Pimpri Chinchwad city PRO
या पेज वर पत्रकारांसाठी घडलेल्या सर्व घडामोडींचे वृत्तांकन मिळेल.
या पेज वर पत्रकारांसाठी घडलेल्या सर्व घडामोडींचे वृत्तांकन मिळेल.
संजीवनी विटा लाइफ हॉस्पिटलचा आर्थिक हितापोटी वृद्ध महिलेच्या जिवाशी खेळ
डॉ किशोर मोडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी - पोलिस हवालदार कैलास लबडे
पिंपरी चिंचवड (प्रतिनीधी) दि.२६ मार्च:- संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल औंध येथील डॉक्टर डॉ किशोर मोडकर यांनी आर्थिक हितापोटी माझी आई जनाबाई बंसीलाल लबडे (वय ७३ वर्ष) यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे वर्तन केल्यामुळे त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस हवालदार कैलास लबडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे. या वेळी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भा.वी. कांबळे पत्रकार कक्षात पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी प्रशांत शितोळे, सौ. संगीता ताई वानखेडे, श्री राजेश बागुल, संतोष मेहत्रे, कैलास लबडे, रवींद्र लबडे, शोभा चव्हान, जाहिन अंसारी, ओमकार लबडे इत्यादी उपस्थितीत होते.
या वेळी लबडे म्हणाले की, आईचा उजवा पाय ७ महिन्यापूर्वी हेवी शुगर मूळे घुडग्याखालुन कापलेला आहे.त्याच पायावर २४ फेब्रूवारी ला पडल्यामुळे संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल औंध येथे एडमिट केले होते.एक्सरे काढला त्यावेळी समजले की मांडीच्या हाडाला हेयर लाइन फ्रैक्चर असल्याने हॉस्पीटल ने ऑपरेशन करून प्लेट टाकावी लागेल सांगितले. गुडघ्या खालून कापलेल्या पायाची जखम भरली नसल्याने व वय ७३ असल्याने नकार दर्शविला. त्यावेळी सदर हॉस्पीटल चे सीनियर डॉक्टर किशोर मोडखरकर यांनी भेटायला बोलवून ऑपरेशन करुण प्लेट टाकली तर दीड महिन्यात आईचा पाय बरा होईल पण जर फक्त प्लास्टर केले तर पाय बरा होन्यासाठी ४ महीने लागतील सांगितले.आईचा पाय खालुन कापलेला आहे त्यामूळे तिला चालता तर येनार नाही त्यामूळे तिला प्लास्टर करा असे सुचविले असता त्यांनी ऑपरेशन थियेटर मध्ये घेउन गेले.पायाला प्लास्टर लाऊन बाहेर आणले त्यावेळी डॉक्टरने विचित्र प्रकारे प्लास्टर मधुन एक लाकुड इंग्रजी *V* आकारचे मांडीखालून बाहेर काढलेले होते.त्यानंतर आईने सांगीतले की ऑपरेशन थियेटर मधे मोडखरकर डॉक्टर ने आणि त्यांच्या टीम ने तिचा पाय एका बाजुला खुप वेळा पिरगळा आहे. जवळपास १०-१५ मिनट ते सर्व जन पाय पिरगळत होते बहुतेक त्यान्नी माझा पाय तोडला आहे.
