Khasdar Krida Mahotsav

Khasdar Krida Mahotsav

Chak de” KKM5 is an annual regional sports meet

29/01/2024

खासदार क्रीडा #महोत्सव समारोप समारंभ...

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 29/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव 2024
Highlights of Volleyball Matches
#खासदार_क्रीडा_महोत्सव_2024 #खासदारक्रीडामहोत्सव #दक्षिण_पश्चिम_नागपूर #मध्य_नागपुर #पूर्व_नागपूर #दक्षिण_नागपूर #खासदार_क्रीडा_महोत्सव #पश्चिम_नागपूर #उत्तर_नागपूर

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 29/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव: हॉलिबॉल स्पर्धा
युथ काटोल, धापेवाडा संघाला विजेतेपद
नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारले्ल्या खासदार क्रीडा महोत्सवातील व्हॉलिबॉल स्पर्धेत युथ स्पोर्ट्स काटोल आणि श्री कोलबास्वामी स्पोर्ट्स अॅकेडमी धापेवाडा संघाने पुरुष व महिला गटातील विजेतेपद पटकावले.

रेशीमबाग मैदानामध्ये व्हॉलिबॉल स्पर्धा पार पडली. शनिवारी (ता.27) रात्री स्पर्धेची अंतिम लढत झाली. पुरूष गटात युथ स्पोर्ट्स काटोल संघाचा सामना रॉयल व्हॉलिबॉल अॅकेडमी संघासोबत झाला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक सामन्यात युथ स्पोर्ट्स संघाने 23-25, 25-13, 25-15, 25-23 अशा गुणांसह रॉयल संघाला पराभवाचा धक्का देत विजेतेपदावर नाव कोरले. महिलांची अंतिम लढत श्री कोलबास्वामी स्पोर्ट्स अॅकेडमी धापेवाडा आणि समर्थ व्यायामशाळा नागपूर यांच्यात झाली. या सामन्यात धापेवाडा संघाने 25-14, 21-25, 25-14, 25-18 अशा गुणफरकाने समर्थ संघाला नमवून विजेतेपद पटकावले.

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत पुरूष गटात समर्थ व्यायामशाळा आणि महिलांमध्ये नागपूर सिटी पोलिस संघाने विजय मिळविला. पुरूष गटातील सामन्यात समर्थ संघाने पुलगाव संघाचा 25-22, 27-25 असा दोन सेटमध्ये पराभव केला. तर महिलांच्या सामन्यात नागपूर सिटी पोलिस संघाने हिंगणघाट संघाला 25-22, 25-20 ने मात दिली.

विजेता, उपविजेता आणि तिसऱ्या स्थानावरील संघांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे समन्वयक माजी नगरसेवक विजय (पिंटू) झलके, कन्वेनर सुनील मानेकर, नितीन कानोडे, सोनाली पठारडकर, सौरभ रोकडे, सुनील हांडे आदी उपस्थित होते.

28/01/2024

📍 🎥 Live खासदार क्रीडा महोत्सव २०२४ पर्व ६वे समारोप समारंभ.
Nitin Gadkari Sandip Joshi Pravin Datke


#खासदार_क्रीडा_महोत्सव_2024

28/01/2024

Live From Closing Ceremony Of ''Khasdar Krida Mohotsav-2024''

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 28/01/2024

खासदार क्रीडा महोत्सवाचे पुरस्कार जाहीर : हरेश व्होरा उत्कृष्ट संघटक तर गणेश पुरोहित उत्कृष्ट प्रशिक्षक
सुभाष क्रीडा मंडळाला उत्कृष्ट संघटना पुरस्कार
नागपूर, ता. २७ : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये यंदा तीन नवीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. उद्या रविवार 28 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या समारोपीय समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. उत्कृष्ट संघटना, उत्कृष्ट संघटक आणि उत्कृष्ट प्रशिक्षक अशा तिनही पुरस्कार्थींचे नाव खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे शनिवारी (ता.27) जाहीर करण्यात आले आहेत.

