Nita Yadav
Among the finest General Physician Doctors in the city, Dr. Nita Yadav (Dr. Nita Yadav Clinic) in Po
*बाळ आणि आईसाठी स्तनपानाचे महत्व*
*जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो?*
डॉ. नीता संजय यादव.
(9405593596)
(लेखिका महिलांविषयक आरोग्य तज्ज्ञ असून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमही राबवत असतात.)
इंट्रो
वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन (डब्ल्यू ए बी ए) च्यावतीने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताहाच्या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जगभरातील नवीन मातांमध्ये स्तनपानाविषयी जागृती निर्माण करणे, त्याचे समर्थन करणे आणि प्रोत्साहन देणे हा ह्यामागील हेतू आहे. जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो?
जगभरात सर्वत्र स्तनपान करणाऱ्या मातांचे संरक्षण, समर्थन आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह आयोजित करून तो साजरा केला जातो.
1992 मध्ये पहिल्यांदा जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला आणि त्या काळापासून, जगभरातील संस्थांद्वारे त्यास मान्यता मिळाली. जागतिक स्तनपान सप्ताहाचा इतिहास
जेव्हा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड (युनिसेफ) यांनी स्तनपानाचे संरक्षण, प्रोत्साहन आणि समर्थन करण्यासाठी इनोसेन्टी डिक्लरेशन म्हणून ओळखले जाणारे एक निवेदन तयार केले तेव्हा स्तनपानाचे महत्त्व जागतिक स्तरावर ओळखले गेले. इनोसेन्टी डिक्लरेशन एक औपचारिक दस्तऐवज आहे आणि ते उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तयार केले गेले होते, त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेेश केला गेलेला होता.
मातांना स्तनपान चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणे
बाळासाठी अनुकूल हॉस्पिटल उपक्रम वडिलांना माता, आरोग्य सेवा कामगार आणि समुदायाला पाठिंबा देण्यासाठी मार्गदर्शन आणि शिक्षण स्तनपान करणाऱ्या मातांचे संरक्षण आणि समर्थन करण्यासाठी कायदे आणि धोरणे तयार करणे. जगभरातील स्तनपान करणाऱ्या समुदायाला एकत्र करणे, स्तनपानास सार्वजनिक समर्थन वाढवणे आणि इनोसेन्टी घोषणेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करतात. तुम्ही खालीलपैकी एक किंवा अधिक गोष्टी करू शकता.
1. आपल्या लहान मुलाला स्तनपान करा जागतिक स्तनपान आठवडा साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, अर्थातच, आपल्या लहान बाळाला स्तनपान देणे आणि त्याचे पोषण करणे! आपल्या सर्वांना माहीत आहे की आई आपल्या बाळाला पाजण्यासाठी सदैव तयार असते, त्यासाठी विशिष्ट तारखांची आणि उत्सवाची गरज नसते. जर तुम्ही सध्या बाळाला स्तनपान देत असाल तर ह्या आठवड्यात सुद्धा तुम्ही ते उत्साहाने केले पाहिजे.
2. विविध एजन्सीद्वारे प्रायोगिक कार्यक्रम, व्याख्याने किंवा वॉक
जागतिक स्तनपान सप्ताहा दरम्यान जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक संस्था वॉक, सेमिनार इत्यादी प्रायोजित करतात. त्यासाठी आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी लोगो असलेले टी शर्ट, बांगड्या याचे वाटप करतात.
3. स्तनपानाच्या सुट्टीसाठी जा. आपल्या दिनचर्येतून थोडा वेळ काढून कुटुंबासह सुट्टीवर जा. दररोजच्या कामांमध्ये आणि चिंतांमध्ये न अडकता ह्या कालावधीत तुमच्या बाळाला स्तनपान दिल्याचा आनंद घ्या, थोडा वेळ काढा आणि आराम करा, योगा, ध्यान किंवा आपल्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला नवचैतन्य देणारी कोणतीही क्रिया करा. विशेषत: या महत्त्वाच्या काळात हे अगदी गरजेचे आहे. काही वेळा काही अडचणींमुळे तुम्ही प्रवास करू शकत नसल्यास तुम्ही घरीच छोट्या सुट्टीचे नियोजन करू शकता. शेवटी, आपल्या लहान बाळासोबत आणि आपल्या पतीसोबत आराम करण्यासाठी आणि दर्जेदार वेळ घालवण्यासाठी घर हे एक परिपूर्ण ठिकाण आहे!
स्तनपान संदर्भात काही गैरसमजुती
1. उजव्या स्तनामध्ये अन्न असते आणि डाव्या स्तनामध्ये पाणी असते-
ही चुकीची समजूत आहे. बाळाला स्तनपान करताना प्रथम पाण्यासारखे द्रवपदार्थ येतात. नंतर फॅट्स असणारे दूध असते. त्यामुळे बाळाला एका वेेळी एकच ब्रेस्ट पूर्णपणे पाजणे. म्हणजे सर्व प्रकारचे पोषक घटक मिळतील आणि बाळाचे पोट भरेल. बाळाची वाढ व्यवस्थित होईल.
2. प्रसूतीनंतरचे सुरुवातीचे दूध बाळाला देऊ नये, ही कल्पना चुकीची आहे,ते आता सिद्ध झाले आहे. पहिल्या दुधाला गोल्डन मिल्क म्हणतात. इमिनोलोबिलिन जास्त असते. ते अगदी थोडेसे आले, चमचाभर मिळाले,थेंब भर मिळाले, कितीही कमी प्रमाण असू दे तरी ते पॉवरपॅकड आहे. शक्तीने पूर्णपणे भरलेले आहे. पोषण मुलांनी भरलेले परिपूर्ण असे ते आहे. कॅलरीजने पूर्ण बाळाची सुरुवातीची भूक कमीच असते.गोल्डन मिल्कचे प्रमाण कमीच असते. त्याला कोलेस्ट्रुम असेही म्हणतात. ते दूध बाळाला पुरेसे आणि पूरक आहे.
3. स्तनाचा आकार लहान असेल तर दूध कमी येईल-प्रसूतीनंतर येणाऱ्या दुधाची तीव्रता ही स्तनाच्या आकारावर अवलंबून नसते. स्तना मध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात, एडीपोज टिशू आणि सिक्रेटिव्ह टिशू. दूध बनवणारे सिक्रेटिव्ह टिशू ह्या पेशी सर्वांनाच असतात. सर्वांना फॅट कमी जास्त असते. फॅट जास्त असतील तर स्तनाची साईज जास्त असते. फॅट कमी असेल तर स्तनाची साईज कमी असते दूध बनण्याची कॅपॅसिटी फॅटवर अवलंबून नसते. सिक्रेटिव्ह टिशूवर असते.
