VP Innovative Wealth Creations

VP Innovative Wealth Creations

WEALTH MANAGEMENT
Compliat YOU'RE DREAM.

म्यूचुअल फंडचा फ्री मास्टरक्लास 🔥 | Top Marathi podcast on Mutual Funds for beginners in marathi 13/05/2024

https://youtu.be/64BVQ0pzuvg?si=d7GcSLRAHgidaBHX

VP Innovative Wealth
9921525020

म्यूचुअल फंडचा फ्री मास्टरक्लास 🔥 | Top Marathi podcast on Mutual Funds for beginners in marathi म्यूचुअल फंडचा फ्री मास्टरक्लास | Top Marathi podcast on Mutual Funds for beginners in marathi | What Is Mutual Fund in Marathi | What is Mutual Fund and How...

25/04/2024

*☑️(आर्थिक साक्षरता कार्यक्रम)*
चला, उद्या म्हणजे शुक्रवार ची संध्याकाळ सत्कारणी लावूयात,
*नमस्कार,*
*प्रिय गुंतवणूकदार मित्रांनो*,
एका महत्वपूर्ण *सेबी पुरस्कृत* आर्थिक साक्षरता कार्यक्रमासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करीत आहोत.
*☑️ भारतीय अर्थव्यवस्था का दिवसे दिवस का मजबूत होत चालली आहे??*
*☑️ Mutual फंड ची इन्व्हेस्टमेंट* दिवसे दिवस का अजून फायदेशीर होत चालली आहे?
*☑️ मी एक सामान्य गुंतवणूकदार कशा आणि कोणत्या मूलभतं आधारवर इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे या कार्यक्रमात समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊ.* आणि *त्याचं बरोबर स्वतःची आणि परिवाराची आर्थिक साक्षरता सुद्धा वाढवून घेऊ.*

*☑️ महत्वाचा विषय:*
*" भारत @100*
*☑️ प्रमुख वक्ते :*
*श्री. मनुज जैन*
_( डायरेक्टर - व्हाईट ओक Mutual फंड)_

*☑️तारीख: 26 एप्रिल 2024*
*संध्याकाळी 6.15 वाजता*
_(Registration 6.15 PM, Session Time 6.45 PM_

*स्थळ: "हॉटेल नुरिया"*
31, आदित्य बिर्ला हॉस्पिटल मार्ग, थेरगाव, पिंपरी-चिंचवड - 411 033.

_(हा सेशन चहा, कॉफी आणि छान छोटयाश्या स्नॅक्स वर आयोजित केला आहे)_
तुमचा शुभेच्छुक,
*VP Innovative Wealth.*
*Vaibhav Patil.*
9921525020.

_घरा -घरात आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न._

23/04/2024

*कोण म्हणतं जॉब करणारे श्रीमंत नाही बनू शकत? ‘असे’ प्लॅनिंग करून तुम्हीही श्रीमंत बनू शकता*

सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत पैसा कमवणे, हा सर्वांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे अनेकदा असे पसरवले जात आहे की, श्रीमंत बनायचे असेल, तर तुमचं स्वतःचं काहीतरी करा. बिझनेस करा, रिस्क घ्या. मात्र, सर्वांसाठी रिस्क घेणे शक्य होत नाही. जॉब करणाऱ्यांची काहीतरी मजबुरी असते. मग जेव्हा तुम्ही जॉब करत असाल, तर तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही का? तर हे चुकीचं आहे. तुम्ही जॉब करूनही श्रीमंत बनू शकता. चला तर, आपण जाणून घेऊयात की, तुमचा एका ठराविक पगार असेल, तर तुम्ही चांगल्या आर्थिक नियोजनाद्वारे खरोखरच श्रीमंत बनू शकता. यासोबतच आपण तुमचा पगार जर कमी असेल, तर तो वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याविषयीही जाणून घेऊयात…

*आर्थिक नियोजन*
आपण जॉब करणारा व्यक्ती कशाप्रकारे योग्य आर्थिक नियोजनाद्वारे श्रीमंत कसा बनू शकतो, हे पाहूयात. आज तुमचा पगार कमी जरी असला, तरीही तुम्ही स्वत:ला धन्यवाद द्या की, तुम्ही या काळात जन्माला आलात. कारण, आज तुम्ही कुठल्या कॉलेजमधून आलात, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. तुमची पदवी काय आहे, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. एवढंच काय, तर तुमचे मार्क्स किती आहेत, याचेही महत्त्व कमी झाले आहे. आजपासून १०-१५ वर्षांपूर्वी या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरत होत्या.
तुम्ही कोणत्यातरी एका गोष्टीत स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवू शकला, तर कोणतीही कंपनी तुम्हाला जॉब देईल, जिथे तुमचा पगार २० हजार किंवा त्याहून अधिक असेल. तर अशा परिस्थितीत आम्ही जे आर्थिक नियोजन तुम्हाला सांगत आहोत, ते तुमच्यासाठी नक्की फायेशीरच असेल.
जर तुमचा पगार २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्ही कोट्याधीश कसे बनू शकता? यासाठी काही नियम आहेत.
*1 असा की, ५०, ३० आणि २० नियम.*
या नियमानुसार, तुमचा जो काही पगार आहे, त्यातील ५० टक्के पगार तुम्ही गरजांवर खर्च करू शकता. जसे की, वीज बिल, पेट्रोल, फोन बिल, खान-पान आणि घराचे भाडे. त्यानंतर ३० टक्के पगार तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर खर्च करू शकता. जसे की, चांगले कपडे घ्यायचे आहेत, पार्टी करायची आहे, कुठे फिरायला जायचे आहे, मूव्हीला जायचं आहे. यानंतर पुढचा भाग येतो २० टक्के पगार, जी आहे बचत. तुम्हाला तुमच्या पगारातील कमीत कमी २० टक्के पैशांची बचत करायची आहे. त्यानंतर याच पैशांची गुंतवणूक करायची आहे. चला तर, आपण याची आकडेमोड करून पाहूयात.

