MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे

आमदार - इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ

04/12/2023

भारतीय नौसेनेच्या शौर्याची साक्ष देणारा दिवस भारतीय नौदल दिन.
आजच्या 'भारतीय नौदल दिनानिमित्त नौदलातील अधिकारी आणि जवानांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

03/12/2023

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची पुन्हा एकदा विजयी घोडदौड..!
सर्व मतदारांचे मनापासून आभार!

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 03/12/2023

माझ्या पाठपुराव्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत हुपरी साठी २ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला व या निधीतून प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मार्ग मोकळा होणार आहे. त्या कामाचा शुभारंभ माझ्या व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. निधी मंजूर करून आणल्याबद्दल समस्त हुपरीवासियांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मि त्यांचा आभारी आहे.

या शुभारंभप्रसंगी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, हुपरी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष आण्णासाहेब शेंडूरे, क.आ.ज. साखर कारखान्याचे संचालक आण्णासो गोटखिंडे, माजी उपनगराध्यक्ष सुरज बेडगे, माजी नगरसेवक मनोहर सुतार, माजी नगरसेवक सुभाष ससे, माजी नगरसेवक अमय जाधव, माजी नगरसेवक प्रताप देसाई, ताराराणी पक्ष जिल्हा युवा अध्यक्ष वैभव हिरवे ( मामा ), योगेश कळंत्रे, पट्टणकडोली ताराराणी शहराध्यक्ष रुपेश पाटील, हातकणंगले तालुका ताराराणी पक्ष उपाध्यक्ष शुभम पाटील, प्रतापसिंह मेटे, ताराराणी पन्हाळा तालुका अध्यक्ष अशोक पाटील, भरत वाळवेकर,अक्षय पोवार, प्रभारी सरपंच बाळासाहेब रणदिवे, के.ई.टी.पी चे संचालक बाळासाहेब माने, प्रकाश जाधव, राजू चिटणीस, उदय पाटील, नेताजी निकम, अमर माने, प्रकाश देशपांडे, जयकुमार माळगे, प्रवीण पाटील, जयपाल गिरी, ओंकार माळी, कल्पेश कापशे, विशाल चव्हाण, राजू पाटील, राजू पटेल, सुतार वकील आदी मान्यवर व ताराराणी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 03/12/2023

मराठा आरक्षण विधानसभेत मांडणार - आमदार प्रकाशआण्णा आवाडे

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 02/12/2023

एक मराठा लाख मराठा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजास आरक्षण मिळवण्यासाठी कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या साखळी उपोषणास भेट देवून जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी कोल्हापूर मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, विजय देवणे व मराठा बांधव उपस्थित होते.
#मराठाआरक्षण

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 02/12/2023

शाहूजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे निवडणूक शाखा, कोल्हापूर आयोजित मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मा. विभागीय आयुक्त, पुणे तथा मतदार यादी निरिक्षक सौरभ राव यांचे अध्यक्षतेखाली व माझ्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली.

या बैठकी प्रसंगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी मोसमी बर्डे चौगुले, उपविभागीय अधिकारी, पन्हाळा समीर शिंगटे, उपविभागीय अधिकारी, करवीर हरिष धार्मिक, उपविभागीय अधिकारी राधानगरी सुशांत बनसोडे, उपविभागीय अधिकारी, भूदरगड वसुंधरा बारवे, उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह सर्व तहसिलदार, विभागीय अधिकारी व कोल्हापूर जिल्यातील शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 02/12/2023

एक मराठा लाख मराठा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजास आरक्षण मिळवण्यासाठी कबनूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या साखळी उपोषणास भेट देवून जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते व मराठा बांधव उपस्थित होते.

#मराठाआरक्षण

02/12/2023

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डाजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा !

28/11/2023

महात्मा जोतिबा फुले यांनी ज्ञानाचा मार्ग दाखवत बहुजन समाजाला परिवर्तनाची दिशा दाखवली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समता आणि एकतेचा पाया रचला. स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं महान कार्य करणारे सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

27/11/2023

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थ सहाय्य
इचलकरंजीचे सागर पटेकरी यांना हार्ट सर्जरी उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये
उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञपूर्व आभार व्यक्त केले.

