Hemant Kamat

Hemant Kamat

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hemant Kamat, Blogger, Hotel Vrishali to Tarabai Garden/Chandawani Street, .

27/12/2021

# दडपे पोहे ! I Am Loving It 😋😍

Photos from Hemant Kamat's post 17/07/2021

Veg-Dum Biryani !! 😋

09/07/2021

LEMON PAPER CHICKEN !
Marinated Chicken [Chicken, Ginger - Garlic Paste, Lemon Juice n Zest, Crushed Paper Corn, Whisked Curd And Salt.. ] Cooked in Coconut Oil N Butter with Masale's And Curd... Deliciously Yammi Lemon Paper Chicken Is Ready.... 😋😋

Photos from Hemant Kamat's post 09/07/2021

Shahi Kofta Curry !!
When Panner, Potato, Dry-Fruit Based Kofte Meets With Curry… THERE WILL BE BLAST OF FLAVOURS ! 😋😋

04/07/2021

Chicken Bhuna Masala !!

03/07/2021

Shakshuka !! A Turkish Egg Dish !! 🍳

24/06/2021

# साबुदाणा-बटाटा खिचडी
आज वटपौर्णिमा, म्हणजे बायकोचा वटपौर्णिमेचा ऊपवास असे हे समिकरण, काल दुपारपासुनच ऊपवासाचा डंका वाजला होता. ..
हे आणुन ठेवा, ते आणुन ठेवा, हे पाहिजे… ते पाहिजे… जरा मोठीच लिस्ट सांगितली होती. पण सगळ संध्याकाळी मिळणार कसे ? एक तर लॅाकडाऊन आणि निर्बधामुळे दुकाने बंद… झाली का पंचायत ! तरी पण जाऊन आलो बाहेर, पण काहीही मिळाले नाही…
झाल कल्याण ! मित्रांच्या बरोबर गप्पा मारून घरी आलो तर दारातुनच बायकोवे विचारले, आणलं का सगळे सामान ? लॅाकडाऊन मुळे सगळं बंद असल्यामुळे काही मिळाल नाही म्हटंल. झाला पट्टा चालु. लवकर जायला काय झाल होत ! रिकामटेकड्या मित्रांच्या बरोबर टाईमपास करायला पाहिजे ! वगैरे वगैरे ! वगैरे वगैरे का तर… मला आणखी काय काय बोलली होती ते आठवतच नाही…
पण ती फुगली होती ते मात्र नक्की ! (बहुतेक मागच्या जन्मी फुगेवाली होती वाटत् 😜) झाल मग ! रात्री साबुदाणा न भिजवताच झोपली…
इकडं मात्र मला झोपच येत नव्हती ! तसं पण रात्री लवकर न झोपायची सवयच आहे.. टीव्ही वर सर्फिगं करायच म्हणजे आवाज येणारं व बायकोची झोपमोड होणार आणि म्युट करून टिव्ही बघण्यात काही अर्थ नाही. टिव्ही बंद केला व मोबाईल वर सर्फिंग करत बसलो… रात्रीचे १२:३० कधी झाले हे कळलेच नाही. त्याच वेळी डोक्यात आले कि ऊद्याची साबुदाणा खिचडी आपण करायची. ठरल मग.. गेलो किचन मध्ये आणि साबुदाणा भिजवला… आणि सर्प्राईज द्यायचे ठरवुन झोपलो..
सकाळी उठलो तर सर्व काही नॅार्मल होते.. चहा झाला, आणि काय आणायचे आहे याची लिस्ट वाचुन दाखवत, लवकर लवकर आवरून बाजारातुन सामान घेऊन या अशी धमकी वजा सुचना केली व अंधोळीला गेली.. मला तर तेवढाच चान्स पाहिजे होता. मग काय दाण्याचा कुटं तर होताच, लगेचच दाण्याचा कुटं भिजवलेल्या साबुदाण्यात मिक्स केला.. बटाटा कट करून त्याला मिरची व जिऱ्याची फोडणी देऊन मस्त पैकी बटाटा तुपात फ्राय करून मीठ कोथंबीर टाकुन मिक्स केलेला साबुदाणा टाकला व वाफ देऊन खिचडी तयार करून ठेवली…अशा पध्दतीने फुगा फोडला व वटपौर्णिमेची बायकोसाठी खास साबुदाणा-बटाटा खिचडी करून ठेवली…

©️®️ P. KAMAT..

