Kuber Foundation

Kuber Foundation

Our journey started from Facebook Group to Kuber Foundation! Now, we are moving towards our dreams an

10/11/2023

१० नोव्हेंबर

जागतिक विज्ञान दिन

१० नोव्हेंबर या दिवशी 'जगातील शांतता आणि विकास' या विषयावर 'जागतिक विज्ञान दिन' साजरा केला जातो. हा दिवस समाजात विज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि उदयोन्मुख वैज्ञानिक समस्यांवर सार्वजनिक चर्चा करण्याची गरज यावर भर देतो. या दिवसाचा हेतू नागरिकांना विज्ञान मध्ये विकासा विषयी माहिती दिली असल्याचे सुनिश्चित करण्याचा आहे. हा दृष्टिकोन वाढवण्यासाठी वैज्ञानिक भूमिका बजावतात ती भूमिका लोकांसमोर आणायला हा दिवस साजरा केला जातो. शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन उद्देश : -

१) शांततापूर्ण आणि टिकाऊ समाजासाठी विज्ञानाच्या भूमिकेवर जन जागरूकता बळकट करणे.

२) देशांमधील सामायिक विज्ञानांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एकता वाढवणे.

३) समाजाच्या फायद्यासाठी विज्ञान वापरण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बांधिलकीचे नूतनीकरण करणे.

४) विज्ञानासमोर आलेल्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करणे आणि वैज्ञानिक प्रयत्नांना आधार देणे.

या दिनाची सुरुवात १९९९ साली यूनेस्को आणि बुडापेस्ट मधील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या विज्ञान संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान परिषदेच्या पाठोपाठ शांती व विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस तयार करण्यात आला.

Photos from Kuber Foundation's post 03/11/2023

विल्यम हार्वे दाना

अंतराळवीर

जन्मदिन - ३ नोव्हेंबर १९३०

विल्यम हार्वे 'बिल' दाना हे अमेरिकन एरोनॉटिकल अभियंता, यू.एस. एअर फोर्सचा पायलट, नासा चाचणी पायलट आणि अंतराळवीर होता. उत्तर अमेरिकन एक्स-१५, उड्डाण करणारे हवाई परिवहन आणि नासा यांनी संयुक्तपणे राबविलेले प्रयोगात्मक अंतराळ विमान उडविणार्‍या बारा पायलटांपैकी तो एक होता. एक्स-२० डायना-सोर कार्यक्रमात भाग घेण्यासाठीही त्यांची निवड झाली. दोन स्वतंत्र उड्डाणांवर, डानाने एक्स-१५ उड्डाण ५० मैलांच्या उंचीवर केली, त्याद्वारे अंतराळवीर म्हणून अमेरिकेच्या जागेच्या सीमेच्या परिभाषानुसार पात्र ठरले; तथापि, कोणत्याही विमानाने आंतरराष्ट्रीय पातळीवर १०० किलोमीटर (६२ मैल) ची मर्यादा स्वीकारलेली कार्मन लाइन ओलांडली नाही.

23/10/2023

आज २३ ऑक्टोबर (सफर जगाची )

हंगेरी या देशाचा आज प्रजासत्ताक दिन आहे (२३/१०/१९८९)
राजधानी -बुडापेस्ट /भाषा -हंगेरिय /चलन - फॉरेन्ट

मध्य युरोपमधील हंगेरी हा भूवेष्टित देश आहे .हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया ,पूर्वेला युकेन आणि रोमानिया ,दक्षिणेला सर्बिया, मॉँटेनिग्रो, क्रोएशिया; पश्चिमेस ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया हे सिमेलागीत देश आहे .

हंगेली हे जगातील ३० लोकप्रिय पर्यटन देशानपैकी एक आहे या देशाला जग भरातून दरवर्षी १ कोटी पर्यटक भेट देतात .या देशाला एकूण पाणी साठ्य पैकी ८० टक्के पाणी भूभाग मध्ये गरम आहे व हे नैसर्गिक आहे .सुमारे १५०० गरम पाण्याचे जरे आहे इथल्या नद्यांना पण गरम पाणी असते .जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गरम पाण्याचा तलाव 'लेक व्हेविज 'येथे आहे .निम्मा हंगेरीयाचा भूभाग हा सपाट मैदानी आहे .या देशात १० जागतिक पातळीचे पार्क आहे .१४५ संवर्धित वने ,३५ सुरक्षित भुषेत्रे आहेत .या देशात ६०० मी.मी पाऊस पडतो .

केल्ट आणि रोमन कालावधीनंतर ९ व्या षटका मध्ये हंगेरिय राजपुत्र आरपाड यांनी हे राज्य स्थापले व हे राज्य १४६ वर्ष टिकले .त्यानंतर ऑट्तोमनच्या १५० वर्ष सत्तेनंतर हेंगेरीया मध्ये हॉब्सबर्ग राजेशाही आली पहिल्या महायुद्धापर्यंत मोठी ताकत असलेल्या हेगेरीयाचा ७० टक्के भाग हा युद्धामध्ये शत्रूराष्ट्राने जिंकला .या नंतर १९४७ ते १९८९ मध्ये अनेक सत्ताधारी ,शासनकर्ते कम्युनिस्ट काळ हंगेरी मध्ये येऊन गेला .या कालावधीत १९५६ च्या क्रांतीकडे साऱ्या जगाचे लक्ष आकर्षित झाले होते .आताचे सरकार १९८९ साली स्थापले आहे .व आताचे अध्यस 'जानोस ऑडेन'हे आहे .

हेंगेरी मध्ये वस्तू कलेचा ऐतिहासिक आणि विशिष्ट कलात्मकता दिसून येते .ऑलोम्पिक खेळ मध्ये सर्वाच्च कामगिरीमध्ये क्रमवारीत हंगेरी हा देश ९ व्या क्रमांकावर आहे .या देशाचे आतापर्यंत ४६५ पदके मिळविली आहे .

' चित्रात डॅन्युब नदीच्या किनारी वसलेले राजधानी 'बुडापेस्ट' हे शहर '