नंतर आईच्या पायाचा एक्सरे काढला तर त्यात आईच्या मांडीच्या हाडाचे दोन टुकडे पडलेले स्पष्ट दिसत होते.त्यामुळे लवकर ऑपरेशन करा असे मोडखरकर यांना सांगीतले. परंतु त्यावेळी ते बोलले की ऑपरेशन ला ४-५ दिवस लागतील. कारण आईच्या मांडीच्या हाडाच्या आतुन एक रॉड आणि बाहेरून एक रॉड टाकावा लागेल तसेच वरच्या आणि खालच्या बाजुला अश्या दोन प्लेट पण टाकाव्या लागतील त्या पुण्यात भेटत नसल्यामुळे दिल्लीवरुन ऑर्डर देउन मागवाव्या लागतील. त्याची किमत एक लाख रुपये असून ऑपरेशन साठी वेगळे डिड-दोन लाख रुपये लागतील. तरी आईच्या ऑपरेशन ला आम्ही होकार दिला. त्यावेळी मोडखरकर डॉक्टर बोलले होते की,आईचा जो पाय ७ महीने आधी कापला तो चुकीचा कापलेला असल्याने अजून ती जखम भरलेली नाही. नंतर कृत्रिम पाय लावला तरी चालायला त्रास होइल त्यामूळे तिच्या मांडीचे ऑपरेशन करताना तीचा पाय ५-६ इंच वरून कापून देतो.ज्यानी पाय कापला ते डॉक्टर नाफाडे यांना बोलावले असता त्यांनी मोडखरकर चुकिचे बोलत असल्याचे सांगितले.
हॉस्पिटल ने इंश्योरेंस कंपनीला आईच्या पायाची एंजोग्राफी आणि एंजॉप्लास्टी झालेली आसताना तिथे ह्दयाची एंजोग्राफी आणि एंजॉप्लास्टी झाली असा खोटा रिपोर्ट दिला त्यामुळे आईचा एडमिट होताना मंज़ूर झालेला इंश्योरेंस क्लेम रद्द झाला. दोन लाख रुपये भरा नाही तर ऑपरेशन होणार नाही असे सांगितल्यामुळे हॉस्पिटल व डॉक्टर जास्तीचे पैसे उकळण्यासाठी जाणून-बुजून त्रास देत असल्याचे लक्षात आल्याने ऑपरेशन साठी डॉक्टर बदलण्यासाठी फॅमिली डॉक्टरला सांगितले.
डॉक्टर कपिल साऊजी यांनी ऑपरेशनचे काम हातात घेतल्यामुळे त्यांनी तपासण्या केल्या. त्यांनी आधीच्या डॉक्टरने केलेल्या चुका सांगून याचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. ऑपरेशनसाठी जवळपास १ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगीतले. भासा निलेश चव्हाण हेल्थ इन्शुरन्स कंपनीत एरिया हेड असल्याने त्याला बोलावले असता दोन तासात हॉस्पिटलने इन्शुरन्स मंजूर केला.
घडलेला प्रकार हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट च्या डॉक्टर निलम यांना सांगीतला असता त्यांनी गांभीर्याने घेतला नाही.ऑपरेशन थियेटर चे आईला प्लास्टर साठी घेउन गेले त्यावेळेसचे सर्व सीसीटीवी फ़ुटेज् आणि प्लास्टर केल्यानंतर जो लगेच एक्सरे काढला जातो तो दया. तसेच ज्या डॉक्टर ने चुकिची महिती इंशुरेंस कंपनीला दिली त्यांचे पूर्ण नाव आणि मोबाइल नंबर द्या म्हनून विनंती केली तरी त्यांनी उड़वाउड़वीची उत्तरे दिली.
पैसे उखळण्यासाठी रुग्णाच्या जीवाशी खेळले जात असेल तर अशा डॉक्टर व हॉस्पिटल वर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे
संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल औंधची चौकशी होऊन चालक-मालक व डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लबाडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कोट १-
संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल औंध येथे पिपंरी चिंचवड शहरातील नवी सांगवी, जूनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागातील रुग्ण मोठया प्रमाणात असतात. या हॉस्पिटलची रोजी रोटी पिपंरी चिंचवड शहरावर अवलंबून आहे. घडलेला प्रकार हा खुप संतापजनक असुन हॉस्पिटलवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
- प्रशांत शितोळे
कोट २-
हॉस्पिटलच्या परवानग्या पैसे देऊन मिळवलेल्या असतात. अयोग्य मार्गाने रुग्णांकडून ते पैसे वसूल केले जातात. गुन्हे दाखल होऊन कायदेशीर मार्गाने न्याय मिळाला नाही तर आंदोलन करून हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात येईल.
