499274) (9420114868) आहेत. त्यांचा कॉटेज क्र. 5 आहे. निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी 9.30 ते 10.30 अशी आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासाठी अरुण कुमार परमार (7499941075) असून त्यांचे संपर्क अधिकारी विपुल जाधव (9421727763) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. 1 आहे. नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी संजय कुमार (8669114729) असून त्यांचे संपर्क अधिकारी लक्ष्मीकांत जाधव (8669114729) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. 12 आहे. निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी 10.30 ते 11.30 अशी आहे.
नागपूर पूर्व, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भोर सिंग यादव (मो.क्र. 8668760145) असून त्यांचे संपर्क अधिकारी अभय जोशी (9422868168) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. 6 असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सायंकाळी 4.30 अशी आहे. नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तरसाठी के. वासुकी (8087811229) असून त्यांचे संपर्क अधिकारी कल्पना इखार (9595097811 ) आहेत. त्यांचा कॉटेज क्र. 21 असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ दुपारी 3 ते 4 अशी आहे.
कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी सुनिल कुमार ( 8421611220) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी प्रशांत भंडारकर (9823426066) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. 03 असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी 9.30 ते 10.30 अशी आहे.
काटोल, सावनेर, हिंगणा आणि उमरेड विधानसभा मतदारसंघासाठी देवरंजन मिश्रा ( 7666421885) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी संजय चिमुरकर (9923481002) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. 07 असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 अशी आहे.
नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व आणि नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी संतोष कुमार मिश्रा ( 7666412361) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी आशिष मोरे (9923331263) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. 11 आहे. नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी दिपक आनंद ( 7666427974) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी प्रशांत हांडे (9579607377) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. 19 असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी 9.30 ते 10.30 अशी आहे.
सावनेर आणि काटोल विधानसभा मतदारसंघासाठी अजय कुमार ( 8941001786) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी विठ्ठलसिंग राजपुत (9673555733) व रविंद्र मसकर (9823373790) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. 20 असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी 10.00 ते 11.00 अशी आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित बाबींच्या निरीक्षणाकरिता आलेल्या निवडणूक निरीक्षकांची राहण्याची व्यवस्था भेटण्याची वेळ दिलेली असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Maharashtra DGIPR Nagpur Municipal Corporation आकाशवाणी नागपूर वृत्त विभाग
“येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभेसाठी मतदान होत आहे. मतदार म्हणून आपण मतदानाच्या पवित्र कर्तव्यासाठी पुढे येऊ यात.”
- मुख्य सचिव सुजाता सौनिक
#मतदानकरूया
Maharashtra DGIPR Nagpur Municipal Corporation आकाशवाणी नागपूर वृत्त विभाग All India Radio, (Akashwani), Nagpur DEONagpur Election Commission of India
#विधानसभानिवडणूक२०२४
होय, निवडणूक काळातील गैरप्रकार तुम्ही रोखू शकता. गैरप्रकाराची तक्रार मोबाईल ॲपद्वारे करा.
..जागरूक मतदार म्हणजे लोकशाहीचा अंगरक्षक
जिल्ह्यात आज तीन नामनिर्देशनपत्र दाखल
काटोल, नागपूर उत्तर आणि नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज
नागपूर, दि. 23 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज दुस-या दिवशी काटोल, नागपूर उत्तर आणि नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक याप्रमाणे तीन नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले.
