Unofficial Only

Unofficial Only

Unofficial Only is created to help people to understand more about our country, it`s democracy.

'एक ओर नए संसद का उद्घाटन हो रहा है, दूसरी तरफ जंतर-मंतर पर लोकतंत्र की हत्या हो रही है' 28/05/2023

The new parliament opening ceremony.

'एक ओर नए संसद का उद्घाटन हो रहा है, दूसरी तरफ जंतर-मंतर पर लोकतंत्र की हत्या हो रही है' भारतीय कुश्ती महासंघ के अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह के ख़िलाफ़ प्रदर्शन कर रहे प​हलवान नए संसद भवन के सामने महिला मह....

24/08/2022

❤️

एमएसपी लागू न करने के पीछे प्रधानमंत्री मोदी का दोस्त अडानी है: सत्यपाल मलिक 24/08/2022

एमएसपी लागू न करने के पीछे प्रधानमंत्री मोदी का दोस्त अडानी है: सत्यपाल मलिक मेघालय के राज्यपाल सत्यपाल मलिक ने किसानों की न्यूनतम समर्थन मूल्य लागू करने की मांग का समर्थन करते हुए केंद्र सर....

18/07/2021
09/06/2021
Photos from Devdutt Pattanaik's post 08/06/2021

सुसंस्कृतपणाच्या पडद्या आड आपण संस्कृती, तथ्य, परंपरा आहेत त्या पण झाकल्या गेल्या त्याचेच हे उदाहरण.

31/05/2021
18/05/2021

Background story of SARS, Covid-19. Was it there since 2013?

04/05/2021

Reality of , .
Please stay inside, eat healthy, take care of family members.
If possible pls contribute to needy people.

आर्य भारताचे मूळ निवासी नाहीत, ते स्थलांतरित - DNA संशोधनात दावा - BBC News मराठी 25/02/2021

Please go through complete article before you conclude anything.

https://www.bbc.com/marathi/international-46719642

आर्य भारताचे मूळ निवासी नाहीत, ते स्थलांतरित - DNA संशोधनात दावा - BBC News मराठी प्राचीन डीएनए संशोधनातून दक्षिण आणि मध्य आशियाच्या नागरिकांच्या जनुकांचा अभ्यास झाला आहे.

Indus Valley Civilisation Had Preference For Beef, Meat-Heavy Diet, Reveals Study 10/12/2020

Ooh this is weird.

Indus Valley Civilisation Had Preference For Beef, Meat-Heavy Diet, Reveals Study The research also mentions that high proportions of cattle bones may suggest a cultural preference for beef consumption across Indus populations, supplemented by the consumption of mutton/lamb.

17/10/2020

इंसान के डर और हताशा की भी एक सीमा होती है। अगर उसे लांघ दी जाए तो मरने और मारने का डर , डर नहीं बस जीने का नजरिया बन जाता है।

Around 236 people of a dalit community namely Valmiki converted to Buddhism in Karhera village of Uttar Pradesh in protests against the brutal gangr**e of a 19-year-old dalit girl in UP’s hathras.
“No matter how much we study, work or rebel, the upper castes look down upon us and treats us as inferior humans. We are made to feel that we are not an equal citizen of the society or country. Be it the recent Hathras r**e case or other instances of violence against dalits, we continue to suffer every day and at every place,” Shashikant M Jadhav tells the media.
The latest National Crime Records Bureau (NCRB) data shows an increase of 7.3 pc in crimes against dalits in India, with 45,935 cases in 2019 an increase from 42,793 cases registered in 2018.
Uttar Pradesh, which grabbed headlines earlier this month over the gangr**e of a 19-year-old Dalit girl in Hathras, allegedly by some upper caste men alone accounts for over 25 pc of the total cases of atrocities against dalits in the country.
“The data on crimes against dalits are certainly alarming. Since 2014, crimes and atrocities have increased. After the violence and r**e cases against dalit women in Hathras and Balrampur, dalits have started to feel more insecure than ever. The demand for conversion to Buddhism has increased manifold across the country, especially in Uttar Pradesh. People belonging to the dalit community and other scheduled castes are opting for leaving Hinduism and embracing Buddhism as an act of liberation and to come out of the cyclic nature of fear and oppression,” Rajratna Ambedkar tells Media India Group.

30/09/2020

From the wall of विचार तर कराल?-सौ.दया सरवदे
-------------+++++++-----------+-+++++++++--------

बेसिकली आम्ही निर्लज्ज आणि कोडगे आहोत.

बलात्कार पीडित मुलगी आमच्या जातीची नाहीये ना ? मग तिचे जातवाले बघून घेतील हा आमचा कायम स्टॅण्ड असतोय.

आम्ही एवढे निर्लज आणि कोडगे आहोत की आरोपी आमच्या जातीचे किंवा समकक्ष असतील तर आम्ही ते असे अनाडी, मूर्ख, बालिश वगैरे आहेत या बचावाची तयारी करतो.

आम्ही माणूस नेमके कधी होणार आहोत ?

जगाला उद्धारी वगैरे म्हणणारी एक मुलगी,महिला बलात्कार होऊन निर्घृणपणे खून करून हालहाल करून मारली जाते, बलात्कार सामूहिक असतो तेव्हा एक स्त्री पीडित आहे हे पुरेस नाहीये आपलं रक्त पेटून उठायला ?

