Sameer Vartak

Sameer Vartak

You may also like

rajku_mar8535
rajku_mar8535

sameer vartak

Photos from Sameer Vartak's post 28/02/2024

बेमुदत उपोषण.
२८ फेब्रुवारी २०२४ सकाळी १० पासून.
वसई विरार शहर महानगर पालिका मुख्यालय.

Photos from Sameer Vartak's post 25/01/2024

सर्वांना नमस्कार,
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी सन्माननीय रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी येथे कोंकण विभागाची बुधवार दिनांक 23 जानेवारी रोजी आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते सन्मा. बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते सन्माननीय विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
या आढावा बैठकीसाठी माझ्यासोबत पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री अम्मार पटेल व श्री सच्चिदानंद बुगडे, सचिव श्री आमिर देशमुख तसेच कोकण विभागातील जिल्हाप्रमुख श्री डेरीक फूर्ट्याडो, (वसई विरार), श्री नौशाद अन्सारी (भिवंडी शहर), श्री सुरेश पाटील (पनवेल), सौ. रिना खांडेकर (कल्याण डोंबिवली), श्री मनोज डाकवे (ठाणे शहर), श्री राजीव पाटील (रायगड), श्री किरण तायडे (रत्नागिरी), श्री पांडुरंग नाटेकर (सिंधुदुर्ग) , वसई विरार जिल्हा कार्याध्यक्ष श्री संदीप किणी, उपाध्यक्ष श्री तारिक खान आणि सरचिटणीस श्री संकेत वसईकर तसेच मकसुद पटेल अशी पर्यावरण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

समीर सुभाष वर्तक
प्रदेशप्रमुख
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,
पर्यावरण विभाग

Photos from Sameer Vartak's post 11/12/2023

सर्वांना नमस्कार,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज नागपूर येथे खोकेबाज, धोकेबाज, लबाड राज्य सरकारच्या विरोधात लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य असा "हल्लाबोल मोर्चा" काढण्यात आला होता.
या "हल्लाबोल मोर्चात" मी स्वतः पर्यावरण विभागाच्या प्रदेश पदाधिकारी , अनेक जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होतो.

समीर सुभाष वर्तक
प्रदेश प्रमुख
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,
पर्यावरण विभाग

Photos from Sameer Vartak's post 10/12/2023

सर्वांना नमस्कार,
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा सन्माननीय सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोलेसाहेबांच्या मार्गदर्शनात तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्मा. श्री प्रमोद मोरे (प्रशासन व संघटना) यांच्या सूचनेनुसार शनिवार दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी सर्व विभाग व सेलच्या समन्वयक सन्मा. प्रज्ञाताई वाघमारे यांच्या संकल्पनेतुन सर्व विभाग व सेलच्या जिल्हा प्रमुख , तालुका प्रमुख आणि जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरास वसई विरार शहर जिल्ह्यापासून सुरवात झाली आहे. यावेळी सन्मा. प्रज्ञाताई वाघमारे यांनी PPT द्वारे सर्व विभाग व सेलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला शासकीय योजना आणि त्यांना सहकार्य करून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील सर्व खेड्यापाड्यात पोहोचविण्यासंदर्भात फार छान आणि योग्य असे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत सन्मा. प्रज्ञाताई वाघमारे आणि उपस्थित विभाग व सेल च्या प्रदेश प्रमुखांचे पर्यावरण विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि पर्यावरण विभाग प्रदेश प्रमुख म्हणून उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि वसई विरारचे प्रभारी श्री जोजो थॉमस, प्रदेश सरचिटणीस श्री विजय पाटील , वसई विरार शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री ओनिल आल्मेडा, विविध विभाग व सेलचे नियोजन पाहणाऱ्या श्रीमती सुरेखा बांदिवडेकर विभाग व सेलचे प्रदेश प्रमुख अनुक्रमे श्री छगन पाटील, श्रीमती विद्या कदम, श्री विष्णू शिंदे, श्री नितिन पाटील, श्री मार्तंड नाखवा, श्री जनक व्यास, डॉ दीपा चक्रबोर्थी, श्री शैलेंद्र हंकर, तसेच पर्यावरण विभाग प्रदेश सरचिटणीस श्री टोनी डाबरे, श्री अभिजित घाग , श्री अम्मार पटेल, प्रदेश सचिव श्री आमीर देशमुख, वसई विरार जिल्हाप्रमुख श्री डेरीक फुरटॅडो, जिल्हा कार्याध्यक्ष श्री संदीप किणी, जिल्हा उपाध्यक्ष श्री तारिक खान, श्री आमिर सय्यद, श्री संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री सनी गुरव, श्री जमील देशमुख, श्री संकेत वसईकर, सचिव श्री संदेश भोईर,श्री सुनील डावरे, श्री अशोक गुरव हेदेखील उपस्थित होते.

