आमच मुक्ताईनगर

आमच मुक्ताईनगर

मुक्ताईनगर च्या जनतेच्या हक्काची जाग

23/06/2022

शिवसेना तुटल्यामुळे ज्याला दुःख नाही तो कसला शिवसैनिक...

26/03/2021

मुक्ताईनगर शहरातील निधी मंजूर झालेले रस्ते कधी होणार??

२०-२० वर्षपासून रस्ते झालेले नाहीत... याला विकास महणावा का?

जे रस्ते काँक्रिट श्रेणी मध्ये मंजूर आहेत तिथे डांबरी रस्ते करण्याचा घाट का रचला जातोय..??

काँक्रिट रस्त्याचे बाजूला लावण्यात येणारे पेवर ब्लॉक कोणी खाल्ले??

२० वर्ष झाले जैसे थे ....

नगरपरिषद गाढ झोपली
नगरसेवक गाढ झोपले
नगराध्यक्षा गाढ झोपेल्या

चोर चोर माऊसेरे भाई....

27/02/2021

*पैसे किती कमवायचे आणि कोणासाठी ?*

*वन बेडरुम फ्लॅट*

(written by An unintended Indian Engineer who hv lived his dream life in USA)

माझ्या वडिलांचे स्वप्न हाेते की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करुन अमेरीकेतील बहुराष्ट्रिय कंपनीत नाेकरीला लागावे. जेव्हा मी अमेरीकेत आलाे तेव्हा हे स्वप्न जवऴपास पुर्ण हाेत आले हाेते.

आता शेवटी मला जिथे हवे तिथे मी पाेहचलाे हाेताे. मी असे ठरवले हाेते की पाच वर्ष मी इथे राहुन बक्कळ पैसा कमवेल की जेणे करुन भारतात गेलाे की पुण्यासारख्या शहरात सेटल हाेईल.

माझे वडिल सरकारी नाेकरीत हाेते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट, अन तुटपुंजी पेंशन. पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे हाेते. घरची, आई-बाबाची खुप आठवण यायची. एकट वाटु लागायच. स्वस्तातल एक फाेन कार्ड वापरुन मी आठवड्यातन २-३ वेळा त्यांना काँल करत हाेताे. दिवस वार्‍यासारखे उडत हाेते. दाेन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यात गेली. अजुन दाेन वर्ष परकिय चलनाचे दर पाहण्यात गेले. रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा.

लग्नासाठी राेज नवनवीन स्थळ येत हाेती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय घेतला. आईवडिलांना सांगितले मला फक्त दहा दिवसांची सुट्टी भेटेल त्या दहा दिवसातच सर्व काही झाल पाहिजे. स्वस्तातले तिकीट पाहुन मी १० दिवसांची सुट्टी घेतली. मी खुश हाेताे, आईबाबांना भेटणार हाेताे. नातेवाईक व मित्रांसाठी खुप सार्‍या भेटवस्तु घ्यायच्या हाेत्या. त्याही राहुन गेल्या.

घरी पाेहचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फाेटाे मी पाहिले, वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली. मुलीचे वडिल समजुतदार हाेते. दाेन दिवसात माझे लग्न लागले. खुप सारे मित्र येतील अस वाटत असताना फक्त बाेटावर माेजता येतील असे मित्र लग्नाला आलेले. लग्नानंतर आईबाबांना काही पैसे हातावर टेकवले. "आम्हाला तुझे पैसे नकाे पाेरा पण वरचेवर भेटायला येत जा " अस बाबा सांगताना त्यांचा आवाज खाेल गेला हाेता. बाबा आता थकले हाेते, चेहर्‍यावरच्या सुरुकुत्या, पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करूण देत हाेत्या. शेजार्‍यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही अमेरिकेला पाेहचलाे.