यावेळी चंद्रशेखर शहा, राहुल घाट उपस्थित होते.

27/11/2023

विश्वामध्ये शांती, प्रेम व बंधुभावाचा संदेश देणारे, शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. सर्व शीख बांधवांना गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

26/11/2023

26/11मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा क्रौर्याचा कळस होता.अनेक निरापराध नागरीकांचा यात बळी गेला.भारतीयांच्या अस्मितेवर झालेला प्रहार होता.हा हल्ला परतवून लावताना पोलीसांसह सुरक्षा दलाच्या जवानांनी अतुलनिय शौर्य दाखविले.या सर्वांचे कृतज्ञ स्मरण व त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

26/11/2023

भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांनी मिळून बनलेले आहे. या सर्व मूल्यांचे पालन करून भारतीय संविधानाचा सन्मान करूया, लोकशाही अधिक मजबूत बनवूया. भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 25/11/2023

देशाचे उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी निमित्त यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज, कलावंत मळा, इचलकरंजी येथे संस्थेचे अध्यक्ष सहकारमहर्षि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या समवेत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे , डी.के.टी.ई संचालक डॉ. राहुल आवाडे, संस्थेचे खजिनदार प्रकाश दत्तवाडे, संचालक स्वानंद कुलकर्णी, संचालक राजू कुडचे, संचालक सर्जेराव पाटील, प्रा. अभिजित कोथळे (सर), बी.ए. टारे (सर), यांच्यासह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 25/11/2023

इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार यांच्या जयंतीनिमित्त डीकेटीई, राजवाडा येथे संस्थेचे अध्यक्ष सहकारमहर्षि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, हस्ते फोटो पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे वहिनी, डी.के.टी.ई संचालक डॉ. राहुल आवाडे, संस्थेचे खजिनदार प्रकाश दत्तवाडे, संचालक स्वानंद कुलकर्णी, संचालक राजू कुडचे, संचालक सर्जेराव पाटील, शैलेश गोरे, प्र.संचालिका प्रा डॉ एल एस आडमुठे यांच्यासह विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 25/11/2023

देशाचे उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी निमित्त ताराराणी पक्ष कार्यालय येथे सहकारमहर्षि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या समवेत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, चंद्रकांत इंगवले, शेखर शहा, राजू कुडचे, उर्मिला गायकवाड, नरसिंह पारीख, रमेश पाटील, श्रीशैल बिल्लूर, , विजय कोराणे, वसंत येटाळे, बंडोपंत लाड, सुरेश कोल्हापुरे, श्रीकांत टेके, नौशाद जावळे, संजय आरेकर, राजेंद्र बचाटे, सर्जेराव हळदकर, बंडोपंत जोग, बाळासो हळदकर, राजू दरिबे, चंद्रकांत पाटील, मुकुंद पोवार, सुखदेव माळकरी, दत्तात्रय कुंभोजे, प्रकाश लोखंडे, महादेव पाटील, चंद्रकांत लांडगे, सर्जेराव पाटील, मुरारजी देसाई, राजू देसाई, लियाकत गोल दान, शिवानंद पाटील, अनिल बम्मन्नावर, विजय गिरमल, राजेंद्र आरेकर, मौला मुजावर, अनिल शिकलगार, शैलेश गोरे, विजय पाटील, दत्तात्रय कसलकर, राजगोंडा पाटील, सुभाष बलवान, फईम पाथरवट, राजाराम बोंगार्डे, संग्राम सटाने, बापुसो घुले,शशिकांत नेजे, मंगला सुर्वे, सपना भिसे, रजनी शिंदे, सीमा कमते, सुवर्णा लाड, अंजुम मुल्ला, हौसाबाई खामकर इत्यादी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

25/11/2023

माझ्या विशेष प्रयत्नातून श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे आधुनिकी करणासाठी २ कोटी आणि वाहनतळ काँक्रिटीकरणासाठी ४ कोटी १८ लाख अशा ६ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणल्या बद्दल श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे.

यावेळी आगार वेवस्थापक (वरिष्ठ) सागर पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सुहास चव्हाण, सौरभ जाधव, आनंदा दोपारे व कर्मचारी उपस्थित होते.

