Ashadeep Sanstha

Ashadeep Sanstha

आशादीप दिव्यांग पुनर्वसन केंद्र व पोषण केंद्र

18/05/2024

श्रींकात चित्रपटाने दिव्यांग मुलांमध्ये चैतन्य

Photos from Ashadeep Sanstha's post 15/05/2024

*श्रीकांत* चित्रपट .
आशादीप अपंग, महिला बालविकास संस्थेतर्फे दृष्टीबाधित स्नेहीमंडळ सदस्यांना प्रेरणा मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी दाखविण्यात आला. एकूण 50 सदस्य 10 लेखनिक म्हणून वेळोवेळी सहकार्य करणारे विद्यार्थी व आम्ही 10 जणी असे 70! दिव्यांग व दिव्यांगस्नेही अशी भावनिक विण असलेल्यांनी एकत्रितपणे आगळावेगळा उत्साहवर्धक अनुभव घेतला. हा चित्रपट eternity mall येथील cine max मध्ये अतिशय शिस्तबध्द पध्दतीने बघतांना इतर उपस्थितांना जाणवले सुद्धा नाही की इतके दृष्टिबाधित विद्यार्थी इथे उपस्थीत आहेत. फक्त अधून मधून होणारा टाळ्यांचा गडगडाट इतरांना बुचकळ्यात टाकत होता.
_कोण आहे श्रीकांत_ त्याने भारतीय शिक्षण व्यवस्थेत अंध व्यक्तीला विज्ञान शाखेत प्रवेश नाकारता येणार नाही यासाठी लढा देवून आपला न्याय्य हक्क प्राप्त केला. संघर्षातून स्वतःला कसे घडवले आणि आज Bollant कंपनीचा मालक पर्यावरणाचा विचार करून उत्पादन निर्मिती करीत आपल्या याशोगाथेने सर्वांचे प्रेरणा स्थान बनला आहे.
एक १०० % दृष्टीबाधित व्यक्ती आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर काय करू शकतो. संघर्ष करून मोठा उद्योगपती कसा होतो हे प्रत्यक्ष पडद्यावर बघण्याचा आनंद घ्या. आणि श्रीकांतला अपेक्षित कार्य ते म्हणजे दिव्यांगांसाठी थोडीफार सहृदयता, संवेदनशिलता बाळगत सहकार्याचा हात पुढे करून संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घ्यावी.... यासाठी आपण प्रयत्नरत राहूया

Photos from Ashadeep Sanstha's post 06/05/2024

प्रियदर्शनी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या प्राध्यापकांची विद्यार्थ्यांसह आशादीप संस्थेस दिव्यांगंच्या समस्या जाणून घेऊन उपयुक्त उपक्रम राबविण्यासाठी भेट आणि चर्चात्मक कार्यक्रम शनिवार दि. ४ मे २०२४ रोजी संपन्न!
सचिव अपर्णा कुळकर्णी यांनी शब्द सुमनांनी उपस्थितांचे स्वागत केले.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रम सुरू झाला. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा शास्त्री यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेची माहिती देत स्नेहीमंडळ सदस्यांना या कार्यक्रमाचा उद्देश विशद करून सांगितला. डीन श्री.कार्तिक उत्तरवार आणि प्रोफेसर संचल तरोडे (प्लेसमेंट अँड ट्रेनिंग ऑफिसर) तसेच दंत तिरंदाज श्री. अभिषेक ठावरे यांचे स्वागत संस्थेचे पोषक उत्पादनं व पुष्पगच्छ तसेच स्मरणिका देवून करण्यात आले.
प्रोफेसर संचल तरोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपस्थित सर्व स्नेहीमंडळ सदस्यांनी नोकरीसाठी येणाऱ्या अडचणी, कोंचिंग संदर्भातील अपेक्षा मोकळेपणाने सांगितल्या. त्या सर्व समस्यांचा विचार करून काही योजना राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. डीन श्री. कार्तिक उत्तरवार यांनी स्नेहीमंडळ सदस्यांना कॉलेज भेटीचे आमंत्रण दिले तसेच पुढील संस्था भेटीत अधिक मुलांना घेऊन येवू आणि सहकार्याचा हात पुढे करु असे आश्वासन दिले. श्री.अभिषेक ठावरे यांनी लेखनिक उपक्रमात पुढाकार घेवून पुढच्या वर्षी नवीन योजना सुरू करू असे सुचविले.
आचल राठोड आणि पलाश हेडाऊ यांनी गीत सादर केले.
संचालन अपर्णा कुळकर्णी यांनी केले. अतिथींचा परिचय सुप्रिया केकतपूरे आणि गीता तारे यांनी आभार प्रदर्शन केले.