की आपल्या रक्ताचे रंग बदललेत ? वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे रंग ?

तुम्ही शहरात आहात म्हणून अस काही होणार नाही या भ्रमात आहात ?

तुम्ही त्यांचे समर्थक आहात या भ्रमात आहात की आपली जात श्रेष्ठ या भ्रमात आहात ?

लांडग्यांच्या जातीला फक्त बाईची योनी आणि स्तन दिसतात बाकी काहीही नाही हे ठाऊक नसेल तुम्हाला तरी हेच उघडनागड सत्य आहे.

वाट्टेल ते करा, रडा ,ओरडा, आक्रोश करा, लिहा,बोला, चित्र काढा, रस्त्यावर या,

पण त्या लेकरासाठी आज ठाम उभे राहा ,

कारण हे लांडगे सोकावले तर उद्या तिच्या जागी कुणीही असेल, अगदी कुणीही !!



Ananda Sh*tole

19/09/2020

Copied from wall of Mr. Samrat Fadnis
-----------+++++++++----------------++++-------

*डबक्यात वाकून बघणार; तर चिखलच उडणार !*

मीडिया म्हणजे फक्त टीव्ही नव्हे. प्रिंट, डिजिटल, टीव्ही अशांना एकत्रित मीडिया म्हणणं जास्त योग्य आहे.

वाचन कमी, आकलनाची तयारी नाही, टीव्हीतली बटबटीत चॅनेल निवडून त्यातल्या महाबटबटीत बातम्या पाहायच्या आणि 'काय हा मीडिया...', म्हणून बोंब ठोकायची, हा रिकामटेकडा नवउद्योग बनून गेलाय.

अर्णब काय फोन करून कानात सांगत नाही, की या माझं चॅनेल मी कर्कश्श किंचाळतो तेव्हा बघाच.

ते बघतो आपण, आपल्या निवडीनं आणि आवडीनुसार.

त्याचवेळी रवीशही ग्रामीण भारतावर, बेरोजगारीवर बोलतच असतो की.

ते पाहायला बोअरिंग वाटतं! कारण, तो प्रश्न विचारतो. ते बोचतात.

अर्णब न्यायनिवाडाच करून टाकतो आणि व्हर्चुअल कोर्टात बदनामीचा रिअल शिक्षाही देऊन टाकतो.

पेपरमध्ये बटबटीतपणा आणि सवंगपणा तुलनेनं अत्यंत सुक्ष्म असतो. पण, ते वाचायचं, त्यावर विचार करायचा आणि डोक्यात चढवून घ्यायचं कधी?

कित्येक पत्रकार महाराष्ट्रातल्या शहरी, ग्रामीण प्रश्नांवर रोज लिहिताहेत. गावोगावी, गल्लोगल्ली फिरून तिथल्या प्रश्नांवर आवाज उठवताहेत. सोल्यूशन्सही शोधताहेत.

सोशल मीडियावर अशी शेकडो लोकं आहेत, जी क्वालिटी कन्टेन्ट तयार करतात. तोही बहुतांशी फुकट. मराठी, हिंदी आणि इंग्रजीत अशा अनेक वेबसाईट आहेत, जिथं रोज डोकं खाजवावं लागेल, अशा स्टोरी असतात.

हा सगळा मिळून मीडिया असतो...त्यात एखादं डबकं असतंच. तिथं कुणीतरी थयथयाट करत असेल, तर शहाणा माणूस घाण अंगावर उडेल म्हणून कडेनं निघून जातो.

समोर उभा राहून वाकून बघून अंगावर चिखल उडवून घेऊन नंतर 'काय हा चिखल...', म्हणून त्रागा करत बसत नाही.

आपण डबक्याजवळ उभं राहायचं की नाही, हे लोकांनी ठरवायचं असतं. त्यासाठी आपलं आकलनही वाढवायचंच असतं.

- सम्राट फडणीस

#नोंद2020

Harsimrat Kaur Badal quits Union Cabinet in protest against two agri Bills 18/09/2020

A good gesture worth more than thousand fake words...

Harsimrat Kaur Badal quits Union Cabinet in protest against two agri Bills Resignation “in protest against anti-farmer ordinances and legislation,” says the sole Shiromani Akali Dal representative in the Narendra Modi government.

13/09/2020

You see when people like us encourage media like Arnab Goswami, Anjana Kashyap n many more you'll never get NEWS. What you'll have is entertainment with no sense. What these people are doing is not journalism. Journalism & reporting needs manpower n hard-work & on the other hand debates needs two or three people arguing with eachother.
Educate yourself what you really want to see on your tv.

29/08/2020

What do you expect...

#कंगना को पता नहीं अपने देश के बारे में। न ही जाति-प्रथा नामक के बारे में। जो सदियों से शोषण का एक टूल रहा है।

24/08/2020

अर्णबच्या जमातीला शिक्षा कोणती द्यायची?
- *संजय आवटे*

'तबलिगी'च्या बातम्या अशा प्रकारे दिल्या जात होत्या की जसे काही तमाम मुस्लिमांनी 'हिंदू भारता'वर 'कोरोना'चे संकट लादले आहे. त्यावर मी 'अर्णबची जमात' अशी पोस्ट त्या वेळी लिहिली होती. तेव्हा, 'लिबरल' म्हणवणारेही अनेकजण माझ्या विरोधात होते. अशा 'मूर्खपणा'चे समर्थन आपण केले; म्हणूनच हिंदुत्ववाद्यांचे फावले, असा त्यांचा रोख होता. मी मात्र माझ्या मुद्द्यावर ठाम होतो.

