Shrikant dhote

my persnoal page

06/12/2023

पुस्तकांशी केली मैत्री,
व्यवस्थेला दिला शह,
भिमा तुझ्यामुळेच रूजला,
समतेचा प्रवाह....

वर्णव्यवस्थेची येथे,
घट्ट होती विण,
सोडविण्या तिजला तु,
झटला क्षणोक्षण,
वर्णव्देशांच्या विरोधाचा,
सोसला तु दाह.....

जातीपाशातुन सोडविण्याशी,
स्विकारला बुध्द,
स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये,
रूजविण्या कटीबध्द,
धर्मांतर करूनी तु,
धर्मव्यवस्थेशी केला द्रोह....

शिक्षणासी मानीले तु,
वाघीणीचे दुध,
त्या बोधानेच चाखतो सगळे,
उत्कर्षाचे मध,
त्या मंत्रानेच मिळाली आम्हा,
उध्दाराची राह....

सर्वसमावेशक केले तु,
देशाचे संविधान,
देशातला प्रत्येक माणूस,
लेखला समान,
कार्य केले जनतेसाठी,
स्वतः चा ठेवला नाही मोह.....

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जिल्हा वर्धा
8087332593

20/11/2023
19/11/2023

आईनेने मुझे खुदको जो दिखाया,
मै किसिको आईना दिखा न पाया ..
स्व....
श्रीकांत धोटे

Photos from Shrikant dhote's post 14/11/2023

Diwali moment's

11/11/2023

श्री गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक, राष्ट्रसंतांच्या साहित्याविषयी अपार निष्ठा असलेले, ज्यांच्या वागण्याबोलण्यातुन फक्त सेवामंडळाचा विचार प्रकटतो असे गुरूदेव सेवा मंडळ, गडचिरोली जिल्हा सेवाधिकारी आद. डॉ. शिवनाथजी कुंभारे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.....

10/11/2023

माणसच हल्ली,
विसरत चाललीत वास्तव
अवास्तव स्वार्थास्तव
नुसताच कृत्रीम रंग
विकतचा बेरंग
जातोय ख-यापासुन दुर,
हळुहळू भरपुर,
बळी पडतोय
कल्पनेच्या इमल्यांना
जाहिरातीच्या जुमल्यांना
जाहिरातीत रंगतो
स्वप्नात दंगतो
रोशनाईच्या झगमगाटात,
हळुच तुंबतो....

एकदा तुंबला की,
कुठे मोकळी वाट,
नवनवीन प्रश्नांची,
गर्दी भरमसाठ,
जुन्याच प्रश्नांची,
सुटत नाही गाठ
गोंधळतो इतके की,
उभेही राहता येत नाही ताठ....

स्वप्नांच्या उता-यात,
परिस्थितीचे निखारे,
विचारांचे वादळ,
सैरावैरा फिरे,
होता सगळी घुसळण,
मिळु शकते लोणी,
पुन्हा चुकलो जर,
विचारणार नाही कोणी....

म्हणुनच

परिस्थितीचे चटके,
विचारांचे खटके,
यातुनच होते,
सत्यतेची जाण,
बेभान मनाला,
थोडं येत भान,
सापडायला लागतं,
हरवलेलं पान,
तेव्हाच येतं
वास्तवाचं भान....

पण
कदाचित
हेही असेल अवास्तव,
वास्तव !

श्रीकांत दिगांबरराव धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
8087332593/9511773236

03/11/2023

क्रांतीकारी राष्ट्रसंत

31/10/2023

वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला लेख

विश्वाच्या अधिष्ठानावर कष्टकऱ्यास नेऊन बसविणारा महात्मा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