4. दूध पिल्यावर दूध वाढते, दुधावर दूध पडते-हे संपूर्णपणे चुकीचे आहे. जेवढे बाळ स्तनपान करेल तेवढे ते जास्तीचे येईल. बाळाचे तोंड स्तनाला लागले की मेंदूकडून दूध स्त्रवण्याची आज्ञा मिळते आणि ते वात्सल्य स्त्रवते आणि पान्हा फुटतो. बाळाच्या नुसत्या आठवणीने ही अनेक वेळा दूध गळू लागते. दूध हे स्तनपान करून, ब्रेस्ट पंपने, हाताने पिळून काढू शकता. फक्त दूध पिल्याने दूध वाढत नाही.
5. पहिल्या बाळाला पाजू शकले नाही आता दुसऱ्याला पण तसेच होणार - यासंदर्भात एक्सपर्टची मदत घ्या. डॉक्टरांना भेटा पहिले वेळी काय समस्या झाली होती ज्यामुळे दूध पाजू शकला नाहीत. दुसऱ्या वेळी हा प्रॉब्लेम येईलच असे नाही आणि त्यासाठी आधीच तयारीत राहणे. समस्या येऊ नये म्हणून काळजी घेणे. समस्या आली तर काय उपाय करायचे त्याची आधीच तयारी हवी. कदाचित वेगळी अवस्था असेल पहिले वेळी. दुसरे वेळी ती समस्या असेलच असे नाही. योग्य मदतीने आणि सल्ल्याने तुम्ही योग्य ती काळजी घ्या.
6. स्तनपानाचे वेळी विशिष्ट गोष्टी खाव्यात - घरातील म्हातारी माणसे ज्येष्ठ माणसे,वयस्कर लोक फोर्स करतात हेच खा, ते खाऊ नको,असे कर,पाणी कमी पी,दूध पातळ येईल. तर नेहमी लक्षात ठेवा,आपल्या भुकेप्रमाणे कमी जास्त जसे असेल तसे खावे आणि नेहमीचे अन्न जी आपल्याला सवय आहे,आपण जे खात आलो आहे, ते नेहमीच खा. तहान लागली की पाणी प्या. घाम आला की भूक वाढेल तसे जेवण जाईल. आजारी पडू नये असा आहार घ्यावा.
7. बाळाला वीस मिनिटे स्तनावर ठेवावे लागेल-असे काही नसते स्तनावर ठेवायची वेळ आणि स्तनपानाची वेळ ह्या वेगवेगळ्या असू शकतात बाळाला पकडून ठेवले तरी सुद्धा तो पीत नसेल तर अर्धा अर्धा तास ठेवूनही काही अर्थ नाही. बाळाची भूक किती आहे,ओढण्याची ताकद किती आहे,ओढण्याची वेळ किती आहे हा वेगवेगळा असू शकतो पंधरा मिनिटांपासून 45 मिनिटापर्यंत ही वेळ असू शकते. बाळाचे मागणीनुसार स्तनपान करावे.
8. स्तनपानाचे काळामध्ये आई कोणतेही औषध घेऊ शकत नाही-
हे पण पूर्णपणे चुकीचे आहे. अशी अनेक औषधे आहेत ती आई घेऊ शकते.जी औषधे बाळ घेऊ शकते ती औषधे आई घेऊ शकते. आई आजारी असताना डॉक्टरांकडे गेली तर डॉक्टरांना सांगा, बाळ अंगावर पिते आहे. त्यानुसार डॉक्टर औषध योजना करतील विनाकारण त्रास काढायची गरज नाही. गरज असेल तिथे चालणारी औषधे घेऊ शकता, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार.
9. एक वर्षानंतर बाळाला आईच्या दुधाची गरज नसते - WHOअनुसार वयाची दोन वर्षे बाळाला आईच्या दुधाची गरज असते. वयाचे एक वर्षानंतर कदाचित बाळाची खाण्याची गरज जास्त असेल, परंतु आईच्या दुधातले घटक बाळाच्या वाढ आणि विकासासाठी आवश्यक असतात. कमीत कमी दोन वर्षे दूध पाजू शकतात.
10. आई आजारी असेल तर स्तनपान करायचे नाही - आई आजारी असताना बाहेरून जी लक्षणे दिसतात,ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी हे आधीपासूनच त्याचे व्हायरस आईच्या शरीरामध्ये काही दिवस आधी असतात. तेव्हा बाळ आईजवळ असते. त्यामुळे ते आधीच बाळ व्हायरस बॅक्टेरिया यांना एक्स्पोज झालेले असते.आजारी असतानाच स्तनपान केले जाते.
तेव्हा बाळाच्या शरीरामध्ये एंटीजन गेलेले असतात. नंतरही स्तनपान करत राहिले तर बाळाला आईच्या दुधातून अँटिबोडीज मिळतात.
स्तनपान करताना येणाऱ्या अडचणी
1. बाळ दूध पीत नाही,ओढू शकत नाही ही कॉमन समस्या-
याची काय कारणे असू शकतील? अगदी साधे कारण हे असते की, बाळाची पोझिशन नीट नसते. आईची डिलिव्हरी नुकतीच झालेली असते. बाळासोबत आईपण नव्याने जन्माला आलेली असते हे लक्षात ठेवायला हवे. बाळाला जवळ घेताना त्याचे डोके, खांदे आणि कंबर एका रेषेमध्ये असावे. स्तनपान करताना बाळाचे नाक दबू नये याची काळजी घ्यावी. स्तन पिणे, हे ओढणे, गिळणे आणि श्वसन याचे संतुलन को-ऑर्डिनेशन आहे. बाळ नीट श्वास घेऊ शकत नसेल तर,तो नीट ओढू शकत नाही म्हणून त्याचे नाक नेहमी फ्री असावे. बाळाची पोझिशन नीट नसेल तर डाव्या हाताने बाळास पकडणे,क्रॉस फील मेथड किंवा फुटबॉल होल्ड मेथड असे पकडले तर जास्त मदत होईल.
2. स्तनपान न देऊ शकण्याचे दुसरे कारण असे असू शकते की आईला चपटे निपल किंवा इन्वर्टेड खोल निपल असतात. क्रॉस्फिडल किंवा फुटबॉल होल्ड ट्राय केला असेल तरीही बाळ पीत नसेल तर कदाचित निपलशिल्डची गरज पडेल. निपल शील्ड एक प्लास्टिकचे शील्ड असते, सिलिकॉनचे असते. ठराविक टेक्निकने ते आपण वापरू शकता. तुमचे डॉक्टर तुम्हाला शिकवतील. हे एखाद्या आठवड्यापुरते वापरायचे असते.बाळाचे तोंड लागले की ते सहजपणे दूध पिऊ शकते. एक आठवड्यानंतर तुम्ही हळू हळू बाळ शील्ड शिवाय दूध पिईल हे पाहिले पाहिजे.