खासदार क्रीडा महोत्सवाद्वारे यंदा देण्यात येत असलेला उत्कृष्ट संघटना पुरस्कार कॉटन मार्केट येथील सुभाष क्रीडा मंडळाला जाहीर करण्यात आलेला आहे. स्मृतीचिन्ह व 1 लाख रुपये रोख असे उत्कृष्ट संघटना या पुरस्काराचे स्वरूप आहे. हरेश व्होरा यांची उत्कृष्ट संघटक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर गणेश पुरोहित यांची उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. स्मृतीचिन्ह व प्रत्येकी 51 हजार रुपये रोख असे उत्कृष्ट संघटक आणि उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराचे स्वरूप आहे. खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे तिनही पुरस्कार्थींची निवड करण्यात आली आहे.

समितीकडे आलेल्या अर्जांमधून क्रीडा भूषण पुरस्कार्थींची देखील निवड करण्यात आलेली आहे. या सर्व पुरस्कार्थींना उद्या रविवारी यशवंत स्टेडियमवर सायंकाळी 6 वाजता आयोजित समारंभामध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 28/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव : कॅरम स्पर्धा
निखील, अंजली, निशिकांत ‘चॅम्पियन’
नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कॅरम स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रतिस्पर्धींना नमवून निखील लोखंडे, अंजली प्रजापती, निशिकांत मेश्राम आणि गुरूचंदन तांबे आपापल्या गटात ‘चॅम्पियन’ ठरले.

उत्तर नागपूर क्रीडा संकुल अहुजा नगर येथे झालेल्या स्पर्धेतील पुरूष गटात निखील लोखंडेने 25-7, 25-11 अस दोन सेटमध्ये राहुल वर्माचा पराभव करून अजिंक्यपदावर मोहोर उमटविली. पाचवा मानांकीत इशान साखरेला पराभवाचा धक्का देऊन अंतिम फेरी गाठणाऱ्या बिगरमानांकीत राहुल वर्माने अंतिम सामन्यात निखील लोखंडेला चांगलीच टक्कर दिली. पुरूष गटात तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात इरशाद अहमदला यश मिळाले.

महिलांच्या सामन्यात आपली विजयी मोहिम कायम राखत रॉय क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजली प्रजापतीने अंतिम लढतीतही बाजी मारली. तिने रॉय क्लबच्याच दिप्ती निशादचा 16-20, 25-1, 21-10 ने पराभव करून विजेतेपद पटकावले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत पुष्पलता हेडाउला नमविण्यात डिम्पल परातेला यश आले.

प्रौढांच्या गटातही निशिकांत मेश्रामने आपली विजयी मोहिम कायम राखत अंतिम सामना जिंकला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिनेश बागडेला 19-21, 22-5, 16-15 ने पराभूत करीत निशिकांतने अंतिम लढत आपल्या नावे केली. तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात इम्तियाज अहमदला पराभूत करीत संदीप गजीमवारने विजय मिळविला. वैयक्तिक गटात ओम क्रीडा मंडळाच्या गुरूचंद्रन तांबेने हितेश जांभुळकरला मात देत विजय मिळविला. तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात ओम क्रीडाच्या रजत कोटांगलेने त्याच्याच मंडळाच्या तोमेश्वर परातेचा पराभव केला.

सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. मिलींद माने, स्पर्धेचे कन्वेनर नागेश सहारे, भाजपा उत्तर नागपूरचे अध्यक्ष गणेश कानतोडे, माजी नगरसेवक महेंद्र धनविजय, कॅरम असोसिएशनचे मो. इकबाल, मुकुंद नागपूरकर, गौरव सोनटक्के आदी उपस्थित होते.

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 28/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव : क्वान की डो मटेरियल आर्ट
अलोक ठाकरे, पायल कोरेला सुवर्ण पदक
नागपूर. खासदार क्रीडा महोत्सवातील क्वान की डो मटेरियल आर्ट स्पर्धेमध्ये अलोक ठाकरे व पायल कोरेने 18 वर्षाखालील वयोगटात सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. विवेकानंद नगर येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 18 वर्षाखालील वयोगटात मुलांच्या 55 किलोवरील वजनगटामध्ये अलोक ठाकरेने प्रथम, सुशील राऊळेने द्वितीय व सिद्धेश ढोरेने तृतीय क्रमांक पटकावला.

