Dr. Padalkar Medical Parenting
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Padalkar Medical Parenting, Paediatrician, 6/3 Erandwane, Sneh Heritage, Pune.
जरूर ऐका, आणि समजून घ्या!
श्रेयस की प्रेयस | Shreyas ki Preyas. सुश्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे आणखीन एक अनोखा समाजिक उपक्रम म्हणजे सोबतचा व्हिडीओ. तुम्ही पहा, इतरांनाह....
उन्हाळा आलाय!
त्यात काय विशेष?नेहमीच येतो तो! बरोबर आहे. तरी उन्हाळ्याचे म्हणून काही खास आनंद असले उदा.आंबा, मोगरा, वाळा, वळीवाचा पाऊस --- ऋतू बदलताना नवे जंतू आपल्याला विशेष करून लहान मुलांना हटकून त्रास देतात.कोरोना पण त्यातलाच एक.
आता मी कोरोनाबद्दल लिहून तुम्हाला त्रास देणार नाहीये. नको एवढी माहिती नको इतकी सारखी डोळ्यासमोर नको म्हटले तरी येताच आहे. पण सध्या कोरोना मुळे बाकीच्या गोष्टी घाबरून मागे सरकून बसल्या आहेत.साध्याच पण त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींबद्दल आता सांगणार आहे.
उन्हाळ्याच्या साथीच्या आजारांपैकी गोवर, कांजिण्या, गालगुंड, विषमज्वर (टॉयफॉईड), कावीळ यांच्यावर लसींनी आपण बऱ्यापैकी मात केलीय. पण तरी सगळेच आजार लसींनी टाळता येण्यासारखे नसतात. शिवाय लसी घेतलेल्या नसतील तर या आजारांचा मोठा धोका आत्ताच आहे. या लसी सरकारच्या मोफत योजनेत मिळत नाहीत. स्वखर्चाने घ्यावा लागतात. घेतलेल्या असाव्यात. या आजारांवर उपाय आहेत पण ते टाळणं सोपं आणि स्वस्त आहे.
आजारांबद्दल नाही पण उन्हाळ्यासाठी आरोग्य संभाळण्यासाठीच्या काही टीपा इथे देते. जितकं मूल लहान तितकं ते चटकन आजारी पडतं . मग तो आजार कोणताही असो. त्याच्या शरीराची पाण्याची, कॅलरीजची गरज वाढते. नेमकी भूक कमी झाल्यानं मूल खात पीत नाही. क्वचित उलट्याही करतं. मूल खात नसेल तर त्याची पाण्याची गरज आणखी वाढते. म्हणून ही गरज प्रथम पुरवली पाहिजे. साखर मीठ युक्त पाणी आग्रहपूर्वक वारंवार पाजलं पाहिजे. त्याला शू स्वच्छ पाण्यासारखी भरपूर होणं महत्वाचं. लहान मूल स्वतः पाणी मागू शकत नाही हे लक्षात घ्यावं.आग्रहानं पुन्हा पुन्हा विचारावं.मूल
आजारी नसलं तरी,या उन्हामुळं आणखी काय काय होतं ? उन्हामुळे हवेत कोरडेपणा येतो पंख्यामुळे किंवा AC मुळे तो वाढतो. यामुळे त्वचेतून घामाच्या रूपाने पाणी वाया जाते. म्हणून त्वचा कोरडी पडते. ओठ कोरडे पडतात. त्यांना चिरा पडतात. नाक कोरडे पडते.नाकातून रक्त येतं ,शू कमी होते, शी कडक होऊ लागते, मुलं ओठावरून जिभा फिरवू.लागतात. नाकात बोटं घालू लागतात. अंग खाजवू लागतात. शी रोज, मऊ होईनाशी होते. कडक झाली तर शी करायला टाळू लागतात. पोट दुखतेची तक्रार करू लागतात या शिवाय मोठं लक्षण नाकाचा घुळणा फुटणं आणि शी तून दुखून रक्त पडणं. ही प्राथमिक लक्षणं खरं तर शरीराला पाणी कमी पडतंय हे सुचवत असतात. पण आपलं दुर्लक्ष झालं अन हे पाणी पाजून सुधारल नाहीतर पुढ दोन मोठ्या समस्या समोर येतात एक धावायला लावणारी तर दुसरी दीर्घकाळ त्रास देणारी, आजार व्यतिरिक्त सहज टाळता येणारे
हे त्रास जवळजवळ सगळ्यांनाच थोड्याफार प्रमाणात होणारे यासाठी द्रव पदार्थांचा प्रमाण वाढवलं पाहिजे. मुलांना पाणी प्यायची आठवण करत ते त्यांना हाताशी उपलब्ध करून दिलं पाहिजे. दर तासाला थोडंथोडं पाणी पीत राहिलं तर अधिक चांगलं.म्हणजे मुलं खूप तहानेनं व्याकुळ होऊन ढसाढसा एकदम खूप पाणी पिणार नाहीत. सरबतं, फळांचा रस, ताक. अशी व्हरायटी असली तर आणखीच चांगलं.
थोड्या मोठ्या मुलांना त्यांची सरबतं बनवायला शिकवलं तर पालकांचं कामही होईल आणि मुलांना नवी कौशल्यही येतील. ही एक चांगली ऍक्टिव्हिटीच होऊ शकेल. पहा करून रोज वेगळं सरबतं सर्वांसाठी बनवायचं.सर्वांना नेऊन पाजायचं. पालकांनी पण पाणी पिण्याची सवय करावी. मुलांच्या ते लक्षात येतं आणि त्यांना सुद्धा चांगली सवय लागते.
आणखी एक गोष्ट,पाणी थोडं गार असेल तर जास्त प्यालं जातं ,यावर दुमत नसावं. मोठ्यांनी थंडगार पाणी प्यायचं आणि मुलांना कोमट मचूळ पाणी द्यायचं हे ठीक नाही. त्यांना पण गार पाणी नकोका? एका तांब्याला फडकं ओलं करून लावून ठेवलं तर पाणी चांगलं गार होतं ,मुलं थोडं जास्त पितात असा अनुभव आहे. आज एवढं पुरे!
