Vishwas Thakur
I am a first generation Entrepreneur, Banker and a Social Activist working in areas like Youth Level
cuttings
Vishwas
महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बॅंक्स परिषद २०२३-२०२४ नाशिक
Maharashtra State Urban Co.Op. bank's # Sahakar parishad #2024 #
नाशिक एज्युकेशन सोसायटी, नाशिक, पेठे विद्यालयाचा 101 वा ‘नवा पेशवे वाडा दिन’ तथा ‘वर्धापनदिन’ 15 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मला निमंत्रित केले होते. पेठे विद्यालयाचा मी माजी विद्यार्थी याचा मला सार्थ अभिमान आहे. आयुष्याची जडण-घडण आणि संस्कार मला शाळेने दिले. आदर्श माणूस म्हणून जगण्याची शिकवण मला शाळेने दिली.
नव्या पिढीसमोर विचार मांडण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा.दिलीप फडके सर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा आदी मान्यवरांसमोर विचार व्यक्त करण्याचा अनुभव आनंददायी होता. शाळेच्या आठवणी यानिमित्ताने पुन्हा मनात उजळुन आल्या. यावेळी.चंद्रशेखर मोंढे- नाशिक एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष,श्री. जयदीप वैशंपायन- उपाध्यक्ष नाशिक एज्युकेशन सोसायटी,श्री. राजेंद्र निकम -सचिव नासिक एज्युकेशन सोसायटी,श्री. दिलीप अहिरे- शिक्षण मंडळ अध्यक्ष,श्री. देवदत्त जोशी -शालेय समिती अध्यक्ष पेठे विद्यालय,श्री. चंद्रशेखर वाड- माजी शालेय समिती अध्यक्ष, श्रीमती.सरोजिनी तारापूरकर -कार्यकारी मंडळ सदस्य, सौ.मैथिली गोखले- कार्यकारी सदस्य,श्रीमती. रंजना परदेशी- कार्यकारीमंडळ सदस्य, श्री. मोहन रानडे, श्री.विश्वास बोडके, श्री.विजय कोठारी,श्री. के.डी. चौधरी,श्री. शैलेश पाटोळे-सहकार्यवाह, श्री. विजय मापारी- सहकार्यवाह,श्री. उमेश कुलकर्णी -सहकार्यवाह,श्री. कैलास पाटील -मुख्याध्यापक पेठे विद्यालय, श्री. चि. म. सहारे उपमुख्याध्यापक, श्री. रवींद्र पगार- पर्यवेक्षक आदी उपस्थित होते.
आम आदमी पार्टी ,महाराष्ट्राचे संघटन मंत्री, मा.नविंदर सिंग अहलुवालिया व आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे मीडिया प्रमुख मा चंदन पवार यांची आज भेट झाली. यावेळी विविध विषयांवर छान गप्पा झाल्या.दोघांना 'नात्यांचे सर्व्हिसिंग 'हा माझा कथासंग्रह भेट दिला.
माझा 'नात्यांचे सर्व्हिसिंग ' कथासंग्रह' बुकलेट गाय 'अमृत देशमुख यांना ग्रंथ तुमच्या दारीचे शिल्पकार विनायक रानडे.यांनी भेट दिला.
पुस्तकांचे सारांश
लोकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड जागी करणारा तरुण म्हणून अमृत देशमुख आज सर्वश्रुत आहे. दर आठवड्याला विक्रमी विक्री होणारं एक पुस्तक वाचून त्याचा वीस मिनिटांचा सारांश अमृत तयार करतात. हा सारांश स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून, त्यांच्या Booklet ह्या निशुल्क app वर प्रसारित केला जातो. आज पाच लाखांहून अधिक भारतीय हे app वापरतायत.
अमृत हे चार्टर्ड अकौंटंट, सामाजिक उद्योजक, आणि TEDxह्या नामांकित व्यासपीठाचे वक्ता आहेत. आता Booklet ह्या app च्या माध्यमातून ‘Make India Read’ हे मिशन डोळ्यासमोर ठेवून देशात वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचं काम अमृत देशमुख करत आहेत. पुस्तकं वाचनाची सवय ही आपल्याला वेगळ्या पध्दतीने विचार करायला शिकवते आणि सहानुभूतीशील माणूस बनवते, असे त्यांचे मत आहे.
ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचा सहवास माझ्या यशस्वी वाटचालीसाठी कायमच मौलिक, मार्गदर्शक ठरला आहे. विश्वास को-ऑप. बँकेच्या रविवार कारंजा शाखेचे उद्घाटन मा. बाबा महाराजांच्या शुभहस्ते झाले. त्यांच्या रसाळ वाणीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले होते. तो माझ्यासाठी आनंदठेवा आहे. त्यानंतर बाबांशी माझा संपर्क कायम होता. ‘संस्कृती वैभव’ नाशिकतर्फे मला संस्कृती वैभव सन्मान प्रदान करण्यात आला. तोही बाबा महाराजांच्या हस्ते, हा माझ्यासाठी भाग्ययोग होता.
*संत तुकाराम महाराज* म्हणतात,
*देव ते संत*
*देव ते संत*
*निमित्य त्या प्रतिमा*
*मी तो सांगतसे भावे*
*असे ठावे सकला*.
गुरुवार दि.14 सप्टेंबर 2023 रोजी भारती सहकारी बँक लि., पुणे बँकेस मी व दि महाराष्ट्र राज्य अर्बन को-अॉपरेटिव्ह बँक्स् फेडरेशन चे अध्यक्ष सीए अजय ब्रह्मेचा यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी बँकेच्या सर्व शाखाधिका-यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेमध्ये बँकेचे अध्यक्ष सीए बी. बी. कड यांच्या हस्ते माझा व अजय ब्रम्हेचा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सर्जेराव पाटील व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मा. मिलिंद जोशी उपस्थित होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना सीए अजय ब्रह्मेचा यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विविध परिपत्रकांच्या व दिशानिर्देशाप्रमाणे काम करणे हे सहकारी बँकांपुढील आव्हान असल्याचे सांगितले व त्यासाठी कामकाजात ,व्यवस्थापनात बदल करण्याची गरज असल्याचे नमूद केले . मी सर्व शाखाधिकारी यांना बँकेच्या दैनंदिन कामकाजाबाबत मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी शाखेच्या व पर्यायाने बँकेच्या प्रगतीत ख-या अर्थाने योगदान देणारे घटक म्हणजे शाखाधिकारी व कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त कार्यक्षमपणे काम करुन बँकेच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा उचलावा , तसेच ग्राहकाभिमुख सेवा द्यावी, तंत्रज्ञानाचा स्वीकार करून बँक सेवेत गतिमानता आणावी. बँकेचे अधिकारी श्री. एस. आर. निंबाळकर यांनी आभार मानले.
Vishwas #2023
Empowering Communities and the Essence of Friendship
मा.श्री.योगेश शर्मा, चिफ एक्झिक्युटिव्ह-नॅफकब, नवी दिल्ली यांना दि महाराष्ट्र राज्य को-ऑप.बँक्स असो.लि., मुंबईचे शनिवार, 09 सप्टेंबर 2023 रोजीचे 25वे पारितोषिक वितरण समारंभाचे निमंत्रण देतांना असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर, मुंबई, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबईचे अध्यक्ष अजय जव्हेरीलाल ब्रह्मेचा, दि नाशिक जिल्हा अर्बन को-ऑप.बँक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष महेंद्र बोरा, उपाध्यक्ष राजेश भांडगे, संचालक डॉ. शशिताई अहिरे, राजेंद्र (नाना) सुर्यवंशी, नानासाहेब सोनवणे, रत्नाकर कदम आदी मान्यवर.
