PVEAK Association
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PVEAK Association, Editor, B. G16, Starling Towers, Gavat Mandai, Shahupuri, Kolhapur.
अभिनंदन...!!
अभिनंदन...!!
अभिनंदन...!!
फोटोग्राफर विडिओग्राफर अँड एडिटर्स असो. कोल्हापूरच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यामध्ये *श्री संतोष जकाते* यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच श्री प्रभात चौगुले यांची उपाध्यक्ष पदी, श्री विनायक कुचगावे यांची सचिव पदी, श्री युवराज राऊत यांची खजानिस पदी आणि श्री अभिषेक शिवदास यांची सोशल मीडिया कोऑर्डिनेटर पदी निवड झाली आहे. या सर्वांचे सर्व संचालक आणि सर्व सभासद यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन.🎉🎉🎉🎉🎉
आपले विनीत
*श्री संतोष जकाते - अध्यक्ष*
*श्री. प्रभात चौगुले - उपाध्यक्ष*
*श्री. विनायक कुचगावे - सचिव*
*श्री. युवराज राऊत - खजानिस*
*श्री. अभिषेक शिवदास - सोशल मीडिया कोऑर्डिनेटर*
श्री. अमर जाधव - संचालक
श्री. सुरेश मोरे - संचालक
श्री. सायलस मनपाडळेकर - संचालक
श्री. जगदीश गुरव - संचालक
गोडॉक्स पोट्रेट लाइटिंग वर्कशॉप
मेंटोर : सचिन भोर
स्पॉन्सर : किसन फोटो प्लाझा, अल्बम स्टेशन
आयोजक : PVEAK असोसिएशन
10 ऑगस्ट रोजी "गोडॉक्स पोट्रेट लाइटिंग वर्कशॉप" मध्ये सहभागी झालेल्या सर्व फोटोग्राफर्स बंधूंचे PVEAK असोसिएशन च्या वतीने हार्दिक आभार !
PVEAK मार्फत योग शिबिर...
प्रसिद्ध योग तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्या शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाखाली संघटनेचे सदस्य असलेल्या फोटोग्राफर, विडियोग्राफर आणि एडिटर यांनी या शिबिराचा लाभ घेत आहेत. 5 दिवस चालणाऱ्या या शिबिरात धकाधकीच्या जीवनात शरीराचे तसेच मनाचे आरोग्य ठीक राहण्यासाठी कोणती आसने करायला हवी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.
असोसिएशन आपल्या सभासदांच्या हितासाठी सदैव कार्यरत असते. या शिबिराचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे...
Yog Shibir Day 1
PVEAK - Yog Shibir 2023
Yog Shibir Day 1
YOG SHIBIR 2023
Photoshop Workshop 2022
Association took very useful step to educate the professionals.It was a great experience spending a whole day with Intellectual and well known Mentor Mr.Kushal Soni sir. We are also thankful to Mr.Nilesh Raskar sir for arranging this wonderful session for us. We are also thanking to Shri Redekar sir to make available the beautiful venue 'Pais' for this workshop. And also for the delicious food ofcourse.
Gratitides towards the all association members / nonmembers who joined this workshop with huge participation. We are glad that many women professionals also joined the session, which is very good sign for this field.
And last but not the least, all directors took tremendous effort to make succesful this event.
In future the association is willing to arrange the same workshops to create skilled entrepreneurs in the profession.
Thanks
PVEAK
*PVEAK* आयोजित
*Creative*
*Adobe Photoshop*
*Workshop*
*फोटोग्राफर,व्हिडीओग्राफर अँन्ड एडिटर्स असोसिएशन कोल्हापूर.*
प्रीमिअर प्रो वर्कशॉप नंतर घेऊन आलो आहोत *क्रिएटिव्ह फोटोशॉप वर्कशॉप..!!!!*
मार्गदर्शक - *श्री.कुशल सोनी*
पिक्सलेरा इंडियाचे भारतातील Adobe Photoshop चे सुप्रसिद्ध प्रशिक्षक.