15/03/2024

जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमात आपली उपस्थिती प्रार्थनीय!

Photos from Ashadeep Sanstha's post 13/02/2024

आदासा कोराडी शैक्षणिक सहल 10फेब्रुवारी 2024
आशादीप -अपंग, महिला बालविकास संस्थेच्या स्नेहीमंडळ सदस्यांची सहल गुरुवारी सकाळी भगिनी मंडळ येथून सकाळी साडेआठ वाजता आदासासाठी निघाली. बसमध्ये मुलांना महिंद्रा अँड महिंद्रा द्वारे प्रायोजित चविष्ट वडा पावचा नाश्ता देण्यात आला. तसेच संस्थेतर्फे चिक्की, बिस्कीट व पेरू देण्यात आले. नाच गात आदासा केव्हा आले कळलेच नाही. शमी विघ्नेशाचे
दर्शन सर्वांनी शिस्तीत रांगेत जाऊन घेतले. परिसरातील शिव, हनुमान मंदीरात जाऊन दर्शन घेतले. येथील प्रसन्न वातावरण सर्वांना खूप आवडले.
सहलीचा दुसरा टप्पा कोराडी येथील जगदंबा मातेचे दर्शन घ्यायचे असल्याने बसमध्ये बसावेच लागले. कोराडीला उतरल्यावर मंदिराच्या भव्य आवाराने तेथील प्रसन्नतेने सर्वजण भारावले. काहींचे दर्शन झाले तोच आरतीची वेळ झाल्याने सभा मंडपात थांबून आरतीला उपस्थित राहता आले. आरतीनंतर प्रसाद घेऊन प्रसदालयात भोजनासाठी रांगेत मुलांना नेले. आपले ताट हातात घेऊन प्रसाद वाढण्यात येतो पण तेथे सुह्रदयतेचा अनुभव आला त्यांनी सर्व मुलांना जागेवर बसवायला सांगितले व तेथेच ताट देऊन वाढले. त्यामुळे खूप छान वाटले सर्वांनाच! भोजनानंतर मंदिराच्या प्रांगणात वृंदाताई, सौरभ बोरीकर, पलाश हेडाऊ , वेदिका गेडाम, भारती शेंडे,पवन उराडे यांनी भक्तीगीत,भजन गायले . तसेच मुलींनी जसा जमेल तसा गरबा खेळला.तेथे उपस्थित सर्वांनी त्याचा आनंद घेतला तसेच सहलीविषयीही जाणून घेतले.
त्यानंतर मंदिर परिसरात थोडी भ्रमंती व फोटो सेशन केले आणि इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ युथ वेलफेअर लोणारा केंद्राला भेट देण्यास बस पुढे निघाली. इन्स्टिट्यूटच्या सदस्यांनी स्नेहीमंडळ सदस्यांना बसमधून उतरवण्यापासून सभागृहात नेण्यासाठी मनापासून साह्य केले तेथील स्वागत व आदरातिथ्य सर्वानाच भावले. श्रीमती अरूणा सलासल यांनी इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेल्फेअरच्या उद्देशांबद्दल व उपक्रमाबद्दल माहिती सांगितली.
त्यानंतर आशादीपच्या कार्यकारिणी सदस्यांचे स्नेहभेट देवून स्वागत कऱण्यात आले. तेथे सर्व मुलांना चहा नाश्ता देण्यात आला संस्थेच्या वतीने सचिव अपर्णा कुळकर्णी व सहकोषाध्यक्ष डॉ अनघा नासेरी यांनी मनोगत व्यक्त केले. सौरभ बोरीकर व पलाश हेडाऊ यांनी आशादीप संस्था दिव्यांगांसाठी काय काय करते हे उत्कृष्टपणे सांगितले. इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेल्फेअरच्या संचालिका डॉ शिल्पा मिराशी वेळात वेळ काढून मुलांशी संवाद साधण्यासाठी आल्या. त्यांनी सर्वांचा उत्साह वाढवला.त्यांना संस्थेतर्फे स्मरणिका देण्यात आली. तेथील प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन केले होते. मुलांना त्यामुळे खूप मज्जा आली. तसेच स्नेहीमंडळ सदस्यांना संस्थेच्या परिसरातील सैंद्रिय शेती, गोबर गॅस प्लांट, कंपोस्ट खत व इतर प्रयोगशाळांना भेट देऊन त्याबद्दल विस्तृत माहिती त्यांनी दिली. संस्थेतील व्यायामाच्या उपकरणांवरती व्यायाम करण्याचीही मौज मुलांनी घेतली. इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ युथ वेलफेअर मधील कार्यकर्त्यांचा निरोप घेवून मावळत्या सुर्याबरोबर सर्वजण परतीच्या प्रवासासाठी निघालो.
नागपूरला उतरल्यावर सर्व स्नेहीमंडळ सदस्य समाधानाने आपापल्या घरी गेले. जातांना पुढच्या सहलीची उत्सुकता आहे हे आवर्जून सांगून गेले.
एकूण ३९ स्नेहीमंडळ सदस्य सहलीस आले होते.
अपर्णा कुळकर्णी, छायाताई तारे, डॉ. नूतन देव, डॉ. अनघा नासेरी , सुप्रिया केकतपुरे,डॉ. जयश्री पंढरपूरकर, डॉ. वृंदा जोगळेकर वीणा मोहाडीकर , श्री.संजीव केकतपुरे ,इंदिरा देशमुख , इंदुबाई ,कोमल इत्यादी कार्यकारिणी व कार्यालयीन सदस्य सहल यशस्वी करण्यासाठी सहभागी झाले होते.