पहिले दाेन वर्ष बायकाेला हा देश खुप आवडला. वेगवेगळे स्टेट्स अन नँशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत हाेत. बचत कमी हाेऊ लागली पण ती खुश हाेती. हऴुहऴु तीला एकाकी वाटु लागल. कधीकधी ती आठवड्यातुन दाेनदा किंवा तिनदा भारतात फाेन करु लागली. दाेन वर्षानी आम्हाला मुले झाली. एक मुलगा अन एक मुलगी. मी जेव्हा जेव्हा आईबाबांना काँल करायचाे तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडाना पाहायचे हाेते.

दरवर्षी मी सहकुटुंब भारतात यायचे ठरवायचाे. पण पैशांच गणित काही जुळायच नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा. वर्षामागन वर्ष सरत हाेती, भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले हाेते. एक दिवस अचानक आॅफीस मधे असताना भारतातन काॅल आला, "माेहन बाबां सकाळीच गेले रे". खुप प्रयत्न केला पण सुट्टी काही भेटली नाही, अग्निला तर साेडा पण नंतरच्या विधीला पण जायला जमले नाही. मन उदविग्न झालेल. दहा दिवसात दुसरा काॅल आला, आईची पण प्राणज्याेत मालवली हाेती. साेसायटीतील लाेकांनी विधी केले, नातवंडाचे ताेंड न पाहताच आई वडिल ह्या जगातुन निघुन गेले हाेते.

अाईबाबा जाऊन दाेन वर्ष सरली. ते गेल्यानंतर एक पाेकळी तयार झालेली, आईबापाची शेवटची ईच्छा , ईच्छाच राहिलेली.
मुलांचा विराेध असताना भारतात येऊन स्तिरस्थावर हाेण्याचे मी ठरवले. पत्नी मात्र आनंदात हाेती. राहण्यासाठी घर शाेधत हाेताे पण आता पैसे कमी पडत हाेते नवीन घर ही घेता आले नाही. मी परत अमेरिकेत अालाे. मुले भारतात राहयला तयार नसल्याने त्याना पण घेऊन आलाे.

मुले माेठी झाली, मुलीने अमेरिकी मुलासाेबत लग्न केल. मुलगाही आनंदात अमेरिकेत राहताे. मी ठरविले हाेते आता पुरे झाले, गाशा गुंडाळुन भारतात आलाे. चांगल्या साेसायटीत ' दाेन बेडरुमचा' फ्लँट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे हाेते. फ्लॅटही घेतला.

आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या 'दाेन बेडरुमच्या' फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहताे. उरलेल आयुष्य जिच्यासाेबत आनंदात घालवायच ठरवलेल तिन इथेच जीव साेडला.

कधीकधी मल वाटते हा सर्व खटाटाेप केला ताे कशासाठी? ? याचे माेल ते काय? ?

माझे वडील भारतात राहत हाेते तेव्हा त्याच्या नावावरही एक फ्लॅट हाेता. माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही. फक्त एक बेडरुम जास्त आहे. त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडिल गमावले, मुलांना साेडुन आलाे, बायकाेपण गेली.

खिडकितुन बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते, त्या सुंदर आठवणी मनात फेर धरु लागतात.
अधुन मधुन मुलांचा अमेरिकतन फाेन येताे ते माझ्या तब्येतीची चाैकशी करतात, अजुनही त्यांना माझी अाठवण येते यातच समाधान आहे.

आता जेव्हा माझा मृत्यु हाेईल तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांच भल कराे.

पुन्हा प्रश्न कायम अाहे. हे सर्व कशासाठी अन काय किंमत माेजुन.

*मी अजुनही उत्तर शाेधताेय.*

*फक्त एका बेडरुम साठी?*
जगण्याचे माेल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यासाठी आयुष्य पणाला लाऊ नका.
🙏🏻🙏🏻

05/12/2020

*संस्कार*
*श्री टी.एन. शेषन जब मुख्य चुनाव आयुक्त थे, तो परिवार के साथ छुट्टीयां बिताने के लिए मसूरी जा रहे थे। परिवार के साथ उत्तर प्रदेश से निकलते हुऐ रास्ते में उन्होंने देखा कि पेड़ों पर गौरैया के कई सुन्दर घोंसले बने हुए हैं।*