समीर सुभाष वर्तक
प्रदेश प्रमुख
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,
पर्यावरण विभाग

09/12/2023

आमच्या नेत्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आधारस्तंभ, श्रीमती सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Photos from Sameer Vartak's post 08/12/2023

सर्वांना नमस्कार,
बंगली वेल्फेअर ट्रस्ट आणि रंजन क्रीडा मंडळ आयोजित "वसई आयडॉल 2024" च्या लोगो चे अनावरण माझ्या हस्ते मंगळवारी 5 डिसेंबर रोजी बंगली वेल्फेअर ट्रस्टच्या कार्यालयात झाले. तसेच या स्पर्धेच्या गुगल लिंकचे उदघाटन प्रसिद्ध उद्योजक श्री ऑल्विन परेरा यांनी केले. यावेळी वसईची गानकोकीळा, प्रसिद्ध गायिका कु. लॅरिसा आल्मेडा यादेखील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसई आयडॉल कार्यकारी मंडळ कार्याध्यक्ष श्री रॉबर्ट (रॉबी) आल्मेडा व सचिव श्री अजित चौधरी यांनी या स्पर्धेची रूपरेषा सादर केली. यावेळी बंगली वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष श्री पीटर ब्रिटो, रंजन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री विपुल चौधरी, बंगली शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष श्री जॉर्ज डायस, वसई आयडॉल 2024 च्या लोगो चे निर्माते श्री विक्रांत चौधरी तसेच या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माझ्यासोबत काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

समीर सुभाष वर्तक

Photos from Sameer Vartak's post 06/12/2023

सर्वांना नमस्कार,
तेलंगणा विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाने सत्तेत असलेल्या भारतीय राष्ट्रीय समितीचा BRS दणदणीत पराभव करून तेलंगणा राज्याची सत्ता मिळवली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी AICC तर्फे मला निरीक्षक म्हणून नेमलेल्या 22 धर्मपुरी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार अडलूरी लक्ष्मण कुमार यांनी 21692 मतांच्या फरकाने विद्यमान मंत्र्यांचा पराभव केलेला आहे.
या विजयासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेष करून तेलंगणा राज्यातील सर्व मतदारांचे हार्दिक अभिनंदन !!

समीर सुभाष वर्तक

Photos from Sameer Vartak's post 04/12/2023

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सन्माननीय फादर दिब्रिटो !!

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, हरित वसईचे प्रणेते, जेष्ठ साहित्यीक आणि माझ्यासारख्या असंख्य तरुण व सामाजिक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक सन्माननीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना 80 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

समीर सुभाष वर्तक

Photos from Sameer Vartak's post 01/12/2023

सर्वांना नमस्कार,
प्रचंड उत्साहात तेलंगणातील निवडणूक संपन्न झालेली आहे आणि आता पाचही राज्यांच्या निकालाची उत्सुकता संपूर्ण भारत देशाला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे माझी ज्या 22-धर्मपुरी विधानसभेच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली होती. तिथे 100 % काँग्रेसचे उमेदवार सन्मा. श्री अडलुरी लक्ष्मण कुमार जिंकून येत आहेत.
मी 27 ऑक्टोबर पासून सतत या मतदारसंघात होतो. आजही दिवसभर संपूर्ण मतदारसंघ फिरलो आणि आता माघारी म्हणजेच घरी येण्यासाठी निघालो आहे.
Bye bye TELANGANA..........