फोटोशॉप CC 2022 मध्ये अल्बम डिजाइनिंगचे असे तंत्र दाखवले जाईल ज्यामुळे आपण केवळ 2 ते 3 मिनिटांमध्ये High क्वालिटी Pixel आउटपुट सहित अन्य कोणत्या सॉफ्टवेयरच्या मदतीशिवाय फक्त Adobe photoshop CC 2022 मध्येच सोप्या पद्धतीने करू शकाल।_
◆ तुम्ही सिंगल क्लिक्स मध्ये कठीण परिस्थिती मधील कलर्स पण ठीक करु शकाल।
◆ तुम्ही कोणत्याही फोटोला क्षणार्धात सहज enhance कराल |
◆ या क्लास नंतर तुम्हाला आयुष्यभर कलर करेक्शन चे रहस्य लक्षात राहील |
◆ करेक्शन पासून अल्बम डिजाइन पर्यत सगळं काही 2 मिनिटाच्या आत शक्य होईल |
◆ आणि बरेच काही ज्याच्या माहिती शिवाय आपण अपडेट होऊ शकणार नाही |
तारीख :*28 सप्टेंबर, 2022*
वेळ :*सकाळी 10 ते 6 वा*
एक वेळ चहा व जेवण
*नोंदणी शुल्क: रु.700/-फक्त*
*संघटनेचे सभासदांसाठी रू.500/-*
*ग्रुप डिस्काउंट दिला जाईल*
आत्ताच आपली सीट फायनल करा!
*सीट बुक करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर*
नोंदणी व माहितीसाठी संपर्क :
*विनायक - 9890687544*
Adobe Premiere Pro Editing Workshop 2022.
खूपच सुंदर चांगल्या प्रतिसादामध्ये प्रीमियर प्रो एडिटिंग वर्कशॉप पार पडले. यामध्ये सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते, आणि किरीट प्रजापती सर यांचे खूपच सुंदर मार्गदर्शन लाभले धन्यवाद सर. 🙏
दि. १९/०८/२०२२
फोटोग्राफी-व्हिडीओग्राफीला उद्योगाचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करू,
खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही
प्रत्येकाच्या जीवनातील आठवणी चिरंतन करणार्या फोटोग्राफर आणि व्हीडीओग्राफर यांच्याकडं प्रशासनाचं कायम दुर्लक्ष झाले आहे. मात्र आता असोसिएशनच्या माध्यमातून हे व्यवसायिक संघटीतरित्या आवाज उठवतायत ही चांगली सुरवात आहे. फोटोग्राफी आणि व्हीडीओग्राफीला उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापुरात फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर ऍन्ड एडिटर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कोल्हापुरातील छायाचित्रकार आणि व्हिडीओग्राफर यांच्याशी संबंधीत घटकांची शिखर संस्था असलेल्या पी.व्ही.ई.ए.के. या संघटनेचा वर्धापनदिन आणि जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जगदिश गुरव असोसिएशनच्या उपक्रमांबाबत माहिती दिली. संघटनेच्यावतीने सभासदांना व्यवसायासाठी सर्व प्रकारची मदत केली जाते. कोरोना काळात सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेळेवर वैद्यकीय उपचार, बेड, इंजेक्शन मिळावेत, यासाठी संघटनेने प्रयत्न केले. तसेच संघटनेच्यावतीने सभासदांचा मोफत विमा उतरवण्यात आला. पूरबाधित झालेल्या फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी व्यावसायिकांना असेासिएशनने रोख मदत आणि प्रापंचित साहित्याचे वाटप केल्याचे गुरव यांनी सांगितले. उपाध्यक्ष अमर जाधव यांनी असोसिएशनच्या मागण्या मांडल्या. फोटोग्राफी आणि व्हीडीओग्राफीच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. असोसिएशनच्यावतीनं सप्टेंबर महिन्यात भरवण्यात येणार्या प्रदर्शनाच्या लोगोचे उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना काळात सर्व असंघटीत वर्गाला शासनाने मदत दिली. मात्र फोटोग्राफी व्यावसायिक त्यापासून वंचित राहीले. त्यामुळे या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करू, अशी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. यावेळी संघटनेचे सचिव सायलस मनपाडळेकर, सुरेश मोरे, संतोष जकाते, विनायक कुचगावे, प्रभात चौगले, युवराज राऊत, अभिषेक शिवदास, शंभू ओवुळकर, संतोष सुर्वे, रितेश आगेजा, कुमार सुतार, जयदीप मोरे यांच्यासह संचालक आणि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
Photo, Video, Editor contest.
Participate and win best award 🏆
Submission till 17th August 2022.
Award ceremony at 19th August 2022.
Photo submission -
ABHISHEK SHIVDAS : 8550966813.
Video submission -
AMAR JADHAV : 9890490311
First time in Kolhapur.
