Foodlife with Swanand

Food life with Swanand या चॅनेल द्वारे आपण कठीण पदार्थ सुधा अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत.

चटपटीत लिंबाचं लोणचं | 11/09/2022

नमस्कार मंडळी...🙏🏻
आज आपण करणार आहोत एक चटपटीत आणि कमीतकमी वेळात होणार तरीही महिनोंमहिने खराब न होणारं लिंबाचं लोणचं..🍋
अगदी घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे..
एकदा नक्की करून बघा. 😇
व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका🤗
धन्यवाद..🙏🏻
https://youtu.be/gApdny5tS1A

चटपटीत लिंबाचं लोणचं | नमस्कार मंडळी...🙏🏻आज आपण करणार आहोत एक चटपटीत आणि कमीतकमी वेळात होणार तरीही महिनोंमहिने खराब न होणारं लिंबाचं लो.....

गोडाचे पोहे | गोकुळाष्टमी स्पेशल |श्रावण स्पेशल रेसिपीज सिरीज | Foodlife With Swanand 17/08/2022

नमस्कार! श्रावण स्पेशल रेसिपीज सिरीज मधील नविन एपिसोड तुम्हां सर्वांसाठी घेऊन आलोय. पदार्थ आहे - गोडाचे पोहे.

अश्याच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी व शिकण्यासाठी सबस्क्राइब करा Foodlife With Swanand चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा.

https://youtu.be/Ph8lz03hJ14

गोडाचे पोहे | गोकुळाष्टमी स्पेशल |श्रावण स्पेशल रेसिपीज सिरीज | Foodlife With Swanand नमस्कार! श्रावण स्पेशल रेसिपीज सिरीज मधील नविन एपिसोड तुम्हां सर्वांसाठी घेऊन आलोय. पदार्थ आहे - गोडाचे पोहे.अश्य....

13/08/2022

अगदी सोप्या पद्धतीने करा झणझणीत लाल मिरचीचा ठेचा | Foodlife With Swanand 👇

https://youtube.com/channel/UCU2z9Zju5hEX8bk67bnkEwQ

25/07/2022

नमस्कार मंडळी ! 😊
तुमच्या सगळ्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आपल्या Foodlife with Swanand या युट्यूब चॅनेल ला आज यशस्वीरित्या 1 वर्ष पूर्ण होत आहे.❤️ तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच कायम माझ्या बरोबर असेलच याची मला खात्री आहे..😊
अशाच नवनवीन रेसिपीज रेसिपी पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्या Foodlife with Swanand च्या पारंपरिक आणि आधुनिक अश्या दोन्ही रेसिपीज आपण घरच्या घरी करुन बघू शकतो..❤️

22/07/2022

Hi folks! You can follow me on all my social media handles. subscribe to my youtube channel and enjoy learning new recipes.

Youtube link: https://youtube.com/channel/UCU2z9Zju5hEX8bk67bnkEwQ

Instagram: https://instagram.com/foodlifewithswanand?igshid=YmMyMTA2M2Y=

15/07/2022

Swanand is all set to share his new and delicious recipes with all of you on his youtube channel - FOODLIFE WITH SWANAD.

https://youtube.com/channel/UCU2z9Zju5hEX8bk67bnkEwQ

Subscribe and press the bell icon.

घरच्या घरी बनवा थंडगार मँगो फ्रुटी । Homemade Mango Frooti | Chef swanand joshi | 22/05/2022

https://youtu.be/Yd5yXYAZubs
नमस्कार..🙏🏻
सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत☀️
आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला दिवसभर तहान-तहान होत राहते..
अशावेळी आपण बाहेरून वेगवेगळी पेय विकत आणतो🧃 पण मंडळी ही जर आपल्याला घरीच करता आली तर.? म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवणारे *घरच्या घरी मेंगो फ्रुटी*🍹 कशी करायची याची रेसिपी..🤗
नक्की करून बघा..
व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करुन सांगा..
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका..
धन्यवाद🙏🏻

घरच्या घरी बनवा थंडगार मँगो फ्रुटी । Homemade Mango Frooti | Chef swanand joshi | नमस्कार मंडळी सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत आणि उन्हाळा म्हटलं आपल्या सर्वानाच काहीतरी थंडगार प्यायची इच्छा...