18 वर्षावरील मुलींच्या 50 किलोवरील वजनगटामध्ये पायल कोरेने सुवर्ण पदकावर मोहोर उटविली. पायलकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या दिप्ती पटलेला रौप्य पदकावर तर क्रिष्णाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 15 ते 17 वर्ष वयोगटात 41 किलोवरील वजनगटात मुलांमध्ये अथर्व श्रीपाडवार विजेता ठरला. त्याने अथर्व चौधरीचा पराभव केला. राज उगरेजिया ने तिसरे स्थान प्राप्त केले. मुलींमध्ये अक्षरा ठाकरेने बाजी मारली. संस्कृती बारसेने दुसरे तर आरुषी इडुलकरने तिसरे स्थान प्राप्त केले. 15 ते 17 वर्ष वयोगटात मुलींच्या 41 किलो वजनगटामध्ये सबिया अंसारीने सुवर्ण, माही चावडेने रौप्य व नंदिनी पाठराबेने कांस्य पदक पटकावले.

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 28/01/2024

उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची क्रिकेट स्पर्धेला भेट

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी (ता.26) रात्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मैदानात फलंदाजी करीत उपांत्य फेरीतील सामन्यांचा शुभारंभ केला व खेळाडूंशी हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी स्पर्धेचे समन्वयक नरेंद्र (बाल्या) बोरकर, रितेश गावंडे, नितीन महाजन, बादल राऊत, नागेश साठवणे, अमर धरमारे, गुड्डू पांडे, आशिष मिश्रा, पुष्कर पोशेट्टीवार, अक्षय ठवकर आदी उपस्थित होते.

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 28/01/2024

खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप रविवारी
ना. नितीन गडकरी, ना. देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
बी.प्राकचे लाईव्ह कॉन्सर्ट : सोहळ्याच्या पार्कींगसाठी विशेष व्यवस्था

नागपूर, ता. २७ : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्या रविवार 28 जानेवारी रोजी समारोप होणार आहे. उद्या रविवारी यशवंत स्टेडियमवर सायंकाळी 6 वाजता आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असेल. यावेळी सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक बी.प्राकचे लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांसाठी नि:शुल्क वाहन पार्कींगची देखील विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुचाकी वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था यशवंत स्टेडियमपुढील जागेवर करण्यात आलेली आहे. तर चारचाकी वाहनांच्या पार्कींगसाठी पटवर्धन मैदान तसेच महामेट्रोच्या मैदानामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमामध्ये ‘तेरी मिट्टी में मिल जावां…’ फेम सुप्रसिद्ध हिंदी, पंजाबी गायक बी. प्राक यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रम नि:शुल्क असून स्टेडियममध्ये प्रवेशासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाच्या सीताबर्डीतील ग्लोकल मॉलमधील मुख्य कार्यालयासह वीर सावरकर चौकातील केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे कार्यालय, यशवंत स्टेडियम, नक्षत्र सभागृह प्रतापनगर, यश कॉम्प्लेक्स भरत नगर चौक, चिटणीस पार्क महाल, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान रेशीमबाग चौक, गिरनार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सुनील हॉटेल जवळ आणि जिंजर मॉल जरीपटका या ठिकाणी सकाळी प्रवेशिका उपलब्ध आहेत. नागरिकांनी त्वरीत आपल्या प्रवेशिका प्राप्त करून कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असेही आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

28/01/2024

केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला "खासदार क्रीडा महोत्सव" पर्व सहावे
Nations First Grass root Level Multi-sport Event

Live concert
B PRAAK

वेळ:- सायं 7 वा
स्थळ:- यशवंत स्टेडियम धांतोली नागपूर.

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 27/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव : कॅरम स्पर्धा
मानांकीत इशानला बिगरमानांकीत राहुलचा धक्का
नागपूर. खासदार क्रीडा महोत्सवातील कॅरम स्पर्धेमध्ये पाचवा मानांकीत इशान साखरेला बिगरमानांकीत राहुल वर्माने पराभवाचा धक्का देत स्पर्धेत आघाडी घेतली. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत उत्तर नागपूर क्रीडा संकुल अहुजा नगर येथे स्पर्धा सुरू आहे.

