UN EXIM- Shetsarthi Market

UN EXIM- Shetsarthi Market

We are Shetkari Market. We are here to bring you a delightful shopping experience. Walk in to our st

गावरान धान्य व कडधान्य

*सेंद्रिय उत्पादने*

� पिवळा मूंग
� हिरवा मूंग
� हिरवा हरभरा
�गावरान मटकी
� गावरान हूलगा
� नाचणी
� बाजरी
� खपली गहू
� काळा वाटाणा
� जवस
�कलोजी ( ब्लॅक सीडस)
� अळीव
� काळा मनुका
�लाल मनुका
� डबल बी लाल (चित्रांग्या वॉल)
�डबल बी सफेद
� तूर सफेद
�उडीद
� हिरवा वाटाणा
� मोहरी
�धने
� तीळ गावरान
� मटकी डाळ
� राजमा
� राजगिरा
�मका स्वीट कॉर्न

09/04/2024

गुढीपाडव्याच्या सर्व पुणे , पिंपरी चिंचवडकर मित्र मंडळींना खूप खूप शुभेच्छा
#पुणेकर #पिंपरी #चिंचवड

14/02/2024

आमचे ध्येय :-
१ - घरा- घरात विषमुक्त अन्न पोचविणे.
२ - गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे.
३ - आम्ही शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यासाठी प्रयत्नशील अहोत.
४ - ग्राहकांशी आपुलकीचे नाते निर्माण करून ग्राहकाला संतूष्ट ठेवणे.
५ - ग्राहकांना कमी किंमतीत उच्च प्रतीचे सेंद्रिय उत्पादन उपलब्ध करून देणे
६ - ग्राहकांची मागणी व गरज ओळखून त्यांना पुरवठा करणे
७ - ग्राहकांची मागणी कमी वेळेत व कमी खर्चात त्यांच्या पर्यंत पोहचविणे.
८ - शेतकरी, ग्राहक व कर्मचारी ह्यांचे हित जोपासणे.

आमची कार्य करण्याची पद्धत :-
१ - आम्ही सेंद्रिय प्रमाणित असलेलेच अन्न व धान्यांची खरेदी करतो.
२ - ग्राहकांपर्यंत उच्च प्रतीचे व आरोग्यदायी अन्न पोहचवतो.
३ - आम्ही पॅकिंग करताना स्वच्छतेचे पालन करतो.
४ - कमी वेळेत उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचविणे.

*UN EXIM PVT LTD PUNE*
त्यांच्या वार्षिक उत्पन्नातील काही भाग आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून देत आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~
Verified Supplier By *UN EXIM PVT LTD Of Certified Natural Food Products* Here is my catalog:
https://wa.me/c/919657808172
Call for more information 9657808172 / 7276209142

31/01/2024

*शेतसारथी धान्य मार्केट*
उद्योगशील शेतकरी ते ग्राहक विक्री..
"प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती"
संपर्क- 9657808172 ,7276209142

🌾 *मावळचा इंद्रायणी तांदुळ*🌾
''शेतसारथीची अस्सल बिगर पॉलिश धान्ये (उत्पादने) आता मिळवा फक्त एका Click वर...
सोबतच्या लिंक वर Click करून ''शेतसारथीच्या अधिकृत वेबसाईट व्हॉटसप्स वरून खरेदी करा आणि ''शेतसारथीची बिगर,पॉलिश उत्पादने त्याच दिवशी वेळेत घरपोच मिळवा.
*ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप करा*
*लिंक वर क्लिक करा*👇
https://wa.me/c/919657808172

*मावळचा राजा इंद्रायणी तांदूळ -60₹/kg*

21/01/2024

जय श्रीराम 🙏🚩🚩

01/01/2024

शेतसारथी परीवार तर्फे आपल्या सर्व शेतकरी बांधवाना व सर्व हितचिंतक ग्राहकांना शेतसारथी परीवार तर्फे आपण सर्व शेतकरी बांधवाना व सर्व हितचिंतक ग्राहकांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎊🤩
सर्व गावरान उत्पादक शेतकरी बांधवाना येणारे वर्ष भरभराटीचे जावो हीच प्राथर्ना 😊
#नवीनवर्ष #शेतसारथी मनःपूर्वक शुभेच्छा 🎊🤩
सर्व गावरान उत्पादक शेतकरी बांधवाना येणारे वर्ष भरभराटीचे जावो हीच प्राथर्ना 😊
#नवीनवर्ष #शेतसारथी

