Dhiraj Telang

Dhiraj Telang

महा. राज्य सदस्य
गडचिरोली जिल्हानिरी?

15/04/2022

"कुछ बनना है तो समुंदर बनो.....
लोगों के पसीने सूकने चाहिए तुम्हारी औकात .......
नापते नापते"

Photos from Dhiraj Telang's post 14/04/2022

सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या मागणीला यश
सर्व विद्याशाखांना महाराष्ट्रात संविधानाची तोंडओळख हा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक वर्षापासून अनिवार्य केला आहे .तशी घोषणा शिक्षण मंत्री ऊदय सामंन्त यांनी केली आहे.सम्यक सम्यक विद्यार्थी आंदोलनाची ही सातत्याने मागणी होती.२०१८ च्या अधिवेशनात तसा ठराव ही केला होता.डॅा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांत हा कोर्स सुरू आहे.तो आता महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांत शिकविला जाईल.
ठराव क्र.१०१ पान नं४३ पहा ,मागणी

14/04/2022

विश्वरत्न, विश्वभुषन, इतिहासकार, ग्रंथप्रेमी,संविधान निर्मिता, युगपुरूष, महान घटनाकार, भारतीय राज्य घटनेचे शिलूपकार भारतरत्न ,महामानव बोधिसत्व परमपुज्य भिमराव रामजी आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त त्यांना,

🙏💐विनम्र अभिवादन💐🙏

व सर्व भारतीयांना, माझ्या मिञ- मैञीनींना, 131 व्या भिम जयंतिनिमित्त खुप खुप शुभेच्छा..💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🙏🇷🇴क्रांतिकारी जय भिम🇷🇴🙏
🥀नमो बुध्दाय🥀

13/04/2022

💐💐💐भावपूर्ण आदरांजली💐💐💐

11/04/2022

राष्ट्रपिता, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीच्या सर्व बहुजनांना हार्दिक शुभेच्छा

09/04/2022

प्रियदर्शी राजा , चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा...!

भारताच्या इतिहासात एकच असा 'एकमेव' म्हणण्यासारखा कालखंड आहे, जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

SVA Maharashtra (सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य) 04/04/2022

प्रिय मित्रांनो,
सप्रेम जय भीम

सम्यक विद्यार्थी आंदोलन निःशुल्क सदस्य नोंदणी अभियानात आपण सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवला आहे. आपल्याला या सदस्य नोंदणी अभियानात भरघोस असा राज्यात तसेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचं अनुषंगाने शाळा कॉलेजांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे सदस्य नोंदणी गुगल फॉर्म भरण्याची मुदत *२७ एप्रिल २०२२* पर्यंत वाढविण्यात आली आहे.या दरम्यान महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये सदस्य नोंदणी साठी वापरत आहोत.
मला आपणा सर्वांचा सक्रिय सहभाग नोंदवल्याचा अभिमान वाटत आहे. तुमचा संयम, तुमची निडरता, संघटने प्रतीची निष्ठा, प्रेम व आपुलकी याचे मला कौतुक आहे. आपणा सर्वांचे प्रेम आणि निष्ठा याचा प्रत्यय हा सदस्य नोंदणी फॉर्म भरताना यावा.आपण सर्वजण या मोहिमेचे स्वागत कराल आणि साक्षीदार व्हाल,अशी अपेक्षा बाळगतो.

जयंतीच्या कार्यक्रमात आपण जास्तीत जास्त सम्यक विद्यार्थी आंदोलन निःशुल्क सदस्य नोंदणी करावी.

https://forms.gle/Rji9zNAAwLHDj4HT7

आपला,
महेश भारतीय, धिरज तेलंग
प्रदेशाध्यक्ष. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष
सम्यक विद्यार्थी आंदोलन
संपर्क: 9545249565

SVA Maharashtra (सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य) Member Contact Information विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना.

03/04/2022

साहस और शौर्य के प्रतीक, परम वीर, महान योद्धा, दूरदर्शी श्रेष्ठ रणनीतिकार व कुशल प्रशासक, मराठा साम्राज्य के संस्थापक
# #छत्रपति_शिवाजी_महाराज जी की #स्मृतीदिवस पर उन्हें #विनम्र_अभिवाद

02/04/2022

झुलेलाल जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा
धिरज तेलंग
सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर

02/04/2022

गुढी पाडवा आणि मराठी नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
धिरज तेलंग
सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर

02/04/2022

चांद सा रोशन हो रमजान आपका
इबाद से भरा हो रोजा आपका
हर नमाज हो कुबूल आपकी
बस ये दुआ हैं खुदा से हमारी।

समस्त भारतीय जनतेस रमजान मुबारक!