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विनील रमेश चौरसिया (अपक्ष), नागपूर उत्तर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून संतोष तुळशीराम चव्हाण (विकास इंडिया पार्टी) तर काटोल विधानसभा मतदारसंघातून लिलाधर मारोतवार कुडे (अपक्ष) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 29 ऑक्टोबर ही नामनिर्देशपत्र सादर करण्याची अंतिम मुदत आहे. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
आज 274 अर्जांची उचल
जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात एकूण 274 अर्जाची उचल करण्यात आली. काटोल, 22, सावनेर – 22 , हिंगणा –25, उमरेड 22, नागपूर दक्षिण पश्चिम – 13, नागपूर दक्षिण –29 , नागपूर पूर्व – 27, नागपूर मध्य – 22, नागपूर पश्चिम – 30, नागपूर उत्तर 21, कामठी – 24, रामटेक – 17 अशा एकूण 274 अर्जांची उचल करण्यात आली. काल दि. 22 ऑक्टोबर रोजी 462 अर्जांची उचल करण्यात आली होती.
00000
*मतदारांच्या जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रमांवर भर*
*जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर*
नागपूर,दि. 23 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रती जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्व स्तरावरील मतदारांना हा उपक्रम आपला वाटावा, त्यांचा कृतिशील सहभाग वाढवा यासाठी विभागप्रमुखांनी तत्पर राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
स्वीप अंतर्गत उपक्रमाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे आदी अधिकारी उपिस्थित होते.
ग्रामीण भागाच्या बरोबरीने शहरी भागात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपक्रमांची निश्चिती करुन ते यशस्वीपणे राबविण्यावर स्वीप अंतर्गत भर दिला पाहिजे. जवळपास दोन लाख युवक आणि नवमतदारांची संख्या आहे. पात्र मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क अधिक उत्साहाने बजावता यावा यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नरत असून दिव्यांग ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासाठी संबंधित विभागांनी योग्य समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Maharashtra DGIPRNagpur Municipal Corporationआकाशवाणी नागपूर वृत्त विभागDDSahyadriNagpur Police CommissionerateDEONagpur
*जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती*
नागपूर, दि. 23 - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असून जिल्हयातील 12 विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हयाकरीता विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
नागपूर पूर्व, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भोर सिंग यादव (मो.क्र. 8668760145), हिंगणा आणि उमरेड (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी पवन कुमार सिन्हा (8668754564), कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी सुनिल कुमार ( 8421611220) आणि काटोल आणि सावनेर विधानसभा मतदारसंघासाठी नवीन कुमार सिंग (8421691220) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित बाबींच्या निरीक्षणाकरिता आलेल्या निवडणूक निरीक्षकांची राहण्याची व्यवस्था रवीभवन येथील अनुक्रमे कॉटेज क्र. 3,4, 5 व 6 येथे करण्यात आलेली आहे. निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra DGIPRNagpur Municipal Corporationआकाशवाणी नागपूर वृत्त विभागDDSahyadriNagpur Police CommissionerateDEONagpur
*जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती*
नागपूर, दि. 23 - जिल्हयातील 12 विधासभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मा. भारत निवडणूक आयोग यांनी नागपूर जिल्हयाकरीता विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक खर्च निरीक्षक यांची नियुक्ती केलेली आहे.
काटोल, सावनेर, हिंगणा आणि उमरेड (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी देवरंजन मिश्रा (7666421885) , नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी संतोषकुमार मिश्रा (7666412361) आणि नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर (अ.जा.), कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी दीपक आनंद(7666427974) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक निरीक्षकांची राहण्याची व्यवस्था रविभवन येथील अनुक्रमे कॉटेज क्र. 7, 11 व 19, रविभवन नागपूर येथे करण्यात आलेली आहे. निवडणूकीच्या संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदारांची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra DGIPRआकाशवाणी नागपूर वृत्त विभागDDSahyadriAll India Radio, (Akashwani), NagpurDEONagpur
*परवानाधारक व्यक्तींना आपली शस्त्रे नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश*
नागपूर, दि. १७ - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबर पासून लागू करण्यात आलेली असून दिनांक 25 नोव्हेंबर पर्यंत (निवडणुकीची घोषणा केल्याच्या दिनांकापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिनांकापर्यंत) अस्तीत्वात राहणार आहे. या कालावधीत शत्र अधिनियम 1959 च्या कलम 21 मधील तरतूदीनुसार परवानाधारक व्यक्तींनी आपली शस्त्रे त्वरीत नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आदेश आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. हे आदेश निर्गमीत केल्याच्या दिनांकापासूनस 3 दिवसांच्या आत संबंधितांनी शस्त्र जमा करणे अनिवार्य आहे.
