R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh

Reunion of all Students, Teachers &
Associate.

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 17/04/2024

दिनांक 16एप्रिल रोजी गोल्ड सिनेमा दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटचा खास शो आपल्या शाळेतील मुलासाठी गुरुदक्षिणा माजी विध्यार्थी संघ आणि 1986 इंग्लिश माध्यम बॅच यांनी आयोजित केला होता. उत्तम प्रतिसाद मिळाला सर्व मुलाकडून ह्या चित्रपट पाहण्यासाठी.
गुरुदक्षिणा संघांचे सदस्य सुभाष पेडणेकर, राकेश राऊत, आरती राजादक्ष्य, हर्षदा सुर्वे,अंशाला अनंत कदम हजर होते आणि योगेश कोकाटे, अनिल जाधव आणि काजल ह्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी मदत केली, त्या बद्दल शाळेतील शिक्षक आणि माजी विध्यार्थी ह्याचे खूप खूप आभार

15/04/2024

दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजता गोल्ड सिनेमा दादर येथे आपल्या शाळेतील विध्यार्थ्यांसाठी खास शो स्वातंत्रवीर सावरकर हा चित्रपट गुरुदक्षिणा संघाने आयोजित केला आहे.

28/03/2024

सौ रेखा परळकर मॅडम यांची शोक सभा आपल्या आर. एम भट् शाळेच्या हॉल मध्ये 29 मार्च रोजी संध्याकाळी 5.00 वाजता आयोजित केली आहे.

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 26/03/2024

आपल्या शाळेच्या माजी शिक्षिका श्रीमती रेखा राजन परळकर ( इंग्रजी विषयाच्या) विद्यार्थी प्रिय शिक्षिका ह्यांचे आज वृद्धापकाळाने आज सकाळी 9.00 वाजता निधन झाले.
गुरुवारी 28.3.24 रोजी सकाळी 10.00 वाजता मुंबईत दादर स्मशान भूमीत अंत्यविधी करण्याचे नियोजन आहे.
जन्म 17 मे 1943
मृत्यु 26 मार्च 2024
भावपूर्ण श्रध्दांजली

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 24/12/2023

✳️गोखले एज्युकेशन सोसायटीचे,
आर. एम. भट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, परळ, मुंबई - १२✳️

वार्षिक क्रीडा महोत्सव (२०२३-२०२४) व क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
परळ :- दरवर्षाप्रमाणे यंदाही शाळेचा 'वार्षिक क्रीडा महोत्सव' सोमवार, दि. १८ डिसें.२०२३ ते शुक्रवार, दि.२२ डिसें. २०२३ या कालावधीमध्ये अतिशय उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने कामगार मैदान या ठिकाणी संपन्न झाला. यात वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे घेण्यात आल्यात.
या क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा शाळेच्या सभागृहात शनिवार दि. २३ डिसें.२०२३ रोजी सकाळी ९ : ३० ते १२ : ०० या वेळेत संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे १९९८ बॅचचे माजी विद्यार्थी, बुद्धिबळ खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शक सन्मा. पुष्कराज कांबळी हे लाभले. याप्रसंगी सर्व मान्यवरांना शाळेतील राष्ट्रीय छात्रसेना पथकातील व स्काऊट - गाईडच्या विद्यार्थी - विद्यार्थिनींनी मानवंदना देऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सन्मा. श्री.के.एस. महाले सर, उपप्राचार्या श्रीम. कांबळे मॅडम, ज्युनि.कॉलेज शिफ्ट प्रमुख श्रीम. खाडये मॅडम, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा मा.श्रीम.अनिता सकपाळ व सहसचिव मा.श्रीम. सुवर्णा घाडगे उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्या श्रीम. कांबळे मॅडम यांनी केला. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सन्माननीय प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला. त्यासोबतच पालक - शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा आणि सहसचिव यांचाही सत्कार शाळेच्या उपप्राचार्य श्रीमती कांबळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी आपल्या मनोगतातून संवाद साधला क्रीडा क्षेत्रात खूप चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध आहे त्या संधीचा योग्य वयातच जर फायदा करून घेतला तर जीवनामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळवता येईल यासाठी बुद्धिबळ या खेळा संदर्भात विद्यार्थ्यांना सर्वोत्परी मदत आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासन प्रमुख पाहुणे यांनी दिले आणि आपले मौलिक विचार त्यांनी व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा.श्री. के.एस.महाले सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले जीवनात नेहमी प्रयत्नशील राहावे यानंतर एक सुंदर बोधकथा सांगितली व योग्य वयातच ध्येय ठरवले पाहिजे म्हणजे आपल्या जीवनात यश संपादन करता येईल असे सूचित केले.
शाळेतील व ज्युनियर कॉलेज मधील क्रीडा स्पर्धांच्या बक्षिसांचे यादीचे वाचन सहाय्यक शिक्षिका श्रीमती अस्मिता परब मॅडम व श्री. प्रवीण लेमाडे सर यांनी अतिशय सुंदर रित्या केले.सर्व विजयी खेळाडू विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल्स, तर विजयी संघांना फिरती ढाल देऊन सन्मानित करण्यात आले. चि. दिक्षांत पवार व कु. गायत्री तांबे या दोघांचा या वर्षात *सर्वांगीण यशस्वी खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थिनी'* म्हणून चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.रेश्मा तानवडे मॅडम यांनी केले. अशा या सोहळ्याचा समारोप सामूहिक पसायदानाने झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अतिशय नियोजन पद्धतीने क्रीडाशिक्षक श्री.लक्ष्मण डिसले सर यांनी केले.

