Iskcon Temple Yavatmal

Official Page of ISKCON Yavatmal

16/03/2023
Mobile uploads 07/03/2023
05/03/2023

'भुक पाहत नाही की नैवैद्य कशाचा आहे'

18/02/2023

पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात २४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे.

मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील,' असा वर दिला होता. या वरामुळे उन्मत झालेला राक्षसाने देवांवर स्वारी केली. यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. मात्र शंकारांनाही काही करता येत नव्हते. यावेळी देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजन गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. या देवीचे नाव होते एकादशी

शास्त्रानुसार, जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते असे म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते. एकादशीचे माहात्म्य अगाध आहे. संपूर्ण कल्याणासाठी अवश्य महिन्यातील दोन एकादशी उपवास नक्की करावा. व्रत करतांना नियम पाळणे आवश्यक आहे. या दिवशी मद्यपान, निंदा, अभक्ष्य , चोरी, निंदा, देव गुरू ब्राह्मण यांची निंदा करू नये. ब्रह्मचर्य पालन करून अतिशय मनापासून व्रत करावे.

आज विजया एकादशी पासून आपण दर महिन्याला येणाऱ्या २ एकादशी कथा पाहणार आहोत. दर एकादशीला कथा शेअर केली जाईल.

आज विजया एकादशी ची कथा थोड्याच वेळात शेअर केली जाईल. संपूर्ण एकादशी माहात्म्य कथासार या पुस्तकात असणाऱ्या कथा आपण इथे पाहणार आहोत. सर्व भाविकांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत एकादशी माहात्म्य पोहोचवावे ही नम्र विनंती.

धन्यवाद 🙏

15/02/2023

धर्मासाठी झुंजावे |
झुंझोनी अवघ्यासी मारावे |
मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले |
देशद्रोही तितके कुत्ते |
मारोनी घालावे परते |
देवदास पावती फत्ते यदार्थी संशयो नाही ।
देव मस्तकी धरावा |
अवघासी हलकल्लोळ करावा |
मुलूख बङवावा की बुङवावा |
धर्म संस्थापनेसाठी
दासनवमीच्या
शुभेच्छा
#तेजोमय_हिंदुत्व

14/02/2023

अंदमान मध्ये देश साठी मृत्यू यातना भोगणारा विनायक
सावरकर लक्षत
नसला तरी चालेल परंतु दलितांना मंदिर प्रवेश
आणि त्यान सोबत दलित अस्पुरुश्य सोबत सहभोजन
करणारा
जाती भेद च्या सीमा उखडून फेकणारा सावरकर सदैव
लक्षात राहू द्या ...
- वीर सावरकर {केसरी }
दलित उद्धारक समाज सुधारक वीर

12/02/2023

Brahmagupta, the forgotten scientist & mathematician from ancient India.

09/02/2023

कभी देश के स्टार्स में शुमार थें, आज दो वक्त की रोटी भी मयस्सर नहीं है। 82 साल की उम्र में अब तो मजदूरी करने की भी शक्ति नहीं बची है।

ये भारतीय हॉकी के खिलाड़ी रहे टेकचंद हैं। साल 1961 में जिस भारतीय टीम ने हालैंड को हराकर हॉकी मैच में इतिहास रचा था, टेकचंद उस टीम के अहम खिलाड़ी थे। आज इनकी स्थिति बेहद दयनीय है। हॉकी के जादूगर मेजर #ध्यानचंद के शिष्य और मोहरसिंह जैसे खिलाडियों के गुरू आज एक टूटी-फूटी झोपड़ी में रहने को अभिशप्त हैं। जनप्रतिनिधि से लेकर सरकार तक जिन्हें इनकी कद्र करनी चाहिए, कहीं दूर-दूर तक नजर नहीं आ रहे हैं। हॉकी देश का राष्ट्रीय खेल भी है। शायद इसीलिए सरकार 600 रूपये प्रतिमाह पेंशन देकर इनके ऊपर अहसान कर रही है।

मध्यप्रदेश के सागर में रहने वाले टेकचंद के पत्नी व बच्चे नहीं हैं। भोजन के लिए अपने भाइयों के परिवार पर आश्रित इस अभागे को कभी-कभी #भूखे भी सोना पड़ जाता है। ये उसी देश में रहते हैं, जहां एक बार विधायक- सांसद बन जाने के बाद कई पुश्तों के लिए खजाना और जीवन भर के लिए पेंशन-भत्ता खैरात में मिलता है।

साभार !