PHOTO, VIDEO EXPO 2022
फोटोग्राफी अणि वीडियोग्राफी व्यावसायिकांच्या हितासाठी नेहमीच कार्यरत असणारी संघटना म्हणजेच फोटोग्राफर विडिओग्राफर अँड एडिटर असोसिएशन कोल्हापूर ही संघटना. आजवर सभासदांसाठी संघटनेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. नुकताच भारतीय पोस्ट खात्याकडून रुपये 399/- मध्ये रू. 10 लाखाचा अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा सभासदांना अणि व्यावसायिक यांना फायदा मिळावा या हेतूने संघटनेमार्फत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.मा.राहुलजी चिकोडे, जिल्हाध्यक्ष, भाजपा, कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले. भारतीय पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मेळाव्यात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घेतली. यावेळी सभासदांसह त्यांच्या कुटुंबियांचाही विमा उतरविण्यात आला. सदर कार्यक्रम कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, बाबा जरग नगर येथे संपन्न झाला. यावेळी मा. राहुल चिकोडे, संघटनेचे अध्यक्ष मा. जगदीश गुरव, उपाध्यक्ष मा. अमर जाधव, सचिव मा.सायलस मनपाडळेकर, खजानीस मा. सुरेश मोरे, संतोष जकाते, अभिषेक शिवदास, विनायक कुचगावे, प्रभात चौगले, युवराज राऊत, अमित शिंदे आदी संचालक अणि सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटोग्राफर व्हिडिओग्राफर नेहमीच दुसऱ्यांचे कौतुकाचे क्षण टीपण्याचे काम करत असतो.
पण आज त्यांच्याच पाल्यांच्या कौतुकाचा आणि सत्काराचा क्षण टिपण्याचा सोहळा संपन्न झाला. नुकताच १० वी आणि १२ वी च्या परीक्षांचे निकाल जाहीर झाला. यामधे असोसिएशन मधील सदस्यांच्या मुलांनी चांगले गुण मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी *फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर असोसिएशन कोल्हापूर कडून* आज दि.१ जुलै २०२२ रोजी सकाळी १० वाजता हॉटेल जोतिबा येथे सत्कार सोहळा आणि प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी *मा. राहुलजी चिकोडे, जिल्हाध्यक्ष, भाजपा आणि मा. जयदीप मोरे, सायबर तज्ञ उपस्थित होते.*
प्रास्ताविक असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. अमर जाधव यांनी केले.
असोसिएशनकडून राबंवलेले उपक्रम आणि भविष्यातील वाटचाल याबाबत त्यांनी माहिती दिली.
यावेळी मा राहुल चिकोडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
असोसिएशनचे अध्यक्ष श्री. जगदीश गुरव यांनी असोसिएशनची स्थापना आणि वाटचाल याबाबत माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात मा राहुल चिकोडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच संघटन का असावे याबाबत मार्गदर्शन केले आणि भविष्यात संघटनेच्या पाठीशी उभ राहू अशी ग्वाही दिली.
मा जयदीप मोरे यांनी फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांचे सोशल मीडिया आणि सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शन संचालक प्रभात चौगले यांनी केले.कार्यक्रमास असोसिशनचे सेक्रेटरी मा सायलस मनपाडळेकर तसेच संचालक मा अभिषेक शिवदास,विनायक कुचगावे,संतोष जकाते, युवराज राऊत,सुरेश मोरे आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
आज जागतिक फोटोग्राफी डे...
आज आपल्या *PVEAK* या असोसिएशनचा पहिला वर्धापनदिन...
कोरोनामुळे गेले वर्षभर एकत्र येण शक्य नव्हतं.पण आता कोरोनाच्या प्रभाव कमी झाला आहे.
मग ठरलं एक छोटा कार्यक्रम घ्यायचा आणि सगळे भेटायचं.पण बघता बघता नियोजन वाढत गेलं आणि विविध उपक्रम नियोजित करत करत साकार झाला *एक भव्यदिव्य समारंभ...*
अर्थात यामागे अपार कष्ट होते सर्व संचालकांचे आणि भक्कम साथ होती ती *आपण सर्व सदस्यांची.*
या कार्यक्रमात आलेले पाहुणे देखील भारावून गेले.हा कार्यक्रम करताना यातून आपल्या लोकांसाठी काहीतरी विधायक घडावे असा विचार पुढे आला.तो ही प्रश्न आपण सर्वांच्या सहकार्याने सुटला.आपल्यातील प्रत्येकाने हातभार लावला.
त्यामुळेच काही सदस्यांना आपण आर्थिक मदत करू शकलो.तर उपस्थित सर्वच सदस्यांना आपण मदत किट देऊ शकलो.
आपण यासाठी *मा.राजेशजी क्षीरसागर साहेब* यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत.
कारण त्यांनी फक्त एका फोनवर जवळपास लाखाची मदत किट्स आपल्याला कसलीही नोंद न करून घेता,कोणताही राजकीय हेतू न ठेवता आपल्याला दिलीत.