टीव्ही वाहिन्या, त्यातही हिंदी वाहिन्या 'कोरोना की इंटरनॅशनल जमात' अशा प्रकारचे टॅगिंग करून भयंकर पद्धतीने बातम्या देत होत्या. त्यात अर्थातच 'आज तक', 'झी', 'रिपब्लिक' वगैरे आघाडीवर होते. टीव्हीवर डिबेट्स झडत होते. त्यात मुस्लिम मौलवी विरुद्ध हिंदुत्ववादी पांडे वगैरे असा संघर्ष रंगवला जात होता. 'हिंदू विरुद्ध मुस्लिम' असा आवडीचा डिस्कोर्स प्रस्थापित केला जात होता.

आता हाय कोर्टाचाच निकाल आला आहे.
परवा हाय कोर्टाने सांगितले की, 'तबलिगी'ला बळीचा बकरा बनवले गेले! एवढे सांगून न्यायालय गप्प बसले नाही. 'तबलिगींना बळीचा बकरा बनवणे हा भारतीय मुस्लिमांना अप्रत्यक्षपणे धमकावण्याचा प्रयत्न होता. नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणा-या मुस्लिमांना हेतूतः त्रास दिला गेला. तबलिगींना बळीचा बकरा बनवले गेले. प्रत्यक्षात त्यांची चूक काहीही नव्हती. मात्र, तसे वातावरण तयार केले गेले', असे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे.

या 'मरकज'साठी जे लोक परदेशातून भारतात आले होते, त्यांच्याकडे अधिकृत व्हिसा होता. तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी येत आहेत, असे त्यांनी अधिकृतपणे म्हटले होते. दहा मार्चपूर्वी हे लोक भारतात आले होते. तेव्हा, भारतात लॉकडाऊन सुरू झालेले नव्हते अथवा विमानतळांवर स्क्रिनिंगही सुरू नव्हते. उलटपक्षी, ट्रम्प यांचे स्वागत आणि मध्य प्रदेशातील 'ऑपरेशन लोटस' असले उद्योग मुक्तपणे सुरू होते.
'मरकज'साठी जे लोक बाहेरून आले, ते लॉकडाऊनमुळे इथे अडकून पडले. सरकारने त्यांची जबाबदारी तर घेतली नाहीच, उलटपक्षी ज्यांनी त्यांना आश्रय दिला, त्यांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे केले. आणि, वातावरण असे तयार केले की जणू सगळे मुस्लिम गुन्हेगार आहेत!

हे मी नाही. उच्च न्यायालय म्हणतंय.

मुळात, ज्या कालावधीत निजामुद्दीनमध्ये 'मरकज' सुरू होते, त्याच सुमारास मी स्वतः मुंबईतील एका इंटरनॅशनल कॉन्फरन्सला हजर होतो. सरकारने तोवर कोणतीच पावले उचलली नव्हती. सरकार शब्दशः झोपलेले होते. आयोजकांचे म्हणणे असे की, 'मरकज' आयोजित होण्यात काही अवैध नव्हते. मोदींनी 'जनता कर्फ्यू' घोषित करताच 'मरकज' थांबवले गेले. पण, त्यानंतर लॉकडाउनही घोषित झाले. सगळे लोक दिल्लीतच अडकून पडले. त्यांच्या सुटकेसाठी आणि चाचणीसाठी यंत्रणेने मदत तर केली नाहीच, उलट गुंते वाढवले. हे अपयश यंत्रणांचे आहे. या यंत्रणा केवळ राज्य सरकारच्या नाहीत. त्या केंद्राच्याही आहेत.
तरीही, वातावरण पेटवले गेले. कोणी पेटवले?
माध्यमांनी जे भयंकर वृत्तांकन केले, त्याबद्दल त्यांना आता तरी पश्चात्ताप वाटायला हवा, असे कोर्टाने म्हटले आहे.

काल कोर्टाच्या निकालाची ही बातमी कुठेतरी कोप-यात लागली वा दाखवली गेली. पण, अर्णब आणि त्याच्या जमातीने जे त्या काळात जोरजोरात दाखवले, ते मात्र लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिले. अर्णबच्या टोळीचे काम होऊन गेले.

'गोबेल्स'पेक्षा भयंकर असा हा प्रचार आहे. त्याला खुद्द महाराष्ट्र सरकारही बळी पडले. तिथे इतरांचे काय?

कोर्टाने निकाल तर दिला. 'तबलिगी जमात' निर्दोष असल्याचे सिद्धही झाले. पण, देशात हिंसक वातावरण तयार करणा-या आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम असा द्वेष पेरणा-या अर्णबच्या जमातीला कोणती शिक्षा द्यायची?