हा मनाई आदेश जो समाज दिर्घकालीन स्थायी कायदा, रुढी व परंपरा यानुसार शस्त्रास्त्रे बाळगण्यास हक्कदार आहे त्या समाजाला लागू असणार नाही. तथापी, अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्था, निवडणूक शांततेच्या मार्गान पार पाडण्यास अडथळा निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीची शस्त्रास्त्रे अडकावून ठेवण्यास जिल्हा प्रशासनावर कोणताही प्रतिबंध असणार नाही. सदर आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांचेकडील असलेले शस्त्र वगळण्यात येत आहे.
पंरतु अशा सुरक्षा कर्मचाऱ्याकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील शस्त्राचा गैरवापर होणार नाही याची दक्षता व जबाबदारी संबंधीत बँक/संस्थेच्या अधिकाऱ्यावर राहील. तसेच अपवादात्मक परीस्थितीत शस्त्रे जमा करण्यापासून सूट मिळण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशन मार्फत जिल्हा छाननी समितीकडे अर्ज करण्याची मुभा राहील. हा आदेश 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर पर्यतच्या कालावधी करीता अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
00000
Maharashtra DGIPRNagpur Municipal Corporationआकाशवाणी नागपूर वृत्त विभागDDSahyadriNagpur Police CommissionerateDEONagpur
*वय वर्ष 85 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदान सुविधा*
- डॉ. विपीन इटनकर
▪️निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा
▪️कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर
नागपूर, दि. 17: जेष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे असे नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासह निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यपध्दती विहित करुन दिली आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणताही मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यादृष्टीने 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाचा लाभ उपलब्ध करुन दिला जात असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया काटेकोर पार पाडली जावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
गृह मतदानासाठी नमुना 12-ड तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याचबरोबर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना ही निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यांची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. 12-ड चे फार्म सर्व बीएलओ यांनी काळजीपूर्वक आपल्या भागातील पात्र मतदारांपर्यंत पोहचतील यासाठी अधिक दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक कामाच्या विविध जबाबदारीसाठी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. यासाठी नमुना 12 साठी ज्यांची मागणी आली त्यांची पडताळणी करुन त्यांना मतदान पत्रिका दिलेल्या कालमर्यादेत मिळतील यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. ही संख्या अधिक असल्याने त्याबाबत योग्य तो समन्वय साधून मतपत्रिकांच्या आदानप्रदान बाबतची कार्यवाही दिलेल्या कार्यपध्दतीनुसारच करण्याचे त्यांनी निर्देश दिले. टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करु इच्छिणाऱ्या तसेच निवडणूक कर्तव्यासाठी प्रमाणपत्राद्वारे मतदान करु इच्छिणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे नमुना 12 व 12-अ हे एनआयसी मार्फत उपलब्ध करुन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व प्रक्रिया करतांना अडचण भासल्यास जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी त्या अडचणी निरसन करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
*कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर*
जिल्ह्याच्या सर्व सीमांवर काटेकोरपणे तपासणी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यामध्ये अवैध दारूची तस्करी आणि बेनामी रोकडीचे वहन होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यात अंमलबजावणी यंत्रणेचा मोठा सहभाग असतो. या यंत्रणेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोलिस उपायुक्त विशेष शाखा श्वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, पोलीस, आयकर, परिवहन, रेल्वे, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, नागरी उड्डयन आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000
Maharashtra DGIPRNagpur Municipal Corporationआकाशवाणी नागपूर वृत्त विभागDDSahyadriAll India Radio, (Akashwani), NagpurElection Commission of IndiaNagpur Police CommissionerateDEONagpur
जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान
जिल्ह्यात 4 हजार 610 मतदान केंद्र
राज्य सीमेवर विशेष दक्षता
समाज माध्यमांवर राहणार विशेष लक्ष
नागपूर, दि. 15 –जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 4 हजार 610 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सुमारे 44 लाख 94 हजार 784 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाचे ७५ टक्क्यांवर मतदानाचे लक्ष्य आहे. केवळ प्रशासनाने मानस व्यक्त करून हा संकल्प साध्य होणार नाही. यासाठी मतदारांनीही प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. इटनकर यांनी यावेळी केले.