25/11/2023

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज पुण्यतिथी. त्यांचे कर्तृत्व व कार्यक्षम कारभार महाराष्ट्राला दिशादर्शक ठरला. सर्वसामान्याविषयी अखंड आत्मियता बाळगणाऱ्या त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाला यानिमित्ताने विनम्र अभिवादन!

24/11/2023

श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानक सुशोभीकरणासाठी 6.18 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्यशासनाचे आभार!

24/11/2023

दिवस उजाडला तुळशी विवाहाचा
आनंदाचा आणि मांगल्याचा
तुळशी विवाह समारंभ निमीत्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!!!

23/11/2023

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि।।
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी।
पाहिली शोधुनि अवघी तीर्थे।।
कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
जय जय राम कृष्ण हरी!

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 19/11/2023

छठ पूजा हा सूर्यदेवाला समर्पित सण आहे, जो दिवाळीनंतर सात दिवसांनी साजरा केला जातो. हा देह आणि आत्माशुद्धता, सत्य, अहिंसा, क्षमा आणि करुणा यांचा उत्सव आहे.
या सणाच्या निमित्ताने राजर्षि शाहु पूर्वोत्तर भारतीय संघाच्यावतीने मावळत्यासूर्याची विधीवत पद्धतीने पूजा करून उत्तर भारतीय बांधवांनी पंचगंगानदीघाटावर छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. या पुजास्थळी माझ्या समवेत इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे यांनी भेट देऊन उत्तर भारतीयांना शुभेच्छा दिल्या व गेल्या वर्षी नदीकाठी सुर्यदेवाचे मंदिर उभारण्याची ग्वाही दिली होती.
मंदिर उभारून वचनपूर्ती केली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक मदन कारंडे, शिवजी गिरी, नंदकिशोर प्रसाद, प्रकाश पांडे, सत्येंद्र भगत, संजीव यादव, शिवसागर केसवानी, दिपक शहा, निरंजन मिश्रा, रमेश आरबोळे (जगवाले), विनायक आरबोळे, श्रीकांत टेके ताराराणी पक्ष महिला आघाडी यांच्यासह उत्तर भारतीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 19/11/2023

आमचे नेते सहकारमहर्षी कै. दत्ताजीराव कदम यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने डिकेटीई राजवाडा येथे संस्थेचे अध्यक्ष सहकारमहर्षी माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे दादा यांच्या समवेत सहकारमहर्षी कै. दत्ताजीराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या संचालक स्वानंद कुलकर्णी, संचालक सर्जेराव पाटील, संचालक प्रा. चंद्रशेखर शहा, प्राचार्य सौ. एल. एस.आडमुठे यांच्यासह विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

19/11/2023

माजी खासदार सहकार महर्षी कै. दत्ताजीराव कदम आण्णा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

15/11/2023

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,

आई नंतर आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी दुसरी व्यक्ती म्हणजे बहिण, बहीण-भावाच्या या पवित्र नात्याला उजाळा देणारा सण म्हणजे भाऊबीज यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#भाऊबीज

14/11/2023

नवं स्वपन,ध्येय,क्षितिजे घेऊन येवो दिपावलीचे तेजोमय पर्व
सुख-समृद्धी,आनंद,यशाने उजळून निघावा तुमचा जीवनाचा मार्ग

दिपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.. !

#पाडवा #बळीप्रतिपदा #दिपावली

13/11/2023

इचलकरंजी येथील योगेश बुचडे (मुंबई पोलीस), वैभव खापरखंडे (पुणे पोलीस), अक्षय जाधव (मुंबई पोलीस), श्रीयेश्री कवठेकर (अमरावती पोलीस), शुभम जाधव (MSF ठाणे सिटी), पल्लवी वाजंत्री (MSF मुंबई सिटी) यांची महाराष्ट्र पोलीस विविध पदांवर निवड झाल्याबद्दल या खेळाडूंचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रशिक्षक विनोद वाघमोरे व नितीन वाघमोरे हे उपस्थित होते.