Dr Ajit Padalkar is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: Corona QA Session
Time: Oct 11, 2020 11:00 AM Mumbai, Kolkata, New Delhi
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/2899559371?pwd=eWNwNkpkeHdhYnpENGZjSDlUMXBDZz09
Meeting ID: 289 955 9371
Passcode: zU39Ak
Join our Cloud HD Video Meeting Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...
मित्र हो!
पालकांनी मुलांच्या आजारात घरच्याघरी काय करायचे आहे ते त्यांना कळावं आणि आम्हा डॉक्टरांना लॉकडाऊन च्या काळात फोनवरून सल्ला देणं सोपं आणि निर्धोक व्हावं याबद्दल मी ज्या पोस्ट्स करत असते त्या आणखी अनेक पालकांपर्यंत पोचाव्या म्हणून तुम्ही त्या माझ्या नावानं शेयर करू शकता.
आमचा करोनाचा आजार
डॉ.अजित आणि डॉ. ज्योत्स्ना पडळकर
आम्ही दोघे कोविड मधून मुक्त झाल्याचं कळल्यावर आमचे अनुभव कथन करण्याबद्दल आणि माहिती खबरदारी जाणून घेण्याबद्दल विचारणा झाली म्हणून त्यानिमित्तानं काही...
कोविड संबंधी मीडियावर सतत अपडेट्स आहेत. त्यात गंभीर आजारी झाल्याच्या, दगावल्याच्या, प्रतिष्ठितही न सुटल्याच्या तसेच आपल्या आसपासच्या माहितीतल्या व नातेवाईकांच्या या आजाराच्या बातमींमुळे सर्वदूर भीतीचे वातावरण आहे. त्यात भर घातली आहे ती वेगवेगळ्या सरकारांनी घातलेल्या निर्बंधांनी, आर्थिक चणचणनी आणि नेमके उपाय नसल्यामुळे आलेल्या असहायतेनी.
त्यातच हा आजार काही देशांनी, डॉक्टरांनी, औषधी कंपन्यांनी मुद्दामच केलाय, प्रत्यक्षात तो फार सौम्य आहे, प्रतिबंधात्मक उपाय विनाकारण किंवा हानीकारक आहेत अशा बातम्याही पसरवल्या गेल्या. वेगवेगळ्या पॅथीचे आणि त्यातही सारखे बदलणारे विचार आणखी गोंधळात भर टाकत राहिलेत.
परंतु, कुठेतरी विश्वास ठेवावा वाटतो आणि लागतोही. यावर आमचे विचार मांडतो, पटतात का पहा.
हा आजार मुद्दाम पसरवलाय का ह्याच्याशी आपला काहीही वैयक्तिक संबंध नाही. डॉक्टरांचं म्हणाल तर इतर व्यवसाय धंद्याप्रमाणे नुकसानच खूप झालंय, तसंच नेहेमीच्या औषध दुकानांचं सुद्धा!.
तेंव्हा हा विचार मनातून मनातून काढून टाका.
काही जंतुजन्य आजार वातावरणात कायमपण टिकतात उदा. टायफॉईड. काही दरवर्षी येतात पण विशिष्ट हवामानातच उदा कांजण्या, फ्लू.इ. करोना किंवा कोविड हा नवीन आजार असल्यामुळे तो कायमचा आहे का विशिष्ट हवामानापुरताच आहे हे अजून माहित नाही. तो थोड्या महिन्यांपुरताच आहे असं धरून बरेचसे निर्बंध घातले गेले. तो फार पटकन पसरतो, बऱ्याच जणांना ऍडमिट करायला लागतं, आणि काहींना बरेच दिवस ऑक्सिजन किंवा कृत्रिम श्वास यंत्रणा लागते असं माहिती झालं. ज्या देशात ह्या साधनांची कमतरता आहे त्या देशात काहींना ती जरूर असतानादेखील मिळणार नाही असं होऊ शकेल. म्हणून तो झपाट्यानं पसरू नयेअसे लॉकडाऊन सारखे निर्बंध घातले गेले.
आता असं लक्षात आलंय की, हा काही पटकन थांबणारा, संपणारा आजार नाही. निर्बंध किती दिवस घालणार? त्यामुळे जिथे जिथे प्रमाणाबाहेर पसरतोय, म्हणजे वाढवण्याचे प्रयत्न करून सुद्धा हॉस्पिटल बेड्स कमी पडतायत, तिथे तिथे १५ -१५ दिवस निर्बंध घातले जातायत.
हा आजार फ्लू पेक्षा पटकन पसरणारा आणि जास्ती दिवस हॉस्पटल बेड अडवून ठेवणारा असल्यामुळे तो दुर्लक्ष करण्याजोगा किंवा किरकोळ नक्कीच नाही. त्यामुळे तो होऊ नये म्हणून वैयक्तिक प्रयत्न केलेच पाहिजेत.
असंही लक्षात आलंय की ज्येष्ठ मंडळींना आणि ज्यांना डायबेटिस, हाय ब्लड प्रेशर, हृदय रोग असे आजार आहेत त्यांना तो तीव्र स्वरूपाचा होतो. पण असंही समजलं आहे की तो समाजात बऱ्याच जणांना होऊन गेला की त्याचा प्रसार कमी होऊन इतरांना होणार नाही. त्यामुळे आजारी ज्येष्ठांना तो होण्याचं टाळलं आणि सुदृढ मुलं आणि जवान लोकांना होऊन गेला तर ज्येष्ठांना होणारच नाही. तसंच ज्यांच्या घरी ज्येष्ठ नाहीत त्यांना, म्हणजे मुलं आणि जवान सुदृढ मंडळी, तो होऊन गेलेलाच सामाजिक दृष्ट्या चांगलं आहे.