3. सर्वात कॉमन प्रश्न-
निपलमध्ये वेदना आहेत हे नॉर्मल आहे काय ? स्तनपान करताना कधीही वेदना, हर्ट वाटले नाही पाहिजे. जर वेेदना आहे तर नक्कीच नीट पहावेे की बाळाची पकड नीट आहे काय ? फ्लॅट निपल आहे काय?बाळाची जीभ अपुरी पडती आहे काय?ती टंग टाईज वा लीप टाईज मुळे अशी होते. त्यामुळे जीभ नीटपणे बाहेर येत नाही आणि बाळ नीटपणे स्तनपान करू शकत नाही. नीट पाहून ठरवून हे कसे नीट होईल ते पहावेे.फार तर दूध काढून टाकावे.
4. स्तनामध्ये वेदना,सूज, एंगोर्जमेंट वेगवेगळ्या अवस्थांमध्ये होते. जेव्हा दूध भरते, तेव्हा ते नॅचरली होते. प्रसुतीनंतर तीन ते पाच दिवस होते. तेव्हा दुधाचा फ्लो एकदम वाढतो. तसेच बाळ कधी नीट पिऊ शकत नाही,तेव्हा पण असे होते. बाळाच्या भुकेपेक्षा जास्त दूध येत असेल तर, तसेच बाळाचे दूध सोडवताना पण दूध साठते. दूध साठले की वेेदना होतात. आधी दूध हाताने वा ब्रेस्ट पंपने काढू शकतो.गरम पाण्याने शेकून मग ते इझिली निघेल. त्यासाठी टॉवेेल गरम पाण्यात बुडवून गरम पाण्याने शेकून घ्यावे. नंतर दूध काढून मग कोल्ड पॅक लावू शकता.गरम पाण्याने शेकून दुधाच्या वाहिन्या नलिका ग्रंथी प्रसारित पावतात मग दूध काढावे दूध काढल्यानंतर बर्फ कापडात गुंडाळून कोल्ड पॅक लावावा. त्याने सूज कमी होईल. फ्रोजन वाटाणे वा फ्रोजन कोबी पण लावू शकता. पत्ता कोबी फ्रिजमध्ये ठेवून मग ब्रा च्या आतमध्ये सूज लवकर कमी होण्यासाठी लावतात.
5. सर्व आईंना वाटते की माझ्या बाळाचे वजन कमी आहे. दुसऱ्या मुलांची अजिबात तुलना करू नका. तुलना ही जन्माचे वेळचे वजनाशी करा. पाच महिन्यात जन्मतःचे वजन असेल,त्याच्या डबल वजन व्हावेे.एक वर्षाच्या होईपर्यंत तिप्पट वजन होणार आहे आणि दोन वर्षात जन्माच्या वजनाच्या चौपट वजन होणार आहे. जन्मतः वजन कमी असेल तर कमीच वजन भरेल.कोणत्या मुलाचे वजनाची कधी तुलना करू नका. जर वजन कमी असेल तर त्याचे कारण शोधावे.े कधी बाळे आजारी असल्याने नीट पिऊ शकत नाहीत.को-ऑर्डिनेशन झाले नाही तरी पण नीट पिऊ शकत नाहीत. काहीच कारण नसेल तर बाळाला दूध आवडत नाही.24 तासांमध्ये सहा वेळा बाळाची मूत्र प्रवृत्ती झाली असेल, तर वजन वाढते आहे,तर दूध पुरेसे आहे असे समजावे. ब्रेस्ट फीडिंगचे बाळांचे दुग्धपान मोजू शकत नाही. ते युरीन आउटपुट वरून समजते.
दूध वाढण्याचा एकच उपाय, जागतिक नियम आहे. जितके आपण देतो तितके आपण मिळवतो.तसेच जितके स्तनपान कराल तितके ते वाढेल. जेवणाच्या वेेळा पाळाल,भूक लागेल तेवढे खा,दुधाचा पुरवठा वाढण्यासाठी प्रेस फीड कराव्ेो. बाळ छोटे असेल, प्री मॅच्युअर, nionetalआयसीयू मध्ये मध्ये असेल तर, जितके वेेळा बाळ पिते तितके वेेळा दूध एक्सप्रेस करा. अशावेळी दर दोन-तीन तासांनी दूध काढावे लागेल तरच ते वाढेल.
*रजोनिवृत्तीचा काळ - स्त्रियांमधील शारीरिक आणि मानसिक बदल*
*डॉ. नीता संजय यादव, सातारा*
(9405593596)
(लेखिका महिलांविषयक आरोग्य तज्ज्ञ असून महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रमही राबवत असतात.)
इंट्रो
*रजोनिवृत्ती (मेनोपॉज) म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या 45 ते 50 व्या वर्षी स्त्रीला मेनोपॉज येऊ शकतो. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते. या काळाला पेरीमेनोपॉजल पिरीयड म्हणतात. हा काळ साधारणपणे तीन ते चार वर्षांचा असू शकतो. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा आजार नाही. निसर्गचक्राचाच हा एक भाग आहे. त्यामुळे जीवनाच्या या पर्वाला सकारात्मक भावनेने स्वीकारणे आवश्यक आहे.*
रजो निवृत्तीचा काळ मेनोपॉज म्हणजे मासिक पाळीचे बंद होणे. प्रजनन कालावधी संपल्याची खूण असणारी मासिक पाळी बंद होण्याचे जस्ट आधी आणि नंतरच्या वेळेमध्ये दिसणारे बदल म्हणजेच मेनोपोज, रजोनिवृत्ती. स्त्रियांचा अंड्याचा ठराविक साठा हा जन्मतःच असतो स्त्री बीजकोषामध्ये तो साठा असतो. ही बिजांडे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हार्मोन्स स्त्रवतात. आणि ते मासिक पाळी नियंत्रित करतात व अंडी रिलीज करतात. आणि मासिक पाळी थांबली की मेनोपॉज येतो. ही वयोमानाने घडणारी 40 ते 50 वयामध्ये होणारी घटना आहे. तसेच शल्य कर्माने गर्भाशय काढताना बीजकोश काढले वा केमोथेरपी या कारणामुळे मेनोपॉज येतो. परंतु काही कारणांनी 40 वयापूर्वी मासिक पाळी गेली तर त्यास अकाली मेनोपॉज म्हणतात.