28/10/2023

*तु विश्वाचे अधिष्ठान*

भारतात प्राचिन काळापासुन काही अंशी नागर संस्कृती होती त्याचे अवषेश हडप्पा संस्कृतीच्या रुपाने आपणाला बघायला मिळाले. त्यानंतर राजे महाराजांच्या काळातही नागरी संस्कृती होती. ब्रिटीशांच्या आगमनानंतर औघोगीकरणामुळे नागरीकरणाला मोठया प्रमाणात चालना मिळाली. प्राचिन काळापासुन अर्वाचीन काळापर्यंतचा विचार केल्यास आर्थीक, सामाजीक व शैक्षणीकदृष्टया नागरीकरणाचे प्रमाण कमी असले तरी ग्रामाीण व नागरी हा भेद प्राचीन काळापासुन असल्याचे स्पष्ट होते. वंदनिय महाराजांनी ज्या काळात ग्रामगीता हा ग्रंथ लिहीला त्या काळात औघोगीकरणाचे व नागरीकरणाचे वारे वाहण्यास गती येत होती असे दिसुन येते त्यामुळे राष्टसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ निर्मीतीमागचे कारण स्पष्ट करतांना महाराज म्हणतात,
ईश्वरे व्यापीले हे विश्व् | म्हणोनी जगची आम्हा देव |
विश्वाचा मुळ घटक गाव | ग्रामगीता त्याचेसाठी ||
ईश्व्र हा सर्वाठायी आहे. विश्वाच्या प्रत्येक कणात देव आहे. त्याच्या उत्पत्तीचे मुळ हे गाव आहे. त्या गावातील लोकांना कल्याणाचा मार्ग दाखविण्यासाठी हा ग्रामगिता ग्रंथ आहे. गावातील सर्व घटकांचे कल्याण करण्यासाठी ग्रामगीता आहे. जसे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास भगवतगितेच्या रुपाने उपदेश देवुन कर्तव्याप्रती जागरुक केले होते त्याचप्रमाणे प्रत्येक गावास व गावातील प्रत्येक माणुस आपल्या स्वत:च्या कल्याणाप्रती जागरुक व्हावा याकरीता ग्रामगीता हा ग्रंथ आहे असे सांगतांना महाराज म्हणतात,
गिता बोधीली अर्जुनाला | ग्रामगीता ही सर्व ग्रामाला |
राहु नये कुणी मागासला | म्हणोनी बोलीला देव माझा ||
राष्टसंत तुकडोजी महाराजांनी विश्वकल्याणाची संकल्पाना ही ग्राम हे केंद्र माणुनच मांडली आहे.विश्वाचे कल्याण साधायचे असेल तर गावे ही सर्व दृष्टीने समृध्द झाली तर आणी तरच या अखील विश्वाचे कल्याण होणार आहे. विश्वकल्याणाची संकल्पना मांडतांना महाराजांनी पायावर भर दिला आहे आणी जोपर्यंत पाया मजबुत होणार नाही त्याशिवाय विश्वकल्याणाचा मार्ग प्रशस्त् होणार नाही. या विश्वातील सर्व माणुस आर्थीक दृष्टीनेच नाही तर सर्व दृष्टीने समृध्द व्हावा याकरीता ग्रामगिता हा ग्रंथ वंदनिय महाराजांनी निर्मीला आहे. महाराजांनी एकुण 41 अध्यायाचा ग्रामगीता ग्रंथ लिहील्यानंतर हा ग्रामगीता ग्रंथास एक 07 ओव्यांची अर्पण पत्रीका लिहीली आहे. आणी त्यात खऱ्या ग्रामनाथाच्या किंवा गावकऱ्यांच्या व्यथेचे चित्रण महाराजांनी केले आहे. ग्रामनाथाच्या व्यथेचे चित्रण करतांना महाराज अर्पण पत्रीकेत म्हणतात,
सर्व ग्रामासी सुखी करावे | अन्न् वस्त्र पात्रादी द्यावे |
परि स्वत: दु:खची भोगावे | भुषण तुझे ग्रामनाथा ||
कष्ट करोनी महाल बांधशी | परि झोपडीही नाही नेटकीशी |
स्वातंत्र्याकरीता उडी घेशी | मजा भोगती इतरची ||
राष्टसंतांच्या समग्र साहित्यात ग्राम व ग्रामनाथ हा केंद्रबिंदु आहे. सर्वांना अन्नधान्य पुरविणारा शेतकरी शेतात राब राब राबुन अन्नधान्य् पिकवितो, जगाची भुक भागवितो. महाल, राजवाडे, मोठमोठया इमारती बांधणारा मजुरास स्वत:चे घर नसते. या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामास या देशातील सर्वसामान्य् माणसाने बळ दिलं, आपल्या जिवाची बाजी लावली, प्रसंगी प्राणही समर्पीत केले पण स्वातंत्र्याच्या फळाचा त्याला किती फायदा झाला हा सुध्दा प्रश्न महाराज उपस्थित करतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लिहिलेल्या एका भजनात महाराज म्हणतात,
अब तो आया है स्वराज, अपना सुंदर गाव बनालो,
पहिला धर्म बढाओ किसानी, सुधरो अपनी घरजिंदगानी…