गुरूवारी (ता.25) झालेल्या पुरूष एकेरी सामन्यात पाचवा मानांकीत इशान साखरेचा बिगरमानांकीत राहुल वर्माने 19-16, 16-16, 25-1 असा पराभव करीत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. प्रौढांच्या सामन्यांमध्ये संदीप गजीमवार, दिनेश बागडे, निशिकांत मेश्राम आणि इम्तियाज अहमद यांनी तर महिलांमध्ये अंजली प्रजापती, डिम्पल पराते, दिप्ती निशाद आणि पुष्पलता हेडाउ यांनी प्रतिस्पर्धकांना नमवित उपांत्य फेरीत प्रवेश केला.

प्रौढांच्या एकेरीमध्ये संदीप गजीमवारने अकोल्याच्या एजाज मिर्झाचा 21-16, 25-9 ने, दिनेश बागडेने रवी बढेलचा 25-2, 25-4 ने, निशिकांत मेश्रामने अकोल्याच्या अनिश बाबाचा 20-10, 25-0 ने आणि इम्तियाज अहमदने केवल मेश्रामचा 25-16, 25-7 ने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली.

महिलांमध्ये अंजली प्रजापतीने माधवी निशादला 22-4, 19-1 ने, डिम्पल परातेने साक्षी कछवेला 24-0, 5-24, 20-7 ने, दिप्ती निशादने रामटेकच्या वनिष्का गुप्ताला 25-10, 25-0 ने आणि पुष्पलता हेडाउने पौर्णिमा पराळेला 25-16, 15-05 ने नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

27/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव २०२४
आज खेळले जाणारे खेळ आणि स्थळं.
खेळ : पिट्ठू
समन्वयक : सचिन खरे
स्थळं : सभदावना नगर मैदान, बगडगंज
#खासदार_क्रीडा_महोत्सव_2024 #खासदारक्रीडामहोत्सव #दक्षिण_पश्चिम_नागपूर #मध्य_नागपुर #पूर्व_नागपूर #दक्षिण_नागपूर #खासदार_क्रीडा_महोत्सव #पश्चिम_नागपूर #उत्तर_नागपूर

27/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव २०२४
आज खेळले जाणारे खेळ आणि स्थळं.
खेळ : लंगडी
समन्वयक : सचिन खरे
स्थळं : सभदावना नगर मैदान, बगडगंज
#खासदार_क्रीडा_महोत्सव_2024 #खासदारक्रीडामहोत्सव #दक्षिण_पश्चिम_नागपूर #मध्य_नागपुर #पूर्व_नागपूर #दक्षिण_नागपूर #खासदार_क्रीडा_महोत्सव #पश्चिम_नागपूर #उत्तर_नागपूर

27/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव पर्व-६वे , २०२४
आज दिनांक २७/०१/२०२४ ला खेळले जाणारे खेळ आणि स्थळं.
#खासदार_क्रीडा_महोत्सव_2024 #खासदारक्रीडामहोत्सव #दक्षिण_पश्चिम_नागपूर #मध्य_नागपुर #पूर्व_नागपूर #दक्षिण_नागपूर #खासदार_क्रीडा_महोत्सव #पश्चिम_नागपूर #उत्तर_नागपूर

26/01/2024

केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला "खासदार क्रीडा महोत्सवा"चा समारोप २८ जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे सायं. ७ वाजता होणार आहे. या सोहळ्याला सुप्रसिद्ध गायक B PRAAK यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे . तरी कार्यक्रमाला नागपुरातील समस्त युवक युवतींनी तसेच खेळाडूंनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे....!

26/01/2024

खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप रविवारी
क्रीडा भूषणसह यंदा तीन नवे पुरस्कार
नागपूर, ता. २५ : केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा रविवार 28 जानेवारी रोजी समारोप होणार आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता यशवंत स्टेडियमवर आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असेल. सुप्रसिद्धी बॉलिवूड गायक बी. प्राक यांच्या गाण्यांचा कार्यक्रम हे या सोहळ्याचे आकर्षण असेल, अशी माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी दिली आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय समारंभात यंदा क्रीडा भूषण पुरस्कारासोबतच तीन नवीन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट संघटक आणि उत्कृष्ट संघटना असे तीन नवीन पुरस्कार यंदा मान्यवरांच्या हस्ते दिले जातील. नागपूर जिल्ह्यातील विविध खेळांच्या प्रशिक्षकांपैकी उल्लेखनीय कामगिरी करणा-या प्रशिक्षकाला उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 51 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर विविध स्पर्धांचे योग्य आयोजन करणा-यांना उत्कृष्ट संघटक (ऑर्गेनायजर) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 51 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर नागपूर शहरातील विविध संघटना, मंडळ, क्लब यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा संघटनेला उत्कृष्ट संघटना (असोसिएशन) पुरस्कार दिला जाणार आहे. 1 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या तिनही पुरस्कारांसाठी खासदार क्रीडा महोत्सवाच्या निवड समितीमार्फत पुरस्कार्थींची निवड केली जाणार आहे. दरवर्षी दिला जाणा-या क्रीडा भूषण पुरस्कारासाठी विविध खेळांच्या खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले असून त्यापैकी निवड झालेल्या खेळाडूंना 25 हजार रुपये रोख असे स्वरूप असलेला क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

