Saket Book World
मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील महत्त्व?
आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रकाशनाचे आधारस्तंभ : ज्येष्ठ कवी श्री. ना. धों. महानोर
आमच्या प्रवासात त्यांची साथ लाभली.
आनंदात त्यांनी प्रोत्साहन दिले.
संकटात धीर दिला.
चांगल्या कामांचं कौतुक केलं.
महाराष्ट्राचे ते साहित्य रत्न
त्यांनी निर्माण केलेले शब्दधन
आमचा वारसा आहे.
मराठी साहित्य परंपरेतील या
ते एक सोनेरी पान होते.
त्यांना आमच्या साहित्य कुटुंबाकडून
भावपूर्ण श्रद्धांजली.
बाबा भांड
आणि
साकेत प्रकाशन परिवार
आज मंगलाताई नारळीकर हे जग सोडून गेल्याची नकोशी बातमी येऊन थडकली आणि मन विषण्ण झालं.
जयंत नारळीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ शास्त्रज्ञाची सहचारिणी इतकीच त्यांची ओळख सीमित नव्हती.
स्वतः गणितज्ञ, मोठ्या पदांवर कार्यरत असणाऱ्या बहुआयामी मंगलाताई कर्मालाच ईश्वर मानत होत्या. याबरोबरच त्या तत्त्वनिष्ठ व तितक्याच संवेदनशील होत्या.
कॅन्सरशी झुंज देतानाही त्यांच्या कामाचा आवाका थक्क करणारा होता.
नारळीकर सरांची व स्वतःची पुस्तके तयार होताना त्यात जातीनं लक्ष घालण असो वा सामाजिक बांधिलकी म्हणून दारिद्र्यरेषेखालील मुलींना शिकवणे असो की लांबचा प्रवास करून येताच माहेरवाशीण लेकीसाठी लगेचच केक करायला घेणे असो, त्यांचा याही वयातील उत्साह अचंबित करणारा होता.
प्रापंचिक जबाबदाऱ्या आवडीने सांभाळताना आणि जगद्विख्यात शास्त्रज्ञाची पत्नी म्हणून तेवढ्याच तोलामोलाची साथ देताना त्यांची प्रज्ञा कधी झाकोळली गेली नाही.
पुस्तक किंवा पुस्तकेतर विषयांवर बोलताना त्यांचं अद्ययावत ज्ञान, कामाप्रति बांधिलकी व गुणवत्तेचा ध्यास याची वारंवार प्रचीती यायची.
त्यांच्यापुढे आम्ही सर्वार्थाने लहान असूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायला त्या कधी विसरल्या नाहीत.
वैयक्तिक आयुष्य किंवा कामाविषयीची चर्चा असो, त्यांच्या मार्गदर्शनाने आमचं आयुष्य समृद्ध झालं. निगर्वी मंगलाताई आमचा मोठा प्रेमळ आधार होत्या. मंगलाताई, तुमचा सहवास अजून हवा होता.
त्यांच्या जाण्याने साकेत परिवाराची वैयक्तिक हानी झाली आहे. भावपूर्ण श्रध्दांजली🙏
जागतिक पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
आजचा सकाळ, सप्तरंग पुरवणी. उत्कृष्ट व प्रेरक लेख…
साकेत प्रकाशनाचे ज्येष्ठ लेखक, नामवंत साहित्यिक, समीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे नुकतेच निधन झाले.
साकेत प्रकाशनाच्या सुरुवातीच्या वाटचालीत ते अतिशय आपुलकीने आणि खंबीरपणे साकेत प्रकाशनासोबत होते. १९८५ मध्ये साकेत प्रकाशनातर्फे त्यांचा “उलट चालिला प्रवाह” हा कथासंग्रह प्रकाशित झाला.
मराठी ग्रामीण साहित्यात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
मराठी साहित्यामध्ये आणि महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्याला सतत प्रेरणा देत राहील.
साकेत प्रकाशनातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पुलवणूक - पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे विशेष प्रदर्शन
पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं, बहुरंगी व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्राचे सांस्कृतिक दैवत म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. साहित्य, संगीत, नाट्य, सिनेमा अशा चौफेर मुशाफिरी असणार्या व्यासंगी पु.लं.नी साहित्य आणि रंगभूमीला भरभरून दिलं. विनोद, ललित, नाटकं, एकांकिका, व्यक्तिचित्रं, विडंबन, प्रवासवर्णन अशा चौफेर लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यसंपदा अधिकच समृद्ध केली. अशा या चतुरस्र लेखकाचा 103 वा जन्मदिवस साकेत बुक वर्ल्ड आणि दैनिक भास्कर समूहाच्या 94.3 माय एफएमतर्फे आपण साजरा करतोय.
