Jaydutt Dhas Fc
आष्टी,पाटोदा,शिरूर मतदारसंघाचे युवा ?
संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन...!
#भावपूर्णश्रद्धांजली 💐
आपल्या बीड तालुक्यातील हिंगणी (बु.) येथील वीर जवान अविनाश कल्याण आंधळे हे देशसेवा करत असताना शहीद झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे...!💐
Jaydutt Dhas
तहानलेल्या पाखरांवर तू कसे उपकार केलेस;एकचं ओंजळ पिलास पण सारे तळे चवदार केलेस ...!
महामानवास विनम्र अभिवादन..!
Jaydutt Dhas
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना राष्ट्रपती श्री.रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते #पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले याचा आनंद व अभिमान आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्राप्त पद्म पुरस्कारांबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा..!💐
Jaydutt Dhas Fc Jaydutt Dhas
डोंगर दऱ्यात राहणाऱ्या वंचित,अशिक्षित घटकांना सामाजिक प्रवाहात आणून शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री. भगवान बाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
Jaydutt Dhas
नीरजचा भाला, सोन्याचा झाला...
आजचा दिवस खरोखर सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे.फेंका जहाँ तक भाला जाता, द्वंद कहाँ तक पाला जाता, आना ही था अब तो सोना, दूर कहाँ तक भागा जाता...!
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी आज सुवर्णपदक पटकावले. ही सर्वोत्तम कामगिरी असून तमाम भारतीयांसाठी हा अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. सोनेरी इतिहास घडवल्याबद्दल मा. नीरजजी चोप्रा यांचं मनःपूर्वक अभिनंदन ..
Jaydutt Dhas
Sir ..टोलोलिंग पर 'तिरंगा' लहरा रहा है ..I Repeat......Sir..टोलोलिंग पर 'तिरंगा' लहरा रहा है..
#२६जुलै
#कारगीलविजयदिवस
#राष्ट्रप्रथम Jaydutt Dhas
राजर्षी या पदवीला स्वकर्तुत्वाने सार्थ ठरविणारे आणि आपण छत्रपतींचे वंशज असून लोककल्याण हीच आपली जबाबदारी अशा भावनेतून राज्यकारभार करणारे छत्रपती शाहू महाराज.
शिवरायांच्या जीवनात अनेक बाके प्रसंग उभे राहिले, वेगवेगळ्या लढाया असतील किंवा प्रतिपक्षाने टाकलेले राजकीय डावपेच किवा क्षत्रियत्वाचा प्रसंग असेल ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी या सर्व संकटांवर संयमाने मात केली अगदी त्याचपद्धतीने राजर्षी शाहू यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या सर्व संकटांना अतिशय संयमाने तोंड देवून त्यांवर मात केली.
राजर्षी शाहूंचा काळ म्हणजे काही लढाया अशाप्रकारचा नव्हता, तो काळ सामाजिक उत्थान आणि स्वातंत्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या चळवळींचा होता. राजर्षींनी ज्या पद्धतीने सामाजिक उत्थानाला हात घातला तसा त्याकाळी भारतात कोणाही राजाला करता आले नाही. त्याबरोबर क्रांतिकारकांना मदतही करायला ते विसरत नव्हते.
राजकीय व सामाजिक आघाडीवरील राजर्षींचे यश पाहिले तर प्रतिशिवाजी ही उपमा त्यांना सार्थपणे लागू होते.
अशा या राजर्षी शाहूंच्या जयंती दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा...💐🙏
Jaydutt Dhas
भारतीय क्रीडाविश्वातील आदरणीय व्यक्तिमत्व, माजी ऑलिम्पिकपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले.मैदानी खेळांमध्ये त्यांनी मिळविलेल्या यशामुळे अनेक नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळाली...!
मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे भारतीय क्रिडा विश्वाचे मोठे नुकसान झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली...💐
Jaydutt Dhas
स्वराज्य सुखकर,
मुक्त धरेवर,
सुराज्य करिती शिवराजेश्वर...!♥️
#रयतोत्सव
#शिवराज्याभिषेकदिनाच्याहार्दिकशुभेच्छा🚩
Jaydutt Dhas
उत्तम प्रशासक, कुशल संघटक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
Jaydutt Dhas
आम्ही वैकुंठवासी । आलोयाचि कारणासी ।।
बोलिले जे ऋषी । साच भावे वर्तावया ।।
अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून विठूराया च्या भक्तीचं मर्म आणि प्रबोधनाचा सुयोग संगम साधून समस्त मानव कल्याणाचा व समाजोद्धाराचा मूलमंत्र अभंगवाणीच्या माध्यमातून मानवजातीला देणारे महान संत जगद्गुरू श्री. तुकाराम महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..!
