its_kishparte

its_kishparte

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from its_kishparte, Blogger, .

Photos from its_kishparte's post 07/06/2022

इथल्या भिंतीवर युद्धावर जाणाऱ्या सैनिकांचे जथे, देखणे घोडे, उंट, नर्तिका, पर्शियन टोप्या घातलेले लांब दाढीवाले परदेशी प्रवासी या सर्वाचे कोरीव कामातील देखावे पाहून आपण थक्क होयला होते. सैनिकांचा युद्धाचा सराव तसेच होळीच्या सणात नर्तिकांच्या हातात रंगाने भरलेल्या पिचकाऱ्या व त्यांच्या चेहऱ्यावरील दिसणारा जोश इतका जिवंत उभा केलेला आहे की जणू आपल्यासमोर खेळ चालू आहे असे वाटते. वाघ, बिबटे, नीलगाई, मगरी यांच्या शिकारीची शिल्पे, व शिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भेदक क्रूर भाव अचूक टिपलेले आहेत..

12/05/2022

हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. हंपी येथील श्री विरुपाक्ष मंदिर हे प्रसिद्ध आहे. युनेस्कोद्वारे हंपी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. भारतातील एक अप्रतिम पर्यटन स्थळ म्हणून त्याची ओळख आहे. हंपी हे गाव पंपा क्षेत्र, किष्किंधा क्षेत्र, किंवा भास्कर क्षेत्र या नावाने पन ओळखले जाते. पंपा हे तुंगभद्रा नदीचे एक जुने नाव आहे. त्यावरूनच याला हंपी असे नाव पडले. यालाच विजयनगर किंवा विरुपाक्षपुरा असेही म्हटले जाते. कर्नाटकातील भौगोलिक वैविध्य, राज्याचा प्राचीन कालापासूनचा इतिहास व इथली असंख्य ऐतिहासिक स्थळे, यामुळे कर्नाटक राज्य हे पर्यटकांना आकर्षित करते. प्राचीन ऐतिहासिक स्थळे, सदाहरित जंगले, समुद्रकिनारे येथे पर्यटकांची गर्दी असते. पर्यटनात कर्नाटकचा भारतात चौथा क्रमांक लागतो.
________________________

12/05/2022

आयुष्य हे हंपी सारख असावं भग्न असले तरीही दिमाखात उभं राहायचं..
_____________________

Photos from its_kishparte's post 06/09/2021

आपण सर्वजण हा फोटो आपल्या व्यावहारिक चलनावर पाहत असतो. हा रथ हंपी मधील विठ्ठल मंदिराच्या आवारात ३० ते ३५ फूट उंचीचा अतिभव्य कोरीव काम केलेला दगडी रथ असून, तो प्रथमदर्शनी एकसंध दगडातून कोरलेला आहे असे वाटते, पण तो अनेक दगडांनी इतका व्यवस्थित सांधलेला आहे की ते सांधे बारकाईने पाहिल्याशिवाय दिसत नाहीत. रथाची अजस्र दगडी चाके व त्यावरील वर्णनातीत कोरीव नक्षीकाम, मधील आरीचा दांडा, रथाच्या दोन बाजूंस दगडी हत्ती. पूर्वी या हत्तींच्या जागी घोडे होते, त्यांचे जीर्णमध्यात दगडाची पण लाकडाचा भास होणारी शिडी आहे. एकेकाळी हा रथ फिरवीत असत. हंपी मधील ही सर्वात प्रसिद्ध रचना आहे. बऱ्याच लोकांचं स्वप्न असते एकदा तरी या रथाला जाऊन जवळून पाहावं. .
UNESCO World Heritage Site - Incredible Hampi !!!
1st Batch :- 24th To 26th September 2021

Duration: 2N3D
*Join and visit us*
https://chat.whatsapp.com/HZGuNHeLwE96dOJv4nZ7go

For Booking to call or message
🔹Contacts 🔹
Mumbai - 7757883988 (Kishor)
Pune - 9766308013 ( Akshay)
----------------------------------------------

31/08/2021

This weekend
Pawana Lake camping ..⛺♨️
@ just 1100/-

4 PM to next day 11 Am

🔸Sharing Tents.
🔸Evening High Tea (with Pakoda)
🔸Barbeque (Veg/Non-Veg )
🔸Dinner (Veg/Non-Veg; Unlimited)
🔸Live Guitar
🔸Common bonfire & Music, dance
🔸Breakfast (Poha, Tea)

Other : First Aid Kit, Parking, Common Toilets (western, indian) , Dart game, Cricket, Football, Badminton, Carrom
and more
🚾
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
More details
Mumbai :- 7757883988
Pune:-. 9766308013
----------------------------------------