त्यांच्या जन्मदिनानिमित्त 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीदरम्यान पु.लं.च्या साहित्यावरील विशेष ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी व गीतकार दासू वैद्य यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. या ग्रंथप्रदर्शनात पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांबरोबरच त्यांचे विचार प्रिंट केलेले टी शर्ट आणि फ्रीज मॅग्नेट असे आकर्षक साहित्यदेखील उपलब्ध
आहे.
पुलवणूक - पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे विशेष प्रदर्शन
पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं, बहुरंगी व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्राचे सांस्कृतिक दैवत म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. साहित्य, संगीत, नाट्य, सिनेमा अशा चौफेर मुशाफिरी असणार्या व्यासंगी पु.लं.नी साहित्य आणि रंगभूमीला भरभरून दिलं. विनोद, ललित, नाटकं, एकांकिका, व्यक्तिचित्रं, विडंबन, प्रवासवर्णन अशा चौफेर लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यसंपदा अधिकच समृद्ध केली. अशा या चतुरस्र लेखकाचा 103 वा जन्मदिवस साकेत बुक वर्ल्ड आणि दैनिक भास्कर समूहाच्या 94.3 माय एफएमतर्फे आपण साजरा करतोय.
त्यांच्या जन्मदिनानिमित्त 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीदरम्यान पु.लं.च्या साहित्यावरील विशेष ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी व गीतकार दासू वैद्य यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. या ग्रंथप्रदर्शनात पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांबरोबरच त्यांचे विचार प्रिंट केलेले टी शर्ट आणि फ्रीज मॅग्नेट असे आकर्षक साहित्यदेखील उपलब्ध
आहे.
पु.ल. देशपांडे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 4.00 वाजता ‘पुलवणूक’ या विशेष ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन.
दर्जेदार दिवाळी अंकांमधील लेखनाचा
आस्वाद घ्या आणि साजरी करा
अक्षरदिवाळी.
२०२२ चे सर्व दिवाळी अंक ‘साकेत बुकवर्ल्ड’मध्ये उपलब्ध
महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे नवीन प्रकाशन....
📗📓📙📘📕
Maharaja Sayajirao and Dr. Babasaheb Ambedkar (English) -Baba Bhand
-Transleted By- Gayatri Pagdi
"By sending Babasaheb Ambedkar to the USA for higher education on a scholarship, Sayajirao Gaekwad became the solid force that shaped the life of Babasaheb who, as the leader of the depressed classes, led a social revolution from the front. The Maharaja made an exception in Dr Ambedkar's case and waived off the conditions of the scholarships for B.A., M.A. and Ph.D. He was also the first ruler of a princely state that gave free education to children of the backward classes. At 35, he was already a scholar of Buddhism with a deep understanding of its philosophy The Maharaja had passed orders to build a separate bungalow in Baroda for Dr Ambedkar. The reformist Hindu Code Bill, for which Dr Ambedkar later resigned from Jawaharlal Nehru's cabinet, was already passed in Baroda in 1905. In 1909, the Maharaja wrote an essay titled ' The Depressed Classes ' . It went on to lay the foundation for Dr Ambedkar's ' Annihilation of Caste ', an extremely significant document. In 1950, Dr. Ambedkar expressed his wish to write a biography of Maharaja Sayajirao. This book is a small effort to trace the history of association between two of the greatest visionaries of modern India. The hope behind it is to encourage an understanding and study of the two by the younger generations and modern researchers. "
" I have gone through the copy of Maharaja Sayajirao Gaekwad And Dr Babasaheb Ambedkar '. I got to know many things which are new. I look forward to reading your other books too. "
- Prof. Sukhdeo Thorat "
" You're doing an incredible work with Sayajirao Gaekwad. Dr. Ambedkar's unfulfilled aspiration to write a biography of the Maharaja seems to be coming true. Shout out if I can be of any help. Well done ! "
- Suraj Yengde.