Photos from Kuber Foundation's post 13/10/2023

१३ ऑक्टोबर १७७३

व्हर्लपूल आकाशगंगेचा शोध

व्हर्लपूल आकाशगंगेचा शोध चार्ल्स मेसिअर याने १३ ऑक्टोबर १७७३ रोजी लावला. आकाशगंगा म्‍हणजे काय? निरभ्र आकाशात, विशेषतः चंद्र नसलेल्या रात्री, कधी आग्नेय-वायव्य आणि कधी नैर्ऋत्य-ईशान्य असा एक फिक्कट पांढरा दुधाळ रंगाचा, कमी अधिक रुंदीचा पट्टा दिसतो, त्याला ‘आकाशगंगा’ म्हणतात. आकाश गंगेला ‘दूधगंगा’असेही म्हणतात. गॅलिलीओ यांनी १६१० मध्ये प्रथम दुर्बिणीतून आकाशगंगेचे निरीक्षण केले व त्यावरून आकाशगंगेचा दुधाळ रंग तिच्यातील जवळ जवळ असलेल्या असंख्य ताऱ्यांमुळे दिसतो असे त्यांना आढळून आले. विल्यम हर्शेल यांनी १८ व्या शतकाच्या शेवटी व त्यानंतर त्यांचे पुत्र जॉन हर्शेल यांनी १८३४-३८ या काळात आकाशगंगेच्या विविध भागांतील ताऱ्यांच्या संख्यांची नोंद केली. १९००-२० या काळात कापटाइन व त्यांच्या सहकाऱ्यांनी छायाचित्रण करणाऱ्या दुर्बिणीच्या साहाय्याने काही विशिष्ठ भागातील ताऱ्यांच्या संख्यांची नोंद केली. त्यानंतर १९१६-१९ या काळात शॅप्ली यांनी आकाशगंगेच्या मध्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या अनेक गोलाकार तारकागुच्छांचे अंतर काढले व आकाशगंगेचे स्वरूप अधिक स्पष्टपणे मांडले. आकाशगंगेच्या बाहेरून तिच्या पातळीतील एखाद्या बिंदूतून तिच्या कडेच्या बाजूने पाहिल्यास ती मध्ये जाड व कडेला चपटी अशी साधारणपणे बहिर्गोल भिंगाकार दिसेल. यातील सर्वांत तेजस्वी भागात अति उष्ण व अति-तेजस्वी तारे आणि आंतरतारकीय वायूंचे मेघ व धूळ असून हा भाग अतिशय चपट्या तबकडी सारखा आहे. याच भागात साधारणपणे मध्यापासून निम्म्यापेक्षा जास्त अंतरावर सूर्यकुल आहे. या तबडकीच्या भोवती बऱ्याच कमी घनतेचे तेजोमंडल आहे. आकाशगंगेचा व्यास सुमारे ३०,०००पार्सेक (एकपार्सेक = ३·२६ प्रकाशवर्ष) इतका प्रचंड असून मध्यभागी जाडी सुमारे ५००० पार्सेक आहे. सूर्य तिच्या मध्यापासून सुमारे ८३,००० पार्सेक दूर असून या ठिकाणी जाडी सुमारे १००० पार्सेक आहे.

Photos from Kuber Foundation's post 07/10/2023

नील्स बोहर

शास्त्रज्ञ

जन्मदिन - ७ ऑक्टोबर १८८५

अणुचा उपयोग विध्वंसासाठी नव्हे तर मानवाच्या भल्यासाठी व्हावा, असे आपले म्हणणे जाहीरपणे मांडणाऱ्या डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ नील्स बोहर यांचा जन्म ७ ऑक्टोबर १८८५ रोजी डेन्मार्क मधील कोपनहेगन या शहरी एका उच्चभ्रू उमराव घराण्यात झाला. त्यांचे वडील जीवशास्त्राचे प्राध्यापक असल्याने लहानपणापासूनच त्यांनी नील्सला निरीक्षणाची सवय लावली होती. मौजमजा करण्याच्या वयात नील्सने वैज्ञानिक व तात्विक चर्चा करण्यासाठी ‘सूर्यकक्षा’ नावाचे मंडळ स्थापन केले. २२ व्या वर्षीच त्यांना पाण्याच्या बुडबुडय़ाच्या रचनेसंबंधी संशोधनाबद्दल ‘सुवर्णपदक’ मिळाले होते. २६ व्या वर्षी त्यांनी डॉक्टरेट मिळवली. यानंतर इंग्लंडमध्ये जे.जे. थॉमसन व रूदरफोर्ड यांच्यासोबत अणुरचनेवर संशोधन केले. अणुकेंद्रा भोवती विवक्षित कक्षेत इलेक्ट्रॉन फिरतात तसेच इलेक्ट्रॉनच्या कक्षा बदलांमुळे विशिष्ट अणू तयार होतो हे त्यांनी निदर्शनास आणून दिलं. त्यांनी मांडलेल्या अणुभेदांच्या कल्पनेवरून अणुशक्तीबरोबर अणुबॉम्ब या विध्वंसक शस्त्रांची निर्मिती होऊ शकते हे साऱ्या जगाच्या लक्षात आले.

नील्स यांना १९२२ चे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने डेन्मार्कवर कब्जा केल्यावर मोठय़ा हिकमतीने ते अमेरिकेत पळाले. ‘विश्वकल्याणासाठी अणू’ या संकल्पनेचे ते जनक. अणूचा बॉम्ब म्हणून उपयोग म्हणजे मानव जातीला धोका, असे त्यांनी पोटतिडकीने सांगितले. यासाठी इंग्लंड, अमेरिका, रशिया या देशांचे उंबरे झिजवले. पण इंग्लंडसारख्या राष्ट्राने त्यांचा अपमान केला. ‘द युरोपियन न्युक्लिअर रिसर्च सेंटर’ उभारण्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे. अणुबॉम्ब आता लष्कराच्या हातात पडल्याने शांततेच्या प्रचारासाठी त्यांनी मोहीम राबवली. १९५५ मध्ये जिनिव्हात भरलेल्या परिषदेत ‘खुल्या विश्वाची’ त्यांची कल्पना जगातील अनेक शास्त्रज्ञांनी उचलून धरली. अणु विज्ञानाचा उपयोग विश्वकल्याणासाठी व्हावा असे प्रतिपादन करणाऱ्या नील्स बोहर यांना ‘शांततेसाठी अणू’ या कल्पनेचा जनक मानले जाते.

'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून

Photos from Kuber Foundation's post 29/09/2023

🫀२९ सप्टेंबर🫀

जागतिक हृदय दिन

आजकाल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखाद्या विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाय योजना करावी याची माहिती जनतेपुढे मांडणे महत्वाचे ठरते. इतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाकू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्यागोष्टी ताबडतोब बंद करायला हवे.

हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी होती. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी. हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा, तसेच नियमित फलहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखादया छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.

जरा हृदयात डोकाऊन बघा, आत शिरा. आतील भिंती चाचपडून पाहा. तुम्हाला दिसतील विविध रंगाच्या एकमेकात मिसळलेल्या छटा. सार्‍याच भिंतीवर असतील रेशमी मुलायम स्पंदन आणि स्नेहमयी भावाक्षरे. तेंव्हा तुम्हाला कुठेतरी चुकचुकल्या सारखं वाटेल, काहीतरी हरवलेलं वाटेल, तेच ते. इथे तर कुठेही दिसत नाही क्रोधाचे तप्त प्रदेश, द्वेषाचे काटेरी रस्ते, मोहमयी झाडाचे पुंजके, स्वार्थ वादाच्या इमारती. कुठेच कसे नाहीत हिंसक हात? अरे, हे तर सारं बाहेरच राहिलं. इथे तर विशुद्ध प्रेमाच्या आविष्कारा शिवाय काहीही नाही आणि मग हरवलेल्या माणूसपणाचा शोध लागेल. म्हणून हृदयावर प्रेम करा. हृदयातील हा बंदिस्त ठेवा बाहेरच्या जगात वाटा. हृदयासारखं व्हा. काळजी घेणारं, निकोप आणि आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीत सहभागी होऊ या.