- संगीताताई वानखेडे
PC CITY PRO
8208432041
श्री गणेश मिल्ट्री फाउंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड पत्रकारांचा सत्कार
अध्यक्ष अनिल वडघुले यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
वसमत (प्रतिनीधी) दि.१४ :- देश सेवेचे प्रशिक्षण देणाऱ्या श्री गणेश मिल्ट्री फाउंडेशनचे संचालक कृष्णा बागल यांच्या वतीने पिंपरी चिंचवड येथील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी अध्यक्ष अनिल वडघुले,संचालक कृष्णा बागल, कार्याध्यक्ष अविनाश अदक, उपाध्यक्ष सुरज साळवे, डिजीटल मीडियाचे उपाध्यक्ष संतोष गोतावळे व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यां आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना वडघुले म्हणाले की, सैनिक व पोलिस प्रशिक्षण घेतांना विद्यार्थ्यांनी उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले पाहिजे.सैनिकी सेवेत महराष्ट्रातील कोणीही उच्च अधिकारी म्हणजे महत्वाच्या हुद्द्यावर पोहचले नाही याची खंत वाटते. नेशनल डिफेंस अकादमी (NDA) च्या माध्यमातून ते स्वप्न आपण साकार करावे.‘देशसेवा ही रक्तातच असावी लागते असे नाही. मात्र, आयुष्यात करिअर घडविताना ‘ज्ञान, विवेक, पराक्रम’ या ब्रीदवाक्याचा वापर केल्यास देशसेवेचे उद्दिष्ट सफल होते. हेच ध्यानात घेऊन करिअर घडवा' असे आव्हान त्यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना केले.
या वेळी संचालक बागल म्हणाले की,शेतकरी, कष्टकरी जनतेची बाजू सरकार समोर आपण मांडता. त्यामुळे पत्रकारिता हि एक देश सेवाच आहे. डिजीटल मीडिया लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम करत आहे. पत्रकार म्हणुन केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्ध्यार्थ्यात नवचैतन्य संचारले आहे.
पोलिस खात्यातील वर्तवणुक बघता आपण भविष्यात भरती झालात तर सर्व सामान्यांना चांगली वागणूक दिली पाहिजे.प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शूभेच्छा देत केलेल्या आदरातिथ्या बद्दल उपाध्यक्ष सुरज साळवे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कृष्ण सार्थी असल्यामुळे पोलिस व सैनिकी सेवेत नक्कीच यशस्वी व्हाल असा विश्वास विध्यार्थ्यांना देत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सोमनाथ नढे यांनी केले.
जगात भारत देश तरुणांचा देश म्हणुन ओळख आहे.'उठ तरुणा जागा हो, देश सेवेचा धागा हो' या उक्तीप्रमाणे अकॅडमी वाटचाल करत आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रत्येक ठिकाणी अकॅडमीचा जवान देश सेवा करतांना दिसावा अश्या भावना व्यक्त करत कार्याध्यक्ष अविनाश अदक यांनी आभार मानले.
PC CITY PRO
8208432041
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) दि.६ :- पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने महानगरपालिकेतील पत्रकार कक्षात मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून "पत्रकार दिन" अर्थात "दर्पण दिन" साजरा करण्यात आला.
या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पोस्ट विभागाचे नितिन बने,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश अदक, उपाध्यक्ष सुरज साळवे, सचिव विनायक गायकवाड, दत्तात्रय कांबळे, संतोष गोतावळे, महावीर जाधव, रामकुमार शेडगे, रोहन गवळी, विनय सोनवणे, संदिप सोनार, राकेश पगारे, सुनील भिसे, महिला पत्रकार श्रद्धा प्रभुणे आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते.