30/09/2023

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ व आर. एम. भट्ट हायस्कूलमध्ये म. गांधी जयंतीच्या निमित्ताने केंद्र शासनाने केलेल्या आवाहनानुसार रविवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रमदानातून स्वच्छ्ता मोहीम राबवायची आहे.
ह्या उपक्रमाकरीता रविवारी सकाळी ९:३० वाजता सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात जमायचे आहे. गुरुदक्षिणा मार्फत आपल्या शाळेत माजी विद्यार्थी व एनसीसी तसेच स्काऊट गाईडच्या आजी विद्यार्थ्यांना घेऊन शालेय परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी सकाळी ९:३० वाजता शाळेत जमायचं आहे.
Gurudakshiगुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ व आर. एम. भट्ट हायस्कूलमध्ये म. गांधी जयंतीच्या निमित्ताने केंद्र शासनाने केलेल्या आवाहनानुसार रविवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रमदानातून स्वच्छ्ता मोहीम राबवायची आहे.
ह्या उपक्रमाकरीता रविवारी सकाळी ९:३० वाजता सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात जमायचे आहे. गुरुदक्षिणा मार्फत आपल्या शाळेत माजी विद्यार्थी व एनसीसी तसेच स्काऊट गाईडच्या आजी विद्यार्थ्यांना घेऊन शालेय परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी सकाळी ९:३० वाजता शाळेत जमायचं आहे.
गुरूदक्षिणा माजी विद्यार्थी संघ

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 22/09/2023

गोखले एज्युकेशन सोसायटीचे,
आर.एम.भट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ,परळ ,मुंबई १२