तुकडोजी महाराज हे संत असले तरी ते फक्त् आध्यात्मिक संत नव्हते तर वास्तववादी व पोटाची भुक जानणारा संत होता. ज्याने कधीही कर्तव्यकर्मासच रामनाम संबोधले. आणी खरे कर्तव्य करणाराच दु:ख भोगत आहे. त्याविषयीचे भाव त्यांच्या आचार विचारातुन प्रगट होतांना दिसुन येते त्यांनी तर ग्रामनाथास, शेतकऱ्यास, कष्टकऱ्यास ग्रामगिता अर्पण करतांना,
तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो | सकळांचे लक्ष तुजकडे वळो मानवतेचे तेज झळझळो | विश्वामाजी या योगे ||
राष्ट्रसंतांच्या साहित्यात श्रमप्रतिष्ठेचे मोल हे जपले आहे व तशी जाण संपुर्ण समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या साहित्यातुन केला आहे. श्रमीकांची श्रीमंती ही गरिबाचे रक्त् आहे तर श्रम ही खरी गावाची देशाची दौलत आहे असे महाराज म्हणतात. अण्णाभाउु साठे जसे म्हणतात की, पृथ्वी हे शेषनागाच्या मस्तकावर नसुन कष्टकऱ्यांच्या घामावर उभी आहे तोच विचार महाराज आपल्या संपुर्ण लिखाणात मांडतात.आपण मानवतेच्या, मानवी हक्काच्या बाता मारतो पण जेव्हा या विश्वातील कष्टकऱ्यांच्या कष्टाचे खरे मोल होईल त्याच दिवशी मानवता खऱ्या अर्थाने या सृष्टीवर येईल आणी हे सांगतांना महाराज या कष्टकऱ्यास ग्रामनाथास विश्वाच्या अत्युच्च् शिखरावर घेउुन जातांना व ग्रामगीता ग्रामनाथास अर्पण कशासाठी हे स्पष्ट करतांना महाराज म्हणतात,
म्हणोनी तुजसी करीतो अर्पण | तु विश्वाचे अधिष्ठाने |
तुझेच व्हावे आधि उत्थान | विश्वामाजी म्हणोनिया ||
यामध्ये अधिष्ठान हा शब्द अतिशय महत्वाचा आणी श्रमाचे खरे मोल जानणारा आहे. हा शब्द महाराज जाणीवपुर्वक वापरतात. अधिष्ठान या शब्दाचा अर्थ पहायला गेलो तर अधिष्ठान म्हणजे आधार ज्यावर दुसरी कोणतीही वस्तु आधारलेली असते. अधिष्ठान म्हणजे श्रध्दास्थान ज्यावर आपला विश्वास असतो. मुख्यत: आपण आपल्या घरातील देव्हाऱ्यास, ज्याठिकाणी आपले श्रध्दास्थान असते त्यास अधिष्ठान असे म्हणतो. राष्टसंतांनी सामुदायीक प्रार्थना सांगीतली त्यात सामुदायीक प्रार्थनेप्रसंगी कोणत्याही देवीदेवतेची मुर्ती, फोटो न ठेवता त्याठिकाणी एक आसन ठेवुन त्या अधिष्ठानावर आपण आपल्या पुज्यनियास पहावयाचे आहे. आपले अधिष्ठान ते असते ज्याविषयी आपले सर्वस्व् समर्पीत असते. त्या अधिष्ठानावर तुकडोजी महाराजांनी ग्रामनाथास, शेतकरी व कष्टकऱ्यास बसवुन संपुर्ण विश्वाचा आधार हा ग्रामनाथ असल्याचे व त्या ग्रामनाथावरच सर्व सृष्टीचा डोलारा उभा असल्याचे निक्षुन सांगीतले आहे. आणी त्या ग्रामनाथाचा जोपर्यंत उध्दार होणार नाही तो समृध्द होणार नाही तोपर्यंत या विश्वात आनंदीआनंद निर्माण होणार नाही हा विचार महाराजांनी देवुन शेतकऱ्यास, कष्टकऱ्यास विश्वाच्या देव्हाऱ्यात नेवुन बसविले आहे. आणी खऱ्या अर्थाने कष्टकरी ग्रामनाथाच्या कष्टास खरी किंमत दिली आहे. यापुर्वी कष्टकऱ्यास देव्हाऱ्यात नेउुन बसविण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही कदाचित तो भविष्यातही होणार नाही. त्यामुळे फक्त् राष्टसंतानी दिलेले हे स्थान फक्त् कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी ओळखणे आवश्यक नसुन श्रमाचे मोल, पिकविणाऱ्याचे मोल अखिल मानवजातीने लक्षात घेणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने मानवतावादी दृष्टीकोनाचा विकास होणार असुन या विश्वात समृध्दी येणार आहे मात्र या कष्टकऱ्यांच्या श्रमाची कुचेष्ठा होतांना पाहुन राष्टसंतांचा विचार सर्वसामान्य व उच्चशिक्षीतात, राज्यकर्त्यांमध्ये होणे आवश्यक आहे.
सगळीकडे याबाबत उलटी गंगा वाहत असतांना राष्टसंतांचा हा क्रांतीकारी विचार जो विश्वकल्याण साधणारा आहे. खरी मानवता रुजविणार आहे. तो विचार रुजविण्याकरीता आपल्या खारीचा वाटा या भुतलावरील प्रत्येक मानसाने दिल्यास तो मंगल दिवस उगवेल याबाबत शंका असण्याचे कारण नाही.