**********
Source - From Author's wall

29/06/2020

"और बहुत आएंगे! हम आखिरी थोड़े ही हैं "

पुलिस की बंदूक द्वारा मरने से पहले "निषाद" के मुंह से निकली ये अंतिम पंक्तियां ही फ़िल्म "आर्टिकल 15" के आगे की कहानी लिखेंगी। फ़िल्म में "निषाद".. भीम आर्मी के चंद्रशेखर "रावण" की भूमिका में हैं।

फ़िल्म का हीरो "आयुष्मान खुराना" होंगे, डायरेक्टर की चाह भी लगभग यही रही है। सिनेमा हॉल में आंख गड़ाए हुए नौजवानों ने भी आयुष्मान के लिए ही तालियां बजाईं। लेकिन मरने से पहले निषाद के मुंह से निकली इन अंतिम पंक्तियों को सुनने के बाद एक इतिहासकार की कुछ पंक्तियां याद आती हैं जिसने गुप्त काल को भारतीय समाज का स्वर्णिम काल मानने से मना कर दिया था। उस इतिहासकार ने कहा कि "गुप्त काल अभिजातीय वर्ग के लिए स्वर्णिम काल रहा होगा, हाशिए के समाज के लिए कोई भी काल कभी भी स्वर्णिम काल नहीं रहा, हाशिए के समाज का स्वर्णिम काल भूतकाल में नहीं, बल्कि भविष्य के गर्भ में है"

फ़िल्म में मिली तवज्जो के हिसाब से आयुष्मान को फ़िल्म का हीरो कहा जा सकता हैं। लेकिन "नायक" निषाद ही था। नायक निकलकर आते हैं, नायक बनाये नहीं जाते, उन्हें रचा नहीं जाता। नायक सड़कों पर खुद पैदा होते हैं। "निषाद" और उसकी प्रेमिका गौरा परिस्थितियों की उस उर्वरभूमि पर पैदा होते हैं जिसने कभी डॉ. अम्बेडकर को पैदा किया था।

"निषाद" आर्टिकल 15 फ़िल्म का एक ऐसा नायक है जिसपर फिल्मकार का कैमरा कम ही पहुंचा। लेकिन निषाद को नायक कहने के पीछे कइयों कारण हैं। निषाद ने असमानता और शोषण पर आधारित जातिव्यवस्था को "इंडियन एक्सप्रेस" अखबार के किसी आर्टिकल को पढ़कर नहीं जाना। और न ही जातिव्यवस्था को जानने के लिए उसने "रामशरण शर्मा" की भारतीय समाज व्यवस्था पर लिखी गई किताबें ही पढ़ीं।

"निषाद" का नायकत्व "सूवर खाने" के आंगन में जन्म लेता है। निषाद का नायकत्व पशुओं का चमड़ा उतारने वाले बाड़े में जन्म लेता है। निषाद का नायकत्व किसी फिल्मकार ने करिश्माई कहानी कहकर नहीं गढ़ा बल्कि उन तमाम परिस्थितियों में जन्मा जिसमें उसके समाज के लोग कभी हरिजन, कभी बहुजन, कभी दलित बनकर रह गए। आदमी न माने गए।

निषाद का नायकत्व उन परिस्थितियों में जन्म लेता है
जिनमें उन्हें क्लास के बाहर बैठकर पढ़ना पड़ता था। जिनके पानी के मटके अलग हुआ करते थे। जिनके बाप को आज भी चौधरी के घर जमीन पर बिठाया जाता है। जिनकी माँ को आज भी जमींदार अपनी हवस तुष्ट करने के लिए अपने खेतों में दबोच लिया करता है। जिन के बच्चों पर समाज ने " पढ़ गए पूत कुमार के सोलह दूनी आठ" जैसी निर्योग्यताएँ लाद दीं। जिनकी माँ की शादी के अगले दिन ही मेहंदी लगे हाथों में टीन की दो परतें थमा दी गईं थीं, पूरे मोहल्ले के दरवाजे-दरवाजे मल साफ करने के लिए...

फ़िल्म आर्टिकल 15 की कहानी क्या है? उसके किरदार कौन हैं? ये बताना मेरा काम नहीं। लेकिन
इतना कहूंगा फ़िल्म आर्टिकल 15 अदम गोंडवी की कविता "चमारों की गली में ले जाता हूँ" से दो इंच अधिक नहीं है।

सिवाय इसके कि इसमें नायक सवर्ण है और शोषित दलित हैं। फिल्मों में ऐसा सम्भव है। लेकिन असल जीवन में हाशिए के समाज का नायक उसी समाज से निकलेगा। जिन्हें अपनी प्रेमिका को चूमने का भी वक्त न मिला। जिन्हें अपनी प्रेमिका की ओर पलभर हंसकर देखना भी पाप लगा। जिन्होंने महबूबा की गोदी में थके हुए सर आराम करने के लिए रखे तो सही! लेकिन महबूबा की गोदी में सर रखते हुए भी उनके मन में पूनम के गीत नहीं आए बल्कि मैला उठाती माँ की तस्वीरें आईं। जिन्होंने पांच मिनट भी किसी नदी में पैर लटकाकर प्रेमिका के साथ नहीं बिताए। जिन्होंने दो मिनट मनभर साथ में चांद नहीं देखा।

अपने संघर्ष के दिनों में निषाद और उसकी प्रेमिका गौरा के मन में ये मलाल तो होता है। लेकिन मरते वक्त निषाद के चेहरे पर इस बात को पढ़ा जा सकता था कि उसे इस बात का सब्र है कि निषाद अंतिम नहीं है कल और लोग जन्म लेंगे!

