Nilesh Raut

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nilesh Raut, Media/News Company, Nagpur.

Photos from Nilesh Raut's post 08/03/2024

सकाळतर्फे वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा सत्कार
नागपूर, ता. ८ : कामठी रोड येथील इंदोरा वृत्तपत्र विक्रेता केंद्र येथे सकाळतर्फे महिला दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा सत्कार करण्यात आला. सकाळ फॅमिली गाईडचे विदर्भ समन्वयक निलेश राऊत यांचे हस्ते वृत्तपत्र विक्रेत्या महिला रेश्मा राहुल जांभुळकर, लीना विनोद भोवते यांचे शॉल आणि नारड देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

18/11/2023

Mahajyoti reduced the number of apprentices
-Training period also reduced by one month

Nagpur : Mahajyotirpeâ provides coaching for various competitive exams. But since Mahajyoti has reduced the number of these trainees from this year, displeasure has started to emerge among the students.
Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) has been established in 2019 under Other Backward Classes and Bahujan Welfare Department of Government of Maharashtra. Other Backward Classes (OBC), Scheduled Castes (VJ), Nomadic Castes (NT) and Special Backward Classes (SBC) students in the state of Maharashtra through Central Public Service Commission, Maharashtra Public Service Commission, Bank, Police Recruitment Exam Pre-Training, CET JEE NEET for Class XI-XII students, and UGC NET, MBA CET CAT training is provided.
Mahajyotirpeâ had more seats for training for various competitive examinations at the beginning. In this, UPSC (English) 1500, UPSC (Marathi) 1000, MPSC Rajyaseva 1500, Combined Group B and C 1500 are given training for a total of 5500 seats. But this year one third seat has been reduced. UPSC English (500), UPSC (Marathi 250) MPSC Rajyaseva (500) MPSC Group B and C (500) reduced 1750 seats in total.
Specially, while OBC Minister Atul Save decided to increase the number of MBA trainees from 500 to 750, Mahajyoti has reduced this number to 500. Therefore, the tone of displeasure among the students against the decision to reduce the number of trainees in a very short period of time has gradually started to rise. Due to reduced seats, some needy students will be deprived of tuition fees.

Name of Schemes Revised Period Revised Sanctioned No
UPSC (English) 11 months 1000
UPSC (Marathi) 11 months 750
MPSC State Service 11 Months 1000
MPSC Group B & C 6 months 750
Military 6 months 750
MBA CET/CAT 6 Months 500

Reduced duration
12 months training for UPSC and State Services and 8 months training for Group B and C. In this too, Mahajyoti has reduced the duration. In this, UPSC and State Services training has been reduced from 12 months to 11 months and group B and C training has been reduced to 6 months.

11/11/2023

उठा उठा दिवाळी आली... बाबासाहेबांच्या उपकराने भेटलेला बोनस ...घेण्याची वेळ आली..!

इंग्रजांच्या पगार नियमानुसार चार आठवड्यांचा "एक" महिना धरला असता एका वर्षात १३ पगार मिळायलाच हवे होते, पण असं न होता एका वर्षात फक्त १२ पगार मिळत असे, ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आली.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारशी पत्रव्यवहार करून ह्या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली. जर १३चा पगार म्हणजे आताचा आपण ज्याला "बोनस म्हणतो नाही मिळाले, तर आंदोलन करू, असाही इशारा त्या पत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारला दिला.

त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सुचविले की, भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे “दिवाळी : तर १३ वा पगार म्हणजेच "बोनस दिवाळीलाच देण्यात यावा. त्यांच्या पत्राचा विचार करून ब्रिटिश सरकारने ३० जून १९४० साली भारतात "बोनस हा कायदा लागू झाला.

सर्व भारतीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मुंबई कुर्ला येथील बुध्द कॉलनीत बुद्ध कॉलोनी युवा मित्र परिवारातर्फे लागलेला हा बॅनर.
महामानव,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ...!

07/11/2023

७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस...