श्रीकांत दिगांबरराव धोटे
टाकळी चनाजी जिल्हा वर्धा
8087332593

02/10/2023

ऐ लोकप्रिय गांधी! तू शान्ति का सितारा ।
शहरोपे थी निगा पर, था ग्रामिणों का प्यारा ।।टेक।।

माने न माने कोई,
तेरा वह राजकारण |
पर मुझका है पता तू गरिबों का था अधारा ।।1।।

भूखा मरे न कोई,
सबको मिलेगा धंधा ।
यह जानकरके खादी-चरखा तूने सुधारा ।।2।।

इन्सान हों बराबर,
कोउ नीच ना कहावे।
इसके लिए ही तुने हरिजन वचन उचारा ।।3।।

ग्रामों की उन्नती को,
उद्योग ग्राम का हो ।
अभिमान देशका हो, हरदम यहीं पुकारा ।।4।।

बुनियादी शिक्षणों पर,
था जोर जिन्दगी भर ।
तुकड्या कहे तेरा था, बस प्रार्थना सहारा ।।5।।

Photos from Shrikant dhote's post 02/10/2023

विनम्र अभिवादन

01/10/2023

सेना म्हणे

01/10/2023

ग्रामगीता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारासाठी

whatsapp.com

29/09/2023

तुकड्यादास

Photos from Shrikant dhote's post 14/09/2023

पोळा

23/08/2023

चंद्रायान 3 चे यशस्वी लॅडींग
सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐💐👏👏👏🫡
सर्व भारतीयांना मनःपुर्वक शुभेच्छा 💐💐💐

09/08/2023

आदिवासी = निसर्ग

जंगल, डोंगर, द-याखो-या, सगळंच अमुचं रान,
या रानाच्या रक्षणाचं, आम्ही राखतो सदा भान...

होय, म्हणुनच आम्ही आदिवासी,
आम्हीच मुलनिवासी.......

रानावनाची करीतो सेवा,
चविने चाखतो रानातलाच मेवा....

पण आम्ही ओरबडुन रानास, साधत नाही स्वार्थ,
पोटापुरते वाया, घालवत नाही व्यर्थ....

असं समजु नका, आजच आम्ही हे करतो,
उत्पत्तीपासुन आम्ही देव म्हणून निसर्गालाच स्मरतो....

झाडं, झुडपं, पान, फुलं, डोंगर, पशु, पक्षी,
यातच तुम्हाला देव अमुचा मिळेल,
ताडोबा, वाघोबा, कुपारलिंगो, भिवसन,
आदिवासींचा देव कुठे हे तुम्हाला कळेल.....

जल, जंगल, जमीन यांच्याशी आमचं अतुट नातं,
याभोवतीच वास करतं आमचं सारं गणगोत....

जगण्यावागण्यात आमुच्या तुम्हाला,
दिसतील त्या खुणा,
निसर्गाशिवाय आदिवासी,
पुरता ठरतो उणा......

आमुची भाषा, आमुची संस्कृती,
याचे जाणतो आम्ही मोल,
संस्कृती, पोट सांभाळुनही साधतो,
पर्यावरणाचा तोल.....

जगाच्या पाठीवरच्या आदिवासींचे,
धुंडाळा एक समान तत्व,
निसर्ग, पर्यावरणाशिवाय त्याचे,
पुर्ण होत नाही स्वत्व.....

श्रीकांत धोटे
#आदिवासी
टाकळी चनाजी जि. वर्धा

16/07/2023

टोमॅटोने केली लाल,
मचला सगळा बवाल,
कापसाने केले हालाल,
कुणी पुसेना हाल.....