Photos from Kuber Foundation's post 28/09/2023

एडविन हबल

खगोलशास्त्रज्ञ

स्मृती - २८ सप्टेंबर १९५३

एडविन पॉवेल हबल हे अमेरिकन खगोल भौतिकीविद. त्यांनी दीर्घिकांचे (तारामंडलांचे) शोध लावले व त्यांचे वर्गीकरण केले. तसेच ते प्रसरणशील विश्व या विश्वाविषयीच्या प्रतिकृतीचा पहिला पुरावा देणारे खगोलशास्त्रज्ञ आहेत. हबल यांचा जन्म मार्शफील्ड (मिसूरी,अमेरिका) येथे झाला. शालेय विद्यार्थी असताना ते हुशार होतेच, शिवाय त्यांना खेळांतही रस होता. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात र्‍होड्स स्कॉलर म्हणून कायद्याचे अध्ययन सुरू केले. कायद्याची बीए पदवी १९१२ मध्ये मिळविल्यावर ते केंचुकी येथे १९१३ मध्ये वकिली करू लागले. आकाशगंगा या कोट्यवधी तारे असलेल्या दीर्घिकेत सूर्यही आहे. मात्र, आकाशात दिसणाऱ्या सर्व अभ्रिका आकाशगंगेचा भाग नाहीत, हा शोध हबल यांनी मौंट विल्सन वेधशाळेतील निरीक्षणांद्वारे लावला (१९२२-२४). त्यांनी १३०० खगोलीय क्षेत्रे निवडून शेकडो छायाचित्रे घेतली. विशिष्ट अभ्रिकांमध्ये १२ सेफीड चल तारे असल्याचे त्यांना आढळले. सेफीड हा आवर्ती चल ताऱ्यांचा उपगट असून त्यांचा तेजस्वीपणा काळानुसार स्थिर राहत नाही आणि त्यांचा तेजस्वीपणातील बदलाचा आवर्तकाल त्यांच्या अंगभूत माध्य (सरासरी) तेजस्वीपणाशी निगडित असतो.

हबल यांनी मौंट विल्सन वेधशाळेतील २५४ सेंमी. दूरदर्शकाद्वारे घेतलेल्या वेधांवरून व आढळलेल्या ताम्रच्युतींवरून पऱ्यायाने दूर जाण्याच्या गतीवरून अंतर, भासमान प्रत व निरपेक्ष प्रत यांच्यातील परस्परसंबंधाचा उपयोग केला आणि सेफीड तारे लाखो प्रकाशवर्षे अंतरावर म्हणजे आकाशगंगेच्या पलीकडचे असल्याचे निश्चित दाखविले. ज्या अभ्रिकांमध्ये हे सेफीड तारे आहेत त्या प्रत्यक्षात आकाशगंगेहून भिन्न अशा दीर्घिकाच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. उदा. देवयानी अभ्रिकेतील एम-३१ ही दीर्घिका आकाशगंगेच्या फारच बाहेर म्हणजे साडेसात लक्ष प्रकाशवर्षे इतकी दूर आहे. उलट आकाशगंगेचा व्याप फक्त एक लक्ष प्रकाशवर्षे एवढा आहे, हा शोध त्यांनी १९२४ मध्ये घोषित केला.आकाशगंगे बाहेरच्या या दीर्घिका शोधून काढल्यावर लवकरच हबल यांनी १९२६ मध्ये या दीर्घिकांचे त्यांच्या आकारानुसार वर्गीकरण करण्याचे आणि त्यांचे तारकीय घटक व त्यांच्या तेजस्वीपणाचे आकृतिबंध यांच्या समन्वेषणाचे कामही सुरू केले. त्यांनी दीर्घिकांचे विवृत्ताकार, साध्या चक्रभुजीय, दंडयुक्त चक्रभुजीय आणि रचनारहित हे चार प्रमुख वर्ग केले.

दीर्घिकांचा अभ्यास करताना त्यांनी पुढील दुसरा लक्षणीय शोध १९२७ मध्ये लावला. या दीर्घिका उघडपणे आकाशगंगेपासून दूर जात आहेत आणि त्या जितक्या अधिक दूर असतात तितक्या अधिक वेगाने दूर जात आहेत. या शोधाचे असंख्य मतितार्थ (अटकळी वा अन्वय) होते. दीर्घकाळ विश्व स्थिर अवस्थेत असल्याचे मानले जात होते. या शोधामुळे विश्व प्रसरण पावत असल्याचे दिसून आले. त्यांनी १९२९ मध्ये दीर्घिकांची गती व त्यांचे अंतर यांचे गुणोत्तर हा स्थिरांक असेल अशा प्रकारे विश्व प्रसरण पावत असल्याचे शोधून काढले. या स्थिरांकाला त्यांच्या नावावरून हबल स्थिरांक हे नाव पडले. विश्व प्रसरण पावत असल्याचे हबल यांचे मत बरोबर होते; मात्र त्यांनी गणिताने काढलेले हबल स्थिरांकाचे मूल्य बरोबर नव्हते. कारण त्यावरून आकाशगंगेची प्रणाली इतर सर्व दीर्घिकांपेक्षा अधिक मोठी आहे आणि पृथ्वीच्या अंदाजाने काढलेल्या वयापेक्षा संपूर्ण विश्व लहान आहे, असा चुकीचा अर्थ निघत होता. तथापि, नंतर ज्योतिर्विदांनी त्यांचे निष्कर्ष पुन्हा तपासून पाहिले व त्यामुळे हबल यांच्या सिद्धांतांचा बचाव झाला. यामुळे विश्व १०-२० अब्ज वर्षे स्थिर त्वरेने प्रसरण पावत असल्याचे चित्र निर्माण झाले.

हबल यांनी दिलेली हॅली व्याख्याने (ऑक्सफर्ड विद्यापीठ, १९३४), सिलिमन व्याख्याने (येल विद्यापीठ, १९३५) आणि र्‍होड्स मेमोरियल व्याख्याने प्रसिद्ध आहेत. रेड शिफ्टस् इन द स्पेक्ट्रा ऑफ नेब्युली (१९३४) आणि द हबल अ‍ॅटलास (संपा. अ‍ॅलन रेक्स सँडेज, १९६१) ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले होते. उदा. अमेरिकेतील बर्नार्ड, ब्रूस व फ्रँक्लिन ही सुवर्ण पदके तसेच रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१९४०) आणि ऑक्सफर्डच्या क्वीन्स कॉलेजचे फेलो. शिवाय पृथ्वीभोवतीच्या कक्षेत स्थापित केलेल्या दूरदर्शकाला त्यांच्या सन्मानार्थ हबल अवकाश दूरदर्शक (हबल स्पेस टेलिस्कोप) हे नाव देण्यात आले. हबल यांचे सान मारीनो (कॅलिफोर्निया, अमेरिका) येथे निधन झाले.

Photos from Kuber Foundation's post 27/09/2023

📙 काय असते प्लास्टर ऑफ पॅरिस 📙

गणपती उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीपासून बनविल्या जाव्यात असा आग्रह गेली काही वर्ष पर्यावरणवादी धरत आहेत. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असलं तरी एरवी प्लास्टर ऑफ पॅरिस हा एक अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. त्याचा अंगच्या गुणधर्मांमुळं अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा प्राधान्यानं वापर केला जातो. बांधकामात आता सिमेंटचा प्लास्टरसाठी अधिक उपयोग होत असला तरी अजूनही फॉल्स सिलिंगसाठी किंवा इंटिरिअर डेकोरेशनसाठी त्याचा वापर होत असतो.

