Swanil Foundation स्वनिल फाऊंडेशन- मुलांसोबत "वाढ"ताना.

Swanil Foundation स्वनिल फाऊंडेशन- मुलांसोबत "वाढ"ताना.

A Unique Platform For Family... *Hurry up!*
Subscribe now and get huge discounts as follows. (Excludes travel expenses.

There will be separate charges for the trip.)

*What will members get?* For parents - expert sessions on different topics, discussions on different topics, information of events, information on products needed for the family and events. special discounts on purchases, paid counselling (including special discounts for members), discounts on trips. For Kids - Songs, Storytelling, Discussions, Chat

05/09/2024
Photos from Swanil Foundation स्वनिल फाऊंडेशन- मुलांसोबत "वाढ"ताना.'s post 12/08/2024

पुण्यातल्या डॉक्टर आईवडिलांची डॉक्टर मुलगी लग्न होऊन सांगोल्यासारख्या छोट्याशा गावात जाते आणि ग्रामीण भागात शिक्षणाचे, महिला सबलीकरणाचे एक सशक्त प्रारूप विकसित करते हे तिथे जाऊन अनुभवणं खरंच प्रेरणादायी आहे. सांगोला इथल्या डॉ. संजीवनी केळकर यांनी उभ्या केलेल्या माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेविषयी मी बोलतेय. इथल्या कामाचा आवाका बघून थक्क व्हायला होतं.
अशा संस्थेत तिथल्या पालक आणि कार्यकर्त्यांसाठी सत्रं घ्यायला मिळणं हे माझंच भाग्य आहे, असं मला वाटतं. समारोप करताना संजूताई जेव्हा 'आपल्याला अगदी योग्य माणूस मिळालंय असं सत्र ऐकताना वाटलं', असं म्हणाल्या तेव्हा भरूनच आलं मला. 'स्व जाणीव' या विषयावर घेतलेलं सत्र खूप रंगलं. सगळ्या'जणी' आणि काही'जण' मोठ्या उत्साहाने यावेळेस सहभागी झाले होते. स्वतः संजू ताई सेशनचे मुद्दे लिहून काढत होत्या, आमच्या बरोबर नाचत होत्या, गात होत्या.
शाळेत पाऊल टाकल्यापासून ते निघेपर्यंत तिथे अनुभवलेल्या बारीक बारीक गोष्टींचाही त्यांनी केलेला सूक्ष्म विचार हा उत्तम व्यवस्थापन कौशल्य कसे असावे, याचं उदाहरण होता. आपले विद्यार्थी स्वावलंबी असावेत, पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन जीवन कौशल्ये त्यांनी आत्मसात करावीत यासाठी अनेक उपक्रम ही शाळा राबवते. हे प्रत्यक्ष जाऊन अनुभव घ्यावा असेच आहे. अपार आनंदाचा अनुभव घेऊन आम्हीच समृध्द होऊन परतलो.

Photos from Swanil Foundation स्वनिल फाऊंडेशन- मुलांसोबत "वाढ"ताना.'s post 11/08/2024

ज्या शाळेत आपले शिक्षण झाले आहे, त्याच शाळेत आपल्याला सेशन घेण्यासाठी बोलावलं जाणं यातला आनंद कशातच न मोजता येणारा. हा आनंद मला मिळवून दिला, भू. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या प्राचार्य गीताताई सादूल यांनी.
पद्मशाली शिक्षण संस्था ही सोलापुरातील पूर्व भागातील महत्त्वाची संस्था. तेलुगू भाषिक समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी तळमळीने काम करणारे अनेकजण या संस्थेने दिले आहेत. संस्थेची एक शाखा म्हणजे भू. म. पुल्ली कन्या प्रशाला. सध्याच्या प्राचार्य गीता ताई सादूल या सोलापुरात राहून जगभरातल्या शिक्षण प्रयोगांची दखल घेणाऱ्या आणि माझ्या मुलींना मी अभ्यासाबरोबर आणखी काय काय चांगलं देऊ शकते यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या. आपल्या मुलींनी सगळ्या क्षेत्रात जावं, एक उत्तम माणूस व्हावं यासाठी खूप तळमळीने त्या काम करतात. त्यांच्याच प्रयत्नाने या शाळेच्या पाचवी ते दहावीच्या पालकांसाठी पालकत्व कौशल्य प्रशिक्षण ओळख सत्र शनिवारी झालं. त्या आधी संस्थेचे पदाधिकारी गुल्लापल्ली सर आणि श्रीधर चिट्ट्याल सर यांच्याबरोबर बोलताना त्यांचीही तळमळ जाणवली होतीच.
या शाळेत सातवीला मी प्रवेश घेतला. सत्र घेण्यासाठी गेले होते तेव्हा जोशी मॅडम, बेंद्रे मॅडम, हंचाटे सर, नीली मॅडम आणि अन्य शिक्षकांची खूप आठवण आली. शालेय पातळीवरची नाटकाची अनेक बक्षिसे ज्यांच्यामुळे मला मिळाली त्या मीरा पांढरे - शेंडगे मॅडम यांनी नाटकाचा पाया पक्का करतानाच जीवापाड माया केली. त्यांचीही यावेळी खूप आठवण आली.
सकाळची वेळ असूनही पालक मोठ्या संख्येने सत्राला आले होते, ही विशेष कौतुकाची बाब. पुढच्या प्रशिक्षणासाठी आई - बाबा - आजी पालक उत्साही आहेत हे त्यांच्या बोलक्या प्रतिक्रियांवरून जाणवलं.

