मा. तेजस दादा पाटील

मा. तेजस दादा पाटील

आयुष्यात एकच ध्यास आहे
ना आमदार ना खा?

Shivneri fort||shivjayanti||timelapse||Nashiktoshivneri||chhatrapati Shivaji Maharaj||sahyadri 28/02/2020

Pls share,like, comment & subscribe the channel.
जय शिवराय 💐💐💐👍👍

https://youtu.be/olcLpwQ4IUk

Shivneri fort||shivjayanti||timelapse||Nashiktoshivneri||chhatrapati Shivaji Maharaj||sahyadri शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... सनई-चौघडे वाजू लागले... सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... भगवा अभिमानाने फडकू लागला.....

Tejas patil (@Tejaspatil4216) | Twitter 27/11/2019

Tejas patil (@Tejaspatil4216) | Twitter Senaste Tweets från Tejas patil (). सामाजिक जीवन. India

20/10/2019

करा मतदारसंघाचा उद्धार
बजावा 💯% मताधिकार

08/10/2019

#रावण #दहन ! करूया ना,
रावण दहन करू
विषमतेचा,
अन्यायाचा,
भ्रष्टाचाराचा
हिंसेचा
क्रूरतेचा
वाईट प्रवृत्तीचा
वाईट नजरेचा
अनादराचा
रोग राई आणि अस्वच्छतेचा
गरिबीचा, बेरोजगारीचा
निरक्षरतेचा
जातिवादाचा
धर्मांध कट्टरतेचा
करूया ना
रावण दहन अगोदर आपल्या आतला करूया.
:- तेजस पाटील✒
विधानसभा क्षेत्र प्रमुख
संभाजी ब्रिगेड पाचोरा-भडगाव मतदारसंघ

01/09/2019

(२०१९) खूप खूप आभार मराठा सेवा संघ

(२०१८)मराठा सेवा संघामुळे घर-शेत विकून राजकारणात नेत्यांच्या मागे धावणारा मराठा पंचसूत्री हाती घेऊन स्वतः आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय व प्रचार प्रसार माध्यम सत्ता प्रस्थापित करून नेतृत्व करू लागला.
1 सप्टेंबर मराठा सेवा संघ वर्धापन दिनाच्या शिव शुभेच्छा.
तेजस पाटील
(मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता २०१३-आज पर्यंत)

(२०१६)आज मी काहीच नसलो तरी
जे नाही ए (दंगलखोर कट्टरवादी)
ते मराठा सेवा संघाच्या विचारधारे मुळेच

मला विज्ञानवादी बुद्धिजीवी बहुजनवादी दृष्टीकोन देण्यासाठी खुप-खूप आभार.

1 सप्टेंबर मराठा सेवा संघ वर्षांपन दिनाच्या शिव शुभेच्छा..

(२०१५) मराठा सेवा संघाने काय केल किव्हा मराठा सेवा संघ काय आहे हे सांगन्या इतका अनुभवी व मोठा मि नाही

पन मराठा सेवा संघामुळे
तेजस पाटील सारखे हजारो मुलान्ना स्वता विचार करुन लिहन्यास बोलन्यास व्यक्त होन्यास शक्ती दिली

माझ शक्तीपिठ

28/08/2019

काल पर्वा लाठी चार्ज झाला
आज फक्त २०% अनुदान मिळालं !

शुभेच्छा देऊ तरी कश्या
आभार मानू तर कशे

बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांना फक्त २०% पगारात घर भागवायला सांगतंय हे सरकार
यांना माय बाप सरकार म्हणावं तरी कसं ?
#कसाई सरकार निवडून दिलंय लोकहो.

आमची मागणी १००% #अनुदान
आणि शिक्षणाचे राष्ट्रीयकरण.