जिप्सम हे खनिज जर कॅल्शियमच्या सानिध्यात उच्च तापमानाला तापवलं तर त्याचं रूपांतर कॅल्शियम सल्फेटमध्ये होतं. ते रगडून रगडून त्याची वस्त्रगाळ पूड बनवली जाते. तिच्यात पाणी घातलं की त्याचा लगदा तयार होतो. हेच प्लास्टर ऑफ पॅरिस. ते मऊ असताना त्याला हवा तसा आकार देता येतो. साच्यात घालून त्याच्यापासून विविध आकाराच्या वस्तू बनवता येतात. त्यातलं पाणी उडून जाऊन ते घट्ट झाल्यावरही त्याच्या आकारमानात काहीही फरक होत नाही. त्यामुळे साच्याचं आणि तयार झालेल्या वस्तूंचं आकारमानही सारखंच राहातं. पाण्याशी प्रक्रिया होताना त्यातील कॅल्शियम आणि सल्फेट यांच्यामध्ये हायड्रोजन बंध तयार होतात. त्यामुळं ते तसं मृदू आणि गुळगुळीत राहतं. खास करून त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्यामुळे सँडपेपरने घासून त्याचे कंगोरेही नाहीसे करता येतात. घट्ट झाल्यावर ते ठिसुळ राहात नाही, तरीही त्याच्यावर मोठा आघात झाला तर ते मोडू शकतं. त्यामुळे त्याच्यापासून बनवलेले पुतळे जर जमिनीवर पडले तर तुटू शकतात.

त्याचं नाव पॅरिस शहराशी निगडीत असलं तरी त्याचा वापर गेल्या दहा हजार वर्षांपासून होत आहे. त्या काळातील इजिप्शियन संस्कृतीत त्याचा वापर झालेला आढळतो. त्या काळातील कबरींमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस वापरल्याचं दिसून आलं आहे. पुढं ग्रीक लोकांनी ती कला उचलली आणि तिचा सढळ वापर केला. परंतु पॅरिस शहरातील मॉमार्त्र या टेकडीमध्ये जिप्समचे विपुल साठे आढळल्यामुळे त्याला पॅरिसचं नाव चिकटलं.

हाडवैद्य तुटलेल्या हाडांना जोडण्यासाठी याच प्लास्टरचा वापर करतात. शस्त्रक्रिया करून जोडलेली हाडं काहीही हालचाल न होता तशीच राहावी व त्यायोगे ती कायमची जुळून यावीत यासाठी त्या जखमेवर या प्लास्टरचा लेप देतात. त्या वेळी तो लापशीसारखा असतो. पण त्यातलं पाणी उडून जाऊन ते घट्ट होतं आणि त्याचा विळखा त्या भागाला बसतो. हाडं जुळून आल्यावर तो प्लास्टरचा कास्ट कापून काढला जातो.

शिल्पकलेमध्येही त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याला हवा तसा आकार देता येत असल्यामुळे आणि त्याच्या आकारमानात बदल होत नसल्यामुळे ब्रॉन्झचा पुतळा बनवण्यापूर्वी ओतकामासाठी वापरायचा साचा तयार करायला त्याची मदत होते.

बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून

Photos from Kuber Foundation's post 16/09/2023

डॅनियल फॅरनहाइट

तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित

स्मृती - १६ सप्टेंबर १७३६


डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले. त्यांचा मृत्यु ऍम्स्टरडॅम येथे झाला. तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनविण्याचे असंख्य प्रयोग गॅलिलिओ पासून न्यूटन पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले. १७१९ ते १७२४ या काळात डॅनिएल फॅरनहाइट यांनीही तापमापकावर प्रयोग केले. फॅरनहाइट यांनी काचेच्या उभ्या नळीत आधी अल्कोहोल वापरून आपल्या प्रयोगाला सुरूवात केली, त्यात अपेक्षित असे यश न आल्याने मग त्यांनी पारा वापरून प्रयोग सुरूच ठेवले. हे तापमापक जास्त सुटसुटीत व अचूक ठरले. पाण्याचा बर्फ होणे, वाफ होणे, मानवाच्या शरिराचे तापमान या गोष्टी अचूकपणे नोंदवित असल्याची खात्री पटल्यावर फॅरनहाइट यांनी त्या तापमापकाला आपले नाव देऊन प्रयोग जगासमोर आणला. आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सियस सह फॅरनहाइट ची पट्टी असतेच पण बोलण्यात नेहमी गृहित धरले जाते ते फॅरनहाइट या एककाचे तापमान. (उदा. १०० डिग्री ताप)

15/09/2023

Engineering Day

अभियंता दिन

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

अभियंता

जन्म - १५ सप्टेंबर १८६०

आज अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो. याचे कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच. पण घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले, व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले. तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन BA केले. आता त्यांना तांत्रिक शिक्षणाची ओढ लागली. गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसुरुच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त केली ती साधीसुधी नाहीतर सक्करपासून थेट दावणगेरी पर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम क्रमांकात. या दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली. येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले. १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली. एखादा असता तर निवांत आयुष्य जगला असता. पण नियतिला त्यांच्या कडून अजून काही भव्य दिव्य करून घ्यायचे होते.

त्यांची कीर्ती ऐकुन हैद्राबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशैष सल्लागार म्हणुन पद दिले. येथे त्यांनौ हैद्राबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधुन शहर पूरमुक्त केलेच पण त्यामुळे त्या शहराचा कायापालट होऊ शकला. म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर दिली व त्यांनी ती स्विकारली. म्हैसुरला ते १९२६ पर्यंत राहिले. त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली. काही काळ ते दिवाणही होते. या व्यतिरिक्त उद्योग सिंचन शेती या क्षेत्रातही मौलिक योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळुन पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टिम ही त्यांचीच देणगी देशाला. म्हैसुरचे पद सोडल्या नंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग, अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले. समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सर्वोच्च बहुमान केला. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना आदरांजली.

अभियंता दिना निमीत्त सर्व अभियंत्यांना अभिवादन व हार्दिक शुभेच्छा !

13/09/2023

वॉल्टर रीड

सूक्ष्मजंत वैज्ञानिक, पीतज्वरावरील संशोधनात्मक कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध

जन्म - १३ सप्टेंबर १८५१ (बेलरॉई,व्हर्जिनिया)

वॉल्टर रीड हे अमेरिकन लष्करी वैद्य व सूक्ष्मजंत वैज्ञानिक, पीतज्वरावरील संशोधनात्मक कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध. रीड यांचा जन्म बेलरॉई (व्हर्जिनिया) येथे झाला. व्हर्जिनिया विद्यापीठात शिक्षण घेऊन १८६९ मध्ये एमडी पदवी मिळाल्या नंतर त्यांना न्यूयॉर्क येथील बेल्व्ह्यू हॉस्पिटलच्या वैद्यकीय शाळेत प्रवेश मिळाला व १८७० मध्ये त्यांनी तेथील एमडी पदवी संपादन केली. काही वर्षे न्यूयॉर्क इन्फंटस हॉस्पिटल, ब्रुकलिन मधील किंग्ज काउंटी हॉस्पिटल, ब्रुकलिन बोर्ड ऑफ हेल्थ इ. ठिकाणी नोकरी केल्यानंतर १८७५ मध्ये ते अमेरिकन सैन्यात लेफ्टनंट या हुद्यावर भरती झाले. १८७५ ते १८९३ या काळात सैन्यातील निरनिराळ्या जागी नोकरी झाल्यानंतर बढती मिळून त्यांना मेजरचा हुद्दा मिळाला आणि वॉशिंगटन येथे नव्याने स्थापन झालेल्या आर्मी मेडिकल कॉलेजात सूक्ष्मजंतुविज्ञान व निदानीय सूक्ष्मदर्शनशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याच वेळी ते लष्करी वैद्यकीय संग्रहालयाचे अभिरक्षकही होते.