12 जानेवारीला खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले तेव्हापासून शहरातील वेगवेगळ्या 65 क्रीडांगणांवर 55 खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या खेळांचे 12 हजार 500 सामने घेण्यात आले. यामध्ये 2325 संघांचा सहभाग राहिला. यात 4800 ऑफिशियल्स तर 65 हजार खेळाडूंचा सहभाग होता. विजेत्यांना 1100 ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. तर 12300 मेडल्स देखील प्रदान करून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या भव्य महोत्सवात विजेत्यांना एकूण 1 कोटी 35 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. मध्य भारतातील स्थानिक स्तरावरील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा रविवारी 28 जानेवारी रोजी समारोप होत आहे. या भव्य महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्यात सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

प्रवेशिका येथे मिळवा

तेरी मिट्टी में मिल जावा…, बारीश की जाये…, रब्बा वे…, अच्छा सिला दिया…, दिल तोड के…, मेरे यार…, क्या लोगे तुम… रांझा, अल्ला के बंदे…, धोके, प्यार के धोके… अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांनी श्रोत्यांच्या मनावर राज्य करणा-या बी.प्राकच्या गाण्यांचा दिमाखदार सोहळा समारोपीय कार्यक्रमाचे आकर्षण आहे. समारोपीय सोहळा नि:शुल्क असून येथे प्रवेशासाठी प्रवेशिका गरजेची आहे. खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने खालील ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजता पर्यंत प्रवेशिका प्राप्त करण्याचे आवाहनही समितीद्वारे करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे कार्यालय वीर सावरकर चौक ऑरेंज सिटी हॉस्पीटल समोर, खासदार क्रीडा महोत्सवाचे सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील मुख्य कार्यालय, यशवंत स्टेडियम, नक्षत्र सभागृह प्रतापनगर, यश कॉम्प्लेक्स भरत नगर चौक, चिटणीस पार्क महाल, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान रेशीमबाग चौक, गिरनार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सुनील हॉटेल जवळ आणि जिंजर मॉल जरीपटका या ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध आहेत.

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 26/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव
सेंट जोसेफ, विद्यानिकेतन थ्रोबॉलमध्ये अजिंक्य
नागपूर. सेंट जोसेफ आणि विद्यानिकेतन संघाने प्रतिस्पर्धकांना पराभवाचा धक्का देत खासदार क्रीडा महोत्सवातील थ्रोबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. दिघोरी येथील बिरसा मैदानामध्ये गुरूवारी (ता.25) स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली.

मुली आणि मुलांच्या गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. मुलींच्या गटात सेंट जोसेफ आणि प्रोव्हिडन्स जी.एच. यांच्यात चुरशीची अंतिम लढत झाली. यामध्ये सेंट जोसेफ संघाने 15-7, 7-15, 15-9 असा सामना जिंकून जेतेपद पटकावले. मुलींच्या गटात तिस-या स्थानासाठी झालेल्या सामन्यात सेंट उर्सुला संघाने सीडीएस वर 15-12, 15-3, 15-10 ने विजय मिळविला.

मुलांच्या गटामध्ये विद्यानिकेतन संघाने ई-पाठशाला संघाचा 18-16, 15-9 ने पराभव करून विजेतेपदाचे चषक पटकावले. तर तिस-या स्थानासाठीच्या सामन्यात एसओएस संघाने सीडीएसचा 15-8, 15-4 असा एकतर्फी पराभव करून विजय मिळविला.