आता तो होऊ नये म्हणून आपण काय प्रयत्न करावेत, तो सौम्य कसा ठेवावा, डॉक्टरांकडे कधी जावे, तपासणी कधी करावी आणि काय उपचार योग्य आहेत ते पाहूया.
श्वास मार्गाशी संबंधित निकटच्या सहवासानी त्याचा प्रसार होतो. किती प्रमाणात जंतू शरीरात जातात यावर त्याची तीव्रता ठरते. प्रत्यक्ष आजारी माणसाकडून जंतूंचा जास्ती डोस मिळतो, पण ती व्यक्ती आजारी पडायच्या आगोदर १-२ दिवसापासूनच त्याचा प्रसार सुरू होतो. म्हणजे आपल्या संपर्कात आलेला माणूस आत्ता आजारी नसेल तरी तो इन्क्युबेशन पिरियडमध्ये असू शकतो आणि आपल्याला जंतूंचा प्रसाद देऊ शकतो. त्यामुळे आजाराचा प्रसार पूर्णपणे थांबवता येत नाही. हे सर्वांनी लक्षात घेण्याजोगं आहे.
कोणत्याही माणसाशी आपला संपर्क कमीत कमी वेळाचा, कमी वेळा आणि सुरक्षित म्हणजे एक मीटर तरी अंतर राखून ठेवला तर जंतूंचा डोस कमी मिळेल. कायम मास्क वापरणे, तोंडाजवळ हात न नेणे, वरचेवर साबणाने हात धुणे, अनावश्यक प्रवास आणि एकत्र जमणे टाळणे, गर्दीत जाणे टाळणे, जल नेती करणे एवढ्या खबरदाऱ्या पुरेशा आहेत.
मोठयांचा कमीत कमीआणि मुलांचा थोडा वेळ एकत्र संपर्क चालू ठेवायला हरकत नाही.
मुळात आपली प्रकृती योग्य जीवन शैलींनी चांगली ठेवणं आवश्यक आहे. कोणच्याही आजारापासून प्रतिबंध होण्यासाठी. योग्य आहार आवश्यक आहे. त्यामध्ये प्रोटिन्स (दूध,अंडी,नट्स), व्हिटॅमिन्स (कच्चे पदार्थ- फ़ळं,भाज्या), लोह (पालेभाज्या, खजूर, गूळ) हे पदार्थ येतात. पण त्यासाठी आयत्या वेळी आजारी झाल्यावर तात्पुरत्या व्हिटॅमिन किंवा झिंक वगैरे घेऊन काही उपयोग नाही. कोणच्याही पॅथीत या आजारावर प्रतिबंधक औषधे नाहीत, त्यामुळे अशी कोणचीही औषधे घेऊ नयेत.
आजार सौम्य राहावा यासाठी मानसिक स्थिती चांगली लागते. त्यामुळं आपली प्रतिकार शक्ती वाढते. याउलट ताण तणाव भीती यांनी ती कमी होते आणि आजार बळावतो. ती भीती कशी कमी करता येईल?
हा आणि इतर कुठलाही आजार होऊच नये म्हणून पूर्ण खबरदारी आपण घेऊच शकत नाही. हे प्रथम मनापासून समजून घ्या. व्हॅक्सिन मुळे प्रतिबंध होऊ शकेल पण त्याकडे डोळे लावून वाट बघण्यात अर्थ नाही. शिवाय त्यामुळे सध्याचे आणि भविष्यात येणारे नवीन आजार आपण थांबवू शकणार नाही आहोत. आजार होणार आहेत ही शक्यता गृहीत धरा. मनापासून. होता होईल तेव्हढी खबरदारी घेऊच. पण त्याच्या मर्यादा लक्षात घ्या. वाहन चालवतांना ऍक्सिडेंट होईल अशी भीती आपण बाळगतो का, रस्ता ओलांडताना खबरदारी घेऊन सुद्धा ऍक्सिडेंट होतोच ना, टी बी टायफॉईड स्ट्रोक असे आजार पूर्णपणे होणारच नाहीत असे आपण म्हणू शकतो का, सैनिकी जीवन पत्करतांना मरण्याची भीती बाळगून चालेल का, त्यांना आपण सतत का घाबरत नाही? कोविड या आजारावर अनेक माध्यमांनी गोंधळात टाकणारी भरपूर माहिती दिल्यामुळे आपल्याला भीती बसली आहे. ती भीती मनातून काढून टाका.आपलं शरीर आजाराचा सामना करायला समर्थ आहे अशी खात्री बाळगा. येईल त्या संकटाला तोंड द्यायला तयार व्हा.
आपल्याला असं वाटतं की, मुलांना यातलं काही कळत नाही. त्यांच्या मनावर परिणाम होत नाही. पण गेल्या सहा महिन्यातला आमचा अनुभव सांगतो. मुलांचे एकूण आजार खूप कमी झालेत. कारण शाळा बंद, एकत्र खेळ बंद, बाहेरचं खाणं बंद, प्रवास बंद. पोहोणं बंद मुलं घरात सुरक्षित आहेत तर आजारी पडणार कशी? परंतु ज्या काही तक्रारी पालक घेऊन येतायत त्या अशा आहेत - गादीत नव्यानीच शू करायला लागलाय, तोतरे बोलतोय, झोप लागत नाहीये, नखे खातोय किंवा टोकरतोय, सारखं पोट डोके दुखण्याच्या तक्रारी करतोय वगैरे. हे काय दर्शवतात? त्यांच्या मनाची अस्वस्थता. प्रत्यक्ष आजाराची माहिती नसेल तरी आपले संवाद, ताण तणाव, भीतीयुक्त वातावरण त्याच्यापर्यंत पोचलंय. अशा तक्रारी पूर्वीपण आम्ही अनुभवल्यात. पण त्या काही ठराविक पालकांच्या बाबतीत असत. आता त्या खूप कॉमन झाल्या आहेत. त्यामुळे मुलांचीही प्रतिकार शक्ती कमी होतीय. हे असं चालणारं नाही. आपली भीती कमी करणं त्यांच्या भल्या साठीही आवश्यक आहे. त्यांच्यासमोर तरी आपल्या वागण्या बोलण्यातून "ऑल इज वेल" चे संकेत पोचतील अशी स्थिती आणणं शिकून घ्यावं लागणार आहे. ह्या आजारातून हा धडा शिकून घेऊन सार्थकी लावणं जरूर आहे. आर्थिक समस्याही समोर असणारच आहेत, कालांतरानी त्यातून मार्ग निघतीलच, पण आत्ता त्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे.
