महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, Political organisation, .

24/09/2019

*बस परिवाहनाच्या वाढत्या मुजोरी बाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे निवेदन*
दिवसेंदिवस परिवहन सेवेबाबत तक्रारी वाढत आहेत, वेळोवेळी इशारे देऊन सुद्धा परिवहन महामंडळ दुर्लक्ष करीत आहे म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे परिवहन मंडळाला निर्वाणीचा इशारा देत निवेदन सादर करणार आहे. तरी सर्वानी मोठ्या संख्येने *परिवहन नियंत्रणाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानक येथे बुधवार दिनांक 25/9/2019 रोजी सकाळी 10.30 वाजता उपास्थित राहावे* आणि आपल्या समस्या मांडाव्यात.

31/03/2019

महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव

08/05/2018

महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव's cover photo

27/10/2017

शिवसेना हि नेहमी सिमावासीयच्या पाठीशी खंबीरपने उभी राहीली आहे!

१ नोव्हेबर काळा दिवस ची फेरी कर्नाटक अयश्यवी करण्यासाठी मराठी जनतेवर दडपशाही करत आहे त्याचा निषेद करण्यासाठी शिनोळीत शिवसेनेन कर्नाटक सरकारची प्रतीकात्मक अंतयात्रा काढुन निषेद नोंदवीला ।

जय महाराष्ट्र🚩

27/10/2017

जामीन नकोच!
आमची चुक नसताना हि तुम्ही खोट्या का!
अटक झाली तरी चालेल !

नेत्याना अटक झाली की याद राखा नवा ईतीहास घडेल

"१ नोव्हेबर काळा'च दिवस"

25/10/2017

येता १ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या निषेधार्त काढण्यात येणाऱ्या मुक सायकल फेरी प्रचारासाठी कार्य करणारे युवा कार्यकर्ते तसेच म.ए.समीती नेते मंडळीवर येथील पोलीस प्रशासनाने विनाकारण गुन्हे दाखल करुन त्रास देण्याचा प्रयत्न चालू चालू करत मराठी जनतेत दहशत निर्माण माजवण्याचा प्रयत्न चालू केला आहे.या संदर्भात बेळगाव पोलीस आयुक्त श्री टी बी कृष्णाभट यांची गुरुवार दिं २६/१०/२०१७ रोजी सकाळी ११ वाजता भेट घेण्यात येणार आहे.तरी मराठी भाषीक जनतेने मोठ्या संख्येने बेळगाव पोलीस आयूक्त कार्यालय येथे हजर रहावे.असे मध्यवर्ती म ए समीती अध्यक्ष श्री दीपक दळवी, सरचिटणीस श्री मालोजी आष्टेकर,कार्याध्यक्ष माजी आमदार श्री मनोहर किणेकर यांनी आवाहन केलं आहे.

18/10/2017

सर्वांना दिवाळी'च्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩

14/10/2017

*बैठक*
*शहर महाराष्ट्र एकीकरण समीती बेळगाव*
बेळगाव शहर तसेच उत्तर आणी दक्षिण बेळगाव मतदार संघात समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागातील महाराष्ट्र एकीकरण समीती आजी माजी लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते तसेच समीती कार्यकारीणीची बैठक आयोजित केली आहे.तेंव्हा पुढील दिशा ठरवण्यासाठी सर्वांनी वेळेवर बैठकीत मोठ्या संखेने हजर राहून चर्चेत भाग घ्यावा असे शहर महाराष्ट्र एकीकरण समीती अध्यक्ष श्री दीपक दळवी तसेच सरचिटणीस श्री मालोजी आष्टेकर यांनी आवाहन केले आहे.
*विषय- येता १ नोव्हेंबर काळा दिन गांभिर्याने पाळने तसेच बेळगावमधे १३ नोव्हेंबर २०१७ रोजी होणाऱ्या कर्नाटकी अधिवेशनास प्रत्यूत्तर देण्यासाठी मराठी महामेळाव्याचे आयोजन*
**************************
*स्थळ*-महाराष्ट्र एकीकरण समीती कार्यालय,रंगुबाई पॅलेस,
रामलिंगखिंड गल्ली.
*बेळगाव*
*वेळ*-रविवार दि १५/१०/२०१७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता.