#रमजान

01/04/2022

#1एप्रिल

१ एप्रिल या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या 'The problem of Rupee" या ग्रंथाचा आधार घेऊन १ एप्रिल १९३५ साली "RESERVE BANK OF INDIA" स्थापन झाली. त्यामुळे १ एप्रिलला नविन आर्थिक वर्षाची सूरूवात होते.



सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर
१ एप्रिल २०२२

31/03/2022

सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर
आज दिनांक ३१/०३/२०२२ रोजी सायंकाळी 5 वाजता
समाज कल्याण विभाग अधिकारी चंद्रपूर मा. अमोल यावलिकर सर यांच्या शी सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष मा. धिरज तेलंग यांनी भेट घेतली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयावर आणि विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप संदर्भात सुध्दा चर्चा करण्यात आली.
त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थांची जी रेगुलर स्कॉरलशिप मागील 3 वर्षांपासून रखडलेली आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधर योजना ची सुद्धा स्कॉलरशिप अजुन पर्यंत विद्यार्थांना च्या खात्यात जमा झालेली नाही या संदर्भात सुध्दा चर्चा करण्यात आली. त्या वेळी मा. अमोल यावलीकर सर यांनी सांगितले की, ज्या ज्या कॉलेज चे विद्यार्थी आहेत त्या कॉलेज चे नाव सांगा काय अडचणी आहेत ते बघतो.
आणि मी स्वधार योजनेची निधी बँकेत पाठवलेली आहे.
एप्रिल च्या 15 ते 20 तारखे पर्यंत निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होईल.

29/03/2022
Photos from Dhiraj Telang's post 28/03/2022

आज दिनांक २८ मार्च २०२२ रोजी
सम्यक विध्यार्थी आंदोलन जिवती तालुक्यातील समस्या घेऊन पोहचले जिल्हाअधिकारी कार्यालयात !
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू ! सम्यकचे जिल्हा अध्यक्ष धीरज तेलंग यांचा इशारा !

ग्रामीण तालुका म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुका हा निर्मिती पासून ग्रामीणच राहिला आहे. आजपर्यंत तालुक्यात मूलभूत सुविधांची पूर्तता झाली नाही . फक्त निवडणुकांपुरतीच तालुक्याची आठवण राजकीय नेत्यांकडून केली जाते.
सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग यांच्या नेतृत्वात सदर निवेदन मा.जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांना निवेदनातूनया तालुक्यातील लोकांची गैरसोय होत असल्याबद्दल कलेक्टर आणि जिल्हा नियोजन मंडळाला सूचना देऊन बजेटमध्ये तरतूद करावी असे सांगण्यात आले, त्यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष इंजि. मा.भूषण फूसे यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यात नेटवर्क चा खूप प्रॉब्लेम असतो त्यामुळे तिथे टॉवरची निर्मिती करण्यात यावी. तसेच तालुक्यातील रुग्णालय हे फक्त टोल नाक्याप्रमाणे झाले आहे .फक्त रुग्णाचा वेळ वाया जातो कोणत्याही सुविधा नाहीत. रुग्णांना योग्य सुविधा देण्यात. तेथील तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे नाहीत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतीचे पट्टे द्यावे. विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नोकरीवर लागलेल्या तेथील स्थानिक लोकांना जात पळतळणी चे सर्टिफिकेट निघण्यासाठी खूप मोठी समस्या होत असते त्या करिता आपण उपाययोजना करावी.
रस्त्याची दुरावस्था मोठा प्रश्न आहे, त्याचे निराकरण करावे. विध्यार्थ्यांन साठी वाचनालये नाहीत त्याची निर्मिती करण्यात यावे व शासकीय वसतिगृह नाहीत तालुक्यातील वसतिगृहे उभे करण्यात यावे. तालुक्या त येण्या जाण्या साठी बसेस नाही ते टाइम वर सोडण्यात यावे आणि बस्थनाके सुद्धा नाही ती सुद्धा उभारण्यात यावे.
पिण्याच्या पाण्याचा टाकी आहे, परंतु त्या टाकीत पाणीच नाही.वापरण्याचा पाणी ची सुद्धा नाही, स्थानिक पातळीवर लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.त्याचे निराकरण करण्यात यावे. तिथे न्यायालय (कोर्ट) नाही त्याची सुद्धा उभारणी करण्यात यावे.
शिक्षण व्यवस्थेचे योग्य सोय नाही ( एकाच वर्गात 1 पासून ते 9 पर्यंत शिक्षण दिले जातात) त्यावर उपाययोजना करावी. शेतीसाठी लागणारा पाणी नसल्यामुळे पावसावर अवलंबून राहावं लागतं, तिथे तलाव तयार करण्यात यावे.
जिवती तालुक्यात रोजगार नाही त तेथील स्थानिक लोकांना रोजगार निर्माण करावा.
विजेचा तुटवडा खूप मोठा प्रश्न स्थानिक लोकांना भेडसावत असतो. पावसाळ्यात 5 ते 6 दिवस विजेचा पुरवठा बंद असतो त्याची 24 तास लाभ घ्यावा. तेथील युवकांसाठी व्यायाम शाळा, खेळण्याचे ग्राउंड नाही. त्यामुळे तिथला युवक जिल्हा पातळीवर जाऊन शहराच्या ठिकाणी पैसा खर्च करून त्याचा लाभ घेतो. तो तिथेच त्याच्या साठी व्यायाम शाळा आणि खेळण्याचे ग्राउंड उभारावे अश्या एकूण 15 मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे नागराज कांबळे, प्रशिक खांडेकर, क्षितिज इंगळे, राजू हरगीले, आकाश ससाणे, नम्रता सावंत, ऍड.क्षितिज मेंढे, प्रणाली जिवने, निकिता कांबळे, पूजा कोटनाके, प्रतीक्षा चौधरी, प्रदीप गोतावळे, शुद्धोधन बनसोडे, भिमराज बागेसर इत्यादी सम्यकचे पदाधिकारी व विधार्थी यांची उपस्थिती होती.

