DrPriya Insights

DrPriya Insights

I am Dr Priya Prabhu (Deshpande), a public health (preventive) expert. Contact details: [email protected]
YT:
https://tinyurl.com/y9cfbw7x

This is a place to get insights about healthy and safe living in this era of misinformation and confusion.

22/03/2024

Intermittent Fasting खरंच धोकादायक आहे का?

#प्रासंगिक_DrPriya १८

चीन मधल्या संशोधकांनी अमेरिकेतील data (विदा ) वापरून एका conference मध्ये एक पेपर प्रसिद्ध केला आणि तयारील निष्कर्षाने सर्वत्र गोंधळ निर्माण झालाय.

चला, आपले नेहमीचे टेक्निक वापरून याचा सखोल अभ्यास करुया. कारण कोणत्याही बातमीने भीती/राग/आश्चर्य वाटले कि ते मुळातून अभ्यासायचे.

कमेंट मध्ये बातम्यांची लिंक न देता मूळ अभ्यासाचे abstract ची लिंक देत आहे तसेच ज्यांना या अभ्यासाचे पोस्टरवरून अधिक माहिती घ्यायची असेल अश्यांसाठी एक लिंक देखील देत आहे. मुळातून सर्व आकडे बघणे कधीही चांगले.

वेगवेगळे मुद्दे सांगते , किती समजतात ते बघा. कारण हि थोडी संशोधन विषयक माहिती आहे.

१. हा अभ्यास जरी तज्ञांनी केलेला असला तरीही अद्याप कोणत्याही जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेला नाही. प्रसिद्ध होताना इतर तज्ञ याविषयी सखोल परीक्षण करून नंतर प्रसिद्ध करतात. हा टप्पा अजून झालेला नाही. मात्र हा अभ्यास एक funded अभ्यास असल्याने हा प्रसिद्ध होईल , त्याची वाट बघुया.

२. त्यामुळे आत्ता केवळ एक abstract म्हणजे संक्षिप्त/संकीर्ण माहिती व एक पोस्टर एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. त्यावरून निष्कर्ष काढूया.

३. हा अभ्यास secondary data वापरून केलेला आहे. म्हणजे या अभ्यासासाठी खास अशी माहिती गोळा करण्यात आलेली नाही. आधीपासून उपलब्ध माहितीचा वापर प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी झालेला आहे. हा एक retrospective cohort study आहे.

४. अमेरिकेमध्ये गेली बरीच वर्षे National health and Nutritional Examination Survey दर वर्षी घेतला जातो. दर वर्षी साधारण ५००० व्यक्ती त्यामध्ये निवडल्या जातात आणि त्यांच्याविषयी विविध माहिती गोळा केली जाते. याच माहिती मधील २००३ नंतरच्या एकूण २०,०७८ लोकांची माहिती वापरली आहे. मात्र त्यांचा follow up समान वर्षे झालेला नाही. त्यातील ५० % लोकांची माहिती केवळ ८ वर्षांपर्यंत आहे तर २५% लोकांची माहिती केवळ ४.२ वर्षांहून कमी आहे. आणि कोणत्या गटातील लोकांचा किती पाठपुरावा झाला याची माहिती उपलब्ध नाही. २०१९ पर्यंत यातील कितीजण मरण पावले व कोणत्या कारणाने याची देखील माहिती नोंदी वरून घेतली आहे.

५. यातील खाण्याच्या पद्धतीची माहिती ज्या वर्षी या लोकांची नोंदणी झाली त्या वर्षी घेतलेली आहे. दोन वेळा त्यांच्या दिवसभराच्या खाण्याच्या वेळा व अन्नपदार्थ यांची माहिती घेतली होती. पण पुढील वर्षानुवर्षे खाण्याच्या सवयी न बदलता तश्याच राहिल्या आहेत असे यात गृहीत धरलेले आहे. असे अर्थातच घडत नाही.

६. abstract नुसार Eating duration between the *last and first eating occasion* was calculated for each day. इथे थोडे कन्फ्युजन आहे. हे पेपर प्रसिद्ध झाल्यावर स्पष्ट होईल. शेवटच्या व पहिल्या खाण्यामध्ये रात्र असते. तर पहिल्या व शेवटच्या खाण्यामध्ये दिवस असतो. त्यांनी नक्की कसे मोजले आहे यानुसार निष्कर्ष पूर्ण बदलू शकतात.

७. हा अभ्यास अमेरिकन लोकांमधील आहे आणि त्यांच्या खाण्यामध्ये जंक फूड आणि चीजचे व रेड मीटचे प्रमाण खूप जास्त असते. याचाही परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे हा अभ्यास जसाचा तसा जगभरासाठी लावणे योग्य नाही.

८. पोस्टर मधील पहिला टेबल प्रत्येक गटातील सदस्यांची माहिती देणारा आहे. या गटातील संख्या एकसारखी नाही. तसेच यातील लोकांचे प्रमाण वेगवेगळे आहे. कोणतीही तुलना करण्या आधी संशोधकाला दाखवून द्यावे लागते कि दिनही गात समपातळीवर आहेत. इथे असे तपासलेले दिसले नाही. त्या टेबल वरून मी तपासले असता, १२-१६ गट आणि

16/03/2024

धान्याच्या आंतरराष्ट्रीय बँक बद्दल ऐकलंय का?
38

आजची माहिती पॉझिटिव्ह व अभिमानास्पद देखील आहे.
आणि जाणीव देणारी आहे की जगात व देशात अश्या कितीतरी बाबी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात .
त्यामुळे अशी नवी माहिती समजते तेव्हा स्वतःला सर्वज्ञानी न समजण्याचा नम्रपणा येतो.