सहाय्यक पोलिस आयुक्त निसार तांबोळी यांनी शहरी भागात तर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ग्रामीण भागात पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती यावेळी दिली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रतिबंधात्मक कारवाई आदी विषयांची माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभागामार्फत सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
▪️असा असणार निवडणूक कार्यक्रम
जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. दि. 22 ऑक्टोबर रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. 29 आक्टोबर हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
▪️जिल्ह्यात 4 हजार 610 मतदान केंद्र
जिल्ह्यात एकूण 4 हजार 610 मतदान केंद्र असणार आहेत. यात काटोल विधानसभा मतदारसंघात 332, सावनेर 370, हिंगणा 472, उमरेड 395, कामठी 524, रामटेक 359, नागपूर दक्षिण पश्चिम 378, नागपूर दक्षिण 350, नागपूर पूर्व 364, नागपूर मध्य 308, नागपूर पश्चिम 351, आणि नागपूर उत्तर 407 अशी एकूण 4 हजार 610 मतदान केंद्र असणार आहेत. यात उंच इमारतींमधील 11 आणि झोपडपट्टी भागातील 9 मतदान केंद्रांचा समावेश आहे.
▪️राज्य सीमेवर विशेष दक्षता
मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र असल्यास गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच मध्य प्रदेशलगतच्या राज्य सीमेवरील चेकपोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, वन तसेच पोलीस विभागांच्या पथकांमार्फत चेक पोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.
▪️सोशल मीडियावर राहणार विशेष लक्ष
सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
▪️मतदारांनो, व्होटर हेल्पलाईन ॲपवर नाव शोधा
व्होटर हेल्पलाईन ॲपवर मतदारांना आपले नाव शोधता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी आपले नाव शोधून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
Maharashtra DGIPRNagpur Municipal Corporationआकाशवाणी नागपूर वृत्त विभागDDSahyadriAll India Radio, (Akashwani), NagpurNagpur Police Commissionerate Election Commission of India
▪️जिल्ह्यात 4 हजार 610 मतदान केंद्र ▪️राज्य सीमेवर विशेष दक्षता ▪️समाज माध्यमांवर राहणार विशेष लक्ष
Maharashtra DGIPR Nagpur Municipal Corporation आकाशवाणी नागपूर वृत्त विभाग. Nagpur Police Commissionerate. All India Radio, (Akashwani), Nagpur. Election Commission of India
*लोककल्याणासाठी असलेला निधी लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहचवू*
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
▪️पारशिवनी येथे सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन
नागपूर,दि. 13: लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला. याची सुरुवात आम्ही अन्नदात्या शेतकऱ्यांपासून केली. केंद्रसारकारचे सहा हजार व महाराष्ट्र शासनाचे सहा हजार असे आपण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना सावरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील वृद्ध व्यक्तींना आधार देणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना आपण साकारली. लाडक्या बहिणींची योजना आणली. आपल्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. बांधकाम कामगारांसाठी आधार देणारी खास कल्याणकारी योजना आपण सुरू केली. या सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा आपण निर्णय घेतला. लोकांच्या कल्याणाचा निधी त्यांच्या हक्काचा आहे. लोक कल्याणाच्या भावनेतून हा निधी त्यांच्या पर्यंत पोहचविणे व वंचितांना न्यायाच्या कक्षेत आणणे याला आम्ही प्राधान्य दिल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पारशिवणी येथे सुमारे २ हजार कोटी रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारशिवणी मैदान येथे आयोजित समारंभात ते बोलत होते. आमदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल व मान्यवर उपस्थित होते. या विकासकामात सत्रापूर उपसा सिंचन योजना, रस्ते, बंधारे, खिंडसी पुरक कालवा, सालई - माहुली पूल, नेऊरवाडा- पाली, घाटरोहणा - वाघोडा पुल, मनसर माहुली रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंटीकरण, रामटेक बसस्थानक नूतनीकरण, रामटेक पंचायत समिती प्रशासकीय इमारत, देवलापार अपर तहसील कार्यालय नवीन इमारत आदि कामांचा समावेश आहे.