Photos from Nilesh Raut's post 13/10/2023

योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली..!
सुरेश तळेकर : ग्रीन सिटी स्कुलमध्ये 'सकाळ' स्वास्थ्यम
योग प्रात्यक्षिक उपक्रम

नागपूर,ता१३ : विद्यार्थी मोबाईलमध्ये व्यस्त राहत असल्याने विविध आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे स्क्रीन टाइम कमी करून प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी उठून मैदानी खेळ व्यायाम, योग, प्राणायाम करायला पाहिजे त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ,निरोगी राहण्यास मदत होईल. स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे, रोज योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन ग्रीन सिटी स्कुलचे संचालक सुरेश तळेकर यांनी केले. सकाळ एनआयईच्या वतीने शुक्रवारी (ता. १३) हुडेकश्वर रोड येथील ग्रीन सिटी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित 'सकाळ' स्वास्थ्यम योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते बोलत होते.

05/10/2023

खुद को पढता हू..???

05/10/2023

*मी एका पगारातून किती वेळा कर भरावा
आणि का...उत्तर आहे???*

*मी तीस दिवस काम केले,*
*पगार घेतला - कर भरला.*
*मोबाईल विकत घेतला - कर भरला.*
*रिचार्ज - कर भरला.*
*डेटा घेतला - कर भरला.*
*वीज घेतली - कर भरला.*
*घर घेतले - कर भरला.*
*टीव्ही फ्रीझ घेतले- कर भरला.*
*गाडी घेतली -कर भरला.*
*पेट्रोल घेतले - कर भरला.*
*सेवा पूर्ण झाली -कर भरला.*
*गाड़ी रस्त्यावर चालवली - कर भरला.*
*पुन्हा टोलवर कर भरला.*
*निर्मित परवाना -कर भरला.*
*चालक परवाना घेतला-कर भरला.*
*तुम्ही चूक केली असेल तर - कर भरला.*
*रेस्टॉरंटमध्ये खाल्ले - कर भरला.*
*पार्किंगसाठी कर भरला.*
*पाणी घेतले -कर भरला.*
*रेशन खरेदी केले -कर भरला.*
*कपडे विकत घेतले - कर भरला.*
*शूज विकत घेतले - कर भरला.*
*तुम्ही असंख्य वस्तु घेतल्या - कर भरला.*
*शौचालयात गेलो - कर भरला.*
*औषधी विकत घेतली- कर भरला.*
*गॅस घेतला - कर भरला.*
*आणखी शेकडो गोष्टी घेतल्या आणि -कर भरला. काही ठिकाणी फी भरली, काही ठिकाणी बिले भरली गेली,काही ठिकाणी व्याज भरले गेले,कुठे दंडाच्या नावाने,कुठे लाचेच्या नावाने पैसे द्यावे लागले,एवढ्या नाटकानंतर,चुकून जर मी सेव्हिंगमध्ये बचत केली तर कर भरला.*
*आजीवन काम केल्यानंतर सामाजिक सुरक्षा नाही.* *पेन्शन नाही.*
*वैद्यकीय सुविधा नाही. मुलांसाठी चांगल्या शाळा नाहीत.*
*सार्वजनिक वाहतूक नाही.*
*रस्ते खराब आहेत,पथदिवे खराब आहेत,हवा खराब आहे,पाणी खराब आहे,फळे आणि भाज्या विषारी आहेत.*
*रुग्णालये महाग,दरवर्षी महागाईचा फटका,* *अनपेक्षित खर्च आणि संकटे,मग सगळीकडे रांगा.*
*सगळा पैसा गेला कुठे????भ्रष्टाचारात,*
*निवडणुकीत,*
*श्रीमंतांना अनुदानात,*
*मल्ल्यासारखा फरार*
*श्रीमंतांच्या बनावट दिवाळखोरीत,*
*स्विस बँकांमध्ये,*
*नेत्यांच्या बंगल्यात आणि गाड्यांमध्ये*
*आणि सामान्य लोकांना झंडू बनवायला.*
*आता कोण सांगू चोर कोण???*
*अखेर आपले देशवासी असेच किती दिवस ओढाताणीत जीवन जगत राहणार?*
*कृपया प्रत्येक नागरिकाला हे पाठवा.*
*इतका महसूल इंग्रजांनीही घेतला नाही.*

Photos from Nilesh Raut's post 27/09/2023

मोबाईलच्या अतीवापरामुळे नात्यांतील दुरावा वाढला..
सकाळ एनआयईचा उपक्रम; ' मोबाईल श्राप आहे कि वरदान'विषयावर वक्तृत्व स्पर्धा...सकाळ एनआयईच्या व्यासपीठावर संधी दिल्याबद्दल सकाळ वृत्तपत्राचे मनापासून आभार...निलेश राऊत