22/06/2021

Crab 🦀 Rassa !! Surprisingly Tasty 😋

Photos from Hemant Kamat's post 06/06/2021

# Dhahi Vade & Udid Vade !
Ajwain N Mint Flavour , # Sunday Special !!

14/04/2021

Snake Gourd Mixed With Harbhara Dal Veggi N Vangyaache Mirachi Bharit..!!

03/04/2021

Dhahi-Butti... Thanda Thanda Cool Cool !!

02/04/2021

Rangpanchmi Special...
Butter Paneer, Dhahi Bhindi N Masala Kadi... !!

Photos from Hemant Kamat's post 14/03/2021

Sunday Special,
Aromatic And Deliciously Yammicious White Chicken Biryani !! 🐓🍗

07/02/2021

Sunday Special...
Chicken Turmeric ( Fresh )
When Chicken cookes with Fresh Turmeric, Ground Ginger Power, Garlic And Fennel... It gives unique aromatic favour..that awakes the taste buds...😋

Photos from Hemant Kamat's post 31/01/2021

।। कश्मीरी दम आलू ।।

Photos from Hemant Kamat's post 30/10/2020

Rice Kheer On Occasion Of Kojagiri Pournima !!

Photos from Hemant Kamat's post 11/10/2020

Sunday Special !
Malai Chicken And Kolhapuri Chicken Masala !!

Photos from Hemant Kamat's post 09/10/2020

Kerala Style Fish Curry...
Instead Of Raw Mango, Used Mango Powder (Aamchur) And Rava Fish Fry...

Photos from Hemant Kamat's post 28/09/2020

Mutton Shahi Dum Biryani !!
कच्चे घोष कि मटण शाही दम बिर्याणी !!

Photos from Hemant Kamat's post 13/09/2020

Sunday Special Menu !!
Soya Chunks And Chicken Barista !!

05/09/2020

Time For Mix Veg Manchurian...

Photos from Hemant Kamat's post 13/07/2020

Kheema Pulav And Tambada Rassa !!😋

07/07/2020

Poached Egg Peanut Butter Sandwich For Breakfast !!😋😋

21/06/2020

Special....
Today is a # Father’s Day ,
Its a # yoga Day ,
# Annular Solar Eclipse,
And it’s a # Sunday
So what else is required to make Paneer recipe?
So presenting Paneer Lababdar !! 😋😋
& Keshari Shira ! 😋

# Khade Masale’s # Onion Tomato Puree Garlic Paste # Socked Red Chills # Paneer Cubes
# Grated Paneer # Fresh Cream # Kasuri Methi...& # थोडासा प्यार !!
और क्या लगता है पनीर को लबाबदार बनाने के लिये !! 😋

Photos from Hemant Kamat's post 17/06/2020

Dinner Special Chicken Garlic Bhurji !!
( चिकन लसण्या भुर्जी )

Photos from Hemant Kamat's post 06/06/2020

Murga / Chicken Lababdar..
A Mughali Rich Dish...
When marinated cooked chicken meets with gravy of rich tomato onion gravy & spices with tadka of ghee-garlic... MAGIC happens...😋😋

Photos from Hemant Kamat's post 02/06/2020

भेंडी फ्राय आणि कांदा भजी !!
पावसाळी वातावरण, तुटुनपडा खाण्यावर !! 😋😬

30/05/2020

Mix Dal Bukhara” ( मिक्स दाल बुखारा ) is a velvety smooth slow cooked mix lentil simmered in a tomato based gravy And Kolhapur’s Special Pandhara Rassa-Veg (पांढरा रस्सा व्हेज ) made with stock of mix lentil and coconut milk.. - Tastes Same Like Original Pandhara Rassa...

