आरंभ एक नवा विचार

आरंभ एक नवा विचार

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आरंभ एक नवा विचार, Massage service, .

20/09/2023

*घरात कायम पिठाची पिशवी असू द्या. घरातील सर्वांना ती कुठे आहे हे ठाऊक असायला हवे.*

हे स्वतः नेहमी पोळून घेणाऱ्या स्त्रीचे अनुभवाचे बोल आहेत.

काही वेळापूर्वी मी कॉर्न उकळत होते. कॉर्न तयार आहेत कि नाही हे पहाण्यासाठी मी चुकून उकळत्या पाण्यात हात बुडविला.
माझा एक मित्र, व्हिएतनामी पशुवैद्य, घरी आला तेव्हा मी वेदनेने विव्हळत होते. त्याने मला घरात कणिक आहे का? असे विचारले. मी त्याला पीठ दाखविताच माझ्या हातावर त्याने ते थोडे ओतले आणि पिठात हात बुडवून दहा मिनिटे थांबावयास सांगितले.
त्याने मला सांगितले कि व्हिएतनाम मध्ये एक मुलगा असाच आगीत जळाला होता. आग विझविण्याच्या प्रयत्नात कुणीतरी त्याच्या अंगावर पिठाची गोणी ओतली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आग तर विझलीच शिवाय त्या मुलाच्या अंगावर भाजल्याचा कोणताही मागमूस राहिला नाही.
माझ्या स्वतःच्या बाबतीत मी पिठात दहा मिनिटे ठेवलेला हात बाहेर काढल्यावर पाहिले तर जळण्याच्या लाल खुणाही दिसल्या नाहीत. शिवाय वेदनाही पूर्णपणे गायब झाल्या.
लगेच मी पिठाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवली आणि दर वेळी पोळल्यावर ते पीठ वापरते. वास्तविक फ्रीजमधील थंड पीठ हे सामान्य तापमानातील पिठापेक्षा अधिक गुणकारी आहे.
मी जळाल्यावर पीठ वापरतो आणि जळाल्याचा मागमूसही आंगावर रहात नाही.
एकदा तर माझी जीभ पोळली होती. मी दहा मिनिटे त्यावर पीठ ठेवले आणि वेदनामुक्त झालो.
त्यामुळे फ्रीजमध्ये नेहमी एक पिठाची पिशवी ठेवत चला.
पिठात उष्णता शोषण्याची अद्भुत क्षमता असते आणि त्यात भरपूर अॕन्टिअॉक्सिडंट गुणधर्म असतात. जळालेल्या रुग्णाला लगेच मदत मिळून त्यास मोठाच लाभ होतो.
एखादी फायदेशीर गोष्ट जेव्हा आपल्या हाती येते तेव्हा ती लगेच इतरांबरोबर शेअर करावी.

03/07/2023

*हे पहा .....*
आपण दोघांनीही आता पन्नाशी ओलांडली आहे
वेड्यावनी वागणं बंद करायचं !😃
आणि नीट समजूतदारपणे वागायचं
म्हणजे , " मी काय वेडा आहे का ? "
अहो तसं नाही , म्हणजे ...
उगीच छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलायचं नाही
जसं ....
भाजीत मिठच कमी झालं ,
खिचडीच पातळ झालं ,
असे पांचट विषय आता बंद ! 😃

आणि उगीच दर दोन दिवसाला ...
" माझी आई तर की नाही ..."
बस्स झालं हे वाक्य आता ते बंद करायचं 😃

" तुमची आई नको आणि माझा बाप नको " ! 😃
या दोघांवरून आपले खूप वाद झाले ..
आता हे सगळं सोडून द्यायचं !😃
पोरं मोठाले झालेत , कामा धंद्याला लागलेत ....
आता कुणाची शाळा नाही , रिक्षा नाही , डबा नाही .....
मलाही थोडं झोपू द्या अन तुम्हीही थोडं झोपत जा !😃