तुमचा पगार फक्त २० हजार असला, तरीही हा हिशोब वैध आहे. आपण २० हजार रुपयांविषयी बोलत आहोत, तर तुम्हाला यापैकी किती रुपयांची बचत करायची आहे, तर २० टक्के. तुम्ही जर यापेक्षा जास्तीची बचत करू शकला, तर अति उत्तम. २० टक्के रक्कम तुम्ही बचत करत आहात, तर ती रक्कम होते ४ हजार रुपये. आता ४ हजार रुपयांची तुम्ही बचत करत आहात किंवा तुमचं ते ध्येय आहे. आता आपण पाहूयात की, तुम्ही जे ४ हजार रुपये बचत करत आहात, त्यातून तुम्ही काय कराल. पहिला नियम होता ५०-३०-२० आता आपण

*दुसरा नियम पाहूयात, जो गुंतवणुकीचा आहे. त्यानुसार तुम्हाला त्या ४ हजार रुपयांची गुंतवणूक करायची आहे.*
यासाठी तुम्ही जीवन विमा घेऊ शकता. तुम्ही जर तरुण असाल, २७ ते ३० पेक्षा कमी वयाचे, तर तुम्हाला १ कोटी रुपयांचा विमा मिळेल. हा तुम्हाला साधारण ५०० रुपये प्रति महिना हिशोबाने मिळेल. आता ४ हजारातील ५०० रुपये गेले, *तेव्हा तुम्ही साधारण विमा नाही, तर टर्म प्लॅन घ्याल आणि काही गोष्टींची काळजी घ्या.* जसे की, कुटुंबातील सर्वांचा जीवन विमा घ्यायचा नाहीये. जे कमावते लोक आहेत किंवा तुम्ही कमावते आहात, तर तुमचा विमा घ्या. कोणत्याही स्कीममध्ये अडकून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका.

*दुसरी पायरी म्हणजे, आरोग्य विमा. हा विमा सर्वांचा घ्यायचा आहे. कारण, आजारी कुणीही पडू शकतो.* त्यामुळे यासाठी जवळपास ५०० रुपयात तुमचा आरोग्य विमाही मिळेल. आता ४ हजारांपैकी १ हजार रुपये तुमच्या जीवन आणि आरोग्य विम्यासाठी खर्च झाले. *सर्वप्रथम ही दोन कामे केली पाहिजेत.*

*आपत्कालीन निधी*
आता पुढची पायरी म्हणजे आपत्कालीन निधी. आजकाल फ्रीलान्सिंग सुरू आहे. त्यामुळे कोणाच्याही जॉबचा काही भरोसा नाहीये. कधी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाते. कधी व्यवसाय ठप्प पडतो, किंवा लॉकडाऊनची स्थिती उद्भवते. कोणतीही आपत्कालीन स्थिती उभी राहते. मात्र, खर्च हा सुरूच असतो. त्यामुळे त्याची आधी तयारी करायची. *त्यानंतर गुंतवणुकीचा विचार करायचा.*

जर तुमच्या घरात एकटे कमावते असाल, *तर तुमच्याकडे सहा महिन्यांचा आपत्कालीन निधी असावा.* घरातील कमावते व्यक्ती असाल, तर आपत्कालीन निधी तुमच्या गरजांपेक्षा सहा पट असला पाहिजे. म्हणजेच तुमच्या महिन्याच्या गरजांवरील खर्च १० हजार रुपये आहे, तर तुमचा आपत्कालीन निधी हा कमीत कमी ३० हजार रुपयांचा असावा. जास्त असेल, तर उत्तमच.

आता हे ३० हजार रुपये कसे येणार हे पाहूयात. तुमच्या बचतीतील ४ हजार रुपये जे होते, त्यातील १ हजार महिना तर विम्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील. उरलेल्या ३ हजार रुपयांतून तुम्ही आताच गुंतवणुकीला सुरुवात करू नका. तुम्हाला १० महिन्यांसाठी ते ३-३ हजार रुपये जोडून बचत खात्यात आधी ३० हजार रुपये जमा केले पाहिजेत. तसेच, तुम्ही पे ऑटो स्विच ऑन करा. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही पैसे खर्च कराल, तर एफडी करा, जी रक्कम काढता येऊ शकेल. अशाप्रकारे तुम्ही १० महिन्यांपर्यंत ३-३ हजार रुपये जमा करून आपत्कालीन निधी तयार करू शकता. हे तुम्ही कामाला लागल्यानंतर पहिल्या १० महिन्यात करावे लागणार आहे.

जीवन विमा तुम्हाला सर्वप्रथम घ्यायचा आहे. कारण, जितक्या तरुण वयात तुम्ही हा विमा घ्याल, तेवढा तुम्हाला प्रीमियम (हप्ता) कमी भरावा लागेल. तर या झाल्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या. तुम्ही तुमचा जीवन आणि आरोग्य विमा घेतला. तुमचा आपत्कालीन निधी बनवला. आता ११ महिन्यानंतर तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता.

*गुंतवणूक*
तुमच्याकडे आता ३ हजार रुपये आहेत, तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे आहेत, तर आता तुम्ही गुंतवू शकता. म्युच्युअल फंड्समध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास १२-१५ टक्के परतावा सहज मिळवू शकता. यासाठी एखाद्या अनुभवी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.