बऱ्याच जणांच्या शरीरात जंतू पोचतात पण लक्षणं काहीच नसतात. जंतूंच्या कमी डोसमुळे आणि त्यांच्या चांगल्या प्रतिकार शक्तींनी त्यांना आजार होतही नाही. किंवा तो इतका सौम्य असतो की झाल्याचं कळतही नाही. जंतू कधी शरीरात गेले ते कळत नसल्यामुळे तपासणी कधी आणि किती वेळा करणार? आपल्याला आजार होऊन गेलाय हे कळण्यासाठीची तपासणी अजून सहज उपलब्ध नाही. एखाद्याला आजार झाला असेल तर त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली तर ती पॉझिटिव्ह येऊ शकते पण त्याला आजार झाला का नाही हे कळत नाही. त्यामुळे नंतर हा आजार होण्याची शक्यता राहतेच.
थोडक्यात, निरोगी माणसाची तपासणी करून फार काही निष्पन्न होत नाही. सौम्य स्थितीतला हा आजार फक्त तापावरच्या औषधांनी बरा होतो. लवकर निदान केल्यानी किंवा कोणत्याही खास उपचारांनी तो गंभीर होण्याचं टाळता येत नाही. त्यामुळे वैयक्तिक आणि वैद्यकीय दृष्ट्या लवकर निदान करून काही उपयोग नसतो.
साधारण तापाच्या तिसऱ्या दिवशी खात्रीशीर तपासणी होऊ शकते. त्यामुळे पहिल्या २-३ दिवसानंतर इतर काही आजार नाहीत हे ठरवून मग कोविड तपासणी करायला हरकत नाही. पण ताप, अंगदुखी आणि इतर आजारांची काही विशिष्ठ लक्षणं नाहीत असं असताना तो कोविड आहे असं धरूनच तोपर्यंत इतरांशी विशेषतः ज्येष्ठांशी संपर्क टाळा. बाहेरच्या माणसांना घरात घेऊ नका. तीन दिवसांनी किती दिवस इतरांशी संपर्क टाळायचा हे ठरवण्यासाठी तपासणी करू शकता. पण स्वतःसाठीच्या उपचारासाठी त्याचा काही उपयोग नाही हे लक्षात घ्या.
आजार गंभीर स्वरूप धारण करत नाही ना हे स्वतःच मॉनिटर करा आणि रोज शक्यतो ऑन लाईन डॉक्टरांच्या संपर्कात राहा. घरी पल्स ऑक्सिमीटर ठेवा. ताप, हृदय ठोके, ऑक्सिजन पातळी, युरीन आणि श्वासाचा वेग यांचे रेकॉर्ड ठेवा आणि डॉक्टरांबरोबर शेअर करा. १००च्या वर गेलेल्या तापासाठी क्रोसीन घ्या. एव्हडं पुरेसं आहे. सौम्य आजाराला साधारण ताप गेल्यावर १२ दिवस विलग राहणं आवश्यक आहे.
आजार गंभीर झाला तर कुठे जायचं ह्याची तयारी डॉक्टरांबरोबर बोलून करून ठेवा. त्यानंतरच्या उपचार पद्धती डॉक्टर ठरवतील. तपासण्या कुठे होतात, सरकार कुठे आपल्यासाठी पैसे भरते, कुठे सवलतीच्या दारात उपचार होऊ शकतील हे वेळोवेळी ठरवायला लागेल. त्याची माहिती अनेक मार्गानी मिळू शकेल.
आम्ही आमची ती तपासणी दीनानाथ हॉस्पिटल मधून करून घेतली. होम क्वारंटाईन साठी तिथे किट्स मिळतात त्याचा वापर करून त्यांच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहता येतं. जरूर पडल्यास ते ऍडमिशन सुचवतात. त्या योजनेत आम्ही भाग घेतला होता.
आम्हाला दोघांना ३ दिवस ताप, अंगदुखी आणि दरदरून घाम येणं अशी लक्षणं होती. नेहेमीच्या हिमोग्राम, डेंगू तपासण्या नॉर्मल आल्यावर तिसऱ्या दिवशी कोविड तपासणी केली. ती पॉझिटिव्ह आली. तोपर्यंत तापही गेला. काही दिवस अशक्तपणा होता. क्रोसीन शिवाय काही औषध लागले नाही. चौदा दिवसाच्या विलगानंतर आता आम्ही पूर्ण बरे आहोत. आम्हाला डायबेटीस, हैपरटेंशन, हार्ट डिसीज असे कोणतेही आजार नाहीत. नियमित व्यायाम, सकस आहार, चांगली मनस्थिती, चांगले विचार, बरे होऊन परत लवकर कामाला लागण्याची प्रबळ इच्छा, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा यामुळे आमचा आजार सौम्य होऊन आम्ही बरे झालो अशी आमची भावना आहे.
Head Injury - what to do and what not to do
Kids frequently fall and get injured in developing age, sometimes hurting their head. This can be an emergency or sometimes create long term issues, so a bit about what to do and what not to do in case of a head injury.