27/04/2019

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा मी आयुष्याच्या या सुंदर वहीत एक लक्खं सोनेरी पान म्हणून जपून ठेवणार आहे.
आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे माझ्या आयुष्यातील भाग आहात आणि हे आयुष्य अजून सुंदर करण्यात प्रत्येकाचे माझ्या जीवनात अनमोल योगदान आहे.
असच माझ्यावर प्रेम करत रहा,साथ द्या,जेव्हा वाटेल तेव्हा हाक द्या आणि सहकार्याचा हात द्या आणि पाठीवर नेहमी कौतुकाची अशीच थाप द्या.
कारण सर्वांचं प्रेम जिव्हाळा मिळावा या बाबतीत मी थोडा स्वार्थी आहे.
खूप खूप आभार
कुणासाठी भाऊ तर कुणासाठी दादा होता आलं
Buddy bro भावा म्हणत काहींचा वर वर मित्रा होता आलं.
कुणी उद्योजक कुणी राजकीय तर कुणी सामाजिक कार्यकर्ता म्हणत गेलं
तर कुणासाठी त्यांच्या डोळ्यातला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल अस leader तर काहींनी सरळ नेता घोषित केले.
काहींचा तेज्या तर काहींच्या लाडका तेजु होता आलं
काहींचा भैया तर काहीं वडीलधाऱ्यांकडून बेटा हि ऐकू आलं.
रूप अनेक पण विश्वास एक
आपुलकी तुमची आमची थेट
अश्याच अपेक्षा व विश्वासाचे स्वप्नरंजित शब्द माझ्यासाठी सदैव प्रोत्साहन राहील व हळू हळू आता वाढदिवस हा सामाजिक न होता खाजगी होत जाईल.
शुभेच्छांसाठीं पुनःच एकदा मनस्वी आभार..❤🙏😍😇

Photos from मा. तेजस दादा पाटील's post 08/03/2019

महिला दिनाच्या हार्दिक शिव-शुभेच्छा ...

स्वराज्यसंकल्पीका राजमाता जिजाऊ,शिक्षणाचे आराध्य दैवत सावित्रीमाई फुले,फतिमा बि,आहिल्याबाई होळकर,महान रणरागिणी ताराराणी
या सर्वांना अभिप्रेत शुशिक्षित,समता व बंधुता प्रस्थापित करणारी समाज व्यवस्था घडवन्यासाठी पुन्हा एकदा जिजाऊ जन्माला यावे लागतिल त्याशिवाय शिवराय जन्म घेनार नाहित व शिवराज्य पुन्हा येनार नाही .

या साठी अगोदर मुलगी जन्माला यायला हवी म्हणुन या जागतिक महिलादिनी संकल्प करुया
स्त्री गर्भपात व गर्भातलिंग परिक्षनाला विरोध करुया
Save a girl Child

:- तेजस पाटील
९४०३४००६५३
[email protected]
Insta :- Tejas_patil.Tj
YouTube - Yuva Josh
https://www.youtube.com/channel/UCXFm46WLYyR3g9hb6Mcs5nA

Written on 08-03-2016

07/03/2019

If talking about social life, biggest lie is that you don't have responsibility. We are surrounded by lakhs of problems in society.Just pick up any one and strive for its long lasting solution as a Ambition. Our problem is that,
Actually we are not taught for Problem solving.

सामाजिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर सर्वात खोटी गोष्ट ही असेल की, मला जबाबदारी नाही. याउलट आपण ज्या समाजात राहतोय इथे भवताली लाखो समस्या आहेत. फक्त गरज आहे वाट्टेल ती एक समस्या निवडायची आणि तिच्या निवारणासाठी एक उद्देश्य समजून आयुष्य झोकून द्यायची.
मुळात आपली समस्या हि आहे की, आपल्याला समस्या निवारण करायचं असत हे कधी शिकवलंच गेलेलं नाही.

03/03/2019

आमदार गाव दत्तक योजना
खासदार गाव दत्तक योजना
सगळा फक्त बोभाटा किती दत्तक गाव आदर्श झाले ?