१८९८ मध्ये स्पेन व अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू होताच रीड यांनी स्वेच्छेने त्यात भाग घेण्याची तयारी दर्शविली; परंतु त्याच वेळी अमेरिकन सैनिक छावण्यांतून आंत्रज्वराची (टायफॉइड ज्वराची) जोरदार साथ पसरली. तिच्या कारणांच्या चौकशी समितीवर त्यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. साथीमध्ये दररोज कित्येक नवे रोगी आढळत व मृत्युप्रमाण सतत वाढत होते. १९०४ मध्ये म्हणजे रीड यांच्या मृत्यू नंतर प्रसिद्ध झालेल्या या समितीच्या अहवालात आंत्रज्वरा संबंधीच्या अनेक बाबी उजेडात आल्या. समितीने पाण्यापेक्षा माश्या व मानवी विष्ठा रोग झाल्यावर किंवा न होताही रोगवाहक असतो, असेही समितीने सिद्ध केले. समितीने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे साथ आटोक्यात आली.

१९०० मध्ये पीतज्वराची करणे आणि प्रसाराची पद्धती शोधण्याकरिता नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदावर रीड यांची नेमणूक झाली. क्यूबातील अमेरिकन सैन्यात या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. अमेरिकेतही प्रतिवर्षी रोग उद्‌भवून तो मिसिसिपीच्या खोऱ्यात फैलावत असे. या रोगाबद्दल काही अनुमाने काढण्यात आली होती. रीड यांनी जेव्हा या कामास प्रारंभ केला तेव्हा रोगाचे कारण अज्ञात होते. १८९७ मध्ये जुझेप्पे सानारेली या इटालियन वैद्यांनी व इतर शास्त्रज्ञांनी काही सूक्ष्मजंतू पीतज्वरास कारणीभूत असल्याचे प्रतिपादिले होते. रीड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी केलेल्या संशोधनानंतर या सूक्ष्मजंतूंचा हा सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी केलेल्या संशोधनानंतर या सूक्ष्मजंतूंचा व पीतज्वराचा संबंध नसल्याचे दिसून आले. यानंतर लवकरच हाव्हॅनामध्ये पीतज्वराची जोरदार साथ उद्‌भवली आणि रीड व त्यांच्या सहकाऱ्यांना तिकडे पाठविण्यात आले.
तेथे गेल्यानंतर त्यांनी डासांच्या रोगवाहकतेसंबंधी संशोधन सुरू केले.

कार्लोस ह्वान फिनली या शास्त्रांज्ञानी स्टेगोमिया फॅसिएटा (नंतर ईडिस ईजिप्ताय) असे वर्गीकरण केलेल्या जातीचे डास रोगवाहक आहेत, असा सिद्धांत १८८१ मध्येच मांडला होता. रीड व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रायोगिक (प्रयोगाकरता मुद्दाम उत्पन्न केलेल्या) बावीस पीतज्वराच्या रुग्णांचा अभ्यास केला. त्यांपैकी चौदा रुग्णांत डासांच्या चाव्यांपासून, सहांत संसर्गित रक्ताच्या अंतःक्षेपणापासून (इंजेक्शनापासून) आणि दोघांत नित्यंदित (गाळलेल्या) रक्ताच्या अंतःक्षेपणापासून रोगोत्पादन केले होते. निस्यंदित रक्तापासूनही रोग उद्‌भवतो. यावरून रोग व्हायरसजन्य असल्याचे सिद्ध झाले. सात सैनिकांना संसर्गित अंथरूण-पांघरूण वापरावयास लावून केलेल्या प्रयोगांती रोग संक्रमणी पदार्थातून फैलावत नाही, हेही सिद्ध झाले. हे प्रयोग चालू असतानाच समितीचे एक सभासद जे.डब्ल्यू. लासीर यांना संसर्गित डास चावून पीतज्वर झाला व त्यातच ते मरण पावले. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या रोगाच्या स्वानुभावाच्या नोंदींचा रीड व इतरांना रोगासंबंधी उपयुक्त माहिती मिळण्यास उपयोग झाला.

रीड व त्यांच्यां सहकाऱ्यांनी पीतज्वराचे कारण अतिसूक्ष्म सूक्ष्मजीव किंवा निस्यंदनक्षम व्हायरस असून ते मानवात विशिष्ट डासांच्या (ईडिस ईजिप्तास) चाव्यातून रक्तात प्रविष्ट होतात व रोग होतो, हे निर्विवाद सिद्ध केले. रोगाचा परिपाक काल (संसर्ग झाल्यापासून ते रोगाची लक्षणे उद्‌भवतेपर्यंतचा काल) तीन ते सहा दिवसांचा असल्याचे आणि एकदा रोग होऊन गेल्यास त्याबद्दल रोगप्रतिकारकक्षमता निर्माण होते, हेही त्यांच्या प्रयोगावरून समजले. या संशोधन प्रयोगांची एकूण परिस्थिती विशेषेकरून डासामधील रोगकारकांचा अभ्यास, हे शास्त्रीय संशोधनातील एक दैदीप्यमान उदाहरण आहे. रीड यांच्या कार्याचे आर्थिक महत्त्वही फार मोठे होते. त्यांच्या संशोधनामुळे अमेरिका, मेक्सिको, वेस्ट इंडिज, पनामा कालवा या भागांतील पीतज्वराचे बहुशः उच्चाटन करता आले. हाव्हॅनात दीडशे वर्षे धुमाकूळ घालणाऱ्या या रोगाला केवळ तीनच महिन्यांत पायबंद घालता आला. पीतज्वर, आंत्रज्वर व इतर विषयांवरील रीड यांचे संशोधनत्मक अहवाल व नोंदी सुप्रसिद्ध आहेत. हार्व्हर्ड विद्यापीठाने त्यांना सन्माननीय एसए पदवीचा बहुमान दिला. वॉशिंग्टन येथील लष्करी रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. ते वॉशिंग्टन येथे मृत्यू पावले.

11/09/2023

आज '११सप्टेंबर'
(शिकागो- जागतिक सर्वधर्मपरिषद ११/९/१८९३)

शिकागो या शहरी सोमवार जागतिक सर्वधर्मपरिषद भरली होती .पूर्वेकडील आणि पश्चिमे कडील भिन्नभिन्न धर्माचे सर्वश्रेठ प्रतिनिधी एकत्र आले होते . या परिषदेत 'स्वामी विवेकानंद'उपस्थित राहून हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडणार होते "महिमाशाली मूर्ती ,भगव्या वस्त्रांनी शोभायमान ,शिकागो शहरीच्या धूसर गगनात भारतीय सुर्याप्रमाणे देदीप्यमान माथा उचलेला ,द्रुष्टीभेदक परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींसाठी राखून ठेवलेल्या खोलीत स्वामी बसलेले होते .आपल्या देशाचे मुख उजळ करणारे ,आणि सर्वांपेक्षा पुरातन धर्माचे प्रतिनिधी विवेकानंद जरी वयाने सर्वात लहान असले तरीहि प्राचीन आणि श्रेठ सत्याची जिवंत मूर्तीच असे ते इतर कोणापेक्षाही कमी मात्र नव्हते .झपाट्याने प्रगत होत असलेल्या ,उद्धत अशा पाश्चात्य जगात आपल्या योग्यतम पुत्राला दूत म्हणून पाठवून भारतमाता खरोखर गौरावान्वित झालेली आहे .त्या दूतानेहि आपल्या जन्मभूमीचा गौरव न विसरता भारताच्या वाणीची घोषणा केली .