दोन दिवसांपूर्वी एक रील दिसले , ज्यामध्ये svalbard येथील जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय seed vault ची प्रत्यक्ष भेट दिलेली माहिती होती. (लिंक कमेंट मध्ये देईन)

उत्तर ध्रुवापासून १३००किमी अंतरावर svalbard येथे नॉर्वे च्या सरकारच्या खर्चाने एक आंतरराष्ट्रीय धान्य बियाणे बँक बनवली आहे जी २००८ पासून कार्यरत आहे . यामध्ये विविध देशातील धान्यबिया सुरक्षितपणे बॉक्सेस मध्ये साठवलेल्या आहेत. प्रत्येक प्रकारच्या ५०० बिया पाऊच मध्ये सील करून बॉक्स मध्ये साठवलेल्या आहेत. जगातील अनेक देशांनी यामध्ये धान्य बियाणे साठवले आहे. यासाठी international crop trust द्वारे २००१ मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य करार झाला .

याला dooms day vault असेही म्हणतात म्हणजे अगदी जगातील बहुतांश गोष्टी नष्ट झाल्या तरी पुन्हा धान्य उत्पादन सुरू करता यावे व देशांमधील जैव विविधता पूर्ण नष्ट होऊ नये यासाठी अतिशय सुरक्षित पणे हे साठवलेले आहे.

मात्र जगाचा अंत न होताही याची गरज पडू शकते हे सीरिया च्या युद्धात दिसून आले. सीरियातील येथे साठवलेले बियाणे वापरून तेथील नष्ट झालेले कृषी बियाणे पुन्हा तयार करण्यात आले.

पुढचा प्रश्न पडला की भारत जैव विविधता व बियाणे सुरक्षेसाठी काय करत आहे?

या धान्य बँकेमध्ये सर्वात मोठा बियाणे साठा भारताने केला आहे. ९ एप्रिल २०१४ मध्ये आपल्या लाखो बिया येथे सुरक्षितपणे साठवण्यात आल्या . ICAR चे प्रमुख अय्यप्पन यांनी संदेश लिहिलाय (फोटो) In the name of the God , for the welbeing of one and all on the planet earth .

प्रत्येक देश राष्ट्रीय स्तरावर देखील अश्या बँक मध्ये बियाणे सुरक्षित ठेवतात . पण असा बॅक अप न ठेवल्याने इराक व अफगाणिस्तान मधील धान्य बियाणे नष्ट झाले आहे .
तसेच रशियातील बियाणे वाचवण्यासाठी महायुद्धांमध्ये कृषी शास्त्रज्ञांनी जीवाचे बलिदान दिले एवढे या बियाणांचे महत्व असते .

मग पुढचा प्रश्न पडला की भारतात काय केले जातंय बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी ?

ICAR ने १९७६ पासून यासाठी काम सुरू केले होते व ४ प्रकारे बियाणे सुरक्षा केली जाते. २०१० मध्ये चांग ला, लढाक येथे पहिली राष्ट्रीय बियाणे बँक सुरू झाली जिथे मायनस डिग्री तापमानामध्ये विविध धान्य बियाणे साठवलेले आहे. ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची बीज सुरक्षा बँक आहे. हरित क्रांती मुळे नष्ट होणारी धान्य जैव विविधता वाचवण्यासाठी "बीज बचाओ आंदोलन" सुरू झाले होते त्यातून धान्य सुरक्षित ठेवण्याची गरज जाणवली.

पर्यावरण बदल मुळे कृषी वर सर्वाधिक परिणाम होणार आहे . त्यामुळे या बदलांमध्ये टिकून राहणारे धान्य निर्माण होणे आवश्यक आहे . आणि यासाठी आपल्या हजारो वर्षांच्या कृषी इतिहासाचा हा परिपाक सुरक्षित ठेवण्याचे हे महत्वाचे काम सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धान्य बँका करीत आहेत.

अधिक माहितीसाठी लिंक्स कमेंट मध्ये आहेत…

देव करो आणि या बँकेमध्ये साठवलेले बियाणे काढण्याची वेळ कोणत्याही देशावर न येवो.

- डॉ प्रिया प्रभू, मिरज
(१६/३/२४)

आरोग्यस्नेही माहितीसाठी follow करायला विसरू नका

https://www.facebook.com/share/v/hkTyi1y6nRjtCQpa/?mibextid=qi2Omg

13/02/2024

*डीमेंशिया साठी ऑनलाईन सहाय्य*- महत्वाचे

#डीमेंशिया_जाणुया_DrPriya ०८

आज एका वर्षापूर्वी पापांना मागे ठवून मला पुण्याहून परत यावे लागले होते.. फेसबुक मेमरीने दाखवले. आणि आठवले कि पप्पा असताना सुरु केलेले बरेच tag सध्या बंद आहेत. पिअर सपोर्ट ग्रुप मध्ये माहिती शेयर करत असते पण काही लिहिले नाहीये जास्त.

आणि अचानक फेसबुकने एका संस्थेबाबत माहिती दाखवली. माहिती वाचून शंका आली कि हि खरी संस्था आहे कि नाही? म्हणून त्या संस्थेचे नाव शोधले , त्यांचे फेसबुक पेज बघितले, वेबसाईट बघितली, त्यांच्या विषयी बातम्या वाचल्या आणि खरेपणाची खात्री माझ्या मनाला पटल्यानंतर तुमच्यासोबत शेयर करत आहे. (काही links कमेंट मध्ये सापडतील)

*Dementia India Alliance* हि एक NGO आहे आणि या रुग्णांना घरी सुश्रुषा मिळावी यासाठी काळजीवाहकांना सर्वतोपरी सहाय्य देण्यासाठी कटिबद्ध आहे.
८५८५९९०९९० ( मला तर पाठ झाला नंबर) या क्रमांकावर तुमच्या अडचणी आणि प्रश्न यांची उत्तरे विविध भाषांमधून मिळतील. सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते संध्याकाळी ६ अशी या सहाय्यता क्रमांकाची वेळ आहे. इंग्रजी , हिंदी आणि इतर चार दाक्षिणात्य भाषांमधून माहिती वा मदत मिळू शकते.