Photos from मा. तेजस दादा पाटील's post 20/02/2019

जय जिजाऊ
मराठा सेवा संघ पाचोरा पुरस्कृत शिवजन्मोत्सव २०१९
गाव तिथे शिवजयंती - #जागर #विचारांचा अभियान अंतर्गत आज नगरदेवळा ता.पाचोरा येथे
शिव व्याख्याते सागरजी गवते (औरंगाबाद) यांची वैचारिक पर्वणी चे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी मराठा सेवा संघ पाचोरा तालुकाध्यक्ष दीपक पाटील साहेब,संभाजी ब्रिगेड चे जिल्हा चे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक रविंद रामकृष्ण पाटील,मा. तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,गावातील ज्येष्ठ मंडळी व सामाजिक कार्यकर्ते तेजस पाटील उपस्थित होते.यावेळी तेजस पाटील यांनी मराठा सेवा संघ व तत्सम 32 कक्ष करत असलेले प्रबोधन व बहुजनवादी विचारधारा यावर प्रास्ताविक केले.

01/02/2019

शिवरायांचे खरे गुरु विज्ञानवादी परिवर्तनवादी विद्रोही संत श्रेष्ठ जगतगुरु तुकोबाराय यांच्या जयंती निमीत्ताने विनम्र अभिवादन...

11/01/2019
04/01/2019

अवघे या सारे या
स्वराज्यप्रेरिकेला वंदन करूया
जिजाऊ जन्मोत्सव शिंदखेडराजा १२ जानेवारी

05/05/2018

जेव्हा विषय पोटा पाण्याचा असतो (साखर कारखाने,शिक्षण संस्था ई.)
तेव्हा महाराष्ट्रातील मोजके सरंजामी राजकीय घराणे व सर्व पक्षीय दिग्ग्ज मोजक्या राजकीय घराण्यातील कट्टर विरोधक एकत्र येतातच.
या ३०-४० घराणे व सर्व सामान्य समाज यांचा काडीमात्र संबंध नसतो, तरी सुद्धा यांच्या राजकारणातील मक्तेदारी मुळे यांना आपलं प्रतिनिधित्व समजून सकल समाजाला सरंजाम व राज्यकर्ते जमात म्हटले जाते.आणि मुळात समाजाचा खरा दुरबल चेहरा लपवून खोटा प्रतिधिनिधिक मुखवटा लावला जातो.या घराण्यांचे आप आपसात रोटी बेटी व्यवहार सहज होतात, पण उर्वरित २-३ कोटी लोकसंख्या मध्ये याना स्थळ सापडत नाही, याना कुठलाच प्रकार चा व्यवहार करू वाटत नाही.
आणि याच प्रस्थापित घराण्यांच्या मागे धावून आमचा समाज येडे होत आमचे भावी राजकीय भवितव्य ची धमक असणारे समाजातले खरं प्रतिनिधी दाबले जातात आणि शेवटपर्यंत बिन पगारी फुल अधिकारी कार्यकर्तेच राहतात कधी नेते व जेते होऊ दिले जात नाही.
या पुढे यांना डोक्यावर घेऊ नका.
स्वतः मोठे व्हा आपल्यातले लोक सर्व क्षेत्रात मोठे करा
उद्योग, व्यवसाय, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, प्रचार प्रसार माध्यम सर्वच क्षेत्रात आप आपले तळागळातले लोक सर्वोच स्थानी पोहचले पाहिजे.
ज्यांनी कधी गरिबी पहिलीच नाही अनुभवली नाही अश्या लोकांना गरीब शोषित शेतकरी कष्टकरी यांचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे का ? याचा सुद्धा विचार मनात एकदा नक्की आणावा.
तूर्तास इतकंच .

तेजस पाटील
सामाजिक अभ्यासक

Videos (show all)

करा मतदारसंघाचा उद्धारबजावा 💯% मताधिकार
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा मी आयुष्याच्या या सुंदर वहीत एक लक्खं सोनेरी पान म्हणून जपून ठेवणार आहे.आपण सर्वजण कोणत्या ना...

Telephone

Website