*यह देखते ही उनकी पत्नी ने अपने घर की दीवारों को सजाने के लिए गौरैया के दो घोंसले लेने की इच्छा व्यक्त की तो उनके साथ चल रहे। पुलिसकर्मियों ने तुरंत एक छोटे से लड़के को बुलाया, जो वहां मवेशियों को चरा रहा था.उसे पेड़ों से तोड कर दो गौरैया के घोंसले लाने के लिए कहा। लडके ने इंकार मे सर हिला दिया।*

*श्री शेषन ने इसके लिए लड़के को 10 रुपये देने की पेशकश की। फिर भी लड़के के इनकार करने पर श्री शेषन ने बढ़ा कर ₹ 50/ देने की पेशकश की। फिर भी लड़के ने हामी नहीं भरी। पुलिस ने तब लड़के को धमकी दी और उसे बताया कि साहब ज़ज हैं और तुझे जेल में भी डलवा सकते हैं। गंभीर परिणाम भुगतने होंगे।*

*लड़का तब श्रीमती और श्री शेषन के पास गया और कहा,- "साहब, मैं ऐसा नहीं कर सकता। उन घोंसलों में गौरैया के छोटे बच्चे हैं अगर मैं आपको दो घोंसले दूं, तो जो गौरैया अपने बच्चों के लिए भोजन की तलाश में बाहर गई हुई है, जब वह वापस आएगी और बच्चों को नहीं देखेगी तो बहुत दुःखी होगी जिसका पाप मैं नहीं ले सकता"*
*यह सुनकर श्री टी.एन. शेषन दंग रह गए।*

*श्री शेषन ने अपनी आत्मकथा में लिखा है-"मेरी स्थिति, शक्ति और आईएएस की डिग्री सिर्फ उस छोटे, अनपढ़, मवेशी चराने वाले लड़के द्वारा बोले गए शब्दों के सामने पिघल गई। "पत्नी द्वारा घोंसले की इच्छा करने और घर लौटने के बाद, मुझे उस घटना के कारण अपराध बोध की गहरी भावना का सामना करना पड़ा"*

*जरूरी नहीं कि शिक्षा और महंगे कपड़े मानवता की शिक्षा दे ही दें। यह आवश्यक नहीं हैं, यह तो भीतर के संस्कारों से पनपती है। दया, करूणा, दूसरों की भलाई का भाव, छल कपट न करने का भाव मनुष्य को परिवार के बुजुर्गों द्वारा दिये संस्कारों से तथा अच्छी संगत से आते है अगर संगत बुरी है तो अच्छे गुण आने का प्रश्न ही नही है।*

24/11/2020
14/11/2020

#शुभेच्छा_दिवाळीच्या

बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना वेटिंग रूम मध्ये बसुन ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत त्यांचा नातेवाईक लवकर पुर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा #हि_शुभेच्छा....

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत #हि_शुभेच्छा.....

शेजारणीच्या भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं हि शुभेच्छा.....

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही *जिभेला मिळावं हि शुभेच्छा.....

इतरांची दिवाळी आनंदात जाओ म्हणून स्वतःच घरबाहेर कर्तव्य बजावणाऱ्या , जवान, पोलीस, वीज , वाहतूक , आरोग्य कर्मचारी,
यांना कुटुंबियांना बरोबर थोडातरी मोकळा वेळ मिळावा हि शुभेच्छा

आईला पैठणी देण्याची स्वप्नं पाहणाऱ्या , मुलांना त्यांचं हे गोड स्वप्न पूर्ण होवो ही शुभेच्छा ...

बाबांचा पायात कोल्हापुरी असायला पाहिजे असं वाटणाऱ्या मुलांना त्यांचा हा बालहट्ट पूर्ण होवो ही शुभेच्छा. ...

