माझ्या स्मरणातील आठवणी
हि नाती आपली इंटरनेटवरची,
देऊया साथ आ?
ची संधी शोधत असाल तर आधी लोकांच्या समस्या शोधा, त्यातुनच नविन संधी दिसेल .
instagram पुणे जिल्हा उद्योग समूह
Join NOw Instagram
गेले ते दिवस आणि उरल्या फक्त आठवणी .👌👌
#संयम ठेवा _____ #कोण काय बोलत आहे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करा .
#आपल्याला माहिती आपण काय आहोत .
अब वो दिवाली नहीं आती जब मां घर की
सफाई में मेरी खोई हुई गेंद ढूंढ देती थी
#बाप्पा_lover
सहली साठी नाव तर आनंदाने द्यायचो पण विषय पैशाचा यायचा त्याकाळी १००/२०० रुपयांची चणचण भासायची .
गेले दिवस ते दिवस आठवणींचे व्रण ठेऊन .....
Shala
#आठवणी
"चिऊताई, चिऊताई, दार उघड !"
📖छान छान गोष्टी
इयत्ता #पहिली
खालील चित्र किती लोकांना आठवते ?
आपल्या शाळेत असताना कधी ना कधी तुम्ही लॅब मध्ये गेले असाल ? तेंव्हा हेच चित्र दिसायचे का ?
आठवड्यात कुठल्या तरी दिवशी आपल्याला तिथे नेलं जायचं टिपीकल वास .. घेत काहीना काही प्रयोग करायचो आपण .
लाईन ने ठेवलेल्या ॲसिडच्या बाटल्या / फ्लास्क / बिकर / टेस्ट टयुब अन काय काय नाव असायचे ना !
शास्त्रज्ञ झाल्याची फिलींग यायची एकदम
# माझे आणि अनेकांचे बालपण...
पुणे शहरात जन्म घेतल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझे बालपण या सुंदर शहरात गेले. याच्या असंख्य आठवणी मला आनंदी करतात.
लहान पणीच्या आठवणी प्रत्येकालाच असतात. ज्यात आपले कुटुंब, नातेवाईक, शेजारी पाजारी, घर, परिसर, शाळा, दुकाने, मंदिर अशा असंख्य आठवणींनी फेर धरलेला असतो.
आम्ही पुण्यात शिवाजी नगर गावठाणात एका चाळीत राहायचो. तिथून सर्व ठिकाणे जवळ होती. इस्त्रीचे दुकान, फुलं वाला, भाजीचे दुकान, किराणा अगदी हाकेच्या अंतरावर होते. बोळातून मुख्य जंगली महाराज रस्त्यावर आलो की रस्ता ओलांडला की आमची मॉडर्न हायस्कूल होती. वाहने अगदी कमी होती.
सकाळी साधारण सहा वाजता आम्ही उठत होतो. उठल्या उठल्या वडील बंबात पाणी भरून, कोळसे पेटवून बंब तापत ठेवत. पाण्याचे काम वेळेत उरकावे लागे. सकाळी चार तास आणि संध्याकाळी तीन तास पाणी येई. पाणी साठवून ठेवावे लागे. प्रसन्न गार सकाळ आठवते ती पाण्याची कामे उरकून पाण्याची पिपे, बादल्या, कळशा भरण्याची वडिलांची लगबग. आईची स्वयंपाकाची घाई, तो पोळ्यांच्या कणकीचा भला थोरला गोळा. एका कुंड्यात चिरून ठेवलेली भाजी. गॅसवर चढलेले वरणाच्या तूरडाळीचे भांडे. दुसऱ्या पितळीच्या पातेल्यात धुवून ठेवलेला आंबेमोहोर तांदूळ. एकीकडे वरण शिजत असे. वरण शिजवून झाले की भातेचे पातेले गॅसवर चढे. कुकर ही संकल्पना तेव्हा आमच्या घरात रुजलेली नव्हती. ताकाचा गंज, त्यात लाकडी रवी, त्यात दही ओतून ताक घुसळत वडील आईला आपल्या परीने जमेल तितकी मदत करत. आई खाली बसून पोळ्या करे. त्यासाठी स्टोव्ह साफ करून रॉकेल भरून तयार ठेवणे, बादलीत साबण चुरा टाकून पाण्यात पारोसे कपडे बुडवून ठेवणे. अशी वरकामे वडील करत. भाजी आणून देणे, काही किराणा संपला असेल तर तो आणणे अशी काही रोजची कामे आम्ही मुले करत असू. त्या वयातही रॉकेल आणून देणे, दळण आणणे, भाजी आणणे, दूध आणणे, वडिलांसाठी दर गुरुवारी आणि शनिवारी हार आणि फूल पुडी आणणे अशी सहज सोपी कामे मी करत असे.
गाद्या उचलणे, पांघरून आवरून घड्या घालून ठेवणे, बाहेरची खोली आवरणे ही कामे मुलांनी करणे गृहीत होते.. मग नऊ ते दहा अभ्यास चालायचा. साडे दहा वाजता आईची हाक यायची. आंबेमोहोर तांदुळाच्या भाताचा घमघमाट सुटला असायचा. मऊ उकळते वरण खाली ठेवलेले असायचे, पातेल्यात नुकतीच बंद करून उतरवून ठेवलेली पहिल्या वाफेची चविष्ट भाजी असायची. स्टो वर तवा गरम झालेला असायचा. पाट पाणी घेऊन झाले की तव्यावर पोळी पडायची. ताटात भाजी, चटणी, ताक घेऊन आम्ही वाट बघत असायचो. टम्म फुगलेली पोळी हातावर आपटून त्यातली वाफ काढून टाकून आई अर्धी अर्धी माझ्या आणि भावाच्या ताटात टाकत असे. आणि मग स्वर्गीय चवीचा पहिला घास तोंडात स्वाहा होई. तृप्त मनाने आणि भरलेल्या पोटाने आम्ही शाळेसाठी निघायला लागलेले असू.
लहानपणी हे माझे पुणे असे इतके सुंदर होते. माफक वर्दळ, आपुलकीचे नाते संबंध आणि आनंदी मने...
अजून अशा खूप आठवणी सांगायच्या आहेत. सांगेन हळू हळू..
फार फार सुदृढ बालपण मिळाले...
आता मात्र आठवणी खूप येतात...
संगीता दामले.
१२.९.२३.
आठवणी तील पुणे...
गोपाळकाला ची मज्जा काही वेगळीच .....
#काय बरोबर ना. ...
ज्यांच्या सोबत लहानपणी टीव्ही पाहिला त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याग करायला विसरू नका. रम्य ते बालपण
#1990 #आठवणी
#फिलिंग
आपल्या जुन्या काळातल्या शॉपींग बॅग.
🥰दमडी 🥰
जेव्हा तुमची गाडी तुमच्या जुन्या शाळे समोरून जाते.
याच्या बाटल्याच फॅन्सी यायच्या !
पण ....
आपल्या काळातील मुलांच्या पॅन्ट 👇😂
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Website
Address
411015