Bhagwat Nursery and Garden

All types of forest, roadside and garden varieties are available in wholesale rate. सर्व प

Photos from Bhagwat Nursery and Garden's post 21/07/2023
17/05/2023
Photos from Bhagwat Nursery and Garden's post 14/07/2021

Premium quality lawns available.
, , Blue Grass

25/01/2021

Another one loading
Shrubs n pots....

25/01/2021

24/01/2021
Landscaping varieties Loading...

21/01/2021

Bagged another one...
Loading for Kerala.

Photos from Bhagwat Nursery and Garden's post 14/01/2021

🙏It gives me an immense pleasure to announce that Bhagwat Nursery and Garden as a team we’ve executed bulk order of complete 12 ton loading to Gujarat.

Timeline photos 26/12/2020

Cascabella thevetia loading

21/12/2020

2+ Feet height
/ बिट्टी 7000 quantity available in 5/6 bag. Kunjirwadi, Pune, Maharashtra.
Call/Whats-app 7038553382.

Photos from Bhagwat Nursery and Garden's post 14/09/2020

8+ Feet height
16"X16" and 14"X16" Bag size available in bulk quantity.
For more details reach us at
https://www.facebook.com/tulasinurseryandgarden/
07038553382

Timeline photos 02/08/2020

Todays loading
7038553382


All available in bulk quantity.

Timeline photos 29/07/2020

Todays loading


#शंकासुर

All roadside and divider saplings available in wholesale rate.
7038553382

Timeline photos 04/07/2020

ह्या झाडाची ऑर्डर असूनही विकले नाही...
ह्यामधील पिल्ले निघून गेल्यावर हे झाड विकुयात असा विचार मनात आला

24/06/2020

22/06/2020 loading...


Minimum order quantity 1000 pieces.
Bag Size 5"X6".
For more details check
07038553382
https://www.facebook.com/tulasinurseryandgarden/

Photos from Bhagwat Nursery and Garden's post 24/06/2020

20/06/2020 loading...
#बदाम






Available in bulk quantity.
For more details reach us at
https://www.facebook.com/tulasinurseryandgarden/
07038553382

Photos from Bhagwat Nursery and Garden's post 24/06/2020

Today's (24/06/2020) loading mix varieties



#गुलेतूरा

#संकासुर


#टेकोमा_गौडीचौडी
#टेकोमा_स्टॅन्स

For details contact 07038553382

20/06/2020

Today's loading...


Minimum order quantity 1000 pieces.
Bag Size 5"X6".
For more details check
07038553382
https://www.facebook.com/tulasinurseryandgarden/

20/06/2020
Timeline photos 16/06/2020

नवीन नर्सरीमधला पहिलाच अंकुर
First germination


#बहावा
#अमलतास

Photos from Bhagwat Nursery and Garden's post 15/06/2020

Executed another bulk order today


#टेकोमा_गौडीचौडी
#टेकोमा_स्टॅन्स
Saplings available in bulk quantity 5"X6" bag size.
For more details reach us at
7038553382
https://www.facebook.com/tulasinurseryandgarden/

15/06/2020

वृक्षप्रेमींसाठी खास देशी व दुर्मिळ झाडे उपलब्द करून देण्याचा मानस आहे, त्याकरिता नवीन विभाग सुरू करत आहे...
A separate section for native and rare trees is being started exclusively for tree lovers
, ,

Photos from Bhagwat Nursery and Garden's post 08/06/2020

Executed bulk order today



#गुलेतूरा

#संकासुर
Available in bulk quantity Red, Pink and yellow color. For more details check

07038553382

निसर्गमित्र - लालासाहेब माने 07/06/2020

निसर्गमित्र - लालासाहेब माने कोणतेही महान काम तुमच्या हातुन होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विद्यापीठातुन पीएच डी घ्यावी लागत नाही. अशी

05/06/2020

And one more.