26/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव : लॉन टेनिस स्पर्धा
राज बागडी, मिष्का तायडेला अजिंक्यपद
नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लॉन टेनिस स्पर्धेमध्ये राज बागडीने पुरूष एकेरीत तर मिष्का तायडेने मुलींच्या गटात अजिंक्यपद पटकाविण्याची कामगिरी केली.

रामनगर टेनिस कोर्टवर पार पडलेल्या लॉन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मिष्का तायडेने मुलींच्या 16 वर्षाखालील आणि 14 वर्षाखालील अशा दोन गटात प्रतिस्पर्धकांना पराभूत करीत जेतेपदाचे दुहेरी मुकूट प्राप्त केले. मिष्का तायडेने 16 वर्षाखालील गटात श्रर्वरी श्रीरामेचा 6-4 ने तर 14 वर्षाखालील गटात सुरमयी साठेचा 6-1 अशा गुणांनी पराभव केला. पुरूष एकेरीमध्ये राज बागडीने प्रतिस्पर्धी तेजल पाल ला 6-3, 6-2 अशी दोन सेटमध्ये मात दिली. पुरूष दुहेरीमध्ये राज बागडी आणि अचिंत्य वर्मा या जोडीने अजय नेवारे व कशीत नगराळे या जोडीचा 6-4, 6-3 असा दोन सेटमध्ये पराभव करीत विजय संपादित केला.

विजेत्यांना रोष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा पश्चिम नागपूरचे अध्यक्ष विनोद कन्हेरे, माजी नगरसेवक प्रमोद कौरती, स्पर्धेचे कन्वेनर सतीश वडे, नागपूर डिस्ट्रीक्ट हार्डकोर्ट टेनिस असोसिएशनचे अशोक भिवापुरकर, डॉ. सुधीर भिवापुरकर, विक्रम नायडू आदी उपस्थित होते.

26/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव २०२४
आज खेळले जाणारे खेळ आणि स्थळं.
खेळ : ऐरोबिक्स आणि फिटनेस
समन्वयक : संजय पौनीकर
स्थळं : लक्षवेध ग्राउंड, नरेंद्र नगर
#खासदार_क्रीडा_महोत्सव_2024 #खासदारक्रीडामहोत्सव #दक्षिण_पश्चिम_नागपूर #मध्य_नागपुर #पूर्व_नागपूर #दक्षिण_नागपूर #खासदार_क्रीडा_महोत्सव #पश्चिम_नागपूर #उत्तर_नागपूर

26/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव पर्व-६वे , २०२४
आज दिनांक २६/०१/२०२४ ला खेळले जाणारे खेळ आणि स्थळं.
#खासदार_क्रीडा_महोत्सव_2024 #खासदारक्रीडामहोत्सव #दक्षिण_पश्चिम_नागपूर #मध्य_नागपुर #पूर्व_नागपूर #दक्षिण_नागपूर #खासदार_क्रीडा_महोत्सव #पश्चिम_नागपूर #उत्तर_नागपूर

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 26/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव : बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धा
अल्फीया शेख, मोहित यादव ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’
नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवित अल्फीया शेख आणि मोहित यादव हे ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरले.

गरोबा मैदान येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये महिला गटात अल्फीया शेख तर पुरूष गटात मोहित यादवने सर्वोत्तम कामगिरी केली. महिलांच्या 63 किलो वजनगटात अल्फीयाने सर्वाधिक 67.67 गुणांची नोंद करीत बाजी मारली. या वजनगटात सोनू सरोते आणि चंदा ओझा यांनी दुस-या व तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरूषांमध्ये 66 किलो वजनगटामध्ये मोहित यादवने सर्वाधिक 76.10 गुण नोंदवित ‘चॅम्पियन्स’चा किताब आपल्या नावावर केला. या गटात मॅक्झिमस दुस-या आणि मयूर टेकाडे तिस-या स्थानावर राहिला.

विविध वजनगटातील विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला स्पर्धेचे समन्वयक माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, कन्वेनर सचिन माथने, माजी नगरसेविका कांता रारोकर, क्रीडा शिक्षक अविनाश सहारे, बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे आनंद डाबरे, लक्ष्मीकांत मेश्राम आदी उपस्थित होते.