गेल्या अडीच वर्षात कधी नव्हे ते शासनाने सर्वसामान्यांच्या व्यथा समजून घेतल्या. गोरगरिबांचे दु:ख ओळखले. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यातून सावरण्यासाठी आपण त्यांच्या बांधावर जाऊन एनडीआरएफ अंतर्गत भरीव मदत पोहचविली. त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिलो. कोणत्याही शासकीय योजनांसाठी दलालाची साखळी आपण ठेवली नाही. केंद्राचा, राज्य शासनाचा जो निधी आहे तो थेट लाभधारकांच्या खात्यात जमा होत आहे. या माध्यमातून राज्यातील जनतेने एक स्वच्छ पारदर्शी सरकारची प्रचिती घेतली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे अतिशय कल्पकतेने आमच्या काही बहीणी वापरत आहेत. यातून त्यांनी आपल्या छोट्या व्यवसायाला आकार दिला आहे. हा पैसा बाजारात खेळते भांडवल म्हणून वापरला जाऊ लागला आहे. या योजनेसमवेत लखपती दिदी योजनेसाठी आम्ही कटिबध्द झालो आहोत. उमेद अंतर्गत महिला बचत गटांची संख्या आम्ही 60 लाखांवरुन 1 कोटीपर्यंत लवकरच घेऊन जात आहोत. उमेदच्या अंतर्गत असलेल्या महिलांनाही अधिक भक्कम करु, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आमदार आशिष जयस्वाल यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संवाद साधला. विदर्भातील विविध विकास कामांसह सिंचनाच्या दृष्टीनेही आपण मैलाचा टपा गाठल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत नागपूर वैनगंगा विकास खोऱ्यांतील सत्रापूर विकास योजनेच्या माध्यमातून सुमारे 10 हजार एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. यासाठी 123 कोटी रुपये राज्यशासनाने दिले आहेत. या योजनेतून जे पंपगृह आहेत त्याद्वारे रामटेक तालुक्यातील 24 गावांतील 6 हजार एकर क्षेत्राला सिंचन उपलब्ध होत आहे.
विदर्भातील सिंचन क्षेत्राला न्याय देण्याकरीता आपण सातत्याने प्रयत्न केले. हा प्रकल्प अनुशेष निर्मुलनाचा एक भाग असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वैनगंगा-नळगंगा हा प्रकल्प विदर्भातील सिंचनाचे चित्र बदलविणारा प्रकल्प आहे. सुमारे 87 हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहेत. यातून 10 लाख एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. आमदार आशिष जयस्वाल यांनी अत्यंत कल्पकतेने आपल्या मतदार संघात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली या शब्दात त्यांनी गौरव केला.
यावेळी आमदार आशिष जयस्वाल यांनी आपल्या मनोगतात मतदार संघातील विकास कामांविषयी कटिबध्दता व्यक्त करुन शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
00000
Maharashtra DGIPR CMOMaharashtraDevendra FadnavisNagpur Municipal Corporationआकाशवाणी नागपूर वृत्त विभागDDSahyadriAll India Radio, (Akashwani), NagpurNagpur Police Commissionerate