CFP Maharashtra

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना .

09/11/2022

धानाची शेती परवडत नाही म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तीस शेतकऱ्यांनी घेतली मध्य प्रदेशातील बैतुल (पाढर) गावातील शेतकऱ्यांची भेट. भेटीदरम्यान तुती लागवड बद्दल घेतले मार्गदर्शन......
पाच एकर शेती असून सुद्धा शेतकऱ्याकडे पुरेपूर पैसा वाचत नाही धानाच्या शेतीचे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे , धान ची शेती ही परवडण्यासारखी राहिलेली नाही ,अशा स्थितीमध्ये धान शेतीला पर्यायी शेती म्हणून व व्यवसायिक दृष्टिकोन बाळगून शेतीला नवीन जोडधंदा द्यावा या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुका गोरेगाव तालुका व आमगाव व तीरोडा तालुका येथील ठराविक शेतकरी यांनी एकत्र येऊन तुती पिकाचे नियोजन केलेल आहे., शासनाची कोणतीही मदत न घेता शेतकरी समोर आलेले आहेत शेतकऱ्यांनी पीक पद्धती व रेशीम लागवडीचे तंत्र तंत्र त्या ठिकाणी जाऊन पाहून आलेले आहेत, आता समोर हे शेतकरी प्रत्येकी एक एकर आपल्या शेतावर लागवड करून रेशीम शेतीला सुरुवात करणार आहेत तरी हा प्रवास शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचा आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे ,काटेकोर पणे मॅनेजमेंट व मेहनत घेतली तर कोणतेच पीक अशक्य बाब नाही .शेतकरी हा मेहनतीने व जिद्दीने काम करत असतो त्याचे मोल शेतकऱ्याला भेटत असतात .नक्कीच शेतकरी तुती लागवडीमध्ये प्राविण्य होतील व एक नवीन प्रयोग आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या तालुक्यासाठी सर्वांसमोर उभा राहील . , ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अभ्यास दौरा केला त्या ठिकाणी अशिक्षित आदिवासी महिला ही शेती करत आहेत अख्खा गाव फक्त आणि फक्त तुती लागवडीमध्ये लाखो रुपये कमवत आहेत आपला जिल्हा तर शिक्षित आणि प्रबळ आहे तर आपण का करू शकत नाही अशी मानसिकता तयार करून शेतकऱ्यांनी हा पाऊल उचललेला आहे.. माझी विनंती राहील आपण सुद्धा या शेतीमध्ये सहभागी होऊन एक एकर शेतीस आपण सुद्धा करावं आपल्याला पुरेपूर मार्गदर्शन तांत्रिक बाबी समजावण्यात येतील ,व मार्केट व शेतीचे मॅनेजमेंट ह्या सर्व बाबी आपल्याला समजविण्यात येतील.,. कोणतीच बाब करण्याच्या आधी आपन व्यक्ती त्या गोष्टीचे निगेटिव्ह पॉईंट शोधत असतो, आणि निगेटिव्ह बाब तयार होत असल्यामुळे तो शेतकरी त्याच ठिकाणी खचला जातो व त्या प्रयोगामध्ये तो अपयशी ठरत असतो जर प्रामाणिक ठाम आपल्याला विश्वास असेल तर आपण प्रत्येक पिकांमध्ये यशस्वी होऊ शकतो व तो काम पूर्ण होऊ शकतो . .........धन्यवाद.....