मोफत मेमरी टेस्ट ची सुविधा उपलब्ध आहे. गरज भासल्यास घरबसल्या तज्ञ डॉक्टरांकडून टेलेमेडिसिनद्वारे मार्गदर्शन उपलब्ध आहे. (यासाठी शुल्क असावे)
family डॉक्टर्स आणि कुटुंबीय यांच्यासाठी काही ट्रेनिंग उपलब्ध आहेत. विविध माहितीचे व्हिडीओ उपलब्ध आहेत.

भारत सरकारला डीमेंशिया आजाराचे महत्व पटवून देण्यात यांनी पुढाकार घेतला होता तसेच गेल्या वर्षी बंगळूरू मधील NIMHANS या संस्थेसह यांनी MOU केलेला आहे आणि एकत्रितपणे या आजाराविरुद्ध काम करणे सुरु केलेले आहे.

डीमेंशियाग्रस्त व्यक्तीसोबत त्याचे कुटुंबीय देखील बऱ्याच त्रासाला सामोरे जाते. कधी या आजाराचे निदानच लवकर होत नाही आणि या वयस्कर व्यक्ती अश्या का वागत आहेत हे न समजल्याने खूप गोंधळाची स्थिती निर्माण होते.

अश्यावेळी समजूतदारपणे प्रश्नांची उत्तरे देणारे या NGOचे प्रतिनिधी नक्कीच खूप उपयुक्त आधार आणि मार्गदर्शन देऊ शकतील .

DIA संस्थेची माहिती सर्च केल्यास सहज उपलब्ध आहे. लिंक खाली देत आहे.

पोस्ट सेव्ह ठेवा, हे आजार वेगाने वाढणार आहेत. तसेच ज्यांना गरज आहे त्यांच्यासोबत हि माहिती नक्की शेयर करा.

डॉ. प्रिया प्रभू, मिरज.
(१३/२/२४)

tag वर क्लिक केल्यास या आधीच्या पोस्त वाचता येतील.

10/12/2023

Free Download for today and tomorrow

As a special offer the *Kindle edition of the Breastfeeding book - Drops of Nurture*- which has breastfeeding journeys of 30 wonderful women including yours' truly , each highlighting a different aspect of breastfeeding - will be available for *free download*. The offer is limited to 10th and 11th Dec 2023.

Feel Free to share about this wonderful opportunity with your dear ones.

You need to have an Amazon account and a Kindle App and you can read it on your mobile too. Just visit the amazon site and enjoy the diversity of breastfeeding experience. Each story is followed by a myth busting page.

If you download and go through the book, your reviews on Amazon site will be most helpful. They will help to reach more and more moms in need who lack support in current system.

You can search for the on amazon (Site/app) or can find links below (Not sharing in the post to avoid limitations)

Happy reading!

Dr. Priya Prabhu (Deshpande)

09/12/2023

चिनी मुलांमधील न्युमोनिया आणि सत्य

गेल्या आठवड्यामध्ये २०१९च्या डिसेंबरची आठवण ताजी झाली. कारण चीन मध्ये पुन्हा न्युमोनिया वाढत असल्याच्या बातम्या वाचायला मिळाल्या. यावेळी मात्र लहान मुले आजारी आहेत व बीजिंग आणि लिओनिन्ग भागात बरीच मुले रुग्णालयांमध्ये दाखल असल्याचे सांगण्यात आल्याने लहान मुलांच्या पालकांमध्ये भीतीची भावना निर्माण झाली. हे नेमके काय आहे ? रुग्णसंख्या वाढीची नेमकी कारणे काय? आणि मुख्य म्हणजे आपल्याला काही चिंतेचे कारण आहे का ? हे थोडक्यात समजून घेवूया.

घटनाक्रम काय आहे?

• २१ नोव्हेंबरला fTVNews ने लहान मुले न्युमोनियाने आजारी असून शाळामधील बरीच मुले बाधित झाल्याचे तसेच काही शिक्षक देखील आजारी असल्याची बातमी दिली. विविध रुग्णालयातील गर्दी वाढत असल्याने चीनमधील जनता सरकारने याविषयी काही कार्यवाही करावी अशी मागणी करीत असल्याचे देखील सांगितले.
• या बातमीनुसार ProMed नावाच्या जगभरातील विविध आजारांवर लक्ष ठेवणाऱ्या साईटवर देखील याविषयी दि. २१ नोव्हेंबरला बातमी देण्यात आली. ProMed हे network जगभरातील विविध आजारांवर लक्ष ठेवते. हे ISID म्हणजे International Society for Infectious Diseases चे network आहे. कोविडबाबत सुरुवातीची बातमी या साईटवर देण्यात आली होती.
• त्यानंतर लगेच म्हणजे २२ नोव्हेंबरला WHO ने एक स्टेटमेंट जाहीर केले आणि चीनकेडे याविषयी तसेच आजारी मुलांविषयी तपशीलात माहिती मागवली. International Health Regulation अंतर्गत अशी माहिती सर्व देशांना द्यावी लागते.
• यामुळे जगभरात याविषयी बातम्या दिल्या गेल्या तसेच हा एखादा नवा विषाणू असेल का याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.
• २३ नोव्हेंबरला चीनकडून आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार जगभरातील उद्रेकांची माहिती देणाऱ्या WHO च्या Disease Outbreak News या साईटवर याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहान मुलांमधील हा न्युमोनिया कोणत्याही नव्या विषाणूने झाला नसून याविषयी काही निर्बंधांची गरज नाही असे देखील सांगितले आहे. खरे तर १३ नोव्हेंबर रोजीच चीनच्या सरकारी प्रवक्त्याने लहान मुलांमधील श्वसनाचे आजार वाढत असल्याविषयी माहिती दिली होती. पण त्यांचे प्रमाण अपेक्षेहून अधिक वाढल्याने तेथील पालक चिंतीत झाले.

न्युमोनिया म्हणजे काय?