30/01/2024

सर्वांनी अवश्य यावे

Photos from Ashadeep Sanstha's post 02/11/2023

आशादीप- अपंग, महिला बालविकास संस्था नागपूरच्या पोषण केंद्राच्या 'आहार जागर' उपक्रमांतर्गत 'श्री. शारदा महिला विकास मंडळ 'शंकरनगर ,नागपूर शारदोत्सव २०२३ आणि ' रा.से.समिती.जयप्रकाश मंडल ' नागपूर कोजागरी कार्यक्रमात 🥗आहार: एक गुंतवणूक🥗 हे पथनाट्य सादर करण्यात आले. आशादीप संस्थेद्वारे आहार जागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी आपण संपर्क साधू शकता.

Khub Badhenge Hum 23/09/2023

https://youtu.be/kGKmcQ0PV5g

Khub Badhenge Hum Ashadeep Khub Badhenge Hum

Aharache bharud : Ashadeep Arogya Poshan Kendra, 08/09/2023

https://youtu.be/xxIufO-RIe8
राष्ट्रीय पोषण मासानिमित्त

Aharache bharud : Ashadeep Arogya Poshan Kendra, "Aharache Bharud " is a musical conversation of a mother with her modern college going daughter ,who is obsessed with junk food. although she does not li...