30/05/2020

टॅमरिंड राईस - Tamarind Rice

गोविंदा.....गोविंदा...!! मला तर टॅमरिंड राईस / पुलियोधारी /पुलियोगारे म्हटलं तर पहिल्यांदा तिरूपती-तिरूमाला देवस्थान आठवते. टॅमरिंड राईस हा साऊथ इंडियन म्हणजे आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तमिलनाडु आणि कर्नाटका मध्ये प्रसिध्द !! यामध्ये चिंचेचा कोळ (गर), गुळ याला फार महत्त्व आहे. अंबट गोड चिखट चव, गुळाचा गोडवा, चिंचेचा अंबटपणा, मधे मधे येणारे शेंगदाणे, ऊडीद-हरभरा डाळ आणि मऊसर मॅाईश्यरयुक्त भात... काॅबीनेशन एक नंबरच.
साऊथ इंडिया मध्ये तर याला पुजे मध्ये फारच महत्त्व आहे. काही खास पुजेमध्ये याचा वापर प्रसाद म्हणुन करतात. तिरूपती बालाजी चे दर्शन घेतल्यावर, पद्मावती देवीचे दर्शन घेतल्यावर मंदिरामध्ये तर हमखास पुलियोगारेचा प्रसाद मिळतोच. दर्शन घेतल्यावर गरम गरम मिळणारा राईस तर एकदम भारीच. तिरूपती बालाजींचे रांगेतुन दर्शन घेतल्यानंतर मन तर प्रसन्नच होते पण नंतर मिळालेला प्रसाद म्हणजे एक प्रकारची ऊर्जाच निर्माण करते ओ... सगळा शिण पहिल्या घासा सोबत जातो. गरम गरम भाताची अंबट गोड तिखट चव चाखताना मधे मधे येणारे शेंगदाणे, ऊडिद हरभरा डाळीचे कण- अप्रतिमच, तोडच नाही त्या चवीला...
दर वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला तिरूपतीला जाणे हे ठरलेल, पण या वर्षी COVID 19- करोणा विषाणुंचा प्रादुर्भावामुळे व लाॅक डाऊन मुळे जाता आले नाही त्यामुळे काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. टॅमरिंड राईसची चव घेता आलेली नाही याचे वाईट वाटत होते, पण तो करण्याचा काही योग दिसत नव्हता.
दोन दिवसापुर्वी राज नावचा माझा मित्र भेटला होता, बोलता बोलता त्याने तिरूपती मंदिर में जैसा राईस मिलता है ना वैसा राईस मेरे दोस्त ने बनाया था ! अस बोलला...एकदम तरतरीच आली राव ! तिरूपती, तिथे मिळणांरा प्रसाद, वेगवेगळे देवस्थान, लाॅकडाऊन यावर चर्चामध्ये वीस पंचवीस मिनिटे कशी गेली तेच समजले नाही. पोलीसांच्यां गाडीचा सायरन वाजण्याचा आवाज आला, मग लगेचच पांगा पांग झाली. तोपर्यंत मनाने ठरवलेले होते कि एक दोन दिवसात काहीही झाले तरी टॅमरिंड राईस करायचाच.
आज वेळ मिळाला मग ! तस लाॅकडाऊन मुळे वेळ मिळण्याचा- न मिळण्याचा काही संबध नाहीच... दुपारीच ठरवले होते, मग साहित्याची जुळवा जुळव केली.. आणि लागलो कामाला...
बासमती तांदुळ होताच आणि शिल्लक राहिलेला चिंचेचा कोळ पण होता.. कारण आदल्या दिवशीच पाणी पुरीचा बेत केलेला होता. त्याच झाल अस की ! बरेच दिवस पाणी-पुरी खाल्ली नसल्यामुळे, शरीरातल पाणी कमी झाल होत ना ! तेव्हा काम थोडे सोपे झाले होते..
मग काय राहीलेले साहित्य गोळा केले आणि केला टॅमरिंड राईस..
साहित्य -
तांदुळ, ऊडिद डाळ, हरभरा डाळ, धने, मोहरी, मेथ्या, तीळ, काळी मीरी, हिंग, कडीपत्ता, वाळलेल्या लाल मिरच्या, गुळ, शेगंदाणे व चिंचेचा कोळ, तीळाचे तेल, हळद पुड आणि चवीसाठी मीठ..

चव तर छानच आली होती.. कधी संपला ते समजलेच नाही !!

©️@ Hemant KamaT..
From Ham’s KitcheN !