https://www.amazon.in/dp/B0B9YC6W7K?ref=myi_title_dp
आज ‘अक्षरनामा’मध्ये
‘सिद्धार्थ’सारख्या तात्त्विक समस्येला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कादंबऱ्या एका वाचनात संपत नाहीत आणि समजतसुद्धा नाहीत. पण शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली ही कादंबरी आजही खिळवून ठेवते! - प्रा. अविनाश कोल्हे
https://www.aksharnama.com/client/article_detail/6256
‘सिद्धार्थ’सारख्या कलाकृती सुबुद्ध वाचकांसमोर असंख्य प्रश्न उभे करतात. अशा प्रश्नांना गणितात असतात, तशी उत्तरं नसतात. या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला स्वतंत्रपणे शोधावी लागतात. शिवाय या उत्तरांत याचं उत्तरं बरोबर आणि त्याचं चुकीचं, असं काहीही नसतं. अशा आशयसूत्रावर जेव्हा कादंबरी संपते, तेव्हा वाचक स्वतःमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो...
‘सिद्धार्थ’सारख्या तात्त्विक समस्येला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कादंबऱ्या एका वाचनात ‘सिद्धार्थ’सारख्या कलाकृती सुबुद्ध वाचकांसमोर असंख्य प्रश्न उभे करतात. अशा प्रश्नांना गणितात अ
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
साकेत बुकवर्ल्डमध्ये 'आझादी का अमृतमहोत्सव' साजरा...
साकेत बुकवर्ल्ड या वाचकांच्या आवडत्या ग्रंथदालनात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुप्रसिद्ध उद्योजक सुनील किर्दक आणि उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या शुभहस्ते उपस्थित वाचकप्रेमी नागरिकांना तिरंगी ध्वजांचे वाटप संपन्न.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या पुस्तकाचा परिचय आजच्या सकाळ (सप्तरंग)मध्ये नक्की वाचा.
धन्यवाद सकाळ समूह🙏🏻🙏🏻
सामना उत्सव - 24-7-2022
प्रथितयश लेखकद्वयी अच्युत गोडबोले आणि डाॅ. वैदेही लिमये लिखित सूक्ष्मजीवांच्या उत्क्रांतीपासून ते कोव्हिडपर्यंतचा चित्तथरारक इतिहास आणि विज्ञान - 'सूक्ष्मजंतू'
समीक्षक डाॅ. जगन्नाथ सातव हे मुंबई येथील रेडिएशन बायोलाॅजी - बायोकेमिस्ट्री डिव्हिजन भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर चे निवृत्त सायंटिफिक ऑफिसर आहेत.
जनसेवेचा वसा घेतलेले नायक अण्णा हजारे यांना 84 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
काळोख्या रात्री अथांग सागरावर प्रकाशाच्या रूपाने दिशादर्शन करणार्या दीपस्तंभासारखे तेजाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. अण्णा हजारे.
‘मैं अकेला चलता गया, लोग जुडते गये, कारवाँ बनता गया.’ या उक्तीप्रमाणे अण्णा हजारे यांनी कोणाची साथ मिळण्याची वाट न पाहता भ्रष्टाचाराचा अंधार दूर करण्यासाठी हाती मशाल घेऊन ‘असतो मा सद्गमय। तमसो मा जोतिर्गमय॥’ म्हणत पुढे सरसावले.
‘एक वयोवृद्ध, सरासरीपेक्षाही कमी उंचीचा माणूस आभाळाइतका उंच होऊन विराट रूप धारण करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.’
वॉरन बफे म्हणजे कायद्याचा आदर करून घवघवीत यश मिळवणारे महान उद्योजक: सीए विवेक अभ्यंकर
वॉरन बफे यांच्यावरील दोन पुस्तकांचे प्रकाशन
जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे त्यांच्यावर आधारित ‘गुंतवणूकसम्राट वॉरन बफे’ हे चरित्र आणि ‘वॉरन बफे यांचे गुंतवणूक मंत्र’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा 20 एप्रिल 2022 रोजी बुधवारी नामवंत सीए विवेक अभ्यंकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. ‘वॉरन बफे हे कायद्याचा आदर करून घवघवीत यश मिळवणारे महान उद्योजक असून त्यांचे चरित्र आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी माहिती देणारी ही पुस्तके सर्वांनी वाचली पाहिजेत’ असे प्रतिपादन त्यांंनी केले.