फ़िल्म अच्छी है, केवल इतना कहना भर कम है। फ़िल्म सम्भवतः दशक की सबसे अच्छी फिल्मों में से एक साबित हो सकती है। फ़िल्म आर्टिकल 15 इतिहास काल के उसी दर्जे में रखी जा सकती है जिस दर्जे में ओमप्रकाश वाल्मीकि की "जूठन" रखी गई है।

फ़िल्म बनाते समय डायरेक्टर अभिनव सिन्हा ने कहीं पर भी बैलेंसवादी बनने की कोशिश नहीं की है। उसने हर छोटी छोटी चीजों पर अपना कैमरा घुमाया है। एक ऐसे दौर में जहां बाजार ही क्रीम-पाउडर से लेकर क्रिकेट की हार जीत तय कर रहा है ऐसे में जितना स्पेस फिल्मकार को मिला है उसमें उसने समाज के सभी बदरंग अंगों को नग्न कर दिखाया है। फ़िल्म के लेखक गौरव सोलंकी ने जिस तरह से संवादों को गढ़ा है हिंदी सिनेमा इसपर आने वाले समय में फक्र कर सकता है। एक्टिंग के लिहाज से आयुष्मान तो जचते ही हैं इसपर बहस करने की जगह नहीं मिलती लेकिन मनोज पाहवा की एक्टिंग अनुभव की भट्टी से तपकर निकली मालूम होती है। जिसके आसपास कोई नहीं।

अंत में एक ही बात कि फिल्मकार ने फ़िल्म के किरदारों की अभिव्यक्ति की आजादी का खूब सम्मान किया है। उसने अपने किरदारों के सामने आंखें नहीं नटेरीं, न ही उनकी गलेबान पकड़ी। एक ऐसे समय में जहां सिनेमाहॉल के दर्शकों में एक बड़ी संख्या सवर्णों की ही है ऐसे में जातिव्यवस्था के मुद्दे को सिनेमा की मुख्यधारा में लाकर फिल्मकार ने पीठ थपथपाने का काम किया है।

लेकिन फ़िल्म आर्टिकल 15 को जूम करके देखने पर आप यह पाएंगे कि भले ही फ़िल्म जातिव्यवस्था पर प्रभावी चोट करती है लेकिन निषाद को छोड़कर अन्य दलितों की स्थिति कृपापात्र जैसी ही है।

निषाद और उसकी प्रेमिका गौरा पर एक अलग फ़िल्म भी बन सकती है और ऐसा बिल्कुल नहीं है कि दलित नायक केंद्रित फिल्मों को दर्शक नहीं मिलते। फ़िल्म मशान और रजनीकांत की फ़िल्म काला अपने समय की सराही गई वो फिल्में हैं जिसके नायक भी हाशिए के समाज से ही आते हैं। उम्मीद है फिल्मकार बाजार के अदृश्य दवाब से बाहर निकल इस बात को जल्दी ही समझेंगे। और इस बात को भी समझेंगे कि बड़ोदा के ब्राह्मण राजा गायकवाड़ ने भले ही डॉक्टर अम्बेडकर की मदद की, उन्हें पढ़ाने के लिए स्कॉलरशिप दी। विदेश भेजा। हर संभव साथ भी दिया। लेकिन सन 47 के समय दलितों पर बनने वाली फ़िल्म के नायक अम्बेडकर ही होंगे गायकवाड़ नहीं।

{आर्टिकल 15 फ़िल्म को एक साल कम्प्लीट हो गया है}

— श्याम मीरा सिंह
(Sources : Post -Tarksheel Society, Img - The Indian Express)

दिल्ली हिंसा में आरोपी सफ़ूरा ज़रगर को हाईकोर्ट ने सशर्त ज़मानत दी 23/06/2020

She got bail, 23 Week pregnant... Let's hope for the better...

दिल्ली हिंसा में आरोपी सफ़ूरा ज़रगर को हाईकोर्ट ने सशर्त ज़मानत दी जामिया मिलिया इस्लामिया की छात्रा सफ़ूरा ज़रगर पर दिल्ली हिंसा में साज़िश रचने का आरोप है. उन्हें बीते 10 अप्रैल को ...

'Pregnancy No Ground for Bail': Delhi Police Cites Jail Statistics, Opposes Safoora Zargar's Plea 22/06/2020

This is dark time for democracy from east to west all over the world. Some power greedy, hate mongers want to challenge the power of people & we shall prove them the power of democracy, power of unity, power of love has always triumph. This time will pass. We'll fight through this.
More power to you
हम भी देखेंगे...

'Pregnancy No Ground for Bail': Delhi Police Cites Jail Statistics, Opposes Safoora Zargar's Plea At the Delhi HC, police said 39 deliveries have taken place in Delhi prisons in the last 10 years.

27/03/2020

Any thoughts about this?

सर वाल्टर रँड यांचा खून करण्यामागचे धार्मिक कट्टरता हेच कारण होते.
========================
© Madhav Khare
२२ जून १८९७ चा सर वाल्टर रँड यांचा खून करण्यामागचे धार्मिक कट्टरता हेच कारण होते. या हत्येला प्लेगच्या साथीची पार्श्वभूमी होती. जेव्हा पुण्यात प्लेगची साथ सुरु झाली तेव्हा माणस पटापट मरत होती. मरणाऱ्यांची संख्या काही हजारापर्यंत पोहोचली होती.