26/12/2023

भारतामध्ये शेतकरी प्रामुख्याने ग्रामीण भागात मध्ये राहतात, तर जलद शहरीकरणामुळे आपल्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक जगतात. शेतीपासून काट्या ( वजन)पर्यंत कृषी मालाचा प्रवास अत्यंत गुंतागुंतीचा आहे ज्यामुळे किंमतींमध्ये अस्थिरता येते.
*शेतसारथी* ही कल्पना शेती उत्पादनांची पुरवठा साखळी सुधारण्याच्या आकांक्षाने जन्माला आली आहे. शेतसारथी महाराष्ट्रशी जोडणार्‍या व्यासपीठाचे प्रतिनिधित्व करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही हे लक्ष्य साध्य करण्याचे लक्ष्य ठेवतो
स्थानिक शेतकरी व उत्पादक कारागीर यांना ग्राहकांशी थेट जोडणी देऊन सशक्त बनविणे

सर्व प्रकारच्या शेतीशी संबंधित सेवांसाठी एक समग्र बाजारपेठ विकसित करुन कृषी-वाणिज्य शॉप उघडणे

सर्व शेती / अन्न उत्पादनांसाठी पसंतीचा व्यासपीठ होण्यासाठी दर्जेदार उत्पादने आणि उत्कृष्ट सेवेचा अविरत पाठपुरावा आम्ही आपल्यासाठी करत आहोत
तुम्ही आम्हाला सहकार्य करा
अस करून आपण आपल्या कुटुंबाचा व देशाचा विकास करण्यास मदत करू
*आपला शेतसारथी*
*UN EXIM PVT LTD PUNE NASHIK*

26/12/2023

📸 Look at this post on Facebook
https://www.facebook.com/share/p/iDAWXSGqXHgKibQk/?mibextid=qi2Omg

🏠🤗एकदा नक्की भेट द्या.....आणि अनुभवा गावरान धान्याचा अवीट गोडवा.....
शेतसारथी मार्केट सोबत

🍚शेतसारथी धान्य मार्केट🍚
तुमच्या जेवणात आरोग्यदायी बदल करा,
नैसर्गिक गावरान धान्याचा वापर करा...

✅ गावरान धान्य
✅ गावरान कडधान्ये
✅ विनापॉलिश डाळी
✅ विनापॉलिश तांदूळ

Original | Pure | Healthy

Delivering in entire Pune and PCMC
(Available In Retail and Wholesale)
आजच ऑर्डर करा

Photos from UN EXIM- Shetsarthi Market's post 25/12/2023

मसाले शेती - त्रिफळा

23/12/2023

रानात दिनभर राबतो, तोच आहे खरा राजा,
रानात सोनं पिकवतो, शेतकरी माझा...

टीम शेतसारथीच्या वतीने सर्वांना राष्ट्रीय किसान दिनाच्या शुभेच्छा!

15/12/2023

**धन्यवाद पिंपरी चिंचवडकर**
शेतसारथी मार्केटला तुम्ही दिलेल्या प्रेमळ प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद ....अशीच साथ राहूद्या

12/12/2023

3.5 Years Strong: *UN EXIM PVT LTD* & *Shetsarathi Market* !

For over 3.5 years, we've been proud partners with *Shetsarthi Market*, your trusted source for natural foods in Moshi, Pune!
Together, we're committed to bringing the community healthy, sustainable options and supporting local businesses. ✨

Visit Shetsarthi Market and experience the *UN EXIM PVT LTD* difference!

Place your order now at www.shetsarathi.org

Photos from UN EXIM- Shetsarthi Market's post 10/12/2023

**UN EXIM PVT LTD या कंपनीच्या शाखा न. 02 शेतसारथी मार्केट या शॉपचा भव्य शुभारंभ सोहळा पार पडला. आपण या सोहळ्यास आपला मोलाचा वेळ देऊन उपस्थित राहिलात त्या बद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. असेच प्रेम राहू द्या.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