12/07/2023

दुनिया में रेल्वे के इतिहास में पहली रेल को धक्का मार कर स्टार्ट किया गया

27/05/2023

त्यागमूर्ती #माता #रमाई #आंबेडकरांची सावली

२७ मे १९३५ माता रमाई आंबेडकर स्मृतीदिन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवऱ्या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबाना लंडनला पाठवणाऱ्या "रमाईबद्दल" जास्त लोकांना माहीत नाही. बाबासाहेबांनी देखील आपल्या मोठेपणाचे सारे श्रेय आपल्या पत्नी रमाई यांनाच दिले आहे "पाकिस्तान आणि भारताचे विभाजन" हा मौलिक ग्रंथ लिहून डॉ. बाबासाहेबांनी आपली सहचारिणी रमाईना अर्पण केला आहे. त्यात ते म्हणतात "जिच्या अंतरंगाचा चांगुलपणा, जिचा उमदा स्वभाव, जिचे स्वच्छ चारित्र्य, जिची सुखद सहानुभूती, माझ्याबरोबर दुःख भोगण्याची तत्परता आणि आमच्या मित्रविहरित काळजीच्या आणि गरजांच्या दिवसांत जिने मला अविरत साथ दिली त्या "रामू"च्या स्मृतीस गुणग्राहकतेची खूण म्हणून माझी कलाकृती अर्पण करतो"! बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत मेणबत्ती प्रमाणे क्षणोक्षणी जळून साथ देणाऱ्या त्यागमूर्ती आई रमाई यांची आज ८८ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन.

19/05/2023

#साइकिल की सवारी किसी भी देश की अर्थव्यवस्था (GDP) के लिए बेहद हानिकारक है....!

सुनने में ये हास्यास्पद लग सकता है , परन्तु सत्य है....

एक साइकिल चलाने वाला देश के लिए बहुत बड़ी आपदा है, क्योंकि.......

वो गाड़ी नहीं खरीदता,
वो लोन नहीं लेता,
वो गाड़ी का बीमा नहीं करवाता,
वो तेल नहीं खरीदता,
वो गाड़ी की सर्विसिंग नहीं करवाता,
वो पैसे देकर गाड़ी पार्किंग नहीं करता,
वो ट्रैफ़िक फाइन नहीं देता ,
और तो और
वो मोटा (मोटापा) नहीं होता।

जी हां .....यह सत्य है कि एक स्वस्थ व्यक्ति
अर्थव्यवस्था के लिए सही नहीं है, क्योंकि...

वो दवाईयां नहीं खरीदता,
वो अस्पताल व चिकित्सक के पास नहीं जाता
वो राष्ट्र की GDP में कोई योगदान नहीं देता।

ठीक इसके विपरित एक फ़ास्ट फूड की दुकान 30 नौकरी पैदा करती है........

10 हृदय चिकित्सक,
10 दंत चिकित्सक,
10 वजन घटाने वाले...!



नोट :-पैदल चलना इससे भी अधिक ख़तरनाक होता है, क्योंकि पैदल चलने वाला व्यक्ति तो साइकिल भी नहीं खरीदता...................!!

02/05/2023

जर्मनीच्या एका वर्तमानपत्रातील व्यंगचित्र !

भारताने लोकसंख्येत चीनवर मात केली आहे. परंतु तंत्रज्ञान व आर्थिक प्रगती यांत चीनने भारतावर मात केली आहे.

सबब , या वर्तमानपत्राने लोकसंख्येने भरपूर असलेल्या भारताची अवस्था दाटीवाटीने भरलेल्या ट्रेनच्या माध्यमातून दाखवली आहे. चीनची प्रगती मात्र हाय स्पीड ट्रेनद्वारे दाखवली आहे !

आपण “विश्वगुरू” म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असलो तरी “सोनाबाईच्या हाती कथलाचा वाळा आहे” हे जगाला माहित आहे !

