Cycling Awareness Pune

Cycling Awareness Pune

Cycling Awareness Pune is a initiative primarily aims to build and transform cycle friendly city.

promoting cycling & cycling awareness is our mission.All Urban Cities are facing heavy traffic problems, let's bring back cycling again to reduce Pollution.

29/06/2024

गेल्या दोन वर्षाच दर्जेदार गियर्सच्या सायकलींची मागणी वाढली?

आजच्या घडीला सायकलींची मागणी, पुरवठा तसेच सुट्या भागांची कमतरता, आयत कर / ड्युटी तसेच काही भागांच्या आयातीवर निर्बंध याची सांगड कुठेतरी जुळेनाशी झालेली आहे. परिणामी दर्जेदार सायकलींच्या किंमती आज गगणाला भिडल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत cost-driven आणि value-driven अशा प्रवासाचे रंजक टप्पे आहे. त्यात अत्यंत छोटं असं सायकल मार्केट त्यात सतराशे साठ ब्रांड आणि प्रकार ! त्यामुळं असंख्य ग्राहकांच्या मनात दर्जेदार हा प्रकार फक्त विचारात तरी येतो किंवा कसे यावर मला तरी प्रश्न आहेत.

दर्जा म्हणजे नक्की काय? आणि सायकल संदर्भात हे पडताळायचं म्हंटल तर जरा ५०-६० वर्षे मागे जायला हवं. माझे आजोबा बापू आजही आठवतात. त्यांची ६५ वर्षे जुनी २४ इंची सायकल आजही डौलानं चालते.एखादी वस्तू त्यावेळी पूर्ण विचार करून घेतली किंवा बांधली जायची. दाढी करायचं खोरं असो किंवा त्यांची २४ इंची तारा सायकल आजही ६० वर्षे जुनी असून अगदी डौलानं चालते. त्या धाटणीची आजच्या तारखेला ईथं बनवायची म्हटली तर तीची दर्शनिय किंमत किमान २५ हजार नक्कीच असेल.

एवढ्या दशकांतली महागाई आजही अशा सायकलला भारतात लागू होत नाही याविषयी मी आमचे सायकल मित्र, अर्थतज्ञ् श्री निरज हातेकर सर यांच्याशी चर्चा केली तर “अशा सायकलींतला अमुलाग्र बदल त्या वापरणा-यांच जगणं खरच सुसह्य किंवा सुखावह झालय का? उत्तर हो असतील तर किंमती जास्त असतील. नाहीतर वर्षानुवर्षे तेवढ्यात तिथच आहेत यावर विचार करायला हवा” सायकलींवरच संशोधन, उत्पादनातील बदल हे इथं पुन्हा एकदा जोखण्यासारखं आहे.

भारतीय सायकल उद्योग आजही कच्या मालासाठी इतर देशावर अलंबुन आहे शिवाय उत्पादन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञाचा अभाव, अभियांत्रिकी तसेच संशोधनाचा अभाव तसेच दूरगामी धोरणाचे अस्तित्व व धोरणांची बांधणी आणि त्या अनुषंगाने प्रयत्न अशा अनेक कारणामुळे दर्जेदार सायकली किंवा त्याचे बहुतांश सुटे भाग भारतात बाहेरूनच आयात करावे लागतात.

त्यात आयात करण्यात येणा-या सायकलच्या टायरचं आत्मनिर्भर ट्यागलाईनवर सन २०२० पासून भलतच गाणं सुरू आहे. भारत सरकारच्या एन्टीडंपींग पाॅलिसी अंतर्गत आयात अजुनही निर्बंधीत आहे. परिणामी ग्राहकांना तब्ब्ल तीन ते चारपट पैसे मोजून अशा सायकलचे टायर विकत घ्यावे लागत आहेत. खरं तर अशा पॉलिसी नंतर भारतात सर्वोच्च दर्जाचे टायर किफायतीशीर दरात उपलब्ध व्हायला हवेत पण सगळं उलटच आहे !