Photos from Ashadeep Sanstha's post 24/07/2023

*आशादीप* अपंग, महिला बाल विकास संस्थेच्या 30 व्या वर्धापन दिन समारंभात दिव्यांगांच्या पालकांनी मुलांना सामान्य माणूस म्हणून वाढवावे आणि भारताचा एक चांगला सामान्य नागरिक घडवावा असा संदेश मा. सौ. कांचनताई यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. सौ. कांचनताई गडकरी यांनी मातृसेवा संघाच्या संस्थापक स्व.कमलाताई होस्पेट व आशादीप संस्थेच्या संस्थापक स्व.उषाताई संत यांना वंदन केले. दिव्यांगांना अंधाराकडून उजेडाकडे नेणारा दीप आणि सकारात्मक आशा निर्माण करणारी संस्था या शब्दात आशादीपचा गौरव केला. आशादीपच्या हितचिंतकांचे अभिनंदन केले. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तयार करणारी 'आशादीप' ही संस्था गत तीस वर्षांपासून काम करते आहे. 'आशादीप'ला पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. दिव्यांग गुणवंतांचे कौतुक केले . रंजन सभागृह मातृसेवा संघ सिताबर्डी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्री सुहास पाटील(सिनियर मॅनेजर CSR ,महिंद्रा अँड महिंद्रा ) आणि डॉ लता देशमुख (सचिव मातृ सेवा संघ ) यांच्या विशेष उपस्थितीत दृष्टीबाधित संगणक प्रशिक्षक प्रशांत वरूडकर यांना स्व. उषा संत पुरस्कार, मानपत्र, स्मृतिचिन्ह, देऊन सन्मानित करण्यात आले. शालांत परीक्षेत "मूकबधिर" गटात प्रथम आलेल्या प्रीतम बागडे यांस 'स्व. वसंत मोघे पुरस्कार', "दृष्टीबाधित " गटात प्रथम क्रमांक मिळविलेल्या इर्फान खान यांस 'स्व.वासंती मोघे पुरस्कार', अस्थीव्यंग गटात अंकीत नंदेश्वर याला आशादीप तर्फे पुरस्कार देण्यात आले. स्नेही मंडळ सदस्यांमध्ये उच्च माध्यमिक परीक्षेत प्रथम विद्यार्थांसाठी या वर्षापासून देण्यात येणारा स्व. प्रतिभा कुळकर्णी स्मृती पुरस्कार सलोनी कापगते हिला देण्यात आला.हा पुरस्कार आशादीप संस्थेचे डॉ. अजय आणि सौ. अपर्णा कुळकर्णी यांनी प्रायोजित केला आहे. बर्लिन येथे पॅरा-ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक विजेता प्रतिक मोपकर, सी.ई.टी परीक्षेत दिव्यांगांमधून प्रथम अर्थव चौधरी, आणि महाराष्ट्र शासनाचा छत्रपती पुरस्कार विजेती मृणाली पांडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. श्री सुहास पाटील यांनी दिव्यांगांच्या प्रगतीकडे बघून आनंद व्यक्त केला आणि सर्व गुणवंतांचे यावेळी अभिनंदन केले. दिव्यांगांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी महेंद्र आणि महेंद्र कंपनी नेहमीच प्रयत्नशील असेल असे आश्वासन दिले. 'आशादीप'च्या सर्व सदस्यांचे व तीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे त्यांनी अभिनंदन केले व ही प्रगती प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
मातृसेवा संघाच्या सचिव डॉ. लता देशमुख यांनी गुणवंतांचा सत्कार हा सर्व दिव्यांगांना प्रेरणादायी राहील व ते प्रगतीपथावर चालतील असा संदेश दिला व 'आशादीप'च्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सूरूवातीला मातृसेवा संघ स्नेहांगण विद्यालयातील चमूने निर्धार गीत सादर केले .
आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा शास्त्री यांनी संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला आणि पुढील वर्षात दिव्यांगांसाठी अभ्यास केंद्र आणि इंटरनेट कॅफे सुरू करीत असल्याची माहिती दिली तसेच किशोरवयीन दिव्यांगांसाठी विशेष मार्गदर्शन प्रकल्प हाती घेणार असल्याचे सांगितले .
त्यानंतर संस्थेच्या सचिव अपर्णा कुळकर्णी यांनी संस्थेचा अहवाल सादर करून संस्थेच्या कार्याची माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे दिली. संस्थेची वाटचाल समाधानकारक आहे असे सांगत,संस्था विनाअनुदानित असून देणगी दात्यांच्या सहयोगाने दिव्यांग सेवेचे शिवधनुष्य पेलण्याचा संस्थेचा प्रयत्न उत्तमरित्या सुरू असून नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी सर्वांनी 'साथी हाथ बढाना ' या तत्त्वावर सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात विविध परीक्षांमध्ये यशस्वी दिव्यांग स्नेहीमंडळ सदस्य, आणि त्यांच्या यशात मदतीचा हात देणाऱ्या लेखानिकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंतांच्या यादीचे वाचन रेखा पारखी यांनी केले. गुणवंतांच्या भेट वस्तू श्री आकाश जैस्वाल यांनी , तर गुणवंतांसाठी खाऊ शारदा महिला विकास मंडळ शंकरनगर नागपूर यांनी प्रायोजित केलेला होता. संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार श्री. लालासाहेब पाटील यांनी संस्थेच्या उपक्रमांची प्रशंसा करून सर्वांना शुभेच्छा देत गुणवंतांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अनघा नासेरी यांनी केले आणि पाहुण्यांचा परिचय डॉ नूतन देव, सुप्रिया केकतपुरे आणि गीता तारे यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन डॉ. सीमा उबाळे यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेच्या सचिव सौ. अपर्णा कुळकर्णी यांनी केले.
कार्यक्रमास स्नेहांगण आणि मातृसेवा संघ यातील सदस्यांची विशेष उपस्थिती होती. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक आशादीपचे सदस्य आणि अनेक समाजसेवी संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेला वर्धापन दिन सोहळा पुढील वाटचालीसाठी प्रेरक!