04/06/2020

भारतीय वृक्ष लावणे का गरजेचे आहे याबद्दलचं लिखाण

भारतीय उपखंडात आढळणारी वड, पिंपळ, ताड, उंबर यासारखी शतायुषी झाडे पिढयानपिढया रुजतात आणि फोफावत जातात. देशी आणि विदेशी वृक्ष असा जेव्हा वाद घातला जातो तेव्हा हमखास केला जाणारा युक्तिवाद म्हणजे, विदेशी झाडे हिरवाई देत नाहीत का? सावली देत नाहीत का? त्यांचा काहीच उपयोग नसतो का? यासारखे प्रश्न उपस्थित केले जातात. तत्त्वत: प्रत्येक जिवंत हिरवे झाड हे झाडच असते, मात्र त्याचा स्थानिक पर्यावरणाला आणि त्यात नांदणाऱ्या जैविक संपदेला कितपत उपयोग होतो, हे पाहणे गरजेचे ठरते.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे दैनंदिन जीवनातल्या अनेक प्रश्नांवर सर्वसामान्य लोक ठिकठिकाणी हिरिरीने चर्चा करताना दिसून येतात. अशा चर्चांमध्ये नियमित चर्चिला जाणारा विषय म्हणजे वृक्षारोपण आणि त्यातही देशी झाडे लावणे योग्य की विदेशी झाडे लावणे अयोग्य, हा कळीचा मुद्दा बनतो. या 'देशी' शब्दाची साधी व्याख्या म्हणजे एतद्देशीय अशीही होऊ शकते. शालेय जीवनात भूगोलाच्या धडयात वेगळे खंड आणि त्यांची निर्मिती शिकल्याची अस्पष्ट आठवण बहुतेकांना असतेच. या खंड निर्मितीदरम्यान निर्माण झालेल्या भौगोलिक सीमा विविध प्रकारच्या नैसर्गिक बदलांना कारणीभूत ठरल्या. पुढे वेगवेगेळे झालेले खंड, आपापल्या सीमांमध्ये वेगवेगळी जीवविविधता (बायोडायव्हर्सिटी) जोपासत समृध्द होत गेले. तिथल्या स्थानिक पर्यावरण, हवामान आणि भौगोलिकतेप्रमाणे या समृध्दतेची जोपासना होत गेली. हे स्थानिक हवामान आणि त्याच हवामानात जन्मून एकमेकांना पूरक बनलेली ही जीवविविधता दुसऱ्या खंडात नेऊन रुजवायचा प्रयत्न केल्यास अर्धवट पूरक ठरते, याचे कारण त्या त्या खंडातल्या अथवा उपखंडातल्या स्थानिक वातावरणाशी ती संपदा अगदी एकरूप झालेली असते. निसर्गाच्या स्थानिक जाळयात एकरूप होऊन एकमेकांना पूरक ठरणारी ही जैविक आणि वनसंपदा स्थानिक निसर्गजाळयाबाहेर मात्र तितकी उपयोगी ठरत नाही. विशेषत: झाडांच्या बाबतीत हा प्रकार मोठया प्रमाणात होताना दिसतो.
ढोबळमानाने खंडात आणि त्याच्या उपखंडात वाढणारी झाडे परिसरात परदेशी समजली जात नाहीत. त्यांचे निसर्गजाळयातले स्थान व त्यांची उपयुक्तता ही शतकानुशतके सिध्द झालेली असते. अशिया खंडात आणि भारतीय उपखंडात आढळणारी झाडे असंबध्द ओळख न बाळगता एकमेकांशी सुसंबध्द असतात. आपल्या खंडप्राय देशाच्या एका कोपऱ्यातून आणून दुसरीकडे लावलेले झाड तिथे विदेशी ठरत नाही. मोठया प्रमाणात निसर्गवैविध्य जपणारा आपला देश आणि आसपासचा परिसर साधारण सारख्याच जातकुळीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृध्द आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात, नैसर्गिक पध्दतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे स्थानिक किंवा देशी वृक्ष अशी सोप्पी व्याख्या आपण करू शकतो. हे असे देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात. ह्या देशी झाडांमुळे अन्न, वस्त्र व निवारा ह्या मानवी गरजा पुऱ्या होण्यास मदत होतेच, त्याशिवाय पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो. या झाडांच्या सहकार्याने जगणारे अनेक जीव 'एकमेकां साह्य करू' उक्तीनेच जणू जगत असतात. देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो. विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते.