या वेळी अध्यक्ष वडघुले म्हणाले की, ६ जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे. लाखो तरुण तरुणी ब्लॉगिंग, वेबसाइट्स आणि युट्युब चॅनेलहून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे, समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. पत्रकारांनी आरोग्य सांभाळून काम केले पाहिजे. असे बोलून त्यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पोस्ट विभागाचे नितीन बने, यांनी कालिदासाचे पाण्यात जांभूळ पडून मासे का खात नाही हे उदाहरण देऊन पत्रकारांनी स्वतः ची काळजी घेण्याचे आवाहन करत पोस्ट विभागाच्या योजनांचे महत्त्व पटवून दिले.पोस्ट विभाग च्या अनेक योजनाची माहिती यावेळी त्यांनी दिली. पत्रकारांना पोस्टा मध्ये अडचणी आल्यास सहकार्य केल्या जाईल.
या वेळी सभासद यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी आयुष्यमान भारत कार्ड व पोस्ट विभागाच्या विमा कार्ड यासाठी नोंदणी करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अविनाश अदक,उपाध्यक्ष सुरज साळवे यांनीही यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज साळवे यांनी तर आभार उपाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी मानले.
PC CITY PRO
8208432041
मंत्रालयात पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुरज साळवे यांचा सत्कार
मंत्रालयात पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुरज साळवे यांचा स पिंपरी चिंचवड (वरिष्ठ प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे मूकनायक ) दि.१५ ऑक्टोंबर २०२३ पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सक्रिय .....
*प्रेस कौन्सिलची महाराष्ट्र सरकारला नोटीस*
*पत्रकारांच्या आंदोलनाचा मोठा विजय*..
मुंबई :
महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हल्ले आणि सरकारच्या बघ्याच्या भूमिकेची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने स्वत:हून(स्यू-मोटो अॅक्शन) दखल घेतली असून पाचोरा पत्रकार हल्ला प्रकरणी पीसीआयने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.. या प्रकरणी प्रेस कौन्सिलने राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे.. प्रेस कौन्सिलने एक सत्य शोधन समिती देखील स्थापन केली आहे.. ही समिती पाचोरयाला जाऊन सर्व वस्तुस्थितीची माहिती करून घेईल अशी अपेक्षा आहे..
सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत केलेल्या आंदोलनाचा हा मोठा विजय असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे..
10 ऑगस्ट रोजी पाचोरा येथील पत्रकार #संदीप_महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी हल्ला केला होता.. त्यानंतर मुंबईतील तेरा पत्रकार संघटनांनी एकत्र येत राज्यपालांची भेट घेऊन त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.. 17 ऑगस्ट रोजी याचा निषेध करण्यासाठी राज्यभर पत्रकारांनी निदर्शनं करीत पत्रकार संरक्षण कायदयाची होळी केली.. .. महाराष्ट्रातील या सर्व घडामोडींची , प्रेस कौन्सिलने स्वतः:हून दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस पाठविली आहे..राज्य सरकारला ही मोठी चपराक असल्याचे सांगितले जाते..
प्रेस कौन्सिलची बैठक सोमवारी दिल्लीत होत आहे.. या बैठकीत महाराष्ट्रातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा आपण उपस्थित करणार असल्याचे कौन्सिलचे महाराष्ट्रातील सदस्य पराग करंदीकर यांनी सांगितले.. आज एस.एम.देशमुख यांनी पराग करंदीकर यांना महाराष्ट्रातील पत्रकारांवरील वाढत्या हल्लयांबद्दल लक्ष घालण्याची विनंती केली होती..
Ellora Caves in Aurangabad, Maharashtra,india.
आग्रहाचे निमंत्रण...
महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अजिजभाई शेख व माजी नगरसेवक हमीदभाई शेख यांच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी केंद्रिय सामजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब व आमदार महेशदादा लांडगे उपस्थित राहणार आहेत.तरी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पत्रकारांनी हेच निमंत्रण समजून उपस्थीत रहावे ही आग्रहाची नम्र विनंती...