*मेनोपॉजची लक्षणे-* मेनोपॉज जवळ आला की स्त्रियांना काही अनुभव येतात. जसे की गरम वाटणे, अचानक वरचे शरीर गरम असल्याचे जाणवणे, घाम येणे. तसेच अनियमित वा न येणारी मासिक पाळी. योनीमार्गामध्ये कोरडेपणा. स्तन सुजणे, वारंवार मूत्र प्रवृत्ती निद्रा त्रास, मानसिक बदल, कोरडी त्वचा, डोळे कोरडे तोंड. थकवा डिप्रेशन धडधड डोकेदुखी सांधेदुखी स्नायू दुखी वेदना वजन वाढणे केस गळणे लैंगिक सवयी बदलणे.
*मेनोपॉजची वेेळी काय घडते-* नैसर्गिक मेनोपॉज हा औषधी व शल्य चिकित्सेने होत नाही त्याच्या तीन अवस्था आहेत.
*1.रजोनिवृत्ती पूर्व काळ-* मेनोपॉज सुरू होण्यापूर्वी हा सुरू होतो. बीजांडे हळूहळू कमी इस्ट्रोजन स्त्रवू लागतात. मेनोपॉझ यू पर्यंत ही अवस्था. बीजकोशअंडी स्त्रवायचे थांबतात. 1 ते 2 वर्षे ही अवस्था असते इस्ट्रोजन पातळी जलद रीतीने खाली येते अनेक स्त्रियांना मेनोपॉज सिंड्रोम असतो.
*2.रजो निवृत्ती काळ-* मासिक पाळी बंद होऊन एक वर्ष होऊन गेलेले असते. अंडी रिलीज करायचे व इस्ट्रोजेन स्त्रावचे बीज कोशाने थांबवलेले असते. एक वर्ष मासिक पाळी आलेली नसते.
*3. रजो निवृत्ती पश्चात काळ-* मेनोपॉझ नंतरची वर्षे गरम वाटण्याची लक्षणे थांबलेली असतात परंतु इस्ट्रोजन कमी झाल्याने म्हातारपण येते.
*4. हार्मोन्सचे असंतुलन-* रजोनिवृत्तीमध्ये हार्मोन्स कमी होतात. त्यामुळे चेहऱ्यावर लव येणं, त्वचेची कांती कमी होणे, तिला सुरकुत्या पडणे, केस पातळ होणे, वजन वाढणे या गोष्टी होतात.
*5. संधिवात वा सांधेदुखी -* गुडघ्यामध्ये, घोट्यांमध्ये टाचांमध्ये दुखणी सुरू होतात. या सर्व गोष्टी हाडांची झीज होऊ लागते. कंबरदुखी, पाठदुखी लागते. मानेच्या स्पॉन्डेलायटीसची सुरुवात होते. त्यामुळे चक्कर येणे, मान दुखणे, हाताला मुंग्या येणे इत्यादी त्रास सुरू होतात.
*मेनोपॉजची लक्षणे -* मासिक पाळीच्या चक्रात बदल होणे. हा बदल विविध स्त्रियांमध्ये विविध प्रकारे दिसून येतो. पाळी महिन्याच्या महिन्याला येते. मात्र रक्तस्त्राव कमी होतो किंवा खूप रक्तस्त्राव होत राहतो आणि काही महिन्यांनी पाळी यायची थांबते.
*जननेंद्रियावरील परिणाम*
-गर्भाशयाच्या तोंडाचा आकार लहान होऊन ते आत सरकते.
-योनीमार्गाचा आकार लहान होतो.
-गर्भाशयाला आधार देणारे स्नायू अशक्त होऊन ते सैल होतात व गर्भपिशवी खाली उतरते.
-गर्भपिशवी आकाराने कमी होते.
-अंडाशय लहान होते. त्यामुळे त्यातून स्त्रवणारी, स्त्रीत्व देणारी इस्ट्रोजन व प्रोजेस्ट्रॉन नामक हार्मोन्स कमी होतात. त्याचे परिणाम स्त्रीच्या संपूर्ण शरीरावर दिसू लागतात.
-गर्भपिशवी खाली आल्याने मूत्रमार्गावरील नियंत्रण कमी होते. त्यामुळे जोरात खोकल्यावर वा शिंक आल्यावर आपोआप लघवी बाहेर पडते.
-लघवीवर ताबा राहत नाही. त्यामुळे पहिल्यापेक्षा वरचेवर लघवीला जावे लागते.
-लघवीला जळजळ होऊ लागते. (कारण इस्ट्रोजन हार्मोन्सची कमतरता) या गोष्टींची लाज वाटून आत्मविश्वास डळमळतो. अनेकदा लोकसंपर्क टाळून एकटे राहण्याकडे अशा महिलांचा कल असतो.
*अकाली रजो निवृत्ती येण्याची कारणे-* प्रतिकार संस्थेच्या तक्रारी जीन्स वा काही मेडिकल कारणांमुळे रजो निवृत्ती लवकर येऊ शकते. प्री मॅच्युअर ओव्हेरियन इन्सफिशियंसी वा प्रि मॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर-बीजकोश खूप लवकर अंडी सोडायची थांबतात काही अज्ञात कारणांमुळे चाळीशीच्या आधीच इस्ट्रोजन प्रोजेस्टोन लेवल बदलतात त्या स्त्री मॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणतात हे प्री मॅच्युअर मेनोपॉजसारखे कायमस्वरूपी नसते.
*मानसिक आरोग्य-* औदासिन्य, चिडचिडेपणा, सहनशीलता कमी होणे, अंग एकदम गरम वाटायला लागते. घाम सुटणे, अंग एकदम थंड पडणे, गरम थंड हवा सहन न होणे, डोकेदुखी जाणवत राहणे, छातीत धडधड, झोप न लागणे, असे बदल स्वभावात होऊ लागतात. पाळी न आल्यामुळे गरोदर राहण्याची सुप्त भीतीही मनात राहते.
*इंडुसड मेनापॉज-* जेव्हा डॉक्टर मेडिकल कारणांमुळे बीजकोश ओवरीज काढून टाकतात, जसे की गर्भपिशवीचा कॅन्सर इंडोमेट्रीअसिस तसेच रेडिएशन, केमोथेरपी, यामध्ये बिजकोशांना नुकसान पोहोचते.
*मेनोपॉजच्या लक्षणांचा कालावधी-* मेनोपॉजची लक्षणे साधारणतः चार वर्षे राहतात प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळे असते.