Photos from EGS Department, Maharashtra's post 01/11/2022
28/10/2022

https://www.facebook.com/MahaMGNREGS/posts/452711437050279

समुद्रातली मासेमारी ते शेततळ्यातला मत्स्त्यव्यवसाय व्हाया मनरेगा

"नमस्कार, मी दत्तू ठाकरे, पालघर जिल्ह्यातल्या दोल्हारी बु. या आदिवासी गावात मी राहतो. माझी ५ एकर जमीन आहे पण आम्ही भाताशिवाय दुसरं कोणतंच पीक घेत नव्हतो. त्यामुळे भाताचा सीजन संपला की आम्ही १८, १९ वर्षांचे गावातले सगळे तरुण रोजगाराच्या शोधात मुंबई, सूरत सरख्या शहरांमध्ये स्थलांतरीत व्हायचो. कोणी मजुरी करायचं तर कोणी मासेमारीच्या बोटीवर कामाला लागलायचं. मी सुद्धा सातपाटी बंदरवरून मासेमारीसाठी समुद्रात जायचो ज्याचे मला वर्षाकाठी ६००० रुपये मिळायचे.

एकदा असंच मासेमारीसाठी दूर समुद्रात असताना आमच्या बोटीची मशिन बंद पडली. चार पाच दिवस समुद्रात इथं तिथं भरकटत राहिलो. जवळचं सगळं खाणं आणि पाणी संपलं होतं. जीव वाचण्याचे काहीच मार्ग दिसत नव्हते. आता आपल्याला इथंच मरण येणार आणि घरच्यांना कळणारही नाही. असा विचार करून करून दिवस ढकलत होतो. एका बेटावर अडकलो. कोणी रडत होतं तर कोणी उदास बसून राहायचं. काही दिवसांंनी नेव्हीच्या लोकांनी आम्हाला वाचवलं आणि आम्हाला मुंबईत भाऊच्या धक्क्यावर सोडलं. मी घरी आलो तेव्हा घरात मरणकळा पसरली होती. माझी आई धाय मोकलून रडायला लागली तिला वाटलेलं तिचा मुलगा मेला.

त्यानंतर मात्र मी गाव सोडून गेलो नाही. आता माझा मुलगा विकास आणि मी मिळून इथं शेती करतो. २०११ मध्ये कृषी विभागातून आम्हाला विहीर मंजूर झाली. त्या विहीरीच्या पाण्यावर पावसाळ्यानंतर आम्ही भाजीपाला घेतो. विहीरीच्या जोरावर कलिंगड घेतलं आणि स्वतः बाजारात नेऊन विकलं. मात्र १७ फूट असलेल्या या विहरीचं पाणी दिवाळीनंतर आटत जायचं आणि संपूर्ण उन्हाळा खडखडाट असायचा. म्हणून गावातले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बाबू मोरे सर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याविषयी मार्गदर्शन केलं. माझा मुलगा विकास आणि मोरे सर यांनी प्रयत्न केल्यामुळे २०२१-२२ मध्ये मी जवळपास १३ गुंठे जागेत ३०x३० चं शेततळं बांधलं.

शेततळ्यातलं पाणी मी पावसाळ्यानंतर शेतीसाठी वापरणार आहे. तसंच शेततळ्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मासेही सोडले आहेत. माझं मासेमारीचं ज्ञान मी आता इथं वापरतोय. शेततळं बांधलं त्या १३ गुंठे जागेत. मला फारतर ५००० रुपयांचं भात मिळालं असतं. पण आता शेततळ्यात सुरू केलेल्या मस्त्यव्यवसायाने आणि त्या पाण्यावर करता येणाऱ्या चवळी, गवार, कलिंगड यांसारख्या पिकांमुळे मला भातापेक्षा जास्त उत्पन्न मिळेल अशी खात्री आहे. माझी तिन्ही मुलं शिक्षण घेत आहेत. मोठा मुलगा विकास MSc च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. मी आणि माझी बायको शिकलो नाही पण मुलांना शिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करत आहोत. त्यात मनरेगासारख्या योजनांचा आम्हाला पाठींबा मिळत आहे."