समीर सुभाष वर्तक

Photos from Sameer Vartak's post 29/11/2023

सर्वांना नमस्कार,
तेलांगणा विधानसभेचा प्रचार थांबलेला आहे. आता लक्ष उद्या गुरुवारी 30 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानावर.

समीर सुभाष वर्तक

28/11/2023
Photos from Sameer Vartak's post 28/11/2023

सर्वांना नमस्कार,
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे माझी तेलंगणा विधानसभेच्या 22 धर्मपुरी विधानसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून नेमणूक झाल्यापासून मागील 30 दिवसांपासून (दिवाळीचे चार दिवस सोडून) मी प्रचारासाठी तेलंगणात असून आज संध्याकाळी प्रचार संपत आहे म्हणूनच पूर्वसंध्येला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि संघटनेचे प्रमुख सन्मा. श्री के सी वेणूगोपाल यांनी ऑनलाईन मिटिंग घेऊन आम्हाला पुढील दोन दिवसांच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या.
या ऑनलाईन मिटिंगमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC) सदस्या श्रीमती दीपा दासमुन्शी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री श्री नसीम खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा पेदापल्ली लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी मा. आमदार श्री मोहनदादा जोशी आणि काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.

समीर सुभाष वर्तक
प्रदेश प्रमुख
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
पर्यावरण विभाग

26/11/2023

!! सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

26/11/2023

!!! सर्व शहिदांना विनम्र अभिवादन !!!

25/11/2023

सर्वांना रविवार दिनांक 26 नोव्हेंबर या 74 व्या संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे सस्नेह निमंत्रण !!

19/11/2023

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न 'स्व. इंदिराजी गांधी' यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Photos from Sameer Vartak's post 15/11/2023

सर्वांना नमस्कार,
मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर आधुनिक भारताचे शिल्पकार, माजी पंतप्रधान दिवंगत पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती तसेच भारत देशातील दिवाळी हा मोठा सण त्यानिमित्ताने पेल्हार येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पर्यावरण विभागातर्फे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख श्री समीर सुभाष वर्तक, प्रदेश सरचिटणीस श्री टोनी डाबरे आणि श्री अभिजित घाग, वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाप्रमुख श्री डेरीक फुरटॅडो, जिल्हा कार्याध्यक्ष श्री संदीप किणी, जिल्हा उपाध्यक्ष श्री तारिक खान, श्री संजय पाटील व नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष प्रो. मॅकनोबेल डिक्रूझ, जिल्हा सरचिटणीस श्री सनी गुरव व श्री राहुल देवकर, जिल्हा सचिव श्री संदेश भोईर, नवनियुक्त श्री निलेश देसाई, काँग्रेसच्या विध्यार्थी संघटनेचे (NSUI) वसई विरार जिल्हाध्यक्ष श्री रितेश सोलंकी व उपाध्यक्ष श्री साबीर शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री देवा तरे, श्री रोहित किणी, श्री दिनेश वझे, श्री अभिजित राऊत, श्री जयेश पाटील, श्री रोशन मिश्रा, श्री संदीप पाटील उपस्थित होते.

समीर सुभाष वर्तक

Photos from Sameer Vartak's post 14/11/2023

सर्वांना नमस्कार,
आज आधुनिक भारताचे शिल्पकार आणि प्रथम पंतप्रधान सन्मा. पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्ताने काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते , माजी राज्यसभा खासदार आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू सन्मा. डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी नालासोपारा येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज सामवेदी ब्राह्मण संघाच्या शिक्षण समिती आयोजित सत्कार समारंभात अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार सन्मा. डॉ भालचंद्र मुणगेकर नालासोपारा येथे आले होते त्यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख श्री समीर सुभाष वर्तक, वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश पाटील, पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री अभिजित घाग, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री अर्षद डबरे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री साबीर शेख, नालासोपारा ब्लॉक अध्यक्ष जरी शहझाद मलिक, जिल्हा सरचिटणीस श्री अश्रफ भाई, सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री आलम अन्सारी आणि काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी माझ्या पत्नी ऍड ज्योस्तना समीर वर्तक ह्यासुद्धा उपस्थित होत्या.