श्रीकांत धोटे

Photos from Shrikant dhote's post 03/07/2023

गुरू हाडामासाचा नव्हे, गुरू नव्हे जाती संप्रदाय/
गुरू शुध्द ज्ञानतत्वची आहे, अनुभवियांचे //

ग्रामगीता

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

11/06/2023

नुसते अस्वस्थ वर्तमान,
विसरले वास्तवाचे भान,

पेटवापेटवीचा खेळ,
नाही वास्तवाचा मेळ..

लोकप्रश्नांचे साचलेत ढिग,
रोज चढते आरोपांची शिग...

घृणास्पद आरोपांची राळ,
ख-या प्रश्नांनी दाटलय आभाळ...

सुत्रांच्या हवाल्याने बातमी,
खरेपणाची किती हमी?....

माणसामाणसात पेरून विसंवाद,
काढायचे नुसते जातीधर्माचे वाद....

थांबवा हे आता कालवणं विष,
तेव्हाच भारतीय म्हणुन उंचावेल शिश....

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
8087332593

31/05/2023

भावबाजीन उतरवला पु-या कापसाचा साज,
स्वस्थ बसु देत नाही घरी आता सुटली रे खाज.....

देवुन पोटाले चिमटा, घरी कापुस पोसला,
भाववाढीच्या आशेनं, फटका व्याजाचा सोसला,
दवाखान्यात जाऊ आता, का पहिले भरू व्याज ?...

मनी जागी होती आशा, गेल्या सालच्या भावाची,
बारा हजार नको म्हणो, आस दहा हजाराची,
पण कवडीमोल भावानं, कापुस विकला जातोय आज.....

नाही कुणाले कळलं, भावबाजीचं गणीत,
कापुस ठेवला रोकुन, झालं माह्यच हनित, (नुकसान)
शेतमालाच्या भावाचे, सांगा कोण सांगेल राज ....

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
दि. 31/05/2023

04/04/2023

सायबा रे सायबा, करुन पाह्य शेती ,
शेतातली जराशी हुंगुन पाह्य माती,......

शेतीशी जरास जोडून पाह्य नात,
कवा कवा बैलाची खावुन पाह्य लात.....

सोसुन पाह्य उन्हाच्या गरम गरम झाळा,
भर उन्हात लावुन पाह्य तरबुजाचा मळा......

गाडणाची वावरातली तुडवुन पाह्य वाट,
गाडणात हातात भाकर घेऊन भरुन पाह्य पोट....

नुसत पावसाच्या भरोश्यावर पेरण्याची कर हिंम्मत,
दोन दिवस दडी मारल्यावर कळल तुले किंमत ......

पुरान शेत खरडल्यावर कस सलतं काळीज,
अनुभवुन पाह्य कशी हराम होते निज......

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा

03/04/2023

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कुणीही कोणत्याही एका विचारधारेच्या दावणीला बांधू शकत नाही. राष्ट्रसंतांचा मुळ विचार हा एवढा व्यापक आहे जो प्रत्येक विचारधारेच्या व्यक्तीला आपलासा वाटु शकतो. राष्ट्रसंतांचा विचार हा सर्वसमावेशक असुन खरा मानवतावादी दृष्टीकोन निर्माण करणारा विचार आहे. राष्ट्रसंतांनी आपल्या संपुर्ण साहित्यात कुण्याही जाती, धर्म, पंथ, पक्ष, व्यक्ती, संत महात्मा यावर टिपण्णीसुध्दा केली नाही. मात्र समाजातील वाईट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धेवर आसुड ओढतांना त्यातुन मार्ग कसा काढायचा याचा पर्यायी मार्ग दिला. हे विश्वची माझे घर म्हणतांना गाव हा विश्वाचा नकाशा म्हटले तर त्यापेक्षाही प्रथम पाया मानव वर्तन व त्यानंतर कुटुंब, समाज, ग्राम व ग्रामापुढे देश या संकल्पना मांडल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य हे समन्वय वादी व बंधुत्वाची भावना निर्माण करणारे आहे. त्यामुळेच राष्ट्रसंतांना कुणीही कुणाच्या दावणीला बांधु शकत नाही.
राष्ट्रसंत व गाडगेबाबा हे परस्पर पुरक संत होते. दोघाही संतांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. पण गाडगेबाबाशिवाय तुकडोजी व तुकडोजी शिवाय गाडगेबाबा कधीही पुर्ण होऊ शकत नाही. तुकडोजीला माननारा प्रत्येक माणुस गाडगेबाबालाही तेव्हढाच मानतो. गाडगेबाबा गेले तेव्हा तुकडोजी महाराजांची वेदना त्यांच्याच शब्दातुन व्यक्त होतांना,
" सुनी खबर की संत गाडगेबाबा हमको छोड गये,
धडक भरी छातीमे हमको पलभर तो नही होष रहे,
वाहवाहरे जनसेवक था तु नये युग का उजियारा,
साधू को आदर्श बताने दिया जन्म तुने सारा.....
त्यामुळेच गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांची तुलना, श्रेष्ठ कनिष्ठ हा वाद निर्माण करण्यापेक्षा या दोन्ही महात्म्यांच्या कर्तुत्वाचा अभ्यास केल्यास अज्ञान दुर होण्यास नक्किच मदत होईल.

