Global kids world English School Vitawa
Best Education World's.....!
*तेजस्विनी गव्हाणे पाटील शैक्षणिक सेवाभावी संस्था द्वारा संचलित ग्लोबल किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल व कल्पतरू विद्यालयाची यशस्वी झेप*.
ग्लोबल किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल च्या माध्यमातून उच्च दर्जाचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण परिसरातील विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणारी शाळा म्हणून नावारूपास आलेली आपली शाळा.
या शाळेने पालकांची गरज लक्षात घेऊन सेमी माध्यमाचे आणखी एक युनिट *कल्पतरू विद्यालयाच्या* नावाने सुरु केले. शून्यातून विश्व निर्माण व्हावे तसे ही शाळा देखील निर्माण झाली. या शाळेने मागील तीन वर्षांपासून इयत्ता 10 वी च्या विदयार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत यश प्राप्त करून देण्यासाठी अविरत असे प्रयत्न केले आहेत. त्याचे फलीत म्हणजे या *तीनही वर्षात बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल देऊन इयत्ता 10 वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले*.
विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे *बाहेरचे ट्युशन न घेता* हे विद्यार्थी आम्ही आपल्या शाळेतच अतिशय प्रामाणिक पद्धतीने तयार केले. व विदयार्थ्यांनी देखील आम्हाला *सकारात्मक प्रतिसाद* दिला.
सेंटरवर कोणत्याही प्रकारची सेटिंग लावून किंवा चीटिंग करून जास्त टक्के घेण्यापेक्षा स्व *मेहनतीने व इमानदारीने* घेतलेले मार्क जास्त आनंद देतात ही बाब आम्ही विदयार्थ्यांच्या लक्षात आणून दिली. व त्यांनी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करून परीक्षा दिली व चांगले मार्क देखील मिळवले.
महागडी फीस भरून बाहेरचे ट्युशन घ्यायचे आणि *पालकांना पैशाचा जास्त भुर्दंड* द्यायचा या पेक्षा आमच्या विदयार्थ्यांनी शाळेला प्रथम प्राधान्य दिले आणि वर्षभर शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनातून चांगले यश प्राप्त केले. या बहुमोल यशासाठी *इयत्ता 10 वीच्या विदयार्थ्यांचे* खूप खूप अभिनंदन.
आपल्या कल्पतरू विद्यालयातून इयत्ता *10 वीच्या तीन बॅच 100 टक्के पास होऊन बाहेर पडल्या*. याचा संचालक या नात्याने मला अतिशय आनंद होत आहे. भविष्यात देखील 100 टक्के निकाल देऊन *उच्च गुणवत्ता असलेले विद्यार्थी घडविणे हाच शाळेचा प्रामाणिक हेतू असणार आहे*.
संचालक
विजय रामराव गव्हाणे पाटील
ईटावा ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर
Academic Year 2023-24 felicitation ceremony for meritorious students in second semester examination...
Congratulations 🎉👏 All Students.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विदयार्थ्यांनी आई सावित्री च्या जीवनावर आधारित मनोगते व्यक्त केली तसेच विद्यार्थीनींनी वेशभूषा साकारून भारतातील महान नारी शक्तीच्या कार्याचा गौरव केला. या वेळी गावातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली.
New Year Celebration 🎉🎉🥳🎈
Happy New Year 2024.
दहीहंडी उत्सव 2023
ग्लोबल किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल तसेच कल्पतरू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दहीहंडीचा उत्सव अगदी उत्साहात साजरा करण्यात आला.
15-August -2023.
Happy Independence Day.
आज शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव 2023 -2024 हा सोहळा साजरा करण्यात आला . यात विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना प्रवेश देण्यात आला तसेच विदयार्थ्यांना खाऊ वाटप सुद्धा करण्यात आला.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने ग्लोबल किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल तसेच कल्पतरू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विटावा येथे 14 एप्रिल रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विदयार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम प्रात्याक्षिकाने गावातील वातावरण अगदी मंत्रमुग्ध झाले होते.
- शैक्षणिक वर्ष 2022-23 -
द्वितीय सत्र परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Telephone
Website
Address
Aurangabad
431136
Opening Hours
Monday | 9am - 5pm |
Tuesday | 9am - 5pm |
Wednesday | 9am - 5pm |
Thursday | 9am - 5pm |
Friday | 9am - 5pm |
Saturday | 9am - 5pm |
Aurangabad, 431001
Educational Leadership and Guidance
Osmanpura
Aurangabad, 431005
Employability Skills and Soft Skills Training institute
Aurangabad
This is an educational page to help the learnars those who are facing problems in English language a
Aurangabad, 431001
�Knowledge,Knowledge Hoti Hai� �doesn't matter which field you have� � if you want to increase your technical knowledge� �then follow this page� https://instagram.com/asliengineer...
Belly Road Patna
Aurangabad, 824143
हमारे Page Tips study पर क्लास 5th से 12th तक की सभी subject की तैयारी NCERT Book से कराई जाती है!