‘वॉरन बफे यांचे उद्योगसंपन्न आयुष्य व जगभरातील गुंतवणूकदारांना त्यांनी केलेले मार्गदर्शन यांविषयीची पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित होणे ही काळाची गरज आहे.’ असेही ते पुढे म्हणाले. याप्रसंगी व्यासपीठावर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. आ. सतीश चव्हाण, डीआयईएमएस संस्थेचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, पुणे येथील प्रख्यात उद्योजक आणि लेखक डॉ. सुधीर राशिंगकर आणि साकेत प्रकाशनाचे संस्थापक श्री. बाबा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती.
साकेत प्रकाशन आणि देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज (डीआयईएमएस) बुक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना मा. आ. सतीश चव्हाण म्हणाले, ‘वाचकांना उपयुक्त ठरतील अशा वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित करणे हे साकेत प्रकाशनाचे अभिनंदनीय कार्य असून आपल्या नव्या पिढीने या पुस्तकांतून प्रेरणा घेतली पाहिजे. औरंंगाबाद येथील बाबा भांड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ही संस्था चालवून आज महाराष्ट्रातील प्रथितयश प्रकाशन संस्था म्हणून नावारूपाला आणले आहे.’
यावेळी डॉ. उल्हास शिऊरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘पुस्तक वाचन हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असून सर्व विद्यार्थ्यांनी वाचनाआधारे स्वत:मध्ये सुधारणा करत राहणे आवश्यक आहे.’
या प्रसंगी डॉ. सुधीर राशिंगकर यांच्या ‘तुमचे भवितव्य तुमच्या हाती - शून्यातून विश्व निर्माण करून जगद्विख्यात ठरलेल्या कंपन्यांच्या यशोगाथा’ या विषयावरील विशेष व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानादरम्यान जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध विविध कंपन्यांची प्रेरणादायी उदाहरणे देत उपस्थित तरुणाईला मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘जगातील मोठमोठ्या कंपन्यांची वाटचाल ही त्या त्या व्यक्तींच्या महत्त्वाकांक्षेतून झाली आहे. आपल्या क्षेत्रात काम करताना प्रत्येकाने नाविन्यपूर्ण, दर्जेदार काम करण्याचे ध्येय ठेवले तर तुम्हीही महान उद्योजक होऊ शकाल. मॅकडोनल्ड, डॉमिनोज, वॉलमार्ट या परदेशी कंपन्यांबरोबरच त्यांनी चितळे, पु. ना. गाडगीळ अशा स्वदेशी कंपन्यांची देखील उदाहरणे देत व्याख्यानाचा विषय खुलवला.’
साकेत प्रकाशनाच्या सौ. प्रतिमा साकेत भांड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. श्री. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभारप्रदर्शन साक्षी जहागीरदार हिने केले.
यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, निमंत्रित लेखक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रसिद्ध लेखक आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳
मेहता पब्लिशिंग हाऊस या मराठी भाषेतील अग्रगण्य प्रकाशन संस्थेचे संचालक सुनील मेहता यांचे आज दुःखद निधन झाले.
प्रकाशक म्हणून सातत्याने मराठी वाचकांची अभिरुची जपलेल्या मेहता सरांनी पुस्तकांच्या क्षेत्रात नेहमीच अभिनव प्रयोग केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तमोत्तम जागतिक लेखकांची पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित करण्याचे काम तर त्यांनी केलेच, पण त्याचबरोबर विविध भारतीय प्रादेशिक भाषांमधील नामवंत लेखकांच्या दर्जेदार कलाकृतीही त्यांनी मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्या. राज्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन आणि 'मेहता मराठी ग्रंथजगत' या त्यांच्या इनहाऊस मॅगझीनचे नियमितपणे प्रकाशन यांसारख्या विविध कल्पक मार्गांसह त्यांनी मराठी वाचकवर्गाला पुस्तकांच्या जगाकडे आकर्षित केले. प्रकाशन क्षेत्रात कालानुरूप होणारे बदल लक्षात घेऊन नेहमी त्याप्रमाणे काम केलेल्या मेहता सरांनी नवीन तंत्रज्ञानाचाही स्वीकार करत वाचकांना प्रकाशन संस्थेशी जोडून घेतले.
अलीकडेच नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी पुस्तक प्रदर्शनाच्या स्टॉलबरोबरच 'लेखक तुमच्या भेटीला'सारख्या विविध साहित्यविषयक उपक्रमांच्या आयोजनासाठी स्वतंत्र स्टॉलची व्यवस्था केली होती. या प्रयोगावरून वाचकांप्रति त्यांना असलेला जिव्हाळा लक्षात येऊ शकेल.