समीर सुभाष वर्तक

Photos from Sameer Vartak's post 22/10/2023

सिस्टर मारिया स्क्रिमीन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

Sr. Maria Scremin has passed into eternity!

We thank God for the gift she has been to us in India and specially in Manickpur(Vasai) these past years ......
May God grant her eternal bliss!✝️✝️✝️

Photos from Sameer Vartak's post 23/08/2023

सर्वांना नमस्कार,
मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी नवनियुक्त काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री सन्माननीय चंद्रकांत हंडोरे तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रशासन व संघटन प्रमुख सन्माननीय प्रमोद मोरे आणि सर्व विभाग व सेलच्या विकासासाठी झटणाऱ्या सन्माननीय प्रज्ञाताई वाघमारे यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुखांचे प्रशिक्षण शिबिर टिळकभवनात संपन्न झाले . या प्रशिक्षण शिबिरातील पर्यावरण विभागाचा प्रमुख म्हणून सहभागी होऊन उपस्थित जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले.
यावेळी माझ्यासोबत पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री धनंजय पाटील, प्रदेश सचिव श्री अभिजीत कांबळे तसेच जिल्हाध्यक्ष अनुक्रमे कोल्हापूर ग्रामीण श्री प्रदीप डाखरे, कोल्हापूर शहर श्री सौरभ मोहिते आणि सांगली ग्रामीण श्री चेतन पाटील हे उपस्थित होते.

समीर सुभाष वर्तक
प्रदेश प्रमुख
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,
पर्यावरण विभाग

Photos from Sameer Vartak's post 22/08/2023

सर्वांना नमस्कार

*वसई - निर्मळ - आगाशी या राज्य महामार्गावरील भुईगाव येथील पेट्रोल पंपाचे रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम आणि वाहनांमूळे वाहतुकीला होणारा अडथळा दूर करावा अन्यथा "रास्ता रोको आंदोलन*

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस उपायुक्त यांना भेटून भुईगाव येथील पेट्रोलपंप मुळे रस्त्यावरील वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी जबाबदार पेट्रोल पंप मालकांवर कायदेशीर कारवाई करून रस्ता मोकळा करावा अन्यथा "रास्ता रोको" करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
तसेच वसई निर्मळ- आगाशी-वसई या राज्य महामार्गावर निर्मळ ते गिरीज डोंगरीपर्यंत अनेक व्यावसायिकांनी अनाधिकृतपणे अतिक्रमण केलेले आहे. तसेच डोंगरी भागात नैसर्गिकरीत्या पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या मार्गावर अनाधिकृत मातीभराव व बांधकाम केल्यामुळे सातत्याने रस्ता पाण्याखाली जात आहे. तरी अनाधिकृत वापर करणाऱ्या सर्वांवर कारवाई करून रस्ता मोकळा करावा आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचीही मागणी करण्यात आली.
भूईगाव येथे नव्याने तयार झालेल्या पेट्रोलपंप ज्याने अगोदरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या राज्य महामार्गावर नियमबाह्य अनाधिकृत बांधकाम केलेले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य महामार्गाचा वाहने उभी करण्यासाठी अनधिकृतपणे वापर करीत आहे. ज्यामुळे नियमित वाहतुकीला प्रचंड अडथळा होत असून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे आणि छोटे-मोठे अप‌घातही होत आहेत अशी माहिती श्री समीर वर्तक यांनी दिली.
काँग्रेसच्या या शिष्टमंडळात पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री टोनी दाबरे आणि श्री अभिजीत घाग, वसई विरार शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री डेरीक फूर्ट्याडो, उपाध्यक्ष श्री संजय पाटील, सचिव श्री संदेश भोईर तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश वानगडे, श्री वैभव चौधरी, श्री संदेश गवळी आणि श्री रोशन मिश्रा उपस्थित होते.