भारतीय उपखंडात आढळणारी वड, पिंपळ, ताड, उंबर यासारखी शतायुषी झाडे पिढयानपिढया रुजतात आणि फोफावत जातात. देशी आणि विदेशी वृक्ष असा जेव्हा वाद घातला जातो तेव्हा हमखास केला जाणारा युक्तिवाद म्हणजे, विदेशी झाडे हिरवाई देत नाहीत का? सावली देत नाहीत का? त्यांचा काहीच उपयोग नसतो का? यासारखे प्रश्न उपस्थित केले जातात. तत्त्वत: प्रत्येक जिवंत हिरवे झाड हे झाडच असते, मात्र त्याचा स्थानिक पर्यावरणाला आणि त्यात नांदणाऱ्या जैविक संपदेला कितपत उपयोग होतो, हे पाहणे गरजेचे ठरते. वर उल्लेखलेल्या आणि इतर अनेक देशी झाडांच्या आवतीभोवती असलेल्या पर्यावरणाला त्या झाडांचा मोठया प्रमाणात उपयोग होत असतो. देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात. वरवर पाहायला गेले, तर हे वाक्य अगदी बाळबोध वाटू शकते. पण त्यामागे पचनी न पडणारे एक वास्तव दडलेय. विदेशी झाडांवर पक्षी घरटी करत नाहीत. गुलमोहरासारख्या झाडावर क्वचितच कावळयासारखा पक्षी घरटे बनवतो. इतर कुठलेही स्थानिक पक्षी विदेशी झाडांकडे फिरकत नाहीत, कारण त्यांना ती झाडे परिचित नसतात. निव्वळ पक्षीच नाही, तर अशा झाडांवर फुलणाऱ्या रंगीत फुलांकडेही कीटक, किडे पाठ फिरवतात. झाड, त्यांची फुले, त्यातून होणारी परागक्रिया, पुढे होणारी फलधारणा ह्या सगळयावर याचा परिणाम होत असतो. स्थानिक वनसंपदेशी आपली अर्थव्यवस्था काही प्रमाणात जोडलेली असल्याने या साध्या नैसर्गिक प्रक्रियेवर होणारा प्रत्येक परिणाम यावर अवलंबलेल्या अर्थव्यवस्थेला खच्ची करत असतो. स्थानिक वृक्षसंपदेतून उत्तम प्रकारे फळे, फुले, मुळे, लाकूड यासारखी वनोपज मिळत असल्याचे शतकानुशतके सिध्द झाल्याने त्यावर अवलंबलेले व्यवसाय तयार झाले. आपल्या पूर्वजांनी विविध झाडांचे महत्त्व ओळखल्याने त्यांना वाचवण्यासाठी धर्माची जोड देऊन त्यांना संरक्षित केले होते. वडाच्या झाडाच्या परिसरात मिळणारा उत्तम प्राणवायू, त्याचे भक्कम कीडरोधक लाकूड, त्याच्या पानांचा, सालीचा, पारंब्यांचा असलेला आयुर्वेदिक उपयोग, मुळांची जमिनीला धरून ठेवण्याची उत्तम क्षमता या सगळया उपयोगांना लक्षात ठेवून त्याला धार्मिक अधिष्ठान देऊन वडाला संरक्षण देऊ केले. तीच कथा उंबराच्या उर्फ औदुंबराच्या झाडाची. उत्तम लाकूड, खाण्यास योग्य फळे, जमिनीला धरून ठेवणारी मजबूत केशमुळे, साल, पान आदींचा असलेला आयुर्वेदिक उपयोग समजून उमजून याही झाडाला धार्मिक कवच चढवल्याने हे झाड वडासाखेच पूज्य झाले. पिंपळ, चिंच, कडुनिंब यासारख्या बहुगुणी झाडांचाही याच माळेत समावेश आहे.

बहुतांश देशी झाडांना वाढीस लागणारा काळ मोठ असल्याने, हल्ली झटपटच्या जमान्यात या झाडांवर वेळखाऊ असा शिक्का मारून वनीकरणाच्या प्रक्रियेतून त्यांची लागवड पध्दतशीरपणे बाद करून टाकण्यात आली. भारतीय झाडे रुजायला, जगायला, फुलायला लागणारा काळ मोठा असल्याने विदेशी वृक्ष लावण्याकडे कल वाढला. त्यांची पटापट होणारी वाढ जोमाने वाढणारी हिरवाई म्हणून ओळखली जायला कारणीभूत ठरली. मात्र विदेशी वृक्षांच्या बेसुमार लागवडीने स्थानिक वनसंपदा अनेक ठिकाणांहून हद्दपार व्हायला लागली. साधारण अठराव्या शतकात, मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने मुंबईत आगमन करून आज संपूर्ण भारत काबीज केला आहे. गुलमोहराला येणारी लालभडक फुले आकर्षक असतात, पण ना किडे-कीटक आकर्षित करू शकत, ना पक्ष्यांना. मात्र परिसरातील इतर झाडांचे पाणी खेचून घेण्याची करामत हे झाड करते. ऑॅस्ट्रेलियातून त्याच सुमारास भारतात आणल्या गेलेल्या निलगिरीच्या झाडाने आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आजूबाजूला इतर स्थानिक झाडांचा जगण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. कानामागून येऊन तिखट झालेले असेच झाड म्हणजे सुबाभूळ. या झाडाला सुबाभूळ न म्हणता कुबाभूळच म्हणणे योग्य ठरेल. या झाडाच्या अतिलागवडीने जमिनीचे वाजलेले तीनतेरा सर्वश्रुत आहेतच. पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया यासारखी झाडे निव्वळ शोभेसाठी लावताना आपल्या पारंपरिक झाडांना सहज नाकारून आपल्याच हातांनी आपल्या पायावर आपण धोंडा पाडून घेत असतो. या विदेशी झाडांमुळे बहुतांश ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढळल्याचे निदर्शनास आले असून कित्येक ठिकाणी तो धोक्याच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. दुसऱ्या खंडातून आलेली ही झाडे, वनस्पती कित्येकदा जणू आक्रमक होऊन स्थानिक वनस्पतींना जगू देत नाहीत. यामुळे स्थानिक जीवविविधतेची अर्थात बायोडायव्हर्सिटीची साखळी कमकुवत होत जाते. दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला. आपण त्याचे नामकरण केले गाजर गवत आणि काँग्रेस गवत, पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही. नीट विचार केला तर याचे कारण लक्षात येईल, ते म्हणजे हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली.
आजमितीला आपल्याकडे बेसुमार फोफावू दिलेली ही विदेशी झाडे, देशी झाडांचा जगण्याचा दर कमी करत असून त्याचे अतिशय दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत. अनेक भारतीय झाडे ही विविध पक्ष्यांचा, किडयांचा नैसर्गिक अधिवास असल्याने, त्या झाडांच्या जागी विदेशी झाडे लावून असे नैसर्गिक आसरे उद्ध्वस्त केले जाताहेत. अशा विदेशी झाडांवर होणाऱ्या परागण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी कमकुवत होतेय. याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत.