16/04/2023

कपिलवस्तू बुद्धविहार उपासक उपासिका संघतर्फे महापुरुषांना अभिवादन

16/04/2023

इंदोरा वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

नागपूर : इंदोरा चौक येथील इंदोरा वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी केक कापून व फूड सलाड वाटप करून मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी केली. यावेळी अश्विन अंबादे, शरद साखरे, कुणाल चिंचखेडे कुणाल पाटील, दिलीप वासनिक , सुमित तिरपुडे ,जय गुप्ता,सत्येन्द्र बावनगडे, मनोज कैथवास, गौतम गजभिये मुकेश मेश्राम, महेश मेश्राम, चंद्रकांत गजभिये, आदी वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

01/04/2023
31/03/2023

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ..

05/03/2023

मराठवाड्यातील पाटलाचा पोरगा लिहितोय.
खूपच प्रामाणिक लिहिलंय...शेवट पर्यंत वाचा...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं.!

गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. *कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत.* आमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठमोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्खा महारवाडा जनावरांसारखा राबला. रेड्याच्या पाठीवर लादलेल्या पखालीतून पाणी वाहून कैक माणसांचे पाय वाकडे झाले. आमच्या माड्यांचे अवजड नक्षीदार खांब बनवण्यासाठी लागणारे लाकडं डोंगरातून खांद्यावर वाहून आणल्याने कित्येक खांद्यांना मरणांतिक कळ लागली असेल. आम्ही त्याच्या बदल्यात *माणशी शेरभर ज्वारी दिली* आणि मोकळे झालो.

आजपर्यंत शाबूत असलेल्या आमच्या डौलदार माड्या आणि तिच्यावरून दिसणारे कुडाचे, छपराचे महारवाडे पाहत आलो. आता महारवाड्यांचे बौद्धवाडे झाले. कुडाची घरं जाऊन पक्की घरं आली. वेगळा असलेला बौद्धवाडा गावात मिसळून गेलेला दिसतो, ते पाहिलं की मनातला गिल्ट (अपराधिक भावना) काहीअंशी कमी होते आणि *म्हणून बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.*

मोठमोठे झाडं आणि दगड उकरून याच महारवाड्यातल्या माणसांनी आमचे शेकडो एकरांचे मळे तळहातासारखे सपाट आणि सुपीक तयार करून दिले. त्याबदल्यात आम्ही त्यांना *डाळींचा चुरा, अन कळणा कोंडा खायला दिला.* हे कुणीच मांडलं नाही. पन्नासेक जनावरांच्या, म्हशींच्या शेणाच्या पाट्या वाहून त्यांच्या टाळूचे केस गेले. वासरांनी पायावर पाय देऊन अनेकदा रक्ताचे बुरबुडे आले, नखं उचकटली. त्याबदल्यात *फक्त तपीलं भरून ताक* देऊन आम्ही पाटीलकी दाखवत त्यांची बोळवण केली. ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं की मरून मेल्यासारखं वाटतं. आज ते सगळं आठवून *बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.*

बाबासाहेबांनी दलितांना माणसात आणलं हे फार चुकीचं वाक्य आहे. *बाबासाहेबांनी दलितांना नाही, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या सवर्णांना माणसात आणलं.*
दलित माणसंच होते. आम्ही माणसासारखं वागत नव्हतो. *त्यामुळे बाबासाहेबांचं ऋण आमच्या कातडीचा जोडा शिवूनही फिटणार नाही.* कारण दलितांना आमच्यापासून वेगळं केलं नसतं तर आम्ही अजूनही त्यांचं रक्त शोषतच राहिलो असतो. म्हणून वाटतं सगळा भम्पक माज बाजूला ठेऊन *बाबासाहेबांना घट्ट मिठी मारावी.*

लै जुना काळ नाही, गावातल्या शाळेत बौद्धवाड्यातल्या पोरांची रांग वेगळी बसत होती. म्हणजे तसं कॅम्पलशन नव्हतं पण सामाजिक कंपूबाजपणा आणि हजारो वर्षांची डीएनएच्या जीनमध्ये रुजलेली/ठासून भरलेली शिकवण नकळत आपली विकृती दाखवायची. चौथीच्या मराठीच्या पुस्तकातल्या बाबासाहेबांच्य चित्राला पेनाने चित्र विचित्र मिशा काढून विद्रुप करायचो. आज ते हटकून आठवतं. *अपराधी वाटतं*. आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून *बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.*