*त्यांचे अगदी मनापासून आभार.*
कार्यक्रमास आपल्या विनंतीस मान देऊन
*प्रेसक्लब चे अध्यक्ष मा.मोहनजी मेस्त्री,*
*डॉ संदीप पाटील सर,*
*सी पी आर चे बंटी सावंत,*
*प्रसादजी भालकर,*
*अभिजित सातपुतेजी,*
*प्रमोदजी सूर्यवंशी,*
यांचा आपण यथोचित सत्कार करून त्यांचा मदतीस उतराई होण्याचा प्रयत्न आपण केला.
अध्यक्षीय भाषणात डॉ संदीप पाटील यांनी तणावमुक्त आणि धकाधकीमध्ये सुद्धा स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे जपायचे याबद्दल अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
आपल्याला हा कार्यक्रम यशस्वी करायला अनेकांनी हातभार लावला.
यामध्ये
*सुभाष फोटोचे शंभू ओवूळकरजी,*
*अल्बम स्टेशनचे संतोषजी सुर्वे,*
*किशन फोटो चे आगेचा बंधू*
*सिद्धी फ्रेम्स* यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्री संजयजी शहापुरे, कोओर्डीनेटर जिल्हा एडीटर्स असोसिएशन तसेच श्री अजय उदासी, अमर एलईडी चे अजितदादा देसाई कार्यक्रमास प्रमुख उपस्थित होते.
सूत्रसंचालन बी न्यूज चे कार्यकारी संपादक *श्री.ताज मुल्लानिजी* यांनी केलं.
तसेच नेहमीच आपल्या असोसिएशनला साथ देणाऱ्या पियुष इव्हेंट्सच्या पियुष उभाळे यांचे फ्लॉवर डेकोरेशन
सादिक भाई भोजन यांचे मुळे
कार्यक्रम सुंदर बनला.
मान्यवरांचे मार्गदर्शन,लाभार्थी चे मनोगत, सत्कार,मानपत्र प्रदान,चेक वाटप,मदत किट वाटप असे भरगच्च कार्यक्रम आजचा आपला पहिला वर्धापनदिन अविस्मरणीय अनुभूती देऊन गेला...
आम्ही आजचा कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद देऊन यशस्वी केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आणि उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार मानतो..
संचालक मंडळ
जगदिश गुरव - अध्यक्ष
अमर जाधव - उपाध्यक्ष
सायलस मनपाडळेकर - सेक्रेटरी
सुरेश मोरे - खजाणीस
विनायक कुचगावे - संचालक
प्रभात चौगले - संचालक
संतोष जकाते - संचालक
अभिषेक शिवदास - संचालक
युवराज राऊत - संचालक
अमित शिंदे - संचालक
फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडीटर्स असोसिएशन कोल्हापूर
कळकळीचे आवाहन...
आपल्या असोसिएशनचे काही सदस्य आहेत ज्यांना पुराचा फटका बसला आहे.सध्या आलेल्या महापुरात त्यांच्या घरात पाणी घुसले आणि पूर्ण घरे पाण्याखाली गेले.
गेले जवळपास दीड वर्ष आपला व्यवसायही पूर्ण ठप्प आहे. त्यात हे अस्मानी संकट कोसळले आहे.
आधीच उत्पन्न बंद झाले आहे त्यात आता त्याला घर पुरात गेल्यामुळे निराश्रिता सारखं बाहेर रहावं लागत आहे.
या अश्या प्रसंगी आपण आपला व्यवसाय बंधू एक मित्र म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहावं असं वाटतं.
आम्ही *फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडीटर्स असोसिएशन* कडून कळकळीची विनंती करतो की आपण प्रत्येकाला जमेल तशी आर्थिक मदत करूयात.
आम्ही असोसिएशनचे खजाणीस सुरेश मोरे यांचा *गुगल पे नंबर* इथे देत आहोत.आपल्याला जेवढि शक्य आहे तेवढी मदत (अगदी 100 रुपयंपासून जेवढी जास्त शक्य असेल तसे) गुगल पे ला पाठवावेत.
आपले सहकारी खूप अडचणीत आहेत. त्यांना मदतीची खूप गरज आहे.असोसिएशनचे पदाधिकारी जे शक्य असेल ते करत आहे परंतु आपण प्रत्येकाने वैयक्तिक काही ना काही मदत करावी असे आवाहन करती आहोत...
सूचना:- पैसे ट्रान्स्फर केल्यानंतर त्याची रिसीट कृपया आपले *उपाध्यक्ष श्री अमर जाधव* यांच्या व्हाट्सएप ला शेयर करावी.