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

13/11/2020

अवध मे श्रीराम पधारे हैं...🚩🚩🚩
जय श्रीराम...🙏🚩

श्रीराम जन्मभूमी 💐💐💐🙏🚩
#अयोध्या🙏🚩

03/11/2020

केरळ मध्ये जेवण व इतर खाण्याचे पदार्थ केळीच्या पानात पार्सल देत आहेत
केळीच्या पानात एक चिकट पदार्थ असतो तो जेवणा
बरोबर पोटात जाऊन cancer नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे
प्लास्टीक मधून जेवण बांधुन आणलेस cancer चा धोका जास्त असतो
उठा जागरूक नागरिक बना आणि आपणही ही पद्धत स्वीकारा

02/11/2020

हे केमिकल कंपोजीशन मुलांना रेग्युलर नक्की द्या.

गूळ + खोबरे = बुद्धीवर्धक
(म्हणून बाप्पाचा नैवेद्य)

गूळ + शेंगदाणे = शक्तिवर्धक
(म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य)

तिळ + गुळ = कॅल्शियम, मॅग्नेशियम,आयर्न + झिंक + सेलेनियम
(हृदयासाठी फायदेशीर आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी,)
(यातले सेलेनियम - कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत करते)
म्हणून संक्रांतीला गुळ पोळी

थंडीत बाजरीची तिळ लावलेली भाकरी - शरीरात उर्जा (उष्णता) निर्माण करण्यासाठी

डिंकाचे लाडु किंवा राजगिरा लाडु
गुळतुप पोळी, शेगदाणा चिक्की किंवा भिजवलेले हरबरे - ताकत मिळण्यासाठी

उन्हाळ्यात नाचणीचे अंबिल , ताक , मठ्ठा , लिंबु सरबत , सोलकडी , ईतर सरबते - शरीरात थंडावा निर्माण करुन दाह कमी करण्यासाठी

असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर दिसतील...

आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जात,
कारण हे जर शिकवले तर bornvita कोण पिणार?

आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर bornvita, कॉम्प्लेन पीत न्हवते ना?

मग त्यांच्यात कमजोरी, ताकद कमी होती का?

अहो एक आपला मावळा ५० शत्रूंशी एकटा लढायचा...

कुठले व्हे - प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा?

शिवाय आपले पुर्वज एवढे हुशार होते, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले व्हिटॅमिन टॉनिक पीत होते का?

आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीच खात असतील, म्हणूनच आताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती... जास्त निरोगी होते आणि जास्त बुद्धिमान पण होते, अहो वयाच्या १८-१९ वर्षी वागभट्टांचे संपुर्ण आयुर्वेद, आर्यभट्ट यांचे संपूर्ण भूमिती बीजगणित ज्ञान, ज्ञानेश्वरी लिहले राव तेव्हाच्या लोकांनी...
कुठले टॉनिक पीत होते का ते? स्वतःला प्रश्न विचारा....

आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमकल मारलेले पण अन्न नसायचे, गाईचे दूध पण प्युअर...

आपण हजारो वर्षांपासूनचं सायन्स मध्ये ऍडव्हान्स होतो.
आपल्याला या सर्वांची गरज नाही...

स्वदेशी खा, ताकद वाढवा, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा
🙏🏻
Cp

01/11/2020

Keep This Mantra Close To Your Heart 💜

28/10/2020

अगदी मनातलं...

28/10/2020

"स्त्री "

कुठे व्यक्त, कुठे अव्यक्त
अातून मृदु वरुन सख्त
संस्कराचे विद्यापीठ अंगी शिस्त
दोन जगात समान व्यस्त
पेलते सा-या कुटुंबाची भिस्त
स्त्री तिचं नांव असतं.......

नको सोहळे सन्मान जास्त
नसते तिचे नाते इतके स्वस्त
नको गौरव स्मृती चिन्ह
कतृत्व तिचे त्याहून जास्त
कुटुंब जिचे जग असतं
स्त्री तिचं नांव असतं......

काय कुणाला हवं नको
यावर असते तिची गस्त
तिच्या विना आयुष्य रिक्त
लांघून चौकट करते स्वत:ला सिध्द
स्त्री तिचं नांव असतं.....