First check if the child is in his/ her senses. If it is crying a lot but still is recognizing you, great! That means, it's distressed, but not unconscious. Such a child needs your support. So don’t panic and assure the child, so the child will feel better soon
Be attentive to any bump or bleeding. Press at the wound site for 5 mins to stop bleeding - this stops external bleeding. Bump signifies bleeding under the skin, not inside the skull. Pressing is more critical than applying ice either for a wound or a bump.
It is important to observe the child for any invisible internal bleeding or brain damage and to decide how urgently it has be acted upon. Bigger the bleeding earlier the appearance of symptoms and requires urgent care. Smaller bleeds will take some time to show up. Excessive sleep, headache, dizziness, vomiting show the need for medical attention. Sometimes CT scan or other such diagnostics might be needed in such cases.
As a precaution, do not give any eatables to such a child and do not administer any medication except with a doctors advice.
Pay attention to the things mentioned here. May be offering small quantity of coconut water, plain water, sherbat is okay. When the kid has recovered, has started to talk and express herself well, one can be at home and observe the child. However, if such new symptoms appear, it should immediately be taken to the hospital.
Most of the times the wounds are external and heal easily. However one has to be attentive for internal injury.
डोक्याला मार लागला-काय कराल काय नको?
मुलांची पडझड ही त्यांच्या वाढत्या वयात होणारच.अनेकदा मुलं डोक्यावर पडतात.
यामुळे तात्काळ धोका तर दीर्घकालीन काही त्रास होऊ शकतात.
म्हणून तेंव्हा काय करावं आणि काय नको याबद्दल थोडं.
पहिलं म्हणजे -मूल सावध आहे ना हे पाहावं.
ते रडत असेल पण तुम्हाला ओळखत असेल तर खूप बरं, म्हणजेच ते बेशुद्ध नाहीये. ते घाबरलेलं असतं.अशा मुलाला तुमचा आधार हवा असतो. आपण धीर द्यावा. स्वतःघाबरून जाऊ नये. त्यामुळे मूल लवकर सावरतं.
टेंगूळ किंवा रक्तस्त्राव याकडे लक्ष द्यावं. रक्तस्त्राव थांबण्यासाठी सलग ५ मिनिटे जखमेवर दाबून धरावं. त्यामुळं हा बाहेरचा रक्तस्राव थांबतो.
टेंगुळ म्हणजे त्वचेखालचा रक्तस्त्राव. जखमेवर किंवा टेंगळावर बर्फ लावण्यापेक्षा दाब देणं महत्वाचं.
या पडण्यामुळं मेंदूला इजा पोचली आहे का, आत न दिसणारा रक्तस्राव झाला आहे का आणि तसं असेल तर किती लवकर उपाय करायला हवेत हे मुलाला तपासून त्याच्यावर लक्ष ठेवून ठरणार असतं.
जितका मोठा रक्तस्राव तितकी लक्षणं लवकर दिसून येतात, तितकं लवकर उपाय करणं गरजेचं असतं. त्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं असतं.
झोप येणं, डोकं दुखणं, चक्कर येणं, उलटी होणं या गोष्टी तशी शक्यता दाखवतात. त्यासाठी डॉक्टरांच्या नजरेखाली थांबावे लागते. जरूर तर CT scan आदि तपासण्या कराव्या लागतात.
अशा मार लागलेल्या मुलाला काहीही खायला देऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध देऊ नका.
वर सांगितलेल्या गोष्टींवर लक्ष ठेवा. फार तर थोडे पाणी, नारळपाणी, सरबत अशा गोष्टी द्या.
मूल सावरलं, चांगलं बोलू लागलं, हवं-नको सांगू लागलं, तर घरी थांबून या गोष्टींवर लक्ष ठेऊ शकता. मात्र नव्याने अशी लक्षणं दिसू लागली तर हॉस्पिटलमध्ये न्यावे.
बहुतेकदा जखमा वरवरच्या असतात. त्या दुरुस्त करणं सोपंही असतं. पण आत झालेल्या इजांसाठी सजग रहाणं गरजेचं आहे.
Allergy:
Skin rashes and more.
Some children can not tolerate a contact with a particular or several substances. These substances may come in contact through skin (direct contact like a cosmetic,color,cream or insect bite), digestive tract (ingestion of new allergen from a protein, preservative chemical or color in the food ) or respiratory tract (inhalation by dust,smoke or fumes).
The child responds to it abnormally with itchy skin rashes or even large urticaria.
It is a non life threatening emergency. You can consult your doctor by sending its images or by video consultation.
If such rashes are associated with swollen lips, hoarse voice or breathing difficulty, the reaction is serious and necessitates immediate hospital visit without wasting time on homemade remedies or whatsapp consultation.
Dr Padalkar
स्किन ऍलर्जी,खाज :
काहींच्या शरीराला एखादी गोष्ट चालली नाही तर त्रास होतो. काही खाण्यातून तर काही श्वासातून, तर काही चावल्यामुळं अंगावर पित्त उठणं, मोठ्या गांधी उठणं, खाज येणं असा त्रास होऊ शकतो.
खरं तर ही एक इमर्जन्सीच, पण जीवघेणी नाही.
या साठीआपण आता डॉक्टरांना विडिओ कॉल करून, फोटो पाठवून औषध उपाय विचारू शकता.
मात्र जर या बरोबर ओठ सुजले, दम लागू लागला, आवाज घोगरा होऊ लागला तर ही रिऍक्शन जरा गंभीर आहे. यासाठी घरगुती उपाय न करता, वेळ वाया न घालवता हॉस्पिटल मध्ये जावं.
डॉ. पडळकर
Cough:
The cough that generally accompanies cold or follows it is a common complaint that our patients have. Many times, children may be able to sleep well and play normally during the day, but the cough may get aggravated with intense activity. Such a cough may not need treatment. But if the child is dull, sleepy or tired, unable to sleep well or are groaning/breathless, you need to take some action.