09/02/2023

चापेकर बन्धु के रूप में 'दामोदर हरी चापेकर' (1869-1898 ई.), 'बालकृष्ण चापेकर (1873-1899 ई.) और 'वासुदेव चापेकर (1880-1899 ई.) भारतीय इतिहास में प्रसिद्ध हैं। ये तीनों भाई बाल गंगाधर तिलक से अत्यधिक प्रभावित थे।

महाराष्ट्र के इन तीनों चापेकर बन्धुओं ने बाल गंगाधर तिलक के प्रभाव में आकर देश की स्वतंत्रता के लिए अपने प्राणों की आहुति दे दी थी।
बालकृष्ण तथा दामोदर चापेकर ने जून, 1897 ई. में महारानी विक्टोरिया के 'हीरक जयन्ती' समारोह के अवसर पर दो ब्रिटिश अधिकारियों रैण्ड और ले. एम्हर्स्ट की हत्या कर दी थी।
इस हत्याकाण्ड के बाद दोनों भाईयों को गिरफ़्तार कर फाँसी दे दी गयी।
तीसरे भाई वासुदेव चापेकर ने 8 फरवरी 1899 को गणेश शंकर द्रविड़ की हत्या कर दी, जिसने दामोदर और बालकृष्ण को गिरफ़्तार करवाया था।
वासुदेव चापेकर को 8 मई, 1899 ई. में गिरफ़्तार करके फाँसी दी गयी।
तीनों भाईयों ने भारत की आज़ादी के लिए अपने प्राणों का बलिदान कर दिया और सदा के लिए अमर हो गये।
वीर बलिदानी चापेकर बंधुओं को शत् शत् नमन्।

Timeline photos 14/12/2022
17/11/2022

29/10/2022

हे आपणास माहीत आहे का ? १ ): पंचप्राण| कोणते ? उपप्राण कोणते ?

आपल्या देहात पाच मुख्य प्राण व पाच उपप्राण असुन, प्रत्येक प्राणाचे कार्य भिन्न भिन्न आहे.

*पाच मुख्य प्राण....*

*१) प्राण २) अपान ३) व्यान ४) उदान ५) समान*

*१) प्राण* :- हा वायु हृदयात राहतो व श्वासोच्छवास करतो.

*२) अपान* :- हा वायु मोठया आतडयात राहतो व मलमूत्राचे विसर्जन करतो.

*३) व्यान* :- हा सर्व शरीरव्यापुन राहतो.

*४) उदान* :- हा कंठात राहतो व अन्नरसाचे विभाजन करतो.

*५) समान* :- हा नाभी कमलात राहतो व सर्व नाडयांना अन्नरस पुरवितो.
-------------------------

*पाच उपप्राण आहेत....*

*१) नाग २) कूर्म ३) कृकल ४) देवदत्त ५) धनंजय*

*१) नाग* :- हा वायु ढेकर निर्माण करतो व शरीरातील अशुद्ध तत्वे बाहेर टाकतो.

*२) कृर्म* :- हा वायु पापण्यांची उघडझाप करतो.

*३) कृकल* :- हा वायु शिंक व खोकला निर्माण करतो

*४) देवदत्त* :- हा वायु जांभई निर्माण करतो.

*५) धनंजय* :- हा वायु मृत्यूनंतर आपल्या शरीरात राहतो व वातावरणातील पिशाच्चे शरीरात शिरणार नाहीत याची काळजी घेतो.

यावरून एक गोष्ट लक्षात येईल की. प्रेत जाळणे ही गोष्ट शास्त्रीयद्रुष्टया अतिशय चांगले आहे. कारण प्रेत जाळल्याने धनंजय वायू शरीरात अडकून राहत नाही व जीवात्म्याचीही मायेतून त्वरीत सुटका होते.
२ ) *🪔👉🏻तिन्हीसांजेला घरात अन्* *तुळशीजवळ दिवा लावल्याने*
*घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होणे*
*आणि त्या वेळी वातावरणातील वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून घरीथांबणे*👇
🪔तिन्हीसांजेला, म्हणजेच दिवेलागणीच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वातावरणातील वाईट शक्तींच्या संचारामुळे प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरींपासून रक्षण होते. म्हणून शक्यतो दिवेलागणीच्या वेळेपूर्वी घरी यावे किंवा दिवेलागणीनंतर घरातून बाहेर पडू नये. बर्‍याचदा वाईट शक्तींची त्रास हा तिन्हीसांजेच्या वेळी सर्वांत जास्त प्रमाणात होते.*
*अघोरी विद्येचे उपासक तिन्हीसांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणार्‍या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करवून घेतात. म्हणून तिन्हीसांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात, हत्या (खून) होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात. या काळाला 👉🏻कातरवेळ म्हणजेच ‘त्रासदायक किंवा विनाशाची वेळ’, असे म्हणतात.’*

25/10/2022

गुरू द्वादशी आणि श्रीपादांची तीन वचने!

