दणकेबाज

दणकेबाज

महाराष्ट्रातील तसेच देश विदेशातील बातम्यांचा अचुक ठाव
राजकीय व्यक्तीवरील विशेष ब्लॉग

30/01/2024
शिव, पानंद शेत रस्त्यांच्या प्रश्नां संदर्भात शरद पवळे यांनी अँड प्रतिक्षा काळे यांच्या मार् 18/07/2023

#शिव_पानंद शेत रस्त्यांच्या प्रश्नां संदर्भात शरद पवळे यांनी अँड प्रतिक्षा काळे यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेला यश..

#शिव_पानंद शेत रस्त्यांचा प्रश्न 60 दिवसांच्या आत निकाली काढण्याचे पारनेर तहसीलदारांना मा. उच्च न्यायालयाचे निर्देश...

अँड.प्रतिक्षा काळे उच्च न्यायालय, औरंगाबाद

👇👇👇👇👇👇👇👇

शिव, पानंद शेत रस्त्यांच्या प्रश्नां संदर्भात शरद पवळे यांनी अँड प्रतिक्षा काळे यांच्या मार् शिव, पानंद शेत रस्त्यांचा प्रश्न पिढ्यानपिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतात माल व अवजारे वाहतुकीसाठ....

20/02/2023

थॅंक्यू मिस्टर शिंदे,

इतर अनेकांप्रमाणेच मीही गावावरून नोकरीसाठी मुंबईला आलेलो. तेव्हा गावात शिवसेनेचं जवळपास कुणीच नव्हतं.मुंबईत आल्यावर शिवसेना कळायला लागली. नोकरीला लागल्यावर लोकाधिकार समितिचं काम करताना शिवसेना अंगात भिनायला लागली. बाळासाहेबांची जिथून जमेल तिथून ऐकलेल्या भाषणांनी अंगात संचारणं म्हणजे काय असतं ते जाणवायला लागलं.

अनेक तालुक्यात लोकाधिकार समितीतर्फे निरीक्षक म्हणून काम करताना गावा खेड्यातल्या शिवसैनिकांची ओळख व्हायला लागली. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले साधेभोळे, निष्ठावान शिवसैनिक. कुणालाही हेवा वाटेल असा हा ठेवा आहे.

पण काय आहे मिस्टर शिंदे,
तुमच्या सारखे लोक जेव्हा शिवसैनिकांच्या मेहनतीवर व बाळासाहेबांच्या आशिर्वादाने निवडून आले ना, सगळ्या बाजूंनी सगळं मिळाल्यानंतर चटक लागली. शिवसैनिक तसाच आहे. फाटकाच. त्याचं आम्हाला काही वाटत नाही.

आता तुम्ही जे काही केलंय ती गद्दारीच. तुम्ही पहिले नाही आणि शेवटचे ही नसणार.
पण तुम्ही जे केलंय ते आजपर्यंत कुणी नाही केलं. तुम्ही आमच्या स्वाभिमानाला धक्का पोचवलाय. आमची शिवसेना दिल्ली च्या ठगांच्या मदतीने चक्क चोरलीत.

एक लक्षात ठेवा मिस्टर शिंदे,
ज्यांना शिवसेना, ठाकरे, मातोश्री चा अडथळा वाटतो. १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन होताना मुंबई हातची गेली असा ज्यांचा समज आहे, त्यांची सोबत घेऊन शिवसेनेवर ताबा मिळवताय. नांव मिळालंय, चिन्ह ही मिळालंय. मिळाली नाही आणि मिळणार ही नाही, ती आमची निष्ठा आणि मातोश्री वर असलेली श्रध्दा. कारण प्रत्येक सच्चा शिवसैनिक मानतो की, आजही आमचं दैवत त्या वास्तूत वावरतंय.