आपण अद्याप एक गोष्टीचा हिशोब केलाच नाही, तो म्हणजे तुमचा पगार कायम २० हजार असणार नाहीये. कधी ना कधी तुमचा पगार वाढणार आहे. तुम्ही नेहमी एवढीच गुंतवणूक करणार नाहीयेत. नक्कीच त्यात वाढ कराल. त्यामुळे जेव्हा तुम्ही जास्त गुंतवणूक कराल, तेव्हा तुम्हाला जास्त पैसे लागतील आणि त्यावर जास्त परतावा मिळेल. जसे तुम्ही सध्या ३००० रुपयांची गुंतवणूक करत आहात, पण पुढच्या वर्षी त्यात १५ टक्के वाढवाल. म्हणजेच पुढच्या वर्षी तुम्ही ३ हजार नाही, तर जवळपास ३५०० हजार रुपये गुंतवाल. त्यानंतर पुन्हा तुम्ही १५ टक्के वाढवाल. आता एक प्रश्न असाही आहे की, कुणाचा पगार दरवर्षी १५ टक्के वाढतो. जर महागाईचा दर ६.७ टक्के वाढला आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर तुमच्या पगाराच्या २० टक्के रक्कम गुंतवत आहात आणि त्यात तुम्ही १० टक्क्यांच्या वाढ केली, पण इतर ८० टक्के खर्च तुमचा गरजा आणि इतर गोष्टींसाठी ६ टक्क्यांनीच वाढला, तरी ४ टक्के तुम्ही गुंतवू शकाल.
तुम्ही ४ हजार रुपये बचत करण्यापासून सुरुवात केली होती. त्यातील १ हजार रुपये विम्यासाठी गेले आणि ३ हजार रुपये उरले आणि तुम्ही प्रत्येक महिन्यात गुंतवणूक करू लागला. जर तुम्ही आता २०-२५ वर्षांचे असाल, तर ४०-४५ वर्षांचे होईपर्यंत २० वर्षांत तुम्ही दर वर्षी ३ हजारांपासून सुरू केलेली गुंतवणूक १५ टक्क्यांनी वाढवत असाल, तर तुम्हाला १२ किंवा १३ टक्क्यांच्या हिशोबाने ४० वयापर्यंत १ कोटी रुपये जमा होतील. म्हणजेच तुम्ही चाळिशीपर्यंत कोट्याधीश बनाल. २० वर्षांनंतर तुमच्याकडे १ कोटी असतील आणि तुम्ही आणखी ५-६ वर्षे थांबलात, तर तुमच्याकडे ५० वयापर्यंत २ कोटी रुपये येतील. यात दोन प्रश्न उद्भवू शकतात, त्यातील एक असा की, दोन कोटी जरी असले, तरीही तेव्हा यांचे मूल्य किती असेल.

हेही आपण पाहूयात. आजपासून २५-३० वर्षांनंतरही २ कोटी रुपयांचे मूल्य जर ५-६ टक्के महागाई पकडली, तरीही तुमच्याकडे त्यावेळी आजच्या हिशोबाने ६५-७० लाख रुपये असतील. एवढ्या पैशात तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. आणखी एक गोष्ट अशी की, तुमचे लग्न झालेले असेल. त्यामुळे तुमचा पार्टनरही कमावता असेल. त्यामुळे दोघेही कमावते असल्यामुळे खर्च वाढणार नाही. अनेक खर्च सामान्य असतात. घरखर्च तेवढा वाढणार नाही. तुमची बचत जास्त होऊ शकते. कधी पगारात १० टक्क्यांची वाढ मिळेल, कधी २० टक्क्यांची, तर कधी ३० टक्क्यांची. या गोष्टींचा हिशोबही आपण अद्याप केला नाही. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न असा की, ५० वर्षांच्या वयात श्रीमंतीचा काय फायदा.

तर हे आपण एकदम वर्स्ट केसमध्ये पाहिलं आहे. मात्र, जर तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला. जर तुम्ही जास्त गुंतवणूक केली, तर होऊ शकतं की, तुम्ही ३५-४० वयात श्रीमंत होऊ शकाल. त्यामुळे तेव्हा तुम्ही या पैशांचा मनासारखा वापर करू शकाल.

VP Innovative Wealth.
Vaibhav Patil.
(Financial Advisor and Mutual funds Distributors.)
9921525020.

Do you Know -Your most daunting financial challenge by Krishan Sharma 15/04/2024

https://youtu.be/o5HkazfhTdo?si=cyuJ2RZo8Dbz9amj

* रिटायरमेंट प्लॅनिंग क्यू जरुरी है??
* जलदी इन्व्हेस्टमेंट क्यू जरुरी है??
* आपने इन्वेस्टमेंट किया हुआ पैसा फ्युचर मे कैसे काम करेगा ??
*ऐसे सभी प्रश्न के जवाब के लिए व्हिडिओ जरूर देखे*

VP Innovative Wealth.
Vaibhav Patil.
9921525020

Do you Know -Your most daunting financial challenge by Krishan Sharma Discover why retirement could be a ticking time bomb for your financial future. Join us as we explore the potential risks and ...

26/03/2024

*☑️म्युच्युअल फंडचा इ-फ्लॅट म्हणजे तरी काय???*
प्रत्येक जण आज काल यामध्ये इन्व्हेस्ट करतोय, आणी सर्वात जास्त फायद्याचे पण होते आहे. विना कटकट...

*प्रॉपर्टी रेंट वर देण्यापेक्षा हे का जास्त बरे किव्हा प्रॉपर्टी घेण्यापासून ते रेंट चालू होण्या पर्यंत जी कट कट पासून दूर जाण्याचा हा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंडचा इ-फ्लॅट होय.*

उदाहरण म्हणून बघूया,
*🏛म्युच्युअल फंडचा इ-फ्लॅट🏛*
आपण फक्त एकच करायचे फ्लॅट ऐवजी *50 लाखा आपण*
(Just Taking as Example)
*म्युच्युअल फंडच्या इ-फ्लॅट म्हणजे Sysmatic Withdrawal Plan मध्ये गुंतवायचे* आणि विना त्रास - विना कटकट दरमहा त्यांत निश्चित (6 ते 7% वार्षिक) परतावा घ्यायचा.
*असे केल्यास आपणास मिळणारे फायदे...*

1) 🏛 50 लाखाच्या फ्लॅटला दरमहा रु.10,000 ते 15,000/- भाडे मिळते,
*म्युच्युअल फंडच्या* इ- फ्लॅटला दरमहा रु.22000 ते 25,000/- मिळतात, तेही हहयात म्हणजेच जिवंत असेपर्यंत. तिथुन पुढे नॉमिनी ला मिळत राहणार च...
2)🏛फ्लॅटचे भाडे वसुलीसाठी *प्रत्येक महीन्याला भाडेकरूंच्या मागे लागावे लागते*.
*म्युच्युअल फंडच्या इ- फ्लॅटला* कोणत्याही भाडेकरूची आवश्यकता नाही. आणि आपले भाडे रु.22000 ते 25,000/- दरमहा आपल्या बँक खात्यात आयुष्यभर विनाकष्ट जमा होते.
3)🏛फ्लॅटचे रु.10,000 ते 15000/- भाडे मिळाल्यावर त्यातून *मेन्टेनन्स चार्जेस, मुनिसिपल चार्जेस, वॉटर चार्जेस सोसायटी चार्जेस वजा जाता फक्त रु.6,500/-* शिल्लक राहतात जेव्हा की, *म्युच्युअल फंडच्या इ-फ्लॅट फ्लॅटमधून मिळालेले रु.22000 ते 25,000/*- पूर्णपणे आपल्या खात्यात जमा होतात त्यावर कोणताही खर्च नाही.
*4)🏛फ्लॅट खरेदी करताना त्रास, पजेशनच्या वेळी होणारी टाळाटाळ,* मुनिसिपालटीमध्ये नाव लावताना होणार त्रास , प्रॉपर्टी कार्डवर नाव लावताना होणार त्रास, यावर कहर म्हणून बांधकामाचा नीत्कृष्ट दर्जा, या सर्वाचा एकच अर्थ, *तो म्हणजे स्वतःची कष्टाची कमाई दुसऱ्याच्या घशात घालणे आणि आयुष्यभराचा मनस्ताप ओढून घेणे.*
यावर एकच उपाय आणि तो म्हणजे *🏛म्युच्युअल फंडचा इ-फ्लॅट🏛* (NJ MARS Balance OR MARS बॅलन्स Advantage पोर्टफोलिओ मधून )
5)🏛 म्हणूनच *म्युच्युअल फंडचा इ-फ्लॅटमध्ये* 50 लाख गुंतवा आणि ह्यतून रु22,000/- ते.25,000/- घरबसल्या मिळवा. (कायमस्वरूपी)