Photos from Sameer Vartak's post 09/08/2023

सर्वांना नमस्कार,
आज 9 ऑगस्ट "जागतिक आदिवासी दिन" आणि "ऑगस्ट क्रांती दिन" या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने बोळींज, विरार येथे "आदिवासी एकता परिषद -भूमिसेना" आयोजित भव्य कार्यक्रमात उपस्थित राहून सर्व आदिवासी बंधू-भगिनींना शुभेच्छा देतांना मार्गदर्शन केले. हा भव्य कार्यक्रम आदिवासी एकता परिषदेचे, पालघर जिल्हा उपाध्यक्ष आणि वसई तालुका अध्यक्ष श्री दत्ता सांबरे आणि तालुका कमिटीने आयोजित केला होता. यावेळी माझे मार्गदर्शक आणि युवाभारतचे श्री शशी सोनवणे आणि कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थितांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. तसेच विविध विभागातील मुलामुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

समीर सुभाष वर्तक

Photos from Sameer Vartak's post 08/08/2023

सर्वांना नमस्कार,
सोमवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री नानाभाऊ पटोलेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली "मंडळ आयोग लागू दिनानिमित्त" मंडल स्तंभ दोदडगाव, जालना येथील "सामाजिक न्याय मेळाव्यास" उपस्थित होतो. 20 वर्षांपूर्वी या मंडल स्तंभाची स्थापना माजी आमदार डॉ नारायणराव मुंढे यांनी केली होती. यावेळी मला मेळाव्यात उपस्थित नागरिकांना काँग्रेसप्रेमी नागरिकांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. ह्या मेळाव्याचे संयोजक विधानपरिषद आमदार श्री राजेशभैया राठोड आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री सत्संग मुंढे यांनी उत्तम नियोजन केले होते. त्यांना पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेश गवळी यांनी मोलाचा हातभार लावला.
या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री धनंजय पाटील, प्रदेश सरचिटणीस श्री अभिजित घाग, वसई विरार काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री डेरीक फुरटॅडो आणि सहकारी मित्र श्री दर्शन राऊत माझ्यासोबत होते.

समीर सुभाष वर्तक
प्रदेश अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,
पर्यावरण विभाग

Photos from Sameer Vartak's post 05/08/2023

सर्वांना नमस्कार,
शुक्रवार दि.०४/०८/२०२३ रोजी ठरल्याप्रमाणे मा. आयुक्तांचा देवतलाव, गिरीज, डोंगरी, निर्मळ, सोपारा आणि बोळींज खारोडी याठिकाणी पाहणी दौरा संपन्न झाला. तसे हे सगळे काही वरातीमागून घोडे हा प्रकार होता परंतु काही का असेना आयुक्त येऊन गेले.
मा. आयुक्तांनी सबंधित विभागाच्या सहा. आयुक्त व उपअभियंता यांना त्या भागामध्ये आतापर्यंत केलेल्या कामांची प्रस्तावित कामांची माहिती घेऊन प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मा. आयुक्तांच्या या संपूर्ण दौऱ्यात मी स्वतः उपस्थित होतो तसेच सोबत बसिन कॅथॉलिक को ऑप बँकेच्या माजी अध्यक्षा कुमारी डॉमिनिका डाबरे, काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस श्री टोनी डाबरे, व श्री अभिजित घाग, बसिन कॅथॉलिक बँकेचे संचालक श्री एव्हरेस्ट डाबरे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री डेरीक फूर्ट्याडो, सामाजिक कार्यकर्ते श्री दर्शन राऊत, तसेच श्री जॉन परेरा व श्री पायस मच्याडो आणि प्रत्येक विभागातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

समीर सुभाष वर्तक
प्रदेश अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,
पर्यावरण विभाग

26/07/2023

माळीण, तळई , इर्शाळवाडी आणि पुढे ..........

कशिद-कोपर गावाला मृत्यूच्या दाढेत ढकलून महाराष्ट्र सरकार , मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री शांत बसून कश्याची वाट पाहत आहेत ???