30/04/2022

कुयरीची भाजी...( कोवळ्या फणसाची भाजी) 😋
मंडळी काय बोलायचं या भाजी बद्दल..
कुयरीची भाजी म्हणजे जणू स्वर्गच.
मुळातच कोकणी असल्यामुळे फणसाची भाजी ही अत्यंत प्रिय ❤
अनेक प्रकारे फणसाची भाजी केली जाते.. फणस कोवळा असताना साधी भाजी ,कांदा घालून केलेली भाजी, तिळकूट घालून केलेली भाजी आणि नंतर जून फणसाचे कधी उकड गरे , पापड, काप, लोणचं ,फणस पिकला की त्याची सांदणं आटवून रस असे अनेक प्रकार एका फळा पासून तयार होतात .😊😊
आणि अत्यंत चविष्ट सुरेख असे हे फणसाचे प्रकार बघून कधी एकदा झाडाला फणस येणार त्याची भाजी आणि वेगवेगळ्या पदार्थांची सुरवात होणार याकडे कोकणी माणसाची नजर लागून राहते...पौष महिना उजाडला कुयरी ची भाजी करायची असे पूर्वी म्हटले जायचे..
पण आता आपल्या चुकांमुळे झालेल्या निसर्गाच्या बदललेल्या चक्रानुसार जेव्हा मिळेल तेव्हा भाजी करणं फायद्याच.. नाही का ?
मंडळी फळ एकच पण वर सांगितल्याप्रमाणे त्याचे पदार्थ मात्र अनेक आता फणसाच आईस्क्रीम सुद्धा मिळतं फणसाचा केकही केला जातो. असे नवनवीन प्रयोग आपण करत असतो पण असे नवनवीन प्रयोग करत असताना जे जुने पदार्थ आहेत तेदेखील आपण खाल्ले पाहिजे आज-काल बऱ्याच लोकांना हे पदार्थ माहिती पण नसतात..
पण मला मी कोकणात राहत असल्याचा अभिमान वाटतो कारण असे वेगवेगळे पदार्थ लहानपणापासूनच माझ्या नशिबात आले आहेत..
तुम्हीसुद्धा करून बघा खूप सुरेख लागते...🤤♥️

08/04/2022

नमस्कार मंडळी..🙏🏻
आज तुम्हाला एक स्पेशल पदार्थ दाखवणार आहे..
मंडळी मागच्या महिन्यात काही दिवस तब्येत बरी न्हवती त्या मुळे काही पदार्थ खाणं कटाक्षाने टाळलं होत पण खादाड जीव माझा या जिवाला पथ्य वगरे पाळण थोड कठिणच..😂
पण महिनाभर अथक प्रयत्न करून पाळलेल हे पथ्य आता संपले एकदाचे..😇काहीतरी वेगळं खायला हव होतं पण बाहेरच काहीही मिळणार नाही काय हव असेल ते घरी करुन खा.. अशी सक्त ताकीद दिली गेली..😔
(तसं सध्या 2 वर्ष कोकणातल्या घरीच असल्याने बाहेरील खाणं खुपच कमी झाल कारण खेडेगाव असल्याने ईकडे तश्या सोई नाहीत फारश्या पण अधुन मधुन होत बाहेरचं खाणं)
मग काय मंडळी अख्ख स्वयंपाक घर पालथ घातलं..
बघितल तर अनेक जिन्नस थोडे थोडेच शिल्लक होते..
मग सगळा मांड मांडून बसलो आणि विचार केला काय करता येइल..
मग एका परातीत उकडलेले बटाटे सोलून किसले त्यात कांदा घातला बारीक चिरून मग मागोमाग कोथिंबीर हिरवी मिरची घातली बारीक चिरून तेव्हड्यात लक्षात आल की फ्रीज मध्ये थोडे पनीर सुद्धा आहे लगेच फ्रीज कडे कूच केली... आणि ते देखील घातल किसून मग प्रश्न पडला की यात घालायला ब्रेड चा चुरा तर नाहीच पण मी पण हार मानणार्‍यातला न्हावे..😎
लगेच फडताळात ठेवलेला पोह्यांचा डबा काढला आणि ते पण वाटून घातले..चवीनुसार मीठ घालून सगळ चांगल एकजीव केल पण तिखट थोड कमी लागत होतं हल्लीच्या मिरच्यांना तिखटपणा जरा कमीच असतो असं म्हणताच समोर मिरचीचे बी दिसले (म्हणजे chilli flakes हो आमच्या कडे त्याला आजोबा मिरचीचे बी म्हणतात)😆😆 ते घातले...
मग त्याचे लहान लहान गोळे केले आपण गुलाबजाम करतो ना अगदी तसे..
मग काढला थोडा मैदा त्यात पाणी आणि मीठ घालून छान पाताळ अशी पेस्ट तयार केली आणि हे गोळे त्यात बुडवून परत एकदा पोह्यांचा पिठात घोळवून मंद आचेवर छान तळून काढले..
काय भन्नाट लागत होते काय सांगू तुम्ही सुद्धा एकदा नक्की करुन बघा एकदा खूप सुरेख लागतात..
पण मंडळी मला याला नाव काय द्यायचं ते सुचत नाहिये..😆😂
एक छान अस नाव करा बरं कमेंट या रेसीपी साठी 🤗