*6)🏛 आणि वरील सर्व फायदे मिळून* त्याशिवायतुम्ही जर *8 वर्षे पेक्षा जास्त* वेळ इन्व्हेस्टमेंट ठेवली, असेल तर ती सुध्दा 5% ते 6% चक्रवाढ व्याजाने पैसे काढून वाढलेली दिसेल आणि नेहमी liquidity (तरलता) फंड ला असतेच .
( घर विकताना इतकी liqudity तुम्हाला मिळू शकत नाही, त्यामुळे आपलेच पैसे असुन गरजेच्या वेळेस मिळायला अडचण तर होतेच. *आता करोना च्या काळा मध्ये तुम्ही बघितले च असेल*
(Note :-म्युच्युअल फंडच्या इ-फ्लॅटसाठी किंवा मंथली Income *7 ते 8 वर्षाचा* तुमचा *कमीत कमी इन्व्हेस्टमेंट कालावधी* असायला च पाहिजे)
*चला तर मग आजच म्युच्युअल फंडचा म्हणजे "इ-फ्लॅट" मध्ये इन्व्हेस्टमेंट करूया*
For more information & Detail Knowledge plz call me.

*Regards,*
VP Innovative Wealth.
Vaibhav Patil.
*Financial Advisor and Mutual funds Distributors.*
9921525020.

*MutualFundSahiihai*

24/03/2024

*🌈होली के मोके पर अपना आर्थिक नियोजन और SIP दोनो साथ में चालू करें?* और पुराणे आदतें को छोडके इन्व्हेस्टमेंट कि नयी आदतें आपनाइये।।🙏🏻

*क्या SIP के जरिए इन्वेस्टमेंट करने से मेरे सारे आर्थिक 🎯 गोल पूरे हो सकते है?*
*आर्थिक साक्षरता का काम जोरोसे होणे* कारण आजकल SIP की बहुत बोलबाला हैं,और इन्वेस्टमेंट का अच्छा जरिया भी है। लेकिन अकेले SIP के द्वारा आप अपना पूरा गोल और प्लांनिंग सेट करोगे तो भविष्य में काफी तनाव आ सकता है।

*☑️क्या करना चाहिए?*
सबसे पहले आप अपने *फाइनेंशियल एडवाइजर* के साथ बैठके आपके वर्तमान इन्वेस्टमेंट, टर्म इन्शुरन्स,हेल्थ इन्शुरन्स, आपकी आय, आपके खर्च, आपके EMI, आपकी भविष्य की जरूरियात के बारे में खुलकर चर्चा करे।

*☑️इससे क्या होगा?*
इससे आपके एडवाइजर को आपकी सही परिस्थिति और ज़रूरीयात के बारे में मालूम होगा, और वो उसिके जरिए आपके लिए अच्छा सा सॉल्यूशन और आर्थिक नियोजन कर के दे पाएगा।

*सामान्यत: हमारे लिए क्या जरूरी होता है? ये जाणना बहोत जरुरी है*
सामान्यत: हरेक की आय, गोल, और जरूरियात अलग अलग होती है, *कोई भी एक सॉल्यूशन सभी के लिए नहीं चल सकता।*
मगर मोटे तौर पर बात की जाए तो, *इसका क्रम इस तरह होना चाहिए*
*१. लाइफ इंश्योरेंस (टर्म इन्शुरन्स)*
२. हैल्थ इंस्योरेंस (फॅमिली कव्हर )
३. चाइल्ड एजुकेशन प्लांनिंग (Mutual Fund)
*४. चाइल्ड मैरिज प्लांनिंग*
(Mutual Fund)
*५. रिटायरमेंट प्लानिंग*
(Mutual Fund)
उसके बाद
*६. हाउस प्लानिंग*
*७. कार प्लांनिंग*
*८. वेकेशन प्लानिंग*
ऊपर दिए गए जरूरियात के आलावा भी कई अलग चीजे हर व्यक्ति के हिसाब से हो सकती है।
*जैसे कि किसी का बालक किसी तरह से सरी जिंदगी उसके ऊपर निर्भर रहे ऐसे में उसका प्लांनिंग का क्रम बदल जाएगा। ऐसी कई बात हो सकती है।*
इसीलिए कोई भी इन्वेस्टमेंट कभिभी अपने मित्र या अन्य कोई जान पहेचान वाले की तरह करने की बजाय उसे अपने हिसाब से *एडवाइजर से मिलके करना चाहिए।*

*☑️क्या में SIP का इन्वेस्टमेंट कर सकता हूं?*
जरूर पर उसके लिए भी बहुत सारे फंड्स है, और कोई भी SIP की शुरुआत करने से पहले आपका इन्वेस्टमेंट का समय, आपका रिस्क लेने की क्षमता के अलावा फंड का पिछला परफार्मेंस, फंड मैनेजर, *योग्य असेट आलोकेशन ऐसें इत्यादि भी ध्यन में रखना जरूरी है।*

*अगर आपको आपके फैमिली और भविष्य के बारे में अच्छा सा इन्वेस्टमेंट करना है तो एडवाइजर जरूरी है, और उनके मार्गदर्शन के जरिए इन्वेस्टमेंट करके साल में कम से कम दो बार एडवाइजर से मिलिए।*

