VillageBook,Bamhani,Pauni,Bhandara

VillageBook,Bamhani,Pauni,Bhandara

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook,Bamhani,Pauni,Bhandara, Government Organization, .

Photos from VillageBook,Bamhani,Pauni,Bhandara's post 18/09/2018

15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता हीच सेवा हा महत्वाकांक्षी अभियान सर्व राज्यांमधे व जिल्हयामध्ये मा.श्री नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या मार्फत स्वच्छता हीच सेवा अभियान राबविण्यात येत आहे .तसेच आज बाम्हणी येथे मा.सरपंच यादव दयारामजी मेंगरे तसेच मा.गटविकास अधिकारी तेलंग मॅडम व पं.स.सदस्य मा.तोमेश्वरभाऊ पंचभाई यांच्या प्रमुख उपस्तिथीमध्ये आजचा कार्यक्रम पार पडला.
आज ग्रामपंचायत तर्फे स्वच्छता हीच सेवा अभियान राबविण्यात आले.गावातील सर्व महिला बचत गट वर्गाने खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतले आपला गाव आपण कस स्वच्छ राहिला ह्या संदर्भात जिल्ह्याचे Dy. CEO,गटविकास अधिकारी तेलंग मॅडम,श्री.तोमेश्वरजी पंचभाई व सरपंच यादवजी मेंगरे यांनी मार्गदर्शन केले व स्वतः सर्वांनी संपुर्ण गाव झाडून काढले उपस्थित ग्रामपंचायत सरपंच श्री.यादव दयारामजी मेंगरे सर्व ग्रामपंचाय सदस्य व गावातील तरुण वर्ग यांनी स्वच्छते बाबत शपथ घेण्यात आली.व चांगल्या प्रकारे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत स्वच्छता हिच सेवा हा अभियान राबविण्यात आला. व कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
*संगणक परिचालक*
*हरीश देसाई*
*ग्रामपंचायत बाम्हणी*

Website