वेळ :- बुधवार दि.१९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता
स्थळ:- खराळवाडी, मरकस मस्जिद चौक, पिंपरी , पुणे -१८
PC CITY PRO
8208432041
On record बोलतोय.... #संजय #राऊत
दै. प्रभात १०/८/२२
#30
पत्रकार परिषद निमंत्रण...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांना यश आले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महापालिका कामगार कर्मचारी सेना शहर अध्यक्ष रुपेश पटेकर राष्ट्रगीता संदर्भात महत्वाची माहिती देणार आहेत. यावेळी दैनिक, साप्ताहिक, न्यूज पोर्टल यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे हि विनंती.
वेळ :- शुक्रवार दि.२२/०७/२०२२ सा. ४ वाजता
स्थळ :- भा.वी. कांबळे पत्रकार कक्ष तिसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे - १८
-----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क :-
सुरज साळवे मुख्य PC CITY PRO
ऑफिस पत्ता :- पिंपरी चिंचवड महानगरपालिके जवळ, शॉप नंबर ११,सुखवानी चेम्बर्स, पिंपरी, पुणे - ४११०१८
मोबाईल नंबर :- 8208432041
भावी नगरसेवक जवाहर ढोरे
Shop for sale or rent
420 super built-up
Shop no 107
Ground floor
Rama Equoter Morwadi
Ajmera road pimpri
Contact no :- 8208432041
शहरात पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा - मा.महापौर माई ढोरे
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधि | दि.१० मे :- शहरात पावसाळापूर्व कामे, नदीपात्रातील जलपर्णी काढणे, कामांसाठी खोदकाम केलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत यासाठी मा. महापौर माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे.
ढोरे यांनी पत्रात म्हटले आहे की,पुढील महिन्यांपासून पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यातच हवामान विभागाने यंदा पाऊस दहा दिवस आधीच केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पावसाळ्याला लवकर सुरुवात झाल्यास पिंपरी-चिंचवडकरांची तारांबळ उडू नये म्हणून शहरात पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन शहरातील सर्व नाल्यांची सफाई तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आपण तातडीने आदेश देऊन नालेसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.
शहराच्या प्रत्येक भागात रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यासाठी अनेक भागात रस्त्यांची खोदाई करावी लागली आहे. खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावीत. रस्ते दुरुस्ती झाली नाही आणि पावसाळ्याला सुरुवात झाली तर संपूर्ण रस्ता चिखलमय बनतो. त्यातून मार्ग काढत जाताना एखादा वाहनचालक किंवा पादचाऱ्याच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे प्रशासनाने शहरवासीयांची आधीच काळजी घेऊन खोदलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. त्याचप्रमाणे शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रात मोठ्यात प्रमाणात जलपर्णी झाली आहे. ही जलपर्णीही तातडीने काढण्याची कार्यवाही करावी अशी विनंती ही महापौर माई ढोरे यांनी केली आहे.
-----------------*------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क :-
सुरज साळवे मुख्य PC CITY PRO
ऑफिस पत्ता :- पिंपरी चिंचवड महानगरपालिके जवळ, शॉप नंबर ११,सुखवानी चेम्बर्स, पिंपरी, पुणे - ४११०१८
मोबाईल नंबर :- 8208432041
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्वास्थ्याची फोनवरून विचारपूस
चिंचवड | प्रतिनिधि | दि.१७ एप्रिल :- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप हे आजारी असून बाणेर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आमदार जगताप यांचे बंधू शंकर शेठ जगताप यांच्याशी फोनवर संपर्क साधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्वास्थ्याची विचारपूस करून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
रिपाई व भाजप यांची युती असल्यामुळे आठवले व जगताप यांच्या मध्ये घनिष्ठ संबंध आहेत. रिपाईचे पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी जगताप यांची तब्येत खालावली असल्याची माहिती आठवले यांना दिल्या क्षणी आठवले यांनी फोन करून त्यांची विचारपूस केली.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रथमच जगताप यांच्या प्रकृतीविषयी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी जाहीर माहिती दिलेली आहे. जगताप रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाइंने ते आजारातून लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.