या सगळया प्रकाराला कुठेतरी आळा घालणे गरजेच आहे. अर्थात आळा घालणे म्हणजे, स्थानिक झाडझाडोऱ्याबद्दल लोकांच्या मनात प्रबोधनद्वारे आत्मविश्वास निर्माण करणे गरजेच आहे. ह्यासाठी कमी अवधीत जोमाने वाढणारी देशी झाडे पुरस्कृत करणे गरजेच आहे. कांचन, पांगारा, बहावा, शिरीष, काटेसावर, भेरली माड, हातगा, शेवगा, कदंब, सुरंगी, सीता अशोक यासारख्या झाडांची लागवड करून ती जोपासणे गरजेचे आहे. देशी वृक्ष, त्यांचे उपयोग, स्थनिक पर्यावरणात जैविक साखळीला मदत होइल अशी हरित संपदा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आज ऑॅस्ट्रेलियासारख्या देशाने स्वत:ची स्थानिक वनसंपदा जपण्यासाठी अतिशय कडक कायदे केले असून इतर खंडांतली हरित संपदा तिथे आणण्यास पूर्ण मज्जाव आहे. हे पाहताना भविष्यपुराणातला एका सुंदर श्लोक आठवला -

अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।
कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।

अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही. (म्हणजेच त्याचे वाईट होणार नाही.) अर्वाचीन काळात अतिशय समृध्द निसर्गात नांदणाऱ्या आणि मर्यादित लोकसंख्या असणाऱ्या राष्ट्रात उपयुक्त झाडांचे महत्व जाणणारे सुज्ञ होते. आज त्याच राष्ट्रात स्थानिक वनसंपदेला उपेक्षित राहावे लागतेय, हे काळाचे दुर्दैवच नाही का? वटपौर्णिमेच्या निमित्ताने एखादा वड लावून ,जगवून, तगवून खानदानी जिवंत संपत्ती म्हणून मुलामुलीला द्यायला हरकत नाही.

यावेळी, आपला सत्यवान हायजीनचे सगळे नियम पाळूनच बाहेर जा ये करतोय नं? हे नक्की पहा.आणि अापल्या सावित्रीला मास्क सॅनिटायझर विसरू देऊ नका. एकमेकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत जागरूक राहून वटपौर्णिमा साजरी करूया.

31/05/2020

🌿🌿विदेशी झाडे का नकोत ?

मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या. निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिबलो ) बरोबर भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे ....

*दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला ....*

*आपण त्याला गाजर गवत आणि काँग्रेस गवत म्हणतो .... पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली ....*

*अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे ...*
*या झाडांच्या फुलात परागकण नाहीत त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत ... या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे ... या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या जमिनी निकृष्ट केलेल्या आहेत ...*

*या झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही ... रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणाऱ्या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे ...*

*एकंदरीत अशा विदेशी झाडांवर होणाऱ्या परागकण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी / अन्नसाखळी कमकुवत होतेय ... परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,शेळीसुद्धा खात नाहीत ....*

*माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्याला अजून कळलेले नाही हेच मोठे दुर्देव याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत ...*

*या प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर उपजीविका करणारे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे हे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत ...*

*ग्लिरिसिडीया सारख्या झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या तरी ते अपंग होतात ... मरतात ...या झाडाखालुन चालताना धाप लागते ... या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते .... जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत ...*
Forwarded

*१९७०च्या दशकात युरोपियन देशांनी जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले...*
*तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे ...*
*फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते.*
*परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत. त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही ... जिथे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे ....* *इतक्या मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर, काशीद, सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे ....*

*आता देशी झाडेच का लावायची ?*

*याबद्दल अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।*
*कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।*

*अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही.*
*हे आपल्या पुराणात सांगून ठेवलेलं आहे ... वडाला, उंबराला देवाचा दर्जा दिला गेलाय ....*
*देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते....*
*या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात....*
*पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो ...*
*देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो...*
*विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात....* *विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते....* *ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढते ...*
*ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडामध्ये आहे ...* *त्यांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाउस, चुकलेले उन्हाळा, पावसाला, थंडी यांचे चक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेवून जात आहे ....*
*देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात....* *साधारणपणे ३५० पेक्षा जास्त जातीची झाडे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात यात आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकते हे वटवाघळाला समजते....*
*यात पाडाला पिकलेला आंबा सुरुवातीला वटवाघळे खातात आणि मग शेतकरी आंबे उतरवितो आणि मग आडी लावली जाते ....*
*मुक्या प्राण्यांना हे कळते मग माणसाला कधी कळणार ...? ? ?*
*पांगारा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस ,आवळा ,आंबा , कवठ, बेल,कडुनिंब ,मोह, पळस ही झाडे न लावता निव्वळ फोटोसाठी चुकीचे वृक्षारोपण करणाऱ्या लोकांना थांबविणे गरजेचे आहे....* *अन्यथा हिरवळ दिसेल, मात्र जैवविविधता दिसणार नाही ...*

Want your business to be the top-listed Home Improvement Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

Tulasi Bulk loading
Tulasi Bulk loading

Telephone

Website

Address


Theur Phata, Kunjirwadi, Solapur Pune Highway
Pune
412201

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 6pm
Sunday 9am - 6pm

Other Nurseries & Gardening Stores in Pune (show all)
HoneyRoots Garden Care Services,Pune HoneyRoots Garden Care Services,Pune
Pune

All types of organic fertilizer and organic manure

Gardenias Nursery - Pune Gardenias Nursery - Pune
Gardenias Nursery, 311, Bhawani Peth, Ladkat Mala
Pune, 411042

All your Gardening Needs at one Place. 1. Plants 2. Pots 3. Gardening Tools 4. Fertilizers 5. Plants & Garden Maintenance Contracts

Green My Zone Green My Zone
Pune, 411040

Nursery, Rare Plants, Exotic Indoor & Outdoor Plants, Pots.

Amita's Creations Amita's Creations
Senapati Bapat Road
Pune

Hello Customers! Welcome to 'Amita's Creations', we love to create beautiful decors using plants to add a look of elegance to your homes as well as gardens. #LoveGreenSpreadGreen

Ritu Biotech Nursery Pune Ritu Biotech Nursery Pune
Sortapwadi, Tal-Haveli District Pune
Pune, 412202

Manufacturer of all seasonal, ornamental, fruits, Flower plants and supply all over India.

Aabhimanyu Rose Nursery Aabhimanyu Rose Nursery
At. Post Dahitane
Pune, 412207

Grow India Plants and Nursery Solutions Grow India Plants and Nursery Solutions
Ranjangaon
Pune, 412209

One stop solution for your garden products & landscaping services. We have variety of plants, shrubs

Shambhavi Nursery Shambhavi Nursery
G1, Sr. No. 36, Kale Padal, Near Indrayani Mangal Karyalay, Hadapsar
Pune, 411028

At Shambhavi Nursery, our goal is to help every household connect with nature and spread consciousness about having plants with their added benefits for improving the environment ...

Green Book Plant Green Book Plant
Nanded City Pune
Pune, 411041

Your home garden will look much better with various types of planters available. Whether you want to

Jungle abode Jungle abode
Pune

Let's get nature home.

Jay Malhar lwan suplayrs Jay Malhar lwan suplayrs
Fursungi Fata , Near Akash Lwan , Manjari Farm , Tel/Haveli , Dist/pune
Pune, 412307

Pune Nursery Garden Development & Maintainers Pune Nursery Garden Development & Maintainers
Pune, 411030

Garden Plants For Development Works All types of Plants