Mahesh Dada Sports Foundation #MDSF

Mahesh Dada Sports Foundation #MDSF

That place for young and small kids for growth our Indian sports .

16/06/2024

अभिमान पिंपरी- चिंचवडचा..!

रहाटणी येथील पदवीधर युवक धावपटू शिवाजी बळीराम खुळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे पार पडलेल्या ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ स्पर्धेत लक्षवेधी कामागिरी केली आहे. धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाते. शिवाजी खुळे यांची कामगिरी पिंपरी-चिंचवडमधील युवकांना प्रेरणादायी आहे.

धावपटू शिवाजी खुळे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !

Photos from Mahesh Landge's post 14/10/2023
13/10/2023

कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महिला, मूल - मुलींसाठी मोफत कराटे, किक बॉक्सिंग, तायक्वॉंदो प्रशिक्षण.
सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ ते शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३
सायंकाळी ०६.०० ते ०७.३० वाजेपर्यंत.

Maheshdada Sports Foundation - MDS Mahesh Landge

06/10/2023

चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंह या जोडीने स्क्वॉश खेळातील मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक पटकावले.

स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल व हरिंदर पाल सिंह यांचे हार्दिक अभिनंदन..!

Photos from Mahesh Dada Sports Foundation #MDSF's post 04/10/2023

चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात पुरुष गटात भालाफेकपटू नीरज चोप्रा याने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन दाखवीत ८८.८८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. तसेच, भालाफेकपटू किशोर जेना याने ८७.५४ मीटरपर्यंत लांब भाला फेकला आणि रौप्यपदक पटकावले आहे.

भालाफेकपटू नीरज चोप्रा, किशोर जेना यांचे हार्दिक अभिनंदन..!

Neeraj Chopra

04/10/2023

गुणवंत क्रिकेटपटू पिंपरी-चिंचवडची कन्या खुशी मुल्ला हिची 19 वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. ही तमाम पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. खुशी मुल्ला आणि सहकारी महाराष्ट्राचे नावलौकीक करतील, असा विश्वास आहे.

क्रिकेटपटू खुशी मुल्ला हिचे हार्दिक अभिनंदन..!

27/09/2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला नेमबाजांनी सुवर्ण कामगिरी केली. महिलांच्या २५ मीटर पिस्टल सांघिक प्रकारात मनु भाकर, ईशा सिंह आणि रिदम सांगवान यांच्या संघाने सुवर्णपदक पटकावले आहे.

नेमबाज मनु भाकर, ईशा सिंह आणि रिदम सांगवान यांचे हार्दिक अभिनंदन..!

25/09/2023

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या संघाने यंदा १०० पदकांची कामाई करण्याचा संकल्प केला आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडुंनी एकूण ५ पदकांवर शिक्कामोर्तब केले. रोईंगमध्ये भारताला तीन पदके मिळाली आहेत. लाइटवेट दुहेरी स्कल्स प्रकारात अर्जुनपाल सिंह यांनी रौप्य, तर कॉक्सलेस दुहेरी प्रकारात बाबुलाल यादव आणि लेख राम जोडीने कांस्यपदक पटकावले. नेमबाजीमध्ये मेहुली घोष, रमिता जिंदल आणि अशी चौक्सी या अनुभवी खेळाडुंनी सांघिक रौप्यपदक पटकावले आहे.

सर्व यशस्वी खेळाडुंचे अभिनंदन व शुभेच्छा..!

16/09/2023

पुण्यातील पॅरा नेमबाज खेळाडू नरेंद्र गुप्ता आणि राघव बारावकर यांची दि. ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत दिल्ली इथं होणाऱ्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत १० मीटर एअर रायफल एस एच २ गटात त्यांची निवड झाली आहे.

पॅरा नेमबाज खेळाडू नरेंद्र गुप्ता आणि राघव बारावकर यांचे अभिनंदन व शुभेच्छा!