-----------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क :-
सुरज साळवे मुख्य PC CITY PRO
ऑफिस पत्ता :- पिंपरी चिंचवड महानगरपालिके जवळ, शॉप नंबर ११,सुखवानी चेम्बर्स, पिंपरी, पुणे - ४११०१८
मोबाईल नंबर :- 8208432041
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्वास्थ्य सुधारणेसाठी महिलांकडून ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही रुग्णालयात जाऊन केली विचारपूस
चिंचवड | प्रतिनिधि | दि.१७ एप्रिल :- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच त्यांचे लाखो चाहते काळजीने व्याकुळ झाले आहेत.आमदार जगताप यांना लवकरात लवकर प्रकृती स्वास्थ्य लाभावे, अशी प्रार्थना करून प्रतिभा महिला प्रतिष्ठाण व मुक्तांगण महिला प्रतिष्ठाण तर्फे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर (पिंपळे गुरव) येथील मंदिरात अभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप महिला भगिनी कडून सुरू करण्यात आला आहे.
या वेळी सौ.शुभांगीताई जगताप,सौ.माई ढोरे,सौ.उषाताई मुंढे,सौ.कावेरी सं जगताप,सौ.पल्लवी जगताप,सौ.सुषमा कदम,सौ.माधवी राजापुरे,सौ.वैशाली जवळकर,सौ.शोभा जांभुळकर,सौ.रविना आंगोळकर,सौ.उर्मिला देवकर,वैजंता काशिद ई महीला उपस्थित होत्या.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रथमच जगताप यांच्या प्रकृतीविषयी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी जाहीर माहिती दिलेली आहे. लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील अशी माहिती महेश लांडगे यांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रुग्णालयात जाऊन लक्ष्मण जगताप यांच्या स्वास्थ्याची डॉक्टरांकडून माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
-------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क :-
सुरज साळवे मुख्य PC CITY PRO
ऑफिस पत्ता :- पिंपरी चिंचवड महानगरपालिके जवळ, शॉप नंबर ११,सुखवानी चेम्बर्स, पिंपरी, पुणे - ४११०१८
मोबाईल नंबर :- 8208432041
Th
मा.क्रीडा सभापती व नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या वतीने ४५० नागरिकांनी मोफत बघितला 'द काश्मीर फाईल्स' चित्रपट
यमुनानगर मधील ४५० नागरिकांनी उत्तम केंदळे यांच्या वतीने मोफत बघितला 'द काश्मीर फाईल्स'
यमुनानगरच्या नागरिकांचे 'द काश्मीर फाईल्स' चित्रपट बघताना आश्रु अनावर
निगडी | प्रतिनिधी | दि.२७ मार्च :- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाची क्रेझ दुसऱ्या आठवड्यातही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत.आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि.२७) पिंपरी चिंचवड शहारातील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांना मा.क्रीडा सभापती व नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या वतीने ४५० नागरिकांना मोफत चित्रपट दाखवण्यात आला. सत्य घटनेवर आधारित चित्रपट दाखवल्याबद्दल नागरिकांनी केंदळे यांचे आभार मानले.
चित्रपट सुरू होताच हिंदू वर झालेल्या अन्याय-अत्याचाराच्या गोष्टी बघताना नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.त्या वेळी असणाऱ्या सरकारच्या धोरणामुळे काश्मीरमध्ये हिंदुंचा नरसंहार झाला.
असंख्य हिंदुंना राहती घरे सोडून पलायन करावे लागले.१९९० मध्ये काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अन्याय,अत्याचार झाला तो सर्वसामान्यांसमोर आला पाहिजे.या उद्देशाने आमदार महेशदादा लांडगे यांनी आम्हा सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांना मोफत चित्रपट दाखविला होता त्या अनुषंगाने तिकीटचे दर महाग असल्याने सर्वसामान्यांना ते पाहता येत नव्हते तसेच जास्तीत जास्त महिलांसाठी हा चित्रपट दाखविण्यात आला आहे कारण महिलांना त्यांच्या व्यस्त कामात चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळत नसल्याने म्हणून आम्ही 'द कश्मीर फाइल्स' चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेतल्याचं केंदळे यावेळी म्हणाले.