12/11/2023

आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृध्दी, यश आणि 'किर्ती प्राप्त होवो, हीच महाक्ष्मी चरणी प्रार्थना..

दिवाळी व लक्ष्मीपूजन निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!

11/11/2023
10/11/2023

#धनत्रयोदशी
आश्विन कृष्ण त्रयोदशी

यमराजाने आपल्या दूतांना ‘या दिवशी जो दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही’, असे सांगितल्याची कथा आहे, म्हणून या दिवशी मंगलस्नान करून यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावतात, तसेच, आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्मही याच दिवशी झाल्याची कथा आहे.

सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

09/11/2023

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.
#वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!🎊🎉💐

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 05/11/2023

इचलकरंजी येथील पंचगंगा नदी घाट येथे बांधण्यात आलेल्या सुर्यनारायण मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा माझ्या व पत्नी सौ. किशोरी आवाडे यांच्या हस्ते होम व पूजन करण्यात आले. तसेच मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. यावेळी आयोजित केलेल्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा हातकणंगले पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, इचलकरंजी विधानसभा प्रमुख अरविंद शर्मा, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दतवाडे, बाळासाहेब कलागते, रमेश आरबोळे (जगवाले), विलास गाताडे, राहुल गाट, नरसिंह पारीख, संजय केंगार, श्रेणिक मगदूम, राजेंद्र बचाटे, विनायक आरबोळे छठ पूजा युवा शक्ति समिति अध्यक्ष शिवजी गिरी, श्रीकांत टेके,सचिव खलीफा महतो, इंजिनियर राजेश कुंदगोळकर, उपाध्यक्ष नंदकिशोर प्रसाद, गोखले गुरुजी, पेटकर गुरुजी, सर्जेराव हळदकर,संजीव यादव, बड़े लाल यादव, शंभू सिंह, निरंजन मिश्रा, रमेश सिंह, राजेंद्र सिंह, शिवसागर केसरवानी, कोमल केसरवानी, दीपक शाह, सोनू गिरी, सागर कम्मे, उदयगिरि यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

05/11/2023

आपल्या अभिनयाने रंगभूमी समृद्ध करणारे सर्व रंगकर्मी, कलाकार, तंत्रज्ञ आणि सर्व रसिक-प्रेक्षकांना मराठी रंगभूमी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 04/11/2023

केंद्रीय पर्यटन विकास मंत्री भारत सरकार मा. ना. श्रीपाद नाईक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले व जिल्ह्यतील पर्यटन स्थळांच्या विकासाबाबत चर्चा केली.

31/10/2023

🚩एक मराठा लाख मराठा🚩
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविनेसाठी आवश्यकतेनुसार विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एकमताने निर्णय घ्यावा व या प्रश्नाची सोडवणूक करावी, ही नम्र विनंती राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली.

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 29/10/2023

ताराराणी पक्ष महिला आघाडी यांच्या वतीने इचलकरंजी येथे कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत भव्य दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमास महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. यावेळी उत्कृष्ट डान्स, उत्कृष्ट वेशभूषा अशा अनेक बक्षिसे माझ्या हस्ते देण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्षा सौ किशोरी आवाडे, सौ मोश्मी आवाडे , ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे व महिला अध्यक्षा उर्मिला गायकवाड ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 28/10/2023

महेश सेवा समिती इचलकरंजी येथे कोल्हापुर जिल्हा माहेश्वरी सभा आयोजित श्री दगडुलाल मर्दा सीएसआर यांच्या सौजन्याने मोफत तपासणी चे विनामुल्य आरोग्य शिबिर माझ्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माहेश्वरी समाज नितीन धुत, आखिल भारतीय मारवाडी युवा मंच अध्यक्ष सुरेंद्र भट्टड, प्रोजेक्ट चेअरमन राधेश्याम भूतड़ा, जिला सचिव लालचंद गट्टाणी, डॉ.मर्दा, लक्ष्मीकांत मर्दा, श्यामसुदंर मर्दा, नंदकिशोर भूतडा, डॉ.कित्तुरे, आनंद बांगड, विनित तोष्णीवाल, नंदकिशोर भूतडा, तसेच सौ.पुष्पा काबरा, निलम भराडिया, शांतीकिशोर मंत्री, चंदनमल मंत्री, मुकेश खाबाणी, मनमोहन कासट, मुकेश खाबानी, अलायन्स हॉस्पिटल मदन गोरे, डॉ. एस.पी मर्दा, डॉ.कृष्णा धुत, डॉ. भंडारे, डॉ. श्रीधर जाधव, उपस्थित होते.