Photos from Ashadeep Sanstha's post 17/07/2023

आशादीप - अपंग, महिला बालविकास संस्थेचा 30वा वर्धापन दिन मा. सौ. कांचनताई गडकरी यांच्या अध्यक्षतेत संपन्न होत आहे तरी सर्वांनी अवश्य उपस्थीत राहावे ही विनंती.

Photos from Ashadeep Sanstha's post 23/03/2023

जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रम... सस्नेह निमंत्रण

Photos from Ashadeep Sanstha's post 09/02/2023

Commonwealth Association for Health And Disability (COMHAD) या जागतिक स्तरावर आरोग्य व दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेतर्फे दि. 7 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या पदग्रहण सोहळ्यात मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते आशादीप संस्थेचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. उदय बोधनकर, डॉ. यशवंत पाटील, डॉ. रमेश मेहता UK, डॉ. रावत, डॉ. प्राजक्ता कडूस्कर, डॉ . प्रदीप जयस्वाल, डॉ. जया शिवलकर, डॉ. मंजुषा गिरी यांच्यासह अनेक डॉक्टर्स व दिव्यांग स्नेही संस्थांची उपस्थिती होती. आशादीप संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. प्रतिमा शास्त्री व सचिव सौ.अपर्णा कुळकर्णी यांनी आशादीपच्या जेष्ठ्य चमुसह सत्कार स्वीकारला. श्री. लालासाहेब पाटील, छाया तारे, सौ. वनिता पाटील, डॉ. नूतन देव, डॉ. वृंदा जोगळेकर यांची उपस्थिती होती.

04/01/2023

लुईस ब्रेल यांना विनम्र अभिवादन

18/12/2022

दृष्टीबाधित भारतीय क्रिकेट संघाचे मनपूर्वक अभिनंदन

Photos from Ashadeep Sanstha's post 11/12/2022

भावविश्व दिव्यांगांचे या कार्यक्रमात....

07/12/2022
Photos from Ashadeep Sanstha's post 20/08/2022

राष्ट्र सेविका समिती नागपूर विभागाद्वारे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ देशभक्तीपर समूहगीत सादरीकरणाच्या उपक्रमात आशादीपच्या दृष्टिबाधीत मुलींच्या चमूने भाग घेऊन उत्कृष्ट गीत सादर केले . गाण्याची प्रॅक्टिस अंध विद्यालयातील शिक्षिका अवंती देशपांडेनी करून घेतली. याप्रसंगी मा. प्रमिलाताई मेंढे यांचे आशीर्वाद मुलींना लाभले.

Photos from Ashadeep Sanstha's post 18/07/2022

*ग्रहणशक्ती विकसित करून यशाचे मानकरी व्हा!*
दिव्यांग गुणवंतांना मा.खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचा संदेश.