उगी तक तक करू नका ,
टेन्शन घेऊही नका अन देऊही नका !
आणि हो योगासनं , प्राणायाम , Morning walk याच्यावर मला सारखं सारखं कीर्तन द्यायचं नाही 😃
तुम्हाला काय माकडा सारख्या उड्या मारायच्यात ते मारा .....माझी का sss ही ना नाही 😜

लक्षात घ्या आता आपली Second इनिंग सुरू झालीय
मस्त enjoy करायचं !
खूप काटकसर केली ,
नको तीतकं मन मारलं
आता छान छान आणि
भरपूर साड्या घ्यायच्या
हिडायचं , फिरायचं , बाहेर जेवायला जायचं .....!
कुरकुर करायची नाही !
आवश्यक तेवढी बचत करायची आणि मस्त मजा करायची !

आणि अजून एक ज्याला आधी जाग येईल त्यानी आधी उठायचं !
उगीच मला 7 वाजले , 8 वाजले असं सांगून दबाव टाकायचा नाही 😃

नवऱ्याने अगोदर उठलं आणि आपल्या सोबत बायकोचाही चहा टाकला तर काय फाशीची शिक्षा आहे का ? 😃😜
म्हणून म्हणते आता कसं निवांत , आरामशीर चालू द्यायचं !
मला सांगा असं वागणं फार अवघड आहे का ?
खरं सांगा अश्याने नवरा बायको मध्ये भांडण होतील का ?
थोडं समजून घ्या हो .....
मेनोपॉज , हार्मोनल चेंजेस , खूप कष्ट केल्यामुळे हाडाची झीज होणे यामुळे पन्नाशी नंतर बायकां थोड्या चिडचिडया होतात
पटकन react होतात
पोटात काही नसतं पण बोलून जातात एखादा शब्द .....
तेंव्हा थोडं समजून घ्या आणि Second इनिंग मजेत खेळा ........!😃😜

30/06/2023

Copy paste
School bus चे काका .....