थॅंक्यू यासाठी म्हटलं मिस्टर शिंदे, की स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर प्रश्न पडला होता काय करायचं?
तो प्रश्न सोडवलात तुम्ही. चक्क आयुष्य वाढवलंत माझं. किमान पंधरा वर्षांनी. आता लवकर मरायचं नाहीय आणि मरणारही नाही.
गद्दारांना गाडल्या शिवाय वर गेलो तर बाळासाहेब लाथ मारून खाली हाकलतील.
ऊध्दवला,आदित्य ला सांभाळा सांगितलं होतं. तू असाच वर आलास. माफ नाही करणार ना बाळासाहेब. सगळं परवडेल, पण मोठ्या साहेबांची नाराजी कशी परवडेल?

तेव्हा.....
आता फीट रहायचं आणि तुमच्यासह सा-या गद्दारांना राजकीय पटलावरून दूर करीपर्यंत उसंत नाही घ्यायची.

थॅंक्यू वन्स अगेन मिस्टर शिंदे.
भेटूच निवडणूकीच्या आखाड्यात.
आमच्याशी एकट्याने लढायची हिंमत नाहीय तुमची. दिल्ली वरून फौजा बोलवा. तीच तुमची खरी ताकद.

थॅंक्यू...
तुम्हाला जय महाराष्ट्र नाही म्हणणार. तो मान गमावलाय तुम्ही.

✍️….. एक जेष्ठ शिवसैनिक...

13/02/2023

हेरे तऱ्हा 🤣🤣💐

13/02/2023

महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालांचे कारनामे

- झारखंड सरकारने घेतलेल्या निर्णयांवर लवकर सही न करने
- भाजपचे सरकार आणण्यासाठी केंद्राला पत्र लिहिणे,झामुमो व काँग्रेसच्या आमदारांना ऑफर देण्याचे आरोप
-आदिवासी भागातील जमिनी खाण्यासाठी उपलब्ध करण्यासाठी दबाव आणणे
लई फार अपेक्षा करू नका

11/02/2023

बॉर्डर गावसकर चषक मध्ये भारताची 🇮🇳🇮🇳🇮🇳विजयी सलामी✌️✌️✌️.सगळ्याच बाबतीत भारतीय संघ सरस ठरला.बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघावर एक डाव आणी १३२ धावा राखुन दणदणीत विजय.
#अभिनंदन_टीम_इंडिया ❤️❤️

08/02/2023

एका ज्येष्ठ शिवसैनिकाचे अनावृत्त पत्र !
( २ जुलै २०२२ रोजीचे हे पत्र आहे.)

एकनाथ शिंदे सोबत जे गेले ते पुर्वाश्रमीचे ( काही दिवसांपुर्वीच ) शिवसैनिक होते.त्यात अनेकांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. एकनाथ शिंदे यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी मुळ शिवसेना सोडली असल्याने ते स्वतःला शिवसैनिक म्हणून घेऊ शकत नाहीत व बाळासाहेब व दिघे साहेबांचे तर मुळीच नाही.

मी एक ज्येष्ठ शिवसैनिक आहे, यात वाद नाही,अन्याया विरोधात मी देखील बंड केले,पण शिवसेने विरोधात वा नेतृत्वा विरोधात नाही. मी पक्षाचा विरोधक उमेदवार हा 9 निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून लादला गेला होता,त्याचा उघड विरोध करण्यासाठी ते बंड होते. मी शिवसैनिक जरूर आहे पण अंधानुकरण करणारा मुळीच नाही.सडेतोड विचार व तशी कृती मी करीत आलो आहे,जे पटत नाही त्याचा उघड उघड विरोध करणे हा माझा स्वभाव धर्म आहे. त्यामुळे अनेकांशी पंगा घेतला आहे. त्यात सत्य बाजू मांडणे हाच एकमेव उद्देश होता व यापुढे ही राहिल.

मी 49 वर्षांपासून बाळासाहेब व दिघे साहेबांना आदर्श मानणारा शिवसैनिक आहे. सद्या जे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे त्याला अनेक कंगोरे आहेत.परंतू सद्या माझे एकच धोरण आहे. काही स्वार्थांध व सत्तालोलूप तसेच अतिमहत्वाकांशी लोकांनी माझी संघटना संपवण्याचा , नामोनिशाण मिटविण्याचा विडा उचलला आहे. अशा वेळी Right or Warong,
हे न पाहता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना खंबीर समर्थन देणे हे मी माझे आद्य कर्तव्य मानतो.