- दत्तू ठाकरे
गाव - दोल्हारी बु.
ता. विक्रमगड
जि. पालघर
#मनरेगा #शेततळं #यशोगाथा
CMOMaharashtra Department of Panchayats & Rural Development Maharashtra Desha महाराष्ट्र देशा Ministry of Rural Development, Government of India

Photos from CFP Maharashtra's post 08/10/2022

ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण .प स.तिरोडा प्रशिक्षणाचा समृद्धी बजेट व दशवार्षिक नियोजन चा भाग म्हणजे शिवार फेरी, गाव फेरी ,कुटुंब सर्वेक्षण , व गाव सभा उपस्थित.
नरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश हरिंखेडे सर , गटविकास अधिकारी श्री लील्हारे सर , पंचायत समिती उपसभापती श्री जमैवार सर.
चांदोरी ग्रामपंचायतचे सरपंच अल्केश मिश्रा जी

, सहायक कार्यक्रमाधिकारी, सुनील कटरे सर, राजेश मेश्राम सर, तुरकर सर सर्व तांत्रिक सहायक,सर्व ऑपरेटर,
सीएफपी टीम:- ज्ञानेश कुमार लांजेवार, मिलिंद पुंजे अजित गौतम गजेंद्र गौतम.
प्रशिक्षक :-
कोटांगले सर , नंदेश्वर सर, राकेश बघेले सर

Photos from CFP Maharashtra's post 22/09/2022

GRS पंचायत समिती साकोली
अभिप्राय रोजगार सेवक

*महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत साकोली येथे ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण दिनांक 19 सप्टेंबर 2022 ते 21 सप्टेंबर 2022 पर्यंत आयोजित करण्यात आले.*

सदर उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिति साकोली चे गट विकास अधिकारी के डी टेंभरे सर, मा. गणेशजी आदे साहेब सभापती पंस साकोली,मा.करंजेकर मॅडम उपसभापती साकोली झलके सर कृषि अधिकारी पंचायत समिति साकोली उपस्थित होते.

♻️ प्रथम दिवसी सर्व ग्राम रोजगार सेवकांचे सौ संध्या भैसारे, सौ अनिता चांदुरकर, कुमारी प्रियंका गाडगीळ यांनी पुष्प आणि टिळा लावून रोजगार सेवकांचे आगमन आणि स्वागत केले.
♻️त्यानंतर नोंदणी आणि परिचय करण्यात आला. सदर प्रशिक्षणासाठी किट आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.

♻️प्रास्ताविक पंचायत समिती साकोलीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अतुल गीमेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय टेंभरे सर गट विकास अधिकारी पंचायत समिती साकोली,व झलके सर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली . कार्यक्रमाचे संचालन कु. प्रियांका गाडगीळ यांनी केले.सन्माननीय गट विकास अधिकारी यांनी ग्राम रोजगार सेवकांना संबोधित करताना सांगितले की गावातील सर्व जॉब कार्ड यांना लखपती कसं करता येईल त्यासाठी हा प्रशिक्षण आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने सर्व ग्राम रोजगार सेवकांनी संबंधी कार्यपद्धती अवलंबावी ह्या कार्यक्रमासाठी प्रवीण प्रशिक्षक *माननीय राकेश बघेले तसेच प्रशांत कोल्हटकर* यांनी तिन्ही दिवशी मोलाचे मार्गदर्शन केले.

♻️पहिल्या दिवशी मी परिपूर्ण कसा, मनरेगा विषयी बदललेला दृष्टीकोण,खोमारपाडा जिल्हा पालघर गावाची समृद्धीची वाटचाल, आपल्या गावाचा उत्प्रेरक, समृद्धी बजेट, प्रत्येक कुटुंब लखपती साठी कुटुंब सर्वेक्षण व आदर्श पाणलोट नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले,