सायकलच्या हरएक पार्ट पुर्ज्यावरचं संशोधनच हळूहळू मानवी जीवन सुखकर करत आलंय आणि आज मानवी जिवनाचा महत्वाचा भाग झालय. टायर हा कुठल्याही वाहनाचा दळणवळणाचा अविभाज्य घटक आहे.विज्ञान आणि तंत्राज्ञानाचा मिलाफ आणि अविरत सुरू असलेलं संशोधन हा महत्वाचा भाग आहे. हेच पूर्वापार असत तर कदाचित हे शक्य झालं असत !इटली सारख्या टायरच्या एका प्लांटवर तब्बल हजार सायंटीस्ट टायरच्या संशोधनावर काम करतात ही वस्तूस्थिती अशा उद्योगांचे मालक अभिमानाने सांगतात.

पार छोट्या पार्ट पुर्जे तसेच लहानग्या सायकलींपासून ते मोठ्यांच्या सायकलीची सुरक्षा किंवा त्यासंदर्भात कोणती मानांकने आहेत, असतील तर ते पाळले जातात का त्याबद्दल आजही म्हणावी तशी जागृती नाहीच. आजही आपल्या देशात आंतरराष्ट्रीय मानांकने आणि त्याची पडताळणी तसेच त्या अनुषंगाने प्रयोगशाळा, कार्यशाळा यांचा अभाव हे देखील दर्जा नसण्याचं कारण आहेच. या उलट फक्त वाजवी किंमत हा एकमेव निकष पाळून सायकल ही आज भारतीय बाजारात उपलब्ध असते!

संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेचा एक अहवाल असं सांगतो कि भारतीय सायकल कंपन्या सायकल निर्मितीत जगात दुस-या क्रमांकावर आहे. पण खास करून आजही त्या मोठ्या प्रमाणात स्टील रोडस्टर सायकलींचे साधं सुधं मॉडेल तयार करण्यावर भर देतात किंबहुना बहुधा तेही फक्त सरकारी निविदांसाठीच !
गेल्या काही दशकांपासून या उद्योगात अशीच परिस्थिती आहे हे देखील विशेष आहे. म्हणूनच काय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मल्टिन्याशनल हजेरी असणारे वेगवेगळे सायकल ब्रांड्स हे भारतात आज दर्जेदार म्हणून भारतात लोकप्रिय होत आहेत.

कोव्हीड लाटे नंतर भारत सरकार तसेच, शहरी स्थानिक स्वराज संस्थांनी काढलेल्या वेगवेगळ्या सायकलला चालना देण्याच्या अधिसूचना, लोकांच्यात आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण यामुळे ब-यापैकी व्यायामाचे हलके फुलके साधन म्हणून सायकल या साधनाची लोकप्रियता वाढत आहे. शिवाय दूरपल्ल्याच्या सायकल सहली, वेगवेगळ्या स्थानिक सायकल संस्था व सायक्लोथाॅन यांचे आयोजन यामुळे सायकल वापराच्या जागृतीस हात भारही लागत आहे. पण नियमित पुरवठा, दर्जेदार, सुखकर वाटणा-या सायकली यांचा अभाव आजही आहे.

युरोपियन तसेच आशियायी प्रगत देशात सायकल ही जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक घरात आयुष्यभर टीकणा-या सायकली असा पिंड आहे आणि त्या अभिमानानं उभ्या आहेत.

नावीन्य, डिझाइन आणि कारागिरीसाठी बेंचमार्क म्हणून आजही जगाला युरोप, जपानकडे पहावे लागते मग ती छोटी सायकल असो, यंत्रसामुग्री किंवा तंत्रज्ञान! कारण ईथे लोकांची काळजी, कदर आणि त्या काळजीपोटी जागृकता घडोघडी आजही आहे. भले त्यांच्यासाठी काही पार्ट पुर्ज्यांचे उत्पादन करणारा देश वेगळा असला तरी आपल्या देशाचं प्रोडक्ट म्हणून इथल्या उत्पादनाच्या दर्जेदारपणावर इथला नागरिक विश्वास ठेवत असतो आणि त्याला तडा जाणार नाही याची काळजी विविध उत्पादने घेत असतात.