चित्रपटाचे नियोजन व यशस्वी करण्यात विकास देशपांडे,गिरीश देशमुख,आदित्य कुलकर्णी, शेखर असरकर, सुनील जाधव,पंकज कराड,रमाकांत पाटील,आदित्य चौधरी,स्वप्नील परदेशीं, स्वप्नील देशपांडे,योगेश साळुंखे,आदित्य निफाडकर,कौस्तुभ देशपांडे, किरण घोटाळे,पंकज साबळे,सचिन पिंजण,प्रशांत बाराथे,प्रभू बालचंद्रण, प्रशांत तरटे,स्वप्नील लोंढे,संकेत चित्ते,पंकज कोळी,विशाल केंदळे,परेश पटेल,स्वप्नील शेटे,मनोहर देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
-----------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क :-
सुरज साळवे मुख्य PC CITY PRO
ऑफिस पत्ता :- पिंपरी चिंचवड महानगरपालिके जवळ, शॉप नंबर ११,सुखवानी चेम्बर्स, पिंपरी, पुणे - ४११०१८
मोबाईल नंबर :- 8208432041
या पेजवर पिंपरी चिंचवड शहारातील राजकीय व इतर व्हिडिओ स्टेटस व बॅनर बघायला भेटतील.
निगडी स्मशानभूमीतील विविध विकास कामाला सुरूवात; स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश
निगडी स्मशानभूमीचा चेहरा मोहरा बदलणार
निगडी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवणे व स्थापत्य विषयक कामांना सुरूवात
निगडी/पिंपरी चिंचवड (प्रतिनीधी) :- गेली अनेक महिने निगडी स्मशानभूमीतील विद्युत दाहीनी व स्थापत्य विकास कामे करण्यासाठी आयुक्तांकडे स्थानिक नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका कमलाताई घोलप, नगरसेविका सुमनताई पवळे वारंवार पाठपुरावा करत होते. त्याला अखेर यश आले असून विकास कामांना सुरुवात झाली आहे.
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील निगडी स्मशानभूमी येथे मागील दोन वर्षांपूर्वी एक नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात आली होती. निगडी स्मशान भूमी अंतर्गत निगडी,यमुनानगर,मोरेवस्ती,आकुर्डी,तळवडे, त्रिवेणीनगर, रुपीनगर,कृष्णानगर संभाजीनगर,प्राधिकरण आदि भागातून नागरिक अंत्यविधीसाठी स्मशानभूमी मध्ये ये जा करत असतात जास्त लोकसंख्या असल्याने या भागातील मृत्यू दरही त्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी १८वर्ष जुनी विद्युत दाहिनी आहे. ती काढून टाकून त्या ठिकाणी नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात येणार आहे. कल्याणी इंटरप्राईजेस ७२ लाखाची विद्युत दाहिनी बसवण्याचे काम करणार आहे. ४ कोटी ११ लाखाचे स्थापत्य विषयक व विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत.नवीन विद्युत दाहिनी बसविण्याचा व स्थापत्य विषयक कामासाठी अनुक्रमाने पत्राद्वारे दिनांक १६/०४/२०२१ व दिनांक १७/०५/२०२१ रोजी पाठपुरावा केला होता. लेखाशिर्ष व स्मशानभूमी च्या कामासाठी निधीची तरतुद उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला. स्मशानभूमीत विविध जातींचे लोक अंत्यविधीसाठी येतात त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध होणार असुन २० वर्षापासून धूळ खात पडलेल्या निगडी स्मशानभूमीचा चेहरा मोहरा बदलणार आहे अशी माहिती नगरसेवक उत्तम केंदळे यांनी दिली आहे.