मा.श्री. सुधीर महाजन (आयएएस, सेवानिवृत्त), चिफ एक्झिक्युटिव्ह-नॅशनल को-ऑप. युनियन ऑफ इंडिया (एनसीयुआय), नवी दिल्ली यांना दि महाराष्ट्र राज्य को-ऑप.बँक्स असो.लि., मुंबईचे शनिवार, 09 सप्टेंबर 2023 रोजीचे 25वे पारितोषिक वितरण समारंभाचे निमंत्रण देतांना असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर, मुंबई, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबईचे अध्यक्ष अजय जव्हेरीलाल ब्रह्मेचा, दि नाशिक जिल्हा अर्बन को-ऑप.बँक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष महेंद्र बोरा, उपाध्यक्ष राजेश भांडगे, संचालक डॉ. शशिताई अहिरे, राजेंद्र (नाना) सुर्यवंशी, नानासाहेब सोनवणे, रत्नाकर कदम आदी मान्यवर.
कवी ना. धों. महानोर
- शोकसंदेश -
मराठी कवितेला रानाची, शेतीची अस्सल भाषा देऊन समृद्ध करणारे
ना. धों. महानोर खर्या अर्थाने रानकवी होते. मराठी भाषेचे वैभव आणि श्रीमंती त्यांनी आपल्या कविता लेखनाबरोबरच गीत लेखनातून दिली. मराठी कवितेचा संपन्न वारसा घेऊन, आपली स्वतंत्र शैली महानोरांनी निर्माण केली. सर्वसामान्य माणुस त्यांची सुख-दु:ख हा त्यांच्या लेखनाचा कायमच आस्थेचा विषय होता. त्यामुळे त्यांचे लेखन सर्वांना भिडत असे. अनेक नवीन लेखन करणार्या कवी, लेखकांना ते नेहमीच बळ देत असत.
माझ्या ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या कथासंग्रहावर अत्यंत आत्मयितेने, आपुलकीने, आस्वादक पत्र महानोर दादांनी मला लिहिले. खरंतर तो माझ्यासाठी पुरस्कारच होता. निरपेक्ष आणि नितळ प्रेम करणार्या महानोर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली...!
- विश्वास जयदेव ठाकूर
संस्थापक अध्यक्ष, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
🎙️ Dear friends, I'm thrilled to announce that Part 1 of my podcast on the Mindful Heart Talk show has just been released! 🌟📻 In this episode, I share my life's journey and experiences with you all. 🌱✨ I hope my story inspire you. Watch the video now to join me on this meaningful journey of self-discovery and growth. 🎧😊 Let's connect through this incredible platform and learn from each other's experiences. Thank you for your support! 🙏
Watch the podcast here: 📺https://youtu.be/x6JPTpCewdo
सर्वांना नमस्कार! 🙏
मी विश्वास ठाकूर. मला तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना अत्यंत आनंद होत आहे.
डॉ. आरती सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून मी आपल्या भेटीला येत आहे.
🌟
टीझर लिंक: https://youtu.be/Z6LX4K-oBm0
💫 माझी कथा तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी आणि शोमध्ये आपल्याशी मनापासून बोलण्यासाठी मी उत्सुक आहे.
📻 तेव्हा, संपर्कात राहा आणि हा भाग चुकवू नका, मी माझ्या प्रवासाबद्दल आणि अनुभवांबद्दल संवाद साधणार आहे. ह्या विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी गप्पा करण्यासाठी 🌱✨
लवकरच भेटूया माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये! 🎧 तेव्हा शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया.
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
NH3 Mumbai Agra Highway Chinchave In
Nashik, 423110
🛑OFFICIAL/ACCOUNT🛑 FOLLOW INSTAGRAM PAGE @aamhi_chinchavekar_41 ⚜️चिंचवेकरांच्या हक्काचं PAGE🔥
Nashik
viralvideo reels cooking motivation vlogs quotes shayeri trending song funny clip romantic video
422009
Nashik, 422009
Mayur Inamke share, like and support me to join you thank you contact- Mayur Inamke @themayur_143
Mahrashtra Adgaon
Nashik, 422003
😇 BØŁĐ GIRŁ🙇♀️ ❤️Sweet Vlogger🌹 👉 July Girl 😎 🚗 Long Drive LOver 🚕 🚫 @ttitude Queen 👑
Anuraj Bunglow , Kamal Nagar , Hirawadi , Panchwati , Nashik/3
Nashik, 422003
Founder - swarajya sevak foundation nashik Works at political & social worker Nashik , maharashtra