Regards,
*VP Innovative Wealth.*
*Vaibhav Patil.*
Financial Advisor & Mutual funds Distributor.
9921525020
*Wish you In Happy Holi🌈*

23/03/2024

https://www.youtube.com/live/LBqo6SSAVzU?si=ao2L9xA27Jfaivxq

गुंतवणूक क्षेत्रात काम करत असताना आजपर्यंतच्या ट्रेनिंग मधील सर्वात महत्त्वाचं, अभ्यासपूर्ण आणि अध्यात्मिक अनुभवातून आलेलं हे संभाषण, संपूर्ण कुटुंब सहित ऐकावं आणि आपली गुंतवणूक कशा पद्धतीने असावी कुठे असावी किती कालावधीसाठी असावी यांची सर्व उत्तर या व्हिडिओमध्ये आहेत कृपया लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा.🙏
Thanks & Regards,
VP Innovative Wealth.
Vaibhav Patil.
(Financial Advisor and Mutual funds Distributors)
9921525020.

https://p.njw.bz/15876

22/03/2024

भारताच्या वेगवान अर्थव्यवस्थेबाबत सर्वच बाजूंनी चांगली बातमी येत आहे. सातासमुद्रापार भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं २०२४ साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मूडीजनं आपलं रेटिंग ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्के केलंय. आता आणखी एका रेटिंग एजन्सीनं भारताच्या विकासाच्या गतीला मान्यता दिली आहे. क्रिसिल रेटिंग एजन्सीनं भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत दिलेत. CRISIL च्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताचा जीडीपी ६.८ टक्क्यांच्या वेगाने वाढेल. रेटिंग एजन्सीस भारताचा विकासाचा दर वाढवत असताना आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या चीनची स्थिती मात्र बिकट आहे. आर्थिक मंदी आणि व्यवसायांसाठी प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत असलेल्या चीननं यावर्षी पाच टक्के आर्थिक वृद्धीचं लक्ष्य ठेवलं आहे.

रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ६.८ टक्के दरानं वाढण्याचा अंदाज आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलनं पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि २०३१ पर्यंत भारत उच्च-मध्यम उत्पन्न असलेला देश बनेल अशी शक्यता व्यक्त केलीये. २०३१ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होऊन ७ ट्रिलियन डॉलर (५८० लाख कोटी) होईल असंही त्यांनी म्हटलंय.

भारतीय अर्थव्यवस्थेला देशांतर्गत संरचनात्मक सुधारणेमुळे आधार मिळेल. २०३१ पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता राखू शकते आणि त्यात सुधारणाही करू शकते. चालू आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा ७.६ टक्क्यांच्या वाढीनंतर, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची वास्तविक जीडीपी वाढ ६.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असल्यातं क्रिसिल रेटिंग्सनं आपल्या ‘इंडिया आउटलुक’ अहवालात म्हटलं आहे.

७ लाख कोटींची अर्थव्यवस्था

रिपोर्टनुसार, पुढील सात आर्थिक वर्षांमध्ये (२०२४-२५ ते २०३०-३१) भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून सात ट्रिलियन डॉलरच्या जवळपास पोहोचेल. क्रिसिलनं सांगितलं की, या कालावधीत अंदाजे सरासरी ६.७ टक्क्यांची वाढ भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत, भारताचे दरडोई उत्पन्न देखील उच्च-मध्यम उत्पन्न गटापर्यंत पोहोचेल. भारत सध्या ३.६ ट्रिलियन डॉलरच्या (२९६ लाख कोटी) जीडीपीसह (GDP) जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताच्या पुढे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे देश आहेत.
Regards,
*VP Innovative Wealth.*
*Vaibhav Patil.*
(Financial Advisor & Mutual funds Distributors)
9921525020.
https://p.njw.bz/15876

21/03/2024

*हो आज च संध्याकाळी 7 वाजता ऑनलाइन आर्थिक साक्षरता कार्यक्रम*
*📈खास आमंत्रण:-*
*चला आजची संध्याकाळ* आपण ती ही सत्कारणी लावूयात ते ही, *महत्वाच्या गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रमात आज ऑनलाइन उपस्थित राहून*

*प्रिय गुंतवणूकदार मित्रांनो,*
तुमचा *कष्टाने मिळवलेला पैसा योग्य ठिकाणी आणि योग्य मालमत्ता वर्ग कुठे गुंतवायचा.?*

आज याचं बरोबर आपण खालील प्रमुख विषयावर बोलणार आहोत.
☑️बचत आणि निवेशातील फरक
☑️विविध प्रकारच्या संपत्तींची वर्गीकरण
☑️ इक्विटीची संपत्ती वर्गीकरण
*☑️ म्युच्युअल इन्व्हेस्टमेंट ची मागणी का वाढत चालेली आहे?*
☑️SIP आणी SWP हे काय आहे?
*☑️ मासिक पेन्शन आणी वाढीव पेन्शन कशी घेऊ शकतो?*
☑️उदयोगपती किव्हा ज्ञानी व्यक्ती सुद्धा REAL ESTATE पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट MUTUAL FUND मध्ये का करतोय , असे अनेक प्रश्नाची उतरे मिळून जातील
*(हा सेशन पूर्णतः मराठी मध्ये आहे)*
☑️तारीख: २१ मार्च (गुरुवार)
वेळ: संध्याकाळी 7 वाजता.

*खालील दिलेल्या लिंक वरून जॉईन करा*

https://meet.google.com/qto-anom-srh

*तुमचा शुभेच्छुक*
VP Innovative Wealth.
Vaibhav Patil.
9921525020.
_*आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी केलेला छोटासा हा प्रयत्न*_
https://p.njw.bz/15876

21/03/2024

यासाठीच जेव्हा कमवत असता तेव्हा प्रॉपर प्लॅनिंग ने पैसे गुंतवावे लागतात जेणेकरून उतार वयात जास्त त्रास होत नाही व असे स्टेटमेंट द्यायची वेळ येत नाही.