♻️दुसऱ्या दिवशी गाव फेरी व शिवार फेरी नियोजनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत चारगाव येथे सकाळी साडेआठ वाजेपासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
♻️त्यात शिवार फेरी व गाव फेरी करण्यात आली. मध्यान भोजनानंतर
♻️चारगाव ग्रामपंचायत येथे तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता बद्दल प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
♻️ त्यानंतर प्रत्येक कुटुंबाच्या घरी ग्राम रोजगार सेवक व यंत्रणा यांनी कुटुंब सर्वेक्षण केलेल्या बाबत चर्चा करण्यात आली.
♻️तिसऱ्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय चारगाव येथे नियोजित वेळी प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू झाले.
♻️त्यात रोजगार सेवकांना माझ्या स्वतःच्या गावाचे नियोजन, व भूमिका केली, रोजगार सेवक हे फक्त रोजगार देणारे मित्र नसून ते समृद्धी मित्र असल्याचे सांगण्यात आले. या विषयांतर्गत अँड्रॉईड मोबाईल आणि मनरेगा याचा समन्वय कसा साधता येईल हे प्रशिक्षकांनी ग्राम रोजगार सेवकांना सांगितले.

♻️कोणतीही योजना घेतानी ग्राम रोजगार सेवकांनी लाभार्थ्यांची कशी संवाद साधता येतील तसेच काही अडचणी आल्यास लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून आपला गाव कसा समृद्ध करता येईल याविषयी माननीय राकेश बघेले सर यांनी विस्तृत अशी माहिती दिली.

♻️ सदर तीन दिवसीय कार्यक्रम हा अगदी खेळीमेळी च्या वातावरणात संपन्न झाला . यात विविध प्रश्नांच्या बाबतीत खूप चर्चा झाल्या आणि त्यांचे निराकरण सुद्धा झाले .

♻️समारोपिय दिवशी विपिन उराडे सर जिल्हा समन्वयक भंडारा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यात माननीय मेढे सर ग्राम विस्तार अधिकारी पंचायत समिती साकोली उपस्थित होते. यात तीनही दिवशी उपस्थित सर्व रोजगार सेवकांना प्रशस्तीपत्र माननीय मेढे सर, माननीय सरपंच मोहनलाल लंजे, उपसरपंच सौ लता भीवगडे उपस्थित होते. झालेल्या ह्या तीनही दिवसाच्या कार्यक्रमात ग्राम रोजगार सेवक सोविंदराव हटकर, अविनाश बोरकर, हरिभाऊ येडणे, श्री बोपचे, होमनाथ पुरामकर, कैलास झोडे, रामेश्वर टेंभुणें, श्री राऊत यांनी ग्राम रोजगार सेवकांच्या समस्या इत्यादी विविध विषयांवर तीनही दिवशी विचारणा करून संकेचे समाधान केले. सोबतच आपल्या विविध मागण्यांचे मा आयुक्त नरेगा यांना निवेदन दिले. ह्या सर्व कार्यक्रमात कार्यक्रमाचे संचालन कुमारी प्रियंका गाडगीळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय अतुलजी गिमेकर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती साकोली,तांत्रिक पॅनल अधिकारी सर्वश्री मिलिंद लांजेवार, सुनील जी कापगते, यशवंत भेंडारकर, पंकज टेंभुर्णे, श्याम दयाल कांबळे, विलास रामटेके, हिमालय मेश्राम, केडी भगत, प्रियंका गाडगीळ, अजित कापगते, महेंद्र तुरकर, संध्या भैसारे, अनिता चांदुरकर,व सर्व ग्राम रोजगार सेवक आणि ग्राम पंचायत चारगाव येथील सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Photos from CFP Maharashtra's post 22/09/2022