Photos from Swanil Foundation स्वनिल फाऊंडेशन- मुलांसोबत "वाढ"ताना.'s post 10/08/2024

"तुमचं सेशन किती वेळ असणार आहे? मी नोकरी करते. तेवढा वेळ मी ऑफिसमध्ये सांगून रजा टाकून येईन. मला या कार्यशाळा अजिबात बुडवायच्या नाहीयेत." सत्रानंतर एक ताई आम्हाला असं म्हणाल्यावर फार समाधान वाटलं.
कोथरूड येथील राजा श्री शिवराय प्रतिष्ठानच्या श्री सद्गुरू बाबा महाराज सहस्त्रबुध्दे विद्या मंदिर इथे तिसरी चौथीच्या पालकांसाठी स्वनिल ट्रेनिंग फाऊंडेशनतर्फे पालकत्व कौशल्य प्रशिक्षण सुरू झालं आहे. या कार्यशाळेच्या ओळख सत्राला पालकांनी खूपच सकारात्मक प्रतिसाद दिला. 100च्या वर पालक आले होते. यात बाबा पालकांची संख्या चांगली होती ही दिलासा देणारी गोष्ट.
शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती जोशी मॅडम यांची शाळेसाठी चांगलं करत राहण्याची तळमळ आम्हाला सुखावून गेली. ज्योती मॅडम आणि बाकी स्टाफ यांचे सहकार्य पण फार मोलाचे.

Photos from Swanil Foundation स्वनिल फाऊंडेशन- मुलांसोबत "वाढ"ताना.'s post 25/07/2024

'उद्या ट्रेनिंग आहे म्हटल्यावर आता काय हे, कॅन्सल झालं तर बरं होईल असं वाटलं होतं. पण दिवसभराचे ट्रेनिंग पाहून काल चुकीचा विचार केला असं वाटलं.'
अंगणवाडी ताई मनोगत व्यक्त करत होत्या आणि आमच्या मनात समाधानाचं कारंजं उसळत होतं.
ऊर्मी संस्थेच्या वतीने जून आणि जुलै महिन्यात आमच्या स्वनिल ट्रेनिंग फाऊंडेशनला अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी बोलवले होते. एकात्मिक बाल विकास विभाग मुळशीच्या माण, मुठा एक, मुठा दोन, कोळवन, अंबावने, पौड या बीटमधील सेविका प्रशिक्षणासाठी आल्या होत्या.
मुलांच्या विकासात खेळ व गाणी - गोष्टींचे महत्त्व, भाषिक विकास व त्या आधारित उपक्रम, विकासात विलंब व early intervention अशा विषयांवर या कार्यशाळा मी, सीमा महाबळेश्वरकर, लक्ष्मी पोटे अशा तिघींनी घेतल्या. मुळशी पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात खूप हसत खेळत या कार्यशाळा झाल्या. अंगणवाडी तायांच्या उस्फूर्त सहभागाने आम्ही एकदम ताजेतवाने होऊन गेलो.
अंगणवाडी तायांनी खूपच उत्साहाने यात सहभाग घेतला. त्यांनी गोष्टीचं पुस्तक तयार केलं, पथनाट्य केलं, गोष्ट सादरीकरण केलं, फुग्यांचे पपेट्स तयार केले, नाचून गाणी म्हटली. रोल प्ले सुद्धा केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित आनंदी बालशिक्षणाचे हे प्रशिक्षण खरोखर आनंदाने पूर्ण झाले.
वाड्या - वस्त्यांमधील या सगळ्या ताया किती लांबून लांबून पावसापाण्याचा प्रवास करून आल्या होत्या. तरीसुध्दा माझ्या अंगणवाडीतलं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, या मुलांना उत्तम सगळं मिळालं पाहिजे, ही तळमळ बघून अनेकदा भरून येतं. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष असताना कुठून आणतात अशी जिद्द या बाया? प्रत्येक ताई वेगळ्या ताकदीची. त्यांच्याकडून भरपूर ऊर्जा घेऊन पुढच्या कार्यशाळेसाठी आम्ही सज्ज झालो.
ऊर्मी संस्थेच्या रेश्मा ताई शेंडे, मिलिंद दादा, रवींद्र दादा, किरण, ICDS मुळशीचे CDPO गिराम सर आणि सुपरवायझर यांच्यामुळे हे शक्य झाले. त्यांच्याविषयी आणि सगळ्या अंगणवाडी तायांविषयी मनापासून कृतज्ञता !
- स्मिता पाटील.