जवळच्या निमशहरात शिकायला होतो. एक कार येऊन गल्लीत उभी राहिली. त्यातले माणसं उतरून कुणाच्या तरी घरात जातात. कारच्या मागच्या काचेवर *"भीमा तुझ्या जन्मामुळे"* लिहलेलं. आमच्यातला एक थोडा प्रौढ मुलगा गेला आणि खाली त्या धूळ बसलेल्या काचेवर लिहून आला *"आम्ही माजलो"....* आज ते सगळं आठवलं की वाटतं बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचायला किती उशीर केला. *नंतर कळतं आपणच त्यांच्याजवळ जायला उशीर केला.* शेवटी अपराधी फील झाल्यावर पुन्हा *बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.*

वर्णव्यवस्थेचं खापर ब्राम्हणांवर फोडून मोकळे होणारे आम्ही खरे लबाड होतो. व्यवस्था ब्रम्हणांनी तयार केली असली तरी ती आम्ही उपभोगली, राबवली. कधी कोणता ब्राह्मण गावात अस्पृश्यता किंवा जातिव्यवस्था राबवण्याचं ट्रेनिंग द्यायला आल्याचं आठवत नाही. पण आज त्यांच्यावर सगळे आरोप ढकलून आम्ही सेफ झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. सगळं सगळं साफ समोर दिसतं. *पूर्णपणे गंडलोय आम्ही.* दिशा दाखवणारे, आम्हाला माणसात आणणारे *बाबासाहेब समजून घ्यायला आम्ही उशीर केला.* आता समजून घेतोय. बाबासाहेबांचं बोट धरून एक एक पाऊल टाकतोय. माणसात येण्याची प्रक्रिया किचकट असते, हळूहळू प्रयत्न सुरू आहे. भारी फील असतो हा...म्हणून *बाबासाहेबांना घट्ट मिठी मारावी वाटते....*

*...कारण आम्ही खातो त्या भाकरीवरबी बाबासाहेबांची सही आहे रं...!!*

*Thanks Ambedkar....*❤️

*- सोमनाथ कन्नर.*(मराठवाडा)

05/03/2023

बाबासाहेबांच्या गीतावर थिरकले मुंबईकरांच्या पाय. सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.. ..व्हिडीओ शेवट पर्यंत बघा..

#मुंबई videos

Photos from Nilesh Raut's post 13/02/2023

सकाळ माध्यमसमूहांच्या सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या माध्यमातून कामठी रोड बेझनबाग येथील नागसेन विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल दैनिक सकाळ वृत्तपत्राचे आभार... निलेश राऊत

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेचा वाद चिघळणार; नागपूरात कर्मचारी आक्रमक 29/12/2022

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेचा वाद चिघळणार; नागपूरात कर्मचारी आक्रमक |

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेचा वाद चिघळणार; नागपूरात कर्मचारी आक्रमक जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी नागपूरात लाखो कर्मचारी आक्रमक

Photos from Nilesh Raut's post 21/11/2022

जरिपटका मिसाळ ले येथील सेंट रोबेन पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर काँलेज तसेच न्यु. चैतन्य स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्ट, क्राफ्ट व विज्ञान मेळाव्याचा आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उदघाटन ओरियंटल बँकेचे माजी व्यवस्थापक भुषण जनबंधु यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका पालिका नागपूरचे शिक्षणाधिकारी राजेंद्र फुसेकर,पत्रकार निलेश राऊत, सुधिर नारनवरे, आनंद खापर्डे, विनय बघेले, शाळेचे संचालक जोतीराव बारसागडे, मुख्याध्यापिका धनश्री बारसागडे, अभिज्ञा बागडे, प्रामुख्याने उपस्थित होते.

09/10/2022

कांशीराम साहेब पार्क में याद कर श्रद्धांजलि दी गई...