अश्या परिस्थितीत *सनातनी मंडळी ही साथ देवाची अवकृपा झाली आहे म्हणून देव पाण्यात बुडवून रोगी नीट होण्याची वाट बघत होते.*

आज जसे करोनावर उपचार म्हणून ही मंडळी शेण खाणे, गोमुत्र पिणे व जै श्रीराम हा मंत्र म्हणायला सांगतात तर काही मंत्री 'गो करोना गो...' हा उद्घोष करतात... अगदी तसाच प्रकार होता तो...!

प्लेग हा रोग हे व्हायरसपासून होतो हे यूरोपियन देशामध्येच माहीत होते, तेव्हा भारतामध्ये या बद्दल कमालीच अज्ञान होते.

या रोगांना भारतात देवांचा कोप झाला असच समजत असत, आणि इतर समाज ही सनातनी प्रवृतीचे शेपुट धरून त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालत असत.

या रोगावर काही उपाय नव्हता. फ़क्त हा संसर्गजन्य रोग आहे, आणि बाधित रोग्यांना इतर चांगल्या माणसांपासून दूर ठेवले असता हा रोग नियंत्रणात येतो एव्हडेच कळाले होते. यालाच आपण आजच्या भाषेत quarantine असे म्हणतो.

त्या नुसार इंग्रजांनी उपाय सुरू केले. या कामासाठी सिव्हिल ऑफिसर रँडची प्लेग कमिशनर म्हणून नियुक्ति केली. आणि indian epidemic act 1897 नुसार रॅंड याना आधिकार बहाल केले. सध्या महाराष्ट्र शासनाने याच अॅक्टनुसार प्रत्येक जिल्हाधिकारी यांना असेच आधिकार करोना प्रसार रोखण्यासाठी दिले आहेत.

रँडने लोकांमध्ये जाऊन या रोगाची माहिती दिली... या रोगाची तीव्रता सांगितली... रोग्यांना इतर चांगल्या माणसांपासून दूर ठेवणे हाच एक उपाय आहे हेही सांगितले.

परंतु रोग हे अश्या काही विषाणु मुळे होतात हे मुळातच माहीत नसलेल्या सनातनी समाजाने रँडला विरोध केला. रँडने त्याच्या कर्तव्याला जागुन घराघरातून प्लेगचे रोगी शोधून त्यांना इतरांपासून वेगळे ठेवले आणि प्लेग नियंत्रणात आणला.

*अशा पद्धतीने रँडने या उपचार मोहिमेत लाखो लोकांचे प्राण वाचविले व त्याला दिलेले कर्तव्य निष्ठेने पार पाडले.*

परंतु लाखो भारतीयांचे प्राण वाचवीणाऱ्या रँडच्या या उपकाराचा सनातनी प्रवृत्तींना गंधही नव्हता. सनातनी प्रवृतींनी या मोहिमेला धर्म संस्कृतीचा ऱ्हास असा समज करुन घेतला.

टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहून ठिकठिकाणी भाषणे देऊन शासनाच्या समाजाला आवश्यक असणाऱ्या मोहिमेविरुद्ध सनातन प्रवृत्तींना इंग्रजांविरुद्ध भडकवायला सुरुवात केली.

याचा परिणाम असा झाला की, लाखो भारतीयांचे प्राण वाचवीणाऱ्या रँडचा खून सनातनी विचारधारा असणाऱ्या चाफेकर बंधुनी 22 जून 1897 रोजी केला. रँड बरोबर त्याचा सहाय्यक आयस्टर याचाही खून केला गेला.

प्लेग विरूध्द लढा देणारे हुतात्मा रँडच्या खुनाबद्दल चाफेकर मंडळींना मृत्यूदंड दिला गेला,
आणि समाजात सुधारणा घडवून आणण्यात बाधा निर्माण करण्याच्या आरोपा खाली टिळकांना सक्तमजुरिची शिक्षा झाली.

एकूणच रँडचे हौतात्म्य हे सनातनी मंडळींच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे घडले.
याचा दुजोरा पुन्हा चाफेकरांच्याच आत्मवृत्तात मिळतो तो असा...

*चाफेकर आत्मवृत्तात एके ठिकाणी म्हणतात, "रँड साहेबांचे आणि आमचे काहीएक वाकडे नव्हते त्यांनी जर आमचे धर्मात हात घालण्याकडे दुर्लक्ष केले असते तर आम्हाला असे करण्याचे काम पडले नसते..."*

ते पुढे लिहितात, "रँड साहेबास कोणतेही व्यसन नसावे असे आमचे मत आहे. तो कधीही लेडीबरोबर लॉन टेनिस खेळत नसे. असे *त्याचे बरेच गुण आमच्या लक्षात आले होते, पण उपयोग काय? तो आमचा धर्मशत्रू बनला होता. त्यामुळे त्याचा सूड घेणे आम्हाला जरूर पडले...*

चतुश्रुंगींच्या मंदिरात चाफेकर एक पद म्हणतात
" पुण्य पत्तनी रँडने धर्म बुडविला सारा ।।
त्या मारा अविचारा हात आमुच्या गे आंबे धैर्य दे मज ।।"
--- रँडने आमचा धर्म बुडवला त्यामुळे त्या अविचारीला मारण्याचे बळ दे...

