Rohit Joshi

Secretory - Pharmacist/Chemists Wing -NCP Pune,
Oraganizing Secretory - CAPD This is official channel of Rohit Joshi. He is Hon.

He is working as a politician and a social worker in pharma field. Secretory of Pharmacist/Chemist Wing Pune also he is a Organising Secretary at Chemists Association Of Pune District. He has 15 years + experience in pharma industry. He is always on front foot to solve issues of chemists and pharmacists. He closely works with the chemists association at district/State level.

23/10/2023
परराज्यातून औषधे खरेदी करणाऱ्या औषध दुकानदारांच्या नियमित चौकशीचे आदेश 20/10/2023

परराज्यातून औषधे खरेदी करणाऱ्या औषध दुकानदारांच्या नियमित चौकशीचे आदेश

राष्ट्रवादी फार्मासिस्ट/केमिस्ट विभागाचे सचिव रोहित जोशी यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

http://dhunt.in/Q83KE

By महाभारत News via Dailyhunt

परराज्यातून औषधे खरेदी करणाऱ्या औषध दुकानदारांच्या नियमित चौकशीचे आदेश पुणे (योगेश काळे): गेल्या काही दिवसांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने बनावट औषधांच्या...

14/10/2023

पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्या मध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत विजयश्री संपादन केला.
भारतीय संघाचे व सर्व भारतीय नागरिकांचे हार्दिक अभिनंदन 💐 💐 💐

Photos from Rohit Joshi's post 12/10/2023

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर अध्यक्ष श्री. दीपकभाऊ मानकर आणि कार्याध्यक्ष श्री. प्रदीप दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली "केमिस्ट- फार्मसिस्ट सेल व असंघटीत कामगार विभाग, पुणे शहर अध्यक्ष श्री. विनोद रमेश काळोखे यांच्या मान्यतेने केमिस्ट- फार्मसिस्ट सेल पुणे शहराच्या
सचिवपदी - श्री. रोहित जोशी
उपाध्यक्षपदी- श्री धनाजी सुर्यवंशी
यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी श्री. दीपकभाऊ मानकर व श्री. विनोद रमेश काळोखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. आपल्या पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्र स्थानी ठेवून, पक्षाचा विस्तार आणि संघटन वाढविण्यासाठी आपण यशस्वी वाटचाल कराल व आपल्या सक्षम कृतितून जनसामान्यांच्या मनात आपल्या पक्षाची प्रतिमा अधिक उज्वल कराल, असा विश्वास अध्यक्षांनी व्यक्त केला.

12/10/2023

आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस - फार्मासिस्ट /केमिस्ट विभागाच्यावतीने माननीय श्री धर्मरावबाबा अत्राम साहेब (मंत्री,अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य) यांची सदिच्छा भेट घेतली.

शहरातील राष्ट्रवादी- फार्मासिस्ट /केमिस्ट विभागाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अत्राम साहेब यांच्याशी चर्चेदरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्यातील केमिस्ट्सच्या समस्या मांडण्यात आल्या.

औषध व्यवसायामध्ये रिटेल लेवलवर काम करताना चैन फार्मसीकडून दिला जाणारा अव्यवहार्य डिस्काउंट तसेच ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या योजना राबवणाऱ्या मेडप्लस, वेलनेस सारख्या फार्मसीजची माहिती त्यांना दिली.
ग्राहकांना फसवणाऱ्या अश्या योजनांचा प्रचार आणि प्रसार चैन फार्मसी राजरोसपणे कायद्याचे उल्लंघन करून करत आहेत, याची माहिती मंत्री महोदयांना दिली.
तसेच यावर लवकरात लवकर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी माझ्यासोबत राष्ट्रवादी फार्मासिस्ट /केमिस्ट विभाग पुणे शहर उपाध्यक्ष श्री धनाजी सूर्यवंशी, वडगाव शेरी- विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष श्री सागर दुरेकर, सिंहगड रोड अध्यक्ष श्री चेतन मराठे व इतर फार्मासिस्ट/केमिस्ट उपस्थित होते.

आपला,
रोहित जोशी,
सचिव - राष्ट्रवादी काँग्रेस फार्मासिस्ट विभाग,
पुणे

Telephone

Website

Address

Pune
411030