मागील तीस वर्षांपूर्वी कै महापौर मधुकर पवळे यांच्यामार्फत विद्युत दाहिनी बसवण्यात आली होती. ती विद्युत दाहिनी कधीही बंद पडत होती. मृतदेह पूर्ण जळत नव्हते. अनेक अडचणीचा सामना आम्हाला व कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. अनेक लोकांचे फोन येत होते. विद्युत दाहिनी बाबत अनेक दिवसापासून महानगरपालिकेकडे पाठपुरावा चालू होता त्यानिमित्ताने आज नवीन विद्युत दाहीनीचे काम चालू करण्यात आले. मागील वर्षी एक नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात आली आहे. कालांतराने अजून एक नवीन गॅस दाहिनी बसवण्यात येणार आहे. त्यामुळे या विद्युत दाहिनी वरील लोड कमी होईल.
नगरसेवक सचिन चिखले
स्मशानभूमी मधील कामांचा कायमचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरीकांचा त्रास कमी होईल.अनेक स्थापत्य विकास कामे, शौचालय,प्रतीक्षा शेड,हवा प्रदूषण नियंत्रण संच,सीमाभिंत, सुरक्षा रक्षक खोली इ कामे व विद्युतविषयक कामे करणे गरजेचे होते. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील.
नगरसेवक उत्तम केंदळे
मृतांच्या नातेवाइकांना स्मशानभुमी येथे बसण्यासाठी व इतर सुविधा येणाऱ्या काळात उपलब्ध करण्यात येतील.
नगरसेविका कमलाताई घोलप
प्रभाग क्रमांक १३ मध्ये लोकसंख्या जास्त आहे त्याच प्रमाणात मृत्युदर ही असतो. त्यामुळे नागरिकांना स्मशानभूमि सुसज्ज झाल्याचा फायदा होणार आहे.
नगरसेविका सुमनताई पवळे
नगरसेवक केंदळे हे मृताच्या नातेवाईकांना प्रत्येक वेळी मदत करत असतात. केंदळे म्हणतात जे काम करतो आहे, ही लोकसेवाच आहे या भावनेने मी करतो. लोकांच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट लावणं ही जबाबदारी माझ्यावर आहे. मला ती योग्य पद्धतीने पूर्ण करावीच लागेल. सेवा म्हणून मी हे काम करतो."काही नातेवाईक येतात. तर, काही मृत झालेल्या रुग्णांचे नातेवाईक येत नाहीत. मग, आपणच मनात देवाचं नाव घेवून त्यांना शेवटचा निरोप द्यायचा.
------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क :-
सुरज साळवे मुख्य PC CITY PRO
ऑफिस पत्ता :- पिंपरी चिंचवड महानगरपालिके जवळ, शॉप नंबर ११,सुखवानी चेम्बर्स, पिंपरी, पुणे - ४११०१८
मोबाईल नंबर :- 8208432041
Click here to claim your Sponsored Listing.
Videos (show all)
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pimpri, Chinchwad
Pimpri
411017
PCMT CHOWK, GAVHANE WASTI
Pimpri, 411039
CUSTOMISED STICKERS, LABELS & CARDS. PRINTING AND CUTTING.
Pimple Gurav
Pimpri, 411061
Hey I,m Onkar...... I.m "digital marketing specialist", I have a Great experience in this industry. I have excellent knowledge of latest digital marketing tools. I am helping t...
Pimpri, 411027
Namaste! my name is girish I am certified of well known institute of graphics design Maharashtra is
Chavan Complex, Shop No: 01, Near Datta Mandir, Next To Shanti Junior School, Wakad, Pune
Pimpri, 411057
DESIGN◆BRANDING◆SOCIALMEDIAMARKETING◆FOODPHOTOGRAPHY
Pimpri, 411017
🌟 Your Partner in Digital Growth 🌟 We specialize in SEO, Social Media Marketing, Email Marketing, Lead Generation and all digital solutions. Helping businesses thrive online with ...