First, measure their respiratory rate. If the respiration rate is more than 30/minute, check the temperature. If the temperature is more than 100F, give a fever reducer. You can also do 'sponging' of the whole body with tepid water. Measure those parameters again after one hour. If the child does not look better or if the respiratory rate is still high in spite of the medicine and sponging, take them to a doctor.
Children with known childhood asthma need urgent and frequent medications. Keep inhalers, nebulizers and oral medicines prescribed to you at home all times and understand how and when to use them. In cases of knows childhood asthma, inhalers are used first, but if that fails a nebulizer is used. If your child is not well in spite of using these, take them to a hospital.
सर्दी पडशापाठोपाठ आलेला खोकला मुलापेक्षा पालकांना अधिक त्रास देतो. मूल खेळायला लागलेलं असतं, त्याला झोप सुद्धा चांगली लागू लागलेली असते, दंगा मस्ती करतांना खोकला वाढतो अशी तक्रार असते. हा खोकला काळजी करण्यासारखा नाही.
मात्र खोकल्यामुळं झोप लागत नाहीये, त्याबरोबर मूल थकलेलं दमलेलं दिसत असेल तर या खोकल्यासाठी काही प्रथमोपचार घरीच करणं गरजेचं आहे.
मुलाचा श्वासाचा वेग मोजावा. तो कण्हत असेल किंवा त्याचं पोट हबके मारत असेल तर त्याला दम लागलाय आणि याला लगेच उपचारांची गरज आहे. या मुलाचा श्वासाचा वेग मोजावा, तो वाढलेला म्हणजे मिनिटाला तीसच्या वरअसेल तर त्याला ताप आहे का हे पाहावं. ताप १०० च्या वर असेल तर तापाचं औषध देऊन आणि सर्व अंगाचं स्पंजिंग करून ताप उतरवावा. ताप उतरवल्यानंतरही मूल नॉर्मल वाटत नसेल, त्याचा दम कमी झाला नसेल तर मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं.
बाळदमा असलेल्या मुलांना वरचेवर दम आणि खोकल्याचा त्रास होतो. त्या पालकांनी दम्याची औषधं, इन्हेलरपफ, स्पेसर, नेब्युलायझर इ. घरी ठेवावीतआणि कधी कशी वापरावी ते आपल्या डॉक्टरांकडून समजावून घ्यावं.
अशा मुलाला दम लागला असता घरी इन्हेलर स्प्रे वापरून त्याचा त्रास कमी होतोय का ते पाहावं.अर्ध्या तासात बरं वाटलं नाही तर नेब्युलाइझ करून पाहावं. तरी बरं वाटत नसेल तर मात्र घरी थांबू नये. हॉस्पिटलमध्ये न्यावं.
Calculating the risk during an illness.
We are so happy to see our children mastering and enjoying new games. We hope that they would compete well with other children, be smart, brave and self reliant. But we need to take efforts to achieve this. Some children are by nature brave and dashing. But this makes them more accident prone and get into difficult situations. While some are shy and cautious. This makes them reluctant to try out things. The first variety needs pulling back while the second needs a push.
Same is true with a response to illness. Some wither in a mild illness while some are vigorous until very late. It is expected that parents differentiate this and respond differently. This is KYC - Know Your Child.
Some risk is involved in teaching new games or skills to children. Falls are expected when children learn to walk, run or climb up and down the stairs/ jungle gym. Accidents are frequent in cycling, swimming, driving scooters etc. We take due precautions and they are a must. We must be vigilant not to leave floor slippery, medicines are stacked away, small mouthable objects are not within reach and so also hazardous objects like knives. scissors, hot objects and electrical appliances. But we have to teach them to use these too.
We have to be prepared to take the same risk while looking after children in illness. All illnesses are not preventable and children develop immunity or resistance to infections only after facing or tackling them. They develop this immunity manifold if they get cured on their own, which means without an antibiotics. The symptomatic medicines like paracetamol or cold cough syrups are not actually medicines in that sense. Antibiotics are. They then fight better in future when they encounter the same or similar infection again and may not fall ill at all.
You will then feel proud for your child being tough.
In short, we need to take this calculated risk with open mind. Parents have to assess the severity of illness and its effect on the child. What are the parameters for the assessment,we have learnt in previous posts.
You know your child better.You will know it better if your child needs medical help . We are there to provide it in need.
We both together will strive to make your child to win a fight of infection and also support him with medicines and intensive care if required.
आजाराची जोखीम पत्करतांना
आपल्या मुलांनी सर्व प्रकारच्या खेळाचा आनंद घ्यावा, इतर मुलांच्या तुलनेत मागे पडू नये, ती धीट आणि स्वावलंबी बनावीत असं सर्व पालकांना वाटत असतंच. पण त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.
काही मुलं जात्याच धाडसी असतात त्यामुळं ती अवघड प्रसंग, अपघात ओढवून घेतात. त्यांना आवर घालावा लागतो. तर काही मुलं नवीन काही करायला बिचकतात. त्यांना थोडं ढकलायला लागतं. काही मुलं आजाराला हळवी असतात
तर काही मुलं आजारातही मस्ती करत राहतात.
सर्व मुलांना एकच नियम लागू होत नाही. ते जाणून पालकांचं वागणं अपेक्षित आहे. याला आम्ही "नो युअर चाईल्ड म्हणजेच के. वाय. सी." म्हणतो! म्हणजे त्याप्रमाणं जरूर तसं पूरक वागता येईल.
कोणतंही नवीन कौशल्य शिकवताना थोडा धोका किंवा जोखीम पत्करायलाच लागते. चालायला, पळायला, जिने चढ उतर करताना किंवा जंगल जिम वरती चढताना पडण्याची शक्यता गृहीत धरावी लागते. सायकल स्कूटर चालवणं, पोहणं या सर्व ठिकाणी अपघाताची शक्यता गृहीत धरावी लागते. योग्य काळजी घेऊन ते आपण करतो आणि करायलाही पाहिजे. निष्काळजी असूनही चालत नाही. मूल पाण्यावरून घसरणार नाही ना, औषधं त्याच्या हाताला लागणार नाहीत ना, घशात अडकू शकतील अशा वस्तू हाताशी नाहीत ना, गरम वस्तू - विजेची उपकरणं - टोकदार वस्तू वगैरे अशा अपघाताच्या शक्यता दूर करणं आवश्यकच आहे. कारण, त्या वस्तू वापरायलाही शिकवायला लागतात.