जागृती सोबतच दूरगामी धोरणं, पायाभूत सुविधा, योग्य निर्णयासोबत कृती या सर्वांची सांगड भारतीय सायकल उद्योग एका नव्या उंचीवर जावू शकतो? हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत राहतो.

01/06/2024

आम्हाला सायकलवर अनुभवता येणा-या आनंद लहरी ऐका आकाशवाणीच्या रेडिओ लहरींवर!

जागतिक सायकल दिनानिमित्य येत्या सोमवार, दि. 3 जून 2024 रोजी
सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील आकाशवाणी सर्व प्राथमिक केंद्रांवरून.

22/08/2022

PMC has invited public suggestions & objections to add the Cycle Plan into Pune's Development Plan.

Before 25 August 2022, please send letters of support, you may download one at this link for content https://tinyurl.com/cycleplanletter

Please email your letter to [email protected]. Your letter will be printed and submitted to the PMC.

Addition to the DP will make it legally binding for PMC to build cycle network, cycle parking, run public cycle rental service.

28/06/2022

पुणे - पंढरपूर सायकलवारी आणि इस्लामपूर - पंढरपूर सायकल वारी सदिच्छा भेट, पंढरपूर
पुणे
Cycling Awareness Pune
Islampur

24/05/2022

सायकल मित्र Vinod Shendage सर यांची सायकल वारी.
नक्की फॉलो करा..

🚴‍♂️🚴‍♀️🚴‍♂️🚴‍♀️🚴‍♂️🚴‍♀️🚴‍♂️🚴‍♀️🚴‍♂️

*🌹दरवळ कर्तृत्वाची🌹*

*चांदज हून सकाळी तांबड फुटायला म्हणजेच सहा वाजता जिंतूर कडे निघालो. पक्ष्यांचा किलबिलाट. माय माऊलींची सकाळ कामाची लगबग.*

*साडेसहाला जिंतूर मध्ये पोहचलो . वाटेत मॉर्निंग वॉक वले, धावणारे युवक, सायकलर्स यांची नजरभेट झाली*.

*शिक्षणासाठी ,विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी ज्यांची नेहमीच लगबग, तगमग, तळमळ असते. असे पांगरी शाळेचे मुख्याध्यापक के सी घुगे सर यांच्याशी प्रथम संवाद झाला .मिळून गणपती मंदिर, शिवाजी नगर याठिकाणी आलो* .

*प्रकाश ससे सर, निवृत्ती गीते साहेब, लहाने सर शुभेच्छा ,आशीर्वाद देण्यासाठी मंदिरात हजर होते* .

*केंद्रप्रमुख दिनकर घुगे सर, पांडुरंग अंभोरे सर व इतर नागरिक उपस्थित होते*.

*सर्वांशी संवाद साधून कर्तृत्वाची दरवळ असणाऱ्या विभूतींच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन येलदरी कडे निघालो* .

अक्षर आनंद
वाचन संस्कार केंद्र

Photo Of "Worlds Most Beautiful Cycling Route" Leaves Indians Thrilled 21/05/2022

One of the scenic bicycle route of India 🚴 Would you like to ride on this scenic route?

Photo Of "Worlds Most Beautiful Cycling Route" Leaves Indians Thrilled Erik Solheim, a former Norwegian diplomat, recently shared a picture of an aerial shot of one of the scenic roads in India, which he said is the "world's most beautiful cycling route".

12/05/2022

Happy to announce that SPTM is working on a project "Cycle Friendly Kothrud" to increase the use of bicycles for commuter trips in Kothrud. This project is supported by the Cummins India Foundation under CSR initiatives.

Learnings from this project can be used to increase the use of bicycles across the city.