Photos from Hemant Kamat's post 24/05/2020

Lunch Menu
Egg Curry With Egg Omelette Rolls

Curry made with gravy of fried onions 🧅 , fresh tomatoes 🍅 purée and delicious dried coconut 🥥 powder with Masale’s and fresh ginger-garlic and fresh coriander leaves..
Boil 🥚 eggs, sauté in oil with red chill powder, salt and pinch of asafoetida..
And egg rolls are made with Omelette containing Shah jeera, crushed ginger garlic, green chillies, coriander leaves, turmeric power, asafoetida and salt... with pinch of sugar..
Truly Tempting And Mouthwatering Combination !! 😋😋

23/05/2020

साबुदाणा खिचडी

रोज रोज एकाच टाईपचा नाष्टा करून फारचं कंटाळा आला होता. तस शेंगदाण्याची सोलापुरी चटणी, गरम गरम चपाती व वाफाळलेला चहा, असा रोजचा माझा नाष्टा. या नाष्ट्याला तोडच नाही.पण लाॅकडाऊन चालु झाल्यापासुन आमच्याकडे अपवाद वगळता वेगवेगळा नाष्टा असतोच. तरी तेच तेच खाऊन वैताग आला होता. काही तरी वेगळ पाहिजे होत. साबूदाण्याची खिचडी खाण्याची ईच्छा होत होती. सध्या आमच्याकडे ऊपवास कोणी करत नाही. त्यामुळे स्वयंपाक घरात काही साबुदाणा कुठे दिसत नव्हता. विचारायची पण पंचायत, कारण साबुदाणा आणायला बाजारात जाणार कोण ?
तसा साबूदाणा हा सॅगो पान नावाच्या झाडाच्या खोडातुन निघणाऱ्या चिकापासुन बनवताता. साबुदाण्याचे उत्पादन प्रथम १९४३ -४४ च्या आसपास तमिळनाडूमधील सेलम येथे झाले. आपल्याकडे याचा वापर ऊपवासाठी खिचडी, पापड, खीर तसेच उसळ करण्यासाठी केला जातो. पण मला खिचडी खायची हुक्की आली होती आणि त्यासाठी साबुदाणा लागतो.
त्याच अस आहे कि आमच्या कडे फक्त आणि फक्त कारंडे यांचा के. बी. कंपनीचाच साबुदाणा वापरला जातो आणि तो मिळतो फक्त बिनखांबी गणेश मंदिरा समोरच्या दुकानात. अर्थातच हे माझे ज्ञान !! दुसरीकडे कुठे मिळतो त्यावर माझा विश्वास नाही. एकदा आणला होता दुसरीकडुन पण त्या दुकानदाराने फसवलं. तेव्हा पासुन मी दुसरीकडे कुठे साबुदाणा घेत नाही.
मागच्या आठवड्यात बीणा काकीनीं सांगितले होते कि, शाहुपुरी मध्ये महालक्ष्मी ट्रेडर्स कडे के. बी. साबुदाणा मिळतो. त्यामुळे मी दोन दिवसा पासुन त्या दुकानाच्या समोरून चक्करा मारतोय पण थांबण्याची काही ईच्छा झाली नाही, कारण दुकानाबाहेर असलेली लोकांची तोबा गर्दी व रांग. अस वाटत होत कि खिचडी खाण्याचा योग काही येत नाही. पण ते माझ्या मित्रामुळे (मोहसीन) शक्य झाले कारण तो शाहुपुरीतच राहतो व माझी अडचण त्याने ओळखली होती. दुसऱ्या दिवशी तर साबूदाण्याची पिशवीच माझ्या हातात पडली होती. मग आलो तडक घरी आणि सांगुन टाकले कि ऊद्या सकाळी नाष्ट्याला खिचडी करायचीच म्हणुन. दुपारची झोप झाली, संध्याकाळी शनीजयंतीची पुजा झाली, रात्रीचे भरपेट जेवन पण झाले पण शाबुदाणे काही भिजवले नाहीत. कधी झोप लागली ते पण कळालेच नाही. सकाळी जाग आली ती दचकूनच, कारण स्वप्नात मी कडकडीत शाबूदाणे खात होतो...त्यावेळी आठवले की आपण काल दुपारीच डंका पेटवला होता आणि फुशारकी मारून सांगितले होते की नाष्ट्याला खिचडी करणार म्हणुन...
पण आता काय करायचे ?
माझी मात्र घालमेल घालमेल चालु होती. पण करणार काय ? आणि सांगणार कुणाला आणि काय ?
हळुच स्वयंपाघरात जाऊन शाबूदाणे भिजवायचे असा विचार केला. गेलो स्वयंपाक घरात, पहातोय काय तर भिजवलेले शाबूदाणा.. मस्त पैकी रात्रभर भिजून टरटरीत फुगलेले आहेत... शेवटी आई ती आईच असते,तीने मात्र न विसरता रात्री शाबुदाणे भिजवून ठेवले होते.
झाल मग ! गंगेत घोड न्हायल एकदाच.
शेगंदाणे पण आईने खरपुस भाजुन ठेवलेले होते. माझ काम तर फारच सोप्प झालं होतं. मग काय दाण्याचा कुट करून घेतला मिक्सर मध्ये... भिजवलेल्या शाबुदाण्या मध्ये खंमग दाण्याचा भरपुर कुट, मीठ व थोडीशी साखर टाकुन मस्त पैकी मिक्स केले... कढई मध्ये तेल व तुप मिक्स करून जीरे व हिरवी मिरचीची फोडणी केली व तयार केलेले शाबुदाणा मिश्रण त्यात टाकले व ते व्यवस्थीत परतवुन घेतले व त्यात बारीक चिरलेली कोथंबीर टाकुन एक वाफ दिली... स्वर्गिय सुखाची अनुभती देणारी खिचडी तयार..झाली ! मग काय तुटुन पडलो सगळीजण, बघता बघता संपुन पण गेली.
साबूदाण्याची खिचडी उकडलेला बटाटा किंवा तळलेला बटाट घालुन पण करताता. तसेच शिजवलेली खिचडी दह्या सोबत सुद्धा मस्त लागते. तसेच खाताना तिखट बटाट्याचा चिवडा किंवा शाबु चिवडा पण छान लागतो. तसेच रात्रभर ताकामध्ये भिजवलेल्या शाबूदाण्याची खिचडी पण अप्रतिम लागते. काही पण करा पण दिल खुश होना चाहिये ।।
©️@ Hemant Kamat
From Ham’S KitcheN...