८ ऑक्टोबर १८९७ ला पोलसांना स्टेटमेंट देताना चाफेकरांनी स्पष्ट म्हटलय ब्रिटीशानी आमच्या देवघरातील मुर्त्या तोडल्याने त्याचा बदला म्हणून आम्ही हे खून घडवले...

(त्यांनीच कबूल केल्याप्रमाणे रँडचा खून चापेकर बंधूंनी देशासाठी नाही तर धर्मासाठी केला. तरीही आम्ही देशभक्तीचा ठेका घेतलेले म्हणणार की, चापेकर बंधू देशभक्त होते! यालाच उरबडवेगिरी म्हणतात.JK)

26/02/2020
19/02/2020

जात, धर्म, लिंग, भाषा या सर्वांपलिकडे जाऊन रयतेला माय बाप मानुन त्यांच्यासाठी झटणाऱ्या, आपल्या आयुष्याची बाजी लावणाऱ्या, आपल्या कर्तृत्वाने इतिहास बदलवणाऱ्या राजास मनाचा मुजरा...
छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
त्यांचे स्मरण फक्त एक दिवस नाही तर आयुष्यभर करण्यासारखे आहे.

काही घटना, माणस आपलं आयुष्य बदलवून टाकतात,

सुस्मृत नरहर कुरुंदकर आणि छत्रपती शिवाजी महाराज.

शाळेला असताना मराठीचा एक धडा होता ' एतद्देशीयांचे राज्य व्हावे ' तो खरतर कुरुंदकरांनी लिहिलेल्या ' छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य ' या छोट्या पुस्तिकेमधील उतारा.

तो वाचताना एक वेगळा पैलू समजला आणि मग वाचताना कुठल्याही घटना ,गोष्टीचे वेगवेगळे पैलू समजून घेऊन विश्लेषण करण्याचा नाद लागला.

आज शिवजयंती आहे म्हणून त्याच पुस्तिकेच्या अनुषंगाने लिहिण जास्त गरजेच आहे.

जेव्हा स्वार्थासाठी लोकांनी शिवाजी हे नाव चलनी नाणं म्हणून वापरणं सुरु केलंय त्या काळात लिहिणं अजून जास्त गरजेचं आहे.

अस म्हणतात चांगला सेनापती चांगला राजा असेलच अस नाही.

चांगला राजा चांगला सेनापती असेलच अस नाही.

युद्ध जिंकण ,लढाया जिंकण ह्यापलीकड जिंकलेल्या राज्यातल्या माणसांची मन जिंकण अतिशय अवघड असतय.

दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने युद्धकाळात प्रधानमंत्री म्हणून विन्स्टन चर्चिल ह्यांना निवडल होत , मात्र युद्ध संपल्यावर झालेल्या निवडणुकीत त्यांना विजय मिळू शकला नाही.

शिवाजी महाराजांचं मोठेपण दिसून येत ते इथच.

आधी आणि नंतरही कदाचित युद्धशास्त्र , लढाईचा आवाका ह्या निकषावर त्यांच्यापेक्षा जास्त शूर ,पराक्रमी राजे होऊन गेलेले असतील.मात्र युद्ध जिंकण्यापलीकडे काय करायला हव ह्याच अचूक भान असलेला राजा म्हणजे शिवाजी.

स्वप्न सगळेच पाहतात , काही लहान काही मोठे ,काही आवाक्यातले काही आवाक्याबाहेरचे.

मात्र शहाजीराजांनी बघितलेलं स्वप्न अशक्यप्राय आणि प्रचंड मोठा आवाका असलेल होत.

आपल्या भूमीवर आपलच राज्य असाव , स्वराज्य असाव हे स्वप्न.

त्यासाठी त्यांनी मांडलेला राजकारणाचा पट आणि खेळ प्रचंड मोठा होता.

छोट्या निजामशहाला मांडीवर बसवून जुन्नरहून राज्यकारभार करताना त्यांनी केलेला प्रयोग अल्पकाळ टिकलेला असला तरीही त्यांच्या मनात काय आहे ह्याची चुणूक देणारा होता.

महाराष्ट्रात जिजाऊनी शिवाजीराजांना घेऊन स्वराज्याचा पाया घालायचा ,त्याला पाठबळ देण्याच काम शहाजीराजे दक्षिणेत राहून करणार.

दक्षिणेत असलेले राजे आपल्या बाजूला वळवून घेऊन सगळ्यांची एकत्र मोट बांधून मग सगळा दक्षिण भारत दिल्लीच्या सत्तेच्या विरोधात उभा करून दिल्लीची सत्ता मोडून काढायची.

ह्या रणनीतीचा भाग म्हणून शिवाजी राजांनी गोवळकोंडा सारख्या राज्याशी मैत्री जोपासली , इतरही भागात जिथे राज्य जिंकली तिथले राजे कायम ठेवून मांडलिक बनवले.

शिवाजी महाराजांना दीर्घायुष्य लाभल असत तर कदाचित तरुण संभाजीराजांच्या मदतीने भारताच्या राजकारणाचा इतिहास बदलला असता.

पण इतिहासात जर तरला स्थान नसतय.