मी पत्रकार असलो तरी आधी शिवसैनिक आहे.सद्याचे लेखन हे एका शिवसैनिकाच्या तीव्र भावना व्यक्त करणारे आहे.त्यात पत्रकार कमी व शिवसैनिकच जास्त आहे, हे मी विनम्रपणे मान्य करतो.त्यामुळे सद्यस्थितीतील माझे लेखन एकतर्फी आहे,हे देखील मी मान्य करतो. घराला आग लागली की ती सर्व प्रथम विझवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत नंतर ती कोणी लावली,कोणामुळे लागली,त्याची कारणं काय आहेत,त्याला जबाबदार कोण ? चुक कोण व बरोबर कोण ? हा घर वाचल्यानंतर च्या समीक्षेचा भाग आहे.

पण आपल्यावर अन्याय झाला,राक्षशी महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून बापाचं बापपण विसरून बापालाच म्हणायचं मीच तुझा बाप, या अहंकाराने वागून स्वतः चे घर बर्बाद करायला निघालेल्या लोकांना परमेश्वर देखील साथ देणार नाही. आज तुमच्या तोंडात जो सोन्याचा चमचा ज्या चाणक्याने दिला आहे, तोच चमचा तुमच्या नरडीचा घोट घेईल, तेंव्हा तुम्हाला खरा बाप व त्याची महती कळेल,पण तेंव्हा वेळ निघुन गेलेली असेल.

माझे आजचे वय 66 वर्ष आहे,मला शिवसेनेकडून काहीच अपेक्षा नव्हत्या व नसतील. शिवसेनेने माझे अनेकदा खुप नुकसान केले आहे, पण मी त्याच्या तपशीलात जाणार नाही. मला पद,तिकिट,पैसा,सत्ता काहीच नको आहे. फक्त माझी शिवसेना ही संघटना या संकटातून (जे घरभेद्यांनी निर्माण केले आहे,) त्यातून सुखरूप बाहेर पडावी,पुर्वीचे वैभव मिळून शिवसेनेची दहशत व दरारा कायम राहून भगवा व मराठी माणसांची मान ताठ रहावी,यासाठी हा आटापिटा आहे.

धन्यवाद ! जय हिंद व जय महाराष्ट्र !

उद्धव ठाकरे साहेब,
मरते दम तक आम्ही आपल्या सोबत आहोत.

दिलीप मालवणकर
ज्येष्ठ शिवसैनिक/पत्रकार
उल्हासनगर
9822902470

07/02/2023

शिवसेनेने मराठी माणूस संपवला?
मग तुमच्यासारखा एक रिक्षावाला दोन वेळेच्या खाण्याचे हाल असणारा, आज २५०० कोटींचा मालक कसा झाला?
तु आज ३ कोटींच्या गाडीतून फिरतोस ती गाडी कुठून आली?
ठाण्यासारख्या महाकाय महागड्या शहरात तुझे दोन बंगले कसे काय उभे राहिले?
हे शिवसनेमुळेच ना??

आणि त्याउलट तुम्ही ज्यांची हमाली करताय त्या कमळीचे मुंबईत तीनपैकी दोन खासदार परप्रांतीय आहेत, सोळापैकी सात आमदार परप्रांतिय आहेत.
महापालिकेत ८२ पैकी ४७ नगरसेवक परप्रांतिय उपरे आहेत. तुमच्या महाशक्तीचे आणि शिवसेनेचे मुंबईत १००% आमदार, खासदार, नगरसेवक मराठी आहेत.
मग शिवसेनेने मराठी माणूस कसा संपवला?
उलट शिवसेनेने मराठी माणसाला नेतृत्वाची संधी दिली, नाहीतर तुम्ही सध्या ज्यांची हमाली करताय त्यांनी लोढा, कोटक, शहा, कोटेचा, शर्मा, मिश्रा, शेट्टी हे सगळे उपरे मुंबईत मराठी माणसांच्या उरावर आणून बसवले. आताही मुंबईत कमळीकडे नऊ मराठी आमदार असूनही त्या परप्रांतीय लोढाला त्यांनी मंत्री केलं, मराठी आमदाराला नाही. असं का?