29/04/2022

सायकल मित्र, पर्यावरण मित्र पिंपरी चिंचवड, पुणे येथे सायकल चळवळीतील आदरणीय व्यक्तिमत्त्व श्री सुनील पाटील सर यांचे एक लक्ष किमी सायकलवने पूर्ण, संपूर्ण सायकलींग अवेअरनेस पुणे तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. 🚴💐

एक लक्ष किमी सायकलवणे पूर्ण व समाजकार्यासाठी प्रति किमी 1रु प्रमाणे रु एक लक्ष देण्याची संकल्प पूर्ती

नमस्कार,
आज 29/04/2022 मॅप माय राइड वर आज 10025 किमी सायकलवणे ची नोंद झाली. 24/01/2016 रोजी सायकलवणे ची पहिली नोंद त्या वेळच्या एंडू मोंडू वर झाली होती.
गेल्या 6 वर्षे 3 महिने व 5 दिवस याकालावधी मध्ये सरासरी 16.13 किमी प्रति तास या वेगाने 6200 तास (3708 राइड्स )सायकलवणे झाले
वयाच्या 51 व्या वर्ष्या नंतर खऱ्या अर्थाने सायकलवणे सुरु केले (या पूर्वी विध्यार्थीदशेत सायकलवणे झाले होते) आज वयाच्या 58 व्या वर्षी हे पूर्ण होत आहे यावर माझाच विश्वास बसत नाही
या सायकलवणे मध्ये काही लक्षात राहिलेल्या सायकल यात्रा
1. सह्याद्री वाचवा मोहीम नवापूर ते महाबळेश्वर(10 दिवस 700+ किमी )
2. निगडी ते माळेगाव एका दिवसात 240 किमी
3. एका दिवसात सिंहगड, तिकोना, राजमाची, पुरंधर, दौलत मंगळगड (भुलेश्वर ), लोहगड व मल्हार गड (सोनारी )
4. दोन दिवसामध्ये सिंहगड - तोरणा - राजगड
5 निगडी - भोर - निगडी
6. निगडी - वाई - निगडी
7. दोन दिवसा मध्ये निगडी - पाचगणी - महाबळेश्वर - भिलार (पुस्तकांचे गाव )-निगडी
8. दोन दिवसा मध्ये निगडी - सातारा -सज्जनगड -निगडी
9.अष्टविनायक सायकल यात्रा (4 दिवसात 500+ किमी )
10.एका दिवसात निगडी पंढरपूर, (235किमी )
तसेच 3 दिवसात निगडी - पंढरपूर - निगडी (500 किमी )व 4 दिवसात निगडी - पंढरपूर - निगडी (500किमी )
11. निगडी - थेऊर - रामदरा - निगडी
12. अनेक वेळा श्री क्षेत्र तुळापूर व वढू बुद्रुक,घोरावडेश्वर, कुंडमळा, लोणावळा, दत्तगड दिघी, आळंदी, कसरसाई, श्रीमंत दगडूशेठ गणपती, तळजाई, शिंदे छत्री,भंडारा
डोंगर, भामचंद्रगड, सावित्री बाई पुणे विद्यापीठ, मस्तानी तलाव, दिवे घाट, कात्रज घाट, पाषाण इत्यादी
13. सण 2016 ते सण 2021 अखेर घर ते कार्यालय जाणे येणे (42 किमी )अंदाजे 40,000 किमी सायकलवणे
14. स्वप्न पूर्ती सायकल यात्रा
जम्मू ते कन्याकुमारी स्वामी विवेकानंद विचार यात्रा सलग 28 दिवस 4080 किमी सायकलवणे
या सायकल यात्रे मध्ये भारतातील उत्तर ते दक्षिण मधील विविध राज्यांची खाद्य संकृती, राहणी मान पाहता आले तसेच अनेक ठिकाणी लोकांनी केलेला सन्मान पाहुणचार प्रसार माध्यमानी घेतलेली दखल तसेच भक्ती शक्ती येथे या सायकल यात्रे चे झालेले स्वागत कायमचे स्मरणात राहील
सायकल मुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे विविध वयोगटातील विविध क्षेत्रातील मित्रांचा गौतवळा वाढला आहे. अनेकाना प्रोत्साहन मिळाले असून अनेक जण अतिशय उत्तम प्रकारे सायकलवणे चा आनंद घेत आहेत