28/10/2023

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि वैभवाचा क्षण ! कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आज चंद्राची शीतलता, साखरेचा गोडवा आणि सुख-समृद्धीचं वरदान प्रत्येकाच्या आयुष्यात यावं, हीच शुभेच्छा !

26/10/2023

श्री संत बाळमामा यांच्या जन्मोत्सव निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा..!
#संत #बाळूमामा
#जन्म

Photos from MLA Prakash Awade -प्रकाश आवाडे's post 24/10/2023

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहरचा ३१ व्या ऊस गाळप हंगामाकरीता मोळी पूजन संपन्न.

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या ३१ व्या ऊस गाळप हंगामाकरीता विजयादशमीच्या शुभदिनी काटा व गव्हाण पूजन कारखान्याचे केन कमिटी चेअरमन डॉ. राहूल आवाडे व सौ मोश्मी आवाडे तसेच व्हा चेअरमन श्री. बाबासो चौगुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय श्री. कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या अमृतहस्ते मोळी पूजन करून गाळप हंगामाचा मुहुर्त करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन श्री. उत्तम आवाडे, पत्नी सौ. किशोरी आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन श्री. स्वप्निल आवाडे, सौ वैशाली आवाडे, कारखान्याचे माजी संचालक जे. जे. पाटील, जयपाल उगारे, कुबेर कमते, फैय्याज बागवान, धनंजय मगदूम, रावसाहेब मुरचिट्टे आणि संचालक सर्वश्री आण्णासो गोटखिंडे, आदगोंडा पाटील, सुकुमार किणींगे, अभयकुमार काश्मिरे, सूरज बेडगे, शितल आमण्णावर, संजयकुमार कोथळी, सुमेरु पाटील, जिनगोंडा पाटील, सौ. कमल पाटील, सौ. वंदना कुंभोजे आणि शिवाजी पुजारी, कृष्णात पुजारी, विलास पाटील, अनिल वडगांवे, सचिन केस्ते, कार्यकारी संचालक श्री. मनोहर जोशी व सर्व अधिकारी आणि हितचिंतक उपस्थित होते.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Ichalkaranji?
Click here to claim your Sponsored Listing.

नाते विश्वासाचे,उद्दिष्ठ विकासाचे ....!


  • विकासाबरोबर राजकारणात माणुसकी जपून समाजसेवा करण्यासाठी राजकारण हे एक माध्यम आहे,हीच माजी खासदार माझे वडिल कल्लाप्पांण्णाआवाडे (दादा) यांची शिकवण सोबत घेऊन, नुसते राजकारण न करता राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालून सामान्य माणसाचा विकास कसा साधता येईल हे ध्येय ठेऊन राजकारण करत आहे. राजकारण... हे माझ्या दृष्टीने आपल्या भागात, आपल्या लोकांत, आपल्या समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे एक माध्यम आहे. माझ्या जीवनात मी अनेक गोष्टी मिळवल्या मात्र राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून एक यशस्वी, सकारात्मक परिवर्तन मला माझ्या परिसरासाठी, मतदारसंघासाठी,प्रभागासाठी, नागरिकांसाठी घडवायचे आहे. माझी इच्छा आहे की एक असा विकासात्मक, व्हिजनरी मतदारसंघ करून दाखवायचा कि ज्याचा आदर्श सारा महाराष्ट्र घेईल....
  • Videos (show all)