१३५० साली अश्विन वद्य द्वादशीला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी लौकिक दृष्ट्या फक्त तीस वर्षांचे असताना आपलं शरीर लौकिकार्थाने कृष्णा नदीमध्ये का गुप्त केले याचा पूर्ण संदर्भ श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात अध्याय चारमध्ये येतो. श्रीपादांना देह गुप्त ठेवायची एवढी घाई का होती त्याला कारण श्रीपादांनी सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता, शिवशर्मा व अंबिका यांना तीन वेगवेगळ्या वेळी कुरवपूर येथे दिलेले वचन आहेत.

या तिनही वचनांना साक्षीभावाने पाहणारे आहे ते चिदंबरम क्षेत्रात दिनांक २५ मे १३३६ चे पळणी स्वामींचे ध्यान. श्रीपादांना याच दिवशी अवतार समाप्ती करावयाची होती. त्यांनी तशी इच्छा वासवी कन्यकांबेस बोलून दाखवली. यावर कन्यकांबेने श्रीपादांना ती वेळ पुढे ढकलायला लावली.

श्रीपादांनी दुसरं वचन दिले ते शिव शर्मांना. उदास शिव शर्मांना श्रीपाद म्हणाले की इतर सर्व विसरून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्याचा मी गुलाम असतो. तुझी व्यथा व इच्छा मला सांग. या भक्तांचा गुलाम शब्दात अवतार समाप्तीचं रहस्य दडलेले आहे. शिव शर्मा स्वतःच्या मंदमती मुलाची व्यथा सांगून त्याला बृहस्पती प्रमाणे विद्वान करण्याची इच्छा व्यक्त करतात.

श्रीपादांनी तिसरं वचन दिले ते शिव शर्मा वारल्यानंतर भिक्षा मागून मंदमती मुलासह जगणाऱ्या शिव शर्मांच्या पत्नीला म्हणजे अंबिकेला. तिला आत्महत्येपासून वाचवून श्रीपाद तिला वचन देतात की तुला तुझ्या पुढच्या जन्मात माझ्या सारखा पूत्र होईल व माझ्या सारखा मीच असल्याने मीच तुझ्या पोटी येईल.

आता अंबिका तर वृद्ध होऊन कुरवपूरात मरण पावली व लाड कारंजा येथे अंबिका नावानेच जन्मुन माधवा सह संसार करती झाली. पण श्रीपादांची वचनपूर्ती राहिली होती ना की जिची स्मृती या लाड कारंजा तील अंबिकेला नव्हती. पण वचन देणारे साक्षात श्रीमन्नारायण श्रीपाद कसं विसरतील!

म्हणून श्रीपाद १३५० च्या अश्विन वद्य द्वादशीला काही क्षणात शंकर भट्टांस सांगतात की बेटा गुप्त रुपात राहण्याची माझी वेळ जवळ आली आहे. पुत्रासमान सेवा करत तू माझ्या समीप राहिलास. माझ्या या पादुका तुला देत आहे. मी येथेच गुप्त रुपात राहणार आहे व नरसिंह सरस्वतीनावाने अवतरणार आहे. इथं श्रीपाद आपलं चवथं वचन शंकर भट्टांस देताना सांगतात की मी तुला रोज मध्यरात्री तीन वर्षे तेजोरुपात दर्शन देऊन अनेक योग रहस्यं सांगेन.

अश्विन वद्य द्वादशीला श्रीपाद म्हणजे गुरू गुप्त झाले म्हणून या तिथीला *"गुरू द्वादशी"* संबोधण्यात येते. आजच्या या अति पुण्यशाली दिवशी आपणही श्रीपादांकडून वचन मिळवण्यासाठी गुरूकृपापात्र होऊयात........!