09/09/2023

पायाने ७५ टक्के दिव्यांग. चालताना प्रचंड त्रास. मात्र, तीच मुगली स्वीमिंग टँकमध्ये उतरली की जलपरी बनते. स्वीमिंगची अशी कोणती स्पर्धा नाही, की त्यामध्ये तिने सुवर्ण यश मिळवले नाही. ९ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, कॉमनवेल्थ गेम्स- २०१८, पॅरा स्वीमिंग चॅम्पियनशीप व अमेरिका ऑस्ट्रेलिया, दुबई येथे आंतरराष्ट्रीय सहभाग घेवून तिने यश मिळवले आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ‘‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’’ने वैष्णवीला गौरविले आहे.

जलतरणपटू वैष्णवी जगताप हिच्या जिद्दीला सलाम !

29/08/2023

मुंबईतील मराठमोळ्या अवघ्या २६ वर्षीय डॉ. आकांक्षा पंडित यांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर अमेरिकेत उत्तुंग भरारी घेतली आहे. संशोधक होण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या आकांक्षा मेंदू मज्जातंतूसंबंधित आजारांवर संशोधन करीत आहेत. त्यांना ‘हील कॉन्फ्रेन्स- २०२३’ मध्ये प्रतिष्ठेचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी आकांक्षा ही सर्वात तरुण आणि एकमेव मराठी मुलगी ठरली आहे.

डॉ. आकांक्षा पंडित यांचे हार्दिक अभिनंदन..!

29/08/2023

भारताचा ग्रॅडमास्टर बुद्धीबळपटू प्रज्ञानंद यांची जागतिक बुद्धीबळ स्पर्धेतील धमाकेदार कामगिरीनंतर प्रसिद्ध उद्योग समुह महिंद्रा ग्रुपचे मालक श्री. आनंद महिंद्रा यांनी प्रज्ञानंदच्या पालकांना आलिशान इलेक्ट्रानिक कार (EV) भेट देण्याची घोषणा केली आहे. प्रज्ञानंद याला महिंद्रा ग्रुपकडून XUV 400 EV ही कार देण्यात येणार आहे.

क्रीडापटूंना प्रोत्साहन देणाऱ्या महिंद्रा गुपचे आणि सर्वेसर्वा श्री. आनंद महिंद्रा यांचे अभिनंदन..!

23/08/2023

: चांद्रयान-3' Mission Live

23/08/2023

जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्टल प्रकारात अमनप्रीत सिंग याने सुवर्णपदक पटकावले आहे. भारतातील नवोदित खेळाडुंसाठी ही प्रेरणादायी बाब आहे.

नेमबाज अमनप्रीत सिंग याचे हार्दिक अभिनंदन..!

01/08/2023

: लोकार्पण व भूमिपूजन सोहळा..!

शुभहस्ते:
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 17 हजार 75 सदनिकांपैकी बोऱ्हाडेवाडी येथील सदनिकांचे लोकार्पण व डुडुळगाव व सेक्टर 12 येथील सदनिकांचे भूमिपूजन.

तसेच, महाराष्ट्रातील पहिला "वेस्ट टू एनर्जी" अर्थात कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा.

01/08/2023

: भारताचे कणखर नेतृत्व माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान.

01/08/2023

: पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शन आणि महाआरती.

14/07/2023

थायलंडमध्ये झालेल्या २५व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अवघ्या १३.०९ सेकंदात १०० मीटर अंतर पार करत सुवर्णपदक पटकावलेय. मनःपूर्वक अभिनंदन !

07/07/2023

क्रोएशिया येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वरूप उन्हाळकरने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. या कामगिरीसाठी हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

30/06/2023

आशिया कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने इराणवर ४२-३२ असा दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत आठव्यांदा विजेतेपद पटकावले.

भारतीय कबड्डी संघाचे हार्दिक अभिनंदन..!