अंतर्गत श्वसनमार्गाच्या जंतूसंसर्गाने जेव्हा फुफ्फुसांचा दाह होतो तेव्हा बाळाला गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाला असे समजतात. कोणत्याही कारणाने सर्दी खोकला झाला असेल तरी त्यापासून संसर्ग जर फुफ्फुसापर्यंत पोचला तर त्या भागाला सूज येते आणि फुफ्फुसे व्यवस्थित काम करू शकत नाहीत. त्यामुळे बाळ जोरात व खोल श्वास घेऊ लागते व दम लागतो. हे न्युमोनिया ओळखण्याची सोपी खूण आहे. बाळ अशक्त असेल तर असे सहजपणे घडते. अश्या वेळी बाळाला तीव्र ताप देखील असतो.
न्युमोनिया विषाणूमुळे तसेच जिवाणूंमुळे होऊ शकतो. उदा. RSV व करोना सारखे विषाणू तसेच मायकोप्लाझ्मा न्युमोनि सारखे जीवाणू लहान मुलांमध्ये न्युमोनिया निर्माण करू शकतात. जर तीव्र श्वसनदाह (न्युमोनिया) असेल तर बाळाला रुग्णालयात दाखल करावे लागते. योग्य त्या औषधोपचारांनी न्युमोनिया बरा होऊ शकतो. मात्र वेळेत उपचार न झाल्यास न्युमोनियामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.


चीनमध्ये लहान मुलांमधील न्युमोनिया का वाढला आहे?

थंडीचा मोसम हा बऱ्याच देशांमध्ये श्वसनाचे आजार वाढवणारा काळ असतो. कारण थंडीमुळे दारे खिडक्या बंद असल्याने बंदिस्त जागांमधील वायुवीजन कमी असते. तसेच सर्वजण खोल्यांमध्ये / घरामध्ये असल्याने संसर्ग सहजपणे फैलावतो. त्यामुळे अश्या देशांमध्ये फ्लू सिझनपूर्वी सर्व नागरिकांना फ्लू शॉट्स दिले जातात.
मात्र चीनमधील हा उद्रेक नेहमीपेक्षा एक महिना आधीच सुरु झाला आहे. या सर्व मुलांना विविध जंतुसंसर्ग झाले आहेत जसे- influenza, Mycoplasma pneumoniae, respiratory syncytial virus (RSV), आणि severe acute respiratory syndrome coronavirus 2 (SARS-CoV-2) देखील .

हे सर्व जुनेच जंतू मुलांना संसर्गित करण्याचे मुख्य कारण म्हणजे २०२३ मध्ये चीनने झिरो कोविड पॉलिसी बंद करून जनतेवरील निर्बंध उठवले आहेत. गेली तीन वर्षे कोविड नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनमध्ये जे कडक निर्बंध लावलेले होते त्यामुळे इतर सर्व श्वसनाचे आजार देखील संक्रमित होत नव्हते. मात्र आता निर्बंध उठवल्याने श्वसनाशी संबंधित सर्वच आजार सर्व जनतेमध्ये संक्रमित होत आहेत. मात्र बऱ्याच लहान मुलांचा या जुन्या जन्तुशी काही संपर्क आलेला नसल्याने हे आजार लहान मुलांमध्ये गंभीर रूप घेऊन न्युमोनिया निर्माण करत आहेत. तसेच लहान मुलांमधील रुग्णसंख्या देखील शाळांमधून झपाट्याने वाढली आहे. काही काळामध्ये ही रुग्णसंख्या कमी होईल अशी अपेक्षा आहे.

या बातमीमुळे घाबरायची गरज आहे का?

नाही. कारण हे आजार कोणत्याही नव्या विषाणूमुळे झालेले नाहीत. हे सर्व जंतू भारतामध्ये आधीपासून आहेतच आणि कमी अधिक प्रमाणात आजार निर्माण करतात. तसेच भारताने कोविडनिर्बंध बरेच आधी उठवले असल्याने अशी घटना आता भारतात घडण्याची शक्यता कमी आहे.

WHO ने याविषयी statement दिल्याने भारतासह सर्व देशांमध्ये लहान मुलांमधील न्युमोनिया वर आता अधिक लक्ष ठेवले जाणार आहे तसेच अश्या रुग्णांची तपासणी विविध विषाणूंसाठी केली जाईल. हे कार्य नियमित सर्वेक्षणाचा भाग असेल . एखाद्या देशामध्ये आजार आढळून आल्यास सर्व देश सतर्क होतात.
विविध देशांमध्ये कोणती ना कोणती साथ नेहमीच सुरु असते. मात्र International Health Regulation मुळे प्रत्येक साथ पसरत नाही. सध्या कोंगोमध्ये मंकीपॉक्सची साथ सुरु आहे. ऑक्टोबर मध्ये केरळमध्ये निपाहची साथ होती आणि त्यात दोन मृत्यू झाले. पण अश्या सर्व साथी स्थानिक स्तरावर थांबवल्या जातात. यासाठी तेथील सार्वजनिक आरोग्य खाते काम करीत असते.

WHO तसेच स्थानिक सरकारे वेळोवेळी जे निर्देश देतात त्यांचे पालन जनतेने केले कि कोणतीही साथ आटोक्यात राहू शकते.
अश्या रुग्णसंख्या वाढीच्या बातम्या आल्या कि घाबरून न जाता खात्रीशीर स्त्रोताकडून अधिक माहिती मिळवायची तसेच निर्देशांचे पालन करायचे.