हाच थोडा धोका आजारांबाबत आपण घ्यायला हवा. सगळे आजार टाळता येत नाहीत आणि मूल आजारातूनच प्रतिकारशक्ती मिळवणार असतं. मूल स्वतःच्या प्रतिकारानी म्हणजे अँटीबायोटिक्स शिवाय आजारातून बरं झालं तर त्याला आणखी प्रतिकार शक्ती मिळेल. अँटीबायोटिक्स हे खरं मुख्य औषध. इतर तात्कालिक लक्षणं दूर करणारी काही खरी औषधं नव्हेत. अशी शक्ती मिळवलेलं मूल पुन्हा त्या आणि तत्सम जंतूना जास्ती जोमानी प्रतिकार करेल आणि त्याला आजार होणार नाहीत किंवा झालेच तर सौम्य होतील. मग तुम्ही म्हणाल आमचं मूल आजाराला टणक आहे.
आजारी मुलाला आजार झेपतोय का नाही यावर लक्ष ठेवत जेंव्हा तो झेपत नाहीये असं दिसेल तेंव्हाच आवश्यक ती वैद्यकीय मदत म्हणजे वरच्या पातळीतले औषधउपचार कधी ऍडमिट करूनही तत्परतेनं देण्यासाठी आम्ही डॉक्टर आहोत.
त्यासाठी आजार थोडा वाढण्याचा धोका पत्करायला लागेल. आपण तो जाणीवपूर्वक घेतलेला असेल. त्यासाठी आपलं मूल किती आजारी आहे याचा अंदाज प्रत्येक पालकाला यायला हवा. हा अंदाज बांधण्याचे निकष आपणआधीच्या काही पोस्ट्स मधून समजून घेतल्या आहेतच.
तुमच्या मुलाला तुमच्यापेक्षा कोण चांगलं ओळखू शकेल? आपण मिळून त्याला आजारातून जिंकून बाहेर यायला मदत करू, पण यासाठी तुमची साथ आवश्यक आहे.
What parameters will indicate whether the child is recovering from illness?
If you have read the previous articles/posts, you must be familiar with the fact that fever is a useful response against infection (entry of germs in the body in sufficient numbers). Please read the entire series of articles/posts to know how to manage fever at home.
As you know, once germs enter the body, they can multiply and cause infection leading to fever. Therefore as long as they are in those sufficient numbers, there will be a proportionate fever response. This fever response can vary between individuals, but if you keep a record, you will know whether your child is recovering or not. It seems an unnecessary exercise, but trust me, keeping a written record gives valuable information!
The body's own defense mechanisms are always in action, and the medicines are given to help the body do its job efficiently. When the number of germs in the body starts to reduce, the temperature starts going back to normal too.
Keep a record of temperatures of more than 100F and measure it whenever you are suspecting fever. Record the time when it was taken in that day and if any medicine was given. Do this on the following 2-3 days too. You will then know how often it rises/spikes and by how much. When both comparatively reduce over the following days, the need of fever reducing medicine is also reduced, and then one can say that the child is recovering. There are smart phone apps available which can plot a graph based on your readings, as sometimes a graph makes it easier to understand the trend. Declining trend of temperature/fever is the first indication of improvement. You will also notice that your child's activity is gradually improving, he/she is more playful, less sleepy/irritable and is eating better. These findings help assess the recovery better.
If your ill child has an older sibling, it is always a good idea to involve them in this care/process too. This will help them learn the process, boost their confidence and will promote bonding within the family.
मूल बरं होतंय कसं ओळखाल?
कोणत्याही आजारात ताप येणं म्हणजे जंतूंविरुद्ध लढाई चालू असण्याची खूण आहे. जोवर जंतूंची नवी फौज हल्ला करायला तयार होत आहे तोवर त्यांना मारण्यासाठी शरीर तापाची निर्मिती करत रहातं. त्यामुळे तापावर लक्ष ठेवलं तरआजार वाढतोय की बरा होतोय हे समजतं.
ह्यात काय विशेष सांगतायअसं वाटेल पण प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा याची व्यवस्थित ठेवलेली नोंदच आपल्याला हा पडताळा देते.
कशी ठेवायची हीनोंद आणि कसं कळतं बरं हे होणं? तापाची नोंद साधारणपणे २-२ तासांनी ठेवावी.थोड्या मोठ्या मुलांना त्यांचा ताप त्यांनाच मोजायला द्यावा.नोंद ठेवायलाही शिकवावं. हे काम ते आनंदानं करतात. त्यांनाही खूप मोठं काम करत असल्याचा 'भाव' मिळतो.जबाबदारीनं केल्याचं कौतुकही करावं. मग आपल्याला पाहायचंय की ताप किती चढतो?म्हणजे तापाची उंची. मग पाहायचंय ताप किती वेळ राहतोय (duration) आणि पुन्हा किती वेळानं पुन्हा येतोय (frequency) हे मांडत राहिलं तर आजार वाढतोय की बरा होतोय हे आपल्याला समजतं . यासाठी नोंद ठेवत रहावं.
ताप उतरवणारीऔषधं तात्पुरताच ताप उतरवत असतात.पुन्हा ताप येऊ नये असा त्याचा उपयोग नसतो.मुलांना आजारात तापाची औषधं वारंवार द्यावी लागतात. एखाद्या आजारात अशी औषधं सर्व जंतू मरेपर्यंत शरीर ताप निर्माण करत असतं.जोवर ताप येत राहतो तोवर आजार संपलेला नाही हे लक्षात घ्यावं.