Photos from Mahesh Dada Sports Foundation #MDSF's post 21/06/2023

आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पतंजली योगपीठ च्या सहकार्याने आपल्या प्रभागातील सी सर्कल येथे योगा शिबिराचे चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रभागातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच आमदार महेशदादा लांडगे यांनी सुद्धा या योगा शिबीर मध्ये सहभागी होऊन योगा केला या शिबिराची सुरुवात उद्योजक प्रताप मोहिते मामा,ऊद्योजक सुरेंद्र शेठ वधवा,उद्योजक सदाशिव जी बोराटे,मोहनराज कुलकर्णी काका,उद्योजिका सुनीता ताई पाटसकर, माणिक पडवळ तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून या शिबिराचे आयोजन आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रं 8 च्या नगरसेविका सौ नम्रता योगेश लोंढे, सा कार्यकर्ते श्री योगेश भगवान लोंढे, सा कार्यकर्ते श्री हनुमंत आण्णा लांडगे, सा कार्यकर्ते श्री निखिल भाऊ काळकुटे, सा कार्यकर्ते श्री शिवराज भाऊ लांडगे, सा कार्यकर्त्या सौ गिता ताई महेंद्रू यांच्या वतीने करण्यात आले होते तसेच प्रशिक्षक श्री सुनिल जी हुले यांनी प्रशिक्षण दिले व सूत्रसंचालन श्री संतोष जी वरे यांनी केले. 🙏🏻🙏🏻

20/06/2023

अभिमान भारताचा...

भारताची तलवारबाज भवानी देवी हिने आशियाई तलवारबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. भवानी देवी हिने या खेळातील विद्यमान जागतिक विजेतीला पराभूत केले. या खेळातील हे भारताचे पहिलेच पदक आहे.

तलवारबाज भवानी देवी हिचे हार्दिक अभिनंदन..!

14/06/2023
23/05/2023

ऑलिंम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने जागतिक भालाफेक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे हार्दिक अभिनंदन..!

Neeraj Chopra

20/05/2023

कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कोमल भगवान गोळे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा "शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2020-21" जाहिर झाल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन !

Komal Gole #शिवछत्रपतीक्रीडापुरस्कार

06/05/2023

अभिमानास्पद...!

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धा जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दोहा येथे सुरु असलेल्या डायमंड स्पर्धेवर नीरज चोप्राने नाव कोरलेय. दोहा येथील कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्रा याने बाजी मारली. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर दूर भाला फेकला.

भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे हार्दिक अभिनंदन..!

Neeraj Chopra
Neeraj Chopra

24/04/2023

भारताचा क्रिकेट खेळाडू, मास्टर ब्लास्टर, भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Sachin Tendulkar

18/04/2023

ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या पॅराबॅडमिंटन आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत चेतन भगत आणि सुकांत कदम या भारतीय जोडीने पुरूष दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले आहे.

चेतन भगत आणि सुकांता कदम यांचे हार्दिक अभिनंदन..!

18/04/2023

अभिनेता आर माधवनच्या मुलाने परदेशात भारताची मान उंचावली आहे. माधवनचा मुलगा वेदांत याने जलतरण स्पर्धेत भारतासाठी पाच सुवर्णपदके जिंकली.

13/04/2023

कझाकिस्तान येथे झालेल्या महिला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्तीपटूंना शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत ३ रौप्य आणि ८ कांस्य अशा एकूण ११ पदकांची कमाई आपल्या खेळाडुंनी केली आहे.

सर्व यशस्वी खेळाडुंचे हार्दिक अभिनंदन..!

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pimpri?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

आमदार चषक २०२२ मोशी

Category

Telephone

Address


Mali Ali, Bhosari Gaonthan
Pimpri
411039
Other Sports Events in Pimpri (show all)
Gadget Free Hours Gadget Free Hours
Pimpri, 411018

Forever fit forever strong - Arranging an gadget free time for kids on every Sunday 9:00 am onwards . Be a step forward and make your child a techno free slave and connect to natur...

River Cyclothon - 2023 River Cyclothon - 2023
Gavjatra Maidan , Ankushrao Landge Hall , Bhosari
Pimpri, 411039

- भारतातील एकमेव सर्वात मोठी सायकल रॅली - इंद्रायणी मातेच्या स्वच्छतेचा अभियान

MD Fitness Bhosari MD Fitness Bhosari
Mahesh Dada Sports Foundation, Londhe Garden, Bhosari Pune/
Pimpri, 411039

We have the one of the BEST UNISEX GYM in Pimpari - Chinchwad (PCMC).

Ionix Sports Club Ionix Sports Club
486/2760, Sant Tukaram Nagar
Pimpri, 411018

🏓Smash the competition at IONIX SPORTS CLUB, the premier sports club in Pimpri-Chinchwad! Top-tier facilities, expert coaching, kids' programs, and a buzzing atmosphere. Join us fo...