मुलांमधील श्वसनाच्या आजारांबाबत नेहमी कोणती काळजी घ्यावी?-

• मुल ताप, सर्दी, खोकल्याने आजारी असेल तर शाळेमध्ये पाठवू नये व इतरांसोबत खेळायला पाठवू नये. भरपूर विश्रांती व पुरेसे पाणी / द्रव मिळाल्यास आजार लवकर बरे होतात.
• शाळांनी देखील अश्या आजारी मुलांना ताप उतरल्यानंतर शाळेत यायला सांगावे. शाळेमधील वायुवीजन चांगले ठेवावे.
• घरातील वयस्कर व्यक्ती आणि इतर लहान मुले यांना जपावे.
• मुल ताप, सर्दी, खोकल्याने आजारी असल्यास त्याची श्वासाची गती मोजून न्यूमोनियाचा धोका ओळखता येतो. योग्य वेळी डॉक्टरांना दाखवावे.
• मुलाला तीव्र ताप असल्यास अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आवश्यकतेनुसार डॉक्टरांना तपासण्या करू द्या.
• डॉक्टरांनी देखील मुलांमधील न्युमोनिया , SARI आणि ILI यांवर लक्ष ठेवावे व तत्कालीन निर्देशांचे पालन करावे.
• घरातील कोणी आजारी असल्यास हातांची स्वच्छता नियमितपणे करा व हात नाका-तोंडाजवळ नेऊ नका. लहान मुलांना या दोन्ही सवयी लावा. तसेच त्यांना शिंकताना व खोकताना कोपराने तोंड झाकायची सवय लावा.
• खिडक्या उघडून घरामध्ये खेळती हवा असू दे.
• मुलांमध्ये respiratory reserves कमी असलेने त्यांच्या आजारपणाची लपवाछपवी न करता योग्य माहिती देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करायला हवे.

प्रत्येक नवा विषाणू pandemic बनत नाही. त्यामुळे उगीच त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही. मात्र वेळोवेळी दिलेले निर्देश पाळले नाही तर एखादा जुना आजार देखील विनाकारण त्रासदायक ठरू शकतो. Forwaded messages वर अधिक विश्वास न ठेवता तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे अधिक सुरक्षित आहे. योग्य शास्त्रीय माहिती कधीही भीती वाढवत नाही तर सुरक्षेचा दिलासा आणि सुरक्षेसाठीचे मार्ग सांगते.

अश्या एखाद्या बातमीला न घाबरता फक्त स्थानिक आरोग्य व्यवस्थेने सतर्क रहाणे आणि जनतेने आरोग्य व्यवस्थेला सहकार्य करणे एवढेच सर्वांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे असते.

- डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) , MD (PSM)
सहयोगी प्राध्यापक , रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यक शास्त्र,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.

(पूर्वप्रसिद्धी- लोकमत सखी (२८/११/२०२३))

ताजा अपडेट:
आज माझ्याकडे एका डॉक्टरांनी विषाणूबाबत विचारणा केल्याने पुन्हा काही नवी बातमी आहे का शोधले पण कोणत्याही authority कडून वेगळे अपडेट्स नाहीएत.
अजून एकांनी ओमायक्रोन XBB बद्दलचा जुनाच मेसेज WA वर पाठवला. त्यावर तारीख नसल्याने सर्वांना नवा वाटत होता.
बातम्या आणि मेसेजेस मुळे घाबरून जाऊ नका. मायकोप्लाझ्मा हा विषाणू नाही तर जीवाणू आहे व antibiotic उपचाराने याचा न्युमोनिया बरा होतो.
त्यामुळे हा लेख पुन्हा शेयर करत आहे.

Photos from DrPriya Insights's post 06/12/2023

Animal चित्रपट आणि बाबासाहेब

मी Animal चित्रपट बघितलेला नाही आणि बघणारही नाही. मी वांगाचा कबीर पण नव्हता बघितला. त्यातील तिरसट हिरो डॉक्टर होता एवढे माहित आहे. पण तीही गोष्ट पचनी पडणे तसे अवघडच होते. त्यामुळे गेले काही दिवस Animal चित्रपटाबाबत जे वाचले आहे त्यावरून मी लिहित आहे. आणि तुम्हाला मुलगी असेल तर पोस्ट अवश्य वाचा.

सर्वसाधारणपणे आक्रमकता व हिंसा म्हणजे पुरुषार्थ , स्त्रियांचे नियंत्रण म्हणजे पुरुषार्थ अश्या प्रकारचा हा चित्रपट आहे. यामध्ये बायकोची निवड ती चांगल्या प्रतीची मुले जन्माला घालू शकेल या निकषावर केलीये, बहुपत्नीत्व कसे पुरुषार्थाचे लक्षण आहे हे वारंवार दाखवले आहे, स्त्री विरुद्ध हिंसा दाखवली आहे, आणि बहुदा प्रेयसी / पत्नीला स्वतःचे बूट चाटून प्रेमाची खात्री पटायला लावली आहे. इतर हिंसेबाबत बरेच आहे पण मी स्त्रियांविषयीच्या काही बाबी उल्लेखिल्या आहेत. हे दाखवले आहे यापेक्षा अधिक चिंताजनक लोकांच्या चित्रपटगृहातील प्रतिक्रिया आहेत. कारण अश्या प्रसंगी प्रेक्षक या चुकीच्या गोष्टींना दाद देताना दिसत आहेत. विशेषतः तरुणाई. तुम्ही बघणार असाल चित्रपट तर लोक कश्याला प्रतिसाद देताय हेही बघाल.

तुम्ही म्हणाल चित्रपट आहे चित्रपट म्हणून सोडून द्यायचा.

एवढे सोपे असते तर कोणी बोललेच नसते. एका घटनेने काही बदल होत नाहीत पण प्रवाहाचा कल लक्षात येतो.

चित्रपट समाजमनावर आणि घटनेवर परिणाम करतात. याचे उदाहरण म्हणजे - "तू मेरी नही हो सकती तो किसी और की भी होने नही दुंगा" - म्हणत एकतर्फी प्रेमातून खून झाले नसते. कारण "लडकी की ना में हा छीपी होती है" असे आपल्याला चित्रपटानीच शिकवले आहे.

विचार करून बघा - एखादा हिरो आणि व्हिलन , दोघांनाही हिरोईन हवी असते. दोघेही तिच्या मागे लागतात, तिचा पाठलाग करतात , कधी ती नको म्हणत असतानाही जवळ घेतात . शेवटी हिरोईन ज्याला मिळते त्याला आपण हिरो म्हणतो आणि हिरोईन ज्याला नाकारते तो व्हिलन होतो. त्यांच्या कृती जवळजवळ सारख्याच असतात. आपल्या लक्षात पण येत नाही.

असो. ही पोस्ट फक्त चित्रपटाबद्दल नाही.