27/11/2023

हिवाळ्यातील दमदार आहार बाजरी .
हिवाळ्यात बाजरी खाण्याचे प्रमाण वाढते.कारण हिवाळ्यात अधिक भूक लागते आणि बाजरीतील जीवन सत्वांमुळे ती भागते.बाजरीत व्हिटामिन बी,बीटाकेरोटीन,कॅल्शियम ,आयर्न,पोटाशियम,मंग्नीज,फोस्फोरस,मग्नेशियम,झिंक भरपूर प्रमाणात असते मुळव्याध ,बद्धकोष्ठता असलेल्यांनी बाजरी खाऊ नये,कारण आयुर्वेदानुसार बाजरी रुक्ष,ऋण असते. दुध वाढण्यासाठी बाजरी मुद्दाम खाण्यास देतात.बाजरीची भाकरी करताना तीळ लावतात. तसेच बाजरीची भाकरी लोणी,गुळ,ठेचा,पिठले,भरीत,मटण अश्या विविध पाककृती बरोबर खवय्ये आवडीने खातात.
हिवाळ्यात बाजरी हा एक दमदार व आरोग्य पूर्ण आहार आहे.

27/11/2023

ध्येयात प्रामाणिकपणा असेल तर निवडलेला व्यवसाय कोणताही असो एक दिवस तो ब्रँड बनतोच.✌🏻
शेतसारथी धान्य मार्केट

27/11/2023

थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून.....

27/11/2023

गावरान उत्पादने

Photos from UN EXIM- Shetsarthi Market's post 27/11/2023

एक आठवण 🌧️🌧️🌧️🌧️
कॉलेजला असताना फी भरली नव्हती म्हणून पाटील सर (मॅनेजमेंट ऑफ कॉलेज ऑफिस) सरानी मला वर्गातून बोलवून घेऊन फी घेऊन आल्याशिवाय कॉलेजला येऊ नको सांगितलं होतं. वडलांनी शेतीच्या (द्राक्षाच्या) खर्चासाठी कर्ज काढलं होतं, वडील म्हणाले तुझी फी भरु का शेतीचा खर्च करू.

परिस्थिती नुसार वडलांचं म्हणणं बरोबर होतं कारण द्राक्षा सारख्या पिकाच्या बाबतीत एखादं आजचं काम किंवा खर्च चुकला तर त्याचा वर्षाच्या उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे नाईलाजाने मला गॅप घ्यावा लागला होता.

एकतर वार्षिक पिक, एक्सपोर्टच्या दृष्टीने भरमसाठ खर्च करावा लागतो, दिवसरात्र मेहनत करावी लागते. अशा परिस्थितीत नाव शेवटपर्यंत नीट पोहोचली तर ठिक नाहीतर मध्येच अडकली तर होत्याचं नव्हतं होऊन जातं. एका चुकीच्या गोष्टीमुळे वर्षभराचं कष्ट आणि खर्च वाया जातो, नुकसान झालं तर पुढच्या वर्षी कसं उभं रहायचं हा आणखी गंभीर प्रश्न असतो...

आज नाशिक आणि इतर ठिकाणी गारपिटीने द्राक्ष आणि इतर पिकांचं नुकसान झालेलं बघून खूप वाईट वाटलं आणि मला माझे दिवस आठवले. या शेतकऱ्यांचीही काही स्वप्नं असतील त्यावर आज पावसाने पाणी फिरवलंय 😥

अशा वेळी जेवढा मोठा शेतकरी तेवढं मोठं नुकसान असतं. पाऊस पडायच्या काळात पडला नाही आणि आता लोकांच्या हाता तोंडाला आलेला घास घालवायला पडतोय. काही ठिकाणी या पावसाचा फायदा असेल काही ठिकाणी प्रचंड नुकसान आहे.