10/10/2017

१ नोव्हेबरची त्यारी १ महिना आधीच सुरु , अभूतपूर्व प्रतिसादाची शक्यता आहे ।

जय महाराष्ट्र🚩

03/10/2017

देखलेना आंखोसे ,आयेगे हम लाखौसे🚩
सिमावासीयच्या काळा कुट्ट दिवस

"१ नोव्हेबर काळा दिवस"
🙏🚩जय महाराष्ट्र🚩🙏

21/09/2017

आज पासुन सुरु होणाऱ्या नवरात्र महोत्सव च्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा आई जगदंबा सर्वांना शक्ती देवो, आर्थिक उन्नती होवो, आरोग्य उत्तम राहो हिच आई जगदंबा चरणी प्रार्थना
💐🌷🌹🥀🌻🌼🌸🌺🍀🍁

😊🙏🚩भवानीच्या आशीर्वादनी 🙏🚩 आमुचा
🚩बेळगाव सिमाभागाचा प्रशन तातडीने सुटो🙏

🙏🚩जय महाराष्ट्र🚩🙏

14/09/2017

बेळगावचे "शाहीर गोपाळ पाटील" यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या बरोबरच महाराष्ट्र एकिकरण समितीचेही अपरिमीत नुकसान झाले आहे, हुतात्मा दिन असो किंवा काळादिन असो सीमाप्रश्नावर पोवाडा म्हणणारा शाहीर आमच्यातून आज निघून गेले महाराष्ट्र एकीकरण समिति'च्या वतीने शाहीर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐

01/09/2017

मन्हे समिति मराठी भाषिकांची दिशाभूल करते!

"काल जय महाराष्ट्र कोनी बोलल" नंतर घूमजाव मराठी मत आपल्याला कडे यावीत मन्हुन हे सर्व

बेळगांवची जनता जानते सर्व कोन दिशाभूल करत!!

🚩"जय महाराष्ट्र"🚩

24/08/2017

Timeline Photos

22/08/2017

सोमवारी रात्री बेळगाव विमान तळावर मध्यवर्ती समितीच शिष्टमंडळाने मुनगंटीवार यांची भेट घेतली ।
सोमवारी दुपारी ते नागपूर हुन कोल्हापूर दौऱ्याला खास विमानाने आले होते रात्री 11 वाजता कोल्हापूरचा कार्यक्रम आटोपून ते बेळगाव मार्गे मुंबईला रवाना झाले.यावेळी सीमा प्रश्नाचे समनवयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील देखील उपस्थित होते.

22/08/2017

*महाराष्ट्र एकीकरण समीती उद्या शेतकरी समस्यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन देणार**
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची हातातोंडाला आलेली खरिप पिक वाया गेल्याने बेळगाव जिल्हा दाष्काळग्रत जाहिर करत शेतकऱ्यांना थेट भरीव नुकसान भरपाई मीळावी, मागील रब्बी पिकविमा रक्कम अजूनही खात्यात जमा नाही, बळ्ळारी नाल्यात अतिक्रमण व सुपीक जमीनीत व्यवसायीक बेकायदेशीर बांधकाम करत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे,शेती उतार्यावरील *नो क्रॉप* खोडा त्याचबरोबर इतर अनेक समस्यानी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना सुस्थितीत आणून जगन्याच बळ देत इतर भेडसावणार्या समस्या सोडवाव्यात यासाठी महाराष्ट्र एकीकरण समीती व समस्त शेतकरी बंधुतर्फे जिल्हाधिकारी बेळगाव यांना मोर्चाने निवेदन देण्यात येणार आहे.तेंव्हा समीतीचे सर्व पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनीधी, शेतकरी,कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करावा अशी विनंती.
*वेळ*-बुधवार दि.23-8-2017
सकाळी 10.30 वाजता.
*स्थळ*-तालूका पंचायत कार्यालय,बेळगाव येथून मोर्चाने निघायचे आहे.

22/08/2017

सीमावासियांची लढाई निर्णायक टप्प्यावर -अॅड. विवेक ठाकरे - बेळगांव Live

belgaumlive.com गेली 61 वर्ष कानडी अत्याचारांनी ग्रस्त असणाऱ्या महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमाभागातील समस्त मराठीजनांचे माय महाराष्ट्रात समाविष्ट होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कारण सर्वोच्च न्यायालयात गेलेला हा 'सीमावाद' आता अंतिम टप्प्यात असून येत्या सोमवारी त्यावर सुनावनी होणार आहे

Website