टिप - वाद निर्माण होण्यास कुणी व्यक्ती कारणीभूत नसुन हे अस्वस्थ वर्तमान कारणीभूत आहे असं मला वाटतय कारण वारंवार संत, महात्मे यांच्याविषयी वाद निर्माण करुन वातावरण ढवळण्याचा जो प्रकार सुरू आहे. त्याला मानवतेची बिजे पेरत राहणे व नुसते वादात पडण्यापेक्षा सकारात्मकता पेरणे आवश्यक आहे. बाकी आपण सुजाण आहातच. कुणीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

श्रीकांत धोटे

28/03/2023

टांगु नका हो लक्तरे वेशीत माझी,
हा आक्रोष आहे सामान्य माणसाचा.......

जागोजागी आमचा उपयोग करुन घेती,
सांगा कुणा कळवळा सामान्य माणसाचा.....

कोण पसरवतो हे जातीधर्माचे विष,
काय संबंध आहे सामान्य माणसाचा.....

आमच तर आभाळ फाटलेल ते कोण शिवेल,
असा सवाल आहे सामान्य माणसाचा.......

स्वार्थासाठी रोज नवे वाद रोजच संशय,
जिव गुदमरतो आहे सामान्य माणसाचा....

श्रीकांत धोटे

21/03/2023

व्हा सावध सकल सुजनहो ! द्या निज-कर्माची ग्वाही ।।
चहू बाजूनि ज्वाल उफळला, ही वेळ सुखाची नाही ।।धृ0।।

कोणी कुणावर प्रेम करीना ।
सत्तेसाठी मुरगळी माना ।
स्वार्थास्तव करिताती धिंगाणा ।। होss
देइल ही साक्ष कुणीही ।।१।।

नच मानवता उन्नत दिसते ।
नैतिकता ढासळली गमते ।
शब्दांचे अवडंबर नुसते ।। होss
हे कुठवर आता राही ।।२।।

म्हणोनी विनंती प्रिय बंधूंना ।
सहकारी जीवन बनवाना ।
सकळावरती प्रेमे करना ।। होss
तरि देश प्रगत हा होई ।।३।।

या संकटिया ! सहकारी व्हा ।
जातियतेच्या विसरुनि भावा ।
तुकड्यादास म्हणे सांगा हो-।। होss
संदेश भरा उत्साही ।।४।।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
गुरुकुंज आश्रम, दि. २0-0६-१९५९

09/03/2023

I've received 100 reactions to my posts in the past 30 days. Thanks for your support. 🙏🤗🎉

08/03/2023

नारी,
तेरी यारी,
सबसे भारी....

नारी,
तु दादी,
दोस्त आधी....

नारी,
तु माता,
प्यारा नाता,

नारी,
तु अर्धांगीनी,
जिवन की रागरंगीनी...

नारी,
तु बहणा,
जिवन का गहना....

नारी,
तेरी ताकद,
कोई न जान सकत....

नारी,
तु दोस्त,
हसी का सैलाब मस्त....

नारी,
तु लडकी,
घर के आनंद की खिडकी.....

नारी,
तेरा संग,
जिवन का रंग.....

नारी,
तु जननी,
विश्व की उद्गामीनी....

नारी,
तु एक,
रुप अनेक....

नारी,
तु व्यापक,
नाप सका न कोई आजतक.....

नारी,
तु महान,
भर प्रगती की उडान.....

श्रीकांत धोटे
8087332593/ 9511783236

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

19/02/2023

गोष्ट हिरकणीची

संधी अश्विनी श्रीकांत धोटे

जय भवानी - जय शिवाजी

13/02/2023

मनातल्या मनात हसतो,
तरीही वास्तव मांडत बसतो....

तोडतात मस्त ते, कल्पनेतुन चंद्र तारे,
वाहवतात मनातल्या मनात उधाण वारे,
वास्तवाचे इथे मी, चटके सोसत असतो,
तरीही वास्तव मांडत बसतो....