श्री गणेशाची स्थापना २०२३
मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आपल्या आर. एम.भट शाळेच्या सभागृहात श्री गणेशाची स्थापना मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली. सदर सोहळ्यास शाळेचे प्राचार्य माननीय श्री. के.एस. महाले सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. रवी कांबळे सर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती विभा निजसुरे मॅडम, श्री. सिन्हा सर, श्री. किशोर जाधव सर , श्री.अमित परब सर व सौ.अस्मिता परब मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी श्री. सोनवणे मामा, पूर्वप्राथमिक विभागाच्या श्रीमती कदम ताई आणि शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थीनी आणि गुरुदक्षिणा संघाचे सभासद (माजी विद्यार्थी) सुद्धा उपस्थित होते.
शाळेचे प्राचार्य माननीय श्री महाले सर यांच्या शुभहस्ते व विद्यार्थ्यांनी केलेल्या "गणपती बाप्पा मोरया" च्या जयघोषात श्री गणेशाचे आगमन व गणेशाचे पूजन करण्यात आले. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गणेश पूजन व आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक व सर्व विद्यार्थी भक्तीरसात न्हाऊन निघाले.
यावर्षी शालेय श्री गणेशाच्या सजावटीसाठी *" व्यावसायिक शिक्षण "* हा विषय निवडण्यात आला आहे. ही सजावट पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने साकारली आहे. आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे, माजी सचिव व महासंचालक ज्ञानमहर्षी सर डॉक्टर मो.स. गोसावी सर यांच्या ध्येयानुसार *व्यावसायिक शिक्षणात नवीन क्षेत्र निर्माण करा, स्वतःला व समाजातील दुर्बल घटकांना पुढे घेऊन चला* या विचारधारेनुसार विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीनंतरच्या व्यवसाय निवडीच्या विविध शाखांची माहिती व्हावी हे या सजावटीतून दाखविण्याचे, सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना यातून योग्य मार्गदर्शन आणि व्यावसायिक योग्य दिशा मिळण्यास नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
श्री गणेशाची उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मनोभावे पूजन व आरती केल्यानंतर सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. श्री गणेशाच्या शाळेतील आगमनामुळे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह स्पष्ट दिसत होता.

05/09/2023

आपल्या सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा.!!! शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..

22/08/2023

नमस्कार
आपल्या ग्रुप मधील सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 10 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजित केली आहे, तरी आपण सर्वांनी हजर राहावे ही विनंती. तसेच वरील पत्रक हे आपल्या बॅच मधील मित्र मैत्रीणीना शेअर करावी.🙏

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 11/07/2023

दुःखद बातमी

आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटी चे सचिव आणि महासंचालक सर डॉ. मो.स.गोसावी ह्यांचे वृद्धापकाळाने ९ जुलै २०२३ रोजी देहावसान झाले. सर यांची शोकसभा आपल्या शाळेत आर.एम. भट. हायस्कूल परळ येथे बुधवार रोजी सकाळी ११.०० वाजता शाळेच्या सभा सोसायटीच्या मुंबई विभागातर्फे आयोजित केली आहे.

07/07/2023

आज ७ जुलै. स्व. काटदरेसरांच्या आयुष्यासाठी ठरलेला काळदिवस ! त्यांच्या आयुष्याच्या कॅलॅंडरमधील शेवटचा दिवस ! सरांच्या आयुष्यरुपी पुस्तकाचं शेवटचं पान !
पुढची पानं तशीच कोरी राहिली वाऱ्यावर नुसतीच फडफडत !
बरोब्बर तीन वर्षांपूर्वी काटदरेसरांनी अकस्मात आणि अकाली या जगाचा निरोप घेतला. त्यांचं असं अचानक जाणं आपल्या सगळ्यांसाठी अविश्वसनीय आणि धक्कादायक होतं. आज तीन वर्षानंतरही विश्वास बसत नाही आणि धक्क्याची तीव्रताही अजून तेवढीच जाणवते आहे.
काटदरेसरांचं स्मरण झालं नाही असा आर एम शाळेचातरी एकही दिवस कधी गेला नसेल. सेवानिवृत्तीनंतर शिक्षक म्हणून त्यांची भूमिका संपली असली तरी शाळेशी असलेलं नातं त्यांचं तुटलं नव्हतं , त्यांनी ते तुटू दिलं नव्हतं. त्यांनी मुलांवर चढवलेला कडक आवाज आणि गडगडाटासारख्या हसण्याचा आवाज आजही शाळेच्या एखाद्या कोपऱ्यातून ऐकू येईल इतके ते शाळेशी समरस आणि एकरूप झाले होते. आर एम भट हायस्कूलचे एक अविभाज्य आणि अतूट अंग !
आज त्रैवार्षिक स्मृतिनिमित्त काटदरेसरांना आपल्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना सरांच्या असंख्य आठवणींनी अंतःकरण ओलेचिंब होऊन जाते. मनात अनेक कडूगोड आठवणींची गर्दी होते. त्या गर्दीत परबसरही दिसतात. कॅंपमध्ये स्वयंपाकघरात काहीतरी करत असलेले कोठावळेसर दिसतात. काटदरेसरांच्या विनोदावर हसणारे संतसरही दिसू लागतात. प्रि. जोशीसर , देशपांडेमॅडम , रावळमॅडम , सोलायमॅडम , परांजपेमॅडम, मराठे मॅडम , एस एम जोशीमॅडम, फाटकसरही आणि मनोज राणे दिसता दिसता नकळत गर्दीतून एकेक हरवून जातात. या सर्व स्वर्गस्थ सहकाऱ्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏🙏

ईश्वर स्व. काटदरेसर आणि सर्व स्वर्गवासी सहकाऱ्यांच्या आत्म्याला सद्गती देवो 🙏🙏🙏

फ्रान्सिस डिमेलो

02/06/2023

🌹🌹हार्दिक अभिनंदन🌹🌹
🏵️ इ.10 वी बोर्ड परीक्षा निकाल 🏵️

मार्च 2023 मध्ये बोर्डाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत आपल्या आर.एम.भट हायस्कूल परळ या शाळेचा निकाल खालील प्रमाणे :

परीक्षेला प्रविष्ठ झालेले विद्यार्थी :- 212
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी :- 205
शाळेचा शेकडा निकाल :- 96.69%

विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी :- 50
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी :- 92
द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी :- 54
पास क्लास मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी :- 09

शाळेत प्रथम आलेले तीन विद्यार्थी
1) कुमारी मदुरा महादेव चिंदरकर 95.20%
2) कुमारी वेदिका संजय करणगुटकर 93.40%
3) कुमारी कार्तिकी सुनिल कांबळे 92.60%

सर्व उत्तीर्ण आणि गुणवंत विद्यार्थ्याचे, त्यांच्या पालकांचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ-आर. एम. भट हायस्कूल

Sachin Tendulkar Birthday : सचिनच्या चाहत्याने परळमध्ये साकारलं पेंटिग : ABP Majha 25/04/2023

आपला माजी विद्यार्थी डॉक्टर अभिजित साटम (सचिनचा जबरा फॅन) ह्याने ह्यावर्षी सुद्धा सचिनच्या (५० व्ह्या) वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेत ५० फूट लांब चित्र काढून सचिनला शुभेच्छा दिल्या, अभिजित हा १० वर्षाचा असल्यापासून सचिन चे वृत्तपत्र मासिक मधील सर्व बातम्या सग्रहीत करून ठेवल्या आहेत, तसेच तो २०१७ पासून नेहमी आपल्या शाळेत सचिनची वेगवेगळ्या रूपात शाळेच्या पटांगणात मोठे चित्र काढतो.
सचिन वेड्या डॉक्टर अभिजीतला त्याचा देव एकदा भेटावा ही ईश्वर चरणी प्रार्थना.

गुरुदक्षिणा माझी विद्यार्थी संघ
https://youtu.be/Ku7UV37O4Ok

https://youtu.be/Y--RiQFrbAM

Sachin Tendulkar Birthday : सचिनच्या चाहत्याने परळमध्ये साकारलं पेंटिग : ABP Majha ाझा मराठीतील सर्व बातम्या, ब्...

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 02/04/2023

आपली माजी विद्यार्थिनी तनुजा भडसावाले वाघ हिने शनिवारी १ एप्रिल रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे आव्हान पालक संघ ( विशेष व्यक्तीकरिता पालकांनी चालवलेली कार्यशाळा) यांचा विद्यार्थी आणि पालक यांचा नाटक आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. बऱ्याच मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यानी कार्यक्रमास हजर होते.आपला माजी विद्यार्थी राकेश राऊत (चित्रपट निर्माता) हा सुद्धा ह्या कार्यक्रमास उपस्थित होता.