*कसा ओळखावा मेनापॉज? -* तुम्हास मेनपोज होतोय असे वाटले तर डॉक्टर तुमच्या लक्षणांवरून ठरवतील. मासिक पाळीच्या नोंदी ठेवा त्यावरून डॉक्टरांना समजेल. डॉक्टर तुमच्या रक्ताच्या तपासण्यांवरून ठरवू शकतात.
*फॉलिकल स्टीमुलेटिंग हार्मोन-* हे मेनोपॉज जवळ आले की वाढते. ओवरीज किती इस्ट्रोजन बनवतात ते समजते. मेनापोज मध्ये ही पातळी कमी होते. यावरून थायरॉईडच्या समस्या समजतात. त्या तुमच्या मासिक पाळीवर परिणाम करतात आणि मेनापॉजची लक्षणे येतात.
*मेनोपॉज उपचार-* मेनोपॉज ही एक नैसर्गिक क्रिया आहे काही कालावधीनंतर ही लक्षणे निघून जातात परंतु जर समस्या निर्माण होत असतील तर उपचारांमुळे बरे वाटते.
*मेनोपॉजवरील काही उपचार असे-*
*1. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी -* हर्टमेनोपोजल हार्मोन थेरेपी असेही म्हणतात याला शरीराकडून तयार न होणारे हार्मोन्स तोंडावाटे घ्यायची काही औषधांमुळे तुमचे हॉट फ्लॅश, योनीगत लक्षणे तसेच हाडे मजबूत करण्यास मदत होते. परंतु त्याने हृदयविकार, ब्रेस्ट कॅन्सर अशा पण समस्या उद्भवू शकतात म्हणून छोटा डोस कमी कालावधीसाठी घेऊ शकता.
*2. स्थानिक हार्मोन थेरपी-* योनी भागाच्या सक्षमपणासाठी इस्ट्रोजन क्रीम व जेल लावायचे.
*3. नॉन हार्मोनल मेडिकेशन्स-* डिप्रेशनचे औषध हॉट फ्लॅशला उपयुक्त. ड्रग गाबा पेंटिंन, रक्तदाबाचे ड्रग, तसेच हॉट फ्लॅशेश व योनीगत ड्रायनेससाठी इस्ट्रोजन रिसेप्टर मॉड्युलिटर्स उपयुक्त.
*4. अस्थि सुरक्षितेेसाठी औषधी चिकित्सा-* काही औषधे वा विटामिन डी घेऊ शकता जेणेकरून हाडे सशक्त होतील.
*5. जीवनशैलीतील बदल -* जीवनशैलीतील बदल मेनोपॉजच्या लक्षणांवर मात करण्यास मदत करतात. हॉट फ्लॅश साठी थंड पाणी, फॅन पुढे बसणे, झोपणे, डबल कपडे घालणे. वजाईनल ड्रायनेससाठी मॉइश्चरायझर वा लुब्रिकेट वापरा. चांगली झोप येण्यासाठी दररोज व्यायाम करा व हृदयविकार, मधुमेह व ऑस्टिवोपोरोसिस टाळा. मूत्राशय गळतीसाठी किगेलचे व्यायाम करा. त्याने ओटीपोटाचे स्नायू सशक्त बनतील. स्मरणशक्ती समस्यांसाठी सामाजिक व मानसिकरित्या सक्रिय रहा. धूम्रपान करू नका. तंबाखूने मेनोपॉज आणि हॉट फ्लॅश लवकर येतात. अल्कोहोल पिण्याची मर्यादा कमी करा. ब्रेस्ट कॅन्सरचा चान्स कमी होणे आणि छान झोप लागणे यासाठी. हॉट फ्लशेस ला उपयोगी होण्यासाठी अन्नसेवनामध्ये विविधता ठेवा, योगा, दीर्घ श्वास, मसाज ही रिलॅक्सेशन तंत्रे वापरा.
*मेनोपॉजच्या इतर उपचार पद्धती-* असे लक्षात आले आहे की सोयाची उत्पादने, हॉट फ्लशेससाठी उपयुक्त आहेत. परंतु अजून त्यावर अभ्यास सुरू आहे डॉक्टरांशी सल्ला मसलत करूनच ठरवा. योगा, ॲक्युप्रेशर हे मेनापॉजच्या लक्षणासाठी सुरक्षित उपचार आहेत. हाडांचा ठिसूळपणा, हृदयविकार, लघवी व शौचाच्या तक्रारी, अलझायमरचा धोका, खूप सुरकुत्या, स्नायूंची ताकद व टोन कमी होणे, दृष्टी कमी होणे, जसे की मोतीबिंदू, मॅक्युलर डीजनरेशन, योनी मार्गात रुक्षता, कामेच्छा कमी होणे, वेेदनादायी नसेल तर नियमित सेक्सुअल ॲॅक्टिव्हिटी सुरू ठेवल्यास रक्त पुरवठा वाढून योनी मार्ग हेल्दी राहील. मेनपॉज झाल्यावर दोन्ही अंडाशय अंडी तयार करत नाहीत. त्यामुळे गर्भधारणा होत नाही परंतु सुरक्षित सेक्स प्रॅक्टिसमुळे इतर सेक्सुअली ट्रान्समिटेड आजार होत नाहीत.
https://chat.whatsapp.com/Ixvdsp4SROh92LiS6WlJzV
*सोपे पंचकर्म घरच्या घरी*
घरच्या घरी पंचकर्म कार्यशाळा:
"पंच" म्हणजे 5 आणि "कर्म" म्हणजे कार्यपद्धती. आयुर्वेदिक पंचकर्म या 5 प्रक्रिया आहेत ज्याद्वारे आपण आपले शरीर, मन आणि आत्मा शुद्ध आणि कायाकल्प करू शकतो. ते आहेत - वामन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण
या कार्यशाळेत आपण प्राचीन उपचार पद्धती पार पाडण्याची तपशीलवार पद्धत देखील शिकाल जसे की -
पादाभ्यंग,पत्र पिंडा स्वेदन, योनी धूपन, नेत्र तर्पण, जानू बस्ती, शिरोधारा, लेपन, चिकित्सा , गर्भसंस्कार, दिनचर्या इ.
या आयुर्वेदिक प्रक्रियेमुळे डिटॉक्सिफिकेशन, शरीराच्या अवयवांमधील वेदना बरे करणे, आपले - रक्त, त्वचा, उती आणि आपल्या शरीराचे प्रमुख अवयव आणि प्रणालींना पोषण मिळण्यास मदत होते. ते करू शकतात:
1. रोगग्रस्त व्यक्तीला लवकर बरे होण्यास मदत करते.