पैसे कमवणे सोपे असते ते सांभाळाने / वाढवणे अवघड त्याला थोडेसे स्किल लागते व संयम. 👍👍

आपल्या कमाईच्या 20%ते25,% किंवा आपल्या कुवती प्रमाणे इन्व्हेस्टमेन्ट सुरु करा आणि आणि उतार वयात कंगाल होण्यापासून वाचा. 😄😄😄

*सेविंग*
*इन्शुरन्स*
*इन्व्हेस्टमेंट*
*इमर्जन्सी फंड*
या गोष्टी समजून घ्या आणि मगच गुंतवणूक करा.

अधिक माहितीसाठी कॉल करा -
*VP Innovative Wealth.*
*Vaibhav Patil.*
(Financial Advisor & Mutual funds Distributors)
9921525020.
https://p.njw.bz/15876

09/03/2024

*धन कि बात*
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यामागे संपत्ती निर्माण करणे तसेच आपली आर्थिक ध्येयं पूर्ण करणे हा उद्देश असू शकतो. जसे की,

💠 *मुलांच्या शिक्षणासाठी*
💠 *नवीन / मोठे घर घेण्यासाठी*
💠 *मुलीच्या लग्नासाठी*
💠 *स्वतःच्या निवृत्ती नियोजनासाठी.*

अशा प्रकारे आर्थिक ध्येय आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खुणावत असतात. एका बाजूला वाढणारी महागाई, सुधारत चाललेला राहणीमानाचा दर्जा आणि प्रत्येक वस्तू ब्रँडेड हवी अशी मानसिकता; हे सर्व मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते. आज म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील वेगवेगळे पर्याय समोर दिसत असले, तरी या पर्यायाकडे वळण्याआधी स्वतःचे आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. *कारण जोपर्यंत किती पैसा आणि कोणत्या आर्थिक ध्येयासाठी, कधी लागणार हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत आपल्याला किती पैसा गुंतवावा, किती जोखीम घ्यावी हेही कळणार नाही.* चला तर मग आज आपण आर्थिक नियोजनाचे महत्व समजून घेऊ.
*आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय?*
आज प्रत्येक व्यक्तीची मग तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य व्यक्ती असो किंवा श्रीमंत प्रत्येकाला काही ना काही आर्थिक ध्येयं आहेत. आज एखादा व्यक्ती महिन्याला १ लाख रुपये कमवत असेल आणि ४०-५० हजार जर त्याला दर महिन्याला घरखर्चाला लागत असतील तर उरलेली रक्कम बचत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढील भविष्यातील गरजांसाठी, अडचणीच्या काळातील खर्चासाठी बाजूला ठेवणे अनिवार्य आहे, हो ना? आर्थिक नियोजन म्हणजेच आपल्या भविष्यातील खर्चाचा मागोवा घेणे आणि त्याची तरतूद करणे. आज वाढलेली महागाई, शिक्षण आणि औषधपाण्याचा वाढलेला खर्च त्यामुळे भविष्याबद्दल कमालीची भीती निर्माण झालेली दिसते. या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी *‘आर्थिक नियोजन’* करून घेणे हाच पर्याय उभा राहतो.
आर्थिक नियोजन करताना पुढील मुख्य घटक पहिले जातात.
*सध्याची आर्थिक परिस्थिती.*
*भविष्यातील आर्थिक ध्येय.*
*गुंतवणुकीत जोखीम घेण्याची क्षमता.*

वरील ३ मुख्य घटकांवर बहुतेक गोष्टी अवलंबून आहेत. आर्थिक नियोजनाचे खालील मुख्य भाग आहेत.

❇️ *पैशाचे व्यवस्थापन*
❇️ *विमा नियोजन*
❇️ *गुंतवणूक नियोजन*
❇️ *निवृत्ती नियोजन*

आपण सविस्तरपणे प्रत्येक बाजू समजावून घेऊ, जेणेकरून तुम्हाला स्वतःचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाईल.

✳️ *पैशाचे व्यवस्थापन* – आर्थिक नियोजन करण्याआधी आपल्या पैशाचे व्यवस्थापन आपण कसे करतो हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. महिन्याला आपण किती कमावतो, किती खर्च करतो, महिन्याच्या खर्चाचे बजेट, वर्षाच्या खर्चाचे बजेट हे सर्व पैशाच्या व्यस्थापनामध्ये केले जाते. जोपर्यंत तुम्ही पैशाच्या व्यवस्थापनाला महत्व देत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचा आर्थिक स्तर उंचावू शकत नाही.

✳️ *विमा नियोजन* – आज जीवन अनिश्चिततेने भरलेले आहे, त्यामुळे कधी कोणते संकट समोर उभे राहील सांगता येत नाही. विमा नियोजनाच्या माध्यमातून आपण आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या विमा कंपन्यांवर सोपवू शकतो. जीवन विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, घराचा विमा अशा अनेक पद्धतीने आपण आपल्या भोवती एक संरक्षक कवच उभा करू शकतो. *भारतीय मानसिकतेत अजूनही विम्यावर होणार खर्च म्हणजे वाया गेलेला खर्च समजला जातो.*

✳️ *गुंतवणूक नियोजन* – आर्थिक नियोजनातील महत्वाचा टप्पा म्हणजे गुंतवणूक नियोजन. वेगवेगळ्या आर्थिक ध्येयासाठी वेगवेगळे आर्थिक नियोजन करणे म्हणजे गुंतवणूक नियोजन होय. मुलांच्या शिक्षणासाठी, नवीन/मोठे घर घेण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी अशा एक ना अनेक ध्येयासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.

✳️ *निवृत्ती नियोजन*– आपण २५ वर्ष शिकत असतो आणि २५-३० वर्ष नोकरी किंवा धंदा करतो आणि या काळात जी काही शिल्लक बाजूला ठेवली असते त्यातून आपल्याला आपल्या निवृत्ती नंतरच्या काळासाठी नियोजन करायचं असते. निवृत्ती नियोजन ही काळाची गरज आहे; कारण वाढलेली महागाई, कमी होणारे व्याजदर यामुळे आपल्या भविष्यासाठीच्या नियोजनाची सुरुवात आजपासूनच करा.