अनेक नवनव्या संकल्पना रुजवत मराठी प्रकाशन क्षेत्राला नवे आयाम देणाऱ्या सुनील मेहता सरांच्या निधनामुळे प्रकाशनजगतामध्ये कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. साकेत प्रकाशनातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐💐
जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ।
तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।
असंख्य अनाथ बालकांची माय असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण आदरांजली
यंदाचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ गेल्या दशकभरात नावारुपाला आलेल्या तीन तरुण लेखकांना जाहीर करण्यात आला आहे. कथाकार किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतरणाची डायरी’ या दीर्घ कथासंग्रहास मुख्य पुरस्कार, लेखक प्रणव सखदेव यांच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीला अकादमीचा युवा पुरस्कार आणि संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीला बालसाहित्यासाठीचा अकादमी पुरस्कार जाहीर झाला.
नवी दिल्ली येथे 30 डिसेंबर 2021 रोजी अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांनी हे पुरस्कार जाहीर केले.
याविषयी आपले मत मांडतांना किरण गुरव म्हणाले की, ‘‘या सन्मानाने खेड्यातील लिहित्या हातांना उर्जा मिळेल.’’ तर ‘‘नव्या लिहित्या पिढीकडे इतरांचेही लक्ष जाईल,’’ असे प्रणव सखदेव म्हणाले. संजय वाघ यांच्या मते, ‘‘मुलांना प्रेरणा देणार्या कादंबरीचा हा सन्मान आहे.’’
पुरस्कारविजेत्या नवीन पिढीतील तरुण साहित्यिकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
रसिक वाचकांनो...
येताय ना...?
औरंगाबाद या आपल्या सांस्कृतिक शहरामध्ये...
साकेत बुकवर्ल्ड या आपल्या आवडत्या ग्रंथदालनात...
पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या १०२ व्या जन्मदिनानिमित्त...
Myfm आणि saket bookworld आयोजित
पुलवणूक हे विशेष ग्रंथ प्रदर्शन...
फुल टू हसवणूक करणारी, आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारी पु.लं.ची बहुरंगी पुस्तकं विशेष सवलतीत खरेदी करण्याबरोबरच आपलं 'पु.ल.प्रेम' जपणारे p**a ani mandali यांनी डिझाईन केलेले आकर्षक टीशर्ट्स आणि मॅग्नेट्स आपलेसे करण्यासाठी नक्की भेट द्या...
पत्ता आपला नेहमीचाच...
साकेत बुकवर्ल्ड, श्रीहरी साफल्य, बलवंत वाचनालयाशेजारी, औरंगपुरा, औरंगाबाद ४३१ ००५
अधिक माहितीसाठी : ८८८८८६४२२९
नक्की भेट द्या खरेदी करा आणि निर्भेळ हास्य मनापासून अनुभवा फक्त पु.ल.देशपांडे यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री Saket Book World Aurangpura Aurangabad
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Bhanusaheb Kabra Marg
Aurangabad
431001
Opening Hours
Monday | 10:30am - 9:30pm |
Tuesday | 10:30am - 9:30pm |
Wednesday | 10:30am - 9:30pm |
Thursday | 10:30am - 9:30pm |
Friday | 10:30am - 9:30pm |
Saturday | 10:30am - 9:30pm |
Sunday | 10:30am - 9:30pm |
Shop No 4, Akhtar Plaza, Opp Seema Clinic Azam Colony, Roshan Gate
Aurangabad, 431001
All your favourite Medical books at your reach!
MGM Road
Aurangabad, 431003
Kriti Kon - a corner for creation. Most visited store for dance necessities, books, fabric, artworks
Shop No 5-6-7-8 Janta Bazar, S B College Road, Aurangpura
Aurangabad, 431001
Wholesalers for Books and Stationery Deals in State Government School Books, And various other educ
Vill-pathakbigha, P. O-pachaukhar, P. S-deo, Dist-aurangabad
Aurangabad, 824202
होम डिलेवेरी सर्विस हमारे यहा आपको कि
# 1-23-100, Rohila Gali
Aurangabad, 431001
We are dealer for Darussalam Publishers Saudi Arabia & Many other international publisers for Marath
Aurangpura Road, India
Aurangabad
All Types Of Books Available and All Language Books Publisher