07/04/2022

नमस्कार मंडळी...🙏🏻
आज बर्‍याच दिवसांनी पारंपरिक पद्धतीने सुरळीच्या वड्या केल्या..🤤
हल्ली घाई गडबडीत कायम कुकर मध्ये करायला शिकलो..पण खरं म्हणाला तर मला पारंपरिक पद्धतीने केलेल्या वड्या जास्त आवडतात..♥️
पण कामामुळे सगळ्याच गोष्टी आपण इन्स्टंट करायला बघतो..बरोबर का नाही मंडळी..?
पण शेवटी पारंपरिक ते पारंपरिक जो पदार्थ इन्स्टंट करतो त्याला पारंपारिकतेची सर नाही..😇
पीठ ताकात छान मिक्स करून त्यात बाकीचे जिन्नस घालून ते गाळून अगदी मंद आचेवर पुर्ण शिजे पर्यंत न थांबता ढवळत राहणे यात वेगळाच आनंद असतो..
स्वयंपाक करताना हा अनुभव खूप काही सांगून जातो आपल्याला
या वडीच मिश्रण जस चांगलं एकत्र होतं तसंच आपल्याला सुद्धा सगळ्या आपल्या माणसांमधे एकत्र व्हावेच लागते..
हे पीठ गाळून सगळ्या चवी बरोबर घेऊन पुढच्या प्रोसेस साठी तयार होते तसाच आपल्याला सुधा सगळ्या मागच्या गोष्टी गाळून टाकून सगळ्या चांगल्या गोष्टी बरोबर घेऊन पुढे जाण्यासाठी तयार व्हावे लागते...
जसे हळूहळू या वडीचे पीठ मंद आचेवर शिजते तसचे आयुष्यात यश मिळवण्यासाठी आपल्याला हळूहळू आणि योग्य त्या रितीने प्रयत्न करावे लागतात सहज किंवा इन्स्टंट यश कधीच मिळत नाही..
पूर्ण शिजल्यावर ही वडी ज्याप्रमाणे स्वतःला व्यवस्थित आकार घेऊन तयार होते आणि आपल्या चवीचा आस्वाद अनेकांना देऊन आनंदी करते त्याच प्रमाणे आपल्यालासुद्धा आपल्या आयुष्याला आकार देऊन आपल्या माणसांना बरोबर घेऊन पुढे जात अनेकांना आनंदी करायचं असतं..बरोबर का नाही मंडळी.?
आज वडी बद्दल लिहिताना सहजच या गोष्टी सुचल्या म्हणून सर्वांसोबत शेअर केल्या पोस्ट आवडली तर नक्की कमेंट करून मला सांगा...🙏🏻

06/04/2022

ओल्या काजूची उसळ...♥️😊
कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट करुन सांगा.?

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Pune

Other Food & Beverage in Pune (show all)
pune._.foodsters pune._.foodsters
Pune

food bloggers

Mazar Global Traders Mazar Global Traders
Pune, 411037

A PROMISE OF SEELCTIVE AROMATIC SPICES, WORLD'S FINEST OF NUTS, LIP SMACKING DRY FRUITS. SO WHY RESIST THE TEMPTATION ? AFGHANISTAN'S BEST DRY FRUITS & SPICES.

Akshyao Home Batter Akshyao Home Batter
Pune

Batter Raja

Karkhanis Foods Karkhanis Foods
Sahakarnagar
Pune, 411009

We deliver authentic Maharashtrian food items, spices & dry fruits all over India.

Ahunaa Pune Ahunaa Pune
GF-15, MARGOSA HEIGHTS, MOHAMADWADI
Pune, 411060

Nosh Biryani Nosh Biryani
Paud Road, Kothrud
Pune, 411038

House of Farsan House of Farsan
Suncity Road, Opp. Suncity Bus Stand
Pune, 411051

One stop shop for Namkeen, Fasting food, Indori namkeen and much more...

Sanjeev Foods Sanjeev Foods
Pimple Saudagar
Pune, 411027

FMCG trading Company

Swayampurna Agro Foods Swayampurna Agro Foods
AT POST MALE, PUNE KOLAD Highway TALUKA/MULASHI, DIST./PUNE
Pune, 412108

ISG Foods & Beverages ISG Foods & Beverages
411037
Pune, 411037

theplatterbyaishu theplatterbyaishu
Pune, 411037

I make food from home & make an amazing platter, atleast 9-13 food items are on the platter with 10 cuisine varieties & customisation aval. Its a small venture from home, a gift to...

AbdulKadir Halal Foods AbdulKadir Halal Foods
Pune, 411048

We are wholesale merchants/traders for halal chicken, meat and fish. Order your wholesale quantities.