ह्या सर्व मुद्द्यांच उत्तर द्या.
आहे का गद्दारांना हिम्मत?

06/02/2023

नवरा जेव्हा बायकोची साडी चोरतो 🤣🤣

05/02/2023

अर्धी मुंबई अदानीकडे आहे....

1. धारावीत 300 एकर जमीन
2. मुंबई विमानतळ
3. नवी मुंबई विमानतळ
4. नवी मुंबईचे वीज वितरण
5. एअर इंडिया क्वार्टर्सची जमीन
6. एअर इंडिया हँगरची जमीन
7. विमानतळा जवळपासची वस्ती हटवणे
8. मीरा भाईंदर वीज वितरण
9. याशिवाय अदानीला मिळू शकणारे 10 प्रकल्प आहेत असे सांगितले जाते.

◆ महाविकास आघाडीच्या सरकारने या सर्व प्रकल्पांची घट्ट नाकाबंदी केली होती.. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात ‘कॉर्पोरेट घराण्यांचा’ महत्त्वाचा वाटा होता असे मी यापूर्वीही लिहिले होते.

✋ शहरे शहर, राज्यानुसार अदानी प्रकल्प उभे केले आहेत..बँकांचे पैसे आणि शेअर्सच्या किमतींचा खेळ: भविष्यात खुप मोठी किंमत मोजावी लागेल.. #कृष्णनअय्यर

05/02/2023

गद्दारी करून सत्तेत आलेल्या अनधिकृत मिंधे सरकारने ७ महिन्यात जाहिराती वरती तब्बल ४२ कोटी ४४ लक्ष खर्च केले आहेत.
#टीप:-पुरावा पहिल्या कमेंट मध्ये.

05/02/2023

मित्र जेव्हा खोटं बोलुन गाडी घेऊन जातो तेव्हा कसा पचका होतो पहा

05/02/2023

आपल्याला या पेजवर विनोदी व्हिडीओ पहायला आवडतील का?कमेंट करून सांगा हो किंवा नाही.

04/02/2023
04/02/2023

कसबा आणी चिंचवड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुलत साहेबांनी पत्र लिहिण्यास सुरुवात केली असंच दिसतंय.❤️❤️
#पत्रलेखक_चुलत_साहेब✍️✍️✍️

03/02/2023

बृहन्मुंबई महानगर पालिका शिवसेने च्या ताब्यात असल्या मुळे महानगर पालिका काय काय करू शकली.......

03/02/2023

#निक्काल
पाचपैकी केवळ एक जागा भाजपला...तोही उमेदवार शिक्षक सेनेचा म्हणजे शिवसेनेचा; शेवटच्या क्षणी आयात केलेला.
बाकी चारपैकी तांबे जातील त्यांच्यात.( शक्यता कमी आहे, ते पुन्हा स्वगृही येतील असा माझा अंदाज.)
सबब, पाटी कोरी आहे विश्वव्यापी पक्षाची.
बंडू टोळीचे चाळीस पैकी तीस- बत्तीस आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत असा या निकालाचा अर्थ काढता येतो.
महाविकास आघाडी एकजुटीने एकत्र राहिली आणि जनतेने त्यांना सोबत केली तर लोकसभेला ४० जागा मविआ जिंकू शकते आणि महाराष्ट्राला दिल्लीत गतवैभव प्राप्त करता येईल.
बाकी प्रकाश आंबेडकर स्वतःच्या फायद्यासाठी का होईना जरा सेंसिबल राजकारण करतील तो सुदिन असेल.

मराठी मिडियाला सुतक लागले आहे निकालाने.