2. निरोगी व्यक्तीला आयुष्यभर चांगले आरोग्य राखण्यासाठी मदत करते !
या कार्यशाळेचा दिवसनिहाय तपशील👇🏻
दिवस 1 - 2
पंचकर्म, पूर्वकर्म आणि पश्चात कर्म यांचा परिचय
आयुर्वेदानुसार तुम्ही "निरोगी व्यक्ती" म्हणून पात्र आहात का?
दिवस 3 - 4
कोणत्या आयुर्वेदिक पद्धती घरी सुरक्षितपणे करता येतात?
कोणत्या आयुर्वेदिक पद्धतींना चिकीत्सकाच्या निरीक्षणाखाली करावे लागते?
दिवस 5-6
पंच कर्मांमध्ये अंतर्दृष्टी - वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण
- प्रक्रियेचे स्पष्टीकरण
- हे कोणी केले पाहिजे
- प्रत्येक कर्माद्वारे बरे होणारे आजार
दिवस 7-8
घरी बरे करण्यासाठी जानू बस्ती, कटी बस्ती, उरो बस्ती इत्यादी करण्याची प्रक्रिया -
स्नायू दुखणे/कडक होणे, स्पॉन्डिलायसिस, गुडघेदुखी, सांधेदुखी, लंबो सॅकरल वेदना इ.
दिवस 9-10
शिरोधारा - तणाव/नैराश्य/चिंता दूर करण्यास मदत करते. स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते.
थालापोथीचिल - केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि केसांशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यासाठी आयुर्वेदिक सराव
दिवस 11-12
नास्य - सर्व 5 इंद्रियांचे पोषण करण्यासाठी लोकप्रिय आयुर्वेदिक सराव.
मानेपासून डोक्यापर्यंतच्या सर्व समस्या/रोगांसाठी उपचार पद्धती (सर्व मानसिक रोगांसह)
नेत्र तर्पण - डोळ्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी सराव
बिडालक - डोळ्यास सुखदायक पेस्ट तयार करणे
दिवस 13-14
पत्र पिंडा स्वेदन - पाठदुखी, मानदुखी, पेटके, कटिप्रदेश, संधिवात इत्यादी बरे करण्यास मदत करते
कर्ण पुरण - वात दोष संतुलित करण्यास मदत करते, कानाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, डोकेदुखी सोडते इ
दिवस 15-16
रेसिपी आणि पंचामृत खाण्याचे फायदे - रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे
गर्भसंस्कारावर सत्र
दिवस 17-18
सर्व आयुर्वेदिक उपचारांची आई - पादाअभ्यंग - घरी करण्याची तपशीलवार प्रक्रिया
योनी धूपन - स्त्रियांच्या स्त्रीरोगविषयक आरोग्य राखण्यासाठी डिझाइन केलेली अनोखी चिकित्सा
प्रारंभ तारीख - 28 ऑक्टोबर
*फी*रु. 2000
स्थळ - व्हॉट्सअॅप आणि कायमस्वरूपी माहिती तुमच्याजवळ
मध्यम - वैयक्तिकरित्या रेकॉर्ड केलेले सत्र, संदर्भ नोट्स, पीडीएफ सारांश, 24*7 शंका अॅड्रेसल सुविधा
पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल
आपण कार्यशाळेत सामील होऊ इच्छित असल्यास, आपण नोंदणी गटात सामील होऊ शकता
शंका निरसन any time, whats app गृपवर वर.
कधीही, कुठेही,केव्हाही जॉईन होऊन लाभ घेऊ शकता.त्यासाठी ऑनलाइन राहण्याची गरज नाही.
*Start- 28 ऑक्टोबर*
* फी 2000रुपये*
Gpay no 9405593596
Or
nitayadav70@okhdfcbank
Or
HDFC bank, satara.
Acount no. 50100263790888
Acount-savings
IFSC code-HDFC0000790
भाषा मराठी,इंग्लिश
संपर्क -हाय टेक विश्व कन्सल्टन्सी 9405593596
Panchkarm at home28oct21 WhatsApp Group Invite
*Never ever Own a Disease.*
Lot of people have a Habit of saying, *“I am Diabetic” or "I'm Hypertensive" etc.* When you say *“I am...”* then you *Own the Disease,* you make the disease a *Part of Yourself,* it becomes your *Identity...*
Another *Classic Example* which most people have a habit of saying is, *“I am Suffering from....”.*
This is an extremely *Harmful Statement.* You are associating *“Suffering”* with your disease. You are constantly *Inviting Misery* with it.
What should you say ?
“I am *Going Through* the condition of Diabetes or Hypertension”. When you say, *“Going Through the condition...”* it simply means you are on a *Journey,* which eventually will come to an *End.* By adding “Condition”, you are stating that it will *Change.*
*Why is it important?*
Words have *Tremendous Power.* Words carry *Vibration.* These vibrations are directly connected with your *Subconscious Mind.* You become what you *Say.*
The *Manifestation Occurs* based on what your Subconscious Mind is *Fed With..!*
When *Good/ Positive thoughts, Good/ Positive words & Good/ Positive deeds* are fed to the subconscious mind, it *Manifests in Positive Occurences.*
So, my friends, Be *Mindful* of what You *Think* & what Words You *Speak*
🙏🏻🌷🙏🏻🙏🏻
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
आपले प्रत्येक काम पूर्ण होवो
नाही कोणते स्वप्न अपूर्ण राहो
धन धान्य आणि प्रेमाने भरलेले असो जीवन
घरात होवो देवी लक्ष्मी चे आगमन
अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!