19/05/2020

आख्खा मसूर कोल्हापुरी ढाबा स्टाईल !

Lentil- Masoor Dal...
When, Over night soaked Masoor Dal Cooked in Onion Tomato Gravy and Garlic Ginger Paste with Garam Masale's, Dhane-Jeera power, Red chilli power and Kasoori methi...
Magic Happens...
Simply Delicious And Tasty !! 😋😋

16/05/2020

🌶🌶 Fiery Red Chillies Chatani !! 🌶🌶
Enhances the taste of Dried Chillies With Garlic and Cumin Seeds in Mustard Oil..
Taste buds are going to be blast..
Remains longer and lasts...😋😋

15/05/2020

Veg-Angara And Dal-Fry !!

13/05/2020

राजमा मसाला with कोल्हापुरी तडका !!
एक अत्यंत लोकप्रिय पंजाबी डिश. प्रोटीन से भरपुर आणि खायला पण स्वादिष्ट असते. मोस्टली राजमा मसाला स्टीम राईस बरोबर किंवा जीरा राईस बरोबर फारच स्वादिष्ट लागते. आज थोड्या वेगळ्या स्टाईल ने कोल्हापुरी तडका देऊन राजमा मसाला केलाय.
Perfect combination of fried onion, tomato pure, crushed Rajama with magic of masale and tadaka..
simply delicious and tasty 😋

©️@ Hemant Kamat
Ham’s Kitchen.