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत साकोली येथे ग्राम रोजगार सेवक प्रशिक्षण दिनांक 19 सप्टेंबर 2022 ते 21 सप्टेंबर 2022 पर्यंत आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिति साकोली चे गट विकास अधिकारी के डी टेंभरे सर, माननीय गणेशजी आदे साहेब सभापती पंस साकोली,माननीय करंजेकर मॅडम उपसभापती साकोली झलके सर कृषि अधिकारी पंचायत समिति साकोली उपस्थित होते. प्रथम दिवसी सर्व ग्राम रोजगार सेवकांचे सौ संध्या भैसारे, सौ अनिता चांदुरकर, कुमारी प्रियंका गाडगीळ यांनी पुष्प आणि टिळा लावून रोजगार सेवकांचे आगमन आणि स्वागत केले. त्यानंतर नोंदणी आणि परिचय करण्यात आला. सदर प्रशिक्षणासाठी किट आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक पंचायत समिती साकोलीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अतुल गीमेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय टेंभरे सर गट विकास अधिकारी पंचायत समिती साकोली,व झलके सर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली . कार्यक्रमाचे संचालन कु. प्रियांका गाडगीळ यांनी केले.सन्माननीय गट विकास अधिकारी यांनी ग्राम रोजगार सेवकांना संबोधित करताना सांगितले की गावातील सर्व जॉब कार्ड यांना लखपती कसं करता येईल त्यासाठी हा प्रशिक्षण आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने सर्व ग्राम रोजगार सेवकांनी संबंधी कार्यपद्धती अवलंबावी ह्या कार्यक्रमासाठी प्रवीण प्रशिक्षक माननीय राकेश बघेले तसेच प्रशांत कोल्हटकर यांनी तिन्ही दिवशी मोलाचे मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी मी परिपूर्ण कसा, मनरेगा विषयी बदललेला दृष्टीकोण,खोमारपाडा जिल्हा पालघर गावाची समृद्धीची वाटचाल, आपल्या गावाचा उत्प्रेरक, समृद्धी बजेट, प्रत्येक कुटुंब लखपती साठी कुटुंब सर्वेक्षण व आदर्श पाणलोट नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले, दुसऱ्या दिवशी गाव फेरी व शिवार फेरी नियोजनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत चारगाव येथे सकाळी साडेआठ वाजेपासून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यात शिवार फेरी व गाव फेरी करण्यात आली. मध्यान भोजनानंतर चारगाव ग्रामपंचायत येथे तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता बद्दल प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाच्या घरी ग्राम रोजगार सेवक व यंत्रणा यांनी कुटुंब सर्वेक्षण केलेल्या बाबत चर्चा करण्यात आली. तिसऱ्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय चारगाव येथे नियोजित वेळी प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू झाले. त्यात रोजगार सेवकांना माझ्या स्वतःच्या गावाचे नियोजन, व भूमिका केली, रोजगार सेवक हे फक्त रोजगार देणारे मित्र नसून ते समृद्धी मित्र असल्याचे सांगण्यात आले. या विषयांतर्गत अँड्रॉईड मोबाईल आणि मनरेगा याचा समन्वय कसा साधता येईल हे प्रशिक्षकांनी ग्राम रोजगार सेवकांना सांगितले. कोणतीही योजना घेतानी ग्राम रोजगार सेवकांनी लाभार्थ्यांची कशी संवाद साधता येतील तसेच काही अडचणी आल्यास लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून आपला गाव कसा समृद्ध करता येईल याविषयी माननीय बघेल सर आणि कोल्हटकर सर यांनी विस्तृत अशी माहिती दिली. सदर तीन दिवसीय कार्यक्रम हा अगदी खेळीमेळी च्या वातावरणात संपन्न झाला यात विविध प्रश्नांच्या बाबतीत माननीय सोविंदराव हटकर कार्याध्यक्ष रोजगार सेवक संघटना भंडारा यांनी तीनही दिवशी विविध प्रश्नावर चर्चा करून समस्यांचे निराकरण केले. समारोपिय दिवशी विपिन उराडे सर जिल्हा समन्वयक भंडारा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यात माननीय मेढे सर ग्राम विस्तार अधिकारी पंचायत समिती साकोली उपस्थित होते. यात तीनही दिवशी उपस्थित सर्व रोजगार सेवकांना प्रशस्तीपत्र माननीय मेढे सर, माननीय सरपंच मोहनलाल लंजे, उपसरपंच सौ लता भीवगडे उपस्थित होते. झालेल्या ह्या तीनही दिवसाच्या कार्यक्रमात ग्राम रोजगार सेवक सोविंदराव हटकर, अविनाश बोरकर, हरिभाऊ येडणे, श्री बोपचे, होमनाथ पुरामकर, कैलास झोडे, रामेश्वर टेंभुणें, श्री राऊत यांनी ग्राम रोजगार सेवकांच्या समस्या इत्यादी विविध विषयांवर तीनही दिवशी विचारणा करून संकेचे समाधान केले. सोबतच आपल्या विविध मागण्यांचे मा आयुक्त नरेगा यांना निवेदन दिले. ह्या सर्व कार्यक्रमात कार्यक्रमाचे संचालन कुमारी प्रियंका गाडगीळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय अतुलजी गिमेकर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती साकोली,तांत्रिक पॅनल अधिकारी सर्वश्री मिलिंद लांजेवार, सुनील जी कापगते, यशवंत भेंडारकर, पंकज टेंभुर्णे, श्याम दयाल कांबळे, विलास रामटेके, हिमालय मेश्राम, केडी भगत, प्रियंका गाडगीळ, अजित कापगते, महेंद्र तुरकर, संध्या भैसारे, अनिता चांदुरकर,व सर्व ग्राम रोजगार सेवक आणि ग्राम पंचायत चारगाव येथील सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Photos from CFP Maharashtra's post 10/09/2022
Photos from CFP Maharashtra's post 09/09/2022