या वर्षात इतरांशी बोलताना काही गोष्टी जाणवल्या .. जसे
एका तरुणाचे वाक्य - "बाहेरचे जग चांगले नाहीये. आपण आपल्या मुलींना जपायचे . त्यासाठी बाहेर पडताना चेहरा झाकायला हवा."
इतरांबद्दल गप्पा मारताना एक घटना समजली जी मी केवळ इतर समाजात घडते असे समजून होते - " आंतरजातीय विवाहामुळे मुलीच्या आईशी भावाने संबंध तोडले"

आणि जाणवले कि या नव्या युगात मुलींच्या अवकाशाचा हळू हळू संकोच होतोय का? अगदी मुंगीच्या पावलाने! ज्या जगातून न मागता तिला बाहेर काढले बहुदा पुन्हा त्या किंवा तश्या एखाद्या जगात हळूहळू पुढची पिढी चाललीये.

आजच्या जगामध्ये मुलींना वडिलोपार्जित मिळकतीचा हिस्सा आनंदाने देणारे कमी असताना ७५ वर्षांपूर्वी जेव्हा बाबासाहेबांनी याविषयी चर्चा केली असेल तेव्हा समाजाची प्रतिक्रिया काय असेल? त्या काळी बहुपत्नीत्व कायद्याने बंद करणे किती अवघड असेल? आजकाल स्त्रियांच्या हक्कांचा कैवार घेणारे आणि त्यासाठी समाज बदल घडवणारे नेते अपवादाने दिसतात.

गेल्या संविधान दिनाला शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्राला गेले तेव्हा संविधान नव्या अर्थाने समजले. व्यासपीठावरील कोणी पाळीच्या काळात स्त्रियांना मिळणारी वागणूक माणूसपणाची नसते असा उल्लेख केला आणि जाणवले हि हा angle आपल्या लक्षात आला नव्हता. संविधान स्त्रीला समान दर्जा देतो पण तो स्त्रीच्या आयुष्यातील सर्व स्तरांमध्ये पोचायला किती वर्षे / दशके / शतके जाणार माहित नाही. जो पर्यंत हक्कांची जाणीव नसते तोपर्यंत ते मिळत नाहीत हेही समजत नसते. विविध बंधनांतून सुटणे अवघड देखील असते.

म्हणून आज स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी ७५ वर्षांपूर्वी काय काय केले हे शोधण्याचा प्रयत्न केला.

१९२७-२८ साली बाबासाहेबांनी म्हटले होते - "देशाची / समाजाची प्रगती मी स्त्रियांची प्रगती किती झाली आहे यावर मोजतो" .

प्रगत स्त्री शिक्षित असते - अजून शिक्षणाची टक्केवारी समान नाही.

प्रगत स्त्री अर्थार्जन करते - अजून प्रमाण बरेच कमी आहे, समानता पुरेशी नाही, महत्वाच्या पदांवर तुरळक स्त्रिया असतात. गृहिणींना स्वतःचे पैसे नसल्याने बऱ्याच वेळा कानकोंडे वाटते किंवा तिच्या श्रमाची किंमत ठेवली जात नाही.

प्रगत स्त्री निर्णयक्षम असते - घरात तिचे मत विचारतात का, आणि राजकारणात असेल तर चालते का हा मोठा प्रश्न आहे. स्त्रीने निर्णय घेणे दूर आहे. काही वेगळे मत मांडले तरी शाब्दिक वा शारीरिक हिंसेला सामोरे जावे लागतेय .

प्रगत स्त्री स्वयंपूर्ण असते - घराबाहेरील अवकाश स्त्रियांसाठी अजूनही संकुचित आहे.

आणि २०२४ लवकरच सुरु होणार आहे! जवळजवळ शतक उलटले आहे. प्रगतीचा मार्ग किती खडतर होता समजून घ्या.

भारतातील स्त्री संघटीत होऊन हक्कांसाठी मागणी करेल हे कधी घडलेच नसते. पण शतकभरापुर्वीच्या स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतःहून अनेक प्रयत्न केले. आणि स्त्रियांना याची जाणीव नाही आणि पुढील पिढी आनंदाने पुन्हा एकदा बंधने स्वीकारेल , न स्वीकारल्यास त्यांना अल्फा मेल्स सोबत सामना करावा लागेल.
हिंदू कोड बिल तत्कालीन संसदेने येऊ दिले नाही याचा निषेध म्हणून बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला. नंतर त्याच कोड बिलातील काही तरतुदी चार कायद्यांच्या रूपाने मिळाल्या ज्यामुळे स्त्रियांचे आयुष्य बदलले. स्त्रियांची प्रगती व सुरक्षा असा नव्या भारताचा सूर असल्याने त्या विचारांनी अगदी २००३ पर्यंतचे कायदे स्त्रियांच्या प्रगतीसाठी बनत राहिले.

दुसरा फोटो वाचणे अवघड आहे पण बाब्साहेबांनी केलेली स्त्रियांसाठीची कामगिरी एकाच स्क्रीनशॉट मध्ये यावी हा प्रयत्न होता. लेखाची लिंक खाली देईनच.

काही कायदे/तरतुदी इथेही सांगते -

Hindu Marriage Act 1955 -
लग्नाचे वय १८
बहुपत्नीत्व गुन्हा
घटस्फोटानंतर पोटगी

Hindu Succession Act 1956
विधवेला दत्तक घेण्याचा अधिकार
स्त्रीच्या संपत्तीवर तिचाच अधिकार - उदा. स्त्रीधन

The adoption and Maintenance Act 1956
विधवांना दत्तक घेण्याचा अधिकार
मुली दत्तक घेण्यास मान्यता
दत्तकविधानापूर्वी पत्नीची सहमती आवश्यक

The Hindu minority and guardianship act 1956
मुलांची कस्टडी आईकडे असण्याचा तरतूद

संविधानामध्ये लिंगाधारित भेदभाव होऊ नये यासाठी बरेच आर्टिकल्स आहेत - समाजात आणि कामाच्या ठिकाणी देखील समान वागणूक. मतदानाचा समान अधिकार ही सर्वात मोठी गोष्ट आहे मात्र ती योग्य प्रकारे वापरली तरच प्रगती शक्य असते.