28/01/2023

ही यांची लायकी म्हणे ३३ देशांनी यांच्या गद्दारीची दखल घेतली होती 🤣🤣🎂

19/01/2023

मिंधे गट 🤣🤣

19/01/2023

आजच्याच दिवशी २ वर्षापुर्वी गाबा वर ताबा मिळवून कांगारूचा घमंड उतरवला होता नवख्या पोरांनी 🇮🇳🇮🇳🇮🇳आणी आणी बॉर्डर गावसकर मालिका २-१ च्या फरकाने जिंकली होती.

#कसोटी_क्रिकेट_इज❤️❤️❤️

#तुटा_था_गाबा_का_घमंड.

ंत

17/01/2023

रंगभूमी वर येणारी आगामी नाटके
१) बाळासाहेबांचा एकनाथ
२) बाळासाहेबांचा देवेंद्र
३) बाळासाहेबांचा नारायण
४) बाळासाहेबांचा किरीट
५) बाळासाहेबांचा मोदी

17/01/2023

😍😍😍

16/01/2023

नेपाळ केसरी #टिल्या

05/01/2023

🚩श्री.क्षेत्र कोरठण खंडोबा वार्षिक यात्रा उत्सव पिंपळगाव रोठा ६,७,८ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे. यात्रेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी ९९२२९४२४८८ या नंबरवर whatsapp मेसेज करावा ही नम्र विनंती🙏

17/12/2022

वडील दत्ताराव गुट्टे वंजारी समाजाचे आणि आई कोल्हाटी समाजातील. आईशी लग्न करण्यापूर्वी वडिलांची २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले, परंतु झाली मुलगी...
मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांमध्ये खटके उडू लागले. तेव्हा आजोबांनी म्हणजे आईच्या वडिलांनी #मुलीला आपल्याकडे ठेवून घेतले आणि सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले आणि कागदोपत्री नाव नोंदले गेले...

सुषमा दगडू अंधारे..!

सुषमा अंधारे या एम.ए., बी.एड., एल.एल.बी.,पी.एच. डी. आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी खडी बोली सहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत.
महात्मा फुले, शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.

कबीर पंथीय सुषमा अंधारेंनी २ ऑक्टोबर, २००६ रोजी भदंत नागार्जुन सुरई ससाई यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह व ’उपरा’कार लक्ष्मण माने, एकनाथ आवाड यांच्यासह बौद्धधर्माची दीक्षा घेतली...

#शूद्र जातीत जन्माला येऊन आज जगातल्या सर्वात मोठ्या सदस्य संख्या असणाऱ्या पक्षाला जेरीस आणले म्हणून #ब्राम्हणवादी चोहू बाजूने घेरल
cp

नंदा पाटील यांच्या वॉलवरुन ....

11/12/2022

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि स्वतः, बिनलायकीचे शेकडो-हजारो कोटीत खेळणारे 'मिंधे' असतानाच, ठाकरे घराण्याच्या 'समृद्धी'विषयी, तुम्हा सार्‍यांच्या मनात एवढा 'विखार'? ...ये तो कुछ जचे ना!