वर्धन - पालकत्व कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा Vardhan- Parenting Skill Training Workshop 28/05/2024

# मुलं चांगली कशी शिकतील?
# मुलांची आवड कशी कळेल?
# मुलांनी किती वेळ खेळायला हवं?
# मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो, काय करायचं?
# स्क्रीन टाईम कसा कमी करायचा?
# कोणती शिक्षा मुलांना योग्य ठरेल?
# मुलांना चांगल्या सवयी कशा लावायच्या?
# कुठली शाळा मुलांसाठी चांगली?
# इच्छा असूनही मुलांसाठी वेळ देता येत नाही, मग काय करायचं?
तुमच्या मनातले आणि असे अनेक प्रश्न सोडवायला मदत करणारी कार्यशाळा.
- - वर्धन टीम
लगेच हा फॉर्म भरून नोंदणी करा.
नोंदणीची अंतिम तारीख-
गुरुवार, 30 मे 2024

वर्धन - पालकत्व कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा Vardhan- Parenting Skill Training Workshop Age Group- Parents of 3 to 12 years children Saturday, 1 June 2024 Kothrud, Pune. 3 ते 12 वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी शनिवार, 1 जून 2024 कोथरूड, पुणे. First Workshop Free पहिली कार्...

27/05/2024

लवकरात लवकर गुगल फॉर्म भरून नोंदणी करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeRyUgfuLvpXQ4VwX_x_OQtkJveJVy0p-Ji1tlDv6C8iEEEtw/viewform

24/05/2024

*स्वनिल ट्रेनिंग फाऊंडेशन आणि को- हम लर्निंग सेंटर घेऊन येत आहे पालक कार्यशाळांची अर्थपूर्ण मालिका.*

पालकत्व हे आनंददायी आहेच, पण आनंदाबरोबरच ते खूप साऱ्या जबाबदाऱ्याही घेऊन येते. या जबाबदाऱ्या आपल्या सगळ्यांसाठीच प्रत्येक टप्प्यात नवीन आणि वेगवेगळी आव्हानं घेऊन येतात. अनेकदा आपण गोंधळून जातो, निराश होतो. अशावेळेस आपल्यासोबत कुणीतरी अभ्यासक, अनुभवी, समविचारी लोक असले तर हा प्रवास जास्त आनंदाचा होईल, याच उद्देशाने 10 वर्षांपूर्वी मुलांसोबत वाढताना हे पालक अभ्यास मंडळ सुरू झाले.

आपल्या कार्यशाळांमुळे गेल्या 10 वर्षात अनेक जणांना खूप मदत झाली.
नवीन शैक्षणिक धोरण आणि काळाची गरज ओळखून आपण आपल्या कार्यशाळेचे स्वरूप आता बदलले आहे.
आपण अनुभवत असलेल्या प्रश्नांना सहजरित्या सोडवण्यासाठी आपल्याही अभ्यासात सातत्य राखणे गरजेचे आहे. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यानुसार पालकत्व बदलत जाते ते कसे - या आणि अशा सगळ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या मालिकांमधून मिळतील तसेच नक्की करायचं काय हेही स्पष्ट होईल. खूप क्रिएटिव्ह पद्धतीने या कार्यशाळा प्रत्येक महिन्यात होणार आहेत.

*त्यासाठीची पहिली कार्यशाळा शनिवार दि. 1 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.*
*ही कार्यशाळा सर्वांसाठी मोफत असणार आहे.*

अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क करावा.
9011090755, 8007999167, 9922689179

02/05/2024

Parenting a toddler? Here's a friendly reminder: some things are just part of the journey! Let go of the worry and embrace the chaos. From messy meals to temper tantrums, remember, it's all a part of their growth and development.

30/04/2024

Unlock the power of positive parenting with these 5 guiding principles!!
Let's foster a nurturing environment where love and learning thrive!

28/04/2024

Balancing work and parenthood? Here are 5 tips to help you thrive. You've got this!