25/10/2022

महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत प्रभावी असून भक्तावरील सर्व प्रकारची संकटे दूर करून संकटांचा सर्वनाश करण्याची शक्ती या स्तोत्रात आहे. हे स्तोत्र अनन्य भावाने म्हटले असता आई जगदंबा प्रसन्न झाल्यावाचून राहणार नाही.

🚩 *॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥* 👏

*श्री गणेशाय नम:*

*नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।*
*शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ १ ॥*

*नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।*
*सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ २ ॥*

*सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।*
*सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३ ॥*

*सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।*
*मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥*

*आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।*
*योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥*

*स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।*
*महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥*

*पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।*
*परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ७ ॥*

*श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।*
*जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ८ ॥*

*महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।*
*सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥ ९ ॥*

*एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।*
*द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥*

*त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।*
*महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥*

*॥इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्ण ||*

🙏🌹 *ॐ महालक्ष्मीच् विद्महे,*
*विष्णू पत्नी च् धीमही,*
*तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्*🌹🙏

🙏🌹 *ॐ श्रीं हरिप्रियायै नमः* 🌹🙏

02/10/2022

पैसे किती कमवायचे आणि कोणासाठी ? 🙏

*वन बेडरुम फ्लॅट*

माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करुन अमेरीकेतील बहुराष्ट्रिय कंपनीत नोकरीला लागावे. जेव्हा मी अमेरीकेत आलो तेव्हा हे स्वप्न जवऴपास पूर्ण होत आले होते.

आता शेवटी मला जिथे हवे तिथे मी पोहचलो होतो. मी असे ठरवले होते की पाच वर्ष मी इथे राहुन बक्कळ पैसा कमवेल की जेणे करुन भारतात गेलो की पुण्यासारख्या शहरात सेटल होईन.

माझे वडिल सरकारी नोकरीत होते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट, अन तुटपुंजी पेंशन. पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे होते. घरची, आई-बाबाची खुप आठवण यायची. एकट वाटू लागायच. स्वस्तातल एक फोन कार्ड वापरुन मी आठवड्यातन २-३ वेळा त्यांना काँल करत होतो. दिवस वार्‍यासारखे उडत होते. दोन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यात गेली. अजुन दोन वर्ष परकिय चलनाचे दर पाहण्यात गेले. रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा.

लग्नासाठी रोज नवनवीन स्थळ येत होती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय घेतला. आईवडिलांना सांगितले मला फक्त दहा दिवसांची सुट्टी भेटेल त्या दहा दिवसातच सर्व काही झाल पाहिजे. स्वस्तातले तिकीट पाहुन मी १० दिवसांची सुट्टी घेतली. मी खुश होतो. आईबाबांना भेटणार होतो. नातेवाईक व मित्रांसाठी खूप सार्‍या भेटवस्तु घ्यायच्या होत्या त्याही राहून गेल्या.

घरी पोहचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फोटो मी पाहिले, वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली. मुलीचे वडिल समजुतदार होते व दोन दिवसात माझे लग्न लागले. खुप सारे मित्र येतील अस वाटत असताना फक्त बोटावर मोजता येतील असे मित्र लग्नाला आलेले. लग्नानंतर आईबाबांना काही पैसे हातावर टेकवले. "आम्हाला तुझे पैसे नकोरे पोरा पण वरचेवर भेटायला येत जा "अस बाबा सांगताना त्यांचा आवाज खोल गेला होता. बाबा आता थकले होते, चेहर्‍यावरच्या सुरुकुत्या, पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करूण देत होत्या. शेजार्‍यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही अमेरिकेला पोहचलो.

पहिली दोन वर्ष बायकोला हा देश खूप आवडला. वेगवेगळे स्टेट्स अन नँशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत होत. बचत कमी होऊ लागली पण ती खुश होती. हऴुहऴु तीला एकाकी वाटु लागल. कधीकधी ती आठवड्यातुन दोनदा किंवा तिनदा भारतात फोन करु लागली. दोन वर्षानी आम्हाला मुले झाली. एक मुलगा अन एक मुलगी. मी जेव्हा जेव्हा आईबाबांना काँल करायचो तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडाना पाहायचे होते.