बाळासाहेबांची चोवीस तास वरकरणी 'पूजा' आणि बाळासाहेबांच्या 'पुत्रपौत्रां'चा आणि 'प्रबोधनकारां'च्या दुसर्‍या-तिसऱ्या पिढीचा एवढा तिरस्कार???
..अहो, शिवछत्रपतींच्या तब्बल १३ व्या पिढीलाही, महाराष्ट्र आजही सन्मान देतोय, विसरलात?
याचाच सरळ अर्थ, तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम-आदर, ही अगदी पूर्णतया नौटंकी होय आणि ठाकरे घराण्याविषयी, आतून आजवर असलेला 'छुपा'; पण आता, संधि साधून उघड केलेला कमालीचा तिरस्कारच (भाजपाई 'असंगांशी संग' जडल्यानंतर, दुसरं काय होणार हो?) होय...
..अन्यथा, बाळासाहेबांनी शिवतीर्थावरुन 'उद्धवजी' आणि 'आदित्यजीं'ना सांभाळून घेण्याचा... म्हटला तर, 'आदेश' आणि म्हटलं तर, आर्जव... केलेलं असतानाही, असं विश्वासघातकी आक्रित, यःकिंचितही कोणी करु शकेल... करु धजावेल कधि???...
..विशेषतः, प्रबोधनकारांनी 'धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म' वगैरेंमधून व आपल्या भाषणं-व्याख्यानांमधून, ज्या सत्यकठोरतेनं वर्णवर्चस्ववादी मनुवाद्यांवर मर्माघाती प्रहार केले होते... त्यामुळेच असलेला, त्या मनुवाद्यांचा आजवरचा 'प्रबोधनकारां'वरील 'खुन्नस', मनुवाद्यांच्या १३ नव्हे; १३० पिढ्या वर गेल्या, तरी मिटणारा नाही... हे दाहक वास्तव आहे आणि त्यांच्या नादाने-साथीने 'मिंधेगटा'ने आरंभलेली ही, पाठीत खंजीर खुपसणारी, 'ठाकरे-घराणे'विरोधी निर्घृण मोहीमच होय!

तेव्हा, तमाम शिवसैनिकांनो, हृदयावर तुमच्या कोरुन ठेवा...

"सारा अंधारच प्यावा,
अशी लागावी तहान...
एका साध्या सत्यासाठी,
देता यावे पंचप्राण...!!!"
..सत्यमेव जयते!

|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||

(संयुक्त-महाराष्ट्रानंतर आता, 'स्वायत्त-महाराष्ट्र'... राष्ट्रांतर्गत राष्ट्र, 'स्वायत्त-महाराष्ट्र'... 'शिवछत्रपती-राष्ट्र'!)
..राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

10/12/2022

नविन पॅकिंग

Want your business to be the top-listed Media Company in NAVI MUMBAI?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

विनोदी भाग साडी
🤣🤣🤣
🇮🇳🇮🇳
🚩श्री.क्षेत्र कोरठण खंडोबा वार्षिक यात्रा उत्सव पिंपळगाव रोठा ६,७,८ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे. यात्रेच्या सर्व...
#गावगाडा
🤣🤣🤣
🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🚩🚩🚩

Telephone

Address

Navi Mumbai

Other Navi Mumbai media companies (show all)
Singer Bhai Achchhe Fan Pages Singer Bhai Achchhe Fan Pages
Film City Road Mumbai
Navi Mumbai, 4000065

Artist / Singer Achchhe Lal

Bazix Hacker Bazix Hacker
Maharashtra Nagar, Kurla West, Mumbai
Navi Mumbai, 400070

Martha Perez Martha Perez
Vikrant Bldg, Vikrant Circle, RB Mehta Marg, Ghatkopar East
Navi Mumbai, 400077

Gum shom Gum shom
Chandivli Vishranti Gruh, Off Saki Vihar Road, Chandivali Farm, Andheri (west)
Navi Mumbai, 400072

Big Bite Marketing Big Bite Marketing
1501
Navi Mumbai, 400706

Get your business seen, heard and felt in the webosphere

Bhumi Kumari Bhumi Kumari
Navi Mumbai

Bhumi

Geetagraphy Geetagraphy
Kamothe
Navi Mumbai, 410209

Hey, Geetagraphy is my youtube channel where I show case my life & happiness (biography) through fun

Sans&Mom Kitchen Sans&Mom Kitchen
Navi Mumbai

Hey hi, all content related to food, travel , vlogs, lifestyle and fashion.

NISHA rana ji NISHA rana ji
Navi Mumbai

instagram pe follo

Ayush Gadiya Ayush Gadiya
Opp Hanuman Mandir Ghansoli Gaon
Navi Mumbai, 400701

�CS Student� �Social Media Marketer� �Helping Others To Make Money Online�

Arif sultan Arif sultan
Thane
Navi Mumbai

FACEssss_Gaming FACEssss_Gaming
Navi Mumbai

MECHANICAL ENGINEER BY PROFESSION I GAMER BY PASSION Streaming everyday 10 pm IST