*आशादीप* अपंग, महिला - बाल विकास संस्थेच्या *29* वा वर्धापनदिन सोहळा 16 जुलै 2022 रोजी भगिनी मंडळ येथे संपन्न. वर्धापन दिन समारोहाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाला. पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी मा.खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.लालासाहेब पाटील, डॉ. प्रतिमा शास्त्री, सौ. अरुंधती महाजन, श्री बसंत कुमार ओस्त्वाल, सौ. अपर्णा कुळकर्णी यांची उपस्थिती होती. प्रारंभी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निर्धारगीत सादर केले. त्यानंतर
संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्रतिमा शास्त्री यांनी आपल्या प्रास्ताविकात पुढील योजनांची माहिती दिली. दीव्यांग सपोर्ट सेल महाविद्यालयात स्थापन होण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगतले. सचिव अपर्णा कुळकर्णी यांनी संस्थेचा अहवाल सादर केला.
स्व. उषा संत स्मृती पुरस्कार दंत तिरंदाज - उजवा हात पोलीओग्रस्त असलेल्या श्री. अभिषेक ठावरे यास मान्यवरांच्या हस्ते रोख राशी,मानपत्र,स्मृतिचिन्ह , शाल व श्रीफळ देऊन सहर्ष प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. अभिषेक ठावरे म्हणाले की दिव्यांगांनी आत्मनिर्भरता अंगिकरण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.
शालांत परीक्षेत मूकबधिर गटात प्रथम आलेल्या किरण राठोड हिस 'स्व. वसंत मोघे पुरस्कार ' देण्यात आला.तर दृष्टिबाधीत गटातून प्रथमा आलेल्या राजाराम यदुवांशी यास ' स्व. वासंती मोघे पुरस्कार देण्यात आला.
लहान वयात अंबाझरी तलावात 2 km चे अंतर पोहून अनोखी कामगिरी करणाऱ्या तसेच राष्ट्रीय पँराजलतरण स्पर्धेत 1सुवर्ण आणि 2 रजत पदक मिळविणाऱ्या *दृष्टिहीन ईश्वरी पांडे* हीचा विशेष सत्कार करण्यात आला.
आपल्या भाषणात मा.खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी अभ्यासा सोबतच इतर गुणही विकसित करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. नाउमेद न होता यशाची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी कष्ट घ्या असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात श्री. लालासाहेब पाटील यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. गुणवंतांचे अभिनंदन करून शुभेछा दिल्या.
सर्व गुणवंतांचा अभिनंदन सोहळा मा.खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
गुणवंतांना भेटवस्तू भारतीय जैन संघटना नागपूर सेंट्रल, महिला शाखा नागपूरच्या पूजा कोठारी आणि पूजा ओस्तवाल यांच्या तर्फे प्रायोजित करण्यात आल्या.
आणि खाऊची पाकिटे श्री. शारदा महिला विकास मंडळ, शंकरनगर नागपूर यांनी प्रायोजित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. अनघा नासेरी यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन डॉ. वृंदा जोगळेकर यांनी केले. सुप्रिया केकतपुरे यांनी गुणवंतांची यादी जाहीर केली.
आभार प्रदर्शन सचिव अपर्णा कुळकर्णी यांनी केले.
IMA नागपूर चे अध्यक्ष डॉ. प्रकाश देव, डॉ.श्याम बाभुळकर, डॉ. सुनीता महात्मे , डॉ. नटराजन, श्री. किरण गोखले इ. मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. दिव्यांग विद्यार्थी,त्यांचे पालक, आशादीपचे संस्थेचे स्नेही, सदस्य आणि अनेक समाजसेवी संस्थाचे सदस्य उपस्थित होते.
चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

12/07/2022

सर्वांनी दिव्यांगांना प्रोत्साहित करण्यासाठी अवश्य यावे.

Photos from Ashadeep Sanstha's post 19/04/2022

समाजभान ' वाढविणारी बुद्धीबळ स्पर्धा संपन्न!

आशादीप अपंग ,महिला बाल विकास संस्था ,रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊन टाऊन आणि विदर्भ संशोधन मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टीबाधित दिव्यांग आणि डोळस व्यक्ती यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 17 एप्रिलला करण्यात आले होते. दीपप्रज्वलनाने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.या स्पर्धेचे उदघाटन IPDG रोटरेरियन शब्बीर शकिर यांचे हस्ते झाले. त्यांच्या जोशपूर्ण भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला . त्यांनी सर्वाना यातून उत्तम व्यक्तिमत्त्व विकास साधा यासाठी शुभेच्छा दिल्या. विदर्भ संशोधन मंडळाचे कार्यवाह डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी दिव्यांगस्नेही उपक्रमात वेळोवेळी सहकार्य करून त्यांचा विश्वास वाढवताना आम्हाला आनंद होत आहे असे सांगून सर्वाना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री. लालासाहेब पाटील यांनी आशादीपच्या सर्व कार्यकारिणी चमुचे अभिनंदन करून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. चेस असोसिएशन नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष श्री. सच्चिदानंद सोमण यांनी दृष्टीबधित दिव्यांग आणि डोळस यांना एकमेकांशी उत्तमरित्या खेळता यावे यासाठी उपयुक्त सूचना देऊन खेळास प्रारंभ केला.
उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक, सूत्र संचालन व आभार प्रदर्शन संस्थेच्या सचिव अपर्णा कुळकर्णी यांनी केले.