जिच्याशिवाय जन्म नाही
ब्रम्हांडाचा अाधार सशक्त
देवी,अाई,बहीण नातं नारीचं
वात्सल्याची जी मुर्त
स्त्री तिचं नांव असतं.....

ईश्वराची कलाकृती जिच्या
प्रेमात सारखं पडाव वाटतं
जीवनात जिचं असणं
पाँवरहाऊस असतं
स्त्री तिचं नांव असतं.....

नऊ महिने नऊ दिवसाचं
खडतर तिचं व्रत असतं
निर्मितीचे जे उगमस्थान
नसानसातून तुमच्या आमच्या
रक्त तिचे वाहात असतं
स्त्री तिचं नांव असतं....

कवीच्या कवितेत कधी
अलंकारीक छंदमुक्त काव्य असतं
देवाहूनही श्रेष्ठ जिचं नातं असतं
स्त्री तिचं नांव असतं....

सृष्टीला वंदनीय असतं
स्फुर्तिदायक स्थान जे
प्रत्येकाच्या जीवनात
असतच असतं
स्त्री तिचं नांव असतं....🌹🌹

25/10/2020

Incredible ❤️

25/10/2020

अधर्म पर धर्म की और असत्य पर सत्य की जीत के प्रतीक महापर्व विजयादशमी (दशहरा) की सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं।
पाप जलेगा ,पुण्य जीतेगा । बुराई हारेगी, अच्छाई जीतेगी ।

सर्वांना #विजयादशमी व #दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!

25/10/2020

विषय :- साप
जात :-मन्यार ( Neurotoxic )

पुष्कळ लोकांचा असा समज आहे की ,
विषारी साप आपल्या भागात आढळत नाहीत
तर हा पहा कोबऱ्यापेक्षा 15 पट विषारी साप.
जो आपल्याकडे शहरात व शेती परिसरात सर्रास आढळतो.
"""""""""""""""”"""""""""""""""""""""""""""""""""

हा निशाचर साप रात्रीच्यावेळी जमिनीवर झोपलेल्या
लोकांच्या अंथरुणात शिरून चावण्याच्या सर्वात जास्त नोंदी आहेत...विशेष म्हणजे या सापाचा दंश एवढा बारीक असतो की
झोपलेल्या लोकांना साप चावला याची किंचितही जाणीव होत नाही. .
शहरी व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात #मण्यार हा साप आढळतो ( मुख्यतः पावसाळ्यात ) व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. ह्याचा रंग निळसर काळा असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. मण्यार मुख्यत्वे निशाचर आहे. अन्नाच्या व गारव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात.

मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर (Neural system) होतो. #मण्यारचे_विष_नागाच्या_विषाच्या_१५_पटीने_जहाल_असते. मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.

छायाचित्रातील सापाला नीट बघा कारण आपण साप दिसताच एवढे घाबरलेले असतो की, काळ्याला लाल व लाल ला पिवळा अशी काही माहिती देऊन फसतो.... यामुळे तुमच्या मदतीला आलेल्या सर्पमित्राला किंवा डॉक्टरला साप ओळखणे कठीण होते 👍

एकवेळ वाईट वेळ तरी सांगून येईल पण
कुठलाच #साप सांगून येत नाही 😀
घाबरू नका, गाफील राहू नका, माहिती ठेवा जास्तीत जास्त शेअर करा 🙏

Photos from आमच मुक्ताईनगर's post 25/10/2020

९० च्या दशकातील आठवणींचा साठा....