*सुरेश मोरे 7350855545*
*संचालक मंडळ, फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडीटर्स असोसिएशन कोल्हापूर.*
सभासदांच्या आणि फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर्स च्या हितासाठी नेहमी कार्यरत असणारी संघटना म्हणजे PVEAK... आता आणखी एक अत्यंत उपयुक्त आणि सर्वांसाठी गरजेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आपल्याला नेहमी लागणारी औषधे तब्बल 15% डिस्काउंट मध्ये आणि तीही मोफत घरपोच मिळु शकणार आहेत. यासाठी आपल्या असोसिएशनला श्री साईप्रसाद मेडिकल्स या प्रतिथयश फर्म कडून ही सेवा देण्यात येणार आहे. यासंबंधीचे सर्टिफिकेट श्री साईप्रसाद मेडिकल्सचे मालक श्री प्रसाद भालकर यांनी आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री अमरजी जाधव यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्री जगदीश गुरव, सचिव श्री सायलस मनपाडळेकर, खजाणीस श्री सुरेश मोरे, श्री प्रभात चौगुले, श्री विनायक कुचगावे, श्री अभिषेक शिवदास, श्री संतोष जकाते, श्री युवराज राऊत आदी उपस्थित होते.
या उपक्रमाचा सर्व सदस्यांनी फायदा घ्यावा असे संचालक मंडळातर्फे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क केल्यास सर्व ब्रँडेड औषधे 15% डिस्कोउंट सह मोफत घरपोच दिली जातील. भविष्यात सभासदांसाठी आणखी विविध उपक्रम राबवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत... संचालक मंडळ,
*फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशन, कोल्हापूर..*
वाजंत्री आणि फोटोग्राफर...
आज मी गडहिंग्लज मध्ये एका लग्नाच्या ऑर्डरीचे शूटिंग करत होतो. तसा आजचा लग्नाचा मुहूर्त सकाळी 9.45 चा होता. पार्टीने आम्हाला सकाळी 9 वाजताच हॉल वरती यायला सांगितले होते. आदल्या रात्री हळदीचा कार्यक्रम संपून जेवायला रात्रीचे 12 च वाजले होते. पार्टीने दिलेल्या एका खोलीवर झोपण्यासाठी हॉल पासून 6किमी अंतरावर मी व माझे मित्र सागर पवार, राहुल ससे(बंधू) गेलो. आदल्या दिवशी दिवसभर कोल्हापूर मध्ये बाबा जरागनागर मध्ये केलेली लग्नाची ऑर्डर, व तिथून कोल्हापूर ते गडहिंग्लज संध्याकाळच्या थंडीत केलेला 75किमी टू व्हिलर चा प्रवास त्यानंतर गडहिंग्लज मधील हळदीचा कार्यकम संपायला झालेला उशीर त्यात कडाक्याची थंडी वाटलं होतं एवढ्या थकव्याने लगेचच झोप लागेल. पण सागर च्या आणि राहुलच्या घोरण्याच्या आवाजाने झोपेचं पार खोबरं झालं.. त्यामुळे सकाळी उठावेसे च वाटत नव्हते पण करणार काय, लग्नाचा मुहूर्त सकाळीच लवकर असल्याने उठलो. हॉल वर 9 वाजताच पोहचलो. लग्नकार्य पार पडले, नंतर 11 वाजेपासून रिसेप्शन सुरू झाले. पै पाहुण्यांची वधूवरांसोबत आपले फोटो काढून घेण्यासाठी धडपड सुरू झाली. व आम्ही त्यांच्या आठवणींचा ठेवा जपण्यासाठी फोटो शूट करू लागलो. तसं रिसेप्शन 3 वाजेपर्यंत सुरू होत. व अचानकपणे आमच्या पाठीमागे वाजंत्री मंडळी येऊन उभे राहिले. तसे ते 10 ते 15 मिनिटे उभे राहिले पण आमच्या काही लक्षात आले नाही ते का उभे आहेत ?.. त्यातील एकजण मला हाताने खुणावत म्हणाला दादा आमचा पण एक फोटो घ्या.मी म्हटलं एवढे 5-7 ग्रुप होऊदेत मग मी तुमचा फोटो घेतो. फोटोसाठी पाहुण्यांचे ग्रुप संपायला 15 ते 20 मिनिटं लागली तरीसुद्धा ते चौघे जण वाजंत्री माझ्यामागे उभेच होते. अर्धा तासाने नवरदेवाचे वडील माझ्याजवळ आले व मला म्हटले दादा या वाजंत्री मंडळींचा फोटो अजून नवरा नवरी सोबत घेतला नाही?