स्पर्धेसाठी प्रत्येकी ४ खेळाडू असणारे ४गट दृष्टीबधित आणि ४ गट डोळस असे करण्यात आले होते आणि त्यांचे ४ राऊंड / फेऱ्यांमध्ये सामने झाले . ज्या स्पर्धकांना टीम मध्ये घेता आले नाही , त्यांना ही उपस्थित प्रेक्षक आणि चेस असोसिएशन नागपूरच्या अनुभवी डोळस खेळाडू बरोबर खेळण्याची संधी देण्यात आली
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे वयोगट 10 वर्ष ते 78 वर्षे अशी खास उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी सर्वच स्पर्धकासाठी खास ब्रेल प्रमाणपत्रे बनविण्यात आली होती.
दुपारी चार वाजता प्रमुख अतिथी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित श्री. विजयजी मुनीश्वर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर श्री. विजयजी मुनीश्वर ,कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा शास्त्री ,रोटरी क्लब ऑफ नागपूर डाउन टाऊनचे अध्यक्ष डॉ. हृषीकेशजी मायी, नागपूर सक्षमचे श्री. शिरीशजी दारव्हेकर उपस्थित होते.
दृशिबाधित गट
विजेता
लुई ब्रेल टीम - ज्ञानीराम, तिजन, सौरभ व सचिन
उपविजेता
शुभांगी, मृणाली ,किरण व अभिषेक
डोळस गट
विजेता
व्हेटरन टीम
श्री शामकुंवर,श्री बरहानपुरे,श्री. अगस्ती व श्री बहादुरे
उपविजेता
ज्युनियर टीम
दीप, प्रथमेश आरव व सप्तक
या शिवाय प्रत्येक बोर्ड वरील सर्वोत्तम दृष्टिबाधीत आणि डोळस गटातून खालील.पारितोषिके देण्यात aLi-
बोर्ड १ तिजन व श्री शामकुंवर
बोर्ड. २ ग्यानिराम आणि श्री बरहानपुरे
बोर्ड ३ सौरभ व श्री अगस्ती
बोर्ड ४ राजेश व श्री बहादुरे
या शिवाय सर्वोत्तम अंध महिला खेळाडू, वयाने सर्वात ज्येष्ठ व सर्वात लन खेळाडूंनाही विशेष पारितोषिके देण्यात आले
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.हृषीकेशजी मायी म्हणाले मी नेत्रतज्ञ असल्याने माझा दृष्टीबधितांशी नेहमीच संपर्क येतो ,त्यांच्या भावना व समस्या मला माहिती असल्याने माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ही स्पर्धा घेण्याची माझी इच्छा होती , तुमच्या सर्वांच्या उत्साही सहभागाने आनंद होत आहे असे ते म्हणाले. श्री. विजयजी मुनीश्वर यांनी खेळाडूंच्या जीवनात योगाचे खूप महत्त्व आहे, सर्वांनी योगिक जीवनशैलीचा अवलंब करावा असे आवाहन केले. आणि त्यांच्या जीवनातील त्यांच्या आईचे,जनार्दन स्वामींचे आणि अनुशासित जीवनशैलीचे महत्त्व सांगून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आणि सर्व खेळाडूंना सतत प्रयत्नशील राहून विजयच्या दिशेने वाटचाल करत राहण्यासाठी प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या.
श्री. शिरिषजी दारव्हेकरांनी सर्वांचे अभिनंदन करून आपल्या रेडिओ अक्ष विषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. प्रतिमा शास्त्री यांनी अध्यक्षीय समारोपात सर्वांचे अभिनंदन करून या वैशिष्ट्यपूर्ण आयोजनाची भूमिका विशद केली.
संपूर्ण स्पर्धा चेस असोसिएशन नागपूरच्या सहकार्याने पार पडली. श्री. सच्चिदानंद सोमण आणि श्री. भूषण श्रीवास यांच्यासह सर्व चमूने बहुमोल कामगिरी केली.तसेच रोट्रॅक्ट कमुनिटी चमुचे विशेष सहकार्य लाभले.
रोटरी क्लब ऑफ नागपूर डाउनटाउन तर्फे गरजू अंध व्यक्तींना पांढऱ्या काठी चे वाटप करण्यात आले .
स्पर्धेचा अहवाल आणि निकाल /(विजयी स्पर्धकांचे नावं) सहसचिव सुप्रिया केकतपुरे यांनी सादर केला
संचालन संस्थेच्या सचिव अपर्णा कुळकर्णी यांनी केले
आभारप्रदर्शन रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊन टाऊनचे सचिव श्री.अभिजित ठाकरे यांनी केले.