Photos from UN EXIM- Shetsarthi Market's post 25/11/2023

एक नवीन सुरुवात.... Market Pimple Gurav ,

Photos from UN EXIM- Shetsarthi Market's post 25/11/2023

पेरू काढणीला सुरुवात - शेतसारथी पेरू फार्म पुणे

Photos from UN EXIM- Shetsarthi Market's post 23/11/2023

शेतसारथी मार्केट पुणे नाशिक
नवीन सुरुवात चिकू तोडणी

Photos from UN EXIM- Shetsarthi Market's post 22/11/2023

भावांनी जपलेली व जोपलेली दराक्षीची बाग... बालपणी गावात बागेबद्दल प्रचंड कुतूहल असायचं.गावात मोजून दोन चार जणांकडं द्राक्ष बाग व्हत्या. बागायतदार यांना मोठा मान असायचा.त्यांच्या शेतात कामाला जाताना आई वडिलांबरोबर आमी बारकी लेकरं पदराला,हाताला धरून सुट्टी दिवशी सोबत जरी गेलो तरी ते कामाचं स्वरूप,तिथला सगळा डामडैल पाहून डोळ्यात असं काहीतरी भारी पाहतोय असा फील असायचा.त्या श्रीमंत वातावरणाची बरोबरी करायचीही हिम्मत व्हायची नाही.आपला जुंधळा,तूरी,गहू,हरबरा,आंब्याचं झाड हे आमच्या लेखी मोठेपणाचं प्रतिक.एकत्र कुटूंब पद्धतीत खूप सारं पाहता आलं.आई बापाच्या कष्टाचं मोल डोळ्यांनी पाहता आलं,त्याची जाणीव झाली,चटके बसले तेव्हा कुठं शहाणपण आलं अन आमी भानावर आलो.चार पुस्तकं मन लावून शिकलो.त्यामुळं आता मन आभाळात अन पाय जमिनीवर,त्या मातीत घट्ट रोवलेले असावे वाटतात... 🌱🍃😍

20/11/2023
19/11/2023

कोणीतरी खरेच म्हटले आहे की, "भारत हा खेड्यांचा देश आहे आणि शेतकरी हा देशाचा आत्मा आहे." मलाही तसेच वाटते. शेतकरी हा एक सन्माननीय भाग आहे आणि आपल्या देशात शेती हा एक उदात्त व्यवसाय मानला जातो. त्यांना "अन्नदाता" देखील म्हणतात, ज्याचा अर्थ "अन्नदाता" आहे. या तर्कानुसार, भारतातील शेतकरी सुखी आणि समृद्ध असला पाहिजे परंतु विडंबना अशी आहे की वास्तव त्याच्या अगदी उलट आहे.

यामुळेच शेतकऱ्यांची मुले त्यांच्या पालकांचा व्यवसाय करू इच्छित नाहीत. सरकारी आकडेवारीनुसार, सुमारे अडीच हजार शेतकरी शेती सोडून उपजीविकेच्या शोधात दररोज शहरांकडे स्थलांतर करतात. हाच कल असाच चालू राहिला, तर अशी वेळ येऊ शकते की एकही शेतकरी उरणार नाही आणि आपला देश “अन्न अधिशेष” पासून वळेल, ज्याला आपण आता “अन्नाची कमतरता” देतो.

मला वाटायचे की वस्तूंचे भाव वाढले की शेतकऱ्याला फायदा होतो पण वास्तव हे आहे की बहुतांश पैसा मध्यमवर्गानेच हडप केला आहे. त्यामुळे शेतकरी नेहमीच हतबल असतो. जेव्हा भरपूर पीक येते तेव्हा उत्पादनांच्या किमती घसरतात आणि अनेक वेळा त्याला आपला माल सरकारला किंवा मध्यस्थांना कवडीमोल भावाने विकावा लागतो आणि जेव्हा दुष्काळ किंवा पूर येतो तेव्हा काय होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
त्या साठीच *शेतसारथी धान्य मार्केट थेट शेतकरी ते ग्राहक* या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हितासाठी एक प्रगतशील क्रांती घेऊन आलाय , आता शेतकरी कुठे न जाता Directly संपर्क साधायचा आणि आपले शेती उत्पादन ऑनलाइन विकायचा तुम्ही तुमच्या कडे असलेले शेती उत्पादन चे संपूर्ण माहिती Shetsarathi च्या वेबसाइट किंव्हा व्हाट्स अँप ला पाठवावी ,स्वतः तुमच्या जागेवरून तुमचे संपूर्ण शेती उत्पादन घेऊन जाईल आणि त्याच क्षणी तुम्हाला मार्केट पेक्षा चांगले पैसे पण देण्याचा प्रयत्न आम्ही करू ज्या मुळे शेतकऱ्याला पैसे पण मिळतील आणि शेती उत्पादन विकायला कोणतेहि कष्ट सहन करावे लागणार नाही.
तर चला होऊया Shetsarathi Market चा भाग आणि करूया आपल्या देशातील शेतकरी समृद्ध.