स्वातंत्र्यापूर्वीही miners act मध्ये कामाच्या ठिकाणी सुविधा आणि बाळंतपणानंतर रजेची तरतूद होती .

मूकनायक वार्तापत्रामध्ये स्त्रियांच्या अडचणींसाठी खास जागा निर्धारित होती.

बाबासाहेबांचे स्त्रियांसंबंधी कार्य याविषयी अनेक लेख, पेपर्स उपलब्ध आहेत. अवश्य वाचा. सध्याच्या काळामध्ये कोणत्याही गटाला आपल्या मागण्यांसाठी किती संघर्ष करावा लागतोय हेही आजूबाजूला बघा. आणि वर लिहिलेली एक एक मागणी स्वतंत्रपणे स्त्रियांना मिळवावी लागली असती तर किती संघर्ष करावा लागला असता आणि तरी सर्व मान्य झाल्या असत्या का हा देखील विचार करा.

न मागता आयुष्य सुधरवणाऱ्या सुविधा भारताचे नागरिक म्हणून भारतीय स्त्रियांना बाबासाहेबांनी मिळवून दिल्या आहेत.
मिळालेले हक्क व अधिकार जाणून स्वतःची प्रगती केली तरच आपल्या समाजाची आणि देशाची प्रगती होणार आहे . केरळ राज्य उदाहरण आहे.

देणाऱ्याने दिले आहे , घेणारे हात आणि घेणारीची समज किती आहे यावर भविष्य ठरेल!

बाबासाहेब, आपल्याबद्दल नेहमीच कृतज्ञता राहील! आम्ही आमच्या मुलींना सुरक्षित व स्वतंत्र अवकाश देण्यासाठी प्रयत्नरत राहू! देशाची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीशिवाय अशक्य आहे हेही ध्यानात ठेवू!

14
#प्रासंगिक

- डॉ. प्रिया प्रभू, मिरज
(६/१२/२०२३)

06/12/2023

जरासा धक्का काफी है

जानेवारीमध्ये पुण्यात यशदामध्ये असताना व्यायाम त्यांच्या नियमानुसार सुरू झाला पण इकडे परत आल्यावर तसे दुर्लक्ष झाले.

आता पुन्हा सुरुवात आहे पण रुटीन नव्हते, फिरायला कधी जाऊ, कुठे जाऊ वगैरे पळवाटा सोबत होत्या . आज उद्या म्हणत म्हणत घरात काही व्यायाम करणे सुरू होते .

पण आज राहुल खरेंनी फोन केला आणि आठवण करून दिली की फेब्रुवारी मध्ये कबुल केलेली भेट बाकी आहे.

माझ्या आधीच्या व्यायामाच्या पोस्ट वाचल्या असतील तर आठवत असेल की भेटण्यासाठी व्यायामाचे ठिकाण निवडणे ही आयडिया पुण्यात वापरली होती . इकडेही तसेच करायचंय!

आता राहुल खरेंच्या फिटनेस एवढा नाही पण त्यांच्या गतीने चालता चालता बोलता येईल एवढा फिटनेस तर असायला हवा ना !

फिर क्या, आज त्या फोनच्या धक्क्याने मी सुरुवात तर केलीये पुन्हा ! इतरांना सांगण्याची आयडिया पुन्हा वापरतेय (आधी पोस्ट होतीच ) आज एक पोस्ट लिहायची आहे म्हणून थोडा वेळ चालले. पण उद्यापासून नक्की वाढेल !

त्यामुळे तुमचे कोणी मैत्र नियमित व्यायाम सुरू करायला धडपडत असतील तर फक्त सल्ला देऊ नका , थोडासा प्रेमळ धक्का द्या , कधी सोबत द्या !

व्यायाम थांबला असेल तरी पुन्हा सुरुवात महत्वाची आणि शून्य दिवस होऊ न देणे महत्वाचे!

आहे का कोणी पुन्हा व्यायाम सुरु करणारे माझ्यासोबत?

37
(6/12/2023)

जुन्या पोस्ट आठवत नसतील तर टॅग वर क्लिक करून वाचता येतील

05/12/2023

The wait is over.

This book - drops of nurture- which has breastfeeding journeys of 30 mothers who are just like you is now available.

Each one has told their story of breastfeeding. Some suffered with hurdles, some struggled to find support, some broke taboos and some tested their limits.

Many of these wonderful women are still contributing in the field of breastfeeding and trying to make it easier for others.

I am proud to be part of this book curated by Dilraz.

Book has 3 sections:
The breastfeeding journey
Finding strength and support
Empowering through education

And 30 stories by:
Aarti Mehta * Abinaya KC * Aparna Udayakumar * Aparna Vashisht * Bhargavi Vishwanathan * Chetana Mrunalini * Dana Hardy * Dia Jadwani * Dilraz Kunnummal * Himani Dalmia * Kanimozhi Senthamarai Kannan * Leena Jamal * Michelle Austin Noronha * Nikita Bhutani * Parvathi Ramanandan * Prachi Data Pendurkar * Priya Deshpande * Priya Dharshini Dev * Raksha Raghavan * Sanyukta Bardhan * Sapna Krishnan * Shacchee Baweja * Sharon Mary * Shruti Jayasurya * Shruti Kanchan * Shyami Sathyasheelan * Sneha Dutta * Swati Jagadish * Varsha Kiran

You may know some of them as part of various groups or from their fb profiles. I connected with some of them through breastfeeding support group and know that each one has a special story to tell.

The book is available on amazon as Kindle edition in India and print version will soon be available. I will post again, watch this space.

International readers have access to print as well as kindle copy on Amazon. Do check the content to see the diversity in the stories.

This will be a nice companion for new parents and would be parents to know that breastfeeding is a skill to be learnt and is possible despite different hurdles. This book will offer support to struggling mothers by telling them they are not alone in the journey and may be some ways to handle the issues. This may also help mothers to gain support from family. Others may want to know how breastfeeding touched and changed lives for these 30 women to get inspired.