विश्वबंधूची प्रतिष्ठ आणि प्रचार करण्यसाठी भरविण्यात आलेल्या सर्वधर्मपरिषदेसमोर सर्व प्रतिनिधींनी आपापल्या विशिष्ठ संप्रदानाचे तत्त्वञान व साधना यांचा मोठ्या पंडीत्यपूर्ण भाषेत उदघोस केले .स्वामी विवेकानंदानी श्रोत्यांना संबोधनाची हि धोपट पद्धत पहिल्यानेच उल्लंधिली केले .पंडिती भाषेत नव्हे ,तर साधारण जनतेच्या भाषेत त्यांनी जनतेला हृदयाला आवाहन केले "अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुनो "हे अपरूप संबोधन ऐकून उत्साहित सात सहस्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता."जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा पृथ्वी वरील सर्वात प्राचीन संन्यासीसंप्रदायाचे प्रतिनिधी स्वामी विवेकानंदानी पृथ्वी वरील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत केले " या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले.

हृदयाच्या अंस्तनातून निधालेले निष्कपट प्रेम आणि सत्याची वाणी यांनी जनताजनादनाच्या हृदयातील प्रीतीच्या करंज्यांचे आवरण दूर करून टाकले .कोणत्याही विशिष्ठ संप्रदायाच्या एखाद्या विशिष्ठ रूपाच्या ईश्वराचे वर्णन स्वामीजींच्या मुखातून बाहेर पडले नाही सर्व धर्माचे मुल अशा सनातन धर्मविषयी -जो धर्म देश -काळ-पत्रभेदाने निरनिराळ्या रूपांनी प्रगत करतो .आणि तरीही स्वरूपत:एकाच महान सत्यामध्ये प्रतिष्टीत असतो .त्या सर्वजनीन धर्माविषयी स्वामी तिथे बोलले .स्वामींच्या कंठाचा आश्रय घेऊन भगवान श्रीरामरामकृष्नाच्या साधनेची आणि सिद्धीची वाणी उद्घोषित झाली .नवयुगच्या मानवाने नवयुगधर्माचा प्रचार करणाऱ्या या तरुण संन्यासाचे अभिनंदन करून त्याचे स्वागत केले .जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. कुणाच्याही राष्ट्रीय ,धर्माच्या नावावर परधर्मावरील अन्याय्य बंद व्हायला हवीत ,व कुणाच्याही राष्ट्रीय ,धार्मिक व स्वातंत्र्याला धक्का न लावता एकमेकात विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी .संकुचितपणा टाकून प्रत्येकाने स्वतःच्या सामर्थ्यावर इतरांच्या ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी यत्न करावयाला हवा स्वामींनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यू यॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद् गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.

Photos from Kuber Foundation's post 06/09/2023

सर एडवर्ड व्हिक्टर अ‍ॅपलटन

भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते

जन्म - ६ सप्टेंबर १८९२

सर एडवर्ड व्हिक्टर अ‍ॅपलटन हे इंग्‍लिश भौतिकीविज्ञ. १९४७ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म यॉर्कशर मधील ब्रॅडफर्ड येथे झाला. त्यांचे शिक्षण केंब्रिज येथील सेंट जॉन्स कॉलेज मध्ये झाले, परंतु पहिल्या महायुद्धात सैन्यांत दाखल होण्यासाठी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. युद्धकालात सिग्नल ऑफिसर म्हणून काम करीत असताना त्यांना रेडिओसंबंधी आवड निर्माण झाली व युद्धानंतर केंब्रिजला परतल्यावर त्यांनी या विषयाचा अभ्यास सुरू केला. १९२० मध्ये कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत ते प्रयोगिक भौतिकीचे साहाय्यक निर्देशक आणि नंतर १९२२ मध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापक होते. १९२४-३६ पर्यंत लंडन विद्यापीठात व त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात ते भौतिकीच्या प्राध्यापकपदावर होते. वातावरणातील केन्ली हेव्हीसाइड थराचे अस्तित्व त्यांनी प्रायोगिक रीत्या दाखवून दिले व त्याची उंचीही मोजली. या थराच्याही वरती व जमिनीपासून २३० किमी उंचीवर पृथ्वी भोवती रेडिओ लघुतरंग परावर्तित करणारा आणखी एक थर अ‍ॅपलटन यांना आडळून आला. या थराला 'अ‍ॅपलटन थर’ असे नाव आता मिळालेले आहे. अशाच प्रकारच्या अनेक थरांनी आयनांबर तयार झालेले आहे, असे त्यांनी प्रयोगाद्वारे दाखवले.

त्यांना रॉयल सोसायटीचे १९२६ मध्ये सदस्यत्व व १९४१ मध्ये 'नाइट' हा किताब मिळाला. अ‍ॅपलटन यांना मिळालेल्या अनेक सन्मानांत अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ एंजिनियर्सचे मॉरिस लीपमान पारितोषिक (१९३९), इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्सचे फॅराडे मेडल (१९४६) आणि १९४७ मध्ये वातावरणासंबंधीच्या भौतिकीतील संशोधन कार्याबद्दल मिळालेले नोबेल पारितोषिक यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस ब्रिटनच्या शास्त्रीय व औद्योगिक संशोधन खात्याचे कायम चिटणीस व युद्धानंतर अणुशक्तीचा आणि कार्यक्षण शास्त्रज्ञांचा उपयोग कसा करून घ्यावा याकरिता ब्रिटिश सरकारने नेमलेल्या समित्यांचे सभासद म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते दूरचित्रवाणी समितीचे सभासद आणि नॅशनल कमिटी ऑफ रेडिओ टेलिग्राफचे चिटणीस होते. ते एडिंबरो येथे मृत्यू पावले.

Photos from Kuber Foundation's post 31/08/2023

३१ ऑगस्ट १८८९

एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला

थॉमस अल्वा एडिसने १८८९ साली आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कायनेटोग्राफ आणि कायनेटोस्कोप तयार केले. आणि याचे पेटंट ३१ ऑगस्ट १८८९ रोजी घेतले. कायनेटोग्राफने चित्रित केलेली फिल्म कायनेटोस्कोप द्वारा पीप शो सारखी दाखविली जाई. फ्रान्स मध्येही ल्यूम्येअर बंधूंनी चलत्‌चित्र प्रक्षेपक तयार केला व २८ मार्च १८९५ रोजी 'लंच अवर ॲट द ल्यूम्येअर फॅक्टरी' हा पहिला चलचित्रपट तेथील एका भागात दाखविला; तर २८ डिसेंबर १८९५ रोजी पॅरिस येथील ग्रॅंड कॅफे मध्ये करमणुकीचे एक साधन म्हणून चार्ज ऑफ द ड्रॅगन्स नावाचा सुमारे १५ मी. (५० फूट) लांबीचा एक चित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यात आला. नंतर १८९६ च्या २० फेब्रुवारी रोजी लंडनचा रॉयल पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्येही असाच एक प्रयोग करण्यात आला. चलत्‌चित्र प्रक्षेपकात महत्त्वाच्या सुधारणा टॉमस अरमॅट याने केल्या. अशा प्रकारचा सुधारलेला चलत्‌चित्र प्रक्षेपक म्हणजेच व्हिटास्कोप होय. पूर्वी दृश्यांचे चित्रीकरण सूर्यप्रकाशात उघड्या जागी होत असे. पुढे १८९३ साली फेब्रुवारी मध्ये वेस्ट ऑरेंज येथे एडिसनने अंतर्ग्रह चित्रीकरणासाठी ब्लॅक मारिआ नावाचे पहिले चित्रपटनिर्मितीगृह बांधले.