#तुकाराम_महाराज_बीज #नतमस्तक🙌❤️
Jaydutt Dhas
केज मतदार संघाच्या भाग्यविधात्या स्व.डॉ.सौ.विमलताई मुंदडा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
#विनम्रअभिवादन #विमलताई #पुण्यतीथी
Jaydutt Dhas
इंद्रायणी भिमात वाहिला शंभुच्या रक्ताचा महापुर.!
सांखळदंड छातीशी कवटाळुन आजही गर्जते तुळापुर...!!
#शौर्यपीठ_तुळापुर #स्मृतिदिन #छावा
Jaydutt Dhas
शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ..!
#क्रांतिज्योती #सावित्रीआई #विनम्रअभिवादन Jaydutt Dhas
छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर मुघलांना कडवी झुंज देत स्वराज्याचा गाडा सावरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव,पराक्रमी आणि मुत्सद्दी छत्रपती राजाराम महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#छत्रपती #स्वराज्यरक्षक #जयंती #विनम्रअभिवादन
Jaydutt Dhas
स्वच्छतेचे उपासक व विज्ञानवादी संत गाडगेमहाराज यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस व कार्यास विनम्र अभिवादन..!
#विनम्रअभिवादन #बाबा #समाजसुधारक #गाडगेबाबा
Jaydutt Dhas
पर स्त्री मातेसमान अशी शिकवण देणाऱ्या जगातील एकमेव राजांचा जन्मोत्सव...
कोणताही जाती भेद न करता १८ पगड जाती जमाती एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन करणाऱ्या राजांचा जन्मोत्सव...!
ेब्रुवारी
#छत्रपती_शिवरायांचा_जन्मोत्सव
#शिवजन्मोत्सव #राष्ट्रोत्सव
#शिवराय_मनामनात
#शिवजयंती_घराघरात 🚩
Jaydutt Dhas
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी गृहमंत्री स्व.आर. आर.(आबा) पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
Rohit R R Patil Jaydutt Dhas
आपल गाव स्वच्छ तर राज्य,देश स्वच्छ,स्वच्छता ठेवण,कचरा कचरा पेटीत च टाकने ही प्रत्तेक नागरीकाची जबाबदारी आहे.आपण स्वतःपासुन हे सुरु केल तर नक्की यात मोठा बदल होऊन रोगराईपासुन आपण मुक्त होऊ शकतो.
आज आष्टी नगरपंचायत “स्वच्छ सर्वेक्षण २०२१”अंतर्गत शहरातील स्वच्छता अभियानात जयदत्त भैय्यांनी सहभाग नोंदवला..!
Jaydutt Dhas
आज साष्टपिंपळगाव (ता.अंबड जि.जालना)येथे सुरु असलेले “मराठा आरक्षण” राज्यव्यापी ठिय्या आंदोलनास जयदत्त भैया यांनी पाटोदा तालुक़्यातील समाज बांधवासोबत भेट दिली व आपले मनोगत व्यक्त केले..
क़ाही दिवसापूर्वी आदरणीय आ.सुरेश(आन्ना)धस यांनी ही या ठिकाणी भेट देऊन सहभाग नोंदवला होता;आपले राजकीय जोड़े बाजुला ठेऊन समाजासाठी कधिही एक पाऊल पुढ़े टाकनार्या धस कूटुंबाचा आम्हाला अभिमान आहे..!
Jaydutt Dhas
आज सारोळा येथे वायभासे आणि बांगर परिवारांच्या शुभविवाहास खा.प्रितमताई मुंडे यांच्यासह युवा नेते जयदत्त भैय्या यांनी उपस्थित राहून नव दाम्पत्यांना वैवाहिक आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या..!
Jaydutt Dhas
"अररं तान्ह्या येडा का खुळा तू घरी लगीन काढलंय, पै-पाहुण जमल्यात, घरांत सोहळ्याचं अन्न रांदतय, दारात मांडव पडलाय, निवद दाखवलाय, औतन पोचल्यात अन् तू मोहिमेवर गेलास तर जग हसलं राजांवर वरबापाला काय तर मोहिमेवर धाडलाय"
"वा आईसाहेब कोपऱ्यापातूर वगळ यैस्तोवर आम्ही भात आमटी वरपायची, नवीन शेलं पागोटं घालून मिरवायचं नाचायचं अन् आमचं राजं कुठ तर मोहिमवर आईसाब जग हसल आम्हास्नी.... श्यान घालल तोंडात"
"तान्ह्या.. आदी रायबाचं लगीन पार पाड"
"नाही राजं.. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं"...!
गड आला पण सिंह गेला...
सुभेदार तानाजी मालुसरे पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा....!