Photos from UN EXIM- Shetsarthi Market's post 18/11/2023

शेतसारथी धान्य मार्केट - या दिवाळी मध्ये आपल्या परीवाराकडून सर्व महिला कर्मचारी व हितचिंतक सप्लायर, कामगार याना दिवाली भेट देण्यात आल्या यावेळी उत्तम आवारे, नवनाथ कुंभाडे, हांडे काका, हे सर्व मान्यवर उपस्थित होते

18/11/2023

*6000 + ग्राहकांचा टप्पा पुर्ण*..
*आमची गावरान उत्पादने पसंद केलेल्या 6000 + कुटुंबाचे, शेतसारथी परिवारा तर्फे लाख लाख धन्यवाद*...
*अल्पावधी काळामध्ये मधे आपण दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसाद मुळे आम्ही खूपच प्रोत्साहित झालेलो आहोत*...
*आमच्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेवुन या पुढेही आमची उत्पादने अधिक गुणवत्तापुर्ण व विश्वास पूर्वक ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही कटिब्ध आहोत*...
*शेतसारथी उद्योग समुह*
🙏🏻7770013005 🙏🏻

Photos from UN EXIM- Shetsarthi Market's post 16/11/2023

हिरवे शिवार - गावरान काकडी तोडणी सुरुवात @पुणे

Photos from UN EXIM- Shetsarthi Market's post 16/11/2023

सुरुवात धान्य मळणी....@पुणे- नाशिक

16/11/2023

store

आपल्याला माहीत असो किंवा नसो आपल्या दैनंदिन जीवनात आपण 5-25% भेसळ असलेल्या वस्तू सेवन करतो.भेसळयुक्त पदार्थ खाल्याने आपल्या आरोग्यावर दूरगामी वाईट परिणाम होतात.ह्या भेसळयुक्त पदार्थांच्या गर्दीत शेतसारथी धान्य मार्केट ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली ती स्वतःच्या स्वछ आणि पूर्णतः पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचवल्यामुळे .मराठी माणसे जितकी मधासारखी रसाळ आहेत तितकेच shetsarathi store वरून आपण order केलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ,पूर्णतः नैसर्गिक,गावरान,चवदार आणि आरोग्यवर्धक असल्याचा दाखला देते.

समाधानी ग्राहक हीच आमची ओळख

लगेच आपली बुक करा
https://wa.me/c/919657808172

store

आपल्याला माहीत असो किंवा नसो आपल्या दैनंदिन जीवनात आपण 5-25% भेसळ असलेल्या वस्तू सेवन करतो.भेसळयुक्त पदार्थ खाल्याने आपल्या आरोग्यावर दूरगामी वाईट परिणाम होतात.ह्या भेसळयुक्त पदार्थांच्या गर्दीत शेतसारथी धान्य मार्केट ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली ती स्वतःच्या स्वछ आणि पूर्णतः पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचवल्यामुळे .मराठी माणसे जितकी मधासारखी रसाळ आहेत तितकेच shetsarathi store वरून आपण order केलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ,पूर्णतः नैसर्गिक,गावरान,चवदार आणि आरोग्यवर्धक असल्याचा दाखला देते.

समाधानी ग्राहक हीच आमची ओळख

लगेच आपली बुक करा
https://wa.me/c/919657808172

15/11/2023

सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा

*भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!*

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Videos (show all)

#shetsarathifarms  #unexim  #nashikpune UN EXIM- Shetsarthi Market
🙏 ⛈️🌧️पावसाचे चे आगमन झाल्यामुळे आज पासून शेती कामांना सुरुवात झाली .... शेतसारथी फार्म हाऊस 🐂🐄🏡😍
*शेतसारथी धान्य मार्केट* उद्योगशील शेतकरी ते ग्राहक विक्री.."प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती"संपर्क- 9657808172 ,72762091...
**आपले कुटुंब आपली जबाबदारी**                                    - *आपले शेतसारथी*Mediclaim आहे म्हणजे आपली सोय आहे असं ...
शेतसारथी मार्केट..... आपल्या हक्काचे आपले दुकान
वाढते आजारपण आणि विविध रोग याला जबाबदार आपल्या खाण्याच्या सवयी किंवा कमी दर्जाचे धान्य कडधान्य इतर उत्पादने  बहुदा घातक ...
सुरुवात..... शेतीकामाची
A2 Milk & Deshi Ghee Available in Pune (PCMC)
Shetsarathi Market Moshi Pune-Nashik

Telephone

Website

Address


UN EXIM PVT LTD PUNE
Pune
412105

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm