Vandya Vande Mataram

"VANDYA VANDE MATARAM"
#saluteofgratitude
A Tribute To Motherland
A Tribute To Soldiers

23/11/2023
23/11/2023

कार्तिकी एकादशी च्या मंगल प्रसंगी भक्तिपूर्ण नमन.

04/10/2022

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणार्‍या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते.
अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक 'अर्धनारीनटेश्वर' या नावाने ओळखतात.

देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फूलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे.
देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

03/10/2022

दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।' तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत.
दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।' तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत.

महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.

आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-
जन्म कोटि लगि रगर हमारी।
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।
या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.

02/10/2022

शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी माता कालीचे विशेष पूजन होतं आणि मंत्रांचा जप केल्याने देवी प्रसन्न होऊन सर्वत्र विजय प्रदान करते. ही देवी सर्व प्रकाराचे रोग दूर करणारी, विजय वरदान देणारी, सर्व विकार दूर करणारी देवी मानली जाते. या देवीची आराधना करुन देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा. प्रसाद आपण ही ग्रहण करावा ज्याने आरोग्यावर चांगले परिणाम होतात. माता कालरात्रीचे रुप हे रागाने ओतप्रोत असल्याचे म्हटले जाते. याच रुपामुळे कालरात्री मातेला माता शुभांकरी असेदेखील म्हटले जाते. कालरात्री आपल्या भक्तांना निडर आणि निर्भय बनवते असे म्हटले जाते.
मार्कण्डेंय पुराणानुसार, कालरात्री देवी दुर्गाच्या विनाशकारी रूपांपैकी एक आहे. कालरात्री देवी गाढवावर स्वार झालेली असते. कालरात्री मातेचा रंग हा गर्द अंधाऱ्या रात्रीसारखा आहे. या मातेचे केस लांब असतात. तसेच कालरात्री मातेला तीन डोळेसुद्धा असतात. कालरात्री जेव्हा श्वास घेते, तेव्हा तिच्या नाकपुडीतून आगीचे लोट बाहेर पडतात, असे म्हटले जाते. कालरात्री मातेला एकूण चार हात आहेत. एका हातात तलवार आहे. दोन डाव्या हातांपैकी एक हात अभयमुद्रा (संरक्षण) तर दुसरा हात वरमुद्रा (आशीर्वाद) अशा स्थितीत असतो.
कालरात्री मातेबद्दल एक अख्यायिका आहे. शुंभ आणि निशुंभ या दोन राक्षसांनी देवलोकावर हल्ला केला होता. त्यावेळी देवांनी माता पार्वतीला मदत करण्याची प्रार्थना केली. तर दुसरीकडे भय निर्माण करण्यासाठी शुंभ आणि निशुंभ या राक्षसांनी चंड आणि मुंड या दोन राक्षसांना पाठवलं. या राक्षसांचा सामना करण्यासाठी देवीने काली माता म्हणजेच कालरात्रीचे रुप घेतले. या कालरात्री मातेने नंतर चंड आणि मुंड या दोघांना मारले. याच कारणामुळे कालरात्री मातेला चामुंडा देवी असेदेखील म्हटले जाते. कालरात्री देवी शनिग्रहावर राज्य करते.

01/10/2022

दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते.
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.
काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे.
कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्‍णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.

28/09/2022

नवदुर्गेतील चंद्रघंटा देवी दुर्गा देवीचे तिसरे स्वरुप मानले जाते. नवरात्रात तिसऱ्या दिवसाच्या पूजेला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे. भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये खीर, बर्फीचा आवर्जुन वापर करावा, असे सांगितले जात आहे. याशिवाय देवीला मध अर्पण करावा, असे म्हटले जाते.

27/09/2022

दुर्गा देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. बह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिध्दी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते. ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला, तरी देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते. एकाग्रचित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात, असे सांगितले जाते.

26/09/2022

तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…
आज आश्विन शुद्ध प्रतिपदा. घटस्थापनेचा नवरात्र महोत्सवातील पहिला दिवस. या दिवशी नवरात्र महोत्सवामधील पूजनीय अशा नवदुर्गापैकी पहिल्या दुर्गादेवतेचे शैलपुत्रीचे पूजन करायचे. पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून हिचे नांव 'शैलपुत्री' पार्वती.
वृषभ (बैल) वाहन(वृषारूढाम्) असणाऱ्या दुर्गामातेच्या उजव्या हातांत त्रिशूल आहे (शूलधराम्). डाव्या हातात कमळ आहे. दुर्गामातेच्या मस्तकावर चन्द्रकोर आहे (चन्द्रार्ध - कृत - शेखराम्). माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी (वाञ्छित-लाभाय ) सदैव यशस्वी असणाऱ्या (यशस्विनीम्) या शैलपुत्रीला- प्रथम दुर्गामाता स्वरूपाला मी भक्तिभावाने प्रणाम करतो (वन्दे). योगी उपासनेचा प्रारम्भ आज आपल्या मनाला मूलाधारचक्रात स्थिर करून शैलपुत्री दुर्गामातेच्या पूजनाने करतात. आजची माळ पहिली. आज लावलेला नंदादीप अखंड ठेवायचा असतो.

24/01/2022

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,
बाल विभाग,नाशिक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने
"जनजातीय वीरांचे स्मरण"

बुधवार, 26 जानेवारी 2022, सायंकाळी 5.00 वाजता

यूट्यूब ऑनलाइन कार्यक्रम जॉईन करण्याकरिता लिंक.
https://www.youtube.com/watch?v=yoC548x96xc

कार्यक्रम बघणे चुकू नये म्हणून, आपण आत्ताच या लिंक ला क्लिक करून "रिमाइंडर ऑन" करून ठेवावे, म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आपणास नोटिफिकेशन येईल.

14/08/2021
25/01/2021

नववर्ष स्वागत समिती,नाशिक

वंद्य वंदे मातरम संयोजन समिती

सस्नेह नमस्कार,
राष्ट्रीय विकास मंडळ संचलित,नववर्ष स्वागत समिती, नाशिक, सातत्याने नानाविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते.यावेळी मात्र नेहमीपेक्षा वेगळ्या अशा "वंद्य वंदे मातरम् " या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पू्र्वसंध्येला म्हणजेच, सोमवार, दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी,रात्री.८.०० वाजता Vandya Vande Mataram या facebook Page वर live ,Vandya Vande M ataram या youtube channel वर Live , _mataram या Instagram page वर Live हा राष्ट्रभक्ती जागरण हेतू कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये राहणाऱ्या सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशातील नागरिक अपेक्षित आहेत.
या कार्यक्रमाचं वैशिष्टय म्हणजे किमान २५ हजार नाशिककर कुटुंब संपूर्ण वंदे मातरम् मुखोदगत करून,एकाच तालासुरात एकाच वेळी गातील असा भव्य सोहळा आपल्या नाशिकमध्ये प्रथमच होत आहे.
हा कार्यक्रमस नाशिकमधील सर्व मान्यवर व्यक्ती, संस्था, मंडळे, कलाकार, इत्यादींचा समावेश असेल.

09/01/2021

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग शेवटचा (२६) : हुतात्मा राजेन्द्रनाथ लाहिड़ी

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

08/01/2021

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग २५ : हुतात्मा राम प्रसाद बिस्मिल

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

07/01/2021

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग २४ : हुतात्मा अशफाकउल्ला खान

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

06/01/2021

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग २३ : हुतात्मा रोशन सिंह

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

05/01/2021

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग २२ : हुतात्मा अल्लूरी सीताराम राजू

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

04/01/2021

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग २१ : हुतात्मा मतंगिनी हझरा

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

03/01/2021

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग २० : हुतात्मा वांचिनाथन

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

02/01/2021

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग १९ : हुतात्मा कनकलता बरुआ

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

01/01/2021

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग १८ : हुतात्मा सुखदेव थापर

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

31/12/2020

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग १७ : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

30/12/2020

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग १६ : हुतात्मा भगत सिंह

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

29/12/2020

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग १५ : हुतात्मा चंद्रशेखर आझाद

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

28/12/2020

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग १४ : हुतात्मा भोगेश्वरी देवी फुकन

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

27/12/2020

#वंद्य_वंदे_मातरम्_२०२१
#हुतात्मा
भाग १३ : हुतात्मा मदनलाल धिंग्रा

#वंदेमातरम् #स्वतंत्रता #स्वतन्त्रता_सेनानी

Want your organization to be the top-listed Government Service in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

नाशिक मध्ये दहा हजार नागरिक करणार एकत्रित मातृवंदना

नाशिक मध्ये

दहा हजार नागरिक करणार एकत्रित मातृवंदना

गाणार वंदे मातरम्

सहभागी व्हा आणि देशप्रेम रुजवा

Videos (show all)

Category

Telephone

Website

Address

Dr. Moonje Marg, Rambhoomi, Bhosala Military School
Nashik
422005

Other Social Services in Nashik (show all)
Vishal Subhashrao Kadam Vishal Subhashrao Kadam
Nashik

Shiv Sena

AgraSeva Pariwar AgraSeva Pariwar
4615/1, Vrindavan Bungalow, Peth Phata Signal, Panchvati
Nashik, 422003

सुखाश्रेय वृद्धाश्रम Sukhashrey old age home  Ashwini सुखाश्रेय वृद्धाश्रम Sukhashrey old age home Ashwini
Nashik

चलते फिरते आजी बाबा. अंध अपंग बेवारस आजारी अशा सर्व वयस्कर मंडळी साठी कायम राहण्याची जेवणाची व्यवस्था

Self Development through Social Work Self Development through Social Work
Sathe Baug, Mahatma Gandhi Road
Nashik, 422001

अधिक सशक्तता,स्वतंत्रता,अभिव्यक्तीच?

Gaju ghodke samarthak Gaju ghodke samarthak
Nashik

सुवर्णकार ओबीसी समिती प्रदेशाध्यक्ष गजू घोडके

छत्रपती राजे सेना छत्रपती राजे सेना
Plot No 202, Shivkrupa Nagar, Hirawadi, Panchavati, Nashik
Nashik, 422003

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, १८ पगड ज?

Pavan Pawar Pavan Pawar
Nashik, 422101

Nashik District President At Vanchit Bahujan Aagadi

Shri Rupesh Pawar Shri Rupesh Pawar
Nashik

शेतकऱ्यांचा विकास तरुणांना रोजगार