विशेष मुलांकडून नाटक आणि नृत्य आपली माजी विद्यार्थिनी तनुजा गेली कित्येक वर्षे करून घेत आहे. खूप उत्तम सादरीकरण केले सर्व मुलांनी आणि त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. आव्हान ही संस्था शिवाजी पार्क येथे चालवली जाते मुलांकडून राखी, टोपी, तोरण असे गृहोपयोगी वस्तू बनवल्या जातात. गेल्यावेळी त्यांनी बनवलेल्या राख्या बॉर्डरवर जवानांना पाठवण्यात आल्या. आव्हान ह्या संघाला मदतीची गरज आहे, जेणे करून गरुजू व्यक्तींना मदत होईल आणि ह्या विशेष व्यक्ती समाजात पुढे येतील.

https://instagram.com/aawhanpalaksangh?igshid=YmMyMTA2M2Y=

कृपया आव्हान संघटनेच्या इंस्टाग्राम page like, follow and share करा
तनुजा गुरुदक्षिणा संघाला तुझा अभिमान आहे, अशी सामाजिक कार्य करीत रहा.

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 02/04/2023

आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीमती परळकर मॅडम ह्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या पुणे येथे स्थायिक झाल्या. त्यांना पुणे येथे जाऊन गुरुदक्षिणा संघाच्या कार्यकारिणी सदस्यांनी प्रत्यक्ष भेटून विचारपूस केली. त्यांना १९८३ बॅच मधील विद्यार्थी यांनी मॅडमचे शाळेच्या वर्गातील त्याचा फोटो असलेले कॅलेंडर सुद्धा देण्यात आले. मॅडम सर्वांना पाहून खूप आनंदित झाल्या. त्या अशाच आनंदित राहोत ही ईश्वर चरणी प्रार्थना.

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 02/04/2023

कनक प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय शिष्यवृत्ती चां कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गौरव करण्यात आला. गुरुदक्षिणा संघाचे कार्यकर्ते ह्यांनी हजर राहून मुलांचे कौतुक केले.

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 22/03/2023

आपण सर्वाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 02/02/2023

नमस्कार🙏🏻

आपल्या शाळेत इ. ५ वी व ८ वी ची स्कॅालरशीप परीक्षा १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने गुरूदक्षिणा माजी विद्यार्थी संघाकडून “तेजोमय” उपक्रमांतर्गत आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित संस्थेकडून सराव परीक्षा दि. २९/०१/२०२३ रोजी आयोजित केली होती. एकूण ५७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ

23/11/2022

गुरुदक्षिणा संघाने आयोजित केलेल्या अर्थसंकल्प कार्यक्रमाची बातमी आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध केली

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 22/11/2022

आज आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना अर्थसंकल्प या विषयी माहिती देण्यात आली.
आपण थोड्यातून बचत करण्याची सवय कशी करावी, त्या बचतीचा भविष्यात आपल्याला काय फायदा होईल याचे शिक्षण विद्यार्थ्यांना आता देणे फार गरजेचे आहे. ह्याचे औचित्य साधून सर्व शाळेतील मुलांना ह्या विषयी उपयुक्त माहिती देण्यात आली जेणेकरून त्यांना बचतीची जाणीव होऊन त्या प्रमाणे विध्यार्थी बचत करतील.
अर्थसंकल्प विषयी जागरूकता मुलांना कळावी ह्या करिता महाराष्ट्र टाइम्स ने पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम गुरुदक्षिणा संघाने शाळेत आयोजित केला .🙏

मुख्याध्यापक श्री. महाले सर आणि शिक्षक वर्गाचे आभार.

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ
आर एम भट हायस्कुल -परळ

04/09/2022
Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 01/09/2022

आपल्या शाळेचा गणपती. आजकाल मोबाईलच्या युगात पुस्तक वाचन मागेच पडत चालले आहे. विद्यार्थी तर ग्रंथालयात जाणचं विसरले आहेत. अशा विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्या शाळेचे शिक्षक श्री अमित परब सर यांनी घरोघरी ग्रंथालय अशा आशयाने संकल्पना मांडून परिपूर्ण अशी सजावट केली आहे. वाचाल तर वाचाल ही म्हण विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी वाचनाचे फायदे या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर गणेश दर्शनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक परिचय व्हावा या हेतूने पुस्तकं सुद्धा दर्शनी भागात ठेवलेली आहेत. त्यामुळे रंगीबेरंगी मुखपृष्ठ पाहून आपणही पुस्तक वाचावी व त्यापासून काही प्रेरणा मिळवावी या हेतूने विद्यार्थी वाचन करतील व स्वतःचा विकास साधतील.

