म.फुले कृषी विद्यापीठ कृषी सहाय्यक संघटना

म.फुले कृषी विद्यापीठ कृषी सहाय्यक संघटना

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from म.फुले कृषी विद्यापीठ कृषी सहाय्यक संघटना, Government Organization, राहुरी, .

05/06/2024
16/05/2024

२१ मे पासून फुले समर्थ व फुले बसवंत -७८० कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेले खरीप कांदा बियाणे फुले समर्थ व फुले बसवंत- ७८० या वाणांची दि. २१ मे २०२४ पासून विक्री शुभारंभ करण्यात येणार असून, सदर कांदा बियाणांची विक्री विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रमूख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके यांनी दिली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ व फुले बसवंत -७८० या वाणांना शेतकऱ्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरात बियाणे विक्री आणि मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषि विद्यापीठाचे १) कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक, २) कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक, ३) कृषि संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर ४) कृषि संशोधन केंद्र, बोरगांव, जि. सातारा, ५) कृषि महाविद्यालय, मालेगाव जि. नाशिक, ६) कृषि संशोन केंद्र लखमापुर, ७) कृषि विज्ञान केंद्र, धुळे, ८) कृषि महाविद्यालय, पुणे, ९) कृषि महाविद्यालय, हाळगाव ता. जामखेड जि. अहमदनगर या ठिकाणी या वाणांची विक्री सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच सदरचे कांदा बियाणे प्रति किलो रु. १५०० प्रमाणे उपलब्ध होणार आहे. त्याचा सर्व शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रमूख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके यांनी केले आहे.

17/11/2023

*महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे विभाग यांच्यामार्फत ऊस बेणे प्लॉट विक्रीकरिता उपलब्ध आहेत ज्या शेतकरी बांधवांना बेणे पहावयाची आहे किंवा घ्यायचे आहेत त्यांनी संपर्क साधावा*

04/11/2022

विभागीय कृषि संशोधन केंद्र, कृषक भवन, सोलापूर येथे खालील कलमे/ रोपे विक्रीस उपलब्ध आहेत.
1. आंबा (केशर) रू. 80
2. सिताफळ (फुले जानकी) रू. 50
3. कागदी लिंबू (फुले सरबती) रू. 35
4. डाळींब (फुले भगवा सूपर) रू. 30 & गुटी रू. 20.
संपर्क. 7038819285, 9209375695, 9421886992
Office time. 9 AM to 1 PM and 2 PM to 5.30 PM.

05/10/2022

*विजयादशमी!*
*श्रीरामाचा आदर्श घेऊन*
*रावणरुपीअहंकाराचा नाश करत*
*दसरा साजरा करूया...*
*दसरा व विजयादशमी आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा.....!*
* भारत हरिश्चंद्रे *

04/08/2022

*आपले निवडणूक ओळखपत्र(Voter ID) आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे*
सोबत Voter ID कार्ड आणि आधार कार्ड उघडे ठेवा आणि खालील प्रक्रिया FOLLOW करा.
1. प्रथम फक्त स्वतःच्याच Android मोबाईल फोन वरून Google Play Store वरून voter helpline हे app डाऊनलोड करा.
2. voter registration ला क्लिक करा.
3. फॉर्म 6 b ला क्लिक करा.
4. Lets start ला क्लिक करा.
5. आपला मोबाईल नंबर टाका.
6. आपल्या मोबाईलवर OTP येईल तो टाका.
7. OTP टाकल्यानंतर verify ला क्लिक करा.
8. voter id असेल तर Yes I have voter ID हा पर्याय निवडा.
9. voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा.
10. नंतर proceed वर क्लिक करा.
11. आता तुमचा आधार नंबर टाका.
12. Done करा व confirm ला क्लिक करा.
*तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.* त्याचा स्क्रीनशॉट फोटो काढून फोटो गॅलरीत सेव्ह करून ठेवा.
💐💐💐💐
वरील प्रमाणे सर्व मित्रांनी निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावे.

Photos from म.फुले कृषी विद्यापीठ कृषी सहाय्यक संघटना's post 10/07/2022
24/06/2022

❇️ *माळी प्रशिक्षण कोर्स प्रवेश प्रक्रिया, 2022-23*

✳️ सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, *महत्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत * माळी प्रशिक्षण कोर्स प्रवेश प्रक्रिया* *23.06.2022* पासून सुरू झाली आहे.

❇️ प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख *१५.०७.२०२२* आहे. तरी प्रवेश घेण्यासाठी ईच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यानी त्वरित अर्ज भरून घ्यावेत.

🔸 माळी प्रशिक्षण केंद्र: *उद्यानविद्या प्रक्षेत्र, उद्यानविद्या विभाग , मफुकृवि राहुरी*

🔸 प्रवेश अर्ज उद्यानविद्या रोपवाटिका येथे मिळतील

📱संपर्क:०२४२६-२४३४४२

10/06/2022

कांदा बियाणे विक्री चालू आहे,बियाणे ऑनलाईन पद्धतीने विक्री केले जाणार आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

01/06/2022

आज दि ०१/०६/२०२२पासून रोपं शिलक असे पर्यंत विक्री चालू झाली आहे

22/05/2022

महत्मा फूले कृषी विद्यापीठ राहुरी येथे रोपं विक्री चालू आहे

12/05/2022

*महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या बिजोत्पादन प्रकल्पास देशात प्रथम क्रमांक*

*राहुरी विद्यापीठ, दि. 12 मे, 2022*

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील बिजोत्पादन प्रकल्पाला माउ, उत्तर प्रदेश येथील भारतीय बीज अनुसंधान संस्था येथे झालेल्या 37 व्या वार्षिक बिजोत्पादन आढावा बैठकीत देशात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या बैठकीसाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे बियाणे विभागाचे सहायक निदेशक डॉ. डि.के. यादव, उत्तर प्रदेश येथील भारतीय बीज अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार व भारत सरकारच्या बियाणे विभागाचे सचिव श्री. अश्विन कुमार उपस्थित होते.

संपूर्ण देशात एकूण 65 गुणवत्तापूर्ण बिजोत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांमधून महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या बिजोत्पादन प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बिजोत्पादन प्रकल्पाद्वारे तयार होणारे फुले बियाणे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या व बिजोत्पादन कंपन्यांच्या पसंतीस उतरलेले असून, कांदा फुले समर्थ बियाण्यास संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचप्रमाणे विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन पिकाचे फुले संगम व फुले किमया या वाणांच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांची पहिली पसंती असते. विद्यापीठांमध्ये 27 पिकांच्या वाणांचे मूलभूत व पायाभूत बिजोत्पादन करून सदर बियाणे हे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, नॅशनल सीड कार्पोरेशन व बियाणे उत्पादक कंपन्या तसेच शेतकरी गट यांना वेळेवर उपलब्ध करून दिले जाते. दरवर्षी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने तसेच महाराष्ट्र शासन यांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्ट प्रमाणे उच्च दर्जाचे मूलभूत व पायाभूत बियाणे वेळेवर तयार करून त्यांचा पुरवठा केला जातो. विद्यापीठातील सदरचा बिजोत्पादन कार्यक्रम हा विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व दहा जिल्ह्यातील संशोधन केंद्र, कॉलेज प्रक्षेत्रावर राबविला जातो व सर्व संशोधन केंद्राचे या कामी मोलाचे सहकार्य मिळत असते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनाखाली प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे व कृषीविद्या विभागाचे प्रमुख डॉ. आनंद सोळंके, डॉ. चंद्रकांत साळुंखे, डॉ. कैलास गागरे,

Website