27/03/2022

सम्यक विद्यार्थी आंदोलन, चंद्रपूर

जिवती तालुक्यातील लोकांची गैरसोय होत आहे. जिवती मधील लोकांच्या अनेक समस्या घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलन, चंद्रपूर तर्फे मा. जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
तरी सर्व सम्यक विद्यार्थी आंदोलन, च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित रहावे. ही विनंती
दि.:- 28/3/2022 रोजी सकाळी
वेळ:- 11:00 वाजता

आपला
धिरज तेलंग
सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर

24/03/2022

ना कभी थके पैर,
ना कभी हिम्मत हारी,
जज्बा है परिवर्तन का इसलिए सफर है जारी..

21/03/2022

Suhas khamkar with me

20/03/2022

सामाजिक क्रांतीचा एल्गार म्हणजेच चवदार तळे सत्याग्रह

माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठीचा सत्याग्रह आजच्याच दिवशी समतेसाठी, मानवी हक्कासाठी, स्वाभिमानासाठी, समान अधिकारांसाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला होता. महाड चवदार तळे सत्याग्रह निमित्त क्रांतीकारी जय भीम..!

Photos from Dhiraj Telang's post 19/03/2022

आज दिनांक १९/०३/२०२२ रोजी
Golden King Gym visit by Suhas khamkar
चंद्रपूर मध्ये सर्वात पाहिले सुहास खामकर सर यांनी गोल्डन किंग जिम दिली भेट.
India first pro card holder, Mr. Olympia, Mr world, Mr Asia 2X
Mr. India 10X Maharashtra Shri 8.

15/03/2022

१० विच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सम्यक सदिच्छा
💐💐💐

11/03/2022

पाहुनी शौर्य तुज पुढे
मृत्यूही नतमस्तक झाला.
स्वराज्याच्या मातीसाठी
माझा शंभूराजा अमर झाला.
छ. संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन!

10/03/2022

प्रखर विरोध झुगारून
स्त्री शिक्षणाची बीजे रोवली, वाढविली
ज्यांनी स्त्रीजन्माला अर्थ दिला
अशा आद्यशिक्षिका
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!!💐🙏🏻

27/02/2022

मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा

27/02/2022

विनम्र अभिवादन

23/02/2022

नमन

18/02/2022

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏

17/02/2022

आज वस्ताद लहुजी साळवे स्मृतीदिन.म. फुले आणि सावित्रीबाई फुले यान्ना शिक्षणासाठी मदत करणरे. अस्पृश्यची मुले शाळेत दाखल करण्यास मदत केली सावित्रीबाई यांना मनुवादी रस्त्यावर त्रास देत असत महनून सावित्रीबाई चे अंगरक्षक बनून धीर देनारे. मुक्ता साळवे या प्रगल्भ बुद्धिच्या मुलीला शाळेत घालणारे. पुण्यातील नामवंताना, कुस्ती, दांडपट्टा शिकविनारे. अस्पृश्य समाजातील तरुणांना व्यायम चे महत्व पटून देऊन धीटपणा निर्माण करणारे लहुजी साळवे याना कोटी कोटी प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

16/02/2022

श्री. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा..,,💐💐💐💐

15/02/2022

जोपर्यंत आपण असा समाज निर्माण करत नाही की जिथे सर्वांना नोकरी, शिक्षण मिळेल तोपर्यंत कुठल्याही समुहांच्या(बहुजनांपैकी) समस्यांचे समाधान होऊ शकणार नाही, ही भांडवलशाही व्यवस्था बदलणे हे सर्वांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी संख्येने मोठ्या असलेल्या मराठा समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. परंतु याविषयी कोणीही बोलण्यास तयार नाही; कारण व्यवस्था परिवर्तन करणे हे कष्टाचे काम आहे.