🙏🙏🙏🙏🙏
घरी *होम क्वारंटाईन* केलेली लोकं *पाच ते सात* (5- 7)दिवसात *बाहेर पडुन सुपर स्प्रेडर* ठरत आहेत.होम क्वारंटाईन केलेली *कोवीड पेशंट ही 14 ते 17 दिवस* सामान्य लोकांच्या संपर्कात नाही आली पाहिजे.कोवीड *पाॅजीटिव* पेशंट हा *12 ते 14 दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवु शकतो.* मला काही *लक्षणं नाहीत* ,मी *आता बरा आहे* ,मला *काहीच त्रास नाही* होत,मला *दम पण नाही लागत,माझं सॅच्युरेशन ही नाॅर्मल आहे* अशी कारणं सांगत *5 ते 7 दिवसात घराच्या बाहेर* पडुन *सुपरस्प्रेडरची* भुमिका निभावतआहेत. *प्रशासनाला, सरकारला दोष देत* बसण्यापेक्षा आपण *प्रशासनाला काय* *मदत करु शकतो* हा विचार करा. *सरकार, प्रशासन* त्याच्या लेवलवर पुर्ण पणे काम करतंय,आपण *सुजान नागरिक* म्हणून प्रशासनाच्या पुर्ण पणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे *होम काॅरंटाईन पेशंट* ने *चौदा (14)दिवस* घरात *आयसोलेशन* मध्ये राहुन *प्रशासनाला मदत* केली पाहिजे व *सुपर स्प्रेडर* म्हणून *बाहेर नाही पडलं* पाहिजे. *सुपर स्प्रेडर* स्वतःच्या *परिवारासाठी ही घातक* आहेत व *समाजासाठी* पण *.होम काॅरंटाईन कोवीड पाॅजीटिव्ह* असलेल्या प्रत्येक *नागरिकांनी* एक आपली *सामाजिक जबाबदारी* म्हणून व *प्रशासनाला आपली मदत* म्हणुन खारीचावाटा उचलुन *सुपर स्प्रेडर* बनुन *बाहेर फिरु नका* व आपला *14 ते 17* दिवसांचा *होम क्वारंटाईन* कालावधी *घरात राहुन पुर्ण* करा.
🙏🙏🙏
Request the *YOUTH between 18 to 45* to please *DONATE BLOOD* before VACCINATION. begins from 1st MAY...!*
*as After Vaccination one cant Donate blood till minimum 60 days..!*
Please Plan in advance & *Avoid a Possible BLOOD SHORTAGE* in the next 2-3 months due to mass Vaccination..! 🙏🏻
कोविड: प्रश्न आणि उत्तरे
कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरतेय, प्रत्येकाच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील नातेवाईकांमधील कोणी ना कोणी आतापर्यंत कोविड पाॅझिटीव आलंच असेल, प्रत्येकाच्याच मनात भीती आहे,चिंता आहे, शंका आहेत, त्यातल्या काही शंकांचं समाधान करण्याचा हा प्रयत्न.....
प्रश्न: मी तरूण ,धडधाकट, सुदृढ आहे , दोन दिवसांपूर्वी एकदाच ताप येऊन गेला ,आता फक्त थकवा आहे, मग कशाला कोविड टेस्ट करू?
उत्तर: निश्चित निदान होण्यासाठी. ताप गेला म्हणजे आजारही गेला असं नाही . सुरूवातीचा ताप, अंगदुखी ही लक्षणं विषाणूंचा शरिरात प्रवेश झाल्यावर आपले शरीर जी प्रतिक्रिया देतं त्यामुळे दिसतात.
पण नंतर पाच,सहा दिवसाच्या अंतराने ताप पुन्हा येऊ शकतो तो गंभीर लक्षणं घेऊनच जसे की खोकला, धाप लागणे , ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे .
या पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी वेळेत निदान होणे गरजेचे आहे.
शिवाय आपल्याकडून कुटुंबातील व समाजातील इतरांना संसर्ग होऊ नये यासाठीही निदान करून घेणं गरजेचं आहे.
प्रश्न: कोणताही ताप आला की कोविड टेस्ट पॉझिटीव्हच येणार ना ?
उत्तर: नाही. कोविड विषाणूवर असणारा अॅटिजेन नावाचा भाग शोधण्याचं काम कोविड टेस्ट करते. इतर तापात तो का बरं दिसेल? खरोखर कोरोनाचा विषाणू असेल तरच दिसेल ना ! साधारण 100 कोविड टेस्ट केल्या तर त्यातल्या सरासरी 10 ते 15 पाॅझिटीव येतात.
प्रश्न: मी नुकतीच कोरोनाची लस घेतलीय, आता माझी कोरोना टेस्ट केली तर ती पॉझिटिव्हच येणार ना ?
उत्तर: हा एक मोठाच गैरसमज लोकांमध्ये पसरलाय सध्या. अफवा सत्या पेक्षा वेगात पसरतात. याचं शास्त्रीय स्पष्टीकरण द्यायचं तर,
लस आपण घेतो दंडावर, तिथून ती लस स्नायूंमधल्या रक्त वाहिन्यांमार्फत रक्तात पसरते व लसी विरूद्ध प्रतिकारशक्ती (antibody) बनवण्याचे काम शरीर सुरू करते.
कोरोना टेस्ट केली जाते ती नाकातला व घशातला स्त्राव घेऊन, त्याचा रक्ताशी काही संबंध नाही. बाहेरून शरिरात आलेला आणि घशाच्या आवरणावर येऊन बसलेला विषाणूच टेस्ट मध्ये सापडू शकतो. त्यामुळे कोरोना लस घेण्याचा आणि टेस्ट पॉझिटिव्ह येण्याचा काहीच संबंध नाही.
पण झालं असं की बरेच महिने घरात बसलेले जेष्ठ नागरिक लसीकरणाच्या निमित्ताने बाहेर पडले, तिथल्या गर्दीशी त्यांचा संपर्क आला तिथे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्दैवाने आपल्या देशात लसीकरण आणि कोरोनाची दुसरी लाट एकामागोमाग आले त्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला.
प्रश्न: मी कोरोनाची लस घेतलीय मग मला कोरोना झालाच कसा ?
उत्तर : लस आपण दंडावर घेतलीय, तिथून तिचा अंश रक्तात पोहोचलाय. लस आपल्या नाकात किंवा घशात कोणताही असा पडदा तयार करत नाही की विषाणू तिथून आत येणार च नाही. त्यामुळेच लस घेतली तरी कोरोना संसर्ग होऊ शकतो .पण हा विषाणू जेव्हा शरिरात पोहोचेल तेव्हा त्याच्याशी लढण्यासाठी प्रतिकार शक्ती लसीमुळे तयार झालेली असेल त्यामुळे आजार झालाच तरी सौम्य स्वरूपाचा होईल, बळावणार नाही आणि मुख्य म्हणजे मृत्यू टाळता येईल.
मात्र ही प्रतिकार शक्ती तयार होण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेऊन किमान चार ते सहा आठवड्याचा काळ जाणे आवश्यक आहे.
प्रश्न: मला ताप आलाच नाहीये नुसतीच अंगदुखी आहे, मग टेस्ट कशाला करू?