GRS ट्रेनिंग यशदा पुणे येथे आज दिनांक 09/09/2022 ला उपस्थित अप्पर मुख्य सचिव रोहियो श्री नंदकुमार सर , सुमित गोरले सर cfp राज्य समन्वयक महाराष्ट्र ,HRD टीम, राज्य प्रशिक्षक TOT trannar महाराष्ट्र राज्य सर्व उपस्थित.

21/08/2022
Want your organization to be the top-listed Government Service in Nagpur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address

MG नरेगा आयुक्त कार्यालय नागपूर
Nagpur
422103
Other Government Officials in Nagpur (show all)
Job Alert Job Alert
Nagpur
Nagpur

New job alert gov and pvt sector

Hope Education Govt. Job Alert Hope Education Govt. Job Alert
Mominpura
Nagpur, 0712

#Educational News Government Job Alert Government Official

MCED_Nagpur_Udyog_Bhavan MCED_Nagpur_Udyog_Bhavan
Udyog Bhavan Civil Lines
Nagpur, 440001

Manojkumar Suryawanshi, IAS Manojkumar Suryawanshi, IAS
Nagpur

IAS officer Chairman, Nagpur Improvement Trust Metropolitan Commissioner, NMRDA

District Information Office, Nagpur District Information Office, Nagpur
Administrative Building No 1, Third Floor, Civil Lines
Nagpur, 440001

Official Facebook Account of District Information Office, NAGPUR, Directorate General of Information

Gopal sau chef kabab cooking stylish Gopal sau chef kabab cooking stylish
XG3C+X63, Tripur Sundari Temple
Nagpur, 487118

Namaskar hamara YouTube channel mein aap Sabko Swagat hai ,

Humans of GMC Humans of GMC
Medical Square
Nagpur, 440017

This page is created by MARD body 18-19 to showcase the lost feelings and emotions of Humans of GMC

Information Director Office, Nagpur Information Director Office, Nagpur
Old Secretary Building, Civil Line
Nagpur, 440001

Official page of the Director (Information), Nagpur Division, Government Of Maharashtra

रविंद्र मनोहरे रविंद्र मनोहरे
Nagpur, 440001

My Official Page

Incredible Nagpur Incredible Nagpur
Nagpur, NAGPUR

NAGPUR a fab. city...

Nagpur Rock Nagpur Rock
Nagpur, 440034

I will created this page for help people.