25/01/2024

२८ जानेवारीला यशवंत स्टेडियमवर होणार समारंभ
बी.प्राक च्या गाण्यांनी होणार खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप रविवारी २८ जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे होणार आहे. महोत्सवाच्या समारोप समारंभात खास नागपूरकरांसाठी सुप्रसिद्ध गायक बी.प्राक यांच्या गाण्यांची मेजवानी असणार आहे.

या समारंभाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

समारोपीय कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी प्रवेशिका आवश्यक आहेत. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे कार्यालय वीर सावरकर चौक ऑरेंज सिटी हॉस्पीटल समोर, खासदार क्रीडा महोत्सवाचे सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील मुख्य कार्यालय, समारोपीय कार्यक्रमस्थळ यशवंत स्टेडियम, नक्षत्र सभागृह प्रतापनगर, यश कॉम्प्लेक्स भरत नगर चौक, चिटणीस पार्क महाल, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान रेशीमबाग चौक, गिरनार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सुनील हॉटेल जवळ, जिंजर मॉल जरीपटका या ठिकाणी प्रवेशिका उपलब्ध असून नागरिकांनी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवेशिका प्राप्त कराव्यात, असे आवाहन समितीमार्फत करण्यात येत आहे.

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 25/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव
कराटेमध्ये नॅशनल शोतोकानला जेतेपदाचे दुहेरी मुकुट
नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कराटे स्पर्धेमध्ये नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाने मुली व मुलांच्या गटात सर्वाधिक पदकांची कमाई करीत विजेतेपदाचे दुहेरी मुकुट आपल्या नावे केले आहे.

विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे बुधवारी (ता.24) कराटे स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये 14 वर्षावरील वयोगटात नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया (एनएसकेए) मुलींच्या गटात 111 तर मुलांच्या गटात 204 अशी सर्वाधिक पदकांची कमाई करीत स्पर्धेत ‘चॅम्पियन’ ठरला आहे. मुलींच्या गटात एनएसकेए ने 21 सुवर्ण, 9 रौप्य आणि 30 रौप्य पदक पटकाविले. तर मुलांमध्ये एनएसकेए ने 35 सुवर्ण, 27 रौप्य आणि 45 कांस्य पदकांची कमाई केली आहे.

मुलींच्या गटामध्ये मित्सुया-काई-हयासी-हा शितो–रियू कराटे-डो इंडिया संघाने 8 सुवर्ण, 13 रौप्य आणि 12 कांस्य अशी एकूण 62 पदकांची कमाई करीत दुसरे स्थान प्राप्त केले. तर ॲमेच्योर ट्रॅडिशनल कराटे असोसिएशन नागपूर ने 8 सुवर्ण, 4 रौप्य आणि 12 कांस्य असे एकूण 44 पदक प्राप्त करीत तिसरे स्थान राखले.

मुलांच्या स्पर्धेमध्ये अरेना स्पोर्ट्स यूनिव्हर्स ॲकेडमीने 10 सुवर्ण, 5 रौप्य आणि 23 कांस्य अशी एकूण 63 पदकांच्या कमाईसह दुसरे स्थान मिळविले. तर मित्सुया-काई-हयासी-हा शितो–रियू कराटे-डो इंडिया ने 4 सुवर्ण, 6 रौप्य आणि 33 कांस्य अशा एकूण 57 पदकांसह तिसरे स्थान प्राप्त केले.

सर्व वयोगटातील विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर विजेते ठरलेल्या नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया संघाला विजेतेपदाचे चषक प्रदान करण्यात आले.

Photos from Khasdar Krida Mahotsav 's post 25/01/2024

खासदार क्रीडा महोत्सव : थ्रोबॉल स्पर्धा
सेंट जोसेफ, प्रोव्हिडन्सला विजेतेपद
नागपूर. खासदार क्रीडा महोत्सवातील थ्रोबॉल स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये सेंट जोसेफ आणि प्रोव्हिडन्स संघाने पूल ‘ए’ आणि पूल ‘बी’ गटातून विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली.

दिघोरी येथील बिसरा मैदानामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. बुधवारी (ता.24) 17 वर्षाखालील मुलींच्या पूल ‘ए’ गटात सेंट जोसेफ संघाने सीडीएस संघाचा 17-16, 15-07, 15-12 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. तर पूल ‘बी’ गटात प्रोव्हिडन्स संघाने सेंट उर्सुला संघाला 15-3, 15-5 अशी मात देत स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.