Photos from Kuber Foundation's post 25/08/2023

जेम्स वॅट

वाफेवर चालणार्‍या आगगाडीचा जनक

स्मृतिदिन - २५ ऑगस्ट १८१९

वाफेवर चालणार्‍या आगगाडीचा जनक जेम्स वॅट हे स्कॉटिश संशोधक व उपकरण निर्माते होते. त्‍यांच्या वडिलांचा जहाजबांधणीचा व बांधकामाचा व्यवसाय होता आणि त्यांची एक कार्यशाळा होती. जेम्स अशक्त असल्याने त्याचे आधीचे शिक्षण घरीच झाले. नंतर शाळेत जाऊन त्यांनी लॅटिन, ग्रीक व गणित या विषयांचे अध्ययन केले. त्यांना यंत्रोपकरणात विशेष रुची असल्याने त्यांचे खरे शिक्षण वडिलांच्या कार्यशाळेत झाले. तेथे त्यांनी स्वतः यारीसारख्या यंत्राच्या प्रतिकृती बनविल्या; तसेच जहाजावरच्या उपकरणांची माहिती करून घेतली. आधीच्या इजिनात मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा करून त्यांनी बनविलेले वाफेचे इंजिन हे शक्तिनिर्माणाचे साधन म्हणून सर्वत्र वापरले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील हे सर्वांत महत्त्वाचे साधन ठरले. वॅट यांनी त्यानंतर ग्लासगो व लंडन येथे वैज्ञानिक (गणितीय) उपकरणांच्या निर्मिती विषयीचे प्रशिक्षण घेतले. त्या काळी मुख्यतः सर्वेक्षण व मार्गनिर्देशन यांकरिता लागणारी उपकरणे बनवीत असत. १७५७ साली ग्लासगोला परत आल्यावर वैज्ञानिक उपकरणनिर्माते म्हणून त्यांनी ग्लासगो विद्यापीठात काम करण्यास सुरुवात केली. तेथे असताना त्यांनी चतुर्थ यंत्र, होकायंत्र, दाबमापक इत्यादी उपकरणे तयार केली. या काळात त्यांचा अनेक वैज्ञानिकांशी परिचय झाला. पैकी जोसेफ ब्लॅक यांच्याबरोबर त्यांची मैत्री जमली व त्या मैत्रीचा त्यांना वाफेच्या इंजिनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने खूप उपयोग झाला.

वाफेवर चालणार्‍या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट यांना ओळखले जाते. जेम्स वॅट लहानपणी अतिशय आळशी होता, असे त्याच्या न बोलण्यामुळे तरी वाटत होते. तो स्वयंपाकघरात त्याच्या आत्या बरोबर बसलेला असताना, विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते. त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती. जेम्स त्या वाफेवर एकदा कप व एकदा चमचा धरत होता व तो कप व चमचा वाफेच्या जोराने कसा खालीवर होतो, याचे निरीक्षण करत होता. त्याच्या आळशीपणा बद्दल त्याची आत्या नेहमीच कानउघाडणी करत असे. एकदा योगायोगाने जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेतील न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले. इंजिन दुरुस्त करताना जेम्सच्या लक्षात आले, की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे. विचार केल्यावर त्याच्या ध्यानात आले, की न्यूमनचा बॉयलर फार लहान आहे. ज्यात दट्ट्या असतो त्या सिलिंडराच्या घनफळाच्या ३-४ पट वाफ असली, तरच तिच्यामार्फत दट्ट्या सिलिंडराच्या टोकापर्यंत लोटला जाऊ शकेल, असे त्यांना दिसून आले. अशा रीतीने या इंजिनात वाफ मोठ्या प्रमाणात वाया जाते, हे त्यांच्या लक्षात आले.

न्यूमनच्या इंजिनमधील खाली-वर होणारा दांडा (दट्ट्या) जेव्हा खाली ओढला जाई, तेव्हा त्या सिलिंडरमधील पंपरॉड (दांडा) वर उचलला जाई. जेम्सने एका सिलिंडरमधील वाफ पंपाने दुसर्‍या सिलिंडरमध्ये नेऊन त्या सिलिंडरवर गार पाण्याचा मारा केला व त्या वाफेचे बाष्पीभवन करून, पोकळी निर्माण करायची असे ठरवले. त्यामुळे खर्च व वेळ वाचला. दोन सिलिंडरमध्ये त्याने एअरपंप बसवला. पुढे जेम्सने या इंजिनमध्ये पुष्कळ सुधारणा केल्या. न्यूमनच्या इंजिनातील दोषांवर उपाय शोधताना जेम्सला अचानकपणे इंजिनाला स्वतंत्र असा संघनक (वाफेचे द्रवात- पाण्यात- रूपांतर करणारे साधन) जोडण्याची कल्पना सुचली व हा त्यांचा पहिला व सर्वांत महत्त्वाचा शोध ठरला. सिलिंडरात वाफेचे पाण्यात रूपांतर होताना जी सुप्त उष्णता लागते ती वाया जाणे हा न्यूमन इंजिनाचा सर्वांत मोठा दोष असल्याचे त्यांच्या ध्यानी आले होते. म्हणून वाफेच्या संघननाचे काम सिलिंडराऐवजी त्याला जोडलेल्या पण त्यापासून अलग असलेल्या कक्षात करण्याचे त्यांनी ठरविले.

सिलिंडरातून बाहेर पडणारी वाफ सिलिंडरात नेऊन तेथे तिचे संघनन होते. यामुळे सिलिंडरात पाण्याच्या फवार्‍याने संघनन करताना सिलिंडर व दट्ट्या थंड होत असे आणि ते परत तापविण्याकरिता वारंवार जादा उष्णता लागते असे. संघनकामुळे ही उष्णता वाचते. याशिवाय सिलिंडर व दट्ट्या गरम राहण्यासाठी त्यांनी सिलिंडराभोवती आवेष्टन घालून त्यात वाफ सोडण्याची व्यवस्था केली. यामुळे उष्णतेची व पर्यायाने इंधनाची बचत होऊन इंजिन अधिक कार्यक्षम झाले. अशा रीतीने त्यांनी वाफ एंजिनात मूलभूत सुधारणा केल्या. मात्र वाफ एंजिनाचा शोध त्यांनी लावला हा लोकप्रिय (प्रचलित) समज चुकीचा आहे. कारण त्यांच्या जन्माच्या वेळीही वाफ एंजिने खाणीतील पाणी उपसण्यासाठी वापरात होती.