Jaydutt Dhas
सत्य, अहिंसा, विश्वबंधुता अशा उच्च मानवी मूल्यांचा आजीवन पुरस्कार करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आजही समाजासाठी तितकेच अनुकरणीय आहेत. ग्रामस्वराज्य आणि ग्रामोद्योगाला चालना देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शक तत्वांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे...!
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन.
Jaydutt Dhas
डोंगरदऱ्यातील शिक्षणापासुन वंचित असनार्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून तत्कालीन परिस्थितीत “जमिनी विका पण शिका”हा मुलमंत्र देणारे विज्ञाननिष्ठ संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#बाबाविनम्रअभिवादन🙌❤️
Jaydutt Dhas
आदरणीय आ.सुरेश (आण्णा) धस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर कासार येथे “जयदत्तभैय्या धस युवा मंच”आयोजित क्रिकेट स्पर्धेस आज भैय्यांनी भेट दिली..!
Jaydutt Dhas
असमान्य शौर्य गाजवणारे स्वराज्यरक्षक शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज 'राज्याभिषेक दिन' यानिमित्त त्यांच्या त्यागाला आणि शौर्याला मानाचा मुजरा व कृतज्ञतापूर्वक अभिवादन!
#छत्रपती_संभाजी_महाराज
Jaydutt Dhas
देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे, ऑलिम्पिक मैदानावर, सातासमुद्रापार भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे मराठमोळे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!💐
Jaydutt Dhas
मातोरी ता.शिरूर येथे “भालकेश्वर अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड” च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या..!
या प्रसंगी श्री.मच्छिन्द्रनाथ गडाचे महंत ह.भ.प.गुरुवर्य शिंदे बाबा उपस्थित होते..!
Jaydutt Dhas
मकर संक्रांत..!
हा सण नात्यातील स्निग्धता व गोडवा कायम ठेवून परस्पर विश्वास आणि सौहार्द वाढविण्याचा;सर्वांना मकर संक्रांतीनिमित्त मनापासून शुभेच्छा... !
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.🚩
Jaydutt Dhas
स्वराज्यप्रेरिका,राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमीत्त त्रिवार मानाचा मुजरा...!💐🙏🚩
#राजमाताजिजाऊजयंती
#जिजाऊजन्मोत्सव #12जानेवारी
#जयजिजाऊ #जयशिवराय
Jaydutt Dhas
स्वच्छतेचे जनक,प्रबोधनकार राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
Jaydutt Dhas
लोकनेते मा.स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
Jaydutt Dhas
राष्ट्र हे स्वतःच्या घटनेशिवाय अपूर्णच ....!
भारत देशाला संविधानात्मक परिपूर्ती देणारे एक कायदेपंडित,अर्थशास्त्रज्ञ,राजकारणी आणि समाजसुधारक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन .
#महापरीनिर्वाणदिन Jaydutt Dhas
जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून युनेस्को आणि वार्कि फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा 'ग्लोबल टीचर अवॉर्ड' बार्शी तालुक्यातील परितेवाडी येथील श्री.रणजित डिसले यांना जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
आपल्या ग्रामीण भागातील आपल्या मातीतील शिक्षकांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.श्री.डिसले यांना मिळालेला पुरस्कार हा राज्यासह देशातील सर्व शिक्षकांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आहे..
श्री रणजित डिसले आणि कुटूंबियांचे पुन्हा खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा..
Jaydutt Dhas
आपल्या अतुलनीय शौर्याच्या बळावर एकाच वेळी अनेक शत्रूंना समर्थपणे तोंड देत मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
Jaydutt Dhas
बीड ज़िल्हाभर बिबट्या ची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे, भर दिवसा बारा वर्षीय तरुणाला किन्ही या गावामधुन बिबट्याने उचलुन नेलय,म्हनूण रात्री च बिबट्या हल्ला करतो हा समज बाजुला सारून दिवसापण शेतकरी बांधवांनी आता शेतात काम करत असताना सतर्क रहाव ही विनंती..!
सरकारी यंत्रणानी लवकर यावर ऊपाययोजना राबवून बिबट्या जेरबंद करावा आणि या संकटामधुन शेतकरी बांधवांची सुटका करावी..!
Jaydutt Dhas
26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात नागरिकांच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे पोलीस बांधव व निष्पाप मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण आदरांजली..!
#यादरहेक़ुर्बानी
Jaydutt Dhas
आपणांस व आपल्या कुटुंबियास धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..!
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहुन धनवर्षाव अखंडित होत राहो, आपणांस निरामय आरोग्यदायी जीवन लाभो.
 Jaydutt Dhas
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
#वसुबारस Jaydutt Dhas