मी त्यांना म्हटलं पाहुण्यांची गर्दी खूप आहे मी नंतर घेतो नक्की. अस म्हटल्यावर त्या नवरदेवाच्या वडिलांनी स्वतः स्टेज वरील पाहुण्यांना बाजूला सारत त्या वाजंत्री मंडळींना घेऊन स्टेजवरती ते आले. आणि मला व राहुल ला त्यांचे फोटो काढायला व शूटिंग करायला सांगितले.
माझ्या फोटोग्राफी व शूटिंग व्यवसायातल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच वधू वरांसोबत मी वाजंत्री मंडळींचा फोटो काढत होतो कारण यापूर्वी असा प्रसंग कधी आलाच नव्हता. न राहवून मी माझ्या मोबाईल मध्ये ही तो अविस्मरणीय प्रसंग मी ही टिपला. डीजे साउंड च्या या आधुनिक जमान्यात सुद्धा गावोगावीच्या जत्रा,यात्रा, उरूस,विविध मंदिरांची देवकार्ये इत्यादीमध्ये वाजंत्री मंडळींशिवाय त्यांच्या सनई, तुतारी , पिपाणी,ढोल,ताशे,बँड या वाद्यांच्या मंगल व विशिष्ट तालासुराच्या निनादाशिवाय हे कार्यक्रमच होऊ शकत नाहीत. बऱ्यापैकी मागासवर्गीय जातीजमातीतील हे लोक असतात. कोरोनामुळे लग्नसराई थांबली. लग्नसोहळे साधेपणाने व छोटेखानी स्वरूपात झाले. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या आणि हातावर पोट असलेल्या या मंडळींचे रोजगार गेले. आता लग्नसराई पुन्हा सुरू झाली आहे व यांच्या पुन्हा हाताला काम मिळणे सुरू झाले आहे. परंतु या लोकांना वधू वरांसोबत फोटो काढून घेण्याचा खास मान देणे तर सोडाच पण आपल्या लग्नसमारंभात ते लोक जेवलेत का याची माणुसकी म्हणूनही कुणी विचारपूस करत नाही. हे आम्हा फोटोग्राफर लोकांच्या बाबतीत पण होतेच. लोकांना वाटते यांच्या कामाचे आपण यांना पैसे देतोय,सर्वजण आपआपल्या पाहुण्यांना भेटणे फोटो काढणे जेवणे लग्नसोहळ्यात दंग असतात. परंतु आजच्या लग्नसमारंभात नवरदेवाच्या वडिलांनी स्वतः इतर पाहुण्यांना बाजूला सारून या वाजंत्री लोकांना स्टेजवर घेऊन येऊन वधू वरांसोबत त्यांचे फोटो आठवण म्हणून काढायला सांगितले हा प्रसंग काळजात घर करून गेला. तुमच्या आमच्या मंगल क्षणांचे सोबती असणारे हे वाजंत्री मंडळी देखील तुमच्या आमच्या सारखी माणसेच आहेत हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे...
आपलाच ,
विनायक पाटील (साईंट्या फिल्मस् कोल्हापूर)9527362406
सर्वाना नमस्कार..
दि. 08 नोव्हेंबर 2020 रोजी असोसिएशनची सर्व सभासदांची मीटिंग आयोजित करण्यात आली. या मीटिंग ला सभासदांनी मोठ्या प्रमाणात हजर राहून असोसिएशनप्रति आपली कर्तव्यभावना सिद्ध केली. यावेळी आपल्या संघटनेचे कायदा सल्लागार K & K या प्रतिथयश कायदे सल्लागार कंपनीचे ऍड. निखीलजी वारंगे आणि आपल्या संघटनेचे इन्शुरन्स चे काम बघणारे प्रसादजी धर्माधिकारी हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष जगदिश गुरव यांनी असोसिएशनची आजपर्यंतची वाटचाल आणि पुढील ध्येयधोरणे PPT च्या माध्यमातून विशद केली. तर उपाध्यक्ष अमर जाधव यांनी कॅलेंडर आणि वर्कशॉप संदर्भात माहिती दिली. तसेच संचालक अभिषेक शिवदास यांनी असोसिएशनच्या फेसबुक आणि युट्युब चॅनेल संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक विनायक कुचगावे यांनी केले. यावेळी ऍड. निखीलजी वारंगे यांनी सदस्यांना व्यावसायिक मार्गदर्शन केलं. तसेच प्रसादजी धर्माधिकारी यांनी आपल्या सभासदांना दिलेल्या इन्शुरन्स संदर्भात माहिती दिली. यावेळी सदस्यांनी काही सूचना मांडल्या तसेच मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी हॉल मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल गोखले कॉलेजचे श्री दौलतजी देसाई याचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. अमर एलइडी चे अजितदादा देसाई यांनी अल्पोपहारची सोय करून दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.तसेच साउंड साठी विजयजी यादव, स्नॅक्स साठी सतिश शिंदे, प्रोजेकटर साठी मयूर सुतार यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रम सुमारे 3 तास चालला. यावेळी सेक्रेटरी सायलसजी मनपाडळेकर, प्रभात चौगले, संतोष जकाते, युवराज राऊत आणि सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. *संचालक मंडळ, फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशन,कोल्हापूर.*
500 हून अधिक लोकांच्या कार्यक्रमासाठी परवानगीची मागणी साठी इव्हेंट इंडस्ट्री व मंडप व्यावसायिकाचा भव्य मोर्चा..