*पैशाचे व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनाचे महत्व ज्याला पटले आणि त्यानुसार स्वतःच्या आर्थिक जीवनाला ज्यांनी योग्य आकार दिला त्यांची आर्थिक ध्येयं दृष्टीक्षेपात येतात कारण एक राजमार्ग त्यांच्यासाठी तयार झालेला असतो.*

आर्थिक नियोजनामध्ये *म्युच्युअल फंड गुंतवणुकीला* एक वेगळे महत्व आहे ते पुढे पाहूया. *जसा प्रत्येक परिवारासाठी एक डॉक्टर असतो तसचं आज आर्थिक नियोजनकारांना (Financial Advisor)महत्व प्राप्त झाले आहे* तेव्हा योग्य आर्थिक नियोजनकार गाठून स्वतःचंही आर्थिक नियोजन करून घ्या..

Regards,
*VP Innovative Wealth.*
Vaibhav Patil.
*(Financial Advisor and Mutual funds Distributors.)*
9921525020.

https://p.njw.bz/15876

06/03/2024

*🔥डेनिस डिडरोट इफेक्ट🔥*

*रशियात डेनिस डिडरोट* नावाचा एक अभ्यासू वाचक होता. *इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष* होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. *त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय* होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्या वेळी *रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या* गरीबीबद्दल कळले. तिने *डिडरोटला* त्याच्याकडील *लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच 50 हजार डॉलर्स म्हणजे; आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला* देऊ केले. *डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले*.

*डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला*. त्याने त्या पैशातून लगेच *'स्कार्लेट रॉब'*; म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असतांना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज ही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधांत लिहून ठेवले. यालाच *मानस शास्त्रातील 'डिडरोट इफेक्ट' (Diderot Effect)* म्हणतात.

*भारतातले मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स पुढारी सुद्धा; या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने अवलंब करतात. याचे निरीक्षण आपण स्वत: बद्धल करून पहाण्यास हरकत नाही. कसे?

समजा आपण *महागडे कपडे घेतले; तर त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाडी.... इ. घेणार*.

घरात *मोठा टी.व्ही*. आणला की *चांगला टेबल, फर्निचर, HD वाहिन्या सुरु करणार*. घराला *नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार*.

समजा आपण पन्नास हजार रूपयांचा मोबाईल घेतला; तरी आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून 600 रुपयांचा गोरील्ला ग्लास लावणार. दर महिन्याला 500 रुपयांचे कव्हर बदलणार. शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच तीन हजाराचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त शोभून दिसत नाही. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात *'डिडरोट इफेक्ट'*

थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.

*सर्वच उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने वापर करतात.
एक laptop विकत घेतांना त्यासोबत हजार दोन हजाराचा antivirus टाकून देतो. हजार बाराशेचं कव्हर घेतो; ज्याचा क्वचितच वापर केला जातो. *कुंडी वा फुलझाड विकत घेतलं की; सोबत शे दोनशे रुपयाचे खत* माथी मारलं जातं. लग्न समारंभात तर या प्रदर्शनाची चढा ओढ लागलेली दिसून येते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

*आपण एक वस्तू घ्यायला गेलो की; दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी*. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही. यालाच *'spiraling consumption'* म्हणतात. म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो *'डिडरोट इफेक्ट'* (Diderot Effect) होय. ही सामान्य *मानवी प्रवृत्ती* (human tendency) आहे.

या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण *नकळतपणे अनावश्यक खर्च* करत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात.

माणसाला *खर्च करताना भीती वाटत नाही*; पण नंतर *हिशोब लागत नाही*; तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; *या वस्तूची मला कितपत गरज आहे?* असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं *उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा*. असा निर्णय घेतल्यावर त्या *वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां*? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा.

दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो.

संदर्भ :

*'डिडरोट इफेक्ट'*

(Diderot Effect)

*Understanding the 'Diderot Effect' and how to overcome it?*

VP Innovative Wealth.
Vaibhav Patil.
*Financial Advisor & Mutual funds Distributors*
9921525020

02/03/2024

*आमंत्रण,*
आज येताय ना , *हो यायलाच पाहिजे,* *चला या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ,* आजचा शनिवार *संध्याकाळ सत्कारणी लावूयात,*

*📈आर्थिक साक्षरता कार्यक्रम,*

*प्रिय गुंतवणूकदार मित्र,*
*खास, गुंतवणूक आणि टॅक्स सेविंग्स मार्गदर्शन कार्यक्रम तुमच्यासाठी आता जवळच्या "हॉटेल नुरिया" मध्ये..*
✔ *आर्थिक नियोजनाचे महत्व काय? Mutual फंडातील गुंतवणूक का दिवसे दिवसं फायदेशीर ठरत चालली आहे ?*
✔ *हेल्थी रिटायरमेंट फंड कशाला म्हणतात?* (SWP) *Mutual Fund मधून मंथली इन्कम कसा चालू करता येतो?*
*अशा अनेक गुंतागुंतीची प्रश्नाचे समाधान करणारी*
_(ही विनामूल्य कार्यशाळा सेबी च्या आखत्यारीत)_

*☑️दिनांक आणि वेळ:*
*2 मार्च ( शनिवार) संध्याकाळी*
_(नाव नोंदणी 6.00 वाजल्यापासून)_ *सेशन चालू वेळ:- 6.30 वाजता , "हॉटेल नूरिया", बिर्ला हॉस्पिटल च्या समोर, थेरगाव रोड चिंचवड पुणे*
_(हा सेशन चहा +कॉफीं +छान स्नॅक्स वर आयोजित केला आहे)_

तुमचा जवळचा मित्र आणि सल्लागार,
*☑️ VP Innovative Wealth.*
Vaibhav Patil.
9921525020.

Location - - https://g.co/kgs/tWRHqDG
*🙏आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी केलेला छोटासा हा प्रयत्न.*

27/02/2024

आमंत्रण :-
*।।आर्थिक साक्षरता कार्यक्रम।।*
*प्रिय गुंतवणूकदार मित्र,*
*2 मार्च 2024* शनिवार ची संध्याकाळ आपण सत्कारणी लावूयात,
✔ *गुंतवणूक का, कशी व कुठे करावी??*
✔ *आर्थिक नियोजनाचे महत्व काय? Mutual फंडातील गुंतवणूक का दिवसे दिवसं फायदेशीर ठरत चालली आहे व कशी केली पाहिजे?*
✔ *रिटायरमेंट फंड कशाला म्हणतात?* रिटायरमेंट नंतर मंथली इन्कम कसा चालू करता येतो,
*✔️संपत्ती नियोजन आणि त्याचे वितरण करणे म्हणजे काय ?* (Asset Allocation)
अशा अनेक कितीतरी *आर्थिक गुंतवणुकीचे प्रश्नाचे समाधान करणारी* ही
*(विनामूल्य कार्यशाळा सेबी च्या आखत्यारीत)* *ही सदरची माहिती देण्यासाठी गुंतवणूक* कार्यशाळा आयोजित केली आहे
*नक्की शनिवारी स्वतः आपल्या कटुंबा सहित उपस्थित राहा*