सायकलवणे मुळे माझी तब्बेत अतिशय उत्तम राहिली आहे रोज सकाळचा सूर्योदय माझ्या सखी सोबत पाहतो. कोणतेही ताण तणाव येत नाहीत. निसर्गाची विविध ऋतुमधील रूपे पाहताना वय कसे निघून जात आहे समजत नाही. सायकलवणे मुळे अतिशय शांत झोप मिळते.
सायकल मुळे प्रवास खर्चात बचत होते याचा विचार करून सण 2018 पासून एका वर्ष्यात जितके किमी सायकलवणे होईल त्या प्रति किमी 1रु यानुसार समाजकार्या साठी पैसे देणे सुरु केले सण 2021 पर्यत रु 90200 विविध व्यक्ती संस्थाना दिले
जाने 2022 मध्ये ज्या वेळी एक लक्ष किमी सायकलवणे पूर्ण होईल तो पर्यंत एक लक्ष रु समाजकार्या साठी देण्याचा संकल्प केला होता. काल साने गुरुजी ग्रांथालय, आलास, ता शिरोळ जि कोल्हापूर यांना पुस्तके खरेदी साठी रु 5000 दिले व आज निसर्ग सायकल मित्र परिवारास रु 5000 देऊन हा संकल्प पूर्ण करताना विशेष आनंद होत आहे प्रति किमी 1 रु समाज कार्यासाठी हा उपक्रमाचे अनेक जण अनुकरण करत आहेत त्यांचे अभिनंदन
या सायकल यात्रे मध्ये साथ देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या तसेच या साठी सतत भक्कम पाठींबा देणाऱ्या माझ्या कुटूंबियांचे ,मला साथ देणाऱ्या दोन्ही सखीचें (Motra blues व hi bike)तसेच प्रत्येक राइड चे नोंद घेणारे एंडू मोंडू व मॅप माय राइड या ऍप चे धन्यवाद
सायकल खरेदी साठी मार्गदर्शन करणारे, पंचर कसे काढावे शिकवणारे, सायकलवण्यासाठी गिअर कसे टाकावे हे शिकवणारे व ज्यांच्या मुळे जम्मू ते कन्याकुमारी सायकल यात्रे ची स्वप्न पूर्ती झाली ते माझे मित्र, सायकलिंगचे गुरु सुनील ननवरे सर यांच्या मुळे हा एक लक्ष किमी सायकलवणे चा टप्पा पूर्ण करू शकलो सुनील ननवरे सरांना मनःपूर्वक धन्यवाद
या पुढे ही हे आनंददायी सायकलवणे सुरु राहील सायकलला प्रतिष्ठा मिळण्यासाठी व नविन सायकल स्वारांना मार्गदर्शन करण्यासाठी सतत कार्यरत राहीन . सायकलवणे संदर्भात आपल्या काही शंका असतील तर निसंकोच पणे खालील मोबाईल वर संपर्क करावा मी माझ्या परीने शंका निरसन करण्याचा प्रयत्न करेन
अशक्य काहीच नाही, प्रचंड इच्छा शक्ती व सातत्य या दोन गोष्टी आपल्या कडे असतील तर वय कोणती गोष्ट साध्य करण्याच्या आड येत नाही
चला तर मग सायकल चालवू या, तंदुरूस्त राहू या. सायकल धर्म वाढवू या
धन्यवाद
सुनील पाटील
निसर्ग सायकल मित्र
निगडी, पुणे
9860338979
9405581427

Videos (show all)

Come & join me on Today 6th June 2020, at 06:00 pm, to be a part of my little journey which I'm going to cover in short ...
Friends, see you all tomorrow Sat. 25th , 6pm here.. my  FB speech to share cycling experience with you all!
Pune Cycling Awareness Bicycle Diaries session by Vivek Lokur at Soneri Amdar chaha and Book Café
#CyclingAwarenessPune#भाषारतसायकलोपासनाभारतातील विविध भाषा आणि बोलींचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने दिनांक १ जुलै २०१८ पा...

Telephone

Website