२२ मार्च पासून ते आज पर्यंत कोरोना महामारिमुळे लादलेला लॉक डाऊन आता जवळपास संपुष्टात आलेला असला तरी शासनाने इतर व्यवसायांना काही अटी घालून व्यवसायाची परवानगी दिलेली आहे परंतु इव्हेंट इंडस्ट्री व मंडप व्यवसायिक आणि या व्यवसायाशी सलग्न व्यवसाय उदा. बँड,घोडा, केटरिंग, साऊंड,लाईट, डी जे, ऑर्केस्ट्रा, तुतारी,सनई, ढोल ताशा, रथ,रांगोळी, अक्षता, मंगल कार्यालय असे अनेक सेवा पुरवणारे व्यवसाय जवळपास ७ महिने ठप्प आहेत, या व्यवसायासाठी शासनाने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही, सात महिने एक ही रुपया मिळकत नसलेली ही मंडळीनी कष्ट करून जे काही साठवलेले होते ते सर्व आता संपले आहे आणि या लोकांवर उपासमारी ची वेळ आलेली आहे.
आतापर्यंत या व्यवसाय संबंधित असलेले १७ लोकांनी आत्महत्या केलेली आहे आणि बरेच लोक अजुन नैरश्यामध्ये आहेत, त्यांचा आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे त्यात शासन त्यांना काही मदत करत नाही आणि कोणत्याही मदती साठी हे व्यवसायिक हात पुढे करत नाही , आमची फक्त एकच प्रमुख मागणी आहे की सरकारने आमचं व्यवसायास परवानगी द्यावी, जागेच्या कीव कार्यालयाच्या क्षमतेच्या ५० टक्के व ५०० लोकांच्या कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी , कोल्हापूरच्या लागत असलेले कर्नाटक आणि गोवा इथे परवानगी मिळत आहे पण आपल्या कोल्हापूर व महाराष्ट्रात बंधने घातलेली आहेत. सदर बंधने उठवून आम्हाला परवानगी मिळावी अशी मागणी सर्व घटक संघटनेमार्फत करण्यात आली आणि त्यासंबंधी निवेदन जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई यांना देण्यात आले.
सदर मोर्चा दसरा चौक येथून छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास मा. सागर भाई चव्हाण माजी महापौर व कोल्हापूर जिल्हा मंडप लाईट, डेकोरेटर्स चे अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आला , सदर मोर्चा मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व इव्हेंट इंडस्ट्री सलग्न व्यवसायिक हजारोंच्या संख्यने सामील झाले होते असे इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅनर असोसिएशन ( एम्पा) चे अध्यक्ष शाम बासरानी यांनी सांगितले..
या मध्ये विविध संस्था, राजकीय पक्षाचे नेते, नगरसेवक , महापौर यांनी व्यासपीठावरून जाहीर पाठिंबा व्यक्त केला आणि या मागण्यासाठी सहकार्याचे आश्वासन ही दिले..
या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा मंडप लाईट, देकोरेतर्स असो., इव्हेंट मेनेजमेंट, प्लॅनर असो.( एम्पा),
कोल्हापूर जिल्हा साऊंड लाईट जन रे टर असो. कोल्हापूर जिल्हा सांस्कृतिक, मंगल कार्यालय संघ, कोल्हापूर केटरींग वेलफेअर असो, रथवाले, फ्लॉवर डेकोरशन, बँड वाले , फोटोग्राफर,व्हिडिओ ग्राफर एडिटर असो. सहित अनेक संघटना सहभागी होत्या.
Basic Learning Workshop 2020.
Thank you!
Basic Learning Workshop 2020.
नमस्कार..