कोमट पाण्यानं १५-२० मिनिटं सर्व अंग पुसून काढत राहिल्यानं मुलाचा ताप लवकर उतरतो.यासाठी गार पाणीकिंवा बर्फाचं वापरू नये,एक छोटीशी अंघोळ डोक्यावरून घातली आणि ते पाणी अंगावरच वाळू दिलं तर ताप झपाट्यानं उतरतो. औषधं कमी द्यावी लागतात. तापामुळे शरीराला येणार थकवा कमी करता येतो.
हळूहळू ताप उशिरा उशिरा येतो,कमी तीव्रतेचा,थोडाच वेळ टिकणारा,औषधाशिवाय उतरणाराअशा रीतीने नाहीसा होतो. हीझाली सुधारणेची पहिली खूण!
दरम्यान त्याचं पडून रहाणं आणि जास्त झोपणं कमी होत जातं.मूल उठून बसू लागत.त्याचं आता खेळण्यांकडे लक्ष जातं.त्यात ते रमू लागतं.त्याची भूक वाढू लागते. खाणं मागू लागतंआणि किरकीर/ रडणं कमी होऊन हसूही लागतं! मग मात्र आजार संपत आल्याची खात्रीच पटते!
A child's diet during illness:
A child's diet is an important topic for parents, more so during illness. Illness blunts a child's taste buds and also their appetite. Digestion is also sluggish. But the body needs adequate fluids and ready-made calories in the form of carbohydrates to fight with germs. Germs can get an upper hand if children are deprived of nourishment. That's why we should not compromise on it.
A meal that is non-elaborate, light for digestion, easy to swallow yet rich in calories will be ideal. Rice preparations in the form of rice-dal (tur or moong), rice kanji made with rice flour, pancake, puffed rice, sago kanji, fruits like banana, boiled potato/ aloo jira, rajgira, curds, a couple of glucose or marie biscuits (please do not give dark black,chocolate or cream ones) are some such items.
If your child is unable to take semisolids, you need to give more liquids with sugar. Lemon sarbat, buttermilk, fruit juices like sweet lemon, coconut water, even mild tea coffee are some such options. Avoid milk in diarrhoea and ready made juices may be diluted if they are high on sugar.
A child may not tolerate a bulk, so offer small quantity every 15 minutes or so. Chidren are fussy and may demand things like chocolates, pizzas, sweets like pedha or pastry. Do not fall prey. Adults and siblings in the family are also requested to not to enjoy the food stuff which will tempt the sick child and is best avoided by everybody in the family for a while.
As said before avoid red or brown coloured stuff. The reason is that vomiting being common in children, the vomitus can be confused with a bleeding inside. This will necessiate admission into a hospital and further tests.
Last but not the least, your child needs your support and confidence. Involving him in keeping records and preparing items will boost his morale and kill time in a positive manner.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune
411004
Flat No. 6, Ajay Apartment, DP Road (Sanghvi Kesari Road), Above Vividha Novelties, Near Parihar Chowk, Aundh
Pune, 411007
AV Children and Multispeciality Clinic, we focus on providing a full range of services to improve your child’s health and get him or her smiling again. We provide Quality Pediatric...
Shop No. 6, Wing A, Lower Basement, Spring Field, Opp. Reliance Smart, Kharadi B
Pune, 411014
Dr. Sachin Bhise is an accomplished clinician who makes sure every doctor visit to be a good memorab
Above Uttam Super Market, Near Monginis Cake Shop, Behind Kotak Mahindra Bank, Bhel Chowk, Pradhikaran, Nigdi
Pune, 411044
Dr. Amit Mhetre's 'O2 Speciality Clinic' is a complete family healthcare since 1985. We provide spec
1st Floor, Dhoka Heights, To, Narhe Ambegaon Road, Behind Siddhivinayak Temple, Dattanagar Chowk, Katraj
Pune, 411046
pediatrician
S. No. 16, Madhav Nagar, Opposite Tirupati Vasantam, Dhanori Lohegaon Road, Dhanori
Pune, 411015
Kait Child and Family Clinic is one stop destination for Newborn, Pediatric and Family health care services including Vaccination. It is situated on in Dhanori, on Vishrantwadi Loh...
Shree Child Care Clinic, Near Prestige Public School, Swamini Building, Near Shinde Bridge, NDA Road, Shivtirth Nagar, Shivane
Pune, 411023
Dr. Keyur Mahajan Pediatrician, Shree Child Care Clinic, Shivane, Pune Consultant Pediatrician, Mai Mangeshkar Hospital, Warje, Panel Consultant, Deenanath Mangeshkar Hospital, Pu...
303 3rd Floor Fortune Business Center, Kaspate Wasti, Wakad
Pune, 411057
Dr.Pranaami Mehta MBBS, DCH ( Paediatrician )
Padalkar Pediatric Hospital, 6/3 Erandawana
Pune, 411004
Everything about breast feeding. Everything that all parents want to know while raising their childr
Meditech Diagnostics And Polyclinic, Zinnia Elegans, Building B, Marunji Road, Wakad
Pune, 411057
Dr Jayant Khandare is a Reliable and one of the Best Paediatrician in Wakad,Hinjewadi. Dr Jayant Khandare is the Best Paediatrician,Neonatologist,Child Specialist in Wakad,Hinjewad...
Shop No. 29, Aditya Nakoda Enclave No. 1, First Floor, Opposite Rohan Kritika Apts, Sinhagad Road
Pune, 411030
Aastha Healthcare is a specialty clinic that offers comprehensive women’s and childcare services in a welcoming and comfortable setting. We’re recognized for our kind and prompt se...
Shop No. 45, First Floor, Kohinoor Grandeur, Mukai Chowk, Kiwle, Dehuroad, Pimpri Chinchwad
Pune, 412101