समीर सुभाष वर्तक

Photos from Sameer Vartak's post 22/07/2023

दोन तरूण मुली, तीस चाळीस तरुणांचा जमाव दोघीवर बलात्कार करतो, नंतर त्या दोघींची रस्त्यावरून नग्न धिंड काढतो,

यामध्ये सहभागी असणारे तरूण जर भारतीय आहेत तर या देशांतली कोणती विचारधारा त्यांना हा आनंद घ्यायला भाग पाडते. कोणता धर्म त्यांना असं करणं ठीक समजतो, कोणती शाळा, कोणते शिक्षण आणि कोणते आई वडील असे हिडिस संस्कार करतात ?

विवश तरूणींच्या शरीराला नको त्या ठिकाणी स्पर्श करणार्या एकाला पण पुरूष असल्याची लाज का वाटली नाही ?

असा कोणता पराक्रम करीत होते ते, असं कोणतं शौर्य गाजवत होते ते, या असल्या औलादी आईच्या गर्भातच का मेल्या नाहीत ?
जगून उपयोग तरी काय आहे त्यांचा ?

आपल्या आसपास इतकी घाण असेल तर चिंताजनक आणि संतापजनक आहे सगळं!

Photos from Sameer Vartak's post 22/07/2023

सर्वांना नमस्कार,
गुजरात विधानसभेचे आमदार, काँग्रेसचे नेते आणि माझे मित्र सन्माननीय श्री जिग्नेश मेवाणी आज मुंबई विमानतळावर त्यांच्या प्रवासादरम्यान मिळालेल्या वेळेत आमची भेट झाली राजकारण आणि भविष्यासंदर्भात चर्चा झालीच पण मनसोक्त गप्पागोष्टीही झाल्या.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवभारतचे श्री शशी सोनवणे आणि माझे सहकारी श्री अम्मार पटेल हेदेखील सोबत होते.

समीर सुभाष वर्तक

21/07/2023
Photos from Nana Patole's post 20/07/2023
Want your public figure to be the top-listed Public Figure in Vasai?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

आरे जंगल वाचवा !! SAVE AAREY FOREST !!
आरे जंगल वाचवा !! SAVE AAREY FOREST !!
आरे जंगल वाचवा !! SAVE AAREY FOREST !!
HAPPY DIWALI

Category

Telephone

Address

Vasai

Other Politicians in Vasai (show all)
Rahul Sahebrao Sasane Rahul Sahebrao Sasane
Vasai, 401208

उप तालुका प्रमुख बोईसर विधानसभा

Kishor Patil Kishor Patil
Vasai, 401209

Corporater Ward 38 | VVCMC |

Pravin Bhoir MNS Vasai Pravin Bhoir MNS Vasai
Gokhivare
Vasai

प्रविण भोईर

Aparna Patil Aparna Patil
Bhabhola Chulna Road
Vasai, 401202

Official page of Aparna Patil.

Vidya Chetan Patil Vidya Chetan Patil
Arvind Motor Driving School, Parnaka
Vasai, 401201

Raju Isai Raju Isai
Vasai

Working at Bahujan Vikas Aghadi

Shahzad Malik Fans Shahzad Malik Fans
Gala No. 08 WakanPada
Vasai, 401209

Boisar Assembly Congress Committee President Shahzad Malik

स्वप्नील अविनाश बांदेकर, तालुका प्रमुख स्वप्नील अविनाश बांदेकर, तालुका प्रमुख
Swapnil Bandekar Office, Above Kaka Bakery, Beside Vartak Tower, Tulinj Road, Nallasopara (E)
Vasai, 401209

मा. नगरसेवक व नालासोपारा शिवसेना उपशह?

Bjp4vasaivirar Bjp4vasaivirar
Vasai Virar
Vasai, 401203

भाजप वसई विरार जिल्हा अधिकृत फेसबुक पेज जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्र पाटील जिल्हा संयोजक केतन गांधी

Nilesh Tendolkar - निलेश तेंडोलकर Nilesh Tendolkar - निलेश तेंडोलकर
Vasai

शिवसेना तालुका प्रमुख, वसई जिल्हा पालघर

Madan Murukate Madan Murukate
Pelhar Road
Vasai, 401208

Politician