23/10/2020

*या लेखातील मजकूर*
*१)मेंदू कार्यक्षम ठेवण्यासाठी*
*मेंदू कार्यक्षम ठेवण्यासाठी काही टिपः*
----------------------------------------
१) वीस मिनिटे थेट सूर्यप्रकाशात उभे रहा. त्यामुळे तुमच्या मूडमध्ये सतत बदल होणार नाही आणि चिंता वाटत राहणार नाही. तुमचे मन शांत राहील.
२) व्यायामामुळे मेंदूची सक्रियता वाढते. आठवड्यातून एकदा तुमच्या हृदयाची गती वाढवणारे काहीही उपयुक्त ठरते.
३) फालतू कृती थांबवा. मोबाईल पहात बसणे, टीव्ही पहात बसणे. इत्यादी. मनाला शांतता मिळण्यासाठी प्राणायम, ध्यानधारणा, योगासने करणे यासाठी वेळ द्या.
४) स्वतःच्या भावनांवर नियंत्रण : भावना दाबून ठेवण्यापेक्षा कोणत्या परिस्थितीत कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे, कसे वागले पाहिजे याचा अभ्यास करा.
५) ध्यान करण्यामुळे मेंदूतील करडा भाग अधिक विकसित होतो आणि त्यामुळे निर्णयक्षमता, स्वःनियंत्रण आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.
६) सात ते आठ तासांची झोप : झोप कमी मिळाल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम दिवसभराच्या कार्यक्षमतेवर होतो. रोज किमान सात तासांची शांत व गाढ झोप प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेची असते.
७) नवीन काही शिकाः भाषेपासून ते वाद्य वाजवण्यापर्यंत काहीही नव्या गोष्टी शिकू शकता. त्यामुळे तुमचा मेंदू अधिक सक्रियपणे काम करू लागता.

21/10/2020

मुहूर्त सापडला शेवटी..

एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश..

21/10/2020

तात्याराव लहाने
माझी माय अंजनाबाई जीने मला स्वत:ची किडनी देऊन दुसरा जन्म दिला. मी जन्मलो तेंव्हा मी मायीच्या यातना पाहिल्या नव्हत्या.
पण मायाची किडनी काढताना तिला १६६ टाके घ्यावे लागले होते.
मायीच्या वेदना मी रोज पाहत होतो.
पण माय मात्र माझा तात्या वाचला पाहीजे एवढाच विचार करत होती. किती हा त्याग.१२ फेब्रुवारी १९९५ ला मायीचीकिडनी मला मॅच झाली. तो दिवस मी वाढदिवस म्हणुण साजरा करतो. पुढे २२ फेब्रुवारी ला आमची शस्त्रक्रिया झाली.
मला असं वाटत की आपण सर्वांनीच आई-वडिलावर प्रेम करायला पाहीजे. आपल्या सर्वांचे असेच प्रेम राहु द्या. फोटो जोडत आहे.

21/10/2020

नाव: पद्मशीला तिरपुडे।।🌺नव दुर्गा माता🌺🙏🏻🚩
जिल्हा: भंडारा.
खलबत्ते, वरवंटे विकून संसार व मुलाला सांभाळून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास करणारी ही मुलगी आहे.
💐 शतशः प्रणाम 🙏🏻तिच्या कष्टाला ! तिच्या जगण्याच्या जिद्दी ला! जय दुर्गे !जयदुर्गे!🙏🏼🚩🇮🇳👍🏼

20/10/2020

शिवारात या माह्या
कदी आभाय फुटलं, कदी धरिनी रुसली
पन माय हे तुयी हर दैवाशी भांडली
दम धर रे लेकरा हात चालवू दे मले भरभर
तेथं लेकरं हजार वाट पाह्यते मंडईवर.

#चतुर्थी

20/10/2020

सलाम नारी शक्तीला...

19/10/2020

बघा जमलं तर

19/10/2020

सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते..🙏⚘🚩

17/10/2020

बळीराजा...

16/10/2020

आयुष्य जगायचं कधी.

13/10/2020

वाचण्यासारखं असं काही......" आहारबोली "

माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत .
हस्ताक्षर, सही, दिसणे ,काही लकबी, वगैरे पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट जेवताना,जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनहि त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.

म्हणजे बघा .....
समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा तो पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो.
जसे की
पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण *गोड* असतात,

तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो,
त्यांच्यात *patience कमी* असतो.

वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे त्याप्रमाणेच *साधी सरळ* असतात ,ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.

भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत,नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात,यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.

जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी *निरोगी* असतात,

लोणचे कुठले आहे ? आंब्याचे, लिंबाचे का मिक्स हे पाहणारे *आंबटशौकीन* असतात

काही सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक *अतिचिकित्सक* असतात.

यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.
पहिला जेवणाच्या आधी काही reactions असणारे आणि दुसरा जेवणा नंतरची reaction असणारे.

जेवणाच्या आधी ताटे ,भांडी घ्यायला सुरुवात झाली की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही हे बघून त्याची चर्चा करणार.
हे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात .
अशी माणसे *कटकट्या* स्वभावाची आणि जुळवून घेणारी नसतात, अशांना मित्रमंडळी कमी किंवा नसतीलच तर ते हि याच catagory तील असतात.

पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे,
अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे... माझ्या पानात नाही... आत्ताच हवे म्हणून लोक वाढपी ला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो.
हे लोक *jelous* असतात.
सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .

गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच
"मी काय म्हणालोे अहो बासुंदीच आहे ,म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले "
असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , *कंजूष* मनोवृत्तीचे असतात.

जेवणाच्या आधी आणि जेवताना सुद्धा जे लोक
'बाकी सगळे ठीक होते ,पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते".
ती अत्यंत *निगेटिव्ह* मनोवृत्तीची असतात .
समोर चांगले ताट वाढले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.

ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर *खवय्ये* असतात किंवा स्वभावतःच *आनंदी!*

या सर्वांपलिकडे एक विशेष catagory आहे .
सगळे जेवण झाल्यावर
"ताक आहे का ?"
म्हणून विचारणार आणि नाही म्हणल्यावर
" अरेरे ताक असते ना तर मजा आली असती "
असा शेरा मारणारे ...
"कुजकटच"..
Copy paste
Collected photo

दिप्ती कदम

09/10/2020

ताईची रांगोळी ...

वापरलेले घटक
धने ,जिरे,मोहरी ,बडीशेप,काळे तीळ,पांढरे तीळ,मेथी दाणे, लवंग,मिरे,मोहरी डाळ,तेजपान ,दालचिनी,जायफळ ,चक्रीफुल ,दगडफुल,जावित्री,कसुरी मेथी ,वेलदोडे,काळी वेलची,सुकी लालमिरची आणि बोरमिरची

08/10/2020

जालना दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी विवाहित महिलेस ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला 24 तासात पकडले..

येथील चंदनझिरा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका 32 वर्षीय विवाहीतेस सतत फोनवरुन ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला दामिनी पथकाने चांगलाच चोप दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी ही कारवाई केली असून तक्रार दिल्यानंतर अवघ्या 24 तासात तरुणाचा बंदोबस्त केल्याने तक्रारदार महिलेसह तीच्या कुटूंबीयांनी दामिनी पथकाचे आभार मानले आहेत.

याबाबत सविस्तर असे की, जालना येथील चंदनझिरा परिसरात एक विवाहीता तिची मुलगी व आई वडिलांसह राहते. जाफराबाद तालुक्यातील चापनेर येथील एक तरुण या विवाहीतेच्या फोनवर सतत काॅल, मेसेज करुन तिला ब्लॅक मेल करत होता. विवाहीतेच्या नातेवाईकांनाही फोन करुन तीची बदनामी करत होता. याबाबतचा तक्रार अर्ज दोन दिवसापुर्वी विवाहितेने दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव यांच्याकडे दिला होता.
प्राप्त तक्रारीनुसार पल्लवी जाधव यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत मोबाईल लोकेशनच्या आधारे चापनेर, जाफराबाद येथून तरुणास ताब्यात घेतले. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नंतर त्याचे दोन्ही मोबाईल फाॅरमॅट करुन यापुढे अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही असे लेखी घेऊन त्यास पुढील कारवाईसाठी जाफराबाद पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव, मपोशि एस.एम. खांडेभराड, ए.डी. साबळे, यु.पी. साबळे, आर. एल. राठोड दामिनी, पोलीस हवालदार पाटील दामिनी पथक, एएसआय सहाने पोलीस ठाणे जाफराबाद यांनी केली.