19 ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो. पण आपल्या सर्वांसाठी आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे. कारण आज आपण आपल्या स्वतःच्या असोसिएशन (PVEAK) ची अधिकृत घोषणा करत आहोत.याचे औचित्य होते जागतिक फोटोग्राफी डे च्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमाचे.यावेळी निवडक विषेश आमंत्रित सभासदांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद *एम्पा* या इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशनचे प्रेसिडेंट श्री. शामभाई बासराणी होते. प्रमुख पाहुणे श्री सुजित चव्हाण, शंभू ओऊळकर, मनोज जाधव, संतोष शेट्टी, रितेश आगेजा हे उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांचे स्वागत संघटनेचे उपाध्यक्ष श्री अमर जाधव यांनी केले. यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष श्री जगदीश गुरव यांनी या क्षेत्रातील व्यावसायिक एकत्र येणं खूप गरजेचं असून त्यांनी इन्कम टॅक्स, एमएसएमई (MSME), शॉप ऍक्ट यांची कशी गरज आहे याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात शामभाई बसराणी यांनी फोटोग्राफी व्यावसायिकांनी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून आपला व्यवसाय बळकट करावा असे नमूद केले. आपल्या कामाला सोशल मीडियाची जोड घेऊन आपला व्यवसाय कसा वाढवावा याबद्दल देखील थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आले व त्या संदर्भात भविष्यामध्ये वर्कशॉप व सेमिनार देखील घेऊ असे देखील सांगण्यात आले.
कार्यक्रमाला असोसिएशन चे सचिव सायलस मनपाडळेकर, खाजनिस सुरेश मोरे, प्रभात चौगले, संतोष जकाते, युवराज राऊत, अमित शिंदे, विनायक कुचगावे हे संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभात चौगले यांनी तर आभार सायलस मनपाडळेकर यांनी केले.
- *PVEAK*
*फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स अससोसिएशन, कोल्हापूर*
Wishing you a very happy Independence Day!
मराठी फिल्म सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते 'भरत जाधव' यांनी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशनला शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे संघटनेतर्फे मनःपूर्वक आभार.💐
*नमस्कार...*
मागिल पूर्ण वर्ष तसं पाहिलं तर एक जागतिक संकट घेवून आलं. सुरवातीला महापूर आणि पाठोपाठ आलेलं कोरोनाचं संकट, यामुळे अवघं जगचं ठप्प झालं. आपल्या व्यवसायाचं तर अतोनात नुकसान झालं.
पण अस म्हटलं जातं की प्रत्येक संकट एक संधीसुद्धा घेऊन येत असतं. त्यामुळे आपण सुद्धा या संकटाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहायला हवं. आता आपले व्यवसाय बंद आहेत तर या वेळेत आपण आपल्या व्यवसायाची भक्कम पुनर्रबांधणी करायला हवी. आपल्या व्यवसायाची शासकीय पातळीवर अधिकृत नोंद करणे, आपले इनकम टॅक्स, GST अद्ययावत करणे, आपले फेसबुक पेज, युट्युब चॅनेल अपडेट करणे इत्यादी आपल्या व्यवसायाची पाळेमुळे घट्ट करण्याची कामे या वेळेत करायला हवीत. पण बहुतेक वेळा आपल्याला या तांत्रिक बाबींचे ज्ञान अवगत नसते. आणि हीच बाब लक्षात घेऊन आपली असोसिएशन आपल्या सर्वांसाठी व्यवसायाचे आर्थिक आणि कायदेशीर ज्ञान देण्यासाठी घेऊन आली आहे एक व्याख्यान. *कोल्हापुरातील नामवंत टॅक्स कन्सल्टंट आणि GST सल्लागार श्री. चेतन ओसवाल* यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान. आणि ही मुलाखत बी न्यूज चे सिनियर पत्रकार आणि अर्थशास्त्राचे जाणकार श्री अमोल माळी यांनी घेतली आहे. सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण ही मुलाखत पहावी आणि आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी उपयोग करून घ्यावा... धन्यवाद!
*फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशन, कोल्हापूर.*
https://youtu.be/1CG54mW2GNs
Fundamental rules on Accounting, Banking, Finance and Taxation for Entrepreneurs by Mr. Chetan Oswal Fundamental rules on Accounting, Banking, Finance and Taxation for Entrepreneurs by Mr. Chetan Oswal. ...
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the public figure
Website
Address
B. G16, Starling Towers, Gavat Mandai, Shahupuri
Kolhapur
416001
Ichallaranji
Kolhapur, 416115
HI , GUYS WELCOME TO MY PAGE I HOOE YOU ENJOY MY VIDEOS SO DONT FORGOT TO LIKE, SHARE & FOLLOW
Kolhapur
लग्नात आवर्जून घेतले जाणारे उखाणे त्याच्या शिवाय लग्नात माझ्याच नाही म करा account la follow