पूल ‘ए’च्या उपांत्य फेरीमध्ये सेंट जोसेफ संघाने व्हीएनसी संघाचा 15-1, 15-6, 12-15 असा पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. तर सीडीएस संघाने ई पाठशाला संघाला 11-15, 15-13, 15-3 ने पराभवाचा धक्का देत सेंट जोसेफ संघाचे आव्हान स्वीकारले होते. पूल ‘बी’ मध्ये प्रोव्हिडन्स संघाने ई पाठशालाचा 15-02, 15-03 ने तर सेंट उर्सुला संघाने एस.ओ.एस ला 15-12, 15-11 ने मात देत अंतिम फेरी गाठली होती.

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

खासदार क्रीडा #महोत्सव समारोप समारंभ...#KKM6 #nagpur #sports
2Days To Go...गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सव पर्व सहावे चा समारोप २८ जानेवारी रोजी होणार आहे....
गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सव पर्व सहावे चा समारोप २८ जानेवारी रोजी होणार आहे. या समारोपीय स...
खासदार क्रीडा महोत्सव : सायकलिंग१ दिवस बाकी आहेत #kkm6 #khasdarkridamahotsav #khasdar_krida_mahotsav #sports #khasdar #K...
खासदार क्रीडा महोत्सव :बॉडी बिल्डिंग १  दिवस बाकी आहेत#kkm6 #khasdarkridamahotsav #khasdar_krida_mahotsav #sports #khasd...
खासदार क्रीडा महोत्सव : सायकलिंग२ दिवस बाकी आहेत #kkm6 #khasdarkridamahotsav #khasdar_krida_mahotsav #sports #khasdar #K...
खासदार क्रीडा महोत्सव :बॉडी बिल्डिंग २ दिवस बाकी आहेत#kkm6 #khasdarkridamahotsav #khasdar_krida_mahotsav #sports #khasda...
खासदार क्रीडा महोत्सव :  Tug of War   #खासदार_क्रीडा_महोत्सव_2024
खासदार क्रीडा महोत्सव : Long Jump    #खासदार_क्रीडा_महोत्सव_2024
खासदार क्रीडा महोत्सव : कबड्डी    #खासदार_क्रीडा_महोत्सव_2024
खासदार क्रीडा महोत्सव : खो- खो    #खासदार_क्रीडा_महोत्सव_2024
खासदार क्रीडा महोत्सव :   ऍथलेटिक्स    #खासदार_क्रीडा_महोत्सव_2024

Telephone

Address

Nagpur
440010
Other Nagpur gyms & sports facilities (show all)
Nikhil official Nikhil official
Nagpur

Welcome to my page click on the link to connect with us if you interested to start work with us to contact us and thank you for your support ��

CricStar Sports CricStar Sports
RATANDEEP APARTMENT
Nagpur, 440013

SPORTANIA SPORTS PVT. LTD.

cricket crik ipl cricket crik ipl
Nagpur
Nagpur, 4400023

all highlights

Afghanistan Cricket Afghanistan Cricket
Nagpur
Nagpur, 440001

د کرکټ د تازه، دقیق معلوماتو او ښايسته ويډيوګانو لپاره زمونږ فيسبوک پاڼه درسره خوښه کړئ، ښه راغلاست هر کله راشئ.🤝 𝙄'𝙢 𝙗𝙞𝙜 𝙛𝙖𝙣 𝙤𝙛 𝘼𝙛𝙜𝙝𝙖𝙣𝙞𝙨𝙩𝙖𝙣 𝙘𝙧𝙞𝙘𝙠𝙚𝙩 𝙩𝙚𝙖𝙢 ❤️🇦🇫❤️💪

Mahi sport 9 Mahi sport 9
Nagpur, 440035

All types sports wear

Cricket maza Cricket maza
Nagpur

cricket news

Ipl match Ipl match
Nagpur
Nagpur, 440001

�Welcome To My Profile� █║▌║█│▌�V.I.P Account ��Attitude Badshah ��Cricket Lover ��Alone Boy �

Nagpur District Football Association Nagpur District Football Association
Dr. Ambedkar Football Stadium, Patankar Chowk Road, Sahayog Nagar
Nagpur, 440026

Official Facebook account of Nagpur District Football Association

Ipl me Ipl me
Nagpur