26/04/2024

Ready to level up your parenting game? Here are five simple yet powerful steps to becoming a more effective parent!!!
Let's empower each other to raise happy, healthy kids!

24/04/2024

Looking to deepen that special bond with your son? Here are some tried-and-true tips to strengthen your connection!!

22/04/2024

Building a strong parent-child bond starts with simple gestures and meaningful moments. Let's nurture those connections!

20/04/2024

Parenting teens? It's all about staying connected and setting the stage for healthy growth!
From carving out reliable time together to fostering open dialogue through family meetings, being an involved and supportive parent.

18/04/2024

Parenting wisdom for the win! Remember, quality time is key. Prioritize open communication and be the shining example you want your children to follow.

11/04/2024

Unlocking endless imagination starts with these simple steps! Encourage a love for reading with plenty of books, spark creativity with free drawing, weave magical tales at bedtime, repurpose everyday items into art, and sweeten the fun with cake-making adventures! Let's nurture those young imaginations and watch them soar!

09/04/2024

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

07/04/2024

Looking for fun ways to strengthen that parent-child bond? Try these activities together: ✔️ Shopping adventures, ✔️ Brushing up together for healthy smiles, ✔️ Storytime magic with books, ✔️ Creative painting sessions, and ✔️ Playful game nights! Let's make memories and deepen those connections!

05/04/2024

Parenting can be challenging, but with these 5 simple tricks and hacks, life just got a whole lot easier! Take a moment to spend quality time, show appreciation, lend an ear, offer respect, and maintain consistent discipline. Your children will thank you, and you'll enjoy a smoother journey together!

01/04/2024

Unlocking academic success starts at home! Did you know? Research consistently highlights the crucial role of parental involvement in a child's educational journey. Let's team up and pave the way for brighter futures together!!

16/03/2024

दोस्तहो,
इथे सांगायला आनंद होतोय...
आपल्या सगळ्यांच्या निरंतर सहयोगामुळे - सक्रिय सहभागामुळे, मार्गदर्शनामुळे
14 - 15 मार्चला अटल इनक्युबेशन सेंटर, मुंबई आणि फिनॅप आयोजित महाराष्ट्रात प्रथमच झालेल्या
*आयडियाबाज 2024* या
राज्यस्तरीय संमेलनात आपल्या स्वनिल फाऊंडेशनच्या पालक अभ्यास मंडळाला विविध स्तरांवरच्या चाळणीतून Most Promising Idea चा पुरस्कार मिळाला.
Agriculture, Education, Civil Matters, Industry या चार ग्रुपमध्ये 100 जणांचं प्रेझेंटेशन झालं. त्यापैकी 4 जणांची सगळ्यांसमोर प्रेझेंटेशनसाठी निवड झाली. त्यापैकी एक आपण होतो.

10/02/2024

स्वनिल फाऊंडेशनच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, पुणे केंद्र आणि को - हम लर्निंग सेंटर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कालच्या टाईम प्लीज कार्यक्रमाला पालक व मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्वनिल फाउंडेशन तर्फे स्मिता पाटील- वळसंगकर कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत सांगताना...

Videos (show all)

स्वनिल फाऊंडेशनच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, पुणे केंद्र आणि को - हम लर्निंग सेंटर यांच्या...
स्वनिल फाऊंडेशनच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, पुणे केंद्र आणि को - हम लर्निंग सेंटर यांच्या...
From planning to execution, every detail matters!Join us behind the scenes as we put in the spadework to make our event ...
*2 ते 10 वयाची नोंदणी दुपारी बंद होईल. 10 ते 14 ची नोंदणी फक्त चालू असेल. पटकन लिंक क्लिक करा.* 📣📣📣📣📣📣📣📣रूटीनचा खूप कंटा...
*2 ते 10 वयाची नोंदणी दुपारी बंद होईल. 10 ते 14 ची नोंदणी फक्त चालू असेल. पटकन लिंक क्लिक करा.* 📣📣📣📣📣📣📣📣रूटीनचा खूप कंटा...
📣📣📣📣📣📣📣📣रूटीनचा खूप कंटाळा आलाय?तर हे वाचाच...📣📣📣📣📣📣📣📣टाईम प्लीज...थोडा वेळ काढा...स्वनिल ट्रेनिंग फाऊंडेशन साजरा करत आह...
📣📣📣📣📣📣📣📣रूटीनचा खूप कंटाळा आलाय?तर हे वाचाच...📣📣📣📣📣📣📣📣टाईम प्लीज...थोडा वेळ काढा...स्वनिल ट्रेनिंग फाऊंडेशन साजरा करत आह...

Website