07/10/2020

10 वर्षाचा पेपर वाटणारा मुलगा एका घराचं गेट वाजवित आहे.
शिक्षिका - विचारते, काय रे?
मुलगा - काकू, मी तुमची बाग साफ करू का?
शिक्षिका - नको, आज नाही करायची आणि आज पेपर आणला नाहीस.
मुलगा - हात जोडून, ​​दयनीय आवाजात .. "प्लीज प्लीज काकू, मी ते व्यवस्थित साफ करीन, आज पेपर छापले नाही, काल दस-याचीची सुट्टी होती हो ."
शिक्षिका - "ठीक आहे, किती पैसे घेणार?"
मुलगा - पैसे नका काकू, खायला द्या. "
शिक्षिका- अरे ! चांगले काम कर.
( बिच्चारं, भूक लागलेली दिसतेय, पहीलं खायला देते......मालकीन मनातल्या मनात बोलली)
शिक्षिका- आरे मुला ... आधी जेवूण घे, मग काम कर.
मुलगा - नाही काकू, मी पहीलं काम करतो मग तुम्ही मला जेवायला द्या.
शिक्षिका - ठीक आहे, असे म्हणून ति तिच्या कामाला लागली.
मुलगा - एक तासानंतर, "काकू, सफाई योग्य प्रकारे झाली आहे की नाही ते पहा."
शिक्षिका - अरे व्वा! तू तर खूप चांगली साफसफाई केली आहे, भांडी व्यवस्थित ठेवले आहेत. इथे बस, मी जेवण आणते.
शिक्षिकेने त्याला अन्न दिल्यानंतर मुलगा ते अन्न खिशातून पिशवी काढून त्यात अन्न ठेवू लागला.
शिक्षिका - उपाशीपोटी काम केले आहेस, आता इथेच बसून खा, लागले तर आणखी देईल.
मुलगा - काकू नाही, माझी आजारी आई घरी आहे, मला शासकीय रुग्णालयातून औषध मिळाले आहे, परंतु डॉक्टर साहेब म्हणाले आहेत की औषध रिकाम्या पोटी खाऊ घालू नका.
शिक्षिकेच्या पापण्या ओल्या झाल्या ... आणि तीने त्या निरागस मुलाला त्याची दुसरी आई बनून खायला घातले, नंतर त्याच्या आईसाठी भाकरी बनवल्या आणि तिच्या घरी घेऊन गेली आणि त्या आईला दिल्या.
येतांना ती शिक्षीका म्हणाली, “बहिण, तू खूप श्रीमंत आहेस, आपण आपल्या मुलाला दिलेली संपत्ती आम्ही आमच्या मुलांना देऊ शकत नाही”.
आई डोळ्यात अश्रू आलेल्या नजरेने मुलाकडे पहात होती… आणी मुलगा त्याच्या आजारी आईला चिटकला....

आवडलं असेल तर कमेंट करा आणि शेअर करा.
(मी हिंदीतील शेअर करून मराठीत भाषांतर केले आहे.)

05/10/2020

कोणी कोणी केलाय पराक्रम...

05/10/2020

मुक्ताई

03/10/2020

बुलडाणा- नांदुरा येथील हनुमान मूर्ती...🚩
आंध्र प्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मूर्तिकाराने हनुमानाची ही १०५ फुटी मूर्ती २१० दिवस अथक प्रयत्न करून पूर्णत्वास नेली. मूर्ती बनवण्यासाठी ८०० क्विंटल लोखंड, ३७५ ट्रक सिमेंट वापरण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून ३५० किलोचा हार हनुमान जयंतीला मूर्तीला अर्पण करण्याची प्रथा आहे.
🚩🚩 जय बजरंगबली 🚩🚩



___________

02/10/2020

#जळगाव जिल्ह्यातील #रेमिडीसीविर औषध विक्रेत्यांचे संपर्क क्रमांक.
#कोविड19 #कोरोना

01/10/2020

अगदी खरं....

Videos (show all)