राजांच्या आयुष्यातल्या डोळे दिपवून टाकणाऱ्या घटना , अफजलखान वध,पन्हाळा सुटका , शाहिस्तेखान अथवा आग्र्याहून सुटका हे प्रसंग बाजूला ठेवून राजे बघितले तर मग त्यांच व्यक्तिमत्व अजून उत्तुंग आणि भव्य दिसत.

छोटे छोटे तपशील घेऊन अभ्यासले तरीही ज्या प्रदेशावर आपण राज्य करतोय त्या प्रजेला राज्य आणि राजा आपला वाटला पाहिजे ह्या भावनेतून त्यांनी सगळे निर्णय घेतले.

जुलमाचा रामराम घालून ,पैशासाठी लढणारी फौज सगळ्याच राजांकडे होती मात्र हे राज्य आपल आहे ह्या भावनेतून राजासाठी आणि राज्यासाठी हसत मृत्यूला कवटाळणारे जिगरबाज वीर निर्माण करण आणि ती प्रेरणा माणसांच्या मनात निर्माण करण हे खर राजेपण.

हि प्रेरणा निर्माण व्हायला एका रात्रीत झालेली नव्हती , एक एक छोटे छोटे निर्णय घेऊन त्यांनी रयतेच्या मनात विश्वास निर्माण केला आणि मग रयत तिथवर आली.

त्याचा परिपाक म्हणून संभाजी राजांच्या हत्येनंतर स्वराज्य बुडवायला महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेल्या औरंगजेबाला २७ वर्षे झगडून यश मिळाल नाही आणि दक्षिण जिंकण्याच स्वप्न अधूर ठेवून आलमगीराने नगरजवळ शेवटचा श्वास घेतला.

आरमाराची उभारणी , व्यापाराला परवानगी , शेतसारा , पीककर्ज ,पाण्याची व्यवस्था, स्थैर्य अश्या प्रत्येक पातळीवर राजांचे निर्णय त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात.

कुटुंब जोडलेलं असतय घरातल्या स्त्रीशी जी सगळ्या घराला बांधून ठेवतेय.

राजांच्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या घटना.

रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा , हिरकणीचा केलेला सन्मान आणि दक्षिणेत सरदार स्त्रीची विटंबना झाली म्हणून आपल्या सरदाराना केलेली शिक्षा.

ह्या घटना डोळसपणे पाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांना आपला राजा नेमका कसा आहे हे समजल आणि त्यांनी हे राजाच मोठेपण अनुभवून त्यांच्यावर विश्वास टाकला.

हाच विश्वास त्यांनी पुढल्या पिढ्यात संक्रमित केला म्हणून अवघा महाराष्ट्र शिवाजी-संभाजी महाराज नसतानाही मुगलांशी झुंजत राहिला.

माणसांच्या मनात राज्य आपल आहे हा विश्वास निर्माण करण आणि मग त्या माणसांनी राज्य आपल म्हणून त्याच रक्षण करण हि त्याकाळातली अतिशय दुर्मिळ घटना महाराजांचं मोठेपण लखलखीतपणे पुढे मांडत.

ज्या काळात मुगल साम्राज्यात आणि सगळ्याच भारतात राज्यासाठी बाप पोराला ,पोरगा बापाला अटकेत टाकून गादी बळकावत असताना मावळे मात्र आपल्या राजाच्या स्वप्नासाठी प्राण ओवाळून टाकत होते.

सध्याच्या काळात हे जास्त प्रकर्षाने जाणवतय महाराजांनी माणसांना नेमक कस उभ केल ते.

जिथे सरकार नावाची संस्था सगळ काही करेल आणि आपण मात्र बाजूला काठावर बसून गंमत पाहू अशी मानसिकता असलेल्या काळात राज्यासाठी लोकांनी प्राण दिले हे कदाचित लोकांना समजणार नाही आणि समजल तरी पचणार नाही , झेपणार तर नाहीच नाही.

राष्ट्र मोठ होत ते सामान्य माणसांनी राष्ट्राला आपल म्हणून त्याच रक्षण करायला कृती केल्याने.

आजच्या काळात रक्षण करायला कुणाला ढाल तलवार घेऊन लढायला जायचं नाही तर हि लढाई आपल्याच मनात दडून बसलेल्या प्रवृत्तीशी आहे.

राष्ट्राची संपत्ती , राष्ट्राचा लौकिक, बौद्धिक संपदा हि आपलीच असून तीच जबाबदार नागरिक म्हणून वागून आपल्या कृतीने रक्षण केल तर ती वृद्धिंगत होईल हाच धडा आजच्या दिवशी घ्यायला हवा.

अन्यथा फक्त पुतळे उभारून ,स्मारक उभारून सोहळा साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी सगळ विसरून गेलो तर मग उपयोग नाही.

हि समज सगळ्यांना असेल तर कृतीत यावी , नसेल तर समज यावी ह्या शुभेच्छा !!

जोवर भारतातल्या माणसांच्या मनात रयतेच्या कल्याणकारी राज्याची आस आणि संकल्पना जिवंत राहील, जोवर इथल्या माणसांच्या मनात माणुसकी ,कणव, बंधुभाव राहील तोवर शिवाजी महाराज हे नाव मनामनात कायम राहील.

महाराष्ट्राच्या ह्या मानबिंदू आणि मार्गदर्शकाला मानाचा मुजरा !!
By Anand Sh*tole

Website