नुसत्या मारत नाही, प्रगतीच्या बाता,
खोटं टिकते थोडं, मग मिळते लाता,
भासमान फुलले मळे, मी खरे पेरीत असतो,
तरीही वास्तव मांडत बसतो....

गायकास न उरले भावार्थाचे भान,
गातोय कसा बघ सुरताल नी तान,
ते घेती टाळ्या, मी अर्थ उमगत असतो,
तरीही वास्तव मांडत बसतो...

कृषीप्रधान देशात, योजनांचे पिक किती?
शेतकऱयांच्या उन्नतीची सतत, आखत असते निती,
घामास दाम मिळो याची मी बिजे शोधत असतो,
तरीही वास्तव मांडत बसतो.....

धर्म धर्म करता करता धर्म विसरला सारा,
धार्मीकतेचेच सोंग घेऊन, धर्माचा केला कचरा,
ते मिरवितात धर्म, मी धर्माचे मुळ शोधत असतो,
तरीही वास्तव मांडत बसतो....

पुसला जायला हवा होता जातीधर्माचा रंग,
त्यालाच गडद करण्यात स्वार्थी झाले दंग,
ते फासती घट्ट मी फिकट करण्याचा प्रयत्न करतो,
तरीही वास्तव मांडत बसतो....

पुरोगामीत्वाचा काही नुसते आव आणती वरुन,
पुरोगामीत्व पुरोगामित्व या शब्दाला बसले धरुन,
पुरोगामीत्वाचे तत्व स्विकारुन, मी स्वत्व जागवत असतो....
तरीही वास्तव मांडत बसतो...

वास्तव विचार व्यवहाराची, नाही कुणाला जाण,
बाता मारती सगळे, विसरुन देहभान,
अवास्तव नाही मी वास्तवाचे भान ठेवत असतो,
तरीही वास्तव मांडत बसतो.....

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
8087332593

Photos from Shrikant dhote's post 05/02/2023

साहित्यातील व साहित्यीकांमधली दरी कमी करण्याच्या दृष्टीने संमेलनाध्यक्ष मा. चपळगावकर सरांनी घेतलेली भुमिका व केलेली कृती या गढुळ व ढवळून निघालेल्या वातावरणाला नवी दिशा देणारी आहे. साहित्यिक वर्तुळाला यामुळे नवी दिशा मिळेल. सर्व साहित्यिकांनी व समाजाने यातुन बोध घ्यावा.
माणुस जोडा.....
Shrikant dhote महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi HasyJatra) किरण प्रकाश बोरकर पवन कुमार फुके

30/01/2023

गांधी
गांधी नावाचा
माणूस संपविला,
घालुन थेट गोळी,
तरीही करता न आली,
गांधीच्या विचारांची होळी.....

गांधी छाटला,
गांधी उपटला,
गांधी नासविला,
आखले सतत मनसुबे,
पण गांधी अंर्तबाह्य,
खंबीर, खोल, विस्तीर्ण,
अजुनही सक्षमपणे उभे....

कधी गांधींचे टक्कल,
कधी कपडे,
तर कधी तिन बंदर,
सत्य, अहिंसा, सत्याग्रह,
हे झाले खिल्लीचे विषय,
मात्र समजुन घेत नाही,
त्यातला खरा आशय....

ख-या गांधीने,
जात, धर्म, पंथ, पक्षाचे,
कधीच दुकान नाही थाटले,
मात्र कट्ठरवादी धर्मांधांना,
गांधी आपलेच शत्रू वाटले...

गांधी मारला
मात्र विचाराने मरत नाही,
हे लक्षात आल्यावर,
चारित्र्याचे केले जाते हनन,
कुठलातरी फोटो काढतात,
व्हायरल करतात,
चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे,
करतात प्रयत्न.....

कधी गांधी चुकिचा वाटतो,
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी,
असहकार आंदोलन मागे घेतल्याने,
सत्याग्रहाने स्वातंत्र्य मिळते असे म्हणतांना,
पाकिस्तानला पंचावन्न कोटी देतांना,
ही कारणे देवुन समाजमनात पसरविला जातो,
जाणीवपुर्वक संभ्रमाचा किंतु,
समजुन घेत नाही त्यामागचा गांधीजींचा हेतु,

आयुष्यभर ज्यांनी,
गांधीच्या नावाने मोडली बोटे,
ठरविले त्याना खोटे,
त्यांनाही घ्यावा लागतो,
गांधीचा आधार,
आणी म्हणावे लागते,
गांधी मोठे गांधी मोठे .....