    माझ्या पाठपुराव्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत हुपरी साठी मंजूर झालेल्या २ कोटी २४ लाख रुपयांचा कामांचा शुभारंभ. #h...
    पंचगंगा नदी घाट येथील छटपूजा सोहळा 2023..#ichalkaranji #ichalkaranji_life #ichalkaranji_manchester_city #ichalkaranji_ig...
    आवाडे यांच्या घरी खरडा भाकर घेऊन आलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आवाडेनी स्वागत केले. तसेच खरडा भाकर खाल्ल...
    इचलकरंजी येथील पंचगंगा नदी घाट येथे बांधण्यात आलेल्या सुर्यनारायण मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा....
    इचलकरंजीचा पाणी प्रक्ष आणि माझी भूमिका या प्रश्नावर भव्य सभा...#ichlkaranji #इचलकरंजी
    इचलकरंजीचा पाणी प्रक्ष आणि माझी भूमिका या प्रश्नावर भव्य सभा...#ichlkaranji #इचलकरंजी
    इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी (IGM) ला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.यावेळी रुग्णांनी IGM मध्ये चांगले आरोग्...
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कितीही अडथळे आले तरी के. एल मलाबादे चौक इचलकरंजी येथे बसवणार- आमदार प्रकाशआण्ण...
    विद्युत खांब आणि त्यावरुन टाकलेल्या विद्युत तारांमुळे गणेशोत्सव काळात वीज पुरवठा आणि विसर्जन मिरवणूकीत होणारा अडथळा दूर ...
    इचलकरंजीच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या कृष्णा पाईपलाईन गळती संदर्भात शिरढोणवासियांची भेट घेऊन पाईपलाईन...
    .

    Category

    Telephone

    Address


    Awade Nager
    Ichalkaranji
    416115

    Other Politicians in Ichalkaranji (show all)
    Ranjana Ughada Ranjana Ughada
    Shahapur
    Ichalkaranji, 421601

    मा. जि. प. सदस्या

    Santosh Baburao Shelake Santosh Baburao Shelake
    13/364, Kulkarni Mala, Sambhaji Chowk
    Ichalkaranji, 416115

    EX. CORPORATER : ICHALKARANJI MUNCIPLE CORPORATION, ICHALAKARANJI.

    Vishal Pachhapure MNS Vishal Pachhapure MNS
    Ichalkaranji, 416115

    अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना इचलकरंजी राजसाहेब ठाकरे समर्थक कट्टर हिंदुत्ववादी

    Prakash Patil Takawadekar प्रकाश पाटील टाकवडेकर Prakash Patil Takawadekar प्रकाश पाटील टाकवडेकर
    पाटील गल्ली , A/P/टाकवडे , तालुका/शिरोळ , जिल्हा/कोल्हापूर , पिनकोड/४१६१२१
    Ichalkaranji, 416121

    अध्यक्ष, शिरोळ तालुका संजय गांधी निरा?

    londhe_ashutosh londhe_ashutosh
    Ichalkaranji, 416115

    मनसे शहर उपाध्यक्ष मा. अशुतोष लोंढे

    मनसेमित्र मनसेमित्र
    Old Agra Road
    Ichalkaranji, 421601

    जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घड़वायचा आहे...

    amarjit_jadhav amarjit_jadhav
    Zenda Chowck
    Ichalkaranji, KOLHAPUR

    माणसं जोडणारा माणूस

    Santosh Waghela - संतोष वाघेला Santosh Waghela - संतोष वाघेला
    Korochi
    Ichalkaranji, 416109

    सदैव जनतेसाठी

    Nihal Kalawant NCP Nihal Kalawant NCP
    3/34 Kalawant Galli , Takvade Ves Gav Bhag Ichalkaranji Ta-hatkangale Dist-kolhapur
    Ichalkaranji, 416115

    जिल्हाअध्यक्ष (ग्रामीण)- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा कोल्हापूर

    Madan Karande - मदन कारंडे Madan Karande - मदन कारंडे
    Ichalkaranji, 416115

    प्रांतिक सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस

    Aamhi Ichalkaranjikar - आम्ही इचलकरंजीकर Aamhi Ichalkaranjikar - आम्ही इचलकरंजीकर
    Ichalkaranji, 416115

    Ichalkaranji is a city in Kolhapur district in the Indian state of Maharashtra. It is governed by a

    Ravindra Mane - रविंद्र माने Ravindra Mane - रविंद्र माने
    Ichalkaranji

    जिल्हाअध्यक्ष , बाळासाहेबांची शिवसेना, कोल्हापूर जिल्हा.