I hope you are also excited to read these stories as much as I am.

Thank you Dilraz for making me part of this book along with wonderful women whom I adore.

16
(5/12/2023)

03/12/2023

Pap स्मियरची तपासणी करताना दुखते का?

02

गर्भाशयाचा (गर्भाशय मुखाचा ) कॅन्सर हे स्त्रियांच्या मृत्यूचे एक मुख्य कारण आहे. यावर उपचार उपलब्ध असले तरी हा अवयव पोटात लपलेला असलेने व हे बदल सहसा लवकर लक्षणे निर्माण करत नसलेने हा कॅन्सर वेळेत सापडत नाही . सहसा कॅन्सरची वाढ गर्भाशयाबाहेर पडल्यावरच याची लक्षणे सुरू होतात व तोपर्यंत सहसा कॅन्सर पसरल्यामुळे उपचार अवघड, महागडे, अधिक त्रासदायक आणि अयशस्वी होऊ शकतात.

त्यामुळे कोणतीही लक्षणे वा त्रास नसताना स्वतःहून आजाराचा किंवा पूर्ववस्थेचा शोध घेणे ( screening) हा या कर्करोगापासून वाचण्याचा मुख्य मार्ग आहे. (मुलींचे व मुलांचे लसीकरण हा दुसरा मार्ग)

यासाठी Pap स्मियर टेस्ट ही तपासणी केली जाते .

याविषयी मी जानेवारीमध्ये एक पोस्ट केली होती, वाचली असेलच . त्यामध्ये काबुल केल्यानुसार मी स्वतःची Pap तपासणी करून घेतली. उशीर झाला करायला कारण आता चाळीशी संपत आली आहे. Pap तपासणी खरे तर वयाच्या तिशी मध्ये सुरू करायला हवी.

तुम्ही अजून एकदाही pap तपासणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या . हे खूप महत्वाचे आहे.

ही अतिशय साधी, सोपी , न दुखणारी, सुई देखील टोचायची गरज नसलेली तपासणी आहे. मोठ्या सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध असते . तसेच सर्व स्त्री रोग तज्ञ ही तपासणी पाठवू शकतात.

पाळी सुरू नसताना स्त्री रोग तज्ञांना भेट द्या . ते खालून गर्भाशय मुखाची तपासणी करतील. योनीमार्गातून एका लांब काडीवरील ब्रश वापरून गर्भाशय मुखाजवळील पेशी मिळवून त्या तपासणीसाठी लॅब ला पाठवतील. ही तपासणी करताना काहीही जाणवत नाही किंवा त्रास होत नाही. (फोटो पहा)

लॅब मध्ये त्या ब्रशवर उपलब्ध पेशी तपासल्या जातात. मुख्य कर्करोग होण्याआधी काही काळ गर्भाशयमुखाजवळील पेशीमध्ये बदल होण्यास सुरुवात होते. ही कर्करोग पूर्वावस्था असते व याकाळात हे बदल लक्षात आल्यास कर्करोग टाळणे शक्य असते. म्हणून ही तपासणी वाढत्या वयानुसार नियमितपणे करणे आवश्यक असते.

तुमचा रिपोर्ट नॉर्मल असल्यास ३ ते ५ वर्षांनी पुन्हा तपासणी करायला हवी.
मात्र जेव्हा या पेशींमध्ये बदल दिसतात तेव्हा जेवढ्या जास्त पेशींमध्ये बदल दिसतील त्यानुसार पुढील सूचना दिल्या जातात. निदान CIN 1 (Cervical Intraepithelial Neoplasia ) असा असल्यास सहसा १ वर्षाने पुन्हा तपासणी करण्यास सांगू शकतात. CIN 2+ असल्यास पुढील तपासणी करून त्यानुसार डॉक्टर पुढील सल्ला देतील. धोका कमी असेल तर pap तपासणीची वारंवारता वाढवू शकतात किंवा धोका जास्त असेल तर बायोप्सी वा शस्त्रक्रिया करण्यास सांगू शकतात. या रिपोर्टमध्ये संशयास्पद किंवा कर्करोग सदृश्य बदलांचा रिपोर्ट आल्यास वेळ न घालवता योग्य उपचार त्वरित सुरू करा कारण कोणत्याही कर्करोगमध्ये वेळ फार महत्वाचा घटक असतो.

ही तपासणी नॉर्मल यावी यासाठी केली जाते , त्यामुळे नॉर्मल रिपोर्ट बघून पैसे वाया गेले अशी भावना येऊ नये. उलट नॉर्मल रिपोर्ट म्हणजे आपल्याला सर्वायकल कॅन्सरची म्हणजे गर्भाशय (मुखा)च्या कर्करोगाची पूर्वलक्षणे देखील नाहीत याचा आनंद एखादी छोटी पार्टी करून साजरा करायला हरकत नाही. (मलाही बोलावू शकता :) )

शक्य असल्यास हे वर्ष संपण्यापूर्वी ही साधीशी जीवरक्षक तपासणी तुम्ही तुमची व/वा कुटुंबातील इतर स्त्रियांची करून घ्याल का ? यावेळी तपासणी नॉर्मल आली तर पाच वर्षांनी आपण सर्व पुढची pap तपासणी करून घेऊया, मी नक्की आठवण करेन डिसेंबर २०२८ मध्ये!

माहिती इतरांपर्यंत अवश्य अवश्य पोचवा , एखाद्या स्त्रीला , नव्हे तिच्या अख्या कुटुंबाला फायदा होईल !

- डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) MD
शा. वै. म. मिरज .
(३/१२/२०२३)

कमेंटमध्ये तपासणी संबंधी काही फोटो व एक लिंक आहे .
पहिल्या पोस्टची लिंक देखील देईन .

Videos (show all)

mRNA लसीबाबत एक खुलासा नुकताच करण्यात आला. लस मार्केटमध्ये येण्यापूर्वी लस संसर्ग थांबवू शकेल का याचा अभ्यास करण्यात आला...

Website