उत्तर: 15 ते 20 % रुग्णांमध्ये ताप येतच नाही किंवा सौम्य स्वरूपाचा असल्याने कळून येत नाही. अंगदुखी , थकवा ,तोंडाची चव जाणे, वास न येणे, खोकला, छातीत दुखणे किंवा गच्च वाटणे, धाप लागणे, जुलाब होणे, अचानक चक्कर येणे यापैकी कोणतीही लक्षणे असल्यास कोविड टेस्ट केली पाहिजे. सध्या आलेल्या कोविड च्या दुस-या लाटेमध्ये कुटुंबातील सर्व च्या सर्व सदस्यांना एकाच वेळेस संसर्ग होत आहे त्यामुळे घरात एकापेक्षा अधिक लोक आजारी असतील तर ताबडतोब टेस्ट करून घ्यायला हवी.
प्रश्न: मला टेस्ट तर करायची आहे पण भीती वाटतेय, पाॅझिटीव आली तर काय करायचं?
उत्तर: अजिबातच घाबरून जायला नको. कोणी तुम्हाला पकडून कुठे घेऊन जाणार नाहीये. आरोग्य यंत्रणेकडे तेवढी सवडच नाहीये. उलट जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर उपाययोजना करता येतील. बेड ,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर शोधण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. कोविड रूग्णांना आजाराच्या वेगवेगळ्या टप्प्यात कोणती औषधे द्यायची याबाबत निश्चित मार्गदर्शक तत्वे आता डाॅक्टरांकडे उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे औषधोपचार केले की कोविड मधून पेशंट पूर्ण बरा होतो. तरूण रूग्ण तर घरी राहून देखील औषधोपचार घेऊ शकतात. फक्त वयस्कर व्यक्ती, इतर आजार असणा-या व्यक्ती यांनी शक्यतो अॅडमिट राहूनच उपचार घेतलेले बरे.
प्रश्न: आधी जरा चार पाच दिवस
बरं वाटतयं का बघू , नाहीतर नंतर टेस्ट करू, चालेल का ?
उत्तर: नंतर म्हणजे कधी ? वेळ हातातून निसटून गेल्यावर ?
आज जे काही मृत्यू कोविड मध्ये होताना दिसतात त्यांनी किमान सात ते आठ दिवस आजार अंगावर काढलेला असतो, तोपर्यंत फुफ्फुसांमध्ये न्युमोनिया वाढत जातो, ऑक्सिजन कमी व्हायला लागतो आणि रूग्णाची प्रकृती गंभीर होत जाते. मग डाॅक्टर ही हतबल असतात. Time is Money अशी इंग्लिश मध्ये म्हण आहे, पण कोरोना बाबतीत Time is Life असं म्हणता येईल.
प्रश्न: कोविड आजारात RT PCR test सोडून इतर काही टेस्ट करणे गरजेचे आहे का ?
उत्तर: कोविड आजाराची तीव्रता किती आहे,फुफ्फुसाचा किती टक्के भाग न्युमोनियाने
बाधित झाला आहे हे छातीचा सीटी स्कॅन केल्यास अचूक पणे कळते. त्यामुळे उपचारांची दिशा ठरवता येते. याशिवाय काही रक्त तपासण्या ज्यांना वैद्यकीय भाषेत वायरल मार्कर्स असं म्हणतात त्याही करणे गरजेचं असतं त्यावरून आजारातल्या संभाव्य धोक्यांची कल्पना येते. साधारण पणे लक्षणे सुरू झाल्यापासून सहाव्या सातव्या दिवशी या तपासण्या केल्या पाहिजेत. कारण आजार बळावणे, त्यात गुंतागुंत (complications) होणे हे साधारणपणे दुस-या आठवड्यामध्ये दिसून येते.
कधीकधी रूग्णाची RT PCR test निगेटिव्ह असते परंतू कोविड संसर्ग असण्याची दाट शक्यता वाट असते, अशावेळेस सीटी स्कॅन च्या रिपोर्ट वरून निश्चित निदान करता येतं.
कोरोनाची दुसरी लाट खूप वेगाने पसरते आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग ही आयुधं वापरायचीच आहेत, पण तरीही कोरोना झालाच तर त्याला घाबरून न जाता त्याचे लवकरात लवकर निदान करून, त्यावर योग्य वेळी योग्य उपचार करून त्यावर यशस्वी मात करायची आहे. लक्षात असू द्या ...कोविड टेस्ट करायला आपण धावपळ केली तर पुढे व्हेंटिलेटर साठी धावपळ करावी लागणार नाही !
परवा गुढी पाडव्याला आपण सर्वांनी नव्या संवत्सरात प्रवेश केला आहे
शर्वरी संवत्सरातून आपण पाल्व संवत्सरात प्रवेश केला आहे
बऱ्याच जणांना यांच्या नावासंबंधि माहिती नसेल
मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते
की आपल्या पुराणानी हजारो वर्षांपूर्वी याची कल्पना कशी केली असेल
मला आश्चर्य वाटते की प्राचीन ऋषीमुनींनी या सर्व गोष्टींचा कसा विचार केला? आमचे ब्रेन वॉश केलेले मन नॉस्ट्रॅडॅमसचा विचार करतात आणि उत्कटतेचे आकलन करतात.
आता इकडे लक्ष द्या
2019 सालचे नाव होते, ‘विकारी’ खरोखर प्रतिकूल वर्ष ठरून आपल्या नावाला जागलं
मागील वर्षाचे (2020) नाव होते ‘शर्वरी’ म्हणजे अंधाराने जगाला एका गडद छायेत ढकलले .
आता ‘प्लवा’ संवत्सर सुरू झाला आहे. हे खरोखर खूप चांगले वर्ष आहे.
कारण काय आहे?
‘प्लवा’ म्हणजे आम्हाला वाहून नेणारे जहाज ...
वराह संहिता म्हणते: हे असह्य अडचणी पार करुन जगाला घेऊन जाईल आणि आपल्या वैभवाच्या स्थितीत पोहोचेल. आणि आम्हाला अंधारापासून प्रकाशाकडे नेईल
विकारी आणि शर्वरी संवत्सर त्यांच्या नावा प्रमाणे जगली आहेत ना ? .
म्हणून प्लवा हे आपल्या नावाप्रमाणे जगेल अशी आशा ठेवणे हा तार्किक आणि वाजवी समज आहे
हेही लक्षात घेण्यासारखे आहे की ‘प्लवा’ नंतर संवत्सर ‘शुभक्रुत’ येतो ...
जे चांगुलपणा आणि समृद्धी निर्माण करते,
आणि नंतरचे वर्ष म्हणजे ‘शोभक्रुत’ म्हणजे तेज उत्पन्न करते.
मला खात्री आहे की ही संवत्सर त्यांच्या नावाप्रमाणे राहतील आणि आम्हाला आनंद देतील .
चला तर मग ‘प्लवा’ संवत्सरचे स्वागत करूया. 🙏
Contact the practice
Telephone
Website
Address
Satara
415002