काल एका दुकानात गेलो होतो. तेथे माझ्या मुलाच्या school bus चे काका भेटले. एकदम हसतमुख गृहस्थ आहेत ते. मी सहज विचारले काय हो कसे काय? ते म्हणाले, "काही नाही, गाडीतला pen drive खराब झाला आहे, जरा नवीन चांगला बघतोय." सहज विचारले, "कोणती गाणी भरताय." आलेल्या उत्तराने माझा त्यांच्या बद्दलचा आदर वाढला.
ते म्हणाले, "माझ्या गाडीत तीन pen drive आहेत. सकाळी primary चे विद्यार्थी नेतो, त्यांच्यासाठी एक. दुपारी highschool चे विद्यार्थी नेतो, त्यांच्या साठी दुसरा व तीसरा दोघांसाठी common आहे.
सकाळी primary च्या विद्यार्थांसाठी त्यांच्याच शाळेत शैक्षणिक वर्षात शिकवल्या जाणाऱ्या कविता (poem) भरल्या आहेत. दुपारच्या highschool च्या विद्यार्थांसाठी मी कवितांबरोबरच काही सुत्रे व व्याख्या भरल्या आहेत. common असणाऱ्या pen drive मध्ये देशभक्ती पर गीते व स्वातंत्र्य विरांचे जीवन व त्यांचे कार्य (हे मात्र मराठीत) भरले आहे.
सकाळी किंवा दुपारी मुलांना शाळेत नेतांना मी आवर्जून कवितांचा pen drive लावतो. त्यामुळे शिकलेल्या कवितांची किंवा व्याख्यांची ऊजळणी होते. किंवा जे नवीन शिकवणार आहे ते कानावरून जाते व नंतर समजण्यासाठी सोपे होते. शाळेत जातांना थोडे शाळेचे वातावरण तयार होते. मुलांनाही शिकलेल्या कविता पाठ होण्यास मदत होते. ते आनंदाने pen drive मधून येणाऱ्या आवाजात आपला आवाज मिसळून म्हणतात. गाडीत वातावरण सुध्दा खेळीमेळीचे राहते व प्रवासात वेळ केव्हा गेला हे कळत नाही.
मुलांना शाळेतून घरी सोडतांना मात्र मी देशभक्ती पर गाणी व स्वातंत्र्य वीरांची माहिती लावतो. त्यामुळे त्यांच्या कानांवर चांगले विचार तेही मराठीत पडतात, व घरी जातांना ते शाळेच्या वातावरणातून बाहेर पडून वेगळ्या वातावरणात जातात.
हे pen drive मी घरी पण वापरतो. त्यामुळे मला व बायकोलाही इंग्रजी शब्द कानावर पडून कविता पाठ झाल्या आहेत. आमची मुलं या कविता शिकतांना या कविता त्यांची आईपण म्हणून दाखवते तेव्हा आमच्या मुलांचा आनंद पाहण्यात वेगळी मजा असते. मला व बायकोला शिकण्याची खुप इच्छा होती पण परिस्थितीमुळे शिकण्यापासून थोडे लांब पडलो. पण आम्हाला इंग्रजी लिहिता, वाचता आले नाही तरी pen drive मुळे आम्ही कविता म्हणून दाखवतो याचा आम्हाला आनंद आहे. याचा अर्थ पण हळूहळू समजून घेतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे school bus चालवणं हे माझे उदरनिर्वाहाचे साधन आहे. हल्ली बरेच व्यावसायिक त्यांचा व्यवसाय वाढावा म्हणून customer ला additional services देतात त्यातला हा प्रकार आहे. बऱ्याच पालकांना हे ठाऊक असल्याने वर्षाच्या शेवटी पुढील वर्षाचे booking ते अगोदरच करतात. माझ्या नावाचा आग्रह शाळेलाही करतात. त्यामुळे माझे पुढील वर्षाचे शाळेशी contract विश्वासाने होते. याच जोरावर या वर्षी मी आणखीन एक नवीन school bus घेणार आहे.
एका पालकांनी तर अगोदरच सांगितले की तुझ्या नवीन school bus च्या pen drive सह सगळ्या system चा खर्च मी देईन. तु फक्त किती खर्च लागला ते सांग. याच प्रेमाची आज मला गरज आहे व ते मला विद्यार्थी व पालक यांच्या कडून मिळते."
मी मनापासून school bus च्या काकांना नमस्कार केला आणि दुकानदाराला म्हणालो, "यांच्या आताच्या pen drive चे पैसे माझ्या बिलात लावा."

- कौस्तुभ परांजपे.

01/06/2023
28/05/2023

एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले , "गुरुजी ,प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजवून
कोणी गाऊन ,ओरडून
कोणी करूणा भाकून
कोणी डोळे मिटून तर कोणी मौन प्रार्थना करतात. पण प्रार्थना मौन असली तरी ओठ हलतात ,चर्येवर भाव उमटतात, आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता, असे का ?"

रामदास स्वामी हसले,म्हणाले, "एकदा मी असा प्रसंग पाहिला की, एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता.अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेलं, अंगावर चिंध्या, आत्ता पडेल की मग पडेल अशी स्थिती. डोळे आशाळभूतासारखे सर्वांवरून फिरत होते.थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले. विचारले, "बोल, काय पाहिजे तुला?"
"माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे !माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. या वेगळं शब्दात काय सांगू?"
समर्थ म्हणाले, "त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. मी परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे, माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो. या परते शब्दात काय मागू ? 'तो' बघून घेईल. जर माझी 'स्थिती' काही सांगू शकत नसेल तर शब्द काय सांगणार? जर माझी 'अवस्था' त्याला समजत नसेल, तर शब्द काय समजणार?म्हणून अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खर्‍या परमेश्वर प्रार्थनेचे लक्षण आहे. तिथे 'मागणं' काही उरत नाही.तुम्ही प्रार्थनेत 'असणं' हेच पुरेसं असतं"🙏🏻🙏🏻🙏🏻