म्हणुन गांधी म्हणजे,
नुसती स्वातंत्र्याची ज्योत नाही,
गोळी घातलेले प्रेत नाही,
पोस्टरछाप बापु नाही,
पदवी दिली म्हणून राष्ट्रपिता नाही,
तर गांधी
एक विचार,
तोच तारू शकेल देशाला व देईल नवी दिशा
राष्ट्राच्या उज्वल भविष्याचा आधार,
विशाल व्यापक.....

फक्त गांधींचा विचार जागवावा लागेल,
जगावा लागेल, रूजवावा लागेल,
बदलत्या काळानुसार बदल स्विकारून,
तेव्हा गांधी मरणार नाही गोळया घालुन....

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जिल्हा वर्धा
8087332593

29/01/2023

डहाका
30 वे झाडीबोली साहित्य संमेलन, पिंडकेपार
डहाका हा विदर्भातील लोकगीत लोकसंगीत प्रकार असुन डहाका हा विवाह किंवा धार्मिक विधीच्या वेळेस करण्यात येतो. या डाहाक्यामधुन आपल्या पुर्वजांचे स्मरण केले जाते. एकप्रकारे कुटुंबातील या प्रसंगी आम्ही तुमचे स्मरण करीत आहोत या शुभप्रसंगात तुमचे आशिर्वाद असु द्या. हा हेतू असतो. कुटुंबातील ज्यांचे ज्यांचे स्मरण करायचे आहे त्यांची नावे विचारली जातात. संपुर्ण प्रसंगाचे वर्णन या डाहाक्यामधुन होत असते. यावेळेस पूर्वजांच्या आठवणीने वातावरण भावुक व गंभीर असते.
या विषयावर सविस्तर लिहिन....... स्वतंत्र पणे

02/11/2022

#ग्रामगीता
#शेतकरी
#माणुसद्यामजमाणुसद्या

Want your organization to be the top-listed Government Service in Wardha?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

क्रांतीकारी राष्ट्रसंत
गोष्ट हिरकणीचीसंधी अश्विनी श्रीकांत धोटेजय भवानी - जय शिवाजी
डहाका 30 वे झाडीबोली साहित्य संमेलन, पिंडकेपार डहाका हा विदर्भातील लोकगीत लोकसंगीत प्रकार असुन डहाका हा विवाह किंवा धार्...
शानदार हो मेरा भारतवं. राष्ट्रसंतांना विनम्र आदरांजली
सभोवतालची परिस्थिती बघुन निराशा आल्यावर असा व्हिडिओ बघुन उर्जा मिळते.
संधी

Category

Website

Address

Wardha
442001

Other Social Services in Wardha (show all)
Shivaji Choudhary Shivaji Choudhary
Old Mhada Colony Road
Wardha

It's a social page to serve.....

IGS Satyagrah Sabha Wardha IGS Satyagrah Sabha Wardha
Wardha, 442001

गांधी विचारांचे संवर्धन आणि प्रसार य?

Chetan Laddha Chetan Laddha
Wardha, 442001

Digital Creator | Social Media Management

Nihal Pande Nihal Pande
Wardha

युवा: परिवर्तन कि आवाज सामाजिक संगठना संस्थापक अध्यक्ष

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती - युवा शाखा अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती - युवा शाखा
Wardha, 442001

समितीची भूमिका :- "आमचा देवा धर्माला विरोध नाही. त्यांच्या नावावर करणाऱ्या फसवणूकी विरुद्ध लढा आहे"

Nishtha Yatra - निष्ठा यात्रा Nishtha Yatra - निष्ठा यात्रा
Wardha
Wardha, 442001

ज्यांनी केली महाराष्ट्राची चेष्टा.. उत्तर देणार त्याला शिवसैनिकांची निष्ठा - निहाल पांडे

Bhima Shambharkar Bhima Shambharkar
Mission Janhit
Wardha, 442001

एकता परिवार एकता परिवार
Wardha

सर्व सेवक दादा ताईला माझा आदरपूर्वक न?

Amol Deshmukh CRS consultant, social worker Amol Deshmukh CRS consultant, social worker
Wardha, 442001

The community radio station consultant

मा.रोहित दादा पवार विचार मंच. मा.रोहित दादा पवार विचार मंच.
Main Road Wardha
Wardha, 442001

Are they the same as you do something for the community, for the purpose of strengthening the future of the children of farmers and farm laborers.