*✔️दिनांक आणि वेळ:*
2 मार्च (शनिवार)
नाव नोंदणी *संध्याकाळी 6.00 वाजल्यापासून* चालू होईल
*✔️कार्यक्रमाची वेळ:- 6.30 वाजता*

*स्थळ: हॉटेल नूरिया, बिर्ला हॉस्पिटल च्या समोर, थेरगाव रोड चिंचवड पुणे*
(हा सेशन चहा+स्नॅक्स वर आयोजित केला आहे)

तुमचा शुभचिंतक ,
*VP Innovative Wealth*
Vaibhav Patil.
9921525020
*🙏आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न*

25/02/2024

*हर महिने पेन्शन चाहिये क्या???* अभी नही बाद मे चाहिये ?? की 2 साल के बाद चाहिये?? *तो उसके लिये BAF , Hybrid और मल्टि असेट आलोकेशन फंड है ना.*
VP Innovative Wealth.
Vaibhav Patil.
099215 25020

24/02/2024

*नमस्कार मित्रहो,*
*चला आजचा शनिवार खऱ्या अर्थाने सत्कारणी लावूयात,*
*☑️आज येताय ना, हो यायलाच पाहिजे ,*
*3 वाजता हॉटेल नुरिया मध्ये जॉईन करा.* 🙏🏻 #आर्थिक-साक्षरता.
* # 🇮🇳अमृत काल - भारत*

*VP Innovative Wealth.*
Vaibhav Patil.
9921525020.

Location -
https://g.co/kgs/tWRHqDG

16/02/2024

पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टीवर पैशांचा प्रभाव पडतो, मग तो कमी असला तरी किंवा जास्त असला तरी. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा विचार हा व्हायलाच हवा, म्हणून या लेखामध्ये आपण पैशाविषयी बोलूया…( Financial Planning )

पैशाचं योग्य (Financial Planning) नियोजन करण्यासाठी आपण काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला किचकट वाटणारं पैशाचं नियोजन जरा सोपं होऊन जाईल.

१. उत्त्पन्न : पैशाचं नियोजन करताना पहिला मुद्दा आहे तुमचं उत्पन्न! तुम्ही नोकरदार असा की व्यावसायिक, बेरोजगार असा किंवा गृहिणी, तुमचे उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत आणि ते तुम्ही कसे वाढवू शकता जेणेकरून तुमच्याकडे येणारा पैसा वाढेल याचा तुम्हाला सर्वात आधी विचार करावा लागेल.

२. खर्च : दुसरा आणि महत्वाचा मुद्दा असा की तुमचा पैसा खर्च कुठे आणि कसा होतो याची नोंद तुम्ही रोजच्या रोज ठेवायला हवी. बचतीचा मार्ग न स्वीकारता जर तुम्ही वारेमाप पैसा खर्च करत असाल, तर त्याचा तुमच्या आर्थिक भविष्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.

३. बचत : आपला तिसरा मुद्दा आहे बचत. आप कितना कमाते हो पेक्षा आप कितना बचाते हो हे सध्या जास्त महत्वाचं झालंय ! बचत करण्यासाठी अतिरिक्त खर्च टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे बचत करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढा.

४. गुंतवणूक : पैसा वाढवल्याने वाढतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे आपला चौथा मुद्दा आहे गुंतवणूक ! बचत केलेल्या पैशाची विभागणी करा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. प्रसिद्ध गुंतवणूकदार Warren Buffett यांचा एक फेमस quote आहे *“If you don’t find a way to make money while you sleep, you will work until you die”* म्हणजे जर तुम्हाला झोपेत पैसे कमवण्याचा मार्ग सापडला नाही, तर तुम्हाला मरेपर्यंत कामच करत राहावं लागेल.

५. कर्ज : आपला पुढचा मुद्दा आहे कर्ज! तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे नेहमी पुरेसा पैसा असेलच असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने कर्ज घेणे आणि ते सुद्धा सोयीस्कर अटींसह हे खूप गरजेचं आहे.

६. अर्थसंकल्प : जसा देशाचा अर्थसंकल्प असतो तसा देशातील प्रत्येक नागरिकानेसुद्धा आपला स्वतःचा वैयक्तिक अर्थसंकल्प बनवला पाहिजे. अर्थसंकल्प बनवल्यामुळे आपल्या पैशांचे सुयोग्य नियोजन करण्यास मदत होते. यात तुमचे उत्पन्न, खर्च, कर्ज आणि गुंतवणूक अशा सर्व गोष्टींचा ताळेबंद असायला हवा.

७. सातत्य : शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सातत्य! आपल्याकडे आर्थिक नियोजनात कधीच सातत्य आढळत नाही. त्यामुळे वरील सर्व गोष्टींमध्ये तुम्ही कितपत सातत्य राखता यावर तुमचे आर्थिक भविष्य अवलंबून असेल.

Regards,
VP Innovative Wealth.
Vaibhav Patil.
Financial Advisor and Mutual funds Distributor.
9921525020.

https://p.njw.bz/15876

Want your business to be the top-listed Accountant in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

VP Innovative Wealth.9921525020.
*📈 आर्थिक विकास के लिये खास निमंत्रण*_(NJ-Digital SaturdaySchool)_*प्रिय निवेशक और मित्र परिवार,** दिन की बधाई!!*आने वाल...
VP Innovative Wealth
*ऐकले का???*पेंडमिक ( pandemic) नंतर भल्या भल्या ना समजून चुकले की  "2022/23/24" या वर्षामध्ये आता *वेळ आली बरं का "इ-फ्...
Insurance policy information about Budget 2022-2023       *VP INNOVATIVE WEALTH* 099215 25020
VP INNOVATIVE WEALTHVaibhav Patil. 099215 25020
Future of Indian markets. VP INNOVATIVE WEALTH 099215 25020
Important of Life Insurance.

Telephone

Website

Address


Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 3pm