Photos from Ashadeep Sanstha's post 10/02/2022

आशादीप तर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा आभासी व प्रत्यक्ष बक्षीस समारंभ संपन्न!
प्रथम - कुणाल दुरुगवार
द्वितिय - हर्ष गोलाईत , तृतीय - अभिषेक शुक्ला
उत्तेजनार्थ -सलोनी कापगते व हिमांशू निंबुळकर परीक्षक म्हणून डॉ. साधना शिलेदार आणि अवंती देशपांडे यांनी काम बघितले.

Photos from Ashadeep Sanstha's post 03/12/2021

सामावून घेऊ दिव्यांगांना देशविकासात, साथ देऊ त्यांच्या उत्कर्षात

Photos from Ashadeep Sanstha's post 02/09/2021

आशादीप संस्थेस दीपस्तंभ फौंडेशन (जळगाव )चे श्री. यजुर्वेन्द्र महाजन यांची सदिच्छा भेट! क्षणचित्रे

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Vidarbha Sansodhan Mandal Premises, Plot No. 1, West High Court Road, Civil Lines
Nagpur
440001

Opening Hours

Monday 12am - 5pm
Tuesday 12am - 5pm
Wednesday 12am - 5pm
Thursday 12am - 5pm
Friday 12am - 5pm
Saturday 12am - 5pm

Other Charity Organizations in Nagpur (show all)
KHUSH NGO KHUSH NGO
215, Anand Bhavan, Opp Nirmal Urjjwal Bank, Besides Canara Bank, Nandanvan Main Road, Gurudeo Nagar Square
Nagpur, 440009

Khush Multipurpose Society is a Charitable Organization based in Nagpur working on Cancer Awareness & Training, HIV Awareness & Training and Physical, Emotional, Psychological and ...

Orange City Arthritis Foundation, Nagpur Orange City Arthritis Foundation, Nagpur
Arthritis & Joint Replacement Clinic
Nagpur

Orange City Arthritis Foundation is a registered charitable organisation working in the field of Art

AIGI SC/ST EWA-NGP-56 AIGI SC/ST EWA-NGP-56
Nagpur, 440001

Sarkar Group Nagpur Sarkar Group Nagpur
Kamal Road, Binaki, Vaishali Nagar
Nagpur, 440017

The Power of One Welfare Foundation The Power of One Welfare Foundation
Plot No 32, Central Excise Colony, Sneh Nagar, Near Chhatrapati Sq, Wardha Road
Nagpur, 440015

The Power of One Welfare Foundation is an NGO registered in the year 2016.

Vishwakarma Vikas Bahuuddeshiy Sanstha Vishwakarma Vikas Bahuuddeshiy Sanstha
Nagpur, 440009

To help the people of Vishwakarma Samaj to improve their Condition on various aspect i.e Social, Physical, Mental etc..

Jeshtha Mitra Mandal Jeshtha Mitra Mandal
Nagpur, 440014

Gsdc Orange Canine Confederation Nagpur Gsdc Orange Canine Confederation Nagpur
Bezonbagh
Nagpur, 440014

GSDC - ORANGE CANINE CONFEDERATION, NAGPUR Chapter. It was started in the year 2018 by a team of ardent German Shepherd Dog lovers.

Devanshi Foundataion Devanshi Foundataion
Pratap Nagar Square, Pratap Nagar
Nagpur, 440022

DEVANSHI FOUNDATION IS A REGISTERED CHARITABLE ORGANIZATION WORKING TOGETHER WE CAN CREATE A COMMUNITYOF SUPPORT & ACCEPTANCE FOR ALL. THE FOUNDATION ENSURES THE SERVICES TO HU...

Sir Gangadharrao Chitnavis Trust Sir Gangadharrao Chitnavis Trust
56, Temple Road, Beside Hislop College, Civil Lines
Nagpur, 440001

Chitnavis Trust works in the field of Human Welfare & Rights, Medical Relief & Education, Medical Relief , Educational Schools for the poor.

Saksham Nagpur Saksham Nagpur
Madhav Netrapedhi, 16, Devadutta Bhavan, Ranapratap Square, Pratap Nagar
Nagpur, 440022

Samadrishti, Kshamata Vikas Evam Anusandhan Mandal (SAKSHAM) is a charitable national organization was established with an aim to bring all the persons with various disabilities in...