वॅट यांच्या सुधारणांमुळे वाफ इंजिन चालवायला सोपे झाले; ते अधिक खात्रीशीर रीतीने वापरता येऊ लागले व अधिक शक्तिशाली वाफ इंजिने बनविता येऊ लागली. यामुळे कागद गिरण्या, कापड गिरण्या, पिठाच्या गिरण्या, लोखंडाचे कारखाने, भट्‌ट्या, पाणीपुरवठा इ. असंख्य ठिकाणी त्याचा उपयोग होऊ लागला. व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या या इंजिनाचे औद्योगिक क्रांतीला चांगलीच चालना मिळाली. वॅट यांनी जॉन रोबक यांच्या बरोबर वाफेची इंजिने बनविण्याचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला (१७६८) आणि १७६९ साली त्यांनी या एंजिनाचे पेटंट घेतले. मात्र या धंद्यात त्यांना विशेष यश मिळाले नाही. दरम्यान अर्थार्जनासाठी त्यांनी चष्म्याच्या व्यापाऱ्या कडील नोकरी, कालव्यांचे सर्वेक्षण व खोदकाम, बंदरांतील सुधारणा वगैरे कामे केली. या कामांना कंटाळून ते १७७४ साली बर्मिगहॅमला गेले व तेथे त्यांनी मॅथ्यू बोल्टन यांच्या भागीदारीत नव्याने वाफ एंजिने बनविण्याचा उद्योग सुरू केला. त्यांची ही भागीदारी २५ वर्षे टिकली व उद्योग भरभराटीला आला. १७७६ साली त्यांनी दोन वाफ एंजिने उभारली. पैकी एक दगडी कोळशाच्या खाणीत व दुसरे लोखंडाच्या कारखान्यात उभारले. यामुळे वाफ एंजिनांना मागणी वाढली व धंद्याला ऊर्जितावस्था प्राप्त झाली.

पुढील पाच वर्षे म्हणजे १७८१ सालापर्यंत त्यांनी तांब्याच्या व कथिलाच्या खाणीतील पाणी उपसण्यासाठी असंख्य वाफ एंजिने उभारून त्यांच्या देखभालीचे काम केले. खाणव्यवस्थापकांना इंधनाच्या खर्चात बचत व्हावी असे वाटत होते. तसेच अन्य क्षेत्रांतूनही या एंजिनाला मोठी मागणी येण्याची चिन्हे दिसू लागली होती. म्हणून बोल्टन यांनी वॉट यांना एंजिनातील दट्ट्याच्या पश्चाग्र (पुढे-मागे होणार्‍या) गतीचे भुजादंडाच्या परिभ्रमी म्हणजे फिरत्या गतीत परिवर्तन करण्याची विनंती केली. वॉट यांनी हे काम १७८१ साली यशस्वीपणे साध्य केले. त्याकरिता त्यांनी तथाकथित ‘सूर्य व ग्रह दंतचक्र’ ही योजना केली. त्यामुळे एंजिनाच्या एका आवर्तनात भुजादंडाचे दोन फेरे होतात. १७८२ साली त्यांनी द्विक्रिय एंजिनाचे पेटंट घेतले. या एंजिनात दांडा रेटला व ओढलाही जातो. यासाठी दंड व दट्ट्या नव्या पद्धतीने दृढपणे जोडले जाणे आवश्यक होते. ही समस्या त्यांनी १७८४ साली समांतर गतीचा आपला शोध वापरून सोडविली. या दट्ट्याचा दांडा लंब दिशेत हालेल अशा रीतीने संयोगदांड्यांची मांडणी केली. बोल्टन यांच्या सूचनेवरून १७८८ साली वॉट यांनी एंजिनाची गती स्वयंचलितपणे नियंत्रित करणारा केंद्रोत्सारी गतिनियंता शोधून काढला व १७९० साली त्यांनी दाबमापक शोधला. यामुळे वॅट एंजिन जवळजवळ परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचले होते.

एंजिनाची शक्ती मोजण्यासाठी त्यांनी त्याची घोड्याच्या शक्तीशी तुलना केली. अशा प्रकारे हॉर्स पॉवर (अश्वशक्ती) ही संज्ञा प्रचारात आली. त्यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे १ मिनिटात ३३,००० पौंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले. दाबमापकाने एंजिनाची अश्वशक्ती मोजीत व अश्वशक्ती नुसार एंजिनाची किंमत ठरवीत. वाफ एंजिना शिवाय अभियांत्रिकी व रसायनशास्त्र या विषयांतही त्यांनी संशोधन केले होते आणि त्यांना भाषा व संगीत यांतही रस होता. त्यांचे काही महत्त्वाचे संशोधन पुढील प्रमाणे आहे.

आपले कार्यालय उबदार ठेवण्यासाठी त्यांनी वाफेच्या वेटोळ्यांचा वापर केला होता (१७८४). इंधनाची बचत करणारी भट्टी, दाब देऊन मजकुराच्या प्रती काढावयाचे यंत्र व प्रतिलिपी शाई, शिल्पाची (पुतळ्याची) पुनःनिर्मिती करणारे यंत्र, अम्लतेची चाचणी घेणारे दर्शक, नियामक झडप, क्लोरीनचा वापर करून विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करण्याचे तंत्र वगैरे त्यांचे शोध महत्त्वाचे आहेत. शिवाय पाणी हे मूलद्रव्य नसून संयुग आहे, असे सुचविणारे ते एक पहिले संशोधक होते. ग्लासगो वॉटर कंपनीचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते. विज्ञान व कला यांचा प्रसार करणार्‍या लूनर सोसायटीचे ते सदस्य होते. वॅट यांना त्यांच्या संशोधन कार्याबद्दल पुढील अनेक मानसन्मान मिळाले होते. एडिंबरो व लंडन (१७८५) येथील रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, ग्लासगो विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी (१८०६), फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्यत्व वगैरे. त्यांना जहागिरी देऊ करण्यात आली होती; पण ती त्यांनी स्वीकारली नाही. त्यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॉट (वॅट) हे नाव देण्यात आले असून वेस्ट मिन्स्टर ॲबे येथे त्यांचा पुतळा उभारला आहे. त्यांचा एक मुलगा (जेम्स) सागरी अभियंता होता व त्याने जहाजाकरिता वाफ एंजिनाचा वापर केला होता.

तू कुबेर आणि मी ही कुबेर!

The journey of Kuber is started from a Facebook group. While using social media in our day-to-day life the idea of a Change initiated and hence Shri. Santosh Lahamage decided to shape this Facebook Group.

One by one Facebook users from different cities of Maharashtra came together and started sharing the experiences and thoughts with each other. Soon, in group more than 1700 Facebook users put in something by writing “posts” on various subjects, except of course politics.

Kuber was formed by none other than Santosh Lahamage, a respected man in social media. Before forming this group, he discussed with many of his virtual friends who are now no more virtual. The members of Kuber Group meet often and shares happiness and sorrows with each other. This group encourages the members to express. Many members who were shy of writing have now become our star writers. With all these activities Kuber Foundation started participating and taking initiatives in Social Activities like, Water Conservation Project- Rajuri, Osmanabad, Save Tree Campaign, etc.

Videos (show all)

🇮🇳 भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी हाच तो खरा अभिमानाचा क्षण. भारतीय महिला हॉकी संघाने फायनलमध्ये स्पेनचा 1-0 ने पर...
4 डिसेंबर नौदल दिनभारतीय नौदलाच्या कामगिरीची आणि देशासाठीची भूमिका ओळखण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतात नौदल दिन सा...

Telephone