Photos from Hemant Kamat's post 12/05/2020

डाळ-खिचडी
डाळ खिचडी ही सर्वात सोप्पा पदार्थ आणि भारतामध्ये सगळ्या प्रांतात मिळणारी डिश. पण प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. डाळ-खिचडी म्हणजे डाळ व तांदुळ, खड्या मसाल्याच्या फोडणीत नेहमी पेक्षा थोडे जास्त पाणी घालुन शिजवलेला भात. जेवण करायचा कंटांळा आला की माझ्या बायकोचा आवडता पदार्थ. तस फक्त माझ्या बायकोचा नाही तर भारतातील सर्वच बायको नावाच्या प्राण्यांचा आवडता पदार्थ. कारण खिचडी असली की पाना मध्ये डावे ऊजवे पदार्थ करायला नको.
आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे डावे-ऊजव्याची ? तर शास्त्र असतयं ते, पान/ताट वाढायचे. या बाबतीत पुन्हा कधीतरी शेअर करीन मी...
काही प्रांतामध्ये कढी खिचडी, डाळ फ्राय खिचडी केली जाते. पण खिचडी बनवाच्या पद्धती थोड्या फार फरकाने सगळीकडे सारख्याच. फाईव्हस्टार हाॅटेल ते साधा हाॅटेल धाब्या मध्ये पण डाळ खिचडी मिळते, पण हाॅटेल मध्ये मिळणारी खिचडी व घरी केलेली खिचडी या मध्ये जमिन- आसमान चा फरक आहे. बऱ्याच हाॅटेल मध्ये स्टीम भात व शिजवलेली तुर डाळ एकत्र करून वरून तडका देऊन ती वाढली जाते. पण डाळ व तांदुळ एकत्र शिजवुन जी चव येते, ओ बात हीं कुछं और होती हैं ।।
माझ्याघरी खिचडी साठी रत्नागीरी २४, इंद्रायणी, अंबे-मोहर, घनसाळ किंवा काली मुछ जातीचे तांदुळ वापरले जातात व त्या सोबत मुग डाळ किंवा लाल मसुर डाळ वापरतात.
मी मात्र अंबेमोहोर किंवा घनसाळ, मुग डाळ व लाल मसुर डाळ मिक्स करून खिचडी करतो. माझे प्रमाण एक वाटी तांदळाला अर्धा वाटी मुग डाळ व अर्धी वाटी लाल मसुर डाळा असे आहे.
तस आमच्याकडे सोमवारी कधीही खिचडी केला जात नाही, कारण काही माहिती नाही, आई-आजीला विचारले तर कधी योग्य ऊत्तर नाही मिळाले. पण नियम तो नियम, कोण मोडणार ?
पण आज सोमवार असुन पण डाळ-खिचडी केलीच ते पण आईनेच सांगितले म्हणुन. खर सांगु तर गेले काही दिवस लाॅकडाऊन मुळे घरीच रहात असल्यामुळे कोणता वार आहे ?, तारीख काय आहे ? हेच समजायचे बंद झाले आहे. माझ्या मावशीची तब्बेत सध्या नरम गरम असते. वय पण जास्त झाले आहे व आज जरा जास्तच तब्बेत खराब आहे तेंव्हा संध्याकाळी आई म्हणाली की, माई साठी ( आई ! मावशीला माई म्हणते ) आज मी खिचडी करते, तर लगेचच मी आईला म्हणालो की, मी करून देतो खिचडी.. झाल मग..
लगेचच कामाला लागलो, डबे पालथे घातले तर मला अंबेमोहर तांदुळ सापडला. तांदुळ, मुग डाळ व लाल मसुर डाळ एकत्र करून स्वच्छ धुऊन पाण्यात अर्धा तास भिजत ठेवले. तोपर्यंत फोडणीची तयारी केली थोडेसे तेल व तुप कुकरमध्ये टाकले. आता तुम्ही विचारणार ! तेल व तुप का ? तर याचे कारण म्हणजे नुसते तुप टाकले तर ते लवकर जळते, काळे पडते आणि मग करपलेला वास येतो फोडणीला. त्यामुळे नुसत्या तुपाची फोडणी टाकु नका तर त्यात थोडेसे तेल टाका... ( “नही तो आप बोलेंगें कि हेमंत आप ने बताया नही” ! “मगर हेमंत ने बताया था” ! - शेफ रणवीर ब्रार स्टाईल )
एक लहान कांदा ऊभा कापुन, तो तुपा मध्ये परतुन, ब्राॅऊनिश झाल्यावर लंवगं, डालचीनी, काळी मीरी व शाह जीरे, तेजपत्ता आणि धने-जीरे, अजवाईन व वेलदोडे खलबत्यात कुटुन घालुन हळद व अर्धा चमचा लाल चिखट टाकून एक मिनिट परतुन घेणे व अर्धा टोमॅटो टाकून त्यात भिजवलेले डाळ तांदुळ मिक्स करणे व एक चिमुट जायफळ टाकून, नेहमीपेक्षा थोडे जास्त पाणी घालुन चवी पुरते मीठ घालणे व कुकरचे दोन शिट्ट्या काढणे. गरमा गरम डाळ-खिचडी तयार...
साजुक तुप टाकुन खायला घेणे...
ते एकत्र शिजवलेले डाळ-तांदुळ, वरून घातलेल्या साजुक तुपामुळे आलेला खंमंगपणा, मसाल्यांचा स्वाद, कांद्याचा गोडवा व टोमॅटोचा ज्युसीनेस हळद व लाल तिखटा मुळे आलेला कलर... सगळ कस Ultimate Combination with Mouthwatering Taste... 😋😋

@©️Hemant Kamat.
From, Ham’s KitcheN...

Photos from Hemant Kamat's post 12/05/2020

My Lockdown Cooking !!

Videos (show all)

Website