आपल्याला मानवतावादी, समतावादी, लोकाभिमुख असलेली सामाजिक, आर्थिक व्यवस्था निर्माण करावी लागेल. केवळ नफेखोरीसाठी जगणाऱ्या आणि चालणाऱ्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपले कोणतेही प्रश्न सुटनार नाहीत. त्यामुळे मराठांसहीत सर्व बहुजन समाजाने व्यवस्था बदल करण्यासाठी चळवळ केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत आणि नवी व्यवस्था निर्माण केली पाहिजे.

- मा. पी. बी. सावंत सर
(निवृत्त न्यायाधीश, सुप्रिम कोर्ट)

Photos from Dhiraj Telang's post 14/02/2022

सम्यक विध्यार्थी आंदोलनातर्फे जिवती येथे भव्य स्कॉलरशिप बचाव परिषद !

दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोजी जिवती येथील गोंडवाना कॉलेज येथे सम्यक विध्यार्थी आंदोलनामार्फत स्कॉलरशिप बचाव परिषदेचे आयोजन केले होते .
जिवती तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण तालुका म्हणून ओळखला जातो .या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या खूप समस्या निर्माण झाल्या आहेत .
शासनाने कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरु केली मात्र तालुक्यात ग्रामीण भागात नेटवर्क नसल्यामुळे विध्यार्थी शिकूच शकत नाहीत .

आज विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप दोन तीन वर्षांपासून रोखली आहे. बसेस बंद असल्यामुळे विध्यार्थ्यांना येण्या जाण्यास खूप त्रास होत आहे .जातीच्या प्रमाणपत्रासाठी खूप जाचक अटी ठेवल्या आहेत .यामुळे सामान्य विध्यार्थी त्रासले आहेत .
खाजगी शिक्षण संस्थानी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट चालवली आहे . व विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप अडवण्यात येत आहे ती वाचवणियासाठी
सम्यक विध्यार्थी आंदोलन जिवती यांच्या वतीने स्कॉलरशिप बचाव हक्क परिषद घेण्यात आली .

या परिषेदेला मुख्य मार्गदर्शक धीरज भाऊ तेलंग (जिल्हा अध्यक्ष सम्यक विध्यार्थी आंदोलन चंद्रपूर ) यांनी विध्यार्थ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला .प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले
भूषण फुसे साहेब (जिल्हा अध्यक्ष वंचित चंद्रपूर )
यांनी विद्याथ्यांच्या प्रत्येक अडचणीत सहकार्य करण्याची हमी दिली .
जिवतीतील विध्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आपण प्रसंगी जिल्हा अधिकाऱ्याला घेराव घालू ,टॉवर साठी मंत्रालयात निवेदन देऊ अशी ग्वाही दिली .
तसेच स्वागताध्यक्ष सोमाजी गोंडाणे सर यांनी सुद्धा विध्यार्थ्यांच्या प्रश्नावर सम्यक विध्यार्थी आंदोलनाने काम करावे असे आव्हान केले .
परिषेदेला तालुक्यातील शेकडो विधार्थी व पालक उपस्थित होते .अनेक मान्यवरांनि मनोगत व्यक्त करून शासनाच्या शिक्षण धोरणावर टीका केली .
परिषेदेला मार्गदर्शक म्हनुन उपस्थित असलेले
प्रा .बालाजी मोरे सर यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणीसाठी उपाययोजना सुचविल्या .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश जोंधळे सर यांनी भूषविले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुद्धोधन निखाडे यांनी केले .
तर संचालन निधार्थ जिवाने यांनी केले तर आभार शुद्धोधन बनसोडे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली ...

परिषद यशस्वीतेसाठी दशरत गायकवाड ,अमोल कांबळे ,प्रेमकांत कांबळे ,गणेश मेकाले ,सुनिल पैठणे ,अमर लहवराळे ,राजरत्न कांबळे ,अक्षय वाघवसे , संभाजी ढगे ,राहुल सोनकांबळे ,किशोर कांबळे , आकाश ससाणे ,प्रवीण कांबळे यांनी मेहनत घेतली .

13/02/2022

Sva जिवती
Sva चंद्रपूर
Sva महाराष्ट्र

31/01/2022

Happy Birthday Sir

27/01/2022

💐विनम्र अभिवादन💐

15/01/2022

Happy Birthday sujat dada

Want your public figure to be the top-listed Public Figure in Chandrapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Category

Telephone

Address


Nagpur
Chandrapur
442401