बहुजनों के राजनीतिक एकीकरण एवं उत्थान के लिए जीवन भर कार्य करने वाले महान समाज सुधारक मान्यवर कांशीराम साहेब की पुण्यतिथि पर उन्हें प्रभाग 2 के राजगृह नगर के मान्यवर कांशीराम साहेब पार्क में याद कर श्रद्धांजलि दी गई । इस कार्यक्रम में प्रमुख उपस्थित सिद्धार्थ गायकवाड सर ( विभागीय उपायुक्त समाजकल्याण विभाग नागपुर), ने मान्यवर कांशीराम साहेब इनके मियूरल पर माल्या अर्पण करके मार्गदर्शन किया । कार्यक्रम का आयोजन साहेबराव सिरसाट, पुरषोत्तम शेंडे, प्रफुल्ल भालेराव, कोठारेजी, नीलेश गजभिये, आतिश रामटेके, राम यादव, दुर्गेश पांडे, पलाश लिंगायत, प्रणय नगरारे, व राजगृह नगर चे नागरिक उपस्थित थे । इस कार्यक्रम का संचालन पंकज वानखेड़े, व आभार दिनेश यादव ( माजी नगरसेवक ) ने किया ।

12/09/2022

१७ व १८ सप्टेंबरला ब्रम्हपूरीत 'झाडीपट्टी नाट्य संमेलन- २०२२' आयोजन

विशेष आकर्षण सिने अभिनेत्री दीपाली सय्यद - भोसले यांची उपस्थिती

31/08/2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संकटावर मात करीत
यश संपादन केले : नितीन बानगुडे (पाटील)

Want your business to be the top-listed Media Company in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस...
दुनिया में रेल्वे के इतिहास में पहली रेल को धक्का मार कर स्टार्ट किया गया
कपिलवस्तू बुद्धविहार उपासक उपासिका संघतर्फे महापुरुषांना अभिवादन
कपिलवस्तू बुद्धविहार उपासक उपासिका संघतर्फे महापुरुषांना अभिवादन
इंदोरा वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे  बाबासाहेबांना अभिवादन नागपूर : इंदोरा चौक येथील इंदोरा वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे भार...
बाबासाहेबांच्या गीतावर थिरकले मुंबईकरांच्या पाय. सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.. ..व्हिडीओ शेवट पर्यंत बघा..#मुंबई ...
१७ व १८ सप्टेंबरला ब्रम्हपूरीत 'झाडीपट्टी नाट्य संमेलन- २०२२' आयोजनविशेष आकर्षण  सिने अभिनेत्री दीपाली सय्यद - भोसले यां...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संकटावर मात करीत यश संपादन केले : नितीन बानगुडे (पाटील)#Motivation #videos #Nitinbang...

Telephone

Website

Address


Nagpur

Other Media/News Companies in Nagpur (show all)
Digi Samachar Digi Samachar
Jaripatka
Nagpur, 440014

Digi Samachar is largest news providing company. We provide the latest domestics and international ne

Nagpur News Channel Nagpur News Channel
Nagpur, 440034

nagpur news channel in local city news

JKV News JKV News
Nagpur, 440010

Jkv News Provides News on crime, political,entertainment,sport and more

Parmatma Ek Jyoti Parmatma Ek Jyoti
Nagpur, 440026

Parmatma ek jyoti is an Epaper website for latest updates...

hingnavidhansabha hingnavidhansabha
हिंगणा
Nagpur, 440023

हिंगणा विधानसभाच्या सर्व राजकीय, साम?

Nav Indian Times Nav Indian Times
Nagpur

देश वीडियो प्रदेश की खबर सबसे पहले आप तक

Dnu 24 News Dnu 24 News
New Shukrawari Gandhi School Ram Cooler Chowk
Nagpur

Dnu 24 news all weys

Burud Samaj Burud Samaj
Nagpur

This page is to discuss about the problems of BURUD SAMAJ, Lets come together and work for our cast...

Bawal Video's Bawal Video's
Rajiv Ghandi Nagar
Nagpur, 440001

Hello Friends Latest News Mein aapka Welcom Hai� Aapko News as All Video mile ge 2 keep follow.?

Standard Bolt Standard Bolt
Deekshabhoomi
Nagpur, 440001

A series of News, Trending Topics and much more things. Stay tune in and connect with us.

Kheyali Entertainment & Media Pvt.ltd. Kheyali Entertainment & Media Pvt.ltd.
Nagpur, 440013

my work just like corporate film, short film, government film, company profile, ect,... shooting, editing, designing, ect,...

Janta Sanvidhan Janta Sanvidhan
Smith Apartment
Nagpur, 441110

Janta Sanvidhan is a News Media agency of Nagpur that covers complete nationwide news.