दरवर्षी मी सहकुटुंब भारतात यायचे ठरवायचो. पण पैशांच गणित काही जुळायच नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा. वर्षामागन वर्ष सरत होती. भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले होते. एक दिवस अचानक आफीस मधे असताना भारतातन कॅाल आला, "मोहन बाबां सकाळीच गेले रे". खुप प्रयत्न केला पण सुट्टी काही भेटली नाही, अग्निला तर सोडा पण नंतरच्या विधीला पण जायला जमले नाही. मन उदविग्न झालेलं. दहा दिवसात दुसरा कॅाल आला, आईची पण प्राणज्योत मालवली होती. सोसायटील लोकानी विधी केले, नातवंडाचे तोंड न पाहताच आई वडिल ह्या जगातुन निघुन गेले होते.

आई बाबा जाऊन दोन वर्ष सरली. ते गेल्यानंतर एक पोकळी तयार झालेली, आईबापाची शेवटची ईच्छा, ईच्छाच राहिलेली.
मुलांचा विरोध असतानाही भारतात येऊन स्तिरस्थावर होण्याचे मी ठरवले. पत्नी मात्र आनंदात होती. राहण्यासाठी घर शोधत होतो पण आता पैसे कमी पडत होते. नवीन घर ही घेता आले नाही. मी परत अमेरिकेत आलो. मुले भारतात राहयला तयार नसल्याने त्याना पण घेऊन आलो.

मुले मोठी झाली, मुलीने अमेरिकी मुलासोबत लग्न केल. मुलगाही आनंदात अमेरिकेत राहतो. मी ठरविले होते. आता पुरे झाले, गाशा गुंडाळुन भारतात आलो. चांगल्या सोसायटीत 'दोन बेडरुमचा' फ्लँट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे होते. फ्लॅटही घेतला.

आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या 'दोन बेडरुमच्या' फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहतो. उरलेल आयुष्य जिच्यासोबत आनंदात घालवायच ठरवलेल तिन इथेच जीव सोडला.

कधीकधी मल वाटते हा सर्व खटाटोप केला तो कशासाठी? ? याचे मोल ते काय? ?

माझे वडील भारतात राहत होते तेव्हा त्याच्या नावावरही एक फ्लॅट होता. माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही. फक्त एक बेडरुम जास्त आहे. त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडिल गमावले, मुलांना सोडून आलो, बायको पण गेली.

खिडकितुन बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते, त्या सुंदर आठवणी मनात फेर धरु लागतात.
अधुन मधुन मुलांचा अमेरिकतन फोन येतो ते माझ्या तब्येतीची चौकशी करतात, अजुनही त्यांना माझी आठवण येते यातच समाधान आहे.

आता जेव्हा माझा मृत्यु होईल तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांच भल करो.

पुन्हा प्रश्न कायम आहे, हे सर्व कशासाठी अन काय किंमत मोजून.

*मी अजुनही उत्तर शोधतोय.*
*फक्त एका बेडरुम साठी?*

जगण्याचे मोल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यासाठी आयुष्य पणाला लाऊ नका. 🙏🏻🙏🏻

*मित्र वाढवा मित्रजपा त्यांच्या संम्पर्कात रहा*🙏

22/08/2022

Joy of Sri Krsna Janmastami-2022 Yavatmal

Photos from Iskcon Temple Yavatmal's post 22/08/2022

Sri Krsna Janmastami-2022 Celebration at ISKCON Yavatmal

Want your place of worship to be the top-listed Place Of Worship in Yavatmal?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Joy of Sri Krsna Janmastami-2022 @ISKCON Yavatmal

Telephone

Website

Address

ISKCON Sri Chaitanya Kutir, Shirbhate Plot, Bangar Nagar
Yavatmal
445001

Other Religious Organizations in Yavatmal (show all)
Jamaat e Islami Hind Yavatmal Jamaat e Islami Hind Yavatmal
JIH Building, Islampura
Yavatmal, 445001

Mission The Jamaat-e-Islami Hind (JIH) regards Islam as the authentic way of life revealed by the Creator of the universe; for all human beings. Accordingly the JIH invites all peo...

M***i Sohel Qasmi M***i Sohel Qasmi
Kohinoor
Yavatmal, 445001

M***i Sohel Qasmi

Sunni Muslim Education Academy Sunni Muslim Education Academy
Arni Arni
Yavatmal

Grace Fellowship, Yavatmal Grace Fellowship, Yavatmal
35, Dhole Layout, Pimpalgaon
Yavatmal, 445001

A Denomination Free Gospel Centered Missional Church

Mangladevi Mangladevi
Mangla, NER
Yavatmal, 445001

Mangladevi is goddess Durga which is located in remote area of YAVATMAL in village called MANGALA