14/08/2021

सह्याद्रीत वसलेले हे गड-कोट किल्ले…त्यांचा इतिहास, तो निसर्ग, डोंगर दऱ्या, नदी…ओढे, पक्षी पाखरे…विविध रंगी फुले….झाडे वेली…ती माती…तो तिथला दरवळीत सुगंध…तो आनंद मनाला पार भुलवून टाकतो….सह्याद्रीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. त्याच्या अथांग रूपापुढे आपण नेहमीच खुजे वाटत असतो. इथे घडलेल्या इतिहासाने सह्याद्रीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. सह्याद्रीत उभे ठाकलेले गडकिल्ले आपल्याला इथल्या इतिहासाची भव्यता, कल्पकता, सुंदरता यांची प्रचिती देत आजही अगदी भक्कमपणे उभे आहेत. जवळ-जवळ ५०० वर्षे किंवा अधिक काळापासून हे सर्व किल्ले,मंदिरे आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत.
सह्याद्रीला आपापल्या परीने समजुन घेण्यातच खरी मजा आहे, सह्याद्रितील चढ़-उतार आयुष्याच्या नव्या व्याख्या शिकवतात.इथला निसर्ग जगणे शिकवतो. इथले नदी नाले निरंतर आणि संकट काळातुन वाहण्याचा संदेश देतात. इथला रानवारा मनाला सुखावून जातो. इथे प्राणी-पक्षी-वन्यजीव नवनव्या संकल्पनेतुन धैर्य आणि वेळ प्रसंगी शांततेचे रूप घडवतात. खरच हा बेलाग आणि अफाट सहयगिरी मनमोहक आणि कधी कधी रौद्र भासवुन विविधतेच दर्शन घडवतो.

असा हा सह्याद्री आणि मनाला भुलवणारा, अद्भुत हवा हवासा वाटणारा निसर्ग…सगळ्यांना वेड लावणारा सह्याद्री ❤️✌️

13/06/2021

आडदांड, रौद्र, राकट दिसला तरीही सर्वानाच प्रेमाने कुशीत घेत गेलेला हा सह्याद्री इतिहासाने तर ओळखला जातोच, पण त्याच्या आडही कित्येक नवलाईच्या गोष्टी लपल्या आहेत. सह्याद्रीच्या बळकट बाहुपाशात पसरलेली चांदोली, कोयना, भीमाशंकरसारखी जंगले आणि अभयारण्ये.. या अभयारण्यातील पशू-पक्षी- वनस्पतीजीवन हे सारं काही अनुभवावं आणि अभ्यासावं असंच आहे. या सह्याद्रीच्या सान्निध्यातच फुललेले प्राचीन घाटरस्ते, ग्रामीण जनजीवन यांची तर बात काही औरच! देशाला आणि कोकणाला जोडणारे हे रस्ते आपल्याला सह्याद्रीचं खरखुरं रूप दाखवित असतात. कालांतराने या प्राचीन घाटवाटांचं रूपांतर आधुनिक रस्त्यांत झालं असलं तरीही यांचं सौंदर्य काही कमी झालेलं नाही. .

तर सांगायचं तात्पर्य एकच, सह्याद्री म्हणजे फिरस्त्यांसाठी एक अद्भुत ग्रंथच आहे. पावसाळ्यात तर या सह्याद्रीवर स्वर्गच अवतरतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एरवी इतर ऋतूत राकट, बलदंड आणि काहीसा रुक्ष वाटणारा हा सह्याद्री पावसाळ्यात यौवनात पदार्पण केल्यासारखाचं वाटत असतो. या दिवसांत सह्याद्रीच्या कोणत्याही कोप-यात उभे राहा, तुमचे डोळ्यांचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही.. डोंगर, नद्या, ओढे, नाले, पाण्याने भरलेली शेतमळे, फेसाळत कोसळणारे धबधबे, धुक्यात हरवलेली खेडी.. हे सारं पाहिले की मग हा सह्याद्री आपला मित्र वाटू लागतो. पावसाळ्यात सौंदर्याचे नवनवे रूप प्रस्थापित करणारा हा पुराणपुरुष जणू आपल्यासारख्यांच्या फिरण्याच्या कक्षाच रुंदावणारा भासतो. त्यामुळेच पाऊस आणि सह्याद्री हे नातं जर अनुभवायचं असेल, तर आपल्याला सह्याद्रीच्या सानिध्यात स्वतःला हरवाव लागतं..पण यंदा कोरोनासारख्या मोठ्या आजारामुळे आपल्याला घरीच राहावं लागणार आहे . म्हणून की सह्याद्रीवरच प्रेम इथभर पण सुद्धा कमी होणार नाहिये ...
#सहयाद्री❤️
-------------------------------

Website