28/05/2023

🙏🏻🙏🏻

30/03/2023

श्री रामनवमी हार्दिक शुभेच्छा !🙏🏻🙏🏻

12/01/2023

*...म्हणुनच संसार देखणा होतो*
स्त्री थकत नाही , हरत नाही ...
हरली , तरी रडत बसत नाही ..,
ती धडपडते, मार्ग शोधते...
स्त्री ...
सतत कार्यमग्न असते...एखाद्या मुंगीसारखी,,सतत कशाचा तरी साठा करत असते...
मुंगीसारखीच,,,शिस्तबद्ध ...आखीव मार्गावरुन चालत राहते,...
स्त्री ..
जगण्यासाठी तिला व्यसनांचा आधार लागत नाही .,,तिच्यातील जिविगिषु वृत्ती हेच तिचं व्यसन....
ती जगते.....गर्भाशयात मारली गेली नसेल, तर नक्कीच जगते....!
स्त्री ..
धारण करते, पोषण करते...
जगते , तशीच जगवते...
ती मोडत नाही , ती थकत नाही ....
अतीव दुःखानेही , ती कोलमडत नाही ....
स्त्री ...
जन्मतःच लढवय्यी असते...
xx आणि xy गुणसूत्रांच्या गोंधळात, ती सहसा पडत नाही ..,कारण, तिला पक्कं माहिती असतं....तो एका क्षणाचा अपघात असतो केवळ,...!
स्त्री ..
तत्त्वज्ञान जगते,..!
जगण्याची कला ती उपजतच जाणते....
स्विकार , अनुकंपा ,क्षमा ही जगण्याची सूत्रच असतात मुळी तिची ....
आपलं अस्तित्व टिकवून, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांना ती जगवते....
ही तपस्या तीच करु शकते....
स्त्री ...
धात्री असते....म्हणूनच , चिवट आणि संयमी असते....!
ती स्वार्थी असूच शकत नाही ....!

11/01/2023

जुनी शहाणी माणसं !!....

१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे. धेनु (गाय)मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.

२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, 'श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.'

३. अन्नाचे एक शीत तरी सैनिकासाठी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग तुळशीत अर्पण करावे. देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकरांचे आयुष्य वाढते.

४. वाळवण घालताना आज्जी सूर्यमंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची.

५. रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची, 'स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.'

६. मुंग्यांना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, सुखात राहा, माझ्या लेकरांना डसू नका.

७. तुळशीला दिवा लावायची, चिलटे, किडे नष्ट होऊन घरात येत नाहीत. ती माझ्या घशाला आराम देते मी तुळशीच्या पानांना उब देते.

८. लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी च्या उजेडात असावे आग्रह असे. भाकरी पण चंद्रासारखी वाटते , सावल्यांची भीती जाते, खेळ करताना मौज असते, अंधाराची सवय असावी, 'भू'मातेला पण शांतता मिळते म्हणायची.

९. दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात. त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची.

१०. झोपताना तांब्याच्या तांब्यात पाणी भरून डोक्याशी ठेवायची, चांगले असतेच पण तापलेल्या 'भू' चा तप्त असा भार किंवा स्पंदने तांबे घेते आणि आपल्याला शांती देते

अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, अनुभव आणि ज्ञान कधी लक्षातच घेतले नाही.

देता आले तर पुढच्या पिढीला देण्यासारखे,घेता आले तर पुढच्या पिढीने घेण्यासारखे.

20/10/2022

💯

14/10/2022

🙏🙏

27/09/2022

बिग बाजार / D mart मध्ये
बायकोच्या मागे
निरर्थक हिंडतांना
अनेक केविलवाणे नवरे
मी पाहात होतो...!!😢😢

बिग बाजार / D mart मध्ये
कुठेही बसायची सोय नाही...!!😢😢

म्हणून बिग बाजारच्या व्यवस्थापनास माझी एक सूचना - 👇👇👇👇

बिग बाजार / D mart मध्ये जसा एक Bags 👜काउंटर असतो,

तसा नवरे 👳🏼‍♂ ठेवण्याचाही
काउंटर असावा..!!👍👍

नवरा जमा करायचा,
टोकन 1⃣ घ्यायचे आणि
बायकांनी आत जायचे.....!!

