SVG School Asegaon
Informational of SVG School
Activity
*स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज आसेगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.*
आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज आसेगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून शाळेचे संचालक श्री रत्नाकर फाळके सर, श्रीमती गीताताई फाळके मॅडम, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सचिंदर राय सर व निकिता मेहेर मॅडम, प्राचार्य रवि धनूरे सर, उपप्राचार्य योगेश फाळके सर, मुख्याध्यापिका रोशनी कांबळे मॅडम व सर्व शिक्षकवर्ग यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना डॉ. सचिंदर राय सर व मेहेर मॅडम यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रात आपली कारकीर्द कशी घडवावी याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणांतून मित्रपरिवार, शिक्षक व शाळेविषयीचे प्रेम व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*शताक्षी बोडके हिने ऑलिम्पियाड स्पर्धेत मिळवले घवघवीत यश.*
स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज आसेगाव शाळेची विद्यार्थिनी कु. शताक्षी सतिश बोडखे हिने ऑलिम्पियाड स्पर्धेत तिहेरी सुवर्णपदक प्राप्त केले आहेत. या यशाबद्दल शाळेचे संचालक श्री रत्नाकर फाळके सर, श्रीमती गीताताई फाळके मॅडम, उपाध्यक्ष बाबासाहेब सोनटक्के सर, प्राचार्य रवि धनूरे सर, उपप्राचार्य योगेश फाळके सर, मुख्याध्यापिका रोशनी कांबळे मॅडम, शिक्षक दत्तू उबाळे, परमेश्वर उबाळे नागेश लिंगायत, नारायण दुबिले, सोहेल शेख,सागर मुगले, शिक्षिका अनिसा शेख, पुजा फाळके, नम्रता थोरात, अर्चना थळपती, सुनिता बहुरे, जयश्री काटकर, वर्षा काळवणे, वैशाली बोर्डे, सविता राजगुरू यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे शाताक्षीच्या पालकांनी देखील यासाठी तिला प्रोत्साहन देवून प्रेरणा दिली.या यशाचे श्रेय शताक्षीने शाळा, आपले पालक प्रा.श्री सतीश बोडखे सर , आई व वर्गशिक्षिका आसमा पठाण यांना दिले.
विद्यार्थ्यांनी अनुभवले चंद्रयान -3यशस्वी प्रक्षेपण.....