14/07/2022

नमस्कार
दुःखद बातमी

आपल्या गुरुदक्षिणा टीमची अगदी प्रारंभा पासूनच सक्रिय सदस्य असलेली, सर्वांशी मिळून मिसळून राहणारी आपली सहकारी मैत्रीण सुप्रिया सावंत (१९९६ Batch) हीचे आज दुपारी अकस्मात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अतिशय दुःखद बातमी आहे. तिचं स्मरण कायम राहील. तिला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ
आर एम भट हायस्कूल

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 06/07/2022

आज ७ जुलै
ही तारीख आपला आर एम भट हायस्कूल परिवार तरी कधी विसरू शकत नाही. कारण दोन वर्षांपूर्वी याच दिवशी आपणा सर्वांचे लाडके आणि आपणा सर्वांना आदरस्थानी असलेले काटदरे सर ह्यांना करोना नावाच्या काळाने आपणा सर्वांपासून कायमचे हिरावून घेतले. आज त्या दुःखद घटनेला दोन वर्षे झाली असली तरी काटदरेसर आपल्या सोबत नाहीत हे दुःख जराही कमी झाले नाही. लहानमोठ्या प्रत्येक प्रसंगी सरांची पोकळी जाणवल्याशिवाय राहात नाही .यापेक्षा सरांना वेगळी आपली श्रद्धांजली काय असू शकते?
अशी वर्षानुवर्षे आणि दिवसागणिक स्व. काटदरेसरांची आठवण आपल्याला होत राहील एवढे फार मोठे योगदान त्यांनी आपल्या शाळेसाठी आणि आपल्या सर्वांसाठी दिले आहे.
आज आपला समस्त आर एम भट हायस्कूल परिवार आजी माजी शिक्षक आणी माजी विध्यार्थीआदरणीय स्व. काटदरेसरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ
आर एम भट हायस्कूल
परळ
ईश्वर सरांच्या आत्म्यास सद्गती देवो 🙏🙏🙏

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 27/04/2022

गोखले एज्युकेशन सोसायटीचे
आर.एम.भट हायस्कूल , के.ई.एम.हॉस्पिटल व गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दिनांक २७ एप्रिल रोजी शाळेत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. कै.मनोज राणे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ही मोहीम राबविण्यात आली.
श्री.वामन नारकर सर व सौ.नारकर मॅडम आणी श्री. अमित परब सर,सौ. परब मॅडम यांच्या अथक परिश्रमाने ही मोहीम यशस्वी होऊ शकली. त्यांच्या या बहुमोल सहकार्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार. तसेच शाळेचे प्राचार्य पाटील सर, उपप्राचार्य उदमले सर,पर्यवेक्षक गावंड सर, सौ. बंदछोडे मॅडम आणी शिक्षक यांच्या मागरदर्शन आणी सहकार्य दिल्याने त्यांचेही आभार.

लसीकरण मोहीमेत कै.मनोज राणे यांच्या सुविद्य पत्नी मानसी ताई , सुपुत्र मानस तसेच गुरुदक्षिणाचे कार्यकर्ते आणी माजी विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांचे मनपूर्वक आभार.

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 23/04/2022

प्रिय सहकारी

कोरोनाच्या तीन लाटांशी आपण गेल्या दोन वर्षात आवश्यक ती काळजी घेऊन सामना केला आहे. कोरोनाची चौथी लाट उंबरठ्यावर आहे की काय असे जगभरातील ताज्या माहितीवरून वाटू लागले आहे.
कोरोणाच्या या थैमानात अनेक सुहृद आपण गमावले आहेत. गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघाचा अनमोल हिरा, मनोज राणे हा त्यापैकीच एक.
१८ वर्षांखालील मुलांच्या लाशिकरणाची मोहीम सध्या चालू आहे. आपल्या शाळेतील, आर. एम. भट हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेच्या साह्याने मनोज राणे स्मृती लसीकरण शिबिर गुरुवार दिनांक २१ एप्रिल रोजी शाळेत सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळात आपण आयोजित केले होते तेव्हा १८८ विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले..
या उपक्रमास मनोज राणे यांच्या पत्नी मानसी , मुलगा मानस आणि कुटूंबीय हजर होते.

गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 16/04/2022

आज दिनांक १६ एप्रिल रोजी शाळेत NCC विध्यार्थ्यासाठी covid लसीकरण आयोजित केले होते. त्या करिता महानगर पालिका F South च्या टीमचे खूप आभार.

02/04/2022

आर एम भट्ट शाळेतील सर्व आजी माजी शिक्षक आणी विध्यार्थी सर्वाना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Photos from R.M.Bhatt High School -Gurudakshina Maji Vidhyarthi Sangh's post 28/01/2022

दिनांक २७ जानेवारी रोजी गुरुदक्षिणा संघाने NCC Cadets साठी ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केला होता. ९५ मुलांनी सहभाग घेतला. ज्या मध्ये Indian Army मध्ये कसा प्रवेश घेता येतो पुढे किती वर्षाचा कालावधी प्रशिक्षण दिले जाते ह्या बद्दल कमांडर सनी शिगवण ह्यांनी उत्तम माहिती दिली.
माजी विद्यार्थी नयना रेगे (८८ Batch) ह्या कार्यक्रमाकरता मदत केली. त्या बद्दल तिचे आभार🙏💐

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Category

Telephone

Website

Address


Gokhale Society Lane
Mumbai
400012
Other High Schools in Mumbai (show all)
Alumni of Bharda New High School - Mumbai. Alumni of Bharda New High School - Mumbai.
Hazarimal Somani Marg, Fort
Mumbai, 400008

A Place for All the students of Bharda New High School & Junior College to share and cherish our School Days..... We are Proud to be Bhardaites!!

St. Stanislaus High School St. Stanislaus High School
Hill Road , Bandra West
Mumbai, 400050

St. Stanislaus is a public school affiliated to the Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education. The school is run by the Jesuits, renowned for excellence in ...

Maneckji Cooper Education Trust School Maneckji Cooper Education Trust School
Juhu Tara Road
Mumbai, 400049

Maneckji Cooper Education Trust School : Offical Page

New Model English High School New Model English High School
Chembur & Deonar
Mumbai, 400088

Pages for NMEHS Students, Teachers & Alumni

Oxford Public School Oxford Public School
Balbhagwan Shikshan Prasarak Marg
Mumbai, 400067

A School With A Purpose.

Villa Theresa High School- Alumni Page Villa Theresa High School- Alumni Page
66, Drive Gopalrao Deshmukh Marg (Pedder Road), Mumbai/26
Mumbai, 400026

Unofficial page. For queries regarding new admissions, please contact the school directly.

Thakur Vidya Mandir Thakur Vidya Mandir
Thakur Vidya Madir
Mumbai, 401101

Thakur Vidya Mandir High School is a secondary, co-educational school in Kandivali, Mumbai, India. T

ASB High School Student Council ASB High School Student Council
The American School Of Bombay, Bandra Kurla Complex
Mumbai, 400051

This is the Facebook Fan Page for the High School Student Council at the American School of Bombay. HS Students become fans in order to have access to the latest StuCo information,...

st. john's high school mumbai (goregaon west) st. john's high school mumbai (goregaon west)
Goregaon West
Mumbai

Established in 1969, St. John’s Universal School has been in the forefront of making education mea

C.B.M. High School C.B.M. High School
Sindh Seva Samiti Nagar
Mumbai, 400037

C.B.M. High School and P.D. Hinduja Kindergarten was founded in 1972, by the Priyatam Dharam Sabha, as an unaided Sindhi minority school, with the goal of providing high quality ed...

Sheth Karamshi Kanji English High School Sheth Karamshi Kanji English High School
V. P Road
Mumbai, 400080

This page is for smpr and ex-smpr students ! Dedicated to our wonderful school !

Anjuman-I-Islam Jan Mohd Cassum High School Of Commerce Technical Anjuman-I-Islam Jan Mohd Cassum High School Of Commerce Technical
Maulana Shaukat Ali Road
Mumbai, 400008

Anjuam-I-Islam Jan Mohd Cassum High School has a glorious past to cherish. The school came into existence on the 25th July 1942.