येतांना टोकन देऊन
आपलाच नवरा 👳🏼‍♂ ताब्यात घ्यायचा..!!

गर्दीही कमी होईल खरेदी वाढेल..!!👍👍

५०० रु च्या वर खरेदी केल्यास
काऊंटरवर जमा केलेल्या नव-याला
एक चहा द्यावा..!!☕👍👍

1000/- रु च्या वर खरेदी केल्यास एक शरबत

2000/- रु च्या वर खरेदी केल्यास एक मस्तानी जुस द्यावे🍺

5000 आणि त्याच्या पेक्षा जास्त खरेदी झाल्यास 1 ग्लास वाईन देण्यात यावी

म्हणजे तोही निमूट बसेल..!!😷

व बायकांनाही खरेदीचा आनंद घेता येईल..!!
💍💄👞👜👛

काय मत आहे तुमचं...???

01/08/2022

*पाऊस कमिंग जोरदार पडिंग*
*ना रूकिंग ना थकिंग बदाबदा पडिंग..*

पत्रा वाजिंग, वारा सुटिंग
पण कपडा नाॅट सुकिंग वला वला लागिंग ..🙃

ना रूकिंग ना थकिंग जोरदार कमिंग

नदी पण भरिंग ,तळा पण भरिंग
रस्त्यावर पाणी सारखं कमिंग..

टिव्ही बघींग पण लाईंटच गोइंग
आणि लाईट कमिंग तर सिग्नल गोइंग..🤔

आत्ताच एकादशी गोइंग
दिवस भर घरात बसून शेंगा खाइंग
पण पाऊस नाॅट गोइंग..

पाऊस कमिंग सगळेच कवि बनिंग
आणि सगळे कांदाभजी पण बनविंग
पाऊस को हौस वाटींग, तो अजूनच पडींग..🙃

पाऊस च पाऊस सगळीकडं पडींग⛈️🌧️🌧️
आता यात बिचारी सरकार काय करिंग..
कारण सगळा वरूनच धो धो पडिंग..🙃🙂
पण आज मात्र मस्त ऊन पडींग🥳🌞

CP

01/08/2022

*मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, "बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की, मी आजपर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल."*

त्याची मुलगी सारा म्हणाली, "बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. *आमच्यासाठी तुम्ही कांहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती मागे ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवडू द्या."*

थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला.
तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली..

मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, "तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ.....?
यावर सारा म्हणाली, "मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत."

मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, "ओहो, तू टॉम स्मिथची मुलगी आहेस? "

*पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, "हा स्मिथ नांवाचा मनुष्य तोच आहे बरं कां ज्याने ' Institute of Administrators ' या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो.त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं..."*

इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, "मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा..."

सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हर सहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं.

नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली.

एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारल्या गेलं तेव्हा अश्रू भरल्या नेत्रांनी ती उत्तरली, *"माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिक दृष्ट्या जरी ते गरीब होते तरी सचोटी, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप-खूप श्रीमंत होते.*

*"आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?" या, मुलाखतकाराच्या प्रश्नावर त्या उत्तरल्या, "माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून ऊठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही."*

मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला.

*"मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल कां?"*

यावर त्या म्हणाल्या,"मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दीवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे कांही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते."

*आपणही टाँम स्मिथसारखेच आहोत कां..?*

*किर्तीरूपाने शिल्लक राहता येऊ शकते. किर्ती पसरायला आणि किर्तीरूपाने जीवंत होण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्यारूपाने माणूस अमर होऊन जातो..*

सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणिव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे..

*आपल्या मुलाबाळांसाठी हाच वारसा ठेवावा...चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी, चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते याची जाणीव